रामगड किल्ला

अभिजित भिडे's picture
अभिजित भिडे in भटकंती
2 Aug 2019 - 11:51 pm

रामगड म्हणजे शोले सिनेमातील रामगड नव्हे तर कोकणातील एक दुर्ग आहे. कणकवली आचरा मार्गावर कणकवलीपासुन 10 कीमी वर हा गढीवजा दुर्ग आहे.
आमच्या एका ट्रेकर मित्राला महाराष्ट्रातले असे कमी प्रसिद्ध पण ऐतिहासिक मूल्य असलेले दुर्ग शोधून सर करण्याचा ध्यास आहे. त्याने अशाच एका चिंब ऑगस्ट महिन्यात रामगड ला जायचा बेत आखला अणि आमच्यासारखी चार समउत्साही मंडळी लगेच तयार झाली. बारामाही आसने सहजगत्या उपलब्ध असणाऱ्या डबल डेकर एक्सप्रेस मुळे एकाच दिवसात परत येण्याचे आरक्षण केले .
ठरलेल्या दिवशी भल्या पहाटे ठाण्याहून ट्रेन पकडली. पनवेल , पेण , वीर , खेड , चिपळूण , रत्नागिरी अशी को.रे ची एरवी पेंगुळलेली व फ़क्त ट्रेन पुरतीच जागी असणारी स्थानके घेत आमची गाडी कणकवलीला पोचली .
कोकणप्रवास मग तो रस्त्याने असो वा रेल्वेने ,नेहमीच मला खुणावत आलाय.
निसर्गाने आधीच मुक्तहस्ताने उधळण केलेली ही भार्गव भूमि पावसाळ्यात तर हिरवा चुडा ल्यालेल्या नववधूसम अधिकच सुंदर दिसते.
तर कोणत्याही प्रकारची कधीच घाई नसलेल्या अशा कणकवली स्थानकाबाहेरुन बराच वेळ घासघिस करुन एका रिक्शावाल्याला (परतीच्या बोलीवर )पटवले.
आचरा मार्गावरची छोटी एकदोन गावे पार करुन अर्ध्या तासात रामगडला पोहोचलो. दुर्ग
पायापासून जेमतेम अडीचशे तीनशे फूटच उंच असेल. तटबंदी आणि दोन प्रवेशदारे अजून शाबूत आहेत. किल्ल्यावर सहा तोफा जमिनीत उभ्या रोवलेल्या अवस्थेत आढळतात. तटबंदीमध्ये तोफांची आणि टेहळणीसाठी नेढि आहेत. बुरुजावरून आजूबाजूचा बराचसा टापू नजरेत येतो. भुरभुरणाऱ्या पावसाने आसमंत चिंब हिरवा केला होता. सिंधुदुर्गाच्या जवळ असलेला हा दुर्ग बहुतेक सिंधुदुर्गाच्या रक्षणासाठी आणि किनारपट्टी प्रदेशावर नियंत्रण राखण्यासाठी बांधलेला असावा. पण दुर्दैवाने रामगड संबधी ऐतिहासिक संदर्भ वा माहिती फारशी उपलब्द्ध नाही.अर्ध्रया एक तासात आम्ही दुर्ग उतरलो व पायथ्याशी असलेल्या एका मंदिराच्या आवारात क्षुधग्नि शांत केला .
रिक्शावालाही जास्त ताटकळावे न लागल्यामुळे खुश झाला अणि वाजविपेक्षा अंमळ लवकरच कणकवली स्थानकात सोडले.पण मनात अजुन रामगड च होता.भग्नावस्थेतले असे अनेक दुर्ग tm महाराष्ट्रामध्ये इतिहासाची साक्ष देत unsung heroes सारखे उभे आहेत की ज्यांची नावे ही आपल्याला माहित नाहीत. अनामिक खंत अणि नविन दुर्गभेटीचा आनंद अश्या संमिश्र भावनेने ट्रेन मधे बसलो ते अधिकाधिक दुर्गभेटीच्या निश्चयानेच ....

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Aug 2019 - 2:04 am | मुक्त विहारि

पण फोटो हवे होते.

फोटो शिवाय प्रवास वर्णनाला मजा येत नाही. (आमच्या सारख्या आळशी मामाणसांची सोय होते)

दुर्गविहारी's picture

19 Aug 2019 - 7:50 pm | दुर्गविहारी

भटंकतीच्या धाग्यात फोटो मस्ट असतात अन्यथा मि.पा.वर तो फाउल धरतात, तेव्हा पुढच्या वेळी फोटो टाका. काही अडचण आल्यास साहित्य संपादक किंवा मला व्य.नि. केला तरी चालेल.
बाकी त्याच गडावर गणपतीची सुरेख मुर्ती आहे. तुम्ही ती पाहिली नाही के ती तेथून हलवली हे समजायला मार्ग नाही.
तुमचा लिखाणाचा प्रयत्न नक्कीच चांगला हे.
माझ्या लेखमालेत मी गडावर नक्की लिहीणार आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2019 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजकाल चित्रांशिवाय प्रवासवर्णन टाकण्याची प्रथा पडत आहे.

शी बाबा, पूर्वीचे मिपा राहिले नाही ! ;) :)