मार्तंड जे तापहीन

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in लेखमाला
9 Sep 2019 - 6:05 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:400px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}

मार्तंड जे तापहीन

"त्याला हे ज्ञात होते की त्याला काहीही ज्ञात नाही."

आजपर्यंत मी अनेकांच्या हातात विषाचा प्याला दिला होता. त्यातल्या काही जणांचे तर हातपाय पकडून त्यांच्या नरड्यात विष ओतताना माझे हात किंचितही थरथरले नव्हते. मी ज्यांना ज्यांना विष दिले, त्यातले बहुतांश लोक रडत भेकत मरणाला सामोरे गेलेले मी अनुभवले होते. त्यातल्या प्रत्येकाबरोबर न्याय झाला आहे याची मला खातरी होती, म्हणूनच मी त्यांना विष द्यायला जरादेखील कचरलो नव्हतो.

पण ज्या दिवशी आमच्या महान लोकशाहीच्या पाईकांनी त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली, त्या दिवसापासून मी भयंकर अस्वस्थ झालो होतो. कारण या शिक्षेची अंमलबजावणी मलाच करावी लागणार आहे, याची मला कल्पना होती. त्यामुळे हे कृत्य आपल्या हातून होण्याआधीच हे राज्य सोडून कुठेतरी दूर निघून जावे, असे अनेकदा माझ्या मनात पक्के झाले होते. त्याला मी तसे म्हणूनही दाखवले, पण त्यानेच मला असे न करण्याचा सल्ला दिला.

त्याच्या मते त्याचे जीवनकार्य संपले होते आणि मृत्यूला सामोरे जाताना त्याच्या मनात कोणताही संदेह नव्हता. किंबहुना त्याचा मृत्यूच अनेक गोष्टी साध्य करू शकतो, याची त्याला खातरी होती. “मानवास मिळालेले सर्वात उत्कृष्ट वरदान म्हणजे मृत्यू, असे असताना त्याबद्दल का बरे शोक करता राहायचे?” उलट मृत्यूनंतर त्याच्यासाठी अनेक नवी दालने उघडली जातील, याची त्याला खातरी होती. “मानवी बुद्धी सर्वात सामर्थ्यशाली आहे. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनाल” असा त्याचा सिद्धान्त होता. स्वत:च्या भवितव्याबद्दल त्याचे काही वेगळेच विचार होते आणि त्याचमुळे आपल्या भवितव्याबद्दल तो नि:शंक होता.

आमच्या लोकशाहीत शासनकर्त्यांची निवड पाळीपाळीने केली जाई. सर्वसामान्य लोकांमधून हे सदस्य निवडले जायचे. यांच्या हातात सर्वोच्च सत्तेची सूत्रे असत. असे सदस्य निवडले जाताना गुणवत्तेला अजिबात महत्त्व दिले जायचे नाही. मग सेनापती म्हणून आज कोणाची तरी निवड करा, उद्या त्याला पदच्युत करा आणि परवा त्याला फासावर लटकवा अशा प्रकारे अनेक निर्णय होत असत.

मूठभर सत्ता ही पोतभर पैशांपेक्षा जास्त मूल्यवान असते, असे तो नेहमी सांगे.

आपण आजारी पडलो तर वैद्याकडे जातो, कपडे शिवायला शिंप्याकडे जातो, मग देश चालवायला मात्र लायक व्यक्ती का शोधू शकत नाही? असे प्रश्न जर कोणी जाहीरपणे विचारले, तर सत्ताधीशांची मने दुखावली जाणारच ना?

ज्या भौतिकशास्त्रात व गणितात आम्ही वेगाने प्रगती करत होतो, त्याच शास्त्रांना त्याने गौण ठरवले. प्रगतीसाठी माणसाच्या जीवनोद्दिष्टांना व आत्मसंयमनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले पाहिजे, असे त्याने आग्रहाने प्रतिपादन केले. केवळ आणि केवळ विवेकाच्या साहाय्यानेच माणूस स्वत:चे, स्वत:च्या आचारांचे नियंत्रण करू शकतो. आचरणातील चूक ही मुळात बौद्धिक आकलनातील चूक असते, असे त्याने निक्षून सांगितले.

