साहित्य:
- कोंबडी (बिन हाडाचे मास लांबट व बारीक तुकडे करावे , शक्यतो शिजायला सोप्पं असा भाग घाव्या ( छाती आणि मांड्या )
- तांबडी ढब्बू मिरची ( लांबट बारीक काप )
- काजू
- पातीचा कांदा
- तीळ
- सोया सॉस ( शक्यतो कमी खारट वाले) ऑयस्टर सॉस , फिश सॉस
- लाल मिरची ( थोडी, हे काही चिली चिकन जहाल नाहीये )
- लसणी चे मोठे काप / पाकळ्या
- आल्याचे जुलिअन पद्धतीचे काप
- चांगला मध
१) भिजवणे/ मुरवणे : कोंबडी तुकड्यांना ३ सॉस आणि थोडं तिखट मीठ लावून बरेच तास मुरवून ठेवावे त्यात लसणी चे काप टोचून ठेवावे
शेंगदाणा तेलात मोठया वॉक किंवा कढईत तापवून त्यात वरील कोंबडी मधील लसणीचे आणि ताजे कापलेले आल्याचे काप आधी तळून घायवेत ( नंतर वरून घ्यायला म्हणून बाजूला काढावेत)
असा तर्हेने तेलास लसणी आणि आल्याचा स्वाद लागतो
- आच वाढवून तांबडी भोपळी मिरची चे काप परतावे , ( अर्धे कच्चे ठेवावे , झाकण ठेऊ नये पाणी सुटेल)
- नवीन तेल घालून ( लागल्यास) कोंबडी परतावी थोडे तिखट घालावे फार नाही ,
शिजत आल्यावर त्यावर मध घालावा व आच कमी करावी आणि काजू घालावे
- आच बंद करून तीळ भुरभुरावे ( पाहिजे असल्या तीळ आधी कोरडे भाजून घावे)
पदार्थ कोरडा दिसला पाहिजे
वाढणे :
कोंबडी/ भोपळी मिरची आणि बारीक चिरलेला पातीचा कांदा तिन्हि स्वतत्र ठेवावे
थाई जस्मिन भाता बरोबर किंवा , तांदुळाच्या नूडल्स बरोबर खाता येते
प्रतिक्रिया
27 Jun 2019 - 1:18 pm | चौकस२१२
सोबत तांबडी ( परंतु तरीही थोडी थंड करून पिण्याची ) वारुणी म्हणजे " व्हाईट शिराझ "
27 Jun 2019 - 1:31 pm | प्रलयनाथ गेंडास...
१ + ही वेगळी रेसिपी ट्राय करायला हरकत नाही ...
27 Jun 2019 - 1:33 pm | प्रलयनाथ गेंडास...
सुचवणी :
सोया + मध + सुंठ एकदा ट्राय करून बघा ...
27 Jun 2019 - 1:42 pm | चौकस२१२
सुंठ चिकन आठवतंय पूर्वी झालेले तुपात घोळलेले पण त्यात मध नवहता बहुतेक
27 Jun 2019 - 1:38 pm | अभ्या..
चौकसबुवा, आपण सांप्रतकाळी आस्ट्रेलियात असता काय?
मध ही तिथला दिसतोय, पदार्थाचा बाजही फिरंगी वाटतोय.
येनीवे रेशिपीस ३एम नाव द्यावे (मिरची, मध आणि मांस) अशी नम्र इनंती.
.
आजपर्यंत बाळ गाडगीळांचे "मधात तळलेले बदक" वाचनात आलेला
अभ्या...
27 Jun 2019 - 1:55 pm | चौकस२१२
- बाळ गाडगीळ पूर्वी सांगलीच्या विलिंग्डन विद्यालयात होते त्यांचे मधात तळलेलं बदक मलाही आठवते , त्यांचे कडे जुन्या टुमदार दगडी बंगल्यात , लहान असताना एका दुपारी भाजलेली कोंबडी (अर्थातच माफक मसाल्यातील फक्त काली मिरी मीठ असावे बहुतेक तंदूर नव्हे ) आणि थंडगार बिअर असा स्वाद हि घेतला होता , ब्रिज खेळण्याचाच दिवस होता ( बिअर वडिलांनी, मी नाही अर्थात , ) मला वाटते त्यावेळी त नुकतेच अमेरिकेत जाऊन आले होते आणि त्यांनी नवीन ओव्हन आणला होता ,
- पदार्थ तसा फिरंगी नसून अति पूर्वे कडील देशातील आहे ढोबळ मानाने
27 Jun 2019 - 2:23 pm | अभ्या..
विलिंग्डन, चिंतामण, वालचंद आहाहा,
ते माधवनगर, ते विश्रामबाग ते वॉनलेस की डायरेक्ट मिरजंतच की. अमरखड्डा अन शिवशंकर.
