"नारळी पौर्णिमा स्पेशल" ओल्या नारळाच्या पोळ्या by Namrata's CookBook : १५

Namokar's picture
Namokar in पाककृती
14 Aug 2019 - 2:46 am

लागणारा वेळ:
१ तास

लागणारे जिन्नस:

ओलं खोबर (२५०ग्रॅ. )
गूळ/साखर(१५० ग्रॅ. )
वेलची पुड
तुप
गव्हाचे पीठ (१५० ग्रॅ. )
तेल
पाणी
मीठ

क्रमवार पाककृती:
१. सगळ्यात आधी कणिक मळून घेऊ
२. एका परातीमध्ये गव्हाचे पीठ ,त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्या ,लागेलतसे पाणी घालून कणिक मळून घ्या

३. कणिक मळून झालीकी ,एका कापडामध्ये झाकून ठेवा

४. ओलं खोबर खोउन घ्या/ छोटे तुकडे करुन मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या

५. गॅसवर पॅन गरम करायला ठेवा
६. आता त्यामध्ये बारीक केलेले नारळ घालून मध्यम गॅसवर परतून घ्या
साधारण खोबऱ्यातील ओलसरपणा कमी होईपर्यंत ८-१० मिनीटे परतून घ्यायचे आहे

७. आता पॅनमध्ये खोबर्याचा किस एका बाजूला करुन गूळ घाला (गॅस मंद आचेवर करुन घ्या)

८. गूळ थोडेसे पातळ झालेकी किसलेले खोबरे त्यामध्ये एकत्र करुन घ्या
९. आता त्यामध्ये वेलची पुड घालून एकत्र करुन घ्या

१०. (गॅस मध्यम आचेवर करुन घ्या) १५ मिनीटे हे मिश्रण परतायचे आहे
साधारण मिश्रण थोडे जाडसर होत आलेकी गॅस बंद करुन मिश्र्ण थंड करुन घ्यावे

११. आता कणकेचे गोळे करावे.
१२. कणकेच्या गोळ्याची पुरी लाटून त्यामध्ये सारण भारुन पुरीच्या सर्व बाजू एकत्र आणून बंद करावे.

१३. थोडे पीठ लावून पोळी अलगद लाटून घ्यावी
१४. (गॅस मध्यम आचेवर करुन घ्या) तवा गरम करून पोळ्या तूपावर खरपूस भाजून घ्या.

अधिक टिपा:
या पोळ्या २ दिवस टिकतात.
या साहित्यामध्ये बरोबर ६ पोळ्या होतात
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/yr3-1_rlUCg

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

14 Aug 2019 - 8:09 am | उगा काहितरीच

वॉव ! मस्त दिसत आहेत पोळ्या. खोबरं व्यवस्थित भाजल्या जायला हवं असं वाटतेय.

जॉनविक्क's picture

14 Aug 2019 - 8:25 am | जॉनविक्क

सारण अजून किंचित भाजायला हवे, असे वाटते. पोळीतून सारण बाहेर आले नाहीये, ह्यासाठी १०० गुण!

महासंग्राम's picture

14 Aug 2019 - 10:02 am | महासंग्राम
पद्मावति's picture

14 Aug 2019 - 11:35 am | पद्मावति

मस्तंच.

जालिम लोशन's picture

14 Aug 2019 - 3:18 pm | जालिम लोशन

मस्त

आईशप्पथ एकदा तरी कट्टा जमवा ताई ... आपण मुंबईला असाल तर नक्की कळवा .. काय आहे , नारळाचे कुठलेही पदार्थ माझ्यासाठी जीव कि प्राण .. आणि त्यात हे असं चित्रदर्शी वर्णन म्हणजे अत्याचार हो अत्याचार ,, दुसरं काही नाही .. ते सारण बाहेर आलं तरी चालेल , मी सारणाचा कानही वाया जाऊ देणार नाही .. पण कट्ट्याला बोलत तर निदान सहा तरी माझ्या नावाने बाजूला काढून ठेवा .. अहो उद्या राक्षबांधन आहे ,, आणि माझ्यासारखा जबरदस्त , देखणा , राजबिंडा , सुकुमार , सुडौल ?, पण गृहकृत्यदक्ष आणि सदैव बहिणींच्या रक्षणासाठी हाती शस्त्र घेऊन उभा ठाकलेला, मला भाऊ माना किंवा आपल्या मुलासमान माना ,, पण निदान साहतरी पोळ्या करून वाढा आणि मग हाण म्हणा .. बघा हा खिलजी , कसा गुरावानी तुटून पडतो ते ..

धन्यवाद उगा काहितरीच ,जॉनविक्क,यशोधरा,महासंग्राम,पद्मावति,जालिम लोशन,खिलजि,मदनबाण