ही पोस्ट फेसबुकवरुन घेतली आहे.पोस्ट लिहिणारे लेखक व्यवसायानं पत्रकार आहेत.त्यांनी खेडेगावे,छोटी शहरे इथे कामानिमित्त फिरताना आलेला अनुभव मांडला आहे.
तो एमकॉम झाला.मोठ्या मुश्किलीनं नोकरीला लागला.एका पतसंस्थेत महिना सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या.
दुसरा ...तो एम.ए.बी.एड्.झाला.दहा वर्षांपूर्वी एका संस्थाचालकाला दहा लाख रूपये देऊन तो शिक्षक बनला.दहा वर्षे झाली खिशातनं पेट्रोल घालून त्यानं शाळा केली.उरलेल्या वेळेत पानपट्टी चालवली म्हणून त्याचं घर भागलं.आता त्यांची शाळा २५ टक्के अनुदानात आलीय.त्याच्या आयुष्यातला उमेदीचा काळ फुकट नोकरी करण्यात गेला.तरीही तो खूष आहे.पंधराव्या वर्षी का होईना,त्याला पूर्ण पगार मिळेल...
अशी उदाहरणं आजुबाजूला कितीतरी आहेत.
तोंडावर कसलीच रया नसलेले पण आपण कोणीतरी आहोत असा समज करून जगणारे तरूण सगळीकडे दिसतात.तोंडात काहीतरी मचमच चालू असलेले...
कोणी एम.ए.,कोणी बी.ए.,बी.एड.,डी.एड.तर कोणी पॉलिटेक्निक तर कोणी बी.ई.झालेले.असे तरूण गावोगाव शेकड्यांनी आहेत.अपवाद वगळले तर, सगळेच व्यसनाच्या आधिन.तंबाखु, गुटखा,सिगारेट,गांजा,दारू यातच यांचा दिवस जातो.ज्यांच्या बापांची आर्थिक स्थिती चांगली आहे,ती पोरं बापाच्या जीवावर मजा करताहेत...
मजा म्हणजे काय तर हेच गुटखा,गांजा,दारू....
ही पोरं काहीच काम करीत नाहीत.या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यचं नाही.शेतीकडं यावं अशी स्थिती नाही.शिवाय इथं ढोर मेहनत करावी लागते.
त्यामुळं ही पोरं आयुष्यभर अशीच जगतील...बेकार हा शिक्का कपाळी घेऊन मरतील.माझ्या समोर गावात तिशीच्या आतील सात-आठ तरूण दारू पिऊन मेली...
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला.
ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय.ती चिंता विसरायला गांजा आणि दारू हेच औषध.
ग्रामीण भागात शारीरिक कष्टाची कामं सोडली तर,दुसरी कुठलीच कामं नाहीत.या पोरांची अशी कामं करण्याची क्षमता नाही, इच्छाशक्तीही नाही.ही पोरं म्हणजे बापांसाठी ब्याद आहेत.धरलं की चावतयं,सोडलं की पळतयं,अशी बापांची अवस्था आहे.सगळे बाप कदरून गेलेत.माझ्या एका मित्रानं, व्यसनी पोराच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी,त्याच्या खुनाचा घाट घातला होता.ऐनवेळी रिक्षावाला तयार झाला नाही म्हणून तो प्लान अंमलात आला नाही.मित्रानं स्वत: हा किस्सा सांगितला,तेव्हा मी हादरून गेलो.परिस्थितीनं गांजून गेला की, माणूस किती टोकाला जाऊ शकतो,यांचं हे उदाहरण.
सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ...
तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे.
तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी, पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण.
निर्माण होतो तो अहंगंड....आपण कोणीतरी आहोत...यात रमायला आहे मोबाईल डाटा आणि दारू,गांजा.तो यांना वास्तवाची कधीच जाणीव करून देत नाही.आपलं भवितव्य काय? यांचं कोणाकडंच उत्तर नाही.तरीही समाजात सगळं काही सुरळीत सुरू आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर,मी परवा पतसंस्थेतल्या त्या एम.कॉम.मित्राला सहज भेटलो.तो बोलला,बाकी काही असो बघा, देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय...
मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही....
देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं...
सध्या फक्त वाट बघायची...
लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची..
महारुद्र मंगनाळे
------------------------------------------------------
------------------------------------------------------
आता यातल्या काही मुद्दयावर माझी मतं मांडतो.ती १००% बरोबरच आहेत असा दावा नाहीये.
सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या.
एम कॉम होऊनही सात हजाराच्या वर पगार देऊ नये इतपत सदर इसमाची पात्रता असेल तर याला किती गोष्टी जबाबदार आहेत पहा.
आपला कल कॉमर्सकडे नाही हे याला स्वत:लाही समजलं नाहीये.किंवा याला एम कॉम होईपर्यंत कुणी सांगितलेलंही दिसत नाही.किंवा सांगितलं असलं तरी याने दुर्लक्ष केलं.आता ते दुर्लक्ष का केलं? तर आपला कल नेमका कुठं आहे हे सांगणारी सक्षम यंत्रणा,सोय सदर व्यक्ती इयत्ता १० वी पास झाल्यानंतर त्याच्यापर्यंत पोहचली नसावी किंवा हा त्या सुविधेपर्यंत पोहचला नसावा.खेडेगावातला १० वी झालेला मुलगा किंवा त्याचे पालक आपण पुढील करियरचा निर्णय कलचाचणी देऊन घ्यायला पाहिजे इतके जागृत असतात का? बरं कलचाचण्या तरी कितपत विश्वासार्ह असतात ते खालील लिंकमधे वाचा.त्यामुळे त्यावर किती अवलंबून रहावं हा ही प्रश्न आहेच.
https://www.loksatta.com/chaturang-news/aptitude-test-180674/lite/
या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यच नाही.
मान्य! सरकारी नोकरी सगळ्यांना मिळणारंच नाही.पण सरकारी नोकरीत 'असं काहीतरी' नक्की असावं ज्यामुळे ही अपेक्षा होत असावी.नाही का? सरकारी नोकरी असली की लग्न पटकन होतं.(अपवाद क्षमस्व!)
शासकीय नोकरीमुळे स्थिरता,आर्थिक सुरक्षितता त्या अनुषंगाने येणारं चांगलं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा फायदे आहेतच की! ते कसे नाकारणार? की चांगलं मानसिक स्वास्थ्य ही गोष्ट तितकी महत्त्वाची नाहीये?
खाजगी नोकरीत इतकं मानसिक स्वास्थ्य असतं का? सरकारी नोकरीइतकी सुरक्षितता,स्थिरता असते का?कधीही निरोप दिला जाण्याची शक्यता खाजगी नोकरीत अधिक नाही का? किमान वेजेसचा नियम कारखान्यांमधे पाळला जातो का?
स्वत:चा व्यवसाय हा सुद्धा मार्ग आहे पण सुरु केलेला प्रत्येक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो का? व्यवसाय करणं इतकं सोपं असतं का? शिवाय लग्न हा मुद्दा लक्षात घेता छोट्या व्यवसायिकाच्या तुलनेत वरच्या पदावरचा सरकारी नोकरदार मुलीच्या आईवडिलांना जास्त भावला तर ते चूक कसं?
खाजगी नोकरीतही किरकोळ पगाराच्या नोकर्या भरपूर उपलब्ध आहेत.पण चांगल्या किंवा जास्त पगाराची अपेक्षा ठेवणं हे चूक कसं? तितका पगार देण्याइतपत घेतलेल्या उच्च शिक्षणात 'दम' नसेल तर असे अभ्यासक्रम सुधारणं किंवा बंद करणं ही शासनाची जबाबदारी नाही का?
हेच अभ्यासक्रम मोठ्या शहरातल्या टॉपच्या संस्थेतून पूर्ण केल्याने चांगल्या नोकरीची हमी मिळते.पण अशा संस्थांनाही विद्यार्थी संख्येचे बंधन असतेच.सगळेच तिथे शिकायला जाऊ शकत नाहीत.शिवाय काही धनदांडगे लोक पैशाच्या जोरावर आपल्या 'सुमार बुद्धीच्या' पाल्यासाठी सीटस विकत घेण्याची शक्यताही आहेच.सर्वांना हे शक्यही नाही आणि समाजविघातकही आहेच.
मग यातून बोध काय घ्यावा? खेड्यातल्या,छोट्या शहरातल्या लोकांनी,गरीबांनी अशा दर्जेदार,नामांकित संस्थामधून शिक्षण घेण्याचा विचार सोडून द्यावा का?पण महागाई मात्र सगळ्यांना समान आहे.त्याचं काय करणार?महागाईला तोंड देऊन चार पैसे खिशात शिल्लक राहणं गरजेचं आहे.समाजाच्या दृष्टीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब या कॅटॅगिरीत गेलात की लग्नाबिग्नाचा विचार मनातून काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.किंबहूना हेच वास्तव आहे.
यावरुन नोकरी सरकारी असली तर चांगलीच पण खाजगी असली तरी ती भरपूर पगारवाली असणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल.
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला.
ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय.
लग्न होणं हीच आयुष्याची 'इतिकर्तव्यता' आहे का? तर हो! बर्याचजणांबाबत ती निदान गरज तरी आहे हे तरीे नाकारता येणार नाही.शिवाय यात गैर असं काहीच नाही.
सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ...
तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे.
हे वाचल्यावर केवळ कष्टाची मनापासून तयारी असणं हे सुद्धा तितकं पुरेसं नाहीये हे नीट ध्यानात येईल.बाजारात कामही हवं.
तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी,पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण.
निर्माण होतो तो अहंगंड...
शिक्षण घेणारे सगळे असेच होतात का स्वभावानं,वृत्तीनं?
यात रमायला आहे मोबाईल डाटा.
सध्या म्हणे युट्युब हा एक चांगला गुरु आहे.वापर कसा करायचा हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे.
देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय...
मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही....
देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं...
सध्या फक्त वाट बघायची...
लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची..
यात लेखकानं आपला राजकीय द्वेष व्यक्त केलाय असं मला तरी वाटलं.सध्याच्या अवस्थेला केवळ ५ वर्षांपूर्वी आलेलं सरकारंच तेवढं जबाबदार कसं? हे काही समजलं नाही.
शेवटचा राजकीय विद्वेष वगळला तरी परिस्थितीचं वर्णन बर्यापैकी वास्तव दर्शवणारं आहे.व्यसंनांचं समर्थन कदापि नाही.तो यातून बाहेर पडायचा मार्ग खचितच नव्हे.
प्रत्येकाला पुणे-मुंबई-ठाणे गाठणं शक्य नाही.तिथल्या राहण्याच्या ठिकाणांची भाडी,घरांच्या किंमती पाहता ते कितपत 'परवडेल' हा प्रश्नच आहे.कारण मिळालेला सगळा पैसा घरावरच खर्च होणार असेल तर मुंपुठात येऊन फायदा काय?
पण मग यातून मार्ग काय? तिढा सुटावा कसा? मांडा आपापले विचार,आपले अनुभव. _/\_
प्रतिक्रिया
26 Jun 2019 - 12:06 am | जॉनविक्क
स्थलांतर करणे हे अत्यावश्यक आहे. बंगळुरात आजही अनेक चांगले जॉब्स फ्रेशर साठी उपलब्ध आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात. सरळ तिकडची वाट धरावी.
