अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ९/११/१९ सकाळी १०.३० पासून निकाल वाचन
आधीचे शीर्षक : अयोध्या : सर्वोच्च न्यायालयातील दैनंदीन सुनावणी
कथित रामजन्मभूमी (काहींच्या मते बाबरी मस्जिद) जमीन विवाद सामंजस्याने मिटावा अशी स्वतः सर्वोच्च न्यायालयाची इच्छा होती आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तसा एक प्रयत्न करून पाहीला पण यश उभयपक्षात समेट घडवण्यात यश आले नाही तेव्हा परवापासून सर्वोच्च न्यायालयाने खटला दैनंदीन सुनावणीस परवा पासून घेतला आहे.
* मी बर्याच दिवसांची प्रत्यक्ष सुनावणी ट्विटरवर वाचून त्याचे दुवे देण्याचा प्रयत्न केला पण मलाही सर्व दिवसांसाथी वेळ देणे झाले नाही. सुनावणी एकुण ४० दिवस म्हणजे १६ ओक्टोबर पर्यंत चालली. दिवसजिज्ञासूंपैकीकुणी उर्वरीत दिवसांच्या सुनावणीचे दुवे शोधून क्रमवार देण्यात साहाय करु शकले तर उत्तमच. तुर्तास तरी ते काम अर्धवट समजावे
*** नमनाला घडाभर ***
न्यायालयीन सुनावणींच्या प्रत्यक्ष प्रक्षेपणांना सर्वोच्च न्यायालयाची अनुकूलता नसली तरी न्यायालयीन सुनावणी आणि प्रक्रीयांचे पारदर्शक समतोल असे प्रत्यक्ष वृत्तांकन / विवेचन शक्य त्या प्रमाणात जनते समोर जावे अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने इतर केसेसच्या निमीत्ताने मागे केलेली आहे.
अशा दैनंदीन सुनावणीच्या उपलब्ध वृत्तांकनांचा मागोवा या धागालेख चर्चेच्या माध्यमातून मिपाकरांपर्यंत पोहोचावा असा या धागा चर्चेचा उद्देश्य आहे. या खटल्याचे तुर्तास तरी एकतर मुख्यधारेतील माध्यमांनी प्रत्यक्ष वृत्तांकन न देता दिवसाच्या शेवटी देणे चालू आहे, शिवाय वृत्तसंस्थांच्या वृत्तांकनाचा भर हेडलाईन ग्रॅबींग हे महत्वाचे गमक असल्यामुळे न्यायाधिशांनी लिहिलेले अंतीम निकाल वाचे पर्यंत कोणतीही माहिती परिपूर्ण ठरू शकत नाही हि मर्यदा लक्षात घेऊनच ह्या चर्चेत सहभागी झाले पाहीजे . तसेही न्यायालयीन प्रक्रीया क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या असतात. निष्कर्ष घाईकरणे भावनावश होणे कायद्याचे कंगोरे नीट समजलेले नसतानाच दुसर्यांसमोर (मिपाबाहेर) अर्धवट विषद करून अफवांना खतपाणी जाणार नाही कायदा हातात घेण्याचे समर्थन होणार नाही याची प्रत्येकाने स्वतः बद्दल एक जबाबदार नागरीक म्हणून काळजी घेणे श्रेयस्कर असावे. ह्या धाग्यात माहिती चर्चा सहभागींच्या साठी उत्तरदायीत्वास नकार लागू हे नमुद करणे समयोचित ठरावे.
*** विषय ***
अज्ञेय असल्यामुळे माझी व्यक्तिगत भूमिका वस्तुतः तटस्थ आहे आणि माझ्या व्यक्तिगत भूमीकेची अंशतः मांडणी मागील एका धागा प्रतिसादातून केली आहे. त्यात मंदिरवादिंच्या भूमिकेची पुरेशी सकारात्मक दखलही घेण्याचा माझ्या परीने प्रयास केला आहे स्वतः पुरातत्व उत्खनन केलेले डॉ. के. के. मोहम्मद तसेच इतिहास अभ्यासक मिनाक्षी जैन यांच्या मंदिर समर्थनार्थ भूमिकांची दखल त्या धाग्यातील प्रतिसादातून घेतली गेली याची इथे नोंद घेणे श्रेयस्कर असावे.
