गाभा:
सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय?
मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय.
पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही.
तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे.
आत्ता
125/2
34 षटके
न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?
प्रतिक्रिया
9 Jul 2019 - 5:36 pm | गवि
कॅप्टन गॉन?!
9 Jul 2019 - 5:39 pm | प्रशांत
धागा काढायला उशिर झाला नाहितर आधिच गेला असता ;)
9 Jul 2019 - 5:41 pm | गवि
बसवला टेम्पोत.. खरंच की..
लेकिन देर आये दुरुस्त आये, असं म्हणू. तुमचा काय अंदाज टोटल ?
9 Jul 2019 - 5:55 pm | प्रशांत
२२२
10 Jul 2019 - 9:48 am | महासंग्राम
250
9 Jul 2019 - 5:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गविसेठ, विश्वचषक क्रिकेट चालू आणि मिपावर धागा नाही याचं आश्यर्च वाटलं होतं. पण आपण धागा सुरु केला आभार.
तीन बाद १३६ मला वाटतं. न्यूझीलंड २५७ करतील.
-दिलीप बिरुटे
9 Jul 2019 - 5:40 pm | यशोधरा
आपण जिंकणार, विषय संपला. धन्यवाद.
9 Jul 2019 - 5:43 pm | गवि
ते तर झालंच, पण आत्तापर्यंत झालेल्या विजयांप्रमाणे एकतर्फी आणि विनाचुरस सामना होणार की नखे कुरतडत बघावा लागणार हे महत्त्वाचे.
9 Jul 2019 - 5:58 pm | यशोधरा
दहाच्या दहा नखे नाही कुरतडावी लागणार बहुधा. तीन- चार बास होतील. =))
9 Jul 2019 - 5:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होणार हे निश्चित, संध्याकाळी नियमित कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन क्रिकेट पाहणा-यांनी आज टेंशन घेऊ नये. अशी सुचना द्यावी वाटते.
१४९/३-३८.४
-दिलीप बिरुटे
9 Jul 2019 - 5:56 pm | यशोधरा
कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन क्रिकेट पाहणा-यांनी >> ३८.४ ३.८४ होता, आता ३.८८ आहे.
9 Jul 2019 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स. आता वाटतं २४० होतील.
१६३२/४
-दिलीप बिरुटे
9 Jul 2019 - 8:15 pm | प्रचेतस
पाऊस थांबला का?
9 Jul 2019 - 8:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
*वर्ल्डकप क्रिकेट अपडेट्स*
भारत न्युझीलंड उपांत्य सामना
सध्या पावसामुळे सामना थांबलेला आहे, जर पाऊस थोड्या वेळात थांबला व न्यूझीलंड पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही तर, भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार 4 ओव्हर कमी होणार आहेत. तसेच, जर सामना 20 षटकांचा झाला तर भारतासमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडनं 4.5 च्या रनरेटनं धावा केल्या आहेत. त्यामुळं भारताला 6 च्या रनरेटनं धावा कराव्या लागणार आहेत.
आणि जर पाऊसामुळे आज सामना झालाच नाही तर बुधवारी सामना आजच्या स्थितीतच उद्या पुढे सुरू होईल.
आणि जर उद्याही पाऊसामुळे सामना झालाच नाही तर गुण जास्त असल्यामुळे भारत थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.(चोप्य पस्ते)
-दिलीप बिरुटे
9 Jul 2019 - 8:31 pm | गवि
ऑ?
46 ओव्हर्समधे फक्त 211 केल्यात ना त्यांनी? मग भारताला 46 ओव्हर्समधेच 237 टार्गेट कशापायी?