26 Jun 2019 - 12:53 am | Rajesh188
पालकांची जबाबदारी आहे की मुलांना लहानपण पासून सत्य परिस्थिती ची जाणीव करून देणे .मुलांच्या लाडा पाई त्यांना सर्व सुविधा ऐपत नसताना सुद्धा पुरविणे हे चूकच आहे .
मुलांना सर्व कामाची सवय हवी कोण तच काम छोट नसते हे त्यांच्या मनात भरवल पाहिजे .
BE करताना किंवा तत्सम शिक्षण चालू असताना छोटी मोठी कामे त्यांच्या कडून करून घेतली पाहिजे .
अगदी ड्रायव्हिंग शिकणे,लाईट ची fitting करणे,गाड्या दुरुस्त करणे ही काम सुधा यायलाच हवीत.
नोकरी जशी हवी तशी नाही मिळाली तर खचून न जाता जगता आल पाहिजे .
आणि प्राथमिक गरजा भागतील एवढे पैसे कमविणे आपल्या देशात अवघड नाही .
थोर लोकांचे जीवन चरित्र वाचली की निराशावादी विचार येणार नाहीत .मी विठ्ठल कामात चे पुस्तक वाचले होते सर्व वैभव निघून गेल्यावर सुद्धा त्यांनी एअरपोर्ट chya समोर five star hotel उभ करून दाखवले .
तेव्हा त्यांच्या खिशात कधी कधी 100 रुपये सुद्धा नसायचे
27 Jun 2019 - 1:36 pm | Nitin Palkar
पालकांची जबाबदारी आहे की मुलांना लहानपणा पासून सत्य परिस्थिती ची जाणीव करून देणे. हे १०१टक्के खरे आहे, त्याबरोबरच आपल्या देशातील शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडवायला हवे आहेत. सरकारी नोकऱ्यांना असलेले वलय हळूहळू कमी होतेय तरी देखील नजीकच्या भविष्यात ते पूर्णपणे नाहीसे होणार नाही. दरवर्षी किमान सव्वा कोटीने वाढणाऱ्या लोकसंख्येला सरकार (कोणत्याही पक्षाचे) रोजगार पुरवू शकेल अशी अपेक्षा ठेवणे हे चुकीचेच आहे. स्वयं रोजगाराच्या दृष्टीने लहानपणापासूनच मुलांचा कल घडवणे आजची गरज आहे. समाजाची मानसिकता बदलण्यास काही वेळ जाईल.... पण त्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न व्हायला हवेत.
27 Jun 2019 - 1:46 pm | गड्डा झब्बू
विठ्ठल कामत हा बोगस माणूस आहे. एक त्याचा उल्लेख सोडला तर कधी नव्हे ते तुमचा प्रतिसाद पटला.
28 Jun 2019 - 2:18 pm | चौथा कोनाडा
या माणसाच्या बोगसपणा बद्दल अर्धवट ऐकण्यात/वाचण्यात आहे. तपशील समजू शकतील का ?
आणि त्या माणसाने त्याच्या काळात जर कर्तृत्व करून दाखवले तर त्याचा उल्लेख अस्थानी कसा ?
डीएसके यांनी आधीच्या काळात ठसा उमटवला होता !
26 Jun 2019 - 8:54 am | आनन्दा
स्किल आणि अनुभव ही आजच्या जगात सर्वात मोठी शिदोरी आहे.
अनुभव नसताना कमी पगाराची नोकरी नाकारणे याच्याइतका करंटेपणा दुसरा काहीही नाही.
दिलेले काम जर प्रामाणिकपणे केले, आणि डोळे उघडे ठेवुन केले, तर भविष्य नक्कीच उज्ज्वल असते.
26 Jun 2019 - 12:18 pm | सूर्यपुत्र
१०-१५ लाख रुपये देऊन ४-५ हजाराची नोकरी कुणी का स्विकारत असेल? साधी एफ.डी. जरी केली तर व्याज जास्त मिळेल ना? नोकरी करायची गरज काय?
-सूर्यपुत्र.
26 Jun 2019 - 1:23 pm | अभ्या..
अगदीच चार पाच सुरुवातीला असतील पण माझ्याच बघण्यातली दोन उदाहरणे सांगतो.
एक जण बर्याच अंशी सधन परिवारातला, घरचा चांगला चालणारा धंदा, शेती. तालुकाही नाही अशा गावात बीएससी झाला. एमएसस्सी पण पार पडले. कधीही अभ्यास नावाची चीज केली नाही. एक गुण मात्र जबरदस्त अंगात. कुठे कशाची गरज आहे हे पटकन कळते. येनेकेन्प्रकारेण ते मिळवणारच. एमएसस्सी झाल्यावर बीएड केले. सारे पाठ वगैरे दुसर्याकडून करुन घेतले अॅक्चुअली. पैसे टाकून. परिक्षेतही तेच. बीएड झाले की नोकरीचा थोडासा शोध घेतला. अगदी थोडासा. शेजारच्या गावात एक ज्युनिअर कॉलेज होते. ट्रस्टी समाजातीलच. तरीही १५ लाख मागितले. १० लाख रोख, पाच पगारातून वळती. सुरुवातीला पगार १२ हजार. दर महिन्याला २ च हजार घ्यायचा. आता सर म्हनून स्टेटस आले. शिकलेली, बिएड केलेलीच पोरगी केली. कॉलेजात इतर कामे म्हनजे रजिस्टर, विध्यापीठातला पत्रव्यवहार, इंटरनेटवरुन रिझल्ट आनि इतर प्रक्रीया(ह्यात मात्र तो पहिल्यापासून हुशार), सरकारक्डून काही सोपवलेली कामे जसे की मनकीबातचे प्रसारणासाठी सारी सोय करणे, इ लर्निंग म्हणले की प्रोजेक्टरपासून इतर मटेरिअल अॅडजस्ट करणे, विद्यापीठातील लोकांना भेटणे अशी कामे हुशारीने करतो. शिक्षकाचे मुख्य काम शिकवणे हे मात्र विचारु नका. सतत इतर उपक्रम राबवत असल्याने (स्नेहसंमेलन, ट्रीप्स, सभा. कॉलेजातील इतर इव्हेंट) मुलांमध्ये प्रिय. सकाळचे कॉलेज असल्याने दुपारी घरी येऊन शांतपणे धंदा सांभाळतो. संस्थाचालकाचा इतका विश्वास की आता तो आगामी उपप्राचार्य आहे. (पीएचडी किंवा एमफीलची तयारी सुरु आहे, ते कसे व्हायचे ह्याची पूर्ण माहिती काढून झाली आहे) सगळे आयोग बियोग लागू होऊन आता महिन्याला ५५ हजाराचे मीटर पडते आहे. त्यामुळे गावात आरामसे भागून एक्स्ट्रा मानमरातब देखील आहे. थोड्याच वर्षात स्वतःची शिक्षणसंस्थाही काढायचा प्लान आहे.
दुसरा गरीब घरातला पण अभ्यासात हुशार. फक्त पुस्तकी अभ्यासात. प्युअर पोपट. बाकी जगाचे काडीचेही ज्ञान नाही. एक लांबचे मामा शिक्षणसंस्था चालवायचे त्यांच्याकडे शिकायला राहिला. तोही एमेस्सी बीएड करुन मामाच्या संस्थेत नोकरीला लागला. पैसे द्यावे लागले नाही पण मामाची पोरगी करुन घेतली. तीही बीएड. आता दोघेही नवराबायको संस्थेवर आहेत. नवर्याची पीएचडी झाली आहे. दोघांचा मिळून पावणेदोन लाख पगार घरात येतो. तोही अशा गावात की जेथे ५०० रुपयात महिन्याची भाजी मिळते. गव्हरमेंट नोकरी असल्याने कर्जे पटापटा मिळतात, समाजात स्टेटस असते, मुले आदर्श म्हनून पाहतात, राजकारणी लोक जरासे का होईना दबून असतात. ड्युटी अवर थोडे असलेने व सुट्ट्या दाबून असलेने पत्रकारिता, शेती, व्यवसाय अगदी मल्टीलेव्हल मार्केटिंग सारखे धंदे नोकरी सांभाळून सुखनैव करता येतात. काही शिक्षक ही प्रोसीजर न सांभाळता गधामेहनत करत बसतात. शेवटपरयंत शिक्षकच राहतात. पेपर तापासणी, अंतर्गत राजकारण व टोटलच टेन्शन हे फार थोड्या शिक्शकांना असते. बाकी प्रवाहाची दिशा ओळखून आरामसे मार्गक्रमणा करतात. नवीन पिढी घडवायची, संस्कार करायचे, ज्ञानोपासना करत करत ज्ञानाचे दान करायचे असले संस्कार आता कालबाह्य झालेले आहेत. विद्यार्थ्यांना फक्त पास आणि डिग्रीचा शिक्का हवाय त्यासाठी क्लासेस कुठे लावायचे हे चाम्गले माहीत असते पण जोपर्यंत क्लासेस सर्टिफिकेट वाटू शकत नाहीत तोपर्यंत महाविद्यालयांची गरज आहे आणी अशा ठिकाणी नोकरी करणे हे बँकेत एफडी करण्यापेक्षा कधीही चांगला सौदा आहे.
26 Jun 2019 - 1:51 pm | जॉनविक्क
परंतु हीच व्यवस्था आज सो कॉल्ड पदवीधर तयार करत आहे जे लवकरच नैराश्याने ग्रासून जाणार कारण घेतलेल्या डिग्रीचा उपयोगच नाही, पण पदवीधर आहेत मात्र ढीगभर म्हणून नोकरीच्या बाबतीत नेमके डिमांड कुणालाच नाही, आणि राग पुन्हा व्यवस्थेवर काढायला मोकळे.
आपण दोन टोकाची उदा. दिलीत, आपले अनुमानही रास्त आहे पण त्यात एक अभ्यासात हुशार व दुसरा व्यवहारात हुशार आहे. पण यामधील जो वर्ग आहे तो खरा चाचपडत आहे त्याच्या स्व(गुणांचा)चा पुरेसा विकास झालेला नाही आणि त्यासाठी एक व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे ज्यातून त्यांच्यातील स्पर्धात्मकतेचा सांप्रत स्थिती प्रमाणे बळी जाणार नाही. व्यवस्था विजेते नाहीत तर स्पर्धक निर्माण करण्यात अपयशी ठरत आहे हा मूलभूत प्रश्न आहे.
26 Jun 2019 - 6:13 pm | अभ्या..
झैरात म्हणाल पण ह्या अधल्या मधल्यांचं काये ते असं आहे बघा.
https://www.misalpav.com/node/37424
:(
26 Jun 2019 - 1:31 pm | Rajesh188
मी जेव्हा 12 वी ला होतो तेव्हा माझ्या वर्गातील मुलगा महाराष्ट्रात 25 वा आला होता .
पण व्यवहारिक विचार करून पुढे शिकण्याचा विचार सोडून दिला आणि घरच्या उद्योगात लक्ष घातले .
डॉक्टर होण्यासाठी 25 लाख खर्च करण्या पेक्षा तेच पैसे उद्योगात लावले तर जास्त return मिळतील हा विचार करून.
