पं.भीमसेन जोशी कुणाचे?

आनंद घारे's picture
आनंद घारे in काथ्याकूट
7 Nov 2008 - 7:35 pm
गाभा: 

स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. मिसळपाववर तर दुसरी दिवाळी साजरी होत आहे. माझ्या मनात ज्या विभूतींना सर्वोच्च आदराचे स्थान आहे त्यात पं.भीमसेन जोशी यांचा समावेश होतो. तेंव्हा त्यांच्या विरोधात मला एक अवाक्षरसुध्दा लिहायचे नाही किंवा वाद घालायचा नाही हे आधीच स्पष्ट करतो. विकीपीडियावर यासंबंधी माहिती शोधतांना एक गोष्ट मला जाणवली त्याबद्दल या ठिकाणी लिहीत आहे.

आजवर ज्या आदरणीय लोकांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला त्यांच्या यादीमध्ये नांवाबरोबर ती व्यक्तीचे मूळ राज्य किंवा राष्ट्र कोणते हे दिले आहे. पं.भीमसेन जोशी यांच्या नांवापुढे अर्थातच कर्नाटक असे लिहिले आहे. त्यांचा जन्म आजच्या कर्नाटकात (त्या काळातल्या मुंबई इलाख्यात असलेल्या) गदग या गांवी झाला पण ते पुण्याचे रहिवासी आहेत असे मला माझ्या लहानपणापासून वाटत आले आहे. गेली पन्नासाहून अधिक वर्षे ते पुण्यात पं.सवाई गंधर्व संगीत महोत्सव भरवत आले आहेत.

माणसाच्या जीवनात जन्मभूमीलाच सारे महत्व असते की त्याची कर्मभूमी अधिक महत्वाची आहे? त्याचा गौरव करतांना त्याच्या कर्मभूमीचा उल्लेख कां असू नये? हे प्रश्न मला पडले. यावर आपले काय मत आहे?

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

7 Nov 2008 - 7:48 pm | यशोधरा

पंडितजींच्या बाबतीत फक्त त्यांच्या गायन सेवेला महत्व आहे :)

प्रकाश घाटपांडे's picture

7 Nov 2008 - 7:53 pm | प्रकाश घाटपांडे

क्वाँचे म्हजी ?
आपले तुप्ले सम्द्यांचे. यखांद्याचा जन्म कुड झाला पेक्षा त्यो फुल्ला कुड त्ये महत्वाच.
प्रकाश घाटपांडे

अवलिया's picture

7 Nov 2008 - 7:55 pm | अवलिया

कॉय बॉल्लात... झ्याक की वो

नाना

अभिरत भिरभि-या's picture

7 Nov 2008 - 8:25 pm | अभिरत भिरभि-या

आता अहिल्याबाई होळकर, सयाजीराव गायकवाड, (आणि झालेच तर आफ्रिका, अमिरेका, चीन, जपान आणि कुठे कुठे फुललेली लहानथोर मिपाफुले) परकी झाली म्हणायची.

शिवाय थोर अभिनेते बच्चनसाहेब गंगा काछोरा नसुन कोयना-पंचगंगेचा पोरा आहे.
----
(नम्म कर्नाटका व आमच्या महाराष्ट्राचा पण्डितजींवर समसमान अधिकार आहे मानणारा )
अभिरत

पुष्कर's picture

8 Nov 2008 - 1:52 pm | पुष्कर

पंडितजींवर 'अधिकार' सांगणारे आम्ही कोण!!

अभिरत भिरभि-या's picture

8 Nov 2008 - 2:06 pm | अभिरत भिरभि-या

आम्ही, तुम्ही आपण या सर्वनामांचा वापर केलेला नाही. कृपया सोईस्कर /भलते अर्थ काढू नयेत.

यशोदा व देवकीचा कृष्णावर किंवा कोणत्याही मायभूमीचा आपल्या पुत्रावर जो 'अधिकार' असतो त्या अर्थाने या शब्दाचा वापर आहे.
---
सं. मंडळास विनंती:
आपणास आवश्यक वाटल्यास प्रतिक्रिया संपादित करावी.

