आपला मराठी बिग बॉस

Primary tabs

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
17 Jul 2019 - 9:50 pm
गाभा: 

या वेळेस पहिल्यांदाच बिग बॉस-२ मराठी शो नियमित बघत आहे. यापुर्वी बिग बॉस विषयी ऐकुन होतो व अधुन मधुन पाहीलाही होता पण सलग असा या वेळेस बघितला. या शो चे काही तुकडे आवडले काही अजिबात आवडले नाही पण जे काय हा शो बघुन मनात आले ते असे इथे मांडुन बघतो.

बिग बॉस या शो चा मुलभुत साचा फ़ार चतुर लोकांनी व मानसशास्त्राची उत्तम जाण असलेल्या मंडळीनी नियोजनपुर्वक बनवलेला आहे असे प्रकर्षाने जाणवते. यात मानवी भावभावनांचे रोचक (खरे असो वा बनावटी व बनावटी जरी असले तरी एका अर्थाने शेवटी अस्सल च म्हणजे अस्सल बनावटी ) अविष्कार बघावयास मिळतात हाच या शो चा युनिक सेलींग पॉइंट आहे असे मला तरी वाटते. यात जाणवलेली सर्वात मोठी गंमतीदार विसंगती म्हणजे बिग बॉस हा फ़ार न्यायी आदर्श वगैरे वगैरे आहे असे भासवले जात असले वा पटवुन देण्याचा प्रयत्न केले जात असले तरी तसे अर्थातच काहीच नाही. मुळात बिग बॉसचा प्रमुख उद्देश हा कोंबड्या वा कोंबडे झुंजवणे हाच आहे. कारण मायबाप प्रेक्षकाची शो कडुन प्रमुख अपेक्षा कोंबड्या झुंजतांना पाहणे ही आहे. तर काही कारणाने कोंबडे सुस्तावले वा मानवी स्वभावानुसार "जुळवुन" घेउ लागले शांत समंजस होऊ लागले तर बिग बॉस आवर्जुन सक्रीय होत काड्या टाकतो व विविध उपाययोजना गेम्स इ. शकली लढवुन कोंबड्या लढवतो. प्रेक्षकांची दुसरी प्रमुख अपेक्षा ही कळत नकळत का होइना इतरांच्या म्हणजे इथे खेळाडुंच्या "प्रायव्हसी" त प्रवेश मिळवण्याची असते. म्हणजे एक समाजात वावरतांना जरी एकीकडे प्रायव्हसीचे कौतुक वा स्तोम माजवले जात असले " आम्ही पाळतो बर का " असे म्हटले जात असले तरी दुसरीकडे त्याच समाजाकडुन गावगप्पा गॉसिप चा जबर आस्वाद चंगळ म्हणुनही तितक्याच जोमाने घेतला जात असतो. बिग बॉस एक खिडकी उघडुन देतो या बघा या लोकांच्या खासगी जीवनात, अंतरंगात काय आहे ते.

यातील खेळाडु जरी बहुतांश वेळा अनेक मुखवटे बाळगत असले तरी दिर्घकाळा नंतर व ते ज्या सिच्युएशन मध्ये राहतात ती अशी काही असते की त्यांनी चढवलेले मुखवटे कालांतराने एक एक करुन गळुन पडतात व त्यांचे पुर्ण नाही म्हणु शकत पण बरेचसे सत्य "दर्शन" होऊनच जाते. हे मुखवटे कसोशीने बाळगणं मग ते गळुन पडणं हे सर्व बघणं रोचक असतं. अर्थात काही फ़ारच तयारीने आलेले खेळाडु शेवटपर्यंत कदाचित मुखवटा सांभाळण्यात यशस्वीपण होत असावेत पण तो भाग वेगळा आहे. अजुन एक बाब अशी की अनेक रीअ‍ॅलीटी शो हे मॅनिप्युलेटेड असतात तसा हा ही शो असु शकेल पण हा ही एक वेगळा मुद्दा आहे.यातील खेळाडु एक प्रकारे आपले व्यक्तिमत्व विक्रीस ठेवतात म्हणजे मी माझे विचार वागणं बोलणं शरीर मिळुन मी एक सम टोटल अस व्यक्तिमत्व आहे आणी घ्या हा मी तुमच्यासमोर आता "उघडा" आहे मला बघा.