Kg पासून पूर्ण शिक्षणाचा पैसा save केला तर मला नाही वाटत नोकरीची गरज लागेल
26 Jun 2019 - 2:29 pm | स्वधर्म
खरंच अापल्या (बीए, बी काॅम, बी एससी) पदव्यांचा उदरनिर्वाहासाठी काय उपयोग अाहे, हा गेल्या कित्येक वर्षांपासून अनेकांना पडलेला प्रश्न अाहे. हे केलेली अनेक मुले लोकसेवा अायोगाच्या परीक्षा देण्यासाठी ३-४ वर्षे घालवतात. पण नंतर निराश होऊन तो विचार सोडून देतात. तोही एक भूलभुलैयाच अाहे. अापली व्यवस्था इतकी सगळ्या बाजूंनी सडली अाहे, की कुठूनही पहा, चांगलं काही हाती लागेल, हे दुर्मिळच. अपवाद अाहेत, पण अगदी तुरळक. प्रश्न मोठा अाहे, हळूहळू सुधारणा होत अाहे, पण भरडले जाणारे अाहेतच.
26 Jun 2019 - 9:00 pm | उपयोजक
तो चौकात उभा होता !....
आजच तिसरा इंटरव्यू दिला होता. इथेही जॉब लागणार पण पगार पुन्हा 12000च सांगितलेला.
इंजिनिअरिंग पूर्ण होऊन चार महीने झालेले, पण चांगले पैसे देईल असा जॉब मिळत नव्हता. MBA करावे तर एंट्रेन्सला मार्क कमी.
खिशात हात घातला. 20 रु निघाले. एक सिगरेट आणि तीन हेपीडेंट घेऊन चालू लागला.
दहावीचे यश , बारावीपर्यंतचे कौतुक आठवत होते. आता किती फाटली तेही कळत होते. गावात शेती बघावी तर इथली चैन सुटत नव्हती.
शेवटी वडिलांना फोन लावला , "पप्पा मी MPSC ट्राय करणार आहे."
बापाला पोरगं क्लास वन ऑफीसर होण्याचे स्वप्न पडले आणि पोराला तीन वर्ष कमवण्याच्या कटकटीतून सुटका !
आता तो क्लास शोधतोय आणि विश्वास नांगरे पाटलांच भाषण ऐकतोय !....
लागला हा पण लाईनीत. ..
अक्षय राजगे यांच्या वॉलवरुन साभार!
1 Jul 2019 - 7:05 pm | स्वधर्म
हे पर्यायच मला कळत नाहीत. केवळ मल्टी अाॅप्शन प्रश्न सोडवता अाले, म्हणून एखादा सरकारी नोकरीत थेट साहेब होणे, गाडी, ड्रायव्हर, बंगला, घरकामाला माणूस हे ३०-३५ व्या वर्षी अचानक मिळणे, हे खरंच काय अाहे? त्या माणसाकडे बौध्दिक क्षमता, स्मरणशक्ती नक्कीच वरचढ अाहे, पण त्याच्यात अाणि इतरांच्यात ईतका फरक अाहे का? इतर कुठल्या देशात असं असतं का? जाणकारांनी प्रकाश टाकावा.
एमपीएससी, युपीएससी चा अभ्यास करणार्या ९९% मुलांना फक्त याच गोष्टींचं अाकर्षण असतं, म्हणून ते हा मार्ग निवडतात असे मत बनलेले अाहे. लोकांची सेवा वगैरे सगळं नंतर सांगतात. १% असतीलही प्रामाणिक. दुसरे म्हणजे सरकारी नोकराला कमी करणे, कितीही गुन्हा केला तरी अत्यंत अवघड असते, हे पण अाणखी एक कारण अाहे या अाकर्षणाचे.
26 Jun 2019 - 6:34 pm | कंजूस
पैसे मिळवणे म्हणजे आपल्याकडची एखादी गोष्ट विकायची, सेवा द्यायची. कोणत्या गोष्टीला सध्या बाजारात मागणी आहे आणि ते आवाक्यात आहे का हे पाहावे. उगाच रड काढण्यात काही उपयोग नाही.
26 Jun 2019 - 6:35 pm | सुबोध खरे
सर्वाना सरकारी नोकरीच हवी आहे आणि त्या साठी आरक्षण सुद्धा
परंतु वस्तुस्थिती कुणालाच जाणून घ्यायची नाही.
१९९६ साली आपली लोकसंख्या होती ९७ कोटी
२००१ साली आपली लोकसंख्या होती १०७ कोटी
म्हणजे २०१४ ते २०१९ या ५ वर्षात भारताच्या लोकसन्ख्येत १८ वर्षापेक्षा जास्त अशा १० कोटी लोकांची वाढ झाली.
केंद्र राज्य आणि स्थानीक स्वराज्य संस्था असे मिळून भारतात सरकारी नोकर आहेत २.२५ कोटी.
म्हणजे १०० % सरकारी नोकरांना नोकरीतून काढून टाकले तरी (७. ७५) पावणे आठ कोटी तरुणांना रोजगार देणे सरकार ला शक्य नाही.
पण प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी आहे आणि त्यासाठी आरक्षण सुद्धा.
मेरा भारत महान
26 Jun 2019 - 7:14 pm | जॉनविक्क
हो हवीच आहे कारण जागा कितीही कमीजास्त असोत... प्रत्यक्ष Administration हे सरकारी नोकरांच्या हातीच असते. म्हणूनच या नोकरीची किंमत कधीच कमी होत नाही रिगार्डलेस ऑफ तुम्ही कर्मचारी म्हणून कोणत्या हुद्यावर आहात.
आणि अर्थातच सरकारी नोकरी म्हणजे सर्वस्व न्हवे. तरीही त्याचे मोल, योगदान फार मोठे आहेच.
26 Jun 2019 - 8:05 pm | सुबोध खरे
प्रत्येकाला सुंदर बायकोच पाहिजे आहे.
पण आपली लायकी काय आणि आपल्याला मिळण्याची शक्यता किती हे गृहीत न धरता अपेक्षा केली तर पदरात निराशा सोडून काय पडेल.
दर वर्षी जर ३ % सरकारी नोकर निवृत्त होत असतील तर एकंदर भारत भर नोकऱ्या किती उपलब्ध होणार? सात ते आठ लाख आणि १० कोटी गरजू तरुण असतील तर १००० पैकी फार तर ७० ते ८० तरुणांना नोकरी मिळणार आहे. बाकीच्या ९२० तरुणांनी हा विचार करायला नको का?
जो उठतो तो विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलंय म्हणून लोकसेवा आयोगाच्या वाऱ्या करत राहिला तरी काय होणार आहे?
26 Jun 2019 - 8:56 pm | जॉनविक्क
जे लायक आहेत त्यांच्यातल्याच मारामारीचा विचार सुन्न करत आहे, जे अपात्र आहेत (आणी संख्येने बरेच) त्यांचेबाबत तर विचारही करवत नाही. :(
असो, मी फक्त सरकारी नोकरी महत्वाची का, तेथे मी अथवा माझ्यातलाच कोणी का असावा असे सर्वाना वाटते याबाबत उहापोह केला आहे.
मला स्वतःला अमर्याद व स्पर्धात्मक असे खाजगी क्षेत्र जास्त भावते कारण तो माझा पिंड आहे. मी एक महिनाही सरकारी कर्मचारी म्हणून समाधानाने काम करू शकणार नाही हे माझ्या अल्पमतीचे वास्तव. त्यापलीकडे काहीही नाही.
बाकी मला सर्वकाही यशस्वी घडवणारी व्यवस्था अभिप्रेतच नाही मला अशी व्यवस्था असावी वाटते जी कोणाची किमान उमेद खच्ची करणार नाही. माणूस सुखी उमेद जीवन्त आहे तो पर्यंतच असतो यशापयश आणि सुख ही सर्वस्वी वेगळी बाब आहे ज्याला अनेक कांगोरे असतात.
26 Jun 2019 - 9:04 pm | अभ्या..
हजारो वेळा सहमत.
27 Jun 2019 - 10:05 am | सुबोध खरे
मी फक्त सरकारी नोकरी महत्वाची का
साडे अठरा वर्षे श्रेणी १ राजपत्रित अधिकारी म्हणून उच्च पदस्थ सरकारी नोकरी करून ती सोडून ४ वर्षे कॉर्पोरेट जगात काम करून गेली १० वर्षे स्वतःचा व्यवसाय करीत आहे.
एवढ्या अनुभवामुळे जी वस्तुस्थिती आहे ती मांडली आहे.
आजकाल दहावीत ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणे फार सोपे झाले आहे.( ज्याला पूर्वी ६० % मिळत असत त्याला आजकाल ९० % मिळू लागले आहेत) यामुळे प्रत्येक मुलाला आणि आईबापाला आपण/ आपले मूल फार प्रज्ञावंत आहे असा साक्षात्कार होतो
सी बी एस इ मध्ये २०१८ ला सव्वा लाख मुलांना ९० % च्या वर गुण मिळाले
https://www.businesstoday.in/latest/trends/cbse-class-10-results-declare...
महाराष्ट्र राज्य बोर्डात ६३ हजाराच्या वर मुलांना ९० % च्या वर गुण मिळाले.
https://www.hindustantimes.com/education/maharashtra-ssc-result-2018-pas...
अशीच स्थिती इतर राज्यांची आणि ICSE बोर्डाची आहे.
असे एकंदर ७-८ लाख विद्यार्थी भारतात दर वर्षी शिक्षणाच्या बाजारात उतरतात.
अशा लाखो गुणवंत प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना (आणि त्यांच्या पालकांना) आपल्याला मग कमीत कमी आय आय टी किंवा एम्स मध्ये तरी प्रवेश मिळणारच असे वाटू लागते.त्यांच्या स्वप्नांच्या महालाचे भाडे वसूल करणाऱ्यासाठी भरपूर क्लासेस उपलब्ध आहेतच.
खुल्या प्रवर्गाला "भारतभर" एम्स च्या ६१२ जागा आहेत. आय आय टी मध्ये "लोकप्रिय" विषयांच्या साधारण २५०० जागा आहेत.
महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गाला एकंदर सरकारी मेडिकलला १२०० जागा आहेत.
हे क्लास वाले मग विश्वास नांगरे पाटलांसारख्या लोकांच्या नावाचा फायदा उठवून व्हॉट्स अँप वर ढकलपत्रे पाठवत राहतात.
मग ही मुले ज्यांना "आय आय टी /एम्स मिळालेले नसते" ती दोन तीन चार वर्षे राष्ट्रीय किंवा स्थानीक लोकसेवा आयोगाच्या वाऱ्या करीत राहतात.
आपली लायकी काय आहे?कुवत किती? आपल्याला याची आवड आहे का? हा विचार न करता अशी तरुण मुले धाव धाव करत उरी फुटताना पाहून फार त्रास होतो.
एक वर्ष मेडिकल प्रवेशाच्या क्लास मध्ये शिकवून हि गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी पहिली आहे आणि त्याचा त्रास होतो म्हणून तेथे शिकवणे सोडून मी माझ्या मूळ वैद्यकीय व्यवसायात पडलो (आणि अतिशय सुखी आहे).
