गुजरात ट्रिप बद्दल माहिती हवी ahe

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in भटकंती
1 Aug 2019 - 4:45 pm

नमस्कार,

दिवाळी झाल्यावर मी गुजरात ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे:
साधारण प्लॅन असा आहे - पुणे -> अहमदाबाद -> जुनागढ -> गीर -> दीव -> वडोदरा (स्टेशन ऑफ युनिटी) -> पुणे
१. ह्या साठी किती दिवस प्लॅन करावा? मी ६ रात्री असा विचार करतोय
२. आम्ही तिघांचं जण (बायको आणि मुलगा ४ वर्षांचा) असणार आहोत, तर अहमदाबाद हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा
३. हॉटेल्स सांगावीत

अजून काही टिप्स असतील तर नक्की सांगा.

प्रतिक्रिया

तुमचे प्रवासानुभववर्णन फोटो सकट प्रसिध्द करा

MipaPremiYogesh's picture

1 Aug 2019 - 6:56 pm | MipaPremiYogesh

नक्कीच प्रयत्न करीन.

मी गेलो नाही पण सांगितलेल्या ठिकाणांवर शोध घेतला. तुमचं गीर -सासनगीर , जुनागढ, दीव, चोरवाड, पोरबंदर, राजकोट, द्वारका,जामनगर ही सौराष्ट्रात येतात. ती सहल वेगळी करावी.

दमण, सूरत, वडोदरा, ,सरदार पुतळा, पावागड,चंपानेर, अहमदाबाद, गांधीनगर, डाकोर वेगळे ठेवावे हे माझे मत.

MipaPremiYogesh's picture

5 Aug 2019 - 10:09 am | MipaPremiYogesh

धन्यवाद विचार कर्तो तस्सा..

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 10:01 pm | मुक्त विहारि

मुलांना घेऊन शक्यतो प्रवास करू नये.

बाकी, ठिकाणां विषयी इतर मिपाकर सांगतीलच.

पिवळा डांबिस's picture

2 Aug 2019 - 2:22 am | पिवळा डांबिस

आता तेन्ला कुटं ठिवावं म्हंता, मुविदादा? :)
आता प्वारं असल्यावर तेन्ला घिउनच समदीकडं फिराया लागतंय!!
योगेशभाऊ, बिंदास जा आनि जाऊन आल्यावर हितं तुमचे आणुभव टाकाया इसरू नका.

चौकटराजा's picture

2 Aug 2019 - 10:04 am | चौकटराजा

ह्ये एकदम फिट्ट सोलूशन ! आन शेतावची भुईमूग शेंगा , गाजर, काकड्या बी खायला मिळत्याल !

पिंगू's picture

2 Aug 2019 - 10:05 pm | पिंगू

चलो कुटरे. गुजरात ट्रिप कॅन्सल......

नाखु's picture

18 Aug 2019 - 10:54 pm | नाखु

श्रमदानासाठी नावनोंदणी सुरू आहे

गरजू आणि हौशींनी नावनोंदणी करावी पिंगूशेठ यांजकडे

राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल

स्वयंसेवक नाखु

MipaPremiYogesh's picture

5 Aug 2019 - 10:08 am | MipaPremiYogesh

हो मुलाला कुठे ठेव्नार..नक्किच अनुभव टाकेन,,

Abheeshek's picture

3 Aug 2019 - 8:50 pm | Abheeshek

गुजरातला जाणार असाल तर गीरमध्ये भल्या पहाटेची सफारी बुक करा दुपारनंतरच सफारी बुक करण्यात काहीच अर्थ नाही कारण सिंह दिसतच नाही सिंहीणी बऱ्याच आहेत त्या बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयात बघायला मिळतात पण सफारीची मजा वेगळीच दीव गेला तर तेथील किल्ला मस्त आहे दारू पण स्वस्त आहे मस्त दिवस एन्जॉय करू शकता असे पण गुजरात ड्राय स्टेट आहे अनु गुजरात मध्ये चांगले नॉनव्हेज भयंकर अवघड आहे सोबत फर्स्ट एड ठेवा...

MipaPremiYogesh's picture

5 Aug 2019 - 10:05 am | MipaPremiYogesh

गिर च्या माहिति बद्दल धन्यवाद. ड्राय आणि नोन वेज बद्द्ल नो प्रोब्लेम, अम्चा कायम श्रावण अस्तो :).

