भूपाळी (देवद्वार छंद)

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in विशेष
8 Nov 2008 - 6:09 pm
छंदशास्त्र

आम्ही नुकतीच धोंडोपंतांची नव्याने सुरु झालेली छंदशास्त्राची शिकवणी लावलेली आहे. हा पहिल्या धड्यावरचा गृहपाठ.

उठा हो दयाळा
प्रभात जाहली
पाहा उजळली
पूर्व दिशा

भेटीसाठी झाले
जन सारे गोळां
भक्तांचा हा मेळां
वाट पाहे

दाखवा हो रूप
सावळें सुंदर
अति मनोहर
आम्हालागीं

तुम्ही राम आम्हा
तुम्ही कृष्ण आम्हा
विठ्ठलही आम्हा
तुम्हाठायी

द्या हो सर्वां सुख
आरोग्य सावली
करा ब्रीदावली
काही सार्थ

भटू म्हणे नाही
मजला कवित्व
केवळ ममत्व
ईश्वराचे

अजाणतेपणी
काही केला यत्न
दगडच रत्न
माना ऐसे

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

8 Nov 2008 - 6:13 pm | मदनबाण

व्वा...ट्रोजराव्..मस्तच्...आणि पंतांचेही आभार देवद्वार छंद बद्दल.. :)

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

टारझन's picture

8 Nov 2008 - 6:20 pm | टारझन

आर्रेच्च्या भटुर्‍या ... तु ही लिहू लागलास की ... तुला शेरा - अ+

जबरा ....

-(अकवी)टारू

सहज's picture

8 Nov 2008 - 7:15 pm | सहज

झकास प्रयत्न
तुम्ही असा केला
देव तृप्त झाला
भूपाळीने

आधीच मर्कट
त्यात पद्य प्याला
पंतांनी दिधला
लायसन्स

मीनल's picture

8 Nov 2008 - 7:23 pm | मीनल

छान आहे.
पण पहिल्या ३ ओळीत यमक हवे ना?
की असे ही छंदात चालते?

एनी वे, भूपाळी मस्त आहे.

मीनल.

धोंडोपंत's picture

8 Nov 2008 - 7:40 pm | धोंडोपंत

वा वा वा वा,

सुंदर रचना. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

छंदबद्ध काव्याची मजा काय आहे हे वरील रचना पाहून लगेच समजेल.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

बेसनलाडू's picture

8 Nov 2008 - 9:54 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

9 Nov 2008 - 9:59 am | विसोबा खेचर

अत्यंत सुरेख व सात्विक काव्य..!

तात्या.

दत्ता काळे's picture

9 Nov 2008 - 3:36 pm | दत्ता काळे

भटू म्हणे नाही
मजला कवित्व
केवळ ममत्व
ईश्वराचे

. . . नेम धरून गुंफलयं. मस्तच.