पुष्कर's picture

19 Nov 2008 - 4:46 pm | पुष्कर

प्रश्नचिन्ह नजरचुकीने टंकलं. मला प्रश्न विचारायचा नव्हता. ती फक्त एक प्रतिक्रिया आहे. "पंडितजींसारख्या व्यक्तिवर अधिकार आम्ही कुठून सांगणार!! महाराष्ट्र काय किंवा कर्नाटक म्हणजे तरी काय!! तुम्ही आम्ही माणसांनीच बनवला आहे ना! त्यांच्या वतीने आम्हीच सांगत असतो अधिकार."
मी तुमच्या वाक्याचा काहीही अर्थ काढलेला नाही. ती एक स्वतंत्र प्रतिक्रिया आहे. केवळ तुमचा प्रतिसाद वाचून ती सुचली म्हणून त्याच्या उत्तरादाखल लिहिली. त्याचा असा अर्थ निघेल असं माझ्या गावीही नव्हतं; पण ती सर्वस्वी माझी चूक आहे. एका प्रश्नचिन्हाने घोळ केला.

आजानुकर्ण's picture

7 Nov 2008 - 7:55 pm | आजानुकर्ण

पुण्याचे

आपला
(पुणेकर) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 10:55 pm | विसोबा खेचर

त्यांचा जन्म आजच्या कर्नाटकात (त्या काळातल्या मुंबई इलाख्यात असलेल्या) गदग या गांवी झाला

ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येत नाही..!

पण ते पुण्याचे रहिवासी आहेत असे मला माझ्या लहानपणापासून वाटत आले आहे.

यात काही वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे? ते गेली अनेक वर्ष पुणेकर आहेत हीदेखील वस्तुस्थितीच आहे...

माणसाच्या जीवनात जन्मभूमीलाच सारे महत्व असते की त्याची कर्मभूमी अधिक महत्वाची आहे?

माझ्या मते कर्मभूमीच अधिक महत्वाची आहे. खुद्द अण्णांच्या घरीदेखील स्वत: अण्णा, त्यांची पत्नी वत्सलाबाई, त्यांची सूनबाई लक्ष्मी, मुलं जयंता आणि श्रीनिवास, नाती यशोदा आणि रेणूका, मुलगी शुभदा इत्यादी सर्व मंडळी मराठीतच बोलतात हे मी अनेकदा पाहिले आहे...

त्याचा गौरव करतांना त्याच्या कर्मभूमीचा उल्लेख कां असू नये?

त्यांची कर्मभूमी ही फक्त महाराष्ट्र आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का? ते आखिल भारतीय गायक आहेत...

हे प्रश्न मला पडले. यावर आपले काय मत आहे?

मी फक्त त्यांच्या गाण्यावर प्रेम करतो त्यामु़ळे मला असले कुठलेच निरर्थक प्रश्न पडले नाहीत, सबब कुठलेही मत देण्याचा प्रश्नच येत नाही!

तात्या.

विसुनाना's picture

8 Nov 2008 - 10:35 am | विसुनाना

अगदी सहमत. आलंकारिक भाषेत बोलायचं तर सूर्य पूर्वेला उगवतो म्हणून जपानच्या मालकीचा काय?

अभिज्ञ's picture

7 Nov 2008 - 11:34 pm | अभिज्ञ

उद्या आनंद घारे अमेरिकेत राहून "सुप्रसिध्द" झाले तर
आम्ही आपल्याला कुठले समजावयाचे? महाराष्ट्राचे की अमेरिकेचे?

अभिज्ञ.