27 Jun 2019 - 10:13 am | डॉ सुहास म्हात्रे
+१
CBSE gave 56 ‘extra’ marks in Class XII boards
सगळ्यांना सरसकट जास्तीचे ५६ गुण देणे हा प्रकार अनाकलनिय आहे. हा प्रकार अनेक वर्षे चालू आहे असे या बातमीत लिहिले आहे. परिक्षेत तृटी असली तर परिक्षेची प्रक्रिया सुधारायची की सगळ्या मुलांना सरसकट गुणांची भेट द्यायची ???!!! (कपाळावर हात मारणारी स्मायली)
27 Jun 2019 - 5:56 pm | जॉनविक्क
क्लास च्या मार्केटिंग ला बळी न पडणे हा आपणास सध्याच्या बेरोजगारीच्या समस्येवर यथोचित उपाय आहे असे वाटते.
असेल असेल, मलाच हे समजायला जड जात असेल, पण प्रयत्न नक्की करून बघेन.
27 Jun 2019 - 6:04 pm | जॉनविक्क
कारण आपण सरकारी नोकरीच्या मृगजळा मागे धावणाऱ्यांचे वास्तव विषद करत आहात व योग्य बोलत आहात. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
27 Jun 2019 - 2:03 pm | Rajesh188
ह्या वर एक गमती दार खरा घडलेला किस्सा आठवला.
माझा मित्र होता नुकतंच डॉक्टर ची पदवी घेवून बाहेर पडलेला .
त्याला सुंदर बायको हवी होती गोरी ,उंच,लांब केस असलेली आणि नोकरी सुद्धा करणारी आणि घर सुद्धा सांभाळणारी.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ९६ कुळी.
पाहिले एक वर्ष खूप मुली बघितल्या पण सर्व अटींची पूर्तता करणारी मुलगी मिळाली नाही .दुसऱ्या वर्षी एक अट कमी केली तरी मुलगी मिळाली .
अशी ५ वर्ष गेली प्रत्येक वर्षी एक अट कमी होत गेली आणि शेवटी बायको ही फक्त स्त्री असावी एवढी एकच अट शिल्लक राहिली
26 Jun 2019 - 7:31 pm | मराठी कथालेखक
बी कॉमला काहीच भविष्य नाही असे मला वाटत नाही. बी कॉम, एम कॉम करुन अकाउंटिंग क्षेत्रात काम करता येते, SAP , Tally यावर काम करता येते. मी IT professional आहे, आमच्या कंपनीत finance division मध्ये असे लोक SAP वर काम करतात. आमचे invoices (म्हणजे आमच्या ग्राहकांप्रति) वगैरे बनवणं ही कामे करतात. इतरही काही गोष्टींवर कॉमर्सचे लोक काम करतात. किती पगार असतो ते मला माहीत नाही पण पोट भरण्या इतपत नक्कीच असणार.
अर्थात अशी चांगली नोकरी करण्याकरिता ज्ञान चांगलं असावं लागतं. नुसताच उत्तीर्ण झालाय पण विषयातलं मुलभूत ज्ञान नाही अशी स्थिती असेल तर कोण नोकरीवर ठेवणार ?
तरुणांनी हाती घेतलेलं काम / शिक्षण निष्ठेने करायला हवं.
एक उदाहरण देतो. काही वर्षापुर्वी मला एक सरकारी नोकरी मिळाली होती. त्या नोकरीची अट होती की रुजू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत मी MSCIT ही परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे होते. खरं तर ही नोकरी मिळण्या आधी मी आय टी क्षेत्रात होतो आणि माझे संगणकाचे MS Office ई चे ज्ञान चांगले होते त्यामुळे मला खरंतर MSCIT ची काहीच आवश्यकता नव्हती. पण आता सरकारी अट होती तर ती पुर्ण करणे गरजेचे होते. मग मी एका संस्थेत प्रवेश घेतला. MSCIT चे धडे हे ऑनलाईन आपल्या सोयीच्या वेळेनुसार घेता येतात. मी हे सगळे धडे घेतले.. संस्थाचालकाशी कसलीही सेटिंग करण्याचा प्रयत्नही केला नाही. माझ्या मनात हे पण होते की कदाचित मला आतापर्यंत माहीत नसलेल्या २-५ % गोष्टी जरी शिकायला मिळाल्यात तरी चांगलेच. आणि खरंच सांगतो MSCIT चे धडे अतिशय छान आहेत , सोप्या भाषेत आहेत, प्रत्येक धड्यात assignments आहेत त्या सोडवून आत्मविश्वास वाढतो.
यानंतर परीक्षेकरिता मी मला मिळालेल्या तारखेस मला मिळालेल्या केंद्रावर गेलो.. परीक्षा खूपच सोपी वाटली. पण तिथे आलेल्या अनेक मुलांना काहीच येत नव्हते , निव्वळ टवाळकी करत होते ते आणि शेवटच्या काही मिनटांत केंद्रचालकाने त्यांना मदत केली. या मुलांनी MSCIT चे धडे घेतलेच नसावेत हे अगदी स्पष्ट होतं.. फक्त सरकारी नोकरी डोळ्यासमोर ठेवून त्यांना प्रमाणपत्र हवे होते ज्ञानाशी काहीच देणे घेणे नव्हते. अशा मुलांबद्दल का सहानुभूती वाटावी ?
26 Jun 2019 - 8:33 pm | Rajesh188
भारताची लोकसंख्या आज १२५ कोटी chya आसपास आहे त्या मुळे बेरोजगारी खूप प्रमाणात वाढली आहे .
आपल्या कडे पहिल्या पिढी मध्ये ५ मुल प्रत्येकाला असायची तेव्हाच कठोर पने लोकसंख्या नियंत्रणात आणायला हवी होती.
संजय गांधी नी survat तर केली होती पण त्यांना आंधळा विरोध झाला आणि आता लोकसंख्येचा कडेलोट झाला आहे .
तरी सुद्धा बेशरम विचारवंत लोकसंख्या वाढ ही देशाच्या प्रगती ला अनुकूल असले असल्या फालतू थियरी मांडत आहेत .
26 Jun 2019 - 10:02 pm | हणमंतअण्णा शंकर...
https://youtu.be/V7oiro8tYA4
हा शिंपल व्हिडीओ आपल्या ज्ञानात डीचकीभर भर घालेल अशी अपेक्षा!
26 Jun 2019 - 9:42 pm | चौथा कोनाडा
या लेखाला अनुसरूनच ऑटोमेशनबद्दल बोलतो.
१. ऑटोमेशन अर्थात स्वयंचलकरण प्रत्येक उद्योगात झालेय, कारखान्यात, बँकांमध्ये, कार्यालयात .... प्रत्येक ठिकाणी. याचा परिणाम असा झालाय, जिथं १० माणसं लागायची तिथं फक्त २ माणसं लागतात. आणखी टाईट केले कि एकात पण भागते.
२. लेखात उल्लेखलेला एम कॉम वाल्याची तशी चूक नाही, तो उरलेल्या ८ मध्ये फेकला गेला आहे. जी आहे टी सात हजाराची नोकरी करण्यावाचून त्याला पर्याय नाही.
३. जे तरुण माध्यम बुद्धीचे आहेत म्हणजे (साधारण ७५% ते ८५-८८% वाले हे ज्यांना चांगल्या पैकी पगार मिळायचा व प्रगती व्हायची ते खालच्या वर्गात ढकलले गेले आहेत. )
४. याचा परिणाम असा होणार आहे कि एवढं शिक्षण, त्यात गुंतवणूक करून योग्य पगाराची नोकरी मिळत नाही म्हणून हे शिक्षण घेणे बंद होणार.
हे शिक्षणक्षेत्रातील तीव्र स्पर्धा याने या क्षेत्रात संस्था बंद पडणार, तिथंही बेरोजगारी !
५. हे सर्वच क्षेत्रात थोड्या फार फरकाने सुरु आहे.
६. या सर्वांना सेवा क्षेत्रातच जावे लागणार जिथं संधी उपलब्ध आहेत.
७. इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी हाच मुद्दा नुकताच अधोरेखित केला आहे. उत्तम शिक्षण झालेल्या युवकांना फक्त १०-१५ हजार वाल्या नोकर्या कराव्या लागताहेत हे चिंताजनक आहे. बेकारी वाढण्याचे एक कारण आहे. याचा युवा पिढीवर फारच वाईट परिणाम होत आहे.
यातून मार्ग काय? ...... अवघड आहे !
27 Jun 2019 - 1:21 pm | उपयोजक
शिक्षणक्षेत्रातील तीव्र स्पर्धा याने या क्षेत्रात संस्था बंद पडणार, तिथंही बेरोजगारी !
सहमत! यामुळेच सध्या शासन पॉलिटेक्निकची जमेल तिथे जाहिरात करतंय.गावागावात पोरांची शोधाशोध सुरु आहे.फि मधे सवलत देतंय.
1 Jul 2019 - 9:03 pm | चौथा कोनाडा
बरोबर. आता तर पॉलीटेकनिक बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. डिप्लोमा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जेव्हढे पैशे घालावे लागतात त्या प्रमाणात पगार मिळत नाहीत,
या यावर्षी आयटीआय जोरात आहेत. हा प्रत्यक्ष वर्किंग जॉब असल्यामुळे नंतर स्वयं-रोजगार देखील करता येईल
26 Jun 2019 - 10:17 pm | आदिजोशी
आपल्याच मुलांना काय धाड भरली आहे? काही जणांना खरोखर प्रचंड अडचणी असतात. पण, सर्वसाधारणपणे रिकाम्या बसणार्या बहुसंख्य लोकांना कमी कष्टात भरपूर पैसा हवा असतो. खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनांपाई आहेत त्या संधीही घालवून बसतात.
एक उदा.: आमच्या एका भावाची अचानक नोकरी गेली. हवी तशी नोकरी मिळेना. मेकॅनिकलची पोरं १२-१५ हजारात येत असल्याने ह्याला पूर्वीइतका पगारही कुणी देईना. शेवटी लोनवर गाडी घेऊन टूरीस्टचा धंदा सुरु केला. लगेच गर्भश्रीमंत झाला नाही पण निदान रस्त्यावर यायला लागलं नाही. वहिनीनेही घरच्याघरी डबे, ट्यूशन, वगैरे करून हातभार लावला. जवळपास ३ वर्षांनी नव्या प्रमोटर्सनी कंपनी पुन्हा चालू केली. शक्य होतं तितक्या सगळ्यांना परत घेतलं. गाडी पुन्हा रुळावर आली तरी वहिनीने सुरु केलेले डबे, ट्यूशन अजूनही चालू ठेवले आहेत. पडेल ते काम करायची तयारी आणि चिकाटी ह्यामुळे संसार वाचला त्यांचा.
26 Jun 2019 - 11:26 pm | विजुभाऊ
१० वी १२ वी अधीक इंजीनियरिंग य अप्याटर्न ने सगळा गोंधळ केलेला आहे.
इंजिनीयर होऊन बक्कळ पगाराची नोकरी आय टी त मिळते या समजामुळे बर्याच पिढ्या चुकीचे करीयर निवडून वाया गेलेल्या आहेत.