9 Jul 2019 - 9:07 pm | प्रचेतस
When overs are lost, setting an adjusted target for the team batting second is not as simple as reducing the run target proportionally to the loss in overs, because a team with ten wickets in hand and 25 overs to bat can play more aggressively than if they had ten wickets and a full 50 overs, for example, and can consequently achieve a higher run rate. The DLS method is an attempt to set a statistically fair target for the second team's innings, which is the same difficulty as the original target. The basic principle is that each team in a limited-overs match has two resources available with which to score runs (overs to play and wickets remaining), and the target is adjusted proportionally to the change in the combination of these two resources
9 Jul 2019 - 9:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही नवीन अपडेट्स ?
-दिलीप बिरुटे
9 Jul 2019 - 10:00 pm | प्रचेतस
मॅच काय सुरू होईल असे दिसत नै, शुरा
9 Jul 2019 - 10:13 pm | इरामयी
थोडंसं पुरुष मंडळींंना जळवण्यासाठी whatsapp वरून चोप्यपस्तेः
*आज भारत वि.न्युझीलंड हा उपांत्य सामना असल्याने स्त्रियांनी घ्यावयाची काळजी....*
पती १) सायंकाळी आपल्या नेहमीच्या मालिका लावण्याचा आग्रह अजिबात धरु नये...
पती २) अधुनमधुन पतीदेवांना पाणी व चहा आणुन द्यावा....
पती ३) संघाची स्थिती वाईट असल्यास पतीस धीर द्यावा...
पती ४) संघ उत्तम स्थितीत असल्यास पतीच्या आनंदात सहभागी व्हावे...
पती ५) पती सातत्याने चिडचिड करु लागल्यास शांतता बाळगावी...
पती ६) तुम्ही नेहमी जरी नवऱ्याला रिमोटली कंन्ट्रोल करत असल्यात तरीही टि.व्ही चा रिमोट आज मात्र त्याच्याकडेच द्यावा...
पती ७) "भारतच जिंकेल" हे सातत्याने म्हणावे....
हे सगळं करताना तुमची घुसमट झाली तरी काळजी नको. तुम्हाला त्याचा वचपा काढायची एक खूप चांगली संधी वारंवार मिळेल आणि तेसुद्धा आजच. तिचा जरूर लाभ घ्या:
पत्नी १) सामना सुरू असताना तुमचा नवरा जेंव्हा केंव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या सुंदर बायकांकडे डोळे भरून पहात असेल तेंव्हा खुशाल टिव्ही आणि त्याच्या मधोमध (त्याला टीव्ही दिसुच शकणार नाही असं) उभं राहून त्याच्या नजरेला नजर भिडवून पण अतिशय प्रेमाने हे सगळे प्रश्न विचारा: स्कोर काय झाला? आत्ता कोण बॅटिंग करतंय? या बॉलरचं नाव काय? किती ओव्हर झाल्या? रन रेट काय आहे? कोण चांगला स्पिनर आहे? विकेट कीपरच नाव काय?
मग टिव्हीवरची मॅच कोणीही जिंको... तुम्हाला निर्मळ आनंदाची अनुभूती येईल.
10 Jul 2019 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण शेवटचा उतारा नव्हता. छान.
अवांतर : आमच्याकडे अजुनही सचिन तेंडुलकर टीम मधे असतो. धन्यवाद. ;)
-दिलीप बिरुटे
10 Jul 2019 - 2:49 pm | इरामयी
:)
9 Jul 2019 - 11:16 pm | किसन शिंदे
आजची मॅच उद्यावर गेली.
10 Jul 2019 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्या देशात पाऊस असतो तिकडे ठेवतातच कशाला हे सामने.
असो, आज काय वेदर रिपोर्ट ?
राहिलेल्या चार षटकात ४० धावा जरी आल्या तरी दोनशे एक्कावनच्या पुढे ते जात नै.
आणि ते आव्हान आपण लीलया पेलू शकतो. आपल्या संघाचं एक वैशिष्ट्य की आपण त्या त्या संघाच्या लेवलवर जाऊन खेळतो म्हणून दोनशे एक्कावनचं टारगेट साठी चार पाच फलंदाज कामी येतील असे वाटते.
भारतीय संघाला शुभेच्छा आहेतच.
अवांतर : धागा लेखकांनी वरचवर अपडेट टाकले पाहिजे. आग्रह नाही पण धाग्याचा रंगमंचं हलता ठेवला पाहिजे असे वाटते.