27 Jun 2019 - 3:58 pm | सस्नेह
आणि पैप्रकाश ? मधुबन ...?
27 Jun 2019 - 4:07 pm | गवि
पैप्रकाश.. ग्रीनपीस ऑम्लेट, कानपुरी मिसळ.
टीप: ग्रीन पीज नव्हे. ग्रीनपीसच.
27 Jun 2019 - 4:27 pm | चौकस२१२
वालचंद चे खाद्य जीवन ( किंवा विश्रामबाग चे म्हणूयात हवे तर ) यावर वेगळी लेखमाला करायला पाहिजे !
- कर्नाटकच्या जवळ असल्या मुले तो ढंग ( फक्त संध्याकाळी विलिंग्डन जवळचं एका जरा मोठ्या खोपट्यात मिळणार उत्तपा/ डोसा आणि त्यांबरोबरसह आंबट गोड बारीक कांदा घातलेलं ताक/ पातळ दही .. नाव आठवत नाही
- कोकणच्या जवळ त्यामुळं वालचंद च्या मेस मधील सैपाकी
- शिवाय देशी मराठा पद्धतीचे भाकरी मटण
- लिटरच्याच मापात मिळणार ताजा उसाचा रस
- द्राक्षे
- गावातील शिवाजी पुतळ्यापाशी एक टपरीत पातळ कुरकुरीत बटाटा भजी आणि तळलेल्या मिर्चया
- गावातील "आवड निवड" हि ब्राम्हणी "खानावळ" (तुपाची छोटी वाटी प्रसिद्ध)
- मधुबन च्या पुढील "इंदिरा भुवन "
- शाकाहारी खिमा पाव
- गोरे भडंग
- वालचंद आणि चिंतामणराव कॉलेज च्या समोरील टपऱ्या, एक दक्षिणी आणि एका मराठमोळ्या मावशी ची ( पारशी मंडळी बॅन पावात मस्का जॅम आणि भजी एकाच वेळेस भरून त्याचा "बर्गर" करायची,, त्यावेळी विचित्र वाटायचे पण पुढे कळेल कि इतर देशात चिकन च्या बर्गर मध्ये अननस आणि बिट रूट पण घालतात )
- पै प्रकाश ( खोपटातला,, हे मात्र फक्त दारूकाम आणि अंडा बुर्जी साठी ...आठवणी प्रमाणे )
- वालचंद च्या मागे शेतातील पार्टी
- याशिवाय कोल्हापूर ची वेगळीच मजा अधून मधून
- जशी रात्र व्हायची ( " नाईट मारणे ग्लास ट्रेसिंग करीत ) "आणि चहा / जेवणाची तल्लफ यायची तसे विश्रामबाग पासून मार्केट यार्ड कडे जावे लागायचे मग मध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या टपऱ्या कुठे फक्त आम्लेट कुठे फक्त भजी
सर्वात उशीरा म्हणजे गावातील जुन्या रेल्वे स्टेशन जवळ नाहीतर स्टॅन्ड
आणि हो खिशात पैसे असले तर गावातील "मार्टीनस"
दमलो विचार करून
6 Jul 2019 - 10:24 am | निखिल माने
uday, annapurna ani college corner javalachi ice dish wisaru naka
27 Jun 2019 - 1:45 pm | गवि
भारी दिसतंय हे.
साहित्याची मांडणी आणि छायाचित्रे आकर्षक आहेत. परंतु अंतिम तयार पदार्थ आणि मधल्या स्टेप्स यांची छायाचित्रेदेखील असती तर प्रथमच करणाऱ्याला अधिक मदत झाली असती.
