चिनी फसगत!

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
27 Jun 2019 - 3:20 pm

चिनी फसगत ( खास करून प्रथमच भारतातून अति पूर्वेच्या देशात प्रवास करणाऱ्यांसाठी )
तो: चला आपण या वेळी मलेशिया सिंगापोरे ला जाऊन
ती : अरे पण तिकडे जेवणाचा काय चित्र विचित्र चिनी मिळतं, आपण जरी नॉन वेग खात असलो तरी जमणार कसं?
तो: आग त्यात काय आपण नाही का इथे चायनीज खातो जवळ जवळ आठवड्यातून एकदा

खरं तर "ती " ची शंका रास्त असतें प "त्या" ला हे माहित नसता कि भारतात जो चिनी खातो ते " इंडियन चैनेईज" असत

असत चविष्ट आणि मस्त पण ते काही खरे चिनी नव्हे , मेनलॅन्ड ( म्हणजे मूळ शांघाय वैगरे , सेनापती बापट रस्त्यावरचे नाही ) चीन तर सोडून द्या मलेशिया , इंडोनेशिया , सिंगापोरे मधील चैनेईज हे सुद्धा त्यापासून वेगळे आहे ,
तेव्हा जरा "धीरेसे जाना बगियन में"
साधारण फार उच्च चिनी उपहारगृहात एकदम आधी जाऊन नका आधी थोडे इंडोनेशियन, मले किंवा सिंगापोरे मधील "नोन्यया " पद्धतीचे खा ,मग हळू हळू पुढचे
म्हणजे
- नासी लेमक
- नासी गोरेंग
- रेंदान्ग
- चिकन राईस ( सोया लसूण वाला)
- भाजेलेलं मासे ( इंडोनेशियन पद्धतीचे बवाल...)
- आसाम फिश हेड करी ( आसामी नाही तर चिंचेतली भेंडी घातलेली , हो भेंडी आणि मासे काय म्हणणे आहे तुमचे ? )
यात परत भारतीय म्हणजे एक तर शुद्ध शाकाहारी दक्षिणी मिळेल किंवा मग मले तामिळ मुस्लिम समाजाचे सर्व भारतीय उपहारगृह काही पंजाबी नसतात
असो करा मज्जा
मूळ चीन मध्ये खरंच "ऐकावे ते नवलच" या प्रकारातील खाणे मिळते ,, त्यावर फोटू सापडल्यास परत कधी तरी

प्रतिक्रिया

हल्लीच सारंग साठ्येचा एक भाडीपा स्टँड अप कॉमेडी टॉक बघितला. त्यात पुण्यातले लोक पुण्यात मिळणाऱ्या पदार्थांना थेट "जगात भारी"च म्हणतात. स्थानिक, जिल्हा, राज्य वगैरे पातळीवर खेळत नाहीत. थेट जागतिक.

त्यात पुण्यातील चांदणी चौकातील चायनीज जगात भारी, हे ऐकल्यावर सारंग म्हणतो "मुळात गोबी मांचुरीयन किंवा "ट्रिपल शेजवान राईस अंडा मार के" हे चायनीज तरी आहे का मुळात?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2019 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतातच काय, भारताच्या पश्चिम दिशेला असलेल्या सगळ्या देशांत, चीनी खाण्याच्या नावाने जे काही मिळते, त्याला चीनमधील लोक जबाबदार नाहीत... त्या बिचार्‍यांना ते काय असते याची कल्पनाही नाही ! =))

मदनबाण's picture

30 Jun 2019 - 10:49 am | मदनबाण

यात पुण्यातले लोक पुण्यात मिळणाऱ्या पदार्थांना थेट "जगात भारी"च म्हणतात.
पुणेकर कशाला काहीही म्हणतात ! सगळा पांचटपण नुसता, तर्री ला सँम्पल म्हणर्‍यांनकडुन दुसरे काय अपेक्षित असणार ! =)) बरं सगळा फॉल्ट मुळा-मुठेच्या पाण्याचाच बरं का... =))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant

जोन's picture

27 Jun 2019 - 8:04 pm | जोन

झेपेल इतपत चिनी पदार्थ आपल्यापुढे " ऑथेंटिक चिनी" म्हणून येतात ...... खऱ्या चीन मधील ३ जेवणे जेवून तृप्तीची ढेकर देणारा भारतीय महाभाग अजून मला भेटायचा आहे .....