-दिलीप बिरुटे
(मिपा फलंदाज)
10 Jul 2019 - 10:32 am | गवि
ते डकवर्थ लुईस नियमानुसार जास्तीचे टार्गेट येणार होते तो मानसिक लोड उतरला. त्या नियमांचं लॉजिक काही पटलं नाही पूर्णपणे.
अमुक परिस्थितीत संघ अधिक आक्रमक खेळला असता, तमुक इतकी षटके असती तर तो रिलॅक्स खेळला असता वगैरे इतका तपशीलवार विचार करुन वाढीव टार्गेट ठरवायचं तर मग आणखी बऱ्याच बाजू निसटल्या असं म्हणता येतं. पाऊस पडू शकतो याची जाणीव असतानाही एक संघ तुलनेत स्लो खेळला, तर हे हेतुपुरस्सर असण्याची शक्यता आहे असं म्हटलं तर? त्याबद्दल त्यांना पेनल्टी द्यावी की फायदा? असो.
बाकी मिपाकर रंगमंच हलता ठेवतीलच.
10 Jul 2019 - 11:02 am | प्रचेतस
डकवर्थ लुईस पद्धतीमध्ये काही सुधारणा करुन २०१४ पासून डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत वापरात आहे.
10 Jul 2019 - 12:08 pm | महासंग्राम
हेच ते २ महान नग
10 Jul 2019 - 2:47 pm | इरामयी
अपराधी!!! ए , हान् रे त्या दोगान्ला!
10 Jul 2019 - 3:43 pm | mayu4u
The Duckworth-Lewis method of resolving rain-affected games has divided the cricketing fraternity into those who do not understand it and those who pretend they do. Rumour has it that it involves calculus, astrology, quantum mechanics and the use of dice. Either way , the teams get screwed.
10 Jul 2019 - 11:23 am | श्वेता२४
तिथूनच पुढे सुरु होणार आहे.
10 Jul 2019 - 1:23 pm | गवि
https://m.maharashtratimes.com/sports/cricket-news/ndia-vs-new-zealand-s...
अरे देवा..
10 Jul 2019 - 2:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
काळजी/पर्वा इल्ले !
सामना पूर्ण झाला नाही तर लीग फेजमध्ये अधिक गुण असलेला भारत अंतिम फेरीत जाईल.
10 Jul 2019 - 2:18 pm | गवि
अजिबात होऊ न शकल्यास ते ठीक.
पण पावसाच्या अधेमधे अर्धवट काहीतरी सामना होऊन डकवर्थ लुईस पद्धतीने टार्गेट वाढवून मिळून उगीच पराभवाची भानगड नको.
10 Jul 2019 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा
सामना झालाच पाहिजे! हिट मॅन ची अजून एक सेंच्युरी हुकले ना! दुत्त दुत्त
10 Jul 2019 - 3:43 pm | गवि
घ्या गुरुजी. अता काय?
10 Jul 2019 - 2:52 pm | श्वेता२४
.
10 Jul 2019 - 3:03 pm | यशोधरा
२१७/ ५, ४७, ४.६२
10 Jul 2019 - 3:12 pm | गवि
एकामागून एक दोन विकेटी तेवढ्यात.
अंपायरचे बोट ईश्वराच्या दिशेत.
10 Jul 2019 - 3:13 pm | यशोधरा
बघ म्हणावे मांजराला, जडेजा खेळतो बरं.
10 Jul 2019 - 3:12 pm | प्रशांत
१० विकेट पडतील
10 Jul 2019 - 3:13 pm | ज्ञानोबाचे पैजार
दोन विकेटा पडल्या पण
पैजारबुवा,
10 Jul 2019 - 3:15 pm | गवि
भारतीय इनिंगच्या वेळी अँपायरच्या दोन्ही खिशांत फेविकॉल भरुन ठेवावे. हात खिशाबाहेर निघायला नकोत.