27 Jun 2019 - 1:48 pm | अभ्या..
खिक्क्क
27 Jun 2019 - 1:52 pm | गवि
बरं.
या हृदय विरघळवून टाकणाऱ्या लोभसवाण्या गोड हास्याचे कारण ?
27 Jun 2019 - 2:13 pm | अभ्या..
आम्हाला अंतिम तयार पदार्थ म्हणले की आपसूक अत्रुप्त बुवांची आठवण आली अन चेहर्यावर एक लोभसवाणे हास्य विलसले.
27 Jun 2019 - 2:17 pm | गवि
शी ... !!! (लिटरली??)
27 Jun 2019 - 2:00 pm | चौकस२१२
क्षमा, पण काढली नाहीत, अर्थात तसे काही विशेष वेगळे नाहीये ओळींनी सांगितले तसे करा
27 Jun 2019 - 2:07 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
27 Jun 2019 - 2:13 pm | गड्डा झब्बू
आता हे सगळं वाचून आम्हाला ठाऊक असलेल्या सगळ्या जंगली रेसीपी शेअर करायची इच्छा जाहली. वारूणी सोबत तर एक नंबर लागतात त्या.
27 Jun 2019 - 2:16 pm | गड्डा झब्बू
रेसिपी आवडली हे सांगायचे राहिले :-))
27 Jun 2019 - 2:40 pm | चौकस२१२
विसरलो कि ,,, यात जर "सांबाल ओलेक" नावाची मलेशिअन चटणी मिळाली तर किंवा शेझवान नावाचे सॉस चालेले ( पण ते थोडे उग्र होईल .. नकोच )
27 Jun 2019 - 2:46 pm | गवि
अरे देवा रे.
हे म्हणजे अगदी सुशी किंवा लजान्यासदृश भासणारी अनवट नजाकतपूर्ण पाककृती करताना शेवटच्या स्टेजला "याचे कालवून गोल गोळे करुन बेसनाच्या पिठात बुडवून भजी तळून काढावीत आणि टोमॅटो केचपसोबत पेश करावीत" असं म्हटल्यासारखं झालं.
;-)
हलके घ्या.
27 Jun 2019 - 2:52 pm | चौकस२१२
मास्तर काही कळले नाही १००% ...पण बहुतेक भा पो ,, शेजवान केवळ नाव घेतलं कारण सर्वसाधारणपणे "sambal ओलेक" भारतात मिळणे शक्य नाही म्हणून काहीतरी स्थानिक उपाय सांगण्याचा प्रयत्न ... असो
टोमॅटो केचअप चे भारतीय धाडीत स्थान यावर एक वेगळे लिखाण करता येईल .. पण नको उगाच दुखावतील लोक !
27 Jun 2019 - 2:58 pm | गवि
मी फक्त शेजवान सॉसपुरती टिप्पणी केली हो. तेही भारतीय शेजवान सॉस. त्याचा चिनी वरिजिनल प्रकार नक्कीच वेगळा असणार.
इथे मात्र चायनीज हा प्रकार ओव्हर अब्युस झालाय. लहानात लहान गावातही वीज असेल नसेल, देदादु असेल नसेल.. पण एक चायनीज स्टॉल असतोच असतो. त्यात वरून ज्यात त्यात शेजवान.
आणखी उदाहरण ताणायचे तर फणसाचा खास सौम्य स्वाद जपणाऱ्या भाजीत शेवटी बचकभर बादशाह पावभाजी मसाला घालून जेजरून पावासोबत खावी असं म्हटल्यासारख्या भावना.
असो.
27 Jun 2019 - 3:32 pm | चौकस२१२
कळले गवि ...भा पो ...चीन मधील शेजवान सॉस आठवत नाही पण एक दिवस चीन मधील खास शेजवान (उच्चार हि असा नसावा बहुतेक ) उपहारगृहात गेलो तेव्हा तांबड्या कोरड्या मिरची चा भरपूर उपयोग होता एवढे आठवते
उदाहरणार्थ ताटलीत प्रथम तळलेल्या तांबड्या मिरच्यांच्या थर आणि त्यावर भाजलेले मास ( शंख खास करून आठवतो )
बरं दुसरे असे कि सगळी चिनी उपहारगृहे काही शेजवान प्रांतातले नसतात त्यामुळे " शेजवान चिकन आहे का " असे विचारल्यावर कधी कधी मला "आ हे काय बाव्वा ! " (चिनी भाषेत) असा प्रतिसाद मिळाला आहे ,
एकदा जर्मनीतील चिनी उपहारगृहात आणि कधी कधी मलेशियात
27 Jun 2019 - 5:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
केवळ सिच्वान/सेच्वान (Sichuan cuisine, Szechwan cuisine, or Szechuan cuisine) नव्हे तर शान्शी जेवणातसुद्धा (Shaanxi cuisine) लवंगी मिरचीला तुल्यबळ जहाल असलेल्या तिखट मिरच्या सढळ हाताने वापरतात.
