चान्द्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं!

बहुगुणी's picture
बहुगुणी in काथ्याकूट
8 Nov 2008 - 6:02 pm
गाभा: 

टी ऑफ आय मधील बातमी पुढे काय? कुणी माहिती सांगितली तर वाचायला आवडेल. चिनी ब्लॉग्स वर मात्र या मोहिमेच्या यशाविषयी बर्‍याच कुशंका व्यक्त केल्या जाताहेत असं वाचण्यात आलं, वस्तुस्थिती काय आहे?

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

8 Nov 2008 - 6:11 pm | विनायक प्रभू

चिन्याना मलावरोध झाला आहे. कायम चूर्ण वाल्याबरोबर बोलणी चालू आहेत, इलाजासाठी. इथे इनो चालणार नाही.

आनंद घारे's picture

8 Nov 2008 - 8:19 pm | आनंद घारे

चांद्रयानाच्या मोहिमेचे खालील प्रमुख टप्पे आहेत.
१. पृथ्वीवरून उड्डाण
२. अंतराळातून पृथ्वीचे अवलोकन करीत चंद्राकडे गमन
३.चंद्राच्या कक्षेत प्रवेश
४. चंद्राच्या कक्षेत १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे चंद्राभोवती नियमितपणे घिरट्या घालणे हे मुख्य काम आहे. हे काम करतांना खालील गोष्टी करायचे योजिले आहे.
१. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे.
२. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे
३. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या कक्षेचा अभ्यास करणे
४. या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी जवळून घेतलेली माहिती जमा करणे.
या मोहिमेतले पहिले तीन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. चौथ्याची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

या संपूर्ण कालावधीत चांद्रयानाकडून शक्य तेवढी माहिती पृथ्वीवरील केंद्राकडे पाठवत राहिली जाईल. येथील प्रयोगशाळांमध्ये त्याचे विश्लेषण होत राहील. यांतून नवनव्या शास्त्रीय गोष्टी समजत जातील व त्यांचा भविष्यकाळात करण्याच्या प्रयोगात उपयोग होईल. कदाचित पृथ्वीवरील जीवनात उपयोगी पडणारे शोधसुध्दा त्यावरून लागू शकतात. अंतरिक्ष संशोधनासाठी नासाने केलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या कित्याक गोष्टी आज सामान्य माणसाच्या वापरात आल्या आहेत.

वरती आनंदघनांनी सांगितलेल्या टप्प्यांपैकी चवथ्या टप्प्यातील तिसर्‍या भागाची-चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या कक्षेचा अभ्यास करण्याची- उद्या सुरुवात होतेय असं दिसतंय, रात्री दहा वाजता.

आणि पुढच्या मानवरहित चांद्रयानाची (चांद्रयान २) उड्डाण वेळही २०१२ निश्चित झालीय. त्याआधी, २०११ च्या सुमाराला, आदित्य ही सूर्यमोहिम निघतेय.

अनिता's picture

9 Nov 2008 - 10:03 am | अनिता

ह्या चिनी लोका॑च्या अ॑तराळ-भ्रमणाच्या रसभरीत बातम्या त्या॑चे यान उड्ण्याआधिच प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे त्या॑ना भारताचे प्रामाणिक यश खुपत आहे..

अनिता's picture

9 Nov 2008 - 10:04 am | अनिता

ह्या चिनी लोका॑च्या अ॑तराळ-भ्रमणाच्या रसभरीत बातम्या त्या॑चे यान उड्ण्याआधिच प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे त्या॑ना भारताचे प्रामाणिक यश खुपत आहे..

शिशिर's picture

9 Nov 2008 - 7:42 pm | शिशिर

अरे ह्यात त्यान्च्या बारीक डोळ्यान्चा दोष आहे.

मदनबाण's picture

9 Nov 2008 - 8:24 pm | मदनबाण

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन... ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे !!!

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

रामपुरी's picture

10 Nov 2008 - 10:47 am | रामपुरी

जाऊन त्यांच्या डोळ्याच्या फटी जरा मोठ्या करून येईन म्हणतो

शिशिर's picture

14 Nov 2008 - 5:31 pm | शिशिर

चन्द्र यान चन्द्रा पासून १०० कि.मी. अंतरा वर आहे. आज रात्री भारता चा झेन्डा सुध्धा चन्द्रा वर पोचेल. तेव्हा चीन चा पोटात खरच दुखेल.