सध्या आय टी ची अवस्था आणि पुढे ऑटोमेशन मुळे होणारी अवस्था पाहिल्यास आय टीतल्या नोकर्या कमीकमी च होत जाणार आहेत हे नक्की
या सगळ्या बेकार तरुणांना सैन्यात , अर्ध सैनीकी बलात कामे मिळत नाहीत का?
की त्याना त्याबद्दल माहितीच नसते.?
स्वतःचे उद्योग म्हणजे पानटपरी , चहाचा ठेला एवढेच नसते. अगदी कमी भांडवलात बरेच उद्योग आहेत ,
इलेक्ट्रीशियन , सुतार , बिल्डींग मेंटेनन्स इत्यादी आणि तत्सम सेवा उद्योगात बिहारी लोक भरपूर कमावतात हे या तरुणाना दिसत नाही का?
की अमूक दादा, तमूक साहेब, फलाणा नाना, राजे.... वगैरे पुढार्यांच्या मागे मागे करून वय वाया घालवतोय हेही त्यना कळत नाही
कधी कधी वाटते की या तरुणाना काहीच करायचे नाहिय्ये. त्याना स्वतःच्या नाकर्तेपणा चे खापर कशावर तरी फोडायचे आहे.
27 Jun 2019 - 12:03 am | अभ्या..
अजिबात नाही,
असे कितीसे फिरतात राजकारण्यांमागे? फार कमी आहेत. केवळ त्या नेत्याच्या प्रेमाखातर, त्याच्या ग्लॅमरपायी फिरणारे तर फार कमी. टेम्पररी स्वार्थ असतात तेवढे पूर्ण करायला बघतात.
आणि खापर बिपर काही नाही, त्या मुळशी पॅटर्न मधल्या बकासुरासारखे होतंय. प्लास्टिक समजा मग.
चौथा कोनाडा साह्य्बांनी बोलल्याप्रमाणे सेवा व्यवसायात पैसा आहे आणि पिढी तिकडे डाय्व्हर्ट होतीय. ऑफिस नोकर्या नसेनात का, आज डॉमिनोज चा पिझ्झा घरपोह्च मागवला की येणारा हमखास इथलाच कुठलातरी असतो. स्विगी, झोमॅटो चा पार्सल देणारा मुलगा दिवसभर रात्री १२ पर्यंत बाइकवर तंगडत असतो, अॅमेझॉन, फ्लिपकार्टाच्या डिलिव्हरी देणारी मुले अशीच जळगाव, अमरावती, नांदेड, सोलापूरची असतात. ओला उबरवर गावभर कॅब चालवत फिरणारी मुले उस्मानाबाद, लातूर, परभणीची असतात. कसे का होईना महिना १५-२० हजार कमीतकमी कमावतात. अभिमान वाटतो त्यांचा. घर बसल्या पार्सल मागवणारी पिढी जशी वाढतेय तशी हि सर्व्हिस इंडस्ट्री जोमाने बहरतेय. आज पोलिसांना किंवा तुमच्या सोसायटीला माहित नसेल इतका डेटा त्या डिलिव्हरी बॉइजकडे जमा होतोय. एखादा खरोखर भारी आंत्रप्रुनर असला तर अशा नेटवर्कचा कसला जब्री उपयोग करुन घेऊ शकेल. एव्हाना छोट्या स्तरावर ते सुरुही झालेय. गुगलवाले भले प्रत्येक उपयोगकर्त्याचा डेटा सांभाळत असेल, त्याचा व्यापारी उपयोग करत असेल पण जोपर्यंत ड्रोनने घरात पार्सल येत नाहीये, इलेक्ट्रिक जीपीएस ड्रिव्हन टॅक्स्या सुरु होत नाहीयेत आणि व्हर्चुअल फूड बाजारात येत नाहीये तोपर्यंत सर्व्हिस इंडस्ट्री वाढत जाणारच.
बाकी इतर उद्योगात भले प्रप्रांतीय वरचढ होत जातील पण त्यांचीही एक सद्दी असते. काळ बदलेल, पिढी बदलेल पण काळानुसार बदलतील ते तगतील.
27 Jun 2019 - 10:51 am | आनन्दा
माझ्या एका मित्राने ६ महिने स्विगी चा जोब केला.. केवळ हे शोधायला की कोणत्या भागात कोणत्या पदार्थांची मागणी जास्त आहे..
आता एखादे किचन टाकायचा विचार करतोय.
27 Jun 2019 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे
सर्वसामान्य लोक नोकरी मिळवण्यासाठी स्वखर्चाने जोडे झिजवत राहतात. तुमच्या मित्राने कल्पकतेने आपल्या व्यवसायासाठी अत्यावश्यक असलेली माहिती मिळविण्याचे काम करत असतानाच, त्यापासून पैसे कमावण्याची कल्पकता दाखवली आहे.
तुमचा मित्र नक्कीच खूप पुढे जाईल !
27 Jun 2019 - 11:03 am | अभ्या..
ज्जे ब्बात.
यईच है स्पिरिट.
जमाना डेटाबेस चा आहे. जास्तीत जास्त किंमत आता त्यालाच येणार आहे. तुम्ही गुगलसारखे हायफाय सुविधा नका वापरु पण जो डेटा क्रियेटिव्हली कलेक्ट करताहात त्याची किंमत इतकी आहे की गुगलसुध्दा तो पर्चेस करायला पुढे येईल.
27 Jun 2019 - 11:33 am | अभ्या..
आणि महत्त्वाचे म्हणजे कस्टमरनुसार बेंड व्हायला कंपन्या तयार आहेत. त्यासाठी काही गावठी, दुर्गुण अशा समजल्या जाणार्या गोष्टींना पण किंमत असते. किंबहुना त्याच गुणांचा वापर करुन आपले साध्य गाठणारे यशस्वी झालेले पाहिलेत.
माझे दोन मित्र सेल्स मध्ये अतिशय हुशार. फक्त भाषा तेवढी घाटी. कितीहि प्रयत्न केला तरी टोन बदलायला तयारच नाहीत. व्यसनेही गायछापसारखी. पण त्याच्या जीवावर कुणाशीही बोलबच्चन करण्यात पटाईत. आटोमोटिव्ह सेल्समध्येच दोघेजण. एकजण टाटा ला. टाटाचे मॅक्सिमम कअस्टमर कॅबवाले(झेस्ट्,इंडिका) नाहीतर पोलिटिकल (सफारी, सुमो). अशे कस्टमर हँडल करायला हा गडी परफेक्ट.
दुसरा जेसीबी चे अर्थमुव्हर्स विकतो. हा ही तसाच. कारण त्याचे क्लायंट ही तसेच.
दोघांचाही करीअर ग्राफ अगदी चढता आहे हे सांगायला नको.
28 Jun 2019 - 2:29 pm | चौथा कोनाडा
+१
असे कितीतरी गावठी वाटणारे पण बोल्ड धडाडीचे सुपरफिट तरुण पाहिलेत !
सध्याच्या काळात असल्या गुणकौशल्याला फार महत्व आहे
30 Jun 2019 - 5:09 pm | चौकटराजा
कोणत्याही अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा भाग अधिक असणे हे ती अर्थव्यवस्था कधीही धोक्यात येऊ शकते याचे द्योतक आहे . भारताची अर्थव्य वस्था अशीच आहे ! ती फुगलेली आहे. कारण सेवा क्षेत्र माणसाची सोय वाढविते साधन संपत्ती नाही . सध्या फोटो स्टुडिओ या सेवा क्षेत्राची काय अवस्था आहे ? नोकरी गेली बेकारी वाढली की कोण पिझा घरपोच मागवेल ? तसे पहाता उत्पादन क्षेत्र व शेती यातही अतिरिक्त उतपादनाची स्थिति ही वाईटच पण जगात सर्व देशात शेती क्षेत्र विषम पसरल्याने तिथे धोका कमी कारण निर्यातीची शक्यता .
30 Jun 2019 - 6:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोणत्याही अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा भाग अधिक असणे हे ती अर्थव्यवस्था कधीही धोक्यात येऊ शकते याचे द्योतक आहे . भारताची अर्थव्य वस्था अशीच आहे ! ती फुगलेली आहे. कारण सेवा क्षेत्र माणसाची सोय वाढविते साधन संपत्ती नाही.
खाजगी सेवा आपण तेव्हाच स्विकारतो, जेव्हा आपल्याकडे तिच्यासाठी मोजायचे पैसे असतात आणि/किंवा ते काम करायची आपली इच्छा नसते किंवा ते काम आपण स्वतः करू शकत नाही. सरकारी सेवा बहुदा आवश्यक सेवा असतात आणि त्या जनतेच्या भल्याकडे पाहून निर्माण केल्या जातात. त्याविरुद्ध, सर्व खाजगी सेवा मागणी-आणि-पुरवठा तत्वावरच निर्माण झालेल्या असतात.
त्यामुळे, खाजगी सेवा क्षेत्र आपणहून लहान-मोठे होत नाही किंवा करता येत नाही. ते विकास-समृद्धीच्या (पक्षी : जनतेच्या हाती खेळणार्या पैश्याचा) बरोबरीने लहान-मोठे होत जाते.
उदाहरणार्थ, अमेरिकेतिल "खाजगी सेवाक्षेत्राची" उलाढाल सुमारे युएस$१० ट्रिलियन आहे. हे प्रमाण तेथिल "सकल (उत्पादन + सेवा) खाजगी क्षेत्र उलाढालीच्या (खाजगी जीडीपी)" सुमारे ८०% आहे. (संदर्भ : THE SERVICES SECTOR: HOW BEST TO MEASURE IT?) हाच प्रकार सर्व लहान मोठ्या विकसित देशांत दिसून येईल.
त्या मानाने, भारतिय सेवाक्षेत्राचा जीडीपीतिल हिस्सा केवळ ७.३९% आहे (http://statisticstimes.com/economy/sectorwise-gdp-contribution-of-india.php). जसजशी भारतिय अर्थव्यवस्था (आणि दर माणशी उत्पन्न) वाढत जाईल , तसतसा सेवा क्षेत्राचा टक्का वाढत जाईल.
इथे हे ल़षात घ्यायला पाहिजे की, अर्थव्यवस्था कितीही वाढली आणि लोकांच्या हाती कितीही जास्त पैसा खेळू लागला तरी, सर्वसामान्य माणसाच्या उत्पादन (घर, गाडी, एसी, फ्रिज, इ) विकत घेण्यावर मर्यादा असते व बहुतेक उत्पादने अनेक वर्षे काम देत राहतात. सेवा क्षेत्राच्या बाबतीत असे होत नाही... दर दिवशी अथवा वर्षातून अनेकदा दर वेळेस नवीन सेवा घेता येते... उदा : रेस्तराँमध्ये जाणे, सहलीला जाणे, मोबाईल सेवा, घरपोच वाणसामान/वस्तू/जेवण मागवणे, घरकाम, देखभाल, इ.
त्यामुळे, उत्पादन क्षेत्राला एका ठराविक मुदतीनंतर स्थिरतेला (स्टॅग्नेशन) तोंड द्यावे लागते. ती समस्या सेवा क्षेत्रात लवकर येत नाही.
1 Jul 2019 - 6:22 pm | चौकटराजा
उत्पादन क्षेत्राला एका ठराविक मुदतीनंतर स्थिरतेला (स्टॅग्नेशन) तोंड द्यावे लागते. ती समस्या सेवा क्षेत्रात लवकर येत नाही.