माझ्या दृष्टीने 'एकाचवेळी तिहेरी तलाक' विरोधी विधेयक ३७० रद्द करणे अशा सुधारणावादाच्या भिंत्ती उभ्या रहात जे सुधारणांचे अंतीम मंदिर असेल त्यात राम आपसूकच असेल. ईश्वरापुढे नत होण्यासाठी विशेष स्थळांची गरज कोणत्याही धर्मात असण्याचे कारण नाही, तशी ती इस्लाम मध्ये नाही, ब्रह्मा वीष्णू महेश गणेस ते ३३ कोटी देवतां बद्दलच्या श्रद्धा जन्मस्थान माहित नसूनही जोपासल्या जातच आहेत. अर्थात मी मागच्या धागा प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे अन्याय झाल्याचे सिद्ध होत असेल तर त्याचे परिमार्जन झाले पाहीजे. आणि पुरातत्व उत्खनन केलेले डॉ. के. के. मोहम्मद तसेच इतिहास अभ्यासक मिनाक्षी जैन यांना ऐकल्यावर पुरातत्वीय दृष्ट्या तिथे पुर्वी मंदिर असण्याची शक्यता योग्य वाटते .
अर्थात न्यायालयात जमिन विषयक दावे सहसा पुरातत्वीय आधारावर नव्हे प्रॉपर्टी ओनरशीप अंशतः पझेशनच्या आधारावर लढवले जातात पब्लिक मेमरी तोंडी साक्षीं आजिबात चालत नाही असे नाही पण कागदोपत्री पुराव्यांवर अधिक भर असतो आणि सर्वोच्च न्यायालयाने खटला चालल्यास ह्या केसकडे प्रॉपर्टीकेस म्हणूनच पाहीले जाईल हे तसे पुर्वीच स्पष्ट केले आहे. मिनाक्षी जैन काही वेगळ्या बाबींकडे लक्ष्य वेधताता हे खरे असले तरी अलाहाबाद उच्चन्यायलयाचा निकाल आला तेव्हा मी बर्यापैकी अचंबित होतो कारण बर्याच वर्षांपुर्वी मी जेव्हा मासिकातील लेखात आलेल्या कागदपत्रांची माहिती घेतली तेव्हा तो जन्मभूमीवाद्यांच्या बाजूने हाती काही लागेल असे वाटले नव्हते असे आठवते. -मी राजीव गांधी अथवा लालकृष्ण अडवानींच्या जागी असतो तर केसची सुनावणी होईल हे पाहीले असते कायदेशीर दूष्ट्या भक्कम आधार नसलेल्या बाबतीत केवळ श्रद्धेवर अवलंबून राजकारण नक्कीच केले नसते, कायदेशीर आणि ऐतिहासिक दृष्ट्या अधिक सबळ पुरावे असलेल्या जागा राजकारणासाठी उपलब्ध होऊ शकल्या असत्याच किंवा किमान श्रद्धेच्या राजकारणात कायदा हातात घेतला जाणार नाही यासाठी अधिक सजग राहीलो असतो- आणि प्रॉपर्टी विषयक कागदपत्रे जन्मभूमीवाद्यांच्याबाजूने पुरेशी भक्कम नसण्याचा आत्मविश्वासामुळे विरोधीबाजूची मंडळी अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुचवूनही पड घेताना दिसत नसावीत असा माझा व्यक्तिगत कयास आहे. अर्थात पब्लिक मेमरीचा भाग आणि ततसंबंधी पुरातत्वीय पुरावे सर्वोच्च न्यायालय कितपत स्विकारेल यावर मंदीरवाद्यांचे यश अवलंबून असेल असे वाटते - आणि नेमक्या यावेळी कायदा हातात घेऊन केलेल्या पडझडीच्यावेळी मिळालेले पुरात्वतीय आधार साशंकीत म्हणून स्विकारण्यास नाईलाज दर्शवला तर कायदा हातात घेऊन झालेली पडझड योग्य होती का याचा विचारकरण्याचीही वेळ येऊ शकते नाही असे नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या अगदी कालच्या सुनावणीत श्री रामलल्ला विराजमान याचे पुजारीपण निभावण्याचा दावा असलेल्या निर्मोही आखाड्यास कागदपत्रे दाखवता आली नाहीत त्यांचे वकील श्री सुशिलकुमार जैन गोंधळलेले होते ? आणि न्यायालयाने त्यांना अधिक व्यवस्थित पुर्व तयारी करून येण्यास सांगितले. सुशिल कुमार जैनांचा भर अलाहबाद उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे समिक्षणाचा दृष्टीकोण सर्वोच्च न्यायालयाने ठेवावा कागदपत्रे मुळातून तपासण्यावर भर देऊ नये असा असावा,, पण केसचे एकुण महत्व पहाता सर्वोच्च न्यायालयीन न्यायाधिश महोदयांचा भर महत्वाच्या कागदपत्राम्ची व्यक्तिशः पडताळणी करण्यावरही भर असावा.