अनंत छंदी's picture

14 Nov 2008 - 5:58 pm | अनंत छंदी

लय भारी राव! आता सात पंचेचाळीसला आमी बी आमचं यान चंद्रावर न्ह्येयाचा इचार करतोय! शेलिब्रेट का काय ते कराय नकू का?

आनंद घारे's picture

15 Nov 2008 - 7:49 pm | आनंद घारे

मी दिलेल्या यादीमधला चौथा टप्पा (खाली दिलेला) आता सुरू झाला आहे. त्यातल्या ३ व ४ या गोष्टी झाल्या आहेत. भारताचा राष्ट्रीय ध्वज चंद्रावर पोचला आहे. १ व २ पुढील दोन वर्षे चालत राहतील.
४. चंद्राच्या कक्षेत १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे चंद्राभोवती नियमितपणे घिरट्या घालणे हे मुख्य काम आहे. हे काम करतांना खालील गोष्टी करायचे योजिले आहे.
१. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे.
२. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे
३. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या कक्षेचा अभ्यास करणे
४. या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी जवळून घेतलेली माहिती जमा करणे.

आनंद घारे
माझे लेखन आवडले असेल तर कृपया इथेसुद्धा भेट द्यावी.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Nov 2008 - 9:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कालच एक नवीन गोष्ट कळली की चंद्राचं गुरूत्वाकर्षण सगळ्या बाजूंनी समान (सिमेट्रीकल) नाही. चंद्र जेवढ्या वेळात स्वतःभोवती फिरतो तेवढ्याच वेळात पृथ्वीभोवती फिरतो त्यामुळे चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरुन दिसते आणि चंद्राच्या एकाच बाजूने पृथ्वी दिसते ही गोष्ट बर्‍याच लोकांना माहित असेल. पण त्यामुळे चंद्रावर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असमान झालं आहे त्यामुळे चंद्राच्या आपल्या बाजूला प्रचंड जास्त प्रमाणात ज्वालामुखी आहेत (होते?). खालच्या चित्रात पहा, डाव्या बाजूच्या चित्रात जे मोठे काळे डाग दिसत आहेत तीच ती मोठी पठारं.

कालच एक नवीन गोष्ट कळली की चंद्राचं गुरूत्वाकर्षण सगळ्या बाजूंनी समान (सिमेट्रीकल) नाही. चंद्र जेवढ्या वेळात स्वतःभोवती फिरतो तेवढ्याच वेळात पृथ्वीभोवती फिरतो त्यामुळे चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरुन दिसते आणि चंद्राच्या एकाच बाजूने पृथ्वी दिसते ही गोष्ट बर्‍याच लोकांना माहित असेल. पण त्यामुळे चंद्रावर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असमान झालं आहे त्यामुळे चंद्राच्या आपल्या बाजूला प्रचंड जास्त प्रमाणात ज्वालामुखी आहेत (होते?).

आपल्यादिशेला असलेली बाजू

लांबची बाजू

चंंद्राच्या आपल्या बाजूला जेवढी पठारं आहेत तेवढी दुसर्‍या बाजूला नाहित आणि या पठारांच्या असमान विभागणीमुळे चंद्राचं गुरुत्वाकर्षण सिमेट्रीकल नाही. त्यामुळे एखादी गोष्ट चंद्राभोवती महिन्या-दोन महिन्यांपेक्षा जास्त स्थिर कक्षेत फिरती ठेवायची असेल तर त्याच्या विषुववृत्तापासून काही विशिष्ट अंशात कललेल्या वृत्तातच ती गोष्ट असणं भाग आहे, (माझ्या आठवणीप्रमाणे ८६.५, ४३.२ अंश, असे काही आकड्यांवर फारसा विश्वास ठेवू नये.) नाहीतर ती गोष्ट फारतर दोन महिने त्या कक्षेत राहून शेवटी चंद्रावर कोसळते.

आपल्या चांद्रयानाच्या बाबतीत हीच गोष्ट महत्त्वाची आहे, की ते यान एका विशिष्ट कक्षेत स्थिर करणे. या यानातून पाठवलेले सिग्नल्स रेडीओ लहरींच्या रुपात पाठवले जात असून, बंगळूरूच्या जवळ एक रेडीओ दुर्बिण आहे ती गोळा करत आहे.

(चंद्राचे फोटो विकीपीडीयावरुन साभार)