खेळाडुंच्या एकुण संख्येत प्रमुख भरणा हा सिने कलाकारांचा च असतो त्यातही विशेषत: मालिकावीरांचा त्यातही असे कलाकार की जे जवळ जवळ कारकिर्दीच्या अंताला वा अस्ताला आलेले आहेत. यांचाच भरणा जास्त का असावा ? एक उत्तर असे वाटते की हे अभिनयात निपुण असतात व दिर्घ काळ "खेळ" खेळत राहणे, ओढत राहणे ही यांच्या अंगवळणी पडलेली बाब असते. म्हणजे हे दिर्घकालीन काल्पनिक मालिके ऐवजी दिर्घकालीन वास्तव खेळ जणु मालिकेच्या स्पिरीट मध्ये खेळु शकतात. यामुळे मालिकावीरां कडुन मनोरंजन अधिक होत असावे शिवाय फ़ेस व्हॅल्यु वगैरे म्हणजे सुंदर घरातील सुंदर खेळाडु हे समीकरण असेल. यात खर म्हणजे सर्वचे सर्व खेळाडु वेगवेगळ्या क्षेत्रातील घेतले म्हणजे एकही प्रोफ़ेशन रीपीट न करता घेतले व मालिकावीर वा चित्रपट कलाकार वगळले तर हा शो खरच वेगळा होइल कदाचित.

या शो ची एक गंमत म्हणजे खेळाडुंकडुन मराठीत बोलण्याचा आग्रह एकीकडे केला जातो मात्र जेव्हा महेश मांजरेकर जेव्हा शाळा घेण्यासाठी येतो तेव्हा तो एकेक शोधुन शोधुन इंग्रजी शब्द वापरत असतो. या शो मध्ये विजयी खेळाडुला मिळणारी मोठी आकर्षक रक्कम व प्रसिद्धी ही प्रेरणा खेळाडुंना अटीतटीने हिरीरीने खेळण्यास भाग पाडत असते. या शो मधला एक खेळाडु पराग जेव्हा म्हणतो की त्याच्या डोक्यावर ६२ लाखांचे कर्ज आहे तेव्हा तो हा खेळ जिंकण्यास किती डेस्परेट असेल याचा अंदाज येतो. खेळाडुंच्या मिक्सींग मध्ये वेगवेगळे वर्ग जाणुन बुजुन समाविष्ट केले जातात म्हणजे कमी शिकलेले खेळाडु जास्त शिकलेल्या खेळाडुं सोबत मिसळवल्याने टकराव जास्त होतो तेवढेच जास्त मनोरंजन होते

सध्याच्या सीझन मध्ये बिचुकले हा एक रोचक कॉम्प्लेक्स क्रिएचर होता पराग ही तसाच होता. पण दुर्देवाने बिचुकले खेळाबाहेर पडला पराग ही गेम बाहेर झाला. उरलेल्यामध्ये किशोरीची डिसेन्सी आकर्षक आहे पण समंजस सकारात्मक संतुलित लोकांची बिग बॉस खेळाला अ‍ॅलर्जी आहे त्यामुळे इथ असे खेळाडु फ़ार काळ टिकु शकत नाहीत.

टंकण्याचा कंटाळा आलाय पुढील भाग प्रतिसादांतुन लिहीतो

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

18 Jul 2019 - 1:32 pm | चौथा कोनाडा

अ .... रे ..... रे .... !

मिपाकर हे असलं बघतात ?

जॉनविक्क's picture

18 Jul 2019 - 4:12 pm | जॉनविक्क

सर्व एपिसोड नाही बघत

चौकटराजा's picture

18 Jul 2019 - 8:36 pm | चौकटराजा

मराठी , हिंदी मालिका , बिग बॉस सारखे शो , हिंदी मराठी चर्चा कार्यक्रम पाहणे आता सोडून दिले आहे . त्यापेक्षा तू नळी मस्त आहे. निवडीला वाव भरपूर ! पूर्वी टी वही वर टेली गेम्स , क्रिस्टल मेंझ नावाचे कार्यक्रम असत ते खरोखरच उत्तम होते. इथे खरा बिग बॉस कार्यक्रम कसा असावा हे पाहायचे असेल तर तू नळी वर " एक्साम" हा सिनेमा आहे जरूर पहा . बिग बॉस हा किती फालतू कार्यक्रम आहे त्याचा प्रत्यय येईल !