ज्या प्रमाणे सजीव नसलेली कॉर्पोरेट कंपनी व्यक्ती समजून कंपनीच्या वतीने केस लढवता येते तसेच काहीसे मंदिरातील मुर्तींच्या नावे व्यक्ती समजून केस लढता येते तर अयोध्येत कथित रामजन्मस्थानी २०व्या शतकाच्या मध्यात अकस्मिक प्रकट झालेल्या श्रीरामलल्ला विराजमान मुर्तीचे प्रतिनिधीत्व करणारे वकील के पराशरन युक्तिवादात अधिक अनुभवी कसलेले असावेत. त्यांनी आज म्हणजे तिसर्या दिवशीच्या युक्तिवादात जसे मुर्तीस मुर्तीचे व्यक्ति म्हणून गृहीत धरता येते तसे एकुण विवादीत रामजन्मभूमीस सुद्धा व्यक्ती म्हणून गृहीत धरावे कारण हिंदू धर्मात केवळ मुर्तीच नव्हे तर वास्तुही दैवीशक्ती/व्यक्ती म्हणून पुजनीय असते असा नवाच युक्तिवाद मांडण्याचाचा प्रयत्न केला अशा प्रकारची टेक्निकॅलिती सर्वोच्च न्यायालयासमोर प्रथमच आल्याने न्यायालयाने पुढे विचारकरू आधी पुरावे बघू द्या हा फोकस जारी ठेवण्याचे ठरवले असावे असे वाटते, के पराशरांचाही भर लोक्श्रद्धा कायदेशीर शब्दात पब्लिक मेमरी आणि पुरातवतीय आधारांवर असेल असे कालच्या म्हणजे दुसर्या दिवसाचे वृत्तांकन वाचून वाटले…
असो ही सुनावणी सोमवार ते शुक्रवार दररोज म्हणजे आठवड्याचे पाच दिवस होण्याची शक्यता आहे..
*** ***
संवैधानिक पीठ में जस्टिस डी. वाई. चंद्रचूड़, जस्टिस एस. ए. बोबडे, जस्टिस अशोक भूषण जस्टिस एस. ए. नजीर
लेखन चालू
*** सोशल मिडीया वापरताना माहिती पडताळण्याची काळजी घ्या ***
खात्रीपुर्वकतेची कल्पना नाही
* ट्विटर टेग्स : #AyodhyaHearing , #AyodhyaCase
* ट्वितर हँडल्स : @LiveLawIndia , @TheLeaflet_in
***मागिल चर्चा संदर्भ आणि बाह्य दुवे ***
* https://barandbench.com/ayodhya-live-updates-supreme-court-day-1/
* https://barandbench.com/ayodhya-hearing-live-updates-supreme-court-day-2/
* दिवस ५ वा uniindia
दिवस ५ वा लाईव्ह लॉ ट्विटर हँडल
* https://en.wikipedia.org/wiki/Ayodhya_dispute विकिपीडियातील सर्व नोंदी विश्वासार्हच असतील याची खात्री देता येत नाही याची नोंद घ्या.