आनंद घारे's picture

8 Nov 2008 - 7:56 pm | आनंद घारे

अमेरिकेत राहून "सुप्रसिध्द" होण्याचा प्रश्नच नाही. मी इथे फक्त भटकायला आलो आहे. रिकाम्या वेळात मिपावर चकाट्या पिटायला येतो. :)

आनंद घारे's picture

10 Feb 2009 - 10:34 pm | आनंद घारे

भारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांच्याबद्दल मला काय वाटते ते कृपया इथे वाचावे. ते सर्वे विश्वाचे आहेत यात मला मुळीच शंका नाही. अहो, पं.भीमसेनजी कर्नाटकाचे आहेत असे ज्यांनी कोणी ठरवले असेल त्यांच्या विरुध्द माझी तक्रार मी या प्रस्तावात केली आहे. त्य़ातून प्रत्येक पदकाच्या मानकर्‍याच्या नांवाच्या पुढे त्याच्या राज्याचे नांव लावायलाच पाहिजे असे असेल तर ते कोणाचे असावे हा माझा प्रश्न आहे. कोणताही वाद मी सुरू केलेला नाही. त्यामुळे माझ्यावर ही आगपाखड विनाकारण चालली आहे असे मला वाटते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

अवांतर प्रतिसादाबद्द्ल क्षमा मागतो..

कांही लोक आपली बढाई करत असतात तर कांही लोक उगाचच "मी क्षुद्र, नगण्य आहे, माझी कांही लायकी नाही." वगैरे म्हणत विनयाचा कृत्रिम आव आणतात
घारे साहेब,
मागील लेखात वरिल ओळी कृत्रिम आव आणणार्‍या बड्या माणसांबद्द्ल लिहिताना...

पण तुमच्याच लेखनाबद्द्ल खालील वाक्य वाचताना वरिल वाक्य सार्थ आहेत असे वाटते..
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत,

शेन्डेफळ

रेवती's picture

8 Nov 2008 - 12:03 am | रेवती

कुठलाही कलावंत हा रसिकांचा असतो.
आपल्या मनात त्यांचं गाणं व ते कलावंत घर करून असतात.

रेवती

सुक्या's picture

8 Nov 2008 - 12:11 am | सुक्या

मला वाटते पंडीत़जींसारख्या व्यक्तींना प्रांत किवा देश यांच्या सीमेत बांधले जाउ नये. तसे करण्याचा प्रयत्न ही होउ नये. त्यांचा जन्म कर्नाटक किंवा कर्मभुमी महाराष्ट्र असली तरी त्याचे संगीतातील योगदान हे या सर्व बाबींच्या पलीकडे आहे. त्यामुळे मी पं.भीमसेन जोशी कुणाचे? याचे उत्तर "सर्व संगीतप्रेमींचे" असेच देइल.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

आनंद घारे's picture

8 Nov 2008 - 8:09 am | आनंद घारे

पं.भीमसेन जोशी भारतातीलच नव्हेत तर जगातील सर्व संगीतप्रेमींचे याबद्दल कांही दुमत नाही. फक्त सर्व भारतरत्नांच्या यादीमध्ये त्यांचे Indian state or country कर्नाटक असे दाखवले आहे असे मला आधी वाटले. यामुळे हा चर्चेचा प्रस्ताव लिहिला होता. त्यापुढे of origin असेही लिहिले आहे. पण याचा संबंध जन्मस्थानाशी नाही असे दिसते. श्री जेआरडी टाटा आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म महाराष्ट्राबाहेरचा असला तरी त्यांचे Indian state or country of origin महाराष्ट्र असेच दिले आहे. एम .जी.रामचंद्रन यांचा श्रीलंका तर व्ही.व्ही.गिरि यांचा ओरिसा दिला आहे, ते मात्र जन्मस्थानावरून ठरवले असावे. एकंदरीत पाहता या कोष्टकात विसंगती आहेत असे दिसते.

घाटावरचे भट's picture

8 Nov 2008 - 9:37 am | घाटावरचे भट

वाद घालू नका...त्यापेक्षा अण्णांचा मियां मल्हार ऐका आणि मजा करा
http://www.youtube.com/watch?v=Bu2O21kASKw

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2008 - 2:48 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतोय आणि तेच करतोय... :)

म्हणजे, या वादात न पडता मी पण मस्त त्यांचं गाणंच ऐकतोय.

