लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ कप पाणी
२ कप दूध
५ छोटे चमचे चहा पावडर (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
४ चमचे साखर (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
१ इंच आलं(किसलेले)
१/४ चमचा वेलची पुड
मातीचं भांड
क्रमवार पाककृती:
१. मातीचे भांडे कमी गॅस फ्लेमवर गरम करायला ठेवा
२. आता गॅसवर एक भांडे ठेवा त्यामध्ये पाणी ,चहा पावडर ,साखर,किसलेले ,वेलची पुडआलं घाला
३. मातीच्या भांड्याची बाजू बदला
४. पाणी थोडे उकळलेकी त्यात दूध घालून एकदा मस्त चहा उकळून घ्या
५. चहा एका भांड्यात गाळून घ्या
६. आता मातीचे गरम भांडे एका मोठ्या पातेल्यात ठेवा आणि त्यामध्ये गरम चहा ओता
७. मातीच्या भांड्यात बुडबुडे येण्यास सुरुवात होईल आणि चहा बाहेर पडेल. आता कप मध्ये चहा ओता आणि सर्व्ह करा
या पावसात मस्त तंदूरी फ्लेवर चहाचा आस्वाद घ्या घरच्या घरी
प्रतिक्रिया
28 Jun 2019 - 2:23 pm | यशोधरा
तंदुरी चहा overhyped आहे.
28 Jun 2019 - 4:14 pm | उपेक्षित
+१ यशो ताई.
त्यापेक्षा पूर्वी कुल्हड मध्ये मिळायच्या चहाची चव मस्त असायची.
तरीही तुम्ही सांगताय तसा घरी करून बघेल १ डाव
28 Jun 2019 - 4:27 pm | गोरगावलेकर
कुल्हडमधीलच पण तंदूर चहा काही महिन्यांपुर्वीच उदयपूर भेटीत पहिल्यांदा पिण्यात आला. .चहा तयार करतांना बघायला खूप भारी वाटते. पण चवीला तितकासा आवडला नाही.
28 Jun 2019 - 6:20 pm | Namokar
@उपेक्षित धन्यवाद
28 Jun 2019 - 6:24 pm | सुबोध खरे
तंदुरी चहा overhyped आहे.
you said it !
28 Jun 2019 - 6:19 pm | Namokar
फोटो टकण्याचा पहिला प्रयत्न
आणि ही माझ्या चॅनलची लिंक ,ईथे पुर्ण रेसिपी बघायला मिळेल :) :)
https://youtu.be/XjPIavW7a9g
29 Jun 2019 - 12:01 pm | चौथा कोनाडा
म स्त च ! आवडले.
व्हिडो पण छान आहे !
1 Jul 2019 - 1:41 pm | Namokar
@चौथा कोनाडा धन्यवाद
1 Jul 2019 - 5:59 pm | चौथा कोनाडा
_/\_
29 Jun 2019 - 12:37 pm | गवि
प्रक्रियेत भरपूर स्टेप्स आणि प्रत्येक स्टेप दिलखेचक, वाफ किंवा धूर किंवा उकळी दाखवणारी, आणि फायनल प्रॉडक्ट त्यामानाने साधं असा मामला तंदूर चहा ट्राय केल्यावर जाणवला. किंचित राखेचा फ्लेवर उतरतो इतकंच. पण त्यात लवंग आणि असंख्य मसाले घालून तोही मारुन टाकतात.
साधारण चमकदार भारी सेलेब्रिटी बारटेंडर तेच ड्रिंक नुसतं मिसळून देण्याऐवजी पेश करताना अगोदर तीन बाटल्या आणि ग्लास हवेत उडवून, झेलून, त्यात आग लावून, ग्लासाला मिठाचे कोटिंग करून मग ग्राहकासमोर ठेवावं तसा प्रकार.
2 Jul 2019 - 9:48 am | अत्रुप्त आत्मा
एव्हढे उद्योग करण्यापेक्षा तयार चहा कपात एक लालबुंद कोळसा बुडवून काढला तरी बास! तंदूर चहा हे चवीसाठी रचलेल नाट्य नसून नाट्या साठी रचवलेली चव आहे! लउल्लूल्लू टू तं-दूर चहा!
3 Jul 2019 - 12:00 pm | श्वेता२४
एक वेगळ्या पद्धतीचा चहा म्हणून ही पाकृ ठीक आहे. पण यात पुणेरी म्हणून काय वेगळेपण आहे ते समजलं नाही.
3 Jul 2019 - 3:41 pm | महासंग्राम
पुणेरी लिहिलंय कि अजून काय वेगळं पाहिजे :P खिक्क
3 Jul 2019 - 6:06 pm | Namokar
माझ्या माहितीप्रमाणे हा चहा पुण्यात पहिल्यांदा सुरु झाला म्हणून मी असे नाव दिले .बाकी विशेष अस कारण नाही :) :)
3 Jul 2019 - 12:12 pm | कंजूस
कुल्हड बनवणाऱ्यांना रबडी,दही, चहा, त्यात विकल्याने रोजगार मिळतो.
रेल्वेतून बाहेर प्लास्टिक कप फेकण्यापेक्षा कुल्हड फेकल्यास तिची नंतर माती होते.
3 Jul 2019 - 12:13 pm | कंजूस
पण प्लास्टिक चमचा तसाच राहतो. :(
3 Jul 2019 - 10:34 pm | नाखु
"चमचा" कुठलाही असला तरी तसाच राहतो
3 Jul 2019 - 10:40 pm | चौथा कोनाडा
:-)
चमचा वरून हे आठवले :
https://hi-in.facebook.com/zeemarathiofficial/videos/2808175085875614/