चिनी जेवणाची इतकी धास्ती घेण्याची गरज नाही. :)

ते झुरळे, अळ्या, साप, इत्यादी खाण्याचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन नेहमीच्या रेस्तराँमध्ये दिसतही नाही, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. त्यांच्या बातम्या आणि चित्रांवरून संपूर्ण चिनी जेवणाची कल्पना करणे म्हणजे भारतातील झोपडपट्ट्यांवरून सगळ्या भारताची कल्पना करण्यासारखे होईल.

चीन प्रचंड देश आहे. त्याचे क्षेत्रफळ भारताच्या तीनपट आहे आणि त्यात २३ प्रॉव्हिन्सेस (राज्ये), ४ स्वतंत्र राज्यांप्रमाणे चालणार्‍या महानगरपालिका (Beijing, Tianjin, Shanghai, Chongqing), ५ मोठ्या राज्यांच्या आकाराचे स्वायत्त भूभाग (Guangxi, Inner Mongolia, Tibet, Ningxia, Xinjiang) आणि दोन विशेष प्रशासनिक विभाग (Hong Kong, Macau) आहेत. या देशात बहुसंख्य हान लोकांबरोबरच, ५५ नोंदलेल्या अल्पसंख्य जातीजमाती (minority tribes) आहेत. अर्थातच, भारताप्रमाणेच, या सर्व भागांमध्ये/जातीजमातींमध्ये आपापली स्वतंत्र संस्कृती, नृत्य-गाणे-नाटके, पोषाखाची पद्धती, खानपान, सणसमारंभ, इ आहेत.

अश्या देशातिल, सहाजिकच वैविध्यपूर्ण असलेल्या खाद्यसंस्कृतीबद्दल, अर्धवट माहितीवर आधारलेले पूर्वगृह सोडून पाहिले नाही तर, असंख्य वेगवेगळ्या चवदार खाद्यप्रकारांचा आस्वाद घ्यायला मुकायला होईल.

सर्वसामान्य मांस आणि मासे वापरून बनवलेले बरेच चीनी पदार्थ चवदार असतातच, पण तिळाच्या तेलात बनवलेले चीनी शाकाहारी पदार्थही खूप चवदार असतात. माझ्या तिथल्या भ्रमंतीत, आठवड्यातील दोन दिवस "पूर्ण शाकाहारी" जेवण पाहिजे असे मी सांगितले होते आणि माझ्या दर मार्गदर्शकाने अगदी अगत्याने रेस्तराँच्या स्वयंपाकघरात जाऊन माझ्या जेवणात कोणताही मांसाहारी (अगदी मांसाहारी स्टॉक टाकलेलाही) पदार्थ माझ्या ताटात येणार नाही, याची खात्री केली होती. तेथे जाण्यापूर्वी, अशी सेवा मिळेल अशी मलाही खात्री नव्हती. :)

तेव्हा, सागायचा मुद्दा असा की, चीनमध्ये एका दिवसात तीन चिनी जेवणे जेवून तृप्तीची ढेकर देणे, वाटते तितके कठीण नाही... हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो.

उपेक्षित's picture

28 Jun 2019 - 12:09 pm | उपेक्षित

वाह म्हात्रे सर मस्त माहिती, बाकी तुमच्या प्रवासवर्णणाचा (खास करून चीन चे प्रवासवर्णन) मी चाहता आहे.

जोन's picture

1 Jul 2019 - 4:23 pm | जोन

मी स्वतः बरेच वर्षांपूर्वी ४ दिवस राहून आलो होतो ...पण मला इतका चांगला अनुभव आला नाही.....पण तुमचा अनुभव ऐकून मतहि बदलावे लागेल...आणि परत भेटहि द्यावी लागेल ड्रॅगन ला .....:)

असं ऐकिवात आहे की खरोखर चीनमधल्यासारखं चायनीज फूड भारतीय आवडीने खाऊ शकणार नाहीत (वास, स्वाद वगैरे भारतीय नाका-जिभेला अप्रिय वाटतील). किमान काही महिने सतत खाऊन ती चव डेव्हलप करावी लागेल.

