झटपट पराठा

Primary tabs

यशोधरा's picture
यशोधरा in पाककृती
30 Jun 2019 - 6:02 pm

..तर, पराठे बनवायची लहर आली होती पण जास्त पसारा करायची तयारी नव्हती. झटपट काय करता येईल ह्याचा अंदाज घ्यायला पाककृती पुस्तकं, जमवलेल्या रेश्प्या वगैरे पाहून झाल्या पण सोपं पण मस्त असं पटकन् आवडून जाईल,
असं काही सापडलं नाही. नेहमीचा साधा पराठा तर नको होता.

काय करावं, काय करावं हा विचार करत आंतरजालावर धांडोळा घेताना ही एक मस्त चटपटीत आणि पटकन् करता येईल अशी पराठ्याची कृती सापडली आणि बनवलेले पराठे घरी आवडले, म्हणून इथे पण सगळ्यांसाठी लिहूया, म्हटलं.

पाककृती आणि फोटो - आंतरजालावरून साभार. आमच्यात स्वयंपाक बनवतात आणि मग डायरेक्ट खातात, मध्ये फोटो गिटो काढत बसायला वेळ नसतो, पण मिपावर फोटो नसतील पाककृती फाऊल असा एक ( वाईट्ट) नियम आहे, म्हणून हे आपले तोंडी लावण्यापुरते फोटो.

तर, आपल्याला लागणार-

मळलेली कणीक
थोडे जिरे किंवा जिरेपूड
तिखट
पुदिन्याच्या पानांचा चुरा असेल, तर वा! वा!
तूप / तेल ( तूप किंवा तेल वापरू शकता)

कणिक मस्तपैकी मळून घ्यायची.
पराठे करताना, प्रथम तवा तापायला ठेवायचा.

आता, नेहमी चपात्या/ पोळ्यांसाठी घेतो, त्यापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन, पुरीसाठी करतो, त्यापेक्षा थोडा मोठा आकार होईल, इतपत लाटायचे. आता ह्या लाटलेल्या पातीवर एक - दोन चिमटीभर तिखट, जिरे ( किंवा जिरेपूड) घाला.

20190630-171810

असला तर पुदिन्याच्या सुकवलेल्या पानांचा चुरा पसरा. माझ्याकडे चुरा नव्हता, पण पुदिन्याची पाने होती, ती बारीक कापून तीच घातली.

पुदिन्याच्या पानांचा चुरा टाकून, असं दिसेल.
20190630-171832

आता ह्यावर एक दोन चमचे तूप टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचे व घडीच्या पोळीप्रमाणे लाटायचे. खूप पातळ लाटायचे नाही. तव्यावर आता हा लाटलेला पराठा भाजायला टाकायचा.

20190630-171853

खालची बाजू जरा भाजली की परतून घ्यावी, आता वरच्या बाजूला तूप लावावे व पराठा थोड्या वेळाने पुन्हा परतून दुसऱ्या बाजूलाही तूप लावावे व दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजावा.

20190630-171909

दही/ सॉस/ चटणी बरोबर खाण्यासाठी किंवा तसाच खायला पराठा तयार!

20190630-171719

इति श्री आंतरजालम् पराठापुराणम् संपूर्णम्|

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

1 Jul 2019 - 12:03 pm | यशोधरा

सर्व वाचकांचे आभार!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 12:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पराठा आवडला.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) अंडे घालून कसे लागेल
आणि
२) पुदीना नसता तर तसाच चहात बुडवून खाता येईल असे वाटले.

-दिलीप बिरुटे

१) अंडे घालून कसे लागेल

इथे पहा:

https://www.misalpav.com/node/36555

अ

प्रशांत's picture

1 Jul 2019 - 1:51 pm | प्रशांत

दोन्हि प्रकार करुन पाहण्यात येतिल

वाचनखूणा साठवण्यात आल्या

म्हण्जे अंडे पण घालणार काय?