हवे तर पीडिलाईटची स्पॉन्सरशिप घ्यावी.
10 Jul 2019 - 3:15 pm | शाम भागवत
आठवा आऊट.
10 Jul 2019 - 3:15 pm | यशोधरा
ढिंकचिका!!
10 Jul 2019 - 3:16 pm | प्रशांत
दोन यॉर्कर पाहिजेत बास
10 Jul 2019 - 3:18 pm | गवि
चायला. पुन्हा ईश्वराकडे अङ्गुलीनिर्देश?
असू देत. जास्ती विकेटस घेतल्या तर पुढे अडीअडचणीत फायदाच होईल.
10 Jul 2019 - 3:24 pm | प्रशांत
काळजी नका करु बिल देवुन या...
10 Jul 2019 - 3:27 pm | गवि
तुम्ही सायकलची पडलेली चेन बसवून या बघू ब्रेकमध्ये. :-(
10 Jul 2019 - 3:21 pm | शाम भागवत
५० ओव्हर्स संपली. हुश्श.
८ बाद २३९
डिएलएस चा पराभव.
भारताचा विजय पक्का.
10 Jul 2019 - 3:28 pm | गवि
तो कसा?
10 Jul 2019 - 3:42 pm | शाम भागवत
टार्गेट अजून अवघड करता येणार नाही ना.
:)
10 Jul 2019 - 3:40 pm | शाम भागवत
रोहित आऊट.
10 Jul 2019 - 3:41 pm | गवि
गेला रोहित.. शिंकली माशी.
10 Jul 2019 - 3:43 pm | यशोधरा
त्या मांजराला हाकला आधी! :/
10 Jul 2019 - 3:45 pm | शाम भागवत
कोहली आऊट
रिव्ह्यू ची मागणी केलीय.
10 Jul 2019 - 3:46 pm | शाम भागवत
दोन आऊट ५
10 Jul 2019 - 3:47 pm | गवि
बसवला xxx.
काय खरों नसा.
10 Jul 2019 - 3:46 pm | गवि
चायला विराटचा रिव्ह्यू.
10 Jul 2019 - 3:46 pm | श्वेता२४
काय खरं नाही
10 Jul 2019 - 3:47 pm | शाम भागवत
२३९ खूपच जास्त वाटायला लागल्येत.
10 Jul 2019 - 3:47 pm | यशोधरा
धोनी खेळेल.
10 Jul 2019 - 3:47 pm | शाम भागवत
मी बंद केला टिव्ही.
काम करतो जरा घराबाहेरची.
:))))
10 Jul 2019 - 3:52 pm | गवि
भाजी आणतो जरा. गुड डे.
10 Jul 2019 - 3:50 pm | शाम भागवत
तिसरा आउट
10 Jul 2019 - 3:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन विकेट्स गेल्या आता तुमची जवाबदारी.
५/२ -३ ओव्हर्स
-दिलीप बिरुटे
10 Jul 2019 - 3:53 pm | गवि
तिसरा निवर्तला. आता आपण जरा दीर्घश्वसन करु.
10 Jul 2019 - 3:52 pm | शाम भागवत
टिव्ही बंद करेपर्यंत तिसरा गेला.
(डोक्याला हात लावलाय.)
10 Jul 2019 - 3:55 pm | यशोधरा
आपणच जिंकणार आहोत म्हणजे आहोत.
10 Jul 2019 - 4:04 pm | गवि
मेरे करन अर्जुन आयेंगे.. ??
10 Jul 2019 - 4:11 pm | यशोधरा
जिद नै छोडने का रे मामु!
