लागणारा वेळ:
३० मिनिटे(*सफरचंदाचे प्रमाण किती आहे यावर पाककृतीसाठी लागणारा वेळ कमी जास्त होईल)
लागणारे जिन्नस:
सफरचंद
तुप
साखर
वेलची पुड
साय
काजू , बदाम
क्रमवार पाककृती:
१. सफरचंद धुवून ,त्याचे २ काप करुन त्यामधल्या बी काढून किस करुन घ्या
२. कढई मध्ये तुप घ्या
३. तुप गरम होत आलेकी , काजू बदाम तुपावर २ मि. परतून घ्या
४. आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून ,सफरचंदातील पाणी कमी होइपर्यंत छान परतून घ्या(मध्ये मध्ये हलवत राहायच आहे )
५. १५ मिनीट झाल्यावर त्यमध्ये साखर ,वेलची पुड घालून ते एकत्र करुन घ्या
७. एकसारख मध्यम आचेवर हलवत राहायच आहे
८. २ मिनीटानी साय घालून एकत्र करुन घ्या
९. मिश्रण जाडसर होईपर्यंत आणि कढईपासून वेगळे झालेकी आपला सफरचंदाचा हलवा तयार आहे
वाढणी/प्रमाण:
२-३
अधिक टिपा:
*खायचा केशरी रंग घातला तरी चालेल (गाजर हलव्या सारखा रंग येईल)
*सफरचंद लवकर काळे पडतात त्यामुळे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन किसून घ्यावे आणि पाककृती चालू करावी
प्रतिक्रिया
26 Jul 2019 - 10:28 am | ज्ञानोबाचे पैजार
सफरचंदाची साले काढुन किसायचे की साला सकट?
काही प्रकारची सफरचंद ठिसुळ / पिठुळ असतात अशी सफरचंद किसताना फ्रीजर मधे ठेउन किसावी का?
पैजारबुवा,
1 Aug 2019 - 5:00 pm | Namokar
-सफरचंद सालासकट किसावे ,मी कधीही साल काढत नाही.(आपल्या आवडी प्रमणे साल काढली तरी चालेल_)
-तसेच किसले तरी चालेल
धन्यवाद
26 Jul 2019 - 2:04 pm | जॉनविक्क
26 Jul 2019 - 2:04 pm | जालिम लोशन
हटके चव असेल!
26 Jul 2019 - 4:37 pm | अत्रुप्त आत्मा
1 Aug 2019 - 4:53 pm | Namokar
धन्यवाद ज्ञानोबाचे पैजार,जॉनविक्क,हटके चव असेल!,अत्रुप्त आत्मा
1 Aug 2019 - 6:10 pm | तुषार काळभोर
गणपतीसाठी हटके नैवेद्य!!