धर्मराजमुटके's picture

1 Jul 2019 - 10:09 pm | धर्मराजमुटके

कोंबडीवर्गीय प्राण्याने म्हटले असते तर समजण्यासारखे होते पण कोंबड्याने ????

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मैदा असतांना त्याला बैदा का म्हणत असावे ??

-दिलीप बिरुटे

नाक चोंदले असेल. हॅ हॅ हॅ..

चौथा कोनाडा's picture

1 Jul 2019 - 5:55 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा

हे बाराखडीच्या व्याकरण नियमा नुसार आहे !
मैद्यातल्या मी च्या जागी प फ ब भ म कोणताही ओष्ठय उच्चार वापरू शकतो.
भैदा, बैदा, फैदा इ.
खरंतर भैदा म्हणायला हवंय, लगेच एक मागचं अक्षर चालत नाही ना ! मग त्या पुढचं अक्षर ब .... बैदा !

(अशीच आपली गंमत :-) )

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 1:45 pm | प्रचेतस

अंडे घातल्यावर पराठा झटपट होणार नाही.

अंडे घालून किती वेळ झाला आहे किंवा थकवा आला आहे त्यावर ते अवलंबून आहे.

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 1:50 pm | प्रचेतस

=))

जॉनविक्क's picture

26 Jul 2019 - 2:10 pm | जॉनविक्क

श्वेता२४'s picture

1 Jul 2019 - 1:03 pm | श्वेता२४

नक्की करुन बघेन

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 1:46 pm | प्रचेतस

साधी सोपी पाकृ.
कुणी आयती खायला आणून दिली तर खाण्यात येईल.

साधी सोपी, तरीही आयती हवी.

धन्य.

प्रशांत's picture

1 Jul 2019 - 1:54 pm | प्रशांत

अंडे टाकुण?

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 1:55 pm | प्रचेतस

अंडे खात नाही तर टाकण्याचा प्रश्नच येतो कुठे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2019 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

अंडे खात नाही म्हणूनच ते (कचर्‍याच्या डब्यात) टाकण्याचा प्रश्न आला असेल (खरे बघितले तर, उत्तर, आले असेल). ;)

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 9:55 pm | प्रचेतस

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 2:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयतं जाग्यावर मिळतं, असं म्हणतात.
अर्थात ही आमच्या पिढीची गोष्ट.

आता महिलाही नोकरी करत असतात तेव्हा कामं वाटून घेऊन करावी लागतात. त्याला आयतं जाग्यावर मिळतं हे फिलिंग येत नाही असे म्हणतात.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 2:22 pm | प्रचेतस

तुम्ही केलेली एखादी पाकृ तपशीलवार येऊ द्यात.

सरांनी बनवलेलं काही म्हणजे गुळण्यांसाठी मिठाचं पाणी वगैरे का?

अगदी अगदी, किंवा चहा म्हणून नुसतीच मिक्स केलेली चायपत्ती साखर वगैरे वगैरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 2:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नुस्तं एक सिंगल आमलेट केलं त्याचा पार चौथा झाला. मग मित्र म्हणे दोनचं करा तेव्हा जरा जमलं. पण काही वेगळं केलं तर पाकृ करतो.

अंड्याचा पराठा करतो.

-दिलीप बिरुटे

चला आता इथे रेसिपीचे जिन्नस शोधणे आले.

मी इथे फार्मर्स मार्केटमधून पुदिना आणला आहे.

बाकीचे सामान इथे इंडियन ग्रोसरीत मिळेल असं वाटतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 2:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण जेव्हा ही रेशेपी कराल तेव्हा फोटु टाका प्लीज.
नै तर लोक नुसते म्हणतात करून पाहू. वगैरे ते थापा मारल्यासारखं वाटतं.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 2:33 pm | प्रचेतस

सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 2:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आदरणीय गविसेठ नेहमी म्हणतात यव करून पाहीन त्यव करून पाहीन त्यांच्याबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून म्हणावेसे वाटते त्यांना काहीच जमत नसावे.