चौथा कोनाडा's picture

10 Aug 2019 - 5:51 pm | चौथा कोनाडा

पहाटेच्या सफारीला सुद्धा सिंह दिसतीलच याची शाश्वती नसते.
पहाटेच्या सफारीला जाण्यासाठी वेळ व्यवस्थापनासाठी सासण व्हिलेज इथेच मुक्काम करणे इष्ट ठरते. सोबत लहान मुले असतील तर उठायला उशीर होऊ शकतो.
आपल्या सोबत ४ वर्षाचे बालक असल्यामुळे हा भाग (गीर, जुनागढ, दीव वै) हा भाग टाळून थोडी रेलक्सॅ अशी अहमदाबाद- वडोदरा हीच सहल करणे उत्तम ठरेल.
या दोन शहरात स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून ते अक्षरधाम मन्दिर, वॉटर शो, रानीकी वाव अशी सुंदर ठिकाणे आहेत.

कंजूस's picture

5 Aug 2019 - 10:45 am | कंजूस

मुलांच्या वयाप्रमाणे त्यांच्या आवडी बदलतात आणि तशी ठिकाणे निवडून तिथे अधिक वेळ दिला तर ट्रिप चांगल्या होतात. त्यांच्या चौकसपणा आनंदीपणामुळे ट्रिपा फार मजेदार होतात हा माझा अनुभव. उगाच आपल्याला आवड आहे म्हणून तीन तास म्युझिअम,आर्ट ग्यालरी फिरवलं तर फिआस्को नक्की. मोठी झाल्यावर मुले फार आठवणी काढतात जुन्या.

श्वेता२४'s picture

5 Aug 2019 - 11:23 am | श्वेता२४

राजा सयाजीराव गायकवाड बाग जरुर बघा तीथे टॉय ट्रेन, ॲडव्हेंचर गेम, प्राणीसांग्रहालय, असं बरंच काही आहे. माझ्या मुलाला तीथे खूप मजा आली. शक्यतो दुपारी जाऊन प्राणीसंग्रहालय वगैरे पहा. रेल्वे संध्याकाळी असते. तीथे चोरांचा सुळसुळाट आहे. माझा मोबाईल तीथे चोरीला गेला होता. त्यामुळे सावधान. एकदा जरुर जावे असे ठिकाण आहे.

MipaPremiYogesh's picture

9 Aug 2019 - 4:40 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद माहीती बद्द्ल, प्रयत्न करेन

सुबोध खरे's picture

5 Aug 2019 - 11:50 am | सुबोध खरे

एक सूचना - पहिला प्रवास सरळ पुणे ते वेरावळ करा.
Pune Veraval Express -11088
पुणे प्रस्थान १९. ५० आणि जुनागढ आगमन १५. १५
वेरावळ आगमन १६.५५.

अहमदाबाद ते वेरावळ ४०० किमी आहे मुलगा कंटाळेल वेरावळ येथून जुनागढ ९० किमी गीर ७८ किमी आणि दीव ९५ किमी आहेत. अशीच अंतरे जुनागढ हुन आहेत
परत येताना जुनागढ किंवा वेरावळ हुन वडोदरा साठी गाडी घ्या. वडोदरा येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी एकात्मतेचा पुतळा पाहून परत वडोदरा किंवा भरूच ला येऊ शकता तेथून पुण्यासाठी गाडी पकडा.
४ वर्षाच्या मुलाला मोटारींपेक्षा रेल्वे मध्ये जास्त मोकळीक मिळते आणि ती कंटाळत नाहीत हा वैयक्तिक अनुभव आहे. मोटारीचा प्रवास जितका कमी असेल तितके चांगले.
रेल्वे चे आरक्षण आताच केलेत तर सहज होऊन जाईल.

MipaPremiYogesh's picture

9 Aug 2019 - 4:42 pm | MipaPremiYogesh

डॉक , Barobar ahe tumacha. Me pan hach vichar kartoy. Thank you for suggestion.

हा प्लानच दिसतोय पण त्या सौराष्ट्रात सकाळी पोहोचणाऱ्या गाड्या मुंबई/पुण्याहून नाहीत. सांगितलेल्या ठिकाणात फक्त वडोदरा, अहमदाबाद लहान मुलांना आवडेल.

MipaPremiYogesh's picture

9 Aug 2019 - 4:44 pm | MipaPremiYogesh

Thank you, thinking all the aspects. Thinking another option as only do Ahmedabad and Badoda. Still Planning.

आलमगिर's picture

18 Aug 2019 - 9:56 pm | आलमगिर

नमस्कार , तुम्हाला व्यवस्थित प्लँनिंग गाडीसकट मी करुन देऊ शकतो. हवे असल्यास ९९८७८१०९५१ या नंबरवर संपर्क करा.
प्रणव
देविका केळकर ट्रँव्हल्स