कुर्ल्यांचो कालवण

Primary tabs

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in पाककृती
17 Jul 2019 - 7:15 pm

चांगला धुंवाधार पाऊस लागला की आठवण येते ती कुर्ल्यांच्या झणझणीत कालवणाची. आम्ही याला कुर्ल्यो म्हणतो कुणी चिंबोऱ्या असे म्हणतात तर शहरी मराठी भाषेत यांना म्हणतात खेकडे. मोठे काळ्या पाठीचे असावेत त्याला चव चांगली असते.

लागणारे जिन्नसः

सात ते आठ काळ्या पाठीचे कुर्ल्ये (चिंबोऱ्या)
तीन मध्यम आकाराचे कांदे, हिंग, हळद, तिखट, मीठ, लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ साधारण सहा सात चमचे , दोन चमचे गरम मसाला, आठ ते दहा लसूण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, पाच सहा हिरव्या मिरच्या. दोन पळ्या तेल. आणि अर्धा खोवलेला नारळ. दोन चमचे शिरका (नसेल किंवा आवडत नसेल तर चिंचेच्या कोळाचाच वापर करावा)

कुर्ल्या व्यवस्थित साफ करून घ्याव्यात. हे करताना, छोट्या नांग्या आणि मोठे नांगटे काढून वेगवेगळे ठेवावे. तळाला एक त्रिकोणी पिशवीसारखा भाग असतो तो उघडून आतली घाण काढून टाकावी. भरपूर पाणी वापरून कुर्ल्या स्वच्छ धुवून घ्याव्या. नुसत्या पाण्याने कधी कधी स्वच्छ निघत नाहीत तेंव्हा एखाद्या नारळाच्या शेंडीने घासून कुर्ल्या साफ कराव्यात. साफ केल्यावर अर्धे अर्धे तुकडे करून घ्यावेत

लसूण, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर वाटून वाटण करून घ्यावे.
कांदे चिरून दोन भागात वाटावेत त्यातील एक भाग थोड्या तेलावर परतावा कांदा शिजत आला की त्यात खोवलेले खोबरे घालून परतून घ्यावे. थंड झाल्यावर वाटून घ्यावे.

छोट्या नांग्यांमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्याव्या. वाटल्यावर फडक्यावर किंवा गाळणीने गाळून घ्याव्या. चोथा टाकून देऊन गाळीव पाणी एका बाऊलमध्ये घ्यावे त्यात एक चमचा हळद, दोन ते तीन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हिंग, एक चमचा मीठ, दोन मोठे चमचे चिंचेचा कोळ, लसूण-मिरची आणि कोथिंबिरीचे वाटण घालून या सर्वांची पेस्ट करावी व ती कुर्ल्यांना लाऊन अर्धा तास ठेवाव्यात

कढईत दोन पळ्या तेल घालून त्या वर उरलेला चिरलेला कांदा परतून घ्यावा कांदा परतताना त्यावर दोन तीन वेळा पाण्याचे हबके मारून गॅस बारीक ठेऊन झाकण ठेउन वाफ द्यावी. त्यात थोडा हिंग घालावा. कांदा शिजल्यावर कुर्ल्या घालाव्यात. जराशाने दोन चमचे शिरका घालावा तो नसेल तर चिंचेचा कोळ घालावा. थोडं पाणी घालावं उकळी आली की गरम मसाला घालावा. वाटलेलं कांदा खोबरं घालाव. रस्सा पाहिजे तितका होण्यासाठी पुरेसं पाणी घालाव. झाकण ठेऊन मंद गॅसवर दहा ते बारा मिनिटे शिजवून घ्यावे. कालवण तयार. शिताबरोबर, भाकरीबरोबर, किंवा चपाती वा पावाबरोबर सर्व्ह करावा.

या कालवणाने पावसाळी सर्दी खोकला पळून जातो.

गौरीबाई गोवेकर.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Jul 2019 - 10:28 pm | मुक्त विहारि

पाककृती मिळाली. ..

धन्यवाद. ...

पण एक विनंती आहे......पाककृतीचा फोटो हवा होता. ..

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

18 Jul 2019 - 7:14 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

फोटू नक्की देते.

जेम्स वांड's picture

18 Jul 2019 - 10:22 am | जेम्स वांड

आता खेकडे शोधणे आले ओघानेच.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

18 Jul 2019 - 7:18 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

'विश्वचि माझे घर' असल्यावर शोधायला कशाला हवेत? कोणत्याही गावात भानगडी न करता मिळतील. हलके घे रे.

जेम्स वांड's picture

18 Jul 2019 - 11:38 pm | जेम्स वांड

विश्व घर असलं तरी उत्तम खेकडे मिळायला कोळी/कोळीण मावशी नीट परखलेल्या जुन्या ओळखीच्या तरी असाव्यात किंवा जन्मदाता बाप मासेमार तरी हवा, दोन्हीही नाही म्हणून म्हणलं शोधावे लागतील, बाकी आता नारळीपौर्णिमेपर्यंत होड्या परत दर्यात जाणार नाहीत तोवर उत्तम मासळी मिळवायला भानगडी लागणारच की!

(तुम्ही पण हलकेच घेणे)

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

20 Jul 2019 - 3:20 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

नेहमीच्या कोळणी देतात छान मासे. आणि खेकडे म्हणशील तर पावसाळ्यातच येतात चांगले. बाकी अमेरिकेत वगैरे कधीही मिळतात.

माकडतोंड्या's picture

18 Jul 2019 - 12:34 pm | माकडतोंड्या

रफार नीट दिल्याबद्दल धन्यवाद.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

18 Jul 2019 - 7:21 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

धन्यवाद

खेकडे सध्या तुरूंगात आहेत.

रघुनाथ.केरकर's picture

19 Jul 2019 - 8:20 pm | रघुनाथ.केरकर

कुर्ल्यान्चो कसे काय होइल...
जर मालवणित लिहायचे झाले तर कुर्ल्यान्चा कालवण नाहितर साम्बारा

झेन's picture

19 Jul 2019 - 8:50 pm | झेन

गोंयकर असा,
नेक्स्ट बांगड्याचो हुमण विथ तेफळ?

गोयंकारांय अशीं उलैपा वचनांत हां.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

20 Jul 2019 - 3:25 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

तूं गोंयकार आसा? नावावरसून किदें सजमों नाय माका. खुईं रावता गोयात? हांव नार्व्याची. सप्तकोटेश्वर आम्चो साहेब. माजी माय, तिची माय, हांव सेवेकरनी रे त्यांगासोर. बोरे लागता माका. गोयची माणसां मियोता.

यशोधरा's picture

20 Jul 2019 - 4:46 pm | यशोधरा

गोयंकार म्हळ्यार? अच्च गोयंकार नी!!
गोयां रावनां.

आंबट चिंच's picture

20 Jul 2019 - 1:13 pm | आंबट चिंच

ताई तुम्हला निरोप पाठवला आहे. उत्तर द्याल काय ?

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

20 Jul 2019 - 3:27 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

उत्तर दिले

विनटूविन's picture

2 Aug 2019 - 7:01 pm | विनटूविन

मस्ट आहे कुर्ल्याच्या कालवणासाठी

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

12 Aug 2019 - 2:01 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

कधी वापरली नाही या पदार्थात . वापरून पाहिली पाहिजे.

विनटूविन's picture

14 Aug 2019 - 1:35 am | विनटूविन

सांगा