मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर भारतिय क्रिकेटचा खंदा आधरस्तंभ तितकाच नम्र विनयशील आणी सच्चा खेळाडु तो जितका
खेळाडु म्हनुन श्रेष्ठ तितकाच एक व्यक्ती म्हनुन ही श्रेष्ठ आहे याच सचिनने आपल्या कारर्किदीतील प्रतेक शतकांमधे कोनाचा ना कोनाचा
हात आहे असे सांगुन त्यांना धन्यवाद दिले
म्हनुनच मटा च्या बातमीचा संर्दभ यथे देत आहे
नारंगी नागपुरात सचिनच्या गुलाबी शतकाचा साज चढला आणि जामठा गावचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम पावन झाले! नवीन घरात प्रवेश करताना वास्तूपूजा केली जाते ती श्रीगणेश पूजनाने. गुरूवारी विदर्भचे नवे स्टेडियम सचिनच्या शतकाने शुभंकर झाले. याचा आनंद केवळ नागपूरकरांनीच नाही तर साऱ्या क्रिकेट जगताने लुटला. चौथ्या क्रिकेट कसोटीचा नीरस होऊ पाहणारा पहिला दिवस ताजातवाना झाला.
हाच सचिन जेव्हा गिल्ख्रिस्ट जेव्हा त्याच्या वर आरोप करतो तेव्हा राग न करता फक्त शांत राहतो
हाच सचिन जेव्हा चेंडु कुरतड्न्याचा खोटा आरोप केला जातो तेव्हा पंचाशी वाद न घालता शांत पणे त्याचे पालन करतो
हाच सचिन जेव्हा कोलकत्ता कसोटीत शोहेब अख्तर जेव्हा रडीचा डाव खेळुन सचिनला धाव बाद करतो
तेव्हा तमाम भारतिय प्रेक्शकांना शांत राहन्याचे आव्हान करतो आनी दिवसाचा खेळ सुरु राहन्यात मदत करतो
तेव्हा सचिनने दोन्ही प्रकारच्या क्रिकेट मधे १०० शतके ठोकावित
प्रतिक्रिया
7 Nov 2008 - 11:03 am | वेताळ
सचिनला खेळताना बघणे दुग्धशर्करा योग असतो.अश्याच शतकी खेळी त्याच्या कडुन अपेक्षित आहेत.
(सचिनचा फॅन)वेताळ
7 Nov 2008 - 11:06 am | मदनबाण
सचिन संपला असा कांगावा करणार्या लोकांना सचिन याच पध्ततीने उत्त्तर देतो..
या महान फंलंदाजाला माझा सलाम....
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
7 Nov 2008 - 12:27 pm | सागर
या सम हाच... पुन्हा होणे नाही....
सचिन ला वंडरबॉय.... लिटील मास्टर.... अशा बिरुदांनी आपण त्याची स्तुती करतो
हे शब्द फक्त आपल्यासाठी आहेत. पण त्याची किर्ती त्याहिपेक्षा वरचढ आहे.... एवढा सभ्य आणि जोरदार खेळाडू पुन्हा होणे अवघड आहे...
शतकांच्या शतकांनी आपली कारकीर्द सचिनने संपवावी एवढीच आता अपेक्षा त्याच्याकडून आहे...
विक्रमांमागोमाग विक्रम फक्त त्याच्याच नावावर लिहिले गेले आहेत.... एवढ्या सातत्याने खेळणारा फक्त सचिनच....
क्रिकेटच्या निर्विवाद सम्राटाला मानाचा मुजरा....
(सचिनप्रेमी) सागर
7 Nov 2008 - 12:39 pm | टारझन
सचिन भौंचे अभिणंदण !!! जबरा खेळी केली .... पण हल्ली ते आकर्षक षटकार पहायला नाही मिळत ... ज्याचा प्रसाद शेन वॉर्न , डेमियन फ्लेमिंग आणि मायकेल कॅस्प्रोविच सारख्या गोलंदाजांना शारजा मधे मिळाला होता ...
सचिन क्रिकेट चा देव आहे , आम्ही त्याचे निस्सिम चाहते आहोत ... पण पिक वर असताना निवृत्ती घेणे योग्य आहे ( आदर्श ऑस्ट्रेलियाचा) असा अर्थ नाही की आत्ताच तेंडल्या रिटायर व्हावा ... आपले दोनेक वर्ष खेळावं अजुन ...
आणि अंमळ सेंच्युर्या ठोकाव्यात जेणे करून तो ***** पाँटिंग सचिन ला क्रॉस करण्याचा विचार पण करणार नाही ...
वन डे मधे सचिन ला मागे टाकणे आत्ताच्या एकाही बॅटस्मन ला अशक्य आहे !!
भविष्यात कोणी पैदा होइल की नाही हे ग्रह दशेवर अवलंबुन आहे. ग्रह फिरले (तसे ते कायमच फिरतात म्हणा) तरच सचिनच रेकॉर्ड तुटू शकेल .... अशी ग्रहदशा न येओ आणि तेंडल्याचे विक्रम्स अबाधित राहो हीच ग्रहांकडे प्रार्थना
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
7 Nov 2008 - 2:04 pm | विजुभाऊ
सचिन च्या नावावर आणखी एक रेकॉर्ड आहे.
तो हॅन्डलिन्ग द बॉल सोडून बाकी सर्व प्रकारे बाद दिला गेलेला एकमेव खेळाडु आहे.
( ऍप्पियरिन्ग लेट ओन द ग्राउन्ड या प्रकारे तो बाद होता होता वाचला आहे. तिसर्या पंचाने बाद दिलेला पहिला खेळाडु ही तोच आहे)
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
7 Nov 2008 - 2:37 pm | विसोबा खेचर
सचिन जिंदावाद...!
आपला,
(सचिनप्रेमी) तात्या.
7 Nov 2008 - 5:27 pm | सुमीत भातखंडे
९९ वर १० बॉल्स खेळला.
म्हट्लं परत नर्वस ९० चा बळी ठरतो की काय.
पण शेवटी तो most awaited चौकार आला आणि जीव भांड्यात पडला.
सचिनचं मनापासून अभिनंदन.
8 Nov 2008 - 5:06 pm | अनामिका
सच्चू चे कौतुक ,अभिनंदन हे सगळ करायला मराठी शब्दकोषातील सगळी विशेषणे अपुरी आहेत.
सगळ्या टिकाकारांना आपल्या खेळाने निरुत्तर करणार्या या चेंडुफळीच्या खेळातील विक्रमादित्याला मानाचा मुजरा.
"निस्सिम सचिन प्रेमी"
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
8 Nov 2008 - 5:14 pm | राज्या
अरे पण याच सचिनला शिव्या देणार्यांचं काहीतरी करा रे :(