त्याचे विचारच असे जगावेगळे होते की त्यामुळे आयुष्यात त्याने अनेक शत्रू निर्माण करून ठेवले. पण त्याची त्याला जरादेखील फिकीर नव्हती. अनेक प्रतिष्ठितांचे अज्ञान त्याने उघडकीला आणले होते. सत्ताधार्‍यांना दुखावण्यात त्याने जराही कसर ठेवली नव्हती. आणि याचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. त्याच्यावर अनेक प्रकारचे आरोप ठेवून त्याला देहान्त शासन करण्यात आले. आमच्या महान लोकशाही संस्थांना न जुमानणे, तरुणांना आचारभ्रष्ट करणे आणि दैवतांविषयी अश्रद्घा निर्माण करणे, तसेच नवीन ईश्वरकल्पना प्रसृत करणे अशा आरोपांचा त्यांत समावेश होता. आपल्यावरील आरोपांचे त्याने अत्यंत मुद्देसूद खंडन केले. त्यात त्याने कुठेही बचावात्मक पवित्रा घेतला नाही, उलट आव्हानाचाच सूर कायम ठेवला.

शेवटी आमच्या महान लोकशाहीच्या पाईकांनी बहुमताने त्याच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब केले. लोकाशाही तत्त्वानुसार माफी मागण्याची संधीसुद्धा बहाल करण्यात आली. पण याने माफी मागायला साफ नकार दिला. आमच्या लोकशाहीतच त्याच्या बाजूने आणि विरोधात बोलणारे असे दोन्ही प्रकारचे लोक होते. त्याच्यावर केलेल्या आरोपाबाबत ज्युरींनी २८० विरुद्ध २२० अशा मतांनी निर्णय केला होता. यावरून त्याला दिलेल्या शिक्षेत त्यांचे एकमत नव्हते, असेच दिसते.

'लोकशाही ही काही सर्वात आदर्श व्यवस्था नाही. झुंडीत माणूस स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी गमावून बसतो' हे त्याचे मत एका अर्थाने सिद्ध झाले होते. आमच्या राज्यातल्या महान लोकशाहीतसुद्धा अडीच लाखांपेक्षा जास्त लोक इतर दीड लाख लोकांची गुलामीच करत होते, ज्यांना आपले मत व्यक्त करायचा कोणताही अधिकार नव्हता.

501955-wikimedia

खरे तर त्याच्या मित्रांनी त्याचा सुटकेची चोख तजवीज केलेली होती. त्यांनी तुरुंगाच्या सगळ्या अधिकार्‍यांना लाच देऊन फितवले होते. पण त्याने मात्र या सूचनेला नम्रपणे नकार दिला आणि म्हणाला, “तुम्ही सर्व जण मला आनंदाने निरोप द्या, आणि असे समजा की तुम्ही माझे शरीर पुरत आहात, पण माझे विचार मात्र जिवंतच राहातील.”

त्याची ज्ञानदानाची पद्धतसुद्धा मजेदार होती. प्रश्न विचारत विचारत तो पुढे जाई व त्या प्रश्नांची उत्तरे लोकांना द्यायला तो भाग पाडत असे. त्याने या प्रश्नांची सहा प्रकारांत विभागणी केली होती - वैचारिक स्पष्टता येण्यासाठीचे प्रश्न, माहितीची खातरी करून घेण्यासाठीचे प्रश्न, मुद्दा पडताळून पाहण्याचे प्रश्न, वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहण्याचे प्रश्न, निर्णय तपासून पाहण्याचे प्रश्न आणि शेवटी प्रश्नामुळे पडणारे प्रश्न. अशा प्रश्नांमुळे अनेकदा लोकांना सुरुवातीला त्याचा राग येत असे. परंतू नंतर त्यांना त्याचा फायदाही दिसून येई. लोकांच्या माहितीच्या अचूकतेला व परिपूर्णतेला आव्हान देणे हाच ह्या प्रश्नांचा उद्देश असे व या पद्धतीने तो लोकांना त्यांच्या समस्यांचे मुळापासून निवारण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करीत असे.

आमच्या शहरात तो आता एखाद्या आख्यायिकेसारखा प्रसिद्ध झाला होता. लोक त्याच्याबद्दल अनेक खरे-खोटे किस्से सांगू लागले होते. एकदा म्हणे त्याचे आणि त्याच्या महाकजाग बायकोचे भांडणं सुरू होते, त्याच वेळी एक मनुष्य काही शंका घेऊन तिथे आला होता. त्याची ती अवस्था बघून तो परत जायला निघाला. पण याने त्याला थांबवले आणि सांगितले, "तुझी शंका काय आहे, विचार."

"मी लग्न करावं की नाही? असा प्रश्न विचारायला आलो होतो” तो माणूस म्हणाला, “पण मला तुमची अवस्था पाहून त्याचं उत्तर मिळालंय.”

"लग्न कर असाच मी तुला सल्ला देईन.." त्याने त्याही अवस्थेत त्या माणसाला सांगितले.

तो माणूस आश्चर्याने पाहू लागल्यावर याने स्पष्टीकरण दिले, "म्हणजे असं बघ, तू लग्न कर.... तुला चांगली बायको मिळाली तर सुखी होशील.. अन वाईट मिळाली तर तत्त्ववेत्ता होशील.." यातले खरे-खोटे देवच जाणे!