10 Jul 2019 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाकी काही नाही. तिने मळवट जरा एका बाजूला (ऑफसेट) भरलाय... फॅशन म्हणून. :)
10 Jul 2019 - 6:58 pm | खिलजि
गवि साहेब आपले कारण अर्जुन आले वाटतं .. सिक्स मारला कि करणने
10 Jul 2019 - 3:55 pm | श्वेता२४
नाहीतर अकुनी नवीन पाडलेली कविता वाचते. तेवढाच मूड चेंज :D
10 Jul 2019 - 4:03 pm | श्वेता२४
आज सगळीकडून भ्रमनिरास व्हायचा दिवस दिसतोय
10 Jul 2019 - 3:55 pm | चौकटराजा
भारत हहा सामना जिंको वा हिरो सध्याची टीम ही विनर टीम नाही हे मी पहिल्या सामन्या पासून सांगत आहे ! ३ ४ ५ ६ ची बोंबी आहे व त्या खाली क्लब स्टॅंडर्ड ची ही फलंदाज नाहीत !
10 Jul 2019 - 4:08 pm | शाम भागवत
तुमचे म्हणणे खोटे पाडण्यासाठी पहिले तिघे आऊट झाल्येत.
;)
10 Jul 2019 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजच्या दिवस तरी. ;)
-दिलीप बिरुटे
10 Jul 2019 - 4:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
चौरा काका म्हणतात त्यात तथ्य आहे. इथपर्यंत केवळ नशिबाने पोचलो आहोत.
आज न्युझीलंड प्रयत्नांची पराकाष्ठा करणार.
माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल.
पैजारबुवा,
10 Jul 2019 - 4:25 pm | यशोधरा
एकटा मांजऱ्या पुरे नव्हता का की आता तुम्ही पण असं बोलताय ते! दु दु पैबु काका!
10 Jul 2019 - 3:55 pm | इरामयी
मधल्या फळीच्या फलंदाजांना -- पन्त आणि कार्थिक -- आता आपापलं कर्तृत्त्व दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली आहे.
10 Jul 2019 - 4:08 pm | खिलजि
सर्वानी भारतमाता कि जय १०८ वेळा म्हणा बघू .. एव्हढं करा नंतर पुढे दुसरा उपाय सांगतो ..
10 Jul 2019 - 4:12 pm | mayu4u
... कपाटात!
10 Jul 2019 - 4:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही यज्ञ किंवा पावसाचे काही स्तोत्र ?
-
10 Jul 2019 - 4:21 pm | गवि
तेवढा एकच ऑप्शन राहिलाय आता.
10 Jul 2019 - 4:17 pm | खिलजि
आहे ना सर ,, पण आधी सर्वजण १०८ वेळा भारतमाता कि जय बोलले का ?
10 Jul 2019 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२४ वर ४
बाय ऑल. परिस्थिति सुधारली तर येईल.
धागा आला नस्ता तर जिंकलो असतो. ;)
-दिलीप बिरुटे
10 Jul 2019 - 4:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
कार्तिक खपला
पैजारबुवा,
10 Jul 2019 - 4:28 pm | गवि
चला, काही बाऊंडरीज
थोडे पॉझिटिव्ह वातावरण करुया.
10 Jul 2019 - 4:41 pm | जॉनविक्क
4 विकेट जाऊनही पंत आणि पांड्या सकारात्मक अभिनिवेशात भासत आहेत हे चांगले चिन्ह आहे थोडं कर्तृत्वाची साथ हवीय, लेट्स सी
10 Jul 2019 - 4:51 pm | गवि
सूर सापडतोय. स्थिर होताहेत बहुधा.
10 Jul 2019 - 5:01 pm | यशोधरा
होणार, जिंकणार. आपण.
10 Jul 2019 - 4:53 pm | गवि
फक्त 4 विकेट गेल्यामुळे कणा मजबूत राहिला नाही. एखादी आणखी विकेट गेली तरी खाडकन चित्र बदलेल.
10 Jul 2019 - 5:08 pm | उगा काहितरीच
घरी लवकर जाऊन सामना बघायची इच्छाच गेली राव.
शेवटी क्रिकेटमधे शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल हे नाही सांगता येत पण आशा सोडून दिली आहे. :-(
10 Jul 2019 - 5:10 pm | गवि
१८० बॉल आणि १७० रन्स हव्यात. भरवश्याच्या आणखी दोन तीन जास्त विकेट्स हाती असत्या तर हे समीकरण पाहायला निवांत वाटलं असतं एरवी.