प्रथम उत्पादन क्षेत्रात संपृक्तता येऊन तेथील रोजगार कमी होईल व नंतर त्याचा परिमाण सेवा क्षेत्रावर होऊन त्यात बेकारी निर्माण होईल हे आपले म्हणणे युक्तच आहे पण उत्पादन स्थिरता हा माणसे कमी करण्याचा एकमेव निकष असत नाही . जीवघेण्या स्पर्धेमुळे अनेक घटकांचे वास्तविकरण करावे लागते त्यात सर्वात महाग घटक म्हणजे मनुष्य बलाचा नंबर प्राधान्याने लागतो .बजाज आटो मध्ये हेच झाले . बाजारात मागणी होती तरी देखील जीवघेण्या स्पर्धेमुळे १९९१ नंतर तिथे मोठ्या प्रमाणावर मनुष्य बळ कमी करून यंत्रे खरेदी करण्यात आली . अर्थ अभ्यासक श्री अच्युत गोडबोले यांचा एक लेख काळ निर्णय नावाच्या दिनदर्शिकेत वाचल्याचे आठवतेय . दहा एक वर्षात बँकेतील फ्रंटऑफिस वर्ग मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात येईल असा त्यांचा कयास आहे . लोकसंख्या वाढल्याने मागणी वाढते व रोजगार ही वाढतो हे सांप्रत खरे आहे भारत देशात .पण यात उत्पादन क्षेत्रात माणसांचा कमीतकमी वापर आज भारत देशात माणुसकी म्हणून एकदम कमी करण्यात येत नाही .१९९४ मध्ये मी खाजगी नोकरीत होतो तेंव्हा आख्खे व्हाउचर प्रिंटर वर नॅ रेशन सकट होत असे. आज २५ वर्षांनी सरकारी बँकेत ते हातानेच लिहिले जाते. आजही प्रत्येक बँकेत पासबुक मशीन नाही .रोजगार टिकविण्याचा प्रयन्त आज तरी होत आहे .
1 Jul 2019 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रथम उत्पादन क्षेत्रात संपृक्तता येऊन तेथील रोजगार कमी होईल
हे दर वेळेस आणि आता वाटते तेवढ्या तीव्रतेने होईलच असे नाही... इतिहास असे सांगतो कि तसे फार तीव्रतेने आणि किंवा फार काळ होत नाही. अश्या प्रत्येक क्रांतिकारी बदलामुळे, उत्पादन व्यवस्थेवर आणि त्यातील मानवी संसाधनावर परिणाम झालेले आहेत. परंतू, नवीन व्यवस्था नवीन संधी निर्माण करते आणि मानवी कल्पनाशक्ती त्यातून तगून जाण्याचे अनेक (बर्याचदा अधिक चांगले) यशस्वी मार्ग काढते असा अनुभव आहे.
हे इतिहातात बर्याचदा घडलेले आहेत. त्यातील काही महत्वाचे बदल असे म्हणता येतील...
१. शिकारी आणि नैसर्गिक स्त्रोतांपासून अन्न गोळा करण्याची (हंटर-गॅदरर) जीवनशैली ---> शेतीव्यवस्थेवर आधारलेली जीवनशैली
२. केवळ मानवी आणि/किंवा प्राण्यांची क्रयशक्ती वापरून काम करणे ---> यंत्रे वापरून कामे करणे
३. यांत्रिक क्रांती ---> संगणकिय क्रांती
एक क्रमांकाच्या बदलामध्ये झालेल्या विरोध आणि/किंवा काळजीबद्दल लिखित-ऐकीव पुरावे नाहीत. पण, इतर दोन बदलांमध्ये, "आता जुनी कौशल्ये असलेल्या माणसांचे काय? त्यांच्या जीवनाची साधने नाहीशी झाल्यामुले ते बेरोजगार होऊन भुके मरतील अशी मोठी हाकाटी झाली... वेळप्रसंगी ते बदल होऊ नयेत यासाठी जोराचे प्रयत्नही झाले. हा विरोध बहुतांशी, 'अज्ञात भविष्याची काळजी' आणि/किंवा 'जुन्या व्यवस्थेत पक्के झालेल्या हितसंबंधाना बाधा', या कारणांनी होता. नवीन बदलांमुळे होणार्या मानवी जीवनाचा विकासामुळे मिळणार्या फायद्यांच्या रेटा, त्या विरोधावर नेहमीच मात करत राहीला आहे. तसे झाले आणि ते फायदे दिसू लागले की विरोध करणारे लोकही त्या फायद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करण्यामागे लागतात ! :)
हे एक प्रकारे, निसर्गाच्या निवडीचा (Survival of the fittest) भाग आहे... त्यामध्ये फरक इतकाच की, आता फक्त 'नैसर्गिक बदल' हाच एक घटक न राहता, त्यात 'मानवी बुद्धीने घडवलेले बदल' हा एक घटक सामील झाला आहे... आणि तो दिवसे दिवस जास्त, जास्त सबळ बनत चालला आहे.
थोडक्यात, भविष्याबद्दल निराश/नकारात्मक होण्याइतके मानवी बुद्धीला कमी लेखायला नको. तिच्यातल्या लोभ-लालचेमुळे तिने मानवाला अनेकदा अडचणीत आणण्यात आले आहे. मात्र, स्वतःच्या जीवनाबद्दलच्या त्याच लोभ-लालचेने (ज्याला आपण स्वसंरक्षण किंवा self preservation म्हणतो) मानवाला दर वेळेस त्या अडचणींतून बाहेर काढले आहे... किंबहुना, पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या अवस्थेत आणून सोडलेले आहे.
26 Jun 2019 - 11:39 pm | Rajesh188
मुंबई मध्ये श्रीमंत लोकांच्या घरी नोकर आणि जेवण बनवणारे ह्या नोकऱ्या सुधा खूप उपलब्ध असतात .एक इमारती मध्ये जेवढे फ्लॅट त्याचा तिप्पट नोकऱ्या असतात त्या प्रकारच्या .
कमीतकमी पगार १००००/१२००० असतो आणि राहणे आणि जेवण फ्री सर्व ठिकाणी बिहारी तरुण काम करतात .
जो पगार मिळतो तो पूर्ण शिल्लक .
Maharashtra मध्ये तरुण बेकार फिरतील पण अशा नोकऱ्या करणार नाहीत .
लहान मूल म्हणजे नुकतंच जन्म झालेले सांभाळणे साठी ४०००० ते पन्नास हजार पगार मिळतो त्या मध्ये सुद्धा बंगाली आणि गुजराती,मारवाडी स्त्रिया काम करतात
पण आपल्या स्त्रिया हे काम करत नाहीत .
कमी पना वाटतो
30 Jun 2019 - 12:51 pm | बबन ताम्बे
विमाननगर हा पुण्याच्या पूर्वेकडील अलीकडेच 10-15 वर्षांत विकसित झालेला भाग. आय टी कम्पन्या, फिनिक्स मॉल, अनेक हाऊसिंग सोसायट्या असलेल्या या भागात संध्याकाळी फुटपाथवर प्रचंड संख्येने पाणीपुरी, कच्छी दाबेली, डोसा वगैरे खाण्यापिण्याच्या हातगाड्या लागतात आणि खवय्यांची गर्दी ही खूप असते. पण हातगाड्या गाड्या कुणाच्या ? तर बिहारी, राजस्थानी आणि मोमोज बनवणाऱ्या पूर्व भारताकडील
तरुणांच्या. खूप मेहनती , त्यामुळे पैसा पण चांगला मिळतो. यात मराठी तरुण कुठे आहे? तो आहे फक्त फ्लेक्स वर.
ते बिहारी राजस्थानी तरुण हप्ते देऊन सुद्धा(हप्ते कोण घेतं सांगायची गरज नाही) चांगला व्यवसाय करतात.
मध्ये इंटेरिअर करता सुतार शोधत होतो. यच्चयावत सगळी राजस्थानी पोरं आणि खूप स्कील्ड. त्यांना पुण्या मुंबईत बेरोजगारीची समस्या बिलकुल भेडसावताना दिसत नाही.
30 Jun 2019 - 7:14 pm | मराठी कथालेखक
मी चार वर्षांपुर्वी भिंतीच्या खोबणितले कपाट , ड्रॉवर ई बनवून घेतले होते .. राजस्थानी कारागीर होते. पण ते नीट बनले नव्हते, सांगूनही त्यांना नीट दुरुस्त करता आले नाही. ड्रॉवर्स नीट नसल्याने यथावकाश चॅनेल्स खराब झालेत. कसेबसे वापरत होतो. अलीकडे दुसर्या एका राजस्थानी सुताराला दाखवले , या दुस्रुस्तीखेरीज आणखी एक कामपण आहे असे सांगितले. दोन्ही कामाचे मिळून त्याने मला प्रस्तावित खर्च सांगितला तो खूप जास्त वाटला म्हणून त्याला होकार दिला नाही. फक्त दुरुस्तीचे तेवढे काम करण्यास तो तयार नव्हता.
नंतर काही दिवसांनी मी urbanclap वरुन सुतार बोलावला. त्याने वाजवी खर्चात माझ्या ड्रॉवर दुरुस्तीचे काम केले. तो कम करत असताना मी बघत होतो.. तो अतिशय मन लावून काम करत होता. जोडणी स्वतःच्या मनासारखी होई पर्यंत तो करत राहिला. म्हणजे 'हे अजून ठीक करा' असे मला सांगावे लागले नाहिच...आणि हा एक मराठी सुतार होता.
30 Jun 2019 - 8:46 pm | बबन ताम्बे
मला मराठी पेंटर, सुतार , गवंडी, बाल्कनीचे ग्रील बनवणारा फॅब्रिकेटर थुका लावणारेच मिळाले. बरं काम दिले या सद्हेतुने की मराठी माणसाने मराठी माणसाला वर आणले पाहिजे.
1 Jul 2019 - 10:24 am | नाखु
रंगकाम करणारा आणि घराचे बांधकाम करणरा (मराठी माआसणूस म्हणून आवर्जून मराठी माणसाला दिले) काम अर्धवट सोडून गेले
उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागले मनस्ताप झाला तो वेगळाच.
अगदी लहान बाळाला संभाळून या रंगार्या लोकांचे चहापाणी घरच्यासारखे केले तरीही साफसफाई न करता जात असत आणि त्यावरूनच बोललं तर राग आला.
एकजात मराठी रंगारी आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे कटू अनुभव घेतले आहेत.
चौकात बिडी फुंकत दिवस घालवतील पण तुमचं अक्षरशः अर्ध्या दिवसात होणारे काम करायला तयार होणार नाहीत.
घर पहावे बांधून अनुभवी पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु
1 Jul 2019 - 12:28 pm | चौकटराजा
एकूणात मराठी माणूस " बंडल " आहे असा माझा आयुष्यभराचा अनुभव आहे . तरीही गुन्हेगारी मात्र उत्तर भारतीयांत जास्त आहे असाही अनुभव आहे !
1 Jul 2019 - 6:41 pm | धर्मराजमुटके
थोडक्यात काय तर मराठी माणूस कामात ही मागे आणि गुन्हेगारीतही मागेच ! कुठेतरी पुढे या म्हणावं !
