लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पालक / पालकाचे देठ
गोड कणीस
१ चिरलेला कांदा
३ चिरलेल्या मिरच्या (आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करु शकता)
साय /दूध / अमूल फ्रेश क्रीम
तुप
मीठ
क्रमवार पाककृती:
१. सर्वप्रथम एक पातेल घ्या.त्यामध्ये पाणी घ्या , कणीस , चवीनुसार मीठ घालून ३ ते ४ उकळून घ्या
२. तोपर्यंत सूपची तयारी करु
३. कमी गॅस फ्लेमवर एक कढाई घ्या आणि त्यामध्ये तुप घ्या
४. तुप गरम होत आलेकी चिरलेली मिरची घ्या आणि १ मि. परतून घ्या
५. आता चिरलेला कांदा घालून २ मि. परतून घ्या
६.स्वीट कॉर्न तायार आहे ,त्यातील पाणी काढून घ्या
७. कांदा २ मि. परतून झालाकी ,यामध्ये आता पालकाची चिरुन घेतलेली पाने /देठ घलून ८ ते १०मि. परतून घेऊया . मध्ये मध्ये हलवत राहायच
८.गॅस बंद करुन हे मिश्रण थंड करायला ठेवू
९. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या
१०. मध्यम गॅस फेमवर त्याच कढाईमध्ये तुप घ्या
११. तुप गरम होत आलेकी त्यामध्ये पालकाची पेस्ट , पाणी आणि चवीनुसार मीठ घालून ८ ते १० मि उकळून घ्या
१२. आता साय घाला (मस्त फेटून घ्या)सुप मध्ये घलून २ मि. उकळून घ्या
१३. सुप तयार आहे. सर्व्ह करताना त्यामधे स्वीट कॅर्न घाला
अधिक टिपा:
फक्त पालकाचे देठ वापरुन हे सूप करु शकतो
पुर्ण रेसिपीचा व्हिडिओ :
https://youtu.be/egO7vqafa8w
प्रतिक्रिया
3 Jul 2019 - 10:51 am | श्वेता२४
बाहेर मस्त पाऊस पडत असताना असे वाफाळते सूप पिणे म्हणजे. आहाहा.......नक्की करुन बघणार. बाकी काल सरकारी सुट्टी असल्याने तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोबीच्या वड्या करुन पाहिल्या खूप छान झाल्या होत्या. बाहेर पाऊस पडत असताना त्या खूसखुशीत वड्या घरच्यांनी लगेचच गट्टम केल्या. नाहीतर त्यांचा फोटो टाकायचा होता मला तुमच्या धाग्यावर.
3 Jul 2019 - 6:00 pm | Namokar
धन्यवाद श्वेता२४
3 Jul 2019 - 11:10 am | महासंग्राम
स्वीटकॉर्न उकडून घ्यायचे कि नुसतेच उकळून घायचे कारण नुसत्या स्वीट कॉर्न ने पोट खराब होण्याचा संभव आहे ?
3 Jul 2019 - 5:57 pm | Namokar
3 Jul 2019 - 5:57 pm | Namokar
3 Jul 2019 - 5:57 pm | Namokar
स्वीट कॉर्न नीट उकडून घ्यायचे..
3 Jul 2019 - 5:59 pm | Namokar
चुकून आले सेम प्रतिसाद
4 Jul 2019 - 12:19 pm | उपेक्षित
अरे वाह,
तुमच्या पाककृती नेहमी साध्य, सिम्पल, मस्त असतात उगाच चमकोगिरी नसते, अजून येउद्या.
5 Jul 2019 - 3:59 pm | Namokar
धन्यवाद उपेक्षित :)