10 Jul 2019 - 5:14 pm | गवि
टीव्ही अनुपलब्ध.
एक मेडन गेली की काय? असो.
जास्त चेंडू आणि कमी रन हव्यात इथून आता चेंडू आणि आवश्यक रन्स समसमान झाल्या.
आता गणित अधिकाधिक उलट होऊ नये बस्स.
10 Jul 2019 - 5:15 pm | प्रीत-मोहर
जिंकु आपण. पण धोणीला पाठवायला हवं होत वर अस वाटलं. अश्या सिचुएशनला तो बेस्ट होता
10 Jul 2019 - 5:18 pm | गवि
मी पाठीशी शिल्लक आहे, असा दिलासा देऊन काहीसा मानसिक ताण कमी करण्यासाठी धोनी मागे राहिला असेल.
10 Jul 2019 - 5:21 pm | जॉनविक्क
अजून धोनी आउट व्हायचा आहे हा विचार मनाला जास्त आश्वस्थ करतो म्हणूनच तो खालच्या नंबरवर आहे, अन्यथा जिथे रथी महारथी कोसळले तिथे आम्ही काय टिकणार अशीही ओरड होऊन जाते
10 Jul 2019 - 5:18 pm | चौकटराजा
अगदी कमी देशात खेळला जाणारा हा " विचित्र" खेळ मी १९६६ पासून म्हणजे क्लाइव्ह लॉईड १९ वर्षांचा असल्यापासून पाहात आहे .इथे शेवटाचा चेंडू पडेपर्यंत काहीही होऊ शकते. पण ५ बाद झाल्यावर चमत्कार करणारे लान्स क्लूस्नर आज आपल्या संघात नाहीत . १७५ वाला कपिल देव नाही .पाकिस्तान मध्ये बॉलर्स जसे किलिंग इन्स्टीकट ने फलंदाजी करतात ती बॉलर्स ची परंपराच आपल्याकडे फारशी नाही, हार्दिक व पंड्या ना अनुभव कमी आहे ,धोनी २०१६ पासून मंदावला आहे. दिनेश कार्तिक चांगला खेळाडू असेलही पण आता यावेळी त्याची निवड चुकीचीच आहे .इंग्लंडात फिरकीला फारसा वाव नसतोच . धावा रोखल्या तरी विकेट मिळणे दुरापास्त असते. हे लक्षात घेऊन विजेता स्वप्न पाहावे.
10 Jul 2019 - 5:19 pm | चौकटराजा
हार्दिक व पंत असे वाचावे !
10 Jul 2019 - 5:22 pm | जॉनविक्क
10 Jul 2019 - 5:22 pm | गवि
गेला पंत... :-(
10 Jul 2019 - 5:29 pm | जॉनविक्क
आज प्रात्यक्षिक दिसतंय... सुरुवातीचे 3 खेळाडूच काय ते पाया रचतात :(
10 Jul 2019 - 5:34 pm | जॉनविक्क
पण ते किल्ला लढवत राहिले
10 Jul 2019 - 5:44 pm | गवि
१२५ चेंडूंत १५५ रन्स हव्यात. अधिकाधिक कठीण बनत चाललं.
10 Jul 2019 - 5:45 pm | प्रचेतस
फेडरर निशीकोरी मॅच बघत बसावी आता.
10 Jul 2019 - 5:49 pm | गवि
बोंबला.. शुभरात्री.
10 Jul 2019 - 6:33 pm | गवि
धोनी जाडेजा जोडी कौतुकास्पद. स्थिर वाटतंय आता.
सिक्स फोर वगैरे अधेमध्ये चालू. चौदा एक्स्ट्रा रन्स. थिंक पॉझिटिव्ह.