खखोदेजा आणि खरं खोटं चायनात चायनीज जेवलेले भारतीय जाणोत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2019 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रदीप's picture

27 Jun 2019 - 8:54 pm | प्रदीप

असेच आहे. चिनी खाण्यासाठी जिभेची चव 'कमवावी' मागते. (जसे भारतीय उपखंडातील लोक सोडून बाहेरच्या सर्वांनाच आपल्या स्वादाची चव कमवावी लागते, तसेच). डॉ. म्हात्रेंनी सांगितल्याप्रमाणे तिथे अनेक प्रांत आहेत व त्यांच्या पाककृतींच्या वैशिष्ट्यांत बरेच फरक आहेत. उदा. सिच्युवान खाणे तिखट असते, तर ग्वाँदाँगकडील बरेच वेगळे, मसाले व तिखट नाहीच, असे असते.

पूर्वी मला पोर्क पाहिल्याव आपण हे कधीही खाऊ शकणार नाही, असे ठामपणे वाटत असे. आता मी त्यांतील काही पदार्थ खावयास चटावलोय. तरीही निदान मलातरी त्यांचे कोंबडीचे पाय वगैरे खाण्याचा इतक्या वर्षांथी धीर झालेला नाही.

जाता जाता, मूळ लेखातील नासी लेमक, नासी गोरें,, रेंदान्ग, चिकन राईस ( सोया लसूण वाला), भाजेलेलं मासे ( इंडोनेशियन पद्धतीचे बवाल...) इत्यादींचा व चिनी पाककृतींचा संबंध मला समजला नाही. पण ते असो.

चौकस२१२'s picture

28 Jun 2019 - 5:13 am | चौकस२१२

प्रदीप ...त्याचा संदर्भ असा कि प्रथमच जे बाहेर पडलेत आणि ज्यांना काळजी आहे कि मी एकदम भलतंच चिनी कसे खाऊ त्यांनी मूळ चिनी पद्धतीचे एकदम जेवण्याआधी कदाचित या चिनी पाकसंस्कृतीच परिणाम असलेल्या मले/ सिंगापोर इंडोनेशियन पदार्थांची चव घायवी कि जे भारतीय मसालेदार खाद्यसंस्कृती च्या जवळचे आहेत , सोया सॉस चे विविध प्रकार काळातील , केचप मानीस सारखे इतर सॉस असू शकतात हे कळेल इत्यादी ... ती फक्त एक सूचना होती

शिवाय चिकन 65 या चायनीजसदृश पदार्थाचा उगम चेन्नईतला आहे असं वाचलं. चिकन लॉलीपॉप हेही प्रकरण आपल्याकडचं की मूळ चिनी हे कोडं आहे.

शेर्पा राईस, चॉपर राईस वगैरे बहुधा अगदीच लोकल शोध असावेत. हे दोन्ही राईस मुलुंड / ठाणे विभागात ऐकले आहेत. अद्याप ट्राय केलेले नाहीत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2019 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

चिकन 65 आणि चिकन लॉलीपॉप हे दोन्ही प्रकार भारतातच जन्मलेले आहेत. हा घ्या पुरावा ! :)

https://www.wikiwand.com/en/Chicken_65

https://www.wikiwand.com/en/Chicken_lollipop

Rajesh188's picture

27 Jun 2019 - 10:41 pm | Rajesh188

भारतीय पद्धतीने बनवलेले व त्या पदार्थ ला चीन चे पदार्थ म्हणून नाव दिलेलं सर्व पदार्थ असतात spicy.
आणि भारतीय लोकांना ते खूप आवडतात .
मला तर भीती वाटते काही वर्षांनी मूळ भारतीय रेसिपी नष्टच होतील

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2019 - 12:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनात सतत असे एका टोकाचे विचार विचार येऊन तुम्हाला भिती का वाटते बरे? याची आम्हाला काळजी वाटते बरे... म्हणून विचारले. ;) :)

जगात बहुतेक सर्व देशातल्या केवळ मोठ्याच नव्हे तर सर्व मध्यम आकाराच्या आणि काही लहान आकाराच्याही शहरांत भारतिय नावाची, अनेक प्रकारचे खरे भारतिय जेवण देणारी रेस्तराँ आहेत. तेव्हा याबाबतीत काळजी नसावी. :)

भारतीय पद्धतीने बनवलेले व त्या पदार्थ ला चीन चे पदार्थ म्हणून नाव दिलेलं सर्व पदार्थ असतात spicy.

अर्थातच, भारतिय पदार्थांना चीनी पदार्थ म्हणण्याविरुद्ध एक मोहीम काढायची सुवर्णसंधी आहे, हे नमूद करण्यास आनंद होत आहे. ;)