-दिलीप बिरुटे

तुम्ही दर्शविलेल्या या आदराने मी अगदी गहिवरलो आहे. गळा दाटून आला. डोळे पाणावले.

आता बिल मात्र तुम्हीच द्या.

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 2:43 pm | प्रचेतस

ह्याबद्द्ल अगदी सहमत. ते इंडियन ग्रोसरीतही जायचे नाहीत ह्याबद्द्ल खातरी आहे.

सोप्पी आणि छान पाककृती यशोधरा ताई :)
आम्ही ऑफिसला निघायचा आधी वेगळा नाष्टा करण्याएवजी कधी कधी हेच खातो गरम गरम चपात्या लाटताना असे करतो आणि त्यावर तुप घालून पटकन चपातीचा रोल करुन गरम गरम चपाती फस्त .... आ.. हा.. हा...
मस्तच लागते

Rajesh188's picture

1 Jul 2019 - 2:25 pm | Rajesh188

मलबारी पराठा स्टोअर मध्ये रेडीमेड मिळतात .
फक्त गरम करायचे असतात

प्रचेतस's picture

1 Jul 2019 - 2:27 pm | प्रचेतस

ते जबरदस्त लागतात चवीला. डीमार्टला मिळतात.

हा दंगा वाचून खूपच मज्जा आली! कधी काळी मिपावर अस्साच दंगा होत असे, त्याची आठवण आली! =))

सर्व दंगेकर्यांना त्यांनीच बनवलेले पराठे बक्षीस!

सर्व दंगेकर्यांना त्यांनीच बनवलेले पराठे बक्षीस!

हे राम.

काही पराठासदृश पदार्थांना धपाटे असं का म्हणतात ते कळलं.

;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 2:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शंभर पराठे करूनच राहु....!

-दिलीप बिरुटे

गवि's picture

1 Jul 2019 - 2:54 pm | गवि

किती अवांतर कराल?

तुम्ही, प्रचेतस वगैरे ज्येष्ठ मिपाकर असे अवांतर करताना बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 3:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षि म्हणून माझे एक मिपाकर मित्र आहेत त्यांना पण चांगले पराठे येतात म्हणे... हल्ली दिसत नै ते.

-दिलीप बिरुटे

चाणक्य's picture

8 Jul 2019 - 11:33 am | चाणक्य

धपाटे दिले म्हणे कुणीतरी.

आम्ही मूली/कोबी /बटाटा याने आल्लु पराठे खाऊन दिवस काढतोय. पण एकदाही फोटो काढायचं सुचलं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 3:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>आम्ही मूली/कोबी /बटाटा याने आल्लु पराठे खाऊन दिवस काढतोय.

तुम्ही मुलींनी इतर भाजीपालाही करून पाहिला पाहिजे असे वाटते. ;)

(ह.घ्या)

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

1 Jul 2019 - 5:20 pm | पद्मावति

मस्तं दिसतोय झटपट पराठा.

चौथा कोनाडा's picture

1 Jul 2019 - 5:58 pm | चौथा कोनाडा

झकास.
साधा सोपा पराठा !
(मीठ ?)

आवडला पराठा .

कणिक मळताना घातलेलं असतं की मीठ त्यात. तितकं पुरे.

चौथा कोनाडा's picture

3 Jul 2019 - 5:53 pm | चौथा कोनाडा

ओके,
कितपत नमकीन/ चविष्ट लागतंय बगायला पायजे.
धन्यू.

आमच्यात स्वयंपाक बनवतात आणि मग डायरेक्ट खातात

काय सांगता ?? आम्ही तर कोणताही पदार्थ बनविण्याअगोदरच मनातल्या मनात (मांडे) खातो.

