ज्वारीच्या लाह्या by Namrata's CookBook : १४

Namokar's picture
Namokar in पाककृती
14 Aug 2019 - 2:12 am

खरतर नागपंचमीसाठी ही पाककृती लिहायची होती पण काही अडचणींमुळे जमले नाही

लागणारा वेळ:
१ दिवस
लागणारे जिन्नस:

साहित्य:
१ कप ज्वारी
२ कप पाणी

क्रमवार पाककृती:
१. पाणी गरम करा
२. ज्वारी गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवा

३. आता यातील पाणी काढून टाका आणि कॉटनच्या कपड्यावर छान वाळेपर्यंत पसरवा / कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवा (त्यालाच उमले म्हणतात)

४. आता कढई गरम करायल ठेवा
८. जेव्हा कढई गरम होईल तेव्हा त्यात वाळलेली ज्वारी घाला
९. नॅपकिन / सूती कपड्याने नीट हलवायचे आहे

१०. काही मिनिटांत ज्वारीच्या लाह्या /ज्वारीचे पॉपकॉर्न तयार होतील

अधिक टिपा:
*ओलसर ज्वारीच्या लाह्या करायला घेतल्यातर ५०% पेक्षा कमी ज्वारीच्या लाह्या तायार होतील
ज्वारी पुर्ण नीट वाळवलीतरच जास्त लाह्या तयार होतील
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/FXOprlNCvQc

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

14 Aug 2019 - 8:22 am | तुषार काळभोर

नागपंचमीला घरच्या लाह्या वापरायची आयडिया चांगलीय. किंचित उशिरा लेख आला :)

अवांतर- आधी वर्ष-सहा महिन्यातून एकदा act2 पॉपकॉर्न आणायचो. तीस रुपयाला अर्धी मूठ भरेल एवढे दाणे.
मग एकदा युट्यूबवर बघून मक्याच्या दाण्यांचे केले. झक्कास झाले. आता पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं बनवतो. तीस रुपयात पावशेर मका. त्यात मल्टीप्लेक्समधल्या मोठ्या टबएवढे दहा तरी टब भरतील.

जॉनविक्क's picture

14 Aug 2019 - 8:24 am | जॉनविक्क

जालिम लोशन's picture

14 Aug 2019 - 3:24 pm | जालिम लोशन

छान

मक्याच्या लाह्या कशा करायच्या?

तुषार काळभोर's picture

14 Aug 2019 - 10:07 pm | तुषार काळभोर

मक्याचे दाणे घ्या. मूठभर दाण्यांत (एक लिटर दुध बसणारे ) पातेले भरून पॉपकॉर्न बनतील. दुकानात साधा मका 30 रुपये किलो आणि पॉपकॉर्न मका 30 रुपये पावशेर मिळतो. मी साधा मका कधी वापरला नाही.

एक कुकर घ्या. झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून ठेवा.
कुकर आतून पूर्ण कोरडा असावा. त्यात एक चमचाभर (5 मिली) तेल टाका. त्यात मक्याचे दाणे टाका. मक्याचे सगळे दाणे तेलात व्यवस्थित माखले पाहिजेत.

आता कुकर गॅसवर ठेवा. (गॅस अर्थात चालू करायचा आहे).
झाकण कुकरवर उलटे ठेवा. म्हणजे हवा कोंडून राहत नाही आणि पॉपकॉर्न बनताना दाणे बाहेर उडत नाहीत. 2-3 मिनिटात फटाके फुटल्यासारखा आवाज सुरू होईल. आता 10-15 सेकंदानी कुकर हलवत राहा, म्हणजे पॉपकॉर्नच्या वर अडकलेले दाणे तळाला जाऊन गरम होतील. ज्यावेळी फटाक्यांचा आवाज एक फटाका प्रति सेकंद यापेक्षा कमी दराने ऐकू येईल तेव्हा गॅस बंद करा.
पॉपकॉर्न तयार असतील . चवीनुसार वरून मीठ भुरभुरावा.
ताजे ताजे पॉपकॉर्न खायला एकदम मजा येते!!

अनिंद्य's picture

23 Aug 2019 - 2:04 pm | अनिंद्य

@ Namokar,

ज्वारीच्या लाह्या फेव्हरेट पदार्थ. तो बनवायला इतका सोप्पा असेल हे माहित नव्हतं.
क्रमवार-सचित्र रेसीपीबद्दल आभार.

स्वच्छता आणि टापटीप याबद्दल तुम्हाला एक जादा गुण :-)