जॉनविक्क's picture

18 Jul 2019 - 8:56 pm | जॉनविक्क

छान होता. बिग बॉस इज अबोट काँट्रॅव्हर्सी नॉट प्योर इंटलिजन्स ?

Any questions ? ;)

चौकटराजा's picture

20 Jul 2019 - 9:20 pm | चौकटराजा

मग सर्कल ,हाऊस ऑफ नाईन हे ही पहा आवडतील .

आता सगळे एकसुरी वाटते. Exam मी 2010 मध्ये पहिला होता, आता डोक्याचा पार भुगा करणारा प्लॉट नसेल तर नुसतं ब्लड गोर थ्रिल साठी अख्खा चित्रपट सहन करणे नकोसे वाटते. अति चित्रपट पाहण्याचाही हा परिणाम असेल.

ते एकाच बंगल्यात आख्खा चित्रपट चित्रित करून हैपवर चालणारे कंजुरिंग युनिव्हर्स बोर होते, एलिमेंट ऑफ सरप्राईसच्या नादात दीड तासाचे कथानक नऊ दहा तास ताणत पकाऊ ट्विस्ट टाकत शेवटी टिपिकल धाटणीच्या मार्गाने जाणाऱ्या तथा कथित वेब सिरीज प्रेडिक्टेबल वाटतात (क्रिमिनल जस्टीस, मिरझापुर, स्मोक ही ठळक उदा.) त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात पहायसारखे सुचवायचे असेल तर बार बराच रेज झाला आहे असे म्हणून आत्मस्तुती संपवतो

रविकिरण फडके's picture

18 Jul 2019 - 10:41 pm | रविकिरण फडके

येन केन प्रकारेण पैसे करणारे चॅनेल्स, पैशाचे तसेच हपापलेले काम करणारे लोक, आणि रिकामटेकडे आणि/ किंवा विकृत प्रेक्षक.
(अर्थात, वरील शीर्षक इतर अनेक कार्यक्रमांनाही लागू पडेलच म्हणा.)

बिग बॉस हा पूर्ण स्क्रिप्टेड शो आहे.
हा कार्यक्रम पाहणारे आणि त्यातील सगळ्या गोष्टी खरे मानणारे पब्लिक C आहे.

यावेळचा सिझन भिकार असुन मी तो पाहणे फार लवकर बंद केले ! पहिला सिझन मात्र मना पासुन पाहिला होता...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आई शप्पथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना... :- MALAAL

रेमिंग्टन's picture

21 Jul 2019 - 12:37 am | रेमिंग्टन

फक्त बिग बॉस असं नाही पण ईतर कुठल्याही मालिका बघायला एक प्रकारची कमिटमेंट आणि बराचसा संयम लागतो. काही भाग चुकले तरी कथा फारशी पुढे गेलेली नसते म्हणा. टीआरपीच्या नादात आधी वेगवान वाटणाऱ्या कित्येक मालिका नंतर रखडवल्या जातात. पण तोवर प्रेक्षकांना त्याची सवय झालेली असते. आणि आदत से मजबूर म्हणून पाहिल्या जातात.
आजच्या जमान्यात ठराविक भाग असलेल्या मालिका लोकांना, विशेषतः तरुण वर्गाला जास्त आवडू लागल्या आहेत.
टीव्हीपेक्षाही ऑनलाईन नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, हॉटस्टार, झी-५, अल्ट बालाजी ह्यांसारख्याना सबस्क्राईब करून सिझनवाईज एपिसोड्स पहाणं सोयीस्कर वाटत आहे. सबस्क्रिप्शन अनेक लोकांत शेअर करता येत असल्याने पैशाचीही बचत होते. शक्य असल्यास मोबाईलवरून मोठ्या पडद्यावर कास्ट पण करता येतात.
रहस्यमय, विनोदी, गुन्हेगारी जगताच्या, हॉरर असे अनेक जॉनर्स त्याचप्रमाणे विविध डॉक्युमेंट्रीज पहाण्याचेही ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

विनोदपुनेकर's picture

25 Jul 2019 - 10:05 am | विनोदपुनेकर

बिचुकले हवे होते पण मजा येत होती कसले राजकारण आडवे आले बिचार्या पाठी काय माहीत