*** ***
हिंदूबाजूच्या मांडणीत ससंदर्भ मुद्देसुद मांडणी अभावानेच दिसते. मीनाक्षी जैनांच्या शिवाय hritambhara.com/ वरील स्मीता मुखर्जींचा प्रयत्न त्यातल्या त्यात बरा वाटतो. त्यांच्या लेख मालेच्या आतापर्यंतच्या आठ भागांचे दुवे जिज्ञासूंसाठी देऊन ठेवत आहे.
१, २, ३, ४, ५, ६, ७, ८
***
अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे , मराठी शुद्धलेखन व्याकरण चर्चा व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी शक्यतोवर ससंदर्भ आणि कायद्यास अनुसरून चर्चा करण्यासाठी अनेक आभार.
प्रतिक्रिया
26 Jun 2024 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> अर्रेरे प्रोफेश्वरांची लागण झाली तुम्हाला...
अरे देवा...झाली का आमची आठवण.
संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन
-दिलीप बिरुटे
25 Jun 2024 - 10:13 pm | सर टोबी
मागच्या दहा वर्षात बदललं नाही. पुढे कधी बदलेल हे माहित नाही. भ्रष्टाचार, मस्तवालपणा तेवढा सर्व सीमा पार करतोय. मग कोणत्या एवढ्या आवेशाने तुम्ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांची पाठराखण करीत आहात?
संपादित.
-व्यवस्थापन
26 Jun 2024 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामान्य माणूस ते देश परदेशातील मिळून जवळपास पाच हजार कोटी राम मंदिरासाठी देणगी जमा झाल्याचे वाचनात आले. इतका गाजावाजा आणि रामलल्लाचा जो राजकीय इव्हेंट करण्यात आला ते पाहता रामलल्लाला मंदिरात स्थापन करण्याची घाईच झाली त्यात काही वाद नाही.
सामान्य माणसाचे घर जरी असले तरी ते गळत तर नाही ना,हे पाहुन घर अगदी राहण्यायोग्य जो पर्यन्त होत नाही, तो पर्यन्त सामान्य माणूस वास्तू प्रवेश करीत नाही. इथे तर थेट हजारो-लाखोंच्या श्रद्धाळुच्या आस्थेचा प्रश्न असलेल्या प्रभु रामाचा प्रश्न होता. काल पहिल्याच पावसात छत गळायला लागलं. मुख्य मंदिरात पाणी साचलं त्याचा निचरा व्हायची व्यवस्था नाही, बांधकामात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप मुख्य मंदिरपुजारी दास यानी केला.
बळजबरी राहावयास गेलेल्या रामलल्लाने जी काय नाराजी दाखवायची ती निकालाच्या माध्यमातून दाखवली. अजुन मंदिराचे काम सुरु आहे, किंवा राहिले असेल काम नीट-नेटकेपणाने व्हायला हवे तशी अपेक्षा भक्त आणि सामान्यांनी करणे गैर नाही.
-दिलीप बिरुटे
26 Jun 2024 - 11:47 am | पॅट्रीक जेड
प्रभू श्रीरामानी घाईघाईत उद्घाटन केल्याची नाराजी लोकसभा निवडणुकीत दाखवली. आता ह्या मंदिर गळतीची नाराजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दाखवतील. जय श्रीराम.
26 Jun 2024 - 5:20 pm | चौकस२१२
मग त्याच प्रभू रामाने एका पक्षाची गाडी ९९ वर थांबवली आणि एक पक्षाचे २४० तर भेळेचे मिळून २३५ अशी समज पण समाजाला दिली ..हे हि उघड पने कुठलेही आढेवेढे ना घेता मान्य करा! पुढील ५ वर्षे तरी
(खरी जळतोय कुठे कि, हे मंदिर झालेच कसे ? त्यातून हा पक्ष सत्तेवर आलाच कसा+ १० वर्षे टिकलाच कसा आणि + सगळं काही करून परत सत्तेत आलाच कसा ?? )
26 Jun 2024 - 6:11 pm | पॅट्रीक जेड
ईडी, सीबीआय, इंकम टॅक्स, इलेक्टरल बाँड्स, विरोधकांचे अकाऊंट गोठवणे, भ्रष्टांची खोगीरभरती, प्रचंड पैसा, अर्धवट मंदिर उद्घाटन असूनही फक्त २४० तर काहीही नसताना ९९ जागा. असा न्याय केला प्रभू श्रीरामचंद्रानी.