10 Jul 2019 - 6:49 pm | प्रचेतस
लोड कमी झाला असेल थोडा
10 Jul 2019 - 6:46 pm | खिलजि
अरे मी इथे मंत्रपाठ करतोय म्हणून चांगली दशा सुरु झाली आहे .. मला तुमचेही पाठबळ हवे आहे .. त्या जडेजाला मी मंत्र फुंकुनच मैदानावर उतरवले आहे आता तुम्ही त्या धोनीला पाठबळ द्या
10 Jul 2019 - 7:06 pm | खिलजि
उत्कंठावर्धक सामना ... जडेजाने मन जिंकलंय.. निकाल काहीही असू देत
10 Jul 2019 - 7:11 pm | धर्मराजमुटके
अपेक्षांना अंत नाही ! पाकीस्तान बरोबर खेळताना चषक नाही जिंकला चालेल पण पाकीस्तानला हरवावे असे वाटते. आज इथपर्यंत आलोय तर जिंकूनच यावे असे वाटते.
भारत जिंकणार ! टेंशन नक्को !
10 Jul 2019 - 7:21 pm | धर्मराजमुटके
शब्द गिळायची वेळ आली !
10 Jul 2019 - 7:16 pm | गवि
जडेजा चुकीच्या वेळी गेला. हुरहूर.
10 Jul 2019 - 7:25 pm | धर्मराजमुटके
शब्द गिळायची वेळ आली !
10 Jul 2019 - 7:25 pm | यशोधरा
थोडक्यात गेली की. :(
पण जडेजा आणि धोनी छान खेळले.
10 Jul 2019 - 7:36 pm | चौकटराजा
भुवनेश्वर कुमार व चहल पूर्ण ५० ओव्हर्स देखील खेळले नाही . अशावेळी मी जे किलिंग इन्स्टिन्क्त आपल्या ७ नंतरच्या खेळाडूंच्या अंगात नाही असे म्हणालो ते किती उचित आहे ते पहा !
10 Jul 2019 - 7:48 pm | यशोधरा
चौरा काका, पुढच्या वेळी तुम्ही फक्त positive बोला हां काय. मग आपण हरणार नै.
10 Jul 2019 - 8:03 pm | चौकटराजा
२०२३ मध्ये मी सत्तरी ओलांडून जाईन . मग तर माझे कुणीच ऐकणार नाही ! माझा मुद्दा एवढाच टीम चान्गली खेळली पण १९८३ इतके टीमवर्क नव्हते !
10 Jul 2019 - 8:09 pm | यशोधरा
१९८३ इतके टीमवर्क नव्हते >> मान्य. पण तेव्हापासून आतापर्यंत क्रिकेट किती बदलले आहे.
10 Jul 2019 - 7:27 pm | धर्मराजमुटके
आता नेटकरी अनुष्काची ऑनलाईन धुलाई करतील बहुतेक !
10 Jul 2019 - 7:28 pm | चौकटराजा
निकाल काहीही असू दे खालील बाबी सिद्ध आहेत.
१) जर धोनीने निवृत्त होऊन पंत मधला पोरकट पणा काढला तर पंत एक उत्तम खेळाडू होऊ शकतो.
२) हार्दिक पंड्या हा खेळाडू फक्त आय पी एल च्या लायकीचा खेळाडू आहे . त्याला इतर भवितव्य नाही.
३) रवींद्र जडेजा व अश्विन हे अजूनही पोटेन्शियल असलेले खेळाडू आहेत .
४) २०१६ पासून धोनीच्या फटाक्यातला दणका हरवला आहे त्याने निवृत्त होणे उचित .
५) विजय शंकर चा अशोक मंकड ( फक्त इंडिया हिरो ) होण्याची शक्यता अधिक .
10 Jul 2019 - 7:40 pm | धर्मराजमुटके
जाऊ दे ना वं ! आज इथे कोणी चिरफाड च्या मुड मधे असेल असं वाटत नाहीये !
10 Jul 2019 - 7:51 pm | जॉनविक्क
ज्या पाकिस्तानने किवींचा पराभव केला त्या किविंना आपण हरवू शकलो नाही. असो वेल प्लेड इंडिया.
