माझे आजोबा आटगांवला असताना त्यांच्या कडे एक नेपाळी गुरखा खानसामा होता,तो अशी भाजी करायचा. अशी बाबा त्यांच्या लहानपणीची आठवण सांगतात.
साहित्य-
४,५ बटाटे,२ टे-स्पून तेल,हळद१/२ चहाचा चमचा
मिरपूड १ चहाचा चमचा,१/४ चमचा तिखट,मीठ चवीनुसार,कोथिंबीर
कृती-
बटाटे साले काढून लांब चिरा(फ्रेंच फ्राइज सारखे).तेल तापत टाका,त्यात हळद घाला,बटाटे घाला,मिरपूड घाला,तिखट घाला.परता, झाकण ठेवा,बटाटे शिजत आले की मीठ घाला.अधून मधून परता नाहीतर बटाटा खाली लागतो.कोथिंबीर घालून सजवा.
पोळी/फुलक्यांबरोबर खा.
मी २ टे-स्पून लिहिले आहे पण या भाजीला तेल थोडे जास्त लागते.भाजी झाली की कढईतून दुसर्या वाडग्यात काढून उरलेल्या तेलात आमटी होते इतके तेल लागते,नाहीतर भाजी खाली लागते. नॉनस्टीक पॅन मध्ये कमी तेल लागेल.
प्रतिक्रिया
8 Nov 2008 - 5:31 pm | सहज
बटाटा हा ब्रह्मदेवाचे वरदान आहे :-)
बटाट्याची भाजी
पद्धत नेपाळी
फुलके वा पोळी
हाणा संगे
:D
8 Nov 2008 - 5:35 pm | सुनील
बटाटा न आवडणारा मनुष्य मी आजवर पाहिला नाही!
चटकन होणारी भाजी. फोटोही छान दिसतोय.
अवांतर - सहजरावांमध्ये धोंडोपंत संचारला वाट्टं!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Nov 2008 - 8:32 pm | वेताळ
आज बटाट्याचा विषय निघाला आहे म्हणुन एक प्रेमचंदाची एक कथा आठवली.ती एक एदखाऊ बाप व एदखाऊ मुलगा ह्याच्या बद्दल आहे. त्यात मुलाची बायको गरोदर असते व तिला वेदना सुरु झालेल्या असतात.मुलगा व बाप त्यामुळे दिवसभर उपाशी असतात . त्याना भुकेसमोर त्या बाईच्या वेदना दिसत नाहीत.ते रात्री एका शेजारच्या शेतातुन बटाटे चोरुन आणतात.चिखलात बुडवुन ते बटाटे जाळात भाजायला टाकतात. बाप मुलाला म्हणतो बाबा तुझी बायको वेदनेने तळमळत आहे तु तिच्या साठी सुईणीला बोलवुन आण. पण पोराला वाटते मी जर बोलवायला गेलो तर बाप सगळे बटाटे खाणार. तो जायचे टाळतो व भाजलेले बटाटे सोलुन बापा बरोबर खात बसतो.इकडे वेदनेने त्या बाईचा मृत्यु होतो . दुसरया दिवशी जागे होउन ते चहा मागायला तिच्या कडे जातात ,तेव्हा त्याना समजते तिचा मृत्यु झाला आहे. अशी ती मनाला चटका लावणारी कथा होती. त्यावर टिव्ही सिरिएल पण चालु होती.
ही कथा आठवायला बटाटा हे एक कारण आहे. बटाटे विस्तवात भाजल्या नंतर कसे लागतात हे कोणाला माहित आहे का? साधारणता उत्तर भारता मध्ये असे बटाटे भाजुन खातात. ज्यादा माहिती असेल तर देणे
वेताळ
8 Nov 2008 - 9:57 pm | वल्लरी
स्वाती ताई,
![](http://lh5.ggpht.com/_3e0QSn3rpbU/SRW7MRTCyFI/AAAAAAAABJs/y4ePk4IdtVM/s144/08112008492.jpg)
तुमची रेसीपी वाचन्यापुर्वी मी आज बटाट्याची काप केली होती.
बटाट्यचा कुठ्लाहि प्रकार खाण्यास रुचकरच लागतो.
बटाट्याचा विषय निघाला म्हणुन डकवते एक फोटो,,,, ;)
9 Nov 2008 - 9:59 am | विसोबा खेचर
सुरेखच दिसतोय नेपाळी बटाटा..:)
आज-उद्याकडे नक्की करणार..
आपला,
(गुरखा) तात्या.
9 Nov 2008 - 10:15 am | ऋषिकेश
बटाटा नेपाळी
सहज सुंदर
भुक हाच वर
खवैय्यासी
खवैयांची मजा
धन्यु स्वातीताई
पाककृती देई
नवनवी
-(देवाद्वारचा) ऋषिकेश
10 Nov 2008 - 9:47 pm | प्राजु
मस्त. करेन नक्कि.
जया तुझ्या कापाचे फोटोही मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Mar 2009 - 11:52 pm | मस्त कलंदर
संगणक जाल या विषयात Routing Algorithm मध्ये Hot Potato Algorithm नावाचा एक गमतीदार प्रकार होता... नि त्यामुळे तो चांगलाच लक्षात राहीला... गरम बटाटा जसा तोंडात न ठेवता... पट्कन गिळून तरी टाकावा लागतो किंवा थुंकावा लागतो, तसाच काहीसा प्रकार येणार्या packet सोबत होतो... गरमागरम वडा खाताना गरम बटाटा घासात आला.. की याची आठवण हट्कून होतेच होते... पण वेताळांनी उल्लेखिलेली प्रेमचंदांची कफन नावाची कथाही स्मरते..
16 Apr 2010 - 4:13 pm | झुम्बर
फरच भारि लगतो नेपलि बटाटा सर्वनी खल्लि मस्त्पैकि
16 Apr 2010 - 4:47 pm | गणपा
बटाटा हे एक मानव जातीला लाभलेल वरदान आहे.
घरात काय नसल तरी ऐनवेळी नुसतीच वेळ मारुन नेता येत नाही तर एकसे बढीया एक पाककृती करता येतात त्यापण सहज आणि सोप्या वेळ नखाणार्या..
स्वाती ताई नेपाळी बटाटे आवडेश :)
16 Apr 2010 - 5:04 pm | उग्रसेन
बटाट्याचं कायबी बनवा लय जोरदार लागतो हादडायला.
स्वाती ताई नेपाळी बटाटे आवडेश
बाबुराव :)