26 Jun 2024 - 6:18 pm | चौकस२१२
तर काहीही नसताना ९९ जागा.
मिया गीर येतो भी टांग उपर
९९ हे २४० पेक्षा भारी हे कुठले गणित
बसा घोळवत
२०१४ आधीची पापे विसरलात काय?
26 Jun 2024 - 6:23 pm | पॅट्रीक जेड
३०३ चे २४० जळवले मोठे की ४४ चे ९९ झालेले??
२०१४ आधीची पापे विसरलात काय? आय आयटी, आयआयएम कॉलेजेस, मारुती कंपनी, बँकांचे राष्ट्रीयकरण, पाकिस्तानचे दोन तुकडे, अणुबॉम्ब, उदारीकरण,राईट टू एदुकेशन, राईट टू फूड आणखी किती पापे सांगू?
27 Jun 2024 - 12:44 pm | टीपीके
आयआयटी, आयआयएम बद्दल चंद्रसूर्यकुमार यांनी आधीच लिहिले आहे, ते वाचा. मी द्विरुक्ती टाळतो.
बँकांचे राष्ट्रीयकरण - ज्याचे पैशांवर नियंत्रण त्याच्यासाठी सत्ता मिळवणे सोपे. बँकांचे राष्ट्रीयकरण याचा देशाला जितका फायदा झाला (नक्की काय फायदा झाला हा प्रचंड विवादास्पद मुद्दा आहे, बहुतेक तोटाच झाला) त्याहून जास्त त्या काळाच्या तथाकथित गुंगी गुडियाला जुन्यांना डावलून सत्तेवरची मांड, पकड मजबूत करायला मदत झाली.
उदारीकरण - हे गांधी परिवारापेक्षा राव यांचे योगदान आहे, तेच राव ज्यांचे उघडपणे नाव कोणीही काँग्रेसवाला घेत नाही, घेऊ शकत नाही. मला जरी राव यांची कारकीर्द पूर्ण आठवत नसली तरी बहुतेक भारताला लाभलेले सर्वोकृष्ट पंतप्रधान तेच असतील असे वाटते. ज्या परिस्थितीत मोदी सत्तेवर आले त्या परिस्थितीत राव सत्तेवर आले असते तर एखाद्यावेळेस त्यांनी मोदींहून जास्त चांगले काम केले असते.
पाकिस्तानचे दोन तुकडे - हे परत विवादास्पद आहे. शत्रूची जखम भळभळती राहण्यात आपला फायदा असतो. इकडे आपणच शत्रूचे ऑपेरेशन स्वतःच्या पैशाने करून दिले. उलट काहीही न घेता (जसे काश्मीर, आपले सैनिक जे युद्धकैदी होते - निदान हे तरी परत आणायला पाहिजे होते) आपण पाकिस्तानचे युद्धकैदी परत दिले. खरंतर १९७१ ला सैनिकी विजय झाला पण राजकीय पराजय झाला. तरीही आज ५५ वर्षांनी बोलणे सोपे आहे, त्या काळी काय परिस्थिती होती, काय अजून पर्याय होते हे माहीत नसल्याने इंदिरा गांधींच्या गट्स बद्दल आणि सुरवातीच्या आंतरराष्ट्रीय व्यूहाबद्दल त्यांना गुण द्यायला हरकत नसावी. त्यांचे अंध विरोधक सोडले तर बहुतेक सगळेच जण हे मान्य करतील.