1 Jul 2019 - 10:37 pm | नाखु
चलती आहे पण फक्त आपल्या मोहल्ला आणि एरीयातच , परराज्यातील येऊन इथे ढोस देउन राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दहशत निर्माण करतील पण इथला एकही गुंडपुंड बिहार उत्तर प्रदेश इथे जाऊन दबदबा निर्माण करणारा नाही.
स्थानिक नागरिकांना पिडण्यातच मुदुर्मकी गाजविली जाते.
गाववाल्यांचा अनुभवी पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु
2 Jul 2019 - 5:48 pm | चौथा कोनाडा
येतील, येतील, लवकरच येतील !
नाहीतरी सध्या काही मराठी माणसांनी गुन्हेगारीत उत्तर भारतीयांशी कोलॅब्रेशन केलेलेच आहे. दोन्ही टीमा मिळून महराष्ट्रात काम करत असतात.
मग, आरोपी शोधण्यासाठी / अटक करण्यासाठी पोलिसांना परमुलुखाचा दौरा करावा लागतो.
2 Jul 2019 - 6:07 pm | हस्तर
https://www.quora.com/What-is-the-salary-of-Mukesh-Ambanis-cook
27 Jun 2019 - 1:59 pm | गवि
धाग्यावरील काही उल्लेखांच्या संदर्भात:
इतकी वाईट इडली, चटणी, इतकं वाईट सांबार.. इतका वाईट मेदूवडा, इतका वाईट डोसा (वाईट म्हणजे बेचव अशा अर्थाने.. खराब झालेले असं नव्हे) देणाऱ्या अनेक हायवे कामत औटलेट्सची अन्यत्र फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि एकूण इतकी प्रसिद्धी कशाने झाली असावी?
प्रसिद्धीत "चव" हा एक किमान घटक असावा लागतो अशी समजूत आहे. इडली ही सिग्नेचर डिश म्हणून उल्लेख केल्यास इडली, मेदूवडा आणि डोसा हे तरी चांगले असावेत.
की अगदी योगायोगाने मी फक्त वाईट औटलेट्समधेच खात गेलो?
27 Jun 2019 - 2:12 pm | सर टोबी
फ्रँचाइजचा व्यवसाय कसा करू नये याचा वस्तुपाठ म्हणजे विठ्ठल कामतांची हॉटेल्स. त्यांना काहीही ब्रॅण्डिंग आणि प्रमाणीकरण नाही. जसे तुम्ही अनोळखी शहरात गेलात आणि दुरूनदेखील पिवळ्या रंगाचा एम दिसला कि तिथे मॅक डी आहे असा विश्वास तुम्हाला ब्रॅण्डिंग मुळे मिळतो. मॅक डी च्या अमुक आउटलेटचा बर्गर खाल्ला का असे आपण म्हणत नाही कारण कुठेही त्याची चव सारखीच असते. अगदी कच्च्या मालाच्या वापरापासून चवीचे सातत्य जपले जाते.
त्या उलट कामतांची आउटलेट्स. त्यांना ना कुठली ओळख ना चवीचे सातत्य ना किमतीची खात्री.
27 Jun 2019 - 2:50 pm | गड्डा झब्बू
नाही सगळीकडे तिच परीस्थीती आहे. ८-१० वर्षांपूर्वीचा गोष्ट आहे, बिसलेरी ची कींमत ₹ १० होती तेव्हा ह्याच्या आउटलेट्स मधे ती ₹ ४० ला मिळायची. गिर्हाईकांनी बोंबाबोंब केल्यावर या माणसानी बिसलेरी बरोबर संगनमत करुन त्याच्या आउटलेट्स मधे विकल्या जाणार्या बाटल्यांवरची Mrp ₹ ४० प्रींट करून घेतली होती.
त्याच्या आउटलेट्स वर बहिष्कार टाकण्यास आल्याने स्वानुभव नाही पण ईतरांचे अनुभव चव आणि कींमतीच्या बाबतींच अजुनही तसेच आहेत.
27 Jun 2019 - 2:59 pm | चौकटराजा
मी शाळेतला पहिल्या नंबरचा विदयार्थी पण आवड व कुवत याची सांगड न घातल्याने शिक्षणात व नंतर चुकीच्या कंपनीत नोकरी ई कारणा मुळे तसा करियर मध्ये फेल .आज मी ठीक जीवन जगत असलो तरी माझे कर्तृत्व शून्य आहे असे मी मानतो. आज मी जेंव्हा चाळीशीतील तरुण दीड दीड लाख पगार घेताना पाहतो त्यावेळी त्यांचा अभ्यास ही करीत असतो. यांना कंपनीनी इतक्या मोठ्या पदावर ठेवताना चापलुसी हा एकच निकष तर लावला नसेल ना ? असा मला प्रश्न पडतो.
मी माझ्या सर्कल मध्ये " आमची १९५० च्या दरम्यान जन्माला आलेली पिढी काल पट्टीवर योग्य वेळेस जन्माला आली व योग्य वेळी हे जग सोडणार आहे ! " असे म्हणत असतो. योग्य वेळी जन्माला आली अशा अर्थाने की औद्योगिक क्रान्ती नंतर हा असा काळ आहे की जिथे जगातील अनेक देशाना स्वातंत्र्य मिळून बहुतांश ठिकाणी लोकशाहीची स्थापना झाली .म्हणजेच हीन कुळात जन्माला आला तरी कुणीतरी मोठा होण्याची संधी मानवी इतिहासात प्रथमच निर्माण झाली. योग्य वेळी मरणार अशा अर्थाने की आता विकास नावाच्या औषधाचे दुश्परिणाम दिसायला सुरूवात होते आहे. माझया मते येती ४० ते पन्नास वर्षात जगात भयानक उलथापालथ होण्याची शक्यता आहे . त्यात वातावरण समस्या, पाणी समस्या वगरे असणार आहेतच पण सर्वात कराल समस्या म्हणजे " बेकारी ".ज्या ज्या लोकांनी वीस वीस वर्षाचे हप्ते बांधून जागा घेतल्या आहेत ते ही वीस वर्षे पैसे भरू शकणार आहेत का याबद्दल मला शंका आहे. सब प्राईम सारखे एखादे मोठे आर्थिक संकट २००८ साली फक्त अमेरिकेत आले ते जगावर येऊ शकते असे मला वाटत आले आहे. माझे लहानपणी वीज बिल भरण्यासाठी अर्ध्या दिवसाची सुटी घ्यावी लागत असे आता एक घास घेतल्या सारखे ते काम होते. काही नवीन रोजगार निर्माण होतील ही . उदा . ओला उंबर सारख्या सुलभ गाड्या . पण त्याचा परिमाण असा की अनेक लोक पार्किग,कर, विमा यातून सुटका करून घेण्यासाठी स्वतः: ची गाडी घेण्याचे रद्द करतील. आज अनेक कामे " वर्क फ्रॉम होम " अशी करता येतात सबब अशा कामाचे प्रमाण वाढले की त्याचा परिणाम मेट्रो, बस या व्यवसायावर होईल . १९७० च्य सुमारास उद्दामपणे तुम्हाला डावलून पुढे जाणारा रिक्षावाला आज याचका सारखा " यायचे का?" असे विचारत असतो . हा बदल आपण लक्षात घेतला की पुढे काय होणार याचा अंदाज येऊ शकतो .
ज्ञानाचा प्रस्फोट होत असल्याने फसवणुकीवर आधारित व्यवसाय तर बंद होतीलच . त्याचबरोबर कायदा व वैद्यक क्षेत्रातील जाण वाढल्याने याही व्यवसायावर परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही . बरेच लोक बेकारी वाढल्याने अन्न या " सनातनी " व्यवसायाकडे वळतील . आजही वळत आहेत .सबब एकाच रस्त्याला सलग ५० वडापावच्या गाड्या अशी सध्या अतिरंजित वाटणारी स्थिती येऊ शकते .धरण बांधण्यास योग्य जागा संपत गेल्यास , रस्त्याचे जाळे पुरेसे वाढल्यास याही क्षेत्रात अवकळा येऊ शकते. मुलाला एकाकी पणा येऊ नये म्हणून मुलीचा चान्स घेणाऱ्या तरुण जोडप्याला हे कसे कळणार ?
27 Jun 2019 - 3:31 pm | Rajesh188
जेव्हा पासून पृथ्वी वर सजीव निर्माण झाला आहे (त्यात माणूस येतो तो कोण्ही वेगळा नाही)तेव्हा पासून तो जगण्यासाठी संघर्ष करत आहे .पाण्याची कमतरता,अन्नाची कमतरता असे प्रसंग करोडो वेळा पृथ्वी वर येवून गेले आहेत .
त्यातून जे निभावले ते जगले बाकी संपले
जे संपले किंवा जे जगले त्या मुळे परिस्थिती मध्ये काही फरक पडत नाही .
पुढे सर्व वाईटच घडेल असं काही नाही .
निसर्ग स्वतः लोकसंख्या कमी करेल .
पुरुषांना मध्ये वांझ पण वाढत आहे हे त्याचंच निर्देशक आहे .
लग्न न करणे ह्याच सध्या चलती आहे .
माणूस विचार पूर्वक सर्व संकट शी मुकाबला करेल आणि भविष्यात आता पेक्षा पण किती तरी आरामदायी आयुष्य माणूस जगत असेल .
उत्पत्ती आणि विनाश हे हा निसर्गाचा नियम आहे त्या साठी उद्या वाईट होईल म्हणून आज दुखी होवू नका
27 Jun 2019 - 4:33 pm | गड्डा झब्बू
स्वामीजी आप महान है...
27 Jun 2019 - 8:21 pm | चौकटराजा
आतापर्यंत चा मानवी इतिहास पाहिला तर तत्वत: " जो पोट देतो तो घास देतो " हे म्हणणे मान्य करता येईल पण भविष्य काळ हा इतिहासाला बांधील नसतो .मानवी शरीरात देखील आयुष्यभर निसर्गाशी संघर्ष चालू असतोच पण कितीही काळजी घ्या एके दिवशी तो संघर्ष संपतोच . निसर्गापुढे मानव तोकडा आहे . ( खरे तर व्यापक अर्थाने तो ही निसर्गा चाच एक भाग आहे ) .तुम्ही मांडलेला विचार खूप दूरचा आहे .माझी काळजी आहे येत्या पन्नास वर्षासाठीची .
27 Jun 2019 - 3:03 pm | Rajesh188
त्यांच्या पुस्तकं नुसार त्यांना त्यांच्या भावा नी सर्व व्यवसाय वर हक्क सांगून विट्ठल जी ना हाकलून दिले आहे आहे खूप वर्षा पूर्वी .
ज्यांनी व्यवसाय वाढवला त्यांनाच घराच्या बाहेर काढलं गेले.
आणि त्या नंतर ते five star hotel chya व्यवसायात आले अत्यंत घडतर परिस्थिती मध्ये आणि त्यांनी पाहिले five star hotel airport समोर उभे केले .
बाकी कामत हॉटेल शी विट्ठल कामत ह्यांचा आता काही संबंध नाही
27 Jun 2019 - 3:08 pm | गड्डा झब्बू
काय म्हणतां ? खरच?