स्नेहांकिता's picture

1 Jul 2019 - 10:18 pm | स्नेहांकिता

इतक्या किचकट नि खटपटीच्या पाकृला लोक्स सोप्पी सोपी का म्हणताहेत हेच कळेना !
बाकी, यशो धन्य हो. येवढा पेशण्स माला नै बै जमत __/\__
काही ज्येष्ठ मिपाकर्स ईतक्या चांगल्या धाग्यावर बेक्कार धुडगूस घालताना दिसले !
उगाच नाही, मिपा सौंस्क्रूती बुडाली ;)

काही ज्येष्ठ मिपाकर्स ईतक्या चांगल्या धाग्यावर बेक्कार धुडगूस घालताना दिसले !

का नाही घालणार धुडगूस ? यशोमती मैय्या हल्ली फक्त प्रतिसादा पुरत्याच उरल्या होत्या ! कित्ती दिवसांनी पेर्त्या झाल्यायत त्या !

नाखु's picture

1 Jul 2019 - 10:22 pm | नाखु

खायचा सोडून त्या अंड्याचा इतका किस पाडलाय की कोंबडीला ओव्हर टाईम करायला लागेल.

साधी पोळीची कणीक चालेल काय.
भाकरी जमतात पण पोळीची कणीक नेहमीच धोका देते पातळ ते अतिशय घट्ट असा प्रवास करीत दोन माणसांना पुरेल अशी सुरुवात करुन सात माणसाच्या पुरवणी इतकी कणीक मळल्याचा अनुभव गाठीशी आहे

तेंव्हा हा धाडसी प्रयोग निवांत वेळेत करण्यात येईल.

लेकीला आवडला कि बाकी कुणाच्या पसंतीची मोहोर नसली तरी चालेल.

नाखु पांढरपेशा

यशोधरा's picture

1 Jul 2019 - 10:31 pm | यशोधरा

साधीच कणीक की. एकदम फटाफट बनवून होतो. हाकानाका!

चाणक्य's picture

8 Jul 2019 - 11:36 am | चाणक्य

१. सर्वात आधी कुणाकडून तरी पोळ्यांची कणिक मळून घेणे...

बाकी मग यशोतैंच्या रेशिपीनुसार करा. हाकानाका.

स्वाती दिनेश's picture

2 Jul 2019 - 8:22 pm | स्वाती दिनेश

पराठे मस्त दिसत आहेत ग यशो,
स्वाती

कंजूस's picture

3 Jul 2019 - 6:02 am | कंजूस

पराठा हलका ठेवत आहेत.

उपेक्षित's picture

3 Jul 2019 - 2:25 pm | उपेक्षित

सोप्प वाटत आहे करून बघायला पाहिजे. (बाकी लयी दिसांनी दंगा बघितला मिपावर )

खिलजि's picture

3 Jul 2019 - 5:26 pm | खिलजि

ते पराठ्याला किती जोरात लाटायचं .. आणि आम्ही पुरुष ते फक्त खाऊ शकतो कि बनऊपण शकतो .. मी हे सिरियसली इचारतोय कारण मला या रविवारी बनवायचाय म्हणून ..

चामुंडराय's picture

9 Jul 2019 - 3:42 am | चामुंडराय

आमच्या घरी एक वेगळ्या प्रकारचा पराठा बनतो ...
त्याला मी "पुरण - दा - प्राठा" म्हणतो.

उपेक्षित's picture

23 Jul 2019 - 1:23 pm | उपेक्षित

हायला तुमचा प्रतिसाद वाचून आनंदरावांचा एका हॉटेलच्या सर्विस रिव्यू वाला धागा आठवला :)

मुक्त विहारि's picture

24 Jul 2019 - 12:25 am | मुक्त विहारि

मस्त....

पुदिना आवडतो. त्यामुळे बटाट्याचे पराठे करतांना किंवा खिमा पराठे करतांना पुदिना घालून बघायला हवा.