राईट टू एदुकेशन - माझ्या आठवणीप्रमाणे साहाना यांनी मिपावर याबद्दल विस्तृत लिहिले आहे, त्यामुळे परत द्विरुक्ती टाळतो
तर कृपया जर चुकून काही चांगले केले असेल तर त्याचा वापर करून समर्थन करा. असल्या फालतू गोष्टींनी नका करू. आणि जर आठवत नसतील तर वाचन वाढावा किंवा निष्पक्ष लोकांना विचारा. काँग्रेस काळातही काही चांगल्या गोष्टी झाल्या पण आश्चर्य आहे की ज्या खरंच चांगल्या गोष्टी केल्या त्या कोणी का नाही बोलत?
परत एकदा विनंती, एकांगी नका लिहू
5 Jul 2024 - 7:35 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
उगाच कालापव्यय.
26 Jun 2024 - 4:52 pm | चौकस२१२
अजुन मंदिराचे काम सुरु आहे, किंवा राहिले असेल काम नीट-नेटकेपणाने व्हायला हवे तशी अपेक्षा भक्त आणि सामान्यांनी करणे गैर नाही.
अगदी मान्य
बळजबरी राहावयास गेलेल्या रामलल्लाने जी काय नाराजी दाखवायची ती निकालाच्या माध्यमातून दाखवली. या शेरेबाजी ची काहीच गरज नाही ... असो एकूण काय चुका दाखवयाला दोन पाऊले पुढे असता तुम्ही पण कौतिक कार्याची कधीच दानत नाही
३ ऱ्या वेळेला पूर्ण लोकशाही मार्गाने निवडून आलेलया पक्षाचे राजय मान्य करा ....
आणि हो जाता जाता तुम्ही "ऑस्ट्रेल्यात कस काय होते" हे विचारण्यासाधीच सांगतो इथे आम्ही कसेही मतदान झाले तरी एकदा उजवे एकदा डावे आलटून पालटून राजय करतात ते जनता गोड मानून देश चालत राहतो ...
आजच बघा आमचं डाव्या विचारसरणी च्या पंतप्रधांनी ज्युलियन असांज या अमेरिकेचं दृष्टीने देशद्रोही असलेलया पत्रकाराला १४ वर्षांनंतर सोडून आणले अमेरिकेचं जबड्यातून ऑस्ट्रेल्यात नागरिक म्हणून , त्यात विरोधी उजव्यानी बिब्बा घातलं नाही .. मोदींनी पाकिस्तानातून कोणाला सोडवून आणले तर विरोधक मात्र रडीचे राजकारण खेळतात .... घ्या
26 Jun 2024 - 5:43 am | चौकस२१२
पहिली गोष्ट आंधळे पनाणे प्रत्येक गोष्टीचे समर्थन करीत नाहीय अजिबात ,, चूक ती चूक अचंबा याचा वाटतो ( सभ्य शब्दात )
- तुम्चे सारखे फक्त चुका काढण्यात च धन्य मानतात
- लोकशाही ने दिलेला तिसरा कौल पण मान्य कार्याची कुवत नाही तुमचात ,
- तसेच १० वर्षांपूर्वी कीवा पुढील १००० वर्षे कधीच काँग्रेस आणि डावखुर्यांच्या शिया कोणीच सत्तेत आले हेच तुम्हाला खपत नाही
- त्याआधी ५० वर्षे तरी किँग्रेस ने आगमय चुका केल्या तेव्हा कुठे होता , एकीकडे मोदींना हुकूमशाह म्हणताना ७५ साली भारतात एकमेव हुमशाही आली ते विसरता .. आज एकदम "भ्रष्टाचार, मस्तवालपणा तेवढा सर्व सीमा पार करतोय." अरे पण परवाच ९९ आले ना आणि तोरा काय तर स्वतः २७२+ जमवले
- राष्ट्रीय सुरक्षे बद्दल पक्ष हित बाजूला ठेव्वयचे असते पण तिथे हि " आपण विधवा झालो तरी हरकत नाही पण सवाट रंडकी झाली पाहिलेज या साठी नवऱ्याला मारलेले चालेल" हि घृणास्पद वृत्ती
+ नेहरू कुटंबाची "पाठराखण" किती वर्षे करणार तुमच्या सारखे ..
26 Jun 2024 - 12:04 pm | सर टोबी
अस्स? म्हणजे पंप्र जे काही करतील किंवा जे काही होईल ते चांगलेच असं समजायचं?