बिपिन कार्यकर्ते

शंकरराव's picture

10 Feb 2009 - 6:24 pm | शंकरराव

भटोबा .. बेश्ट उत्तर. शब्द संपले..

झकासराव's picture

8 Nov 2008 - 9:46 am | झकासराव

विकीपीडियावर यासंबंधी माहिती शोधतांना एक गोष्ट मला जाणवली त्याबद्दल या ठिकाणी लिहीत आहे.

आजवर ज्या आदरणीय लोकांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला त्यांच्या यादीमध्ये नांवाबरोबर ती व्यक्तीचे मूळ राज्य किंवा राष्ट्र कोणते हे दिले आहे. पं.भीमसेन जोशी यांच्या नांवापुढे अर्थातच कर्नाटक असे लिहिले आहे
>>>>>>>>>>>>>>
व्हेरी शिंपल ऍन्सर.
विकिपेडियावर तुम्ही जावुन तो लेख / माहिती एडिट करा आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती लिहा की.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अभिरत भिरभि-या's picture

8 Nov 2008 - 10:19 am | अभिरत भिरभि-या

विकिपेडियावर तुम्ही जावुन तो लेख / माहिती एडिट करा आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती लिहा की.

आत्ताच "पंडित भीमसेन जोशी" असे मराठी भाषेतील नाव टाकले आहे. पण इन्फोबॉक्स मधील ही माहिती मुख्य पानवर दिसत नाहीये.
|Current = [[Pune]], [[Maharashtra]], [[India]]

कर्मभूमी महाराष्ट्र मला खालील केवळ एक वाक्य सापडले. एकूणच लेख त्रोटक वाटला.
जाणकारांनी भर घालावी.

Pandit Joshi conducts an annual classical musical festival called the Sawai Gandharva Music Festival in the memory of his guru. This festival is held in Pune every December.

बबलु's picture

8 Nov 2008 - 12:49 pm | बबलु

मी आत्ताच विकीपिडीया page edit करून खालील मजकूर add केला आहे.

Pandit Ji has been staying in Pune (Maharashtra, India) for past several decades and Pune, Maharashtra is his Karma-Bhumi (Land Of Destiny).
He is "The" voice of indian classical music and is a living legend for decades.

....बबलु

राघवेन्द्र's picture

8 Nov 2008 - 2:44 pm | राघवेन्द्र

भीमसेन जोशी खरच महान आहेत, यात वादच नाही.
पण हाच विचार कल्पना चावला, सुनिता विल्ल्यम्स अथवा ईतर अनेक भारतीय वन्शाचे लोक जेव्हा ईतर देशात जाऊन राहतात , तिथे नावलौकिक मिळवतात तेव्हाही करायला हवा. तेव्हा आपल्याला जन्मभूमी महत्वाची वाटते आणि अपण जल्लोश करतो.
थोडक्यात, अपल्याला वाटेल तेव्हा मत बदलून credit मिलवण्याचा प्रकार आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. पण यावरुन कोणीही मी भीमसेन जोशी द्वेष्टा आहे असे समजू नये. मलाही भीमसेन जोशी महाराष्ट्रात मोथे झाले याचा सार्थ अभिमान आहे.

बकासुर's picture

8 Nov 2008 - 3:39 pm | बकासुर

जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी.

मनीषा's picture

8 Nov 2008 - 5:22 pm | मनीषा

हे प्रथम अभिजात संगीत कलेचे आहेत... नंतर त्यांच्या रसिक श्रोत्यांचे आहेत .
(त्यांचा मोठे पणा म्हणजे त्यांच्या भक्तगणांमधे संगीतातील तज्ञ , जाणकार आहेत,तसेच पंढरीच्या वारीला मैलोनमैल चालत जाणारे भोळे वारकरी सुद्धा आहेत)

आर्य's picture

19 Nov 2008 - 8:50 pm | आर्य

हा वाद व्यर्थ आहे ! कारण कलेला आणि कलाकाराला कुठलेही बंधन नसते.
वास्त्विकतः कन्नड आणि मराठी हे प्रांत आणि लोक अविभाज्य आहेत, तुम्ही 'राज'कारण्यांच्यात पडुनका.