टेराकोटा सैनिकांचे गाव असलेल्या, शिआनमध्ये (Xi'an, Shaanxi Province), ऑथेन्टिक शांशी जेवण पेश करणार्या रेस्तराँमध्ये, कमीत कमी तिखट जेवण हवे असे सांगितल्यावर, हे पदार्थ मिळाले होते !
उजवीकडे "वांग्याची भाजी" आहे... त्यातले काळपट दिसणारे १/३ तुकडे वांग्याचे आहेत; बाकी २/३ तुकडे जहाल तिखट लाल-हिरव्या मिरच्यांचे आहेत ! डावीकडे चीनी कोबीचे पिकल् (लोणचे) आहे. त्यातली कोबी चांगली दोनेक आठवडे, सढळ हाताने लाल हिरव्या मिरच्या टाकलेल्या व्हिनेगारमध्ये मुरवलेले होते ! कोबीचे एक पान खल्ल्यावर हे आपल्याला जमणारे काम नाही म्हणून सोडून दिले. वांग्याचे तुकडे कोरड्या भातात कालवून कसेबसे खाऊ शकलो, तरी ते पुढचे दोन दिवस आठवण करून देत होते ! ;) =))
मुख्य म्हणजे, चीनी जेवण (Chinese cuisine) म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या बहुतेक सर्व पाककृती व त्यांची नावे चीनमध्ये माहितही नाहीत. त्यांच्याबद्दल विचारल्यास, "हे काय असते?" असा भाव समोरच्या चेहर्यावर दिसतो ! आपल्याकडे चीनी म्हटल्या जाणार्या बहुतेक पाकृ आणि त्यांची नावे प्रथम अमेरिकेत (बहुतेक, अमेरिकास्थित चीनी लोकांकरवी) बनवली गेली आणि तेथून नंतर इतर देशांत आपापल्या स्थानिक चवींप्रमाणे बदलून जगभर नांदत आहेत, असे कुठेसे वाचल्याचे आठवते ! :)
27 Jun 2019 - 5:27 pm | गवि
नंतर या लोकांच्या आतड्यांपासून बॅडमिंटनची नेट्स बनवतात का?
(आभार आणि संदर्भ: शिरीष कणेकर)
27 Jun 2019 - 5:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
आख्य्ख्या रेस्तराँमध्ये, हायहुय करत खाणारा मीच एकटा उपरा माणूस दिसत होतो. इतर सर्व चीनी गिर्हाईके, यापेक्षा जास्त जहाल दिसणार्या पदार्थांवर, मस्त आडवा हात... नाही नाही... चॉपस्टिक्स चालवत होते ! :)
27 Jun 2019 - 4:00 pm | सस्नेह
दिसतय तरी भारी.
बाकी फायनल प्रॉडक्ट पाकृ पेक्षा चखण्यासम अधिक दिसते आहे, असे नोंदवू इच्छिते.
27 Jun 2019 - 4:31 pm | चौकस२१२
चकणा / मुख्य जेवण . कशाही पद्धतीने वापरू शकता कारण चिनी पद्धतीचा जेवणात असे अनेक पदार्थ ( भात किंवा नूडल शियाय ) खातात असा माझा अनुभव आहे
27 Jun 2019 - 4:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
पदार्थ चवदार असणार... फोटोही असा दिसतोय की आताच तेथून काढून गट्टम् करावा ! :)
27 Jun 2019 - 5:49 pm | श्वेता२४
सादरीकरण व फोटो आवडले.
1 Jul 2019 - 12:09 pm | पियुशा
लै भारी !!!