तुमचं बरं आहे.
संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन
आणि गांधी नेहरु यांच्या विषयी कोणी कितीही घाणेरडी कमेंट केली तरी आम्ही त्याने दुःखी होत नाही. तुमचे पंप्र जे आयतं विकून खातायत ना ते गांधी नेहरूंनी मिळवलं आहे.
26 Jun 2024 - 1:04 pm | नठ्यारा
सर टोबी,
मोदी आयतं खातात, असं म्हणता? हा आरोप कुठलाही विरोधी पक्ष कितीही कट्टर विरोधक असला तरीही करीत नाही. बहुधा गांधीनेहरूंनी काहीच मिळवलेलं दिसंत नाहीये.
-नाठाळ नठ्या
26 Jun 2024 - 7:24 pm | नठ्यारा
लोकहो,
राममंदिरास गळती लागल्याची बातमी निराधार आहे. काही भागाचे काम चालू असल्याने सदर प्रकार तात्पुरता जलनिचरा आहे.
संबंधित बातमी :
-नाठाळ नठ्या
26 Jun 2024 - 8:01 pm | पॅट्रीक जेड
हा मिश्रा चालू माणूस दिसतोय. गळतीचे व्हिडीओ व्हायरल
झालेत तरीही हा खोटारडा बेधडक खोटे बोलत सुटतोय. हिंदूंचं दुर्दैव की असे खोटारडे नराधम समितीच्या पदावर आहे. अश्या नराधमास नी त्याला ह्या पदावर बसवणाऱ्या मोठ्या नराधमास चपलेने बडवायला हवे.
3 Jul 2024 - 7:50 pm | पॅट्रीक जेड
पहिल्या पावसात अयोध्येतील ८५० कोटी रुपये खर्चून बनवलेला रामपथ १५ ठिकाणी खड्डे पडून धसलाय. तीन चाट इंजिनिअर सस्पेंड करुन योगी सरकार आपला भ्रष्टाचार लपवायचा प्रयत्न करतंय. रेल्वे स्टेशन बस स्टँड पाण्याखाली गेलेत. एकंदरीत योगी सरकार आणी भाजपची पोल खुललीय.
4 Jul 2024 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो, पाऊस म्हटला की पावसात खड्डे पडायचेच. थोडं लिक बिक व्हायचंच. आता तुम्ही लोकांनी निवडून दिले असते तर, खड्डे बिड्डे भरले असते. ;)
-दिलीप बिरुटे
4 Jul 2024 - 9:43 pm | पॅट्रीक जेड
हाहाहा. हाथरस ला पण त्यामुळेच सुरक्षा दिली नसावी योगीने. मरा साल्याहो. आम्हाला मते देत नाही ना
6 Jul 2024 - 8:21 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
हाथरस हादसा कब और कैसे हुआ?: बाबा के पंडाल में पहुंचने से लेकर भगदड़ तक, सिलसिलेवार ढंग से पूरा घटनाक्रम
https://www.amarujala.com/uttar-pradesh/hathras-accident-know-how-accide...