अप्पा, अक्का, अण्णा हे शब्द सुद्धा कानडी आहेत आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा सुद्धा कानडीच आहे.
भारतरत्न, कर्नाटक-महाराष्ट्र भुषण पंडित भिमसेन जोशी यांनी प्रदेश-भाषा यांच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत. अण्णाचं जसं मराठी 'कानडा राजा पंढरीचा' सर्वश्रुत आहे तसेच कन्नड "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा" हे ही.
हि दोन्ही गाणी ऐकुन तुम्हीच ठरवा ते कुणाचे ते !

आपला
आर्य

विकास's picture

20 Nov 2008 - 4:35 am | विकास

हे म्हणजे अधुनिक काळातील "विसोबा खेचर" अर्थात "तात्या" कुणाचे असे म्हणल्यासारखेच झाले!

असे पहा त्यांनी त्यांच्या संकेतस्थळ लेखनाची सुरवात इतरत्र केली पण जेंव्हा मिसळपाववरील चर्चा इ-सकाळ मधे छापून आली तेंव्हा जर त्यांचे नाव घेतले असते तर तात्यांना मिपाचे म्हणून आपण समजलो असतो का त्यांच्या पुर्वाश्रमाचे म्हणून ? :-)

बाकी वरील प्रतिसाद ह.घ्या. पण भीमसेनांना तरी प्रांत आणि भाषेने मर्यादीत करायला नको असे वाटते.

महेंद्र's picture

10 Feb 2009 - 5:31 pm | महेंद्र

पंडीतजींना आज भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार शासनातर्फे प्रदान करण्यात आला. त्यांचे मनापासुन अभिनंदन!!

सर्किट's picture

10 Feb 2009 - 11:33 pm | सर्किट (not verified)

कृपया आनंदकाकांसारख्य ज्येष्ठ व्यक्तीविषयी असे लिहिण्याचा (आणि संपादकांनी दुर्लक्ष करण्याचा) मी निषेध करतो.

-- सर्किट

शेणगोळा's picture

10 Feb 2009 - 11:40 pm | शेणगोळा

जाहीर क्षमा.

आनंदराव वयाने ज्येष्ठ आहेत हे आम्हाला माहीत नव्हते. तरीही जे लिहिले आहे ते प्रेमाने लिहिले आहे, संपादकांनी काढून टाकू नये. आमच्या दापोली-हर्णै पट्ट्यात रांडच्या ही शिवी धरली जात नाही. आणि तश्याही मिपावर शिव्या चालतात. खुद्द मालकच जाम शिवराळ आहे.

असो.

पुन्हा एकदा माफी.

परंतु 'भीमसेन जोशी कुणाचे' हे शीर्षक अद्यापही पोरकटच वाटते. शीर्षकावरून तरी वयाच्या ज्येष्ठतेचा काहीच पुरावा मिळ्त नाही.

सर्चांचाच लाडका,
शेणगोळा.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

10 Feb 2009 - 11:53 pm | कालिन्दि मुधोळ्कर

आई शप्पथ, काय पण विषय!!!

मराठी माणूस आणि त्याची असुरकक्षितता! सोयिस्कर पणा आहे सगळा. मी कर्नाटकात वाढले; मराठीचे प्रेम घरात मिळाले. पण असला हुमदांड्गेपणा (कानडि रीतीने बोलणार्यांचा आवड्ता शब्द!) फार चीड आणतो बघा.

शंकरराव's picture

11 Feb 2009 - 12:32 am | शंकरराव

सिमावाद अन राजकारणाचा उग्र वास शिर्षकात जाणवतो. (कोणी लिहीले हि बाब नंतरची)

बाकी पं भिमसेनजीं चे नाव अस्ल्या प्रकारात न ओढलेले बरे
जाणकारांनी खुलासा करावा.
कोणाला ही व्यक्तीशा दुखवण्याचा हेतू नव्हता..

शंकरराव गोडबोले