10 Jul 2019 - 10:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रिकेट हा सांघिक खेळ असला त्यात सुरुवातीचे फलंदाज जवाबदार असले तरी प्रत्येक वेळी त्यांनी शतकं ठोकली पाहिजेत. मग हा महातारा धोनी टुचुटुचु खेळून आपला बीपी वाढवतो या xx ला अगोदर बलजबरीने निवृत्त करा. बस दुसरं काही नको. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
(जडेजाबरोबर टुचुटुचु खेळल्यामुळे म्हाता-या धोनीवर संतापलेला)
10 Jul 2019 - 10:34 pm | यशोधरा
ओ काका, त्यानं एक बाजू लावून धरली म्हणून.
10 Jul 2019 - 11:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्क्यूज् मी काकु, आयपीएलला हा म्हातारा धोनी जीवावर उदार होऊन खेळतो. आजच्या सामन्यात त्याने जड़ेजाबरोबर एक बाजू लावून धरली पण चेंडू किती खाल्लेत. कसलं टुचु टुचु खेळतो. अरे प्रसंग काय, तू काय खेळतो काय ? वय किती, खेळतो किती ? च्यायला, मला त्याचं तोंड बघायची इच्छा नै.
काकू तुम्ही त्याची बाजू घेऊन माझं ब्लडप्रेशर वाढवू नका. अगोदरच मला खुप कामाचा लोड आहे. बस आपल्याला त्याला रिटायर करायचंय. या गोष्टीसाठी,आपल्याला मिपावर एक ह्याशटॅग सुरु करायचंय. #''धोनीने निवृत्त व्हायलाच पाहिजे'' #
धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
10 Jul 2019 - 11:17 pm | शिवहरि
सेमिफायनलमधे match during चालले नाही.
10 Jul 2019 - 11:19 pm | शिवहरि
सेमिफायनलमधे match fixing चालले नाही.
15 Jul 2019 - 7:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न्यूझीलंड आणि इंग्लण्ड या दोन्ही संघांनी विश्वचषक क्रिकेट अंतिम फेरीत धड़क मारली आणि कोण जिंकेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. इंग्लण्ड जिंकेल तर छुपा न्यूझीलंड बाजी मारेल असे वाटले. नाणेफेक ( टॉस) जिंकून न्यूझीलंडने पहिली बाजी मारली असे वाटले पण ठराविक धावसंखेच्या आणि ठराविक अंतराने बाद होणा-या संघाने फार मोठी धावसंख्या उभारली नव्हती. २४१ हे आव्हान समोर ठेवून उतरलेल्या रॉय रुट च्या बळावर इंग्लण्ड सहज जिंकेल असे वाटले होते पण चार फलंदाज बाद झाल्यानंतर सामना न्यूझीलंडकड़े फिरला होता. परंतु सामना शेवटच्या षटकापर्यन्त जाऊन टाय झाला. सुपर ओव्हर मधेही सामना टाय झाला. सामन्यात अधिक चौकार ज्याने मारले असतील तो संघ विजयी या मुर्ख नियमामुळे इंगलंडला विश्वविजेता ठरविण्यात आले. एका रोमहर्षक सामन्याचा असा शेवट पाहुन न्यूझीलंडचा समर्थक म्हणून आम्ही हळहळन्याशिवाय काय करू शकणार होतो. इंग्लण्डचं अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
15 Jul 2019 - 9:15 am | फुटूवाला
सामन्यात अधिक चौकार ज्याने मारले असतील तो संघ विजयी
सुपर ओव्हरमध्ये बहुतेक.
15 Jul 2019 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पूर्ण कालच्या सामन्यात आणि सुपर ओव्हर्स मधे इंग्लडने एकूण २४ चौकार ठोकले तर न्यूझीलंडने १६ चौकार ठोकले.
-दिलीप बिरुटे
15 Jul 2019 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार
माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल.
पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले.
पैजारबुवा,
15 Jul 2019 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार
माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल.
पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले.
पैजारबुवा,