------
नलोड करें
होम
उत्तर प्रदेश
लखनऊ
वाराणसी
गोरखपुर
मेरठ
कानपुर
आगरा
नोएडा
प्रयागराज
अलीगढ़
झांसी
बरेली
गाजियाबाद
मुरादाबाद
मथुरा
अमरोहा
अमेठी
अम्बेडकरनगर
आजमगढ़
इटावा
उन्नाव
एटा
औरैया
कन्नौज
कुशीनगर
कौशाम्बी
ग़ाज़ीपुर
बस्ती
गोंडा
बहराइच
लखीमपुर खीरी
घाटमपुर
जालौन
चंदौली
चित्रकूट
पीलीभीत
देवरिया
फतेहपुर
फर्रुखाबाद
फ़िरोज़ाबाद
अयोध्या
बदायूं
बलरामपुर
बलिया
बांदा
बागपत
बाराबंकी
बिजनौर
बुलंदशहर
भदोही
मउ
महराजगंज
महोबा
मिर्ज़ापुर
मुज़्ज़फरनगर
मैनपुरी
रायबरेली
रामपुर
ललितपुर
शामली
शाहजहांपुर
श्रावस्ती
संत कबीरनगर
संभल
सहारनपुर
सिद्धार्थनगर
सीतापुर
सुल्तानपुर
सोनभद्र
हमीरपुर
हरदोई
हाथरस
हापुड़
जौनपुर
Vegetable
CRPF
Khabron Ke Khiladi
Juhi Chawla
Lisa Nandy
Agniveer Death
यूपी का मौसम
Gujarat
Rohini Acharya
Paris Olympics
हाथरस हादसा कब और कैसे हुआ?: बाबा के पंडाल में पहुंचने से लेकर भगदड़ तक, सिलसिलेवार ढंग से पूरा घटनाक्रम
अमर उजाला नेटवर्क, नोएडा Published by: आकाश दुबे Updated Fri, 05 Jul 2024 01:40 PM IST
विज्ञापन
सार
पुलिस व प्रत्यक्षदर्शी 2 जुलाई से ही घटना के लिए लाठी-डंडे वाले सेवादारों व सुरक्षागार्डों को जिम्मेदार मान रहे हैं। अगर वे रोकटोक न करते, धक्का मुक्की न करते तो शायद इतनी बड़ी घटना न होती।
उत्तर प्रदेश फटाफट: पढ़ें सभी खबरें 60s में
Hathras Accident know how accident happened complete incident in one click
Hathras Accident - फोटो : अमर उजाला
Follow Us
विज्ञापन
विस्तार
वॉट्सऐप चैनल फॉलो करें
हाथरस के सिकंदराराऊ के फुलरई मुगलगढ़ी गांव में 2 जुलाई, मंगलवार के दिन जो अमंगल हुआ शायद ही उसे कभी भुलाया जा सके। भगदड़ में 121 लोगों की जान गई, जिनमें ज्यादातर महिलाएं हैं। कई लोग घायल हो गए। घटना के बाद लोगों में दर्द है तो आयोजकों की लापरवाही पर गुस्सा भी। जिस आयोजन के लिए 80 हजार लोगों की अनुमति ली गई, वहां पर 2.50 लाख से अधिक लोग आ गए थे। यह हादसा कब और कैसे हुआ? इस हादसे के पीछे कौन गुनहगार हैं? अब तक पुलिस कार्यवाई कहां तक पहुंची है? आइए जानते हैं इन सवालों के जवाब।
हाथरस हादसे की टाइम लाइन
2 जुलाई, 12 बजे दोपहर: सत्संग शुरू
Trending Videos
मंगलवार को हाथरस के सिकंदराराऊ के फुलरई मुगलगढ़ी गांव में 2 जुलाई, मंगलवार को साकार विश्वहरि बाबा उर्फ भोले बाबा का सत्संग शुरू हुआ। सत्संग में 80 हजार लोगों की अनुमति के बावजूद करीब 2.50 लाख से अधिक लोग आ गए।
विज्ञापन
12.30 बजे दोपहर: साकार नारायण हरि बाबा पंडाल में पहुंचे
दोपहर 12.30 बजे साकार हरि बाबा पंडाल में पहुंचे और उनके पहुंचे ही भीड़ उत्साहित हो उठी। बाबा की प्राइवेट आर्मी ट्रैफिक व्यवस्था से लेकर, पानी और दूसरे इंतजाम देख रही थी। प्रत्यक्षदर्शियों के मुताबिक, सत्संग में लोगों को मोबाइल निकालने तक की अनुमति नहीं थी। जो भी व्यक्ति वीडियो बना रहा था, उस पर बाबा की प्राइवेट आर्मी लाठी बरसा रही थी।
स्थानीय लोगों के अनुसार, जब बाबा का काफिला निकला तब भीड़ को रोक दिया गया। इस दौरान चरणों की रज लेने के चक्कर में अनुयायी अनियंत्रित हो गए। भगदड़ के दौरान लोग मरते रहे और बाबा के कारिंदे गाड़ियों से भागते रहे। किसी ने भी रुककर हालात को जानने की कोशिश नहीं की।