शेवटी तो दिवस उगवलाच. तुरुंगात प्लेटो, क्रीटो व त्याचे इतर शिष्यही सकाळपासूनच जमले होते. आपल्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना मात्र त्याने त्या दिवशी भेटायला येऊ नये अशी विनंती केली होती.

विष बनवणार्‍या सेवकाला मी जितका उशीर करता येईल तेवढा उशीर करण्याची विनंती केली. सूर्यास्ताची चिन्हे क्षितिजावर दिसू लागताना मी त्याच्याकडे जाऊन त्याची माफी मागितली व माझ्या कृत्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नये अशी मी त्याला विनंती केली. मी केवळ हुकमाचा ताबेदार आहे आणि त्या हुकमाची अंमलबजावणी करण्यासाठी मला त्याला विष द्यावे लागणार आहे, हे मी स्पष्ट केले. त्याच्याशी बोलताना मोठ्या संयमाने आवरलेला माझा बांध फुटला आणि मी त्याच्यासमोर ढसाढसा रडू लागलो. पण तो त्याही परिस्थितीत कमालीचा शांत होता. तो म्हणाला, “मी तुझ्या शुभेच्छांचा आनंदाने स्वीकार करतो आणि तुलाही शुभेच्छा देतो. तुझं कर्तव्य तू नि:संकोचपणे पार पाड, यातच तुझा पुरुषार्थ सामावला आहे. माझी अजिबात चिंता करू नकोस.”

त्याने मला विषाचा प्याला घेऊन यायची विनंती केली. “मृत्यूची वेळ पुढे ढकलण्यात मला कोणताही रस नाही.” तो म्हणाला. “त्यापेक्षा माझ्या मित्रा, तुझ्या या विषप्रयोगाच्या दांडग्या अनुभवाचे चार शब्द तू मला सांगावेस असं मला वाटतं.”
“त्यात अवघड असं काही नाही.” मी म्हणालो. “हा प्याला प्यायल्यावर तुम्हाला या इथेच थोड्या येरझार्‍या घालाव्या लागतील. थोड्या वेळाने जेव्हा तुमचे पाय जड होतील, तेव्हा या बिछान्यावर केवळ पडून राहायचं आहे. बाकीचे काम मग ते विष करेल.”

मी थरथरत्या हाताने तो प्याला त्याला दिला आणि त्याने एखादे सरबत प्यावे तसा तो सहज रिता केला. त्याचे विष पिऊन संपल्यावर तर आमच्या दु:खाला पारावार राहिला नाही. माझ्यासकट सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागले. आमचे रडणे ऐकून तो म्हणाला, “कसला बरं हा भेसूर आवाज? मी इतर आप्तेष्टांना घरी पाठवलं, त्याचं मुख्य कारण, त्यांच्या रडण्याचा मला त्रास झाला असता. मला या जगाचा निरोप शांतपणेच घ्यायचा आहे आणि त्यासाठी मला तुमचं सहकार्य हवं आहे.”

हे ऐकल्यावर मात्र आमची आम्हालाच लाज वाटली. आम्ही आमचे अश्रू आवरले. तो मात्र धीरोदात्तपणे येरझार्‍या घालत होता.

थोड्याच वेळात त्याचे पाय जड झाले, मग तो पाठीवर उताणा झोपला…. त्याचे पाय थंडगार आणि निर्जीव होत चालले होते. आता अतिशय थोडा वेळ उरला आहे हे त्यालाही जाणवत होतेच. तो समजुतीच्या स्वरात म्हणाला, ”आता हे विष माझ्या हृदयाच्या जवळ पोहोचलं की संपेलच सगळं.” बोलता बोलता त्याने चादर तोंडावर ओढून घेतली. काही क्षणातच त्या चादरीखाली एक हालचाल झाली. मी जड मनाने चादर बाजूला केली आणि त्याच्या डोळ्यांच्या पापण्या हलक्याच मिटवल्या. एका ज्ञानी माणसाची अखेर झाली होती.

त्याने आत्मज्ञानाचा आयुष्यभर पुरस्कार केला. चिंतनातूनच माणसाला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा साक्षात्कार होईल असे त्याने प्रतिपादन केले होते. खरे सौख्य हे बाह्य किंवा भौतिक परिस्थितीवर अवलंबून नसते, तर निष्ठापूर्वक केलेल्या योग्य वर्तनावर अवलंबून असते. त्याच्या मते सद्‌गुण अनेक प्रकारचे असले, तरी स्वत:शी एकरूप होणे हाच खरा सद्‌गुण आहे आणि तेच परमोच्च ज्ञान आहे.

प्रचि श्रेयनिर्देश: आंतरजालावरून साभार, प्रताधिकारमुक्त.

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

त्याने आत्मज्ञानाचा आयुष्यभर पुरस्कार केला. चिंतनातूनच माणसाला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा साक्षात्कार होईल असे त्याने प्रतिपादन केले होते. खरे सौख्य हे बाह्य किंवा भौतिक परिस्थितीवर अवलंबून नसते, तर निष्ठापूर्वक केलेल्या योग्य वर्तनावर अवलंबून असते. त्याच्या मते सद्‌गुण अनेक प्रकारचे असले, तरी स्वत:शी एकरूप होणे हाच खरा सद्‌गुण आहे आणि तेच परमोच्च ज्ञान आहे.

उत्तम! फार आवडला लेख.
प्रत्येक काळात ज्ञानी, सत्यप्रिय, आणि दृष्टया व्यक्तींसोबत असेच घडत असावे का?

आधी वाटलं होतं काल्पनिक आहे पण नंतर समजलं .. भारी लिहिलं आहे ...

जॉनविक्क's picture

9 Sep 2019 - 8:51 am | जॉनविक्क

काय फरक पडतो इतरांना ?

प्रचेतस's picture

9 Sep 2019 - 8:56 am | प्रचेतस

उत्कृष्ट लिहिलंय माऊली.

कुमार१'s picture

9 Sep 2019 - 9:08 am | कुमार१

चांगलं लिहिलंय

नाखु's picture

9 Sep 2019 - 9:14 am | नाखु

पण शेवटच्या समारोपाच्या चार ओळी आपल्या आत पहायला भाग पाडतात हेच लेखाचे गमक आणि बलस्थान आहे.

आतल्या आतच बाहेरच्यांना शोधणारा पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2019 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंबर एक लेख. आवडला. कमी शब्दात सुरेख मांडणी.

'लोकशाही ही काही सर्वात आदर्श व्यवस्था नाही. झुंडीत माणूस स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी गमावून बसतो'

आजूबाजूला पाहिल्यानंतर आता ते लक्षात येतंच.

"म्हणजे असं बघ, तू लग्न कर.... तुला चांगली बायको मिळाली तर सुखी होशील.. अन वाईट मिळाली तर तत्त्ववेत्ता होशील.."

:)

-दिलीप बिरुटे

चिंतनातूनच माणसाला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा साक्षात्कार होईल

ह्याला धर्माची ठेकेदारी करणाऱ्या आणि कर्मकांडाची दुकानदारी चालवणाऱ्यांचा विरोध असतो कारण जर मनुष्य आत्मचिंतनाने मुक्त झाला तर दुकानदारी चालणार कशी?

- (साधक) सोकाजी

पद्मावति's picture

9 Sep 2019 - 12:22 pm | पद्मावति

उत्तम लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2019 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहिले आहे !

श्वेता२४'s picture

9 Sep 2019 - 1:48 pm | श्वेता२४

सुरेख लिहीलंय.

मित्रहो's picture

9 Sep 2019 - 2:27 pm | मित्रहो

लेख आवडला

प्रशांत's picture

9 Sep 2019 - 2:40 pm | प्रशांत

उत्तम लेख.!

काय सुंदर लिवलंय पैंबुकाका ... फारच परिणामकारक आणि ठसलं गेलंय खोलवर ..

सस्नेह's picture

9 Sep 2019 - 4:34 pm | सस्नेह

लेखन आवडले.

सुधीर कांदळकर's picture

9 Sep 2019 - 6:06 pm | सुधीर कांदळकर

आवडला लेख. केंद्रस्थानी हेमलॉकचा प्याला असला तरी तात्पर्यात मात्र अमृत आहे. धन्यवाद.

मी नाही झालो तत्त्ववेत्ता त्याचे काय असे काही जण मनात म्हणत असतील. मोठ्याने बोलू नका. बयको ऐकेल.

जालिम लोशन's picture

9 Sep 2019 - 6:44 pm | जालिम लोशन

काळजाला भिडणार

इरामयी's picture

9 Sep 2019 - 6:44 pm | इरामयी

खूप छान!

अनन्त्_यात्री's picture

9 Sep 2019 - 6:46 pm | अनन्त्_यात्री

वेगळ्या कोनातून डोळ्यांपुढे उभा केलात !

अनिंद्य's picture

10 Sep 2019 - 1:56 pm | अनिंद्य

सकस लेखन, फार आवडले.

अर्धवटराव's picture

12 Sep 2019 - 9:20 am | अर्धवटराव

बुद्धीच्या देवतेच्या उत्सवाची सांगता त्याच मार्गाच्या पांतस्थाच्या कहाणीने झाली. देहाचे विसर्जन झाले. पण पुनरागमनायच व्हावे म्हणुनच. _/\_ _/\_