लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
६ उडीद पापड
धणे+जिरे पुड
चाट मसाला/काळे मीठ
लाल तिखट
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
कोथिंबीर
बारीक शेव
बुंदी
चवीनुसार मीठ
तेल
क्रमवार पाककृती:
१. उडीद पापड भाजून घ्या
२. पापड एका भांड्यात चुरुन घ्या
३. त्यावर बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो , बुंदी( optional) , तिखट , चाट मसाला, तेल ,मीठ , बारीक शेव घालून सर्व एकत्र करुन घ्या
४. लिंबाचा रस घालून एकत्र करुन घ्या
५. सर्व्ह करताना कोथिंबीर घालून सर्व्ह करा
खूपवेळ तसच ठेवल्यावर पापड चाट नरम होते ,त्यामुळे खायच्यावेळेसच कांदा , टोमॅटो त्यामध्ये घालून एकत्र करा
प्रतिक्रिया
10 Jul 2019 - 7:36 am | तुषार काळभोर
उडदाच्या पापडाची भेळ ...
फोटो एक लंबर आवडला!!
10 Jul 2019 - 9:15 am | उगा काहितरीच
पापड थोडे जुने झाले, खावेसे वाटत नाहीत व फेकूनही द्यावेसे वाटत नाहीत त्यावेळी उपयोगी पडेल ही पाकृ. रच्याकने फोटो छान दिसत आहे.
10 Jul 2019 - 10:13 am | जेम्स वांड
पण मांडण्याची शैली अन फोटो उत्तम आहे. आमच्या ऑफिस मधले मारवाडी आणतात हा प्रकार डब्यात कैकवेळा. ते लोक त्याला "पापडकी चुरी" म्हणतात. कोशिंबिरीसारखा खातात हा आयटम. म्हणजे पापड आणतात अन मग ऑफिस कॅफेटेरिया मधून बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, असलीच तर हिरवी मिर्ची अन कोथिंबीर घेऊन मिक्स करतात त्यात.
10 Jul 2019 - 10:35 am | जालिम लोशन
रुचकर
10 Jul 2019 - 2:26 pm | उपेक्षित
ताई राग येणार नसेल तर एक सांगू ? तुमच्या आधीच्या साध्याश्या पण मस्त रेसिपिंमुळे या वेळी जरा अपेक्षाभंग झाला.
10 Jul 2019 - 9:56 pm | Namokar
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पैलवान , उगा काहितरीच , जेम्स वांड ,जालिम लोशन ,जालिम लोशन ,उपेक्षित
16 Jul 2019 - 3:54 pm | मदनबाण
चवदार आणि झटपट... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरी ज़िन्दगी को ज़िन्दगी बनाने आया पैसा, बेरंगी दुनिया को रंगीन बनाने आया पैसा, अँधेरे कमरों में बत्ती जलाने आया पैसा, सपने तेरा सच्चे करके दिखाने आया पैसा... :- Super 30