27 Jun 2019 - 3:13 pm | गड्डा झब्बू
>>>बाकी कामत हॉटेल शी विट्ठल कामत ह्यांचा आता काही संबंध नाही>>>
कामत हाॅटेलशी नसेल पण विठ्ठल कामतच्या फ्रॅनचाइज शी आहे ना? तो मुद्दा आहे.
27 Jun 2019 - 3:17 pm | गवि
ओह. म्हणजे "इडली ऑर्किड आणि मी"वाले विठ्ठल कामत यांचा हायवेजवरील कामत रेस्टॉरंट चेनशी संबंध नाही ? मला उगीच त्यांच्या फोटोवरुन केलेला लोगो (रेखाचित्र) तिथे वापरलेलं पाहिल्याचं वाटलं होतं. चुकीचं आठवत असेल.
रोचक माहिती. धन्यवाद.
व्हिट्स हे नक्की त्यांचं हॉटेल असावं. तिथे जेवण ठीक होतं. अप्रतिम नव्हे. पण एकदाच जेवल्याने पक्के मत देता येत नाही.
असो.
27 Jun 2019 - 4:37 pm | आनन्दा
व्हित्झ वॉझ ओके ओके. अर्थात हल्ली बार्बेक्यु आणि बुफे पैशाला पासरी झालेत. अश्या वातावरणात वेगळी टेस्ट अशी काय मिळणार?
पण रेट मात्र दाबुन होता तेव्हा पण त्यांचा.
आता बंद झाले बहुतेक.
अवांतर -
मला हल्ली पंजाबी आणि मराठी जेवणाचा नॉशिया आलाय, तेच तेच खाऊन.
27 Jun 2019 - 7:17 pm | झेन
मराठी माणसाला दूस-या मराठी माणसाचे कौतुक करवत नाही. बकवास चवीमधेसुध्दा सातत्य आणि विविधता असते या कामताकडे.
28 Jun 2019 - 3:39 pm | चिगो
विषय खोल आहे, पण मताच्या पिंका टाकतोय..
१. लोकसंख्या : आपण भारतात प्रचंड संख्येने आहोत, आणि त्याचमुळे प्रचंड संख्येनी वाढतोय. १९६१ मध्ये भारताची जनसंख्या जवळपास ४५ कोटी होती. १९९१ मधे जवळपास ८९ कोटी आणि २०१९ मधे १३५ कोटी पेक्षा जास्त.. म्हणजे मागील ६० वर्षांत आपली लोकसंख्या जवळपास तिप्पट झाली आहे, पण त्याच्या तुलनेत नोकरी किंवा व्यवसायांच्या संध्यामधे तितकी वाढ झाली का? तर नाही. बर्याच प्रतिसादकर्त्यांनी म्हट्ल्याप्रमाणे उलट ऑटोमेशनमुळे मनुष्यबळाची गरज कमीच होत चालली आहे.
२. श्रमप्रतिष्ठा नसणे : आपल्या समाजात श्रमाला प्रतिष्ठा नाही. बर्याच अंशी ह्याला आपली वर्णव्यवस्था जवाबदार आहे. अंगमेहनतीचे काम असलेले व्यवसाय हे पारंपारीकरित्या जातींच्या उतरंडीत खाली असलेल्या जातींची अखत्यारी मानले जातात. म्हणूनच गावातला बेरोजगार तरुण बेकार बसेल, पण 'हा' किंवा 'तो' व्यवसाय करणार नाही. 'आपल्याले शोभते का बे ते काम?' ही गुर्मी आहेच.
३. शालेय गुणांचा फुगवटा : पुन्हा एकदा, बर्याच प्रतिसादकर्त्यांनी म्हटल्याप्रमाणे, आजच्या शिक्षणपद्धतीने गुणांचे फुकट वाटप सुरु केलेले आहे. त्यामुळे बर्याच मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा देखील त्यांच्या आकलनशक्ती किंवा शैक्षणिक कुवतीबद्दल गैरसमज होतो.. त्यातही 'एक चाटू और सब घोटू' पद्धतीत कल/ कुवत आणि आवड नसतांनाही 'अबक' कोर्सकरीता अॅडमिशन घेणे, आणि मग पुन्हा 'आपल्याले शोभते का बे ती नोकरी' करत स्वतःच्या इनफ्लेटेड इगोला जपणे सुरु राहते. सिस्टमला शिव्या देणे, हा छंदपण जडतो..
माझ्यामते ह्याला वर्तमानकालीन उपाय फार कमी आहेत. 'डेमोग्राफीक डिव्हीडेंड'चे कौतूक करण्यात जवळपास वीस वर्षं गेलीत आपली. आता हाच 'डेमोग्राफीक डिव्हीडेंड' आता 'डेमोग्राफीक बर्डन' बनत चाललाय. 'स्किल आणि व्होकेशनल एज्युकेशन' बद्दल निर्णय घेतांना आपण श्रमप्रतिष्ठेबद्दलच्या आपल्या परंपरा आणि जातीनिगडीत कल्पनांना लक्षातच घेतलं नाही, आणि आता वैतागलेल्या, खच्ची झालेल्या बेकार तरुणांचे ओझे वाहतो आहोत. स्वतःची किंवा आपल्या मुलांची आवड आणि कल ओळखून खोट्या शैक्षणिक/व्यावसायिक कल्पनांना बळी न पडता संधी शोधणे, हाच उपाय आहे ह्यावर.. बाकी स्पर्धापरीक्षांमध्येही अत्यंत प्रामाणिकपणे स्वविश्लेषण करणे फार गरजेचं असतं. क्लासवाले किंवा पुस्तक लिहून प्रेरणास्त्रोत बनणारे एकतर स्वतःचा खिसातरी जपत असतात किंवा गंडतरी.. त्यात वाहावून जाण्यात अर्थ नाही..
लोकसंख्येला आळा घालणे, ही आजच्या काळाची तातडीची गरज आहे. भरमसाठ जनसंख्या आपल्या नैसर्गिक स्तोत्रांवरही असहनीय ताण आणत आहे, आणि भविष्यात हा ताण वाढतच जाणार. पाणीसंकट आ वासून उभं आहे. We are trampling over the natural resources, and other species who are an invariable part of the nature to our own peril.
28 Jun 2019 - 6:38 pm | सुबोध खरे
बाकी स्पर्धापरीक्षांमध्येही अत्यंत प्रामाणिकपणे स्वविश्लेषण करणे फार गरजेचं असतं. क्लासवाले किंवा पुस्तक लिहून प्रेरणास्त्रोत बनणारे एकतर स्वतःचा खिसातरी जपत असतात किंवा गंडतरी.. त्यात वाहावून जाण्यात अर्थ नाही..
+१००
लोकसंख्येला आळा घालणे, ही आजच्या काळाची तातडीची गरज आहे.
याची सुरुवात ३० वर्षांपूर्वीच व्हायला पाहिजे होती. तर त्याचा प्रभाव आता दिसू लागला असता.
28 Jun 2019 - 4:00 pm | Rajesh188
नीट विचार केला तर आपल्या कडे सेवा देणारे खूप आहेत पण दर्जा नाही .
फक्त लग्न समारंभात जेवण केले तर तुमच्या लक्षात येईल कोणत्या ही सेवेचा दर्जा हा अत्यंत खराब आहे .
साधे घरात रंग जरी द्यायचा असेल तरी प्रामाणिक पने ८ तास काम करणारी लोक भारतात उपलब्ध नाहीत .
शुद्ध तूप तुम्हाला कोठेच मिळणार नाही अशी गंभीर अवस्था आहे .
ह्या परिस्थिती मध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीला खूप मार्केट value आहे
28 Jun 2019 - 6:37 pm | सुबोध खरे
प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीला खूप मार्केट value आहे
प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीला मार्केट मध्ये value येईपर्यंत फार काळ जावा लागतो.
हॉटेलचे उदाहरण घ्या. चांगला दर्जेदार पदार्थ वाजवी भावात मिळतो आहे हे समजून हॉटेल चालायला लागेपर्यंत काही वर्षे जावी लागतात.
एवढा धीर आणि सबळ आर्थिक स्थिती सर्वांची असतेच असे नाही. त्यातून लोकांना शेंडी लावून आपले काम चालते आहे हे लक्षात येताच लोक अशा मार्गाला पटकन वळतात कारण यात झटपट पैसा/ प्रसिद्धी मिळते.
आणि लोकांना लक्षात येईपर्यंत दुसरा व्यवसाय चालू करता येतो. आपली लोकसंख्याच इतकी आहे कि दर्जेदार सेवा न देताहि बरेच दिवस काम चालू शकते.
30 Jun 2019 - 12:01 pm | दीपक११७७
भारतीय जनतेने काठ-कसर हा प्रकार बंद करावा अथवा किमान ८०% नी कमी करावा,
सगळ्या गोष्टी जुगाड करुन आणि/किंवा स्वस्त हवे आहे म्हणाल्यावर नोक-या पगार कुठुन मिळणार
वरिल बदल होण्यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न करावे, पैसा खेळता राहिला तर सगळ्यांना काम मिळेलं, जनतेने देशांतर्गत पर्यटन करावे व सरकारने त्यास प्रोत्साहन आणि infrastructure & security पुरवावी या मुळेही प्रचंड जाॅब निर्माण होतीलं
सध्या एवढचं
बादवे, असे म्हणतात कि इतर देश बचत करतात व अमेरिकन जनता इत्यादी त्यावर चंगळ करतात.
30 Jun 2019 - 12:06 pm | मदनबाण
‘रोजगारसंधी’ गिळंकृत करणारा ‘विकास’!
याच जोडीला समाजात निर्माण झालेला दुसरा मोठा प्रश्न :- राज्यातील ५३ टक्के पुरुष तर ४२ टक्के महिला अविवाहित: सर्वेक्षण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
30 Jun 2019 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
राज्यातील ५३ टक्के पुरुष तर ४२ टक्के महिला अविवाहित: सर्वेक्षण
खरेच !?
6 Jul 2019 - 3:06 pm | चौथा कोनाडा
धन्यु मदनबाण लिन्क साठी !
लेखात नमूद केलेली खालील विधाने बेरोजगारीवर योग्य प्रकाश टाकतात !
त्या श्रमिकवर्गात पांढरपेशी श्रमिक देखील आले.
.... श्रमिक वर्गावर, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने काय संकटे ओढवली असतील, याची आपण कल्पनाच करू शकतो. राज्याच्या या स्थितीला अनेकांनी ‘जॉबलेस ग्रोथ’ – म्हणजे ‘रोजगारसंधींविना विकास’ असे म्हटले आहे. परंतु वास्तविक हे केवळ तेवढेच नसून हा ‘रोजगारसंधी कमी-कमी करणारा विकास’ किंवा ‘जॉब रिडय़ूसिंग ग्रोथ’ आहे.
मानवी श्रमांवर कमीत कमी अवलंबित्व ठेवून, यंत्रे आणि उपकरणे यांवरच भिस्त ठेवणारा हा विकास आहे, ..... आर्थिक उत्पन्नही वाढले. पण म्हणून श्रमिकांना उत्पन्न मिळाले असे नाही; कारण श्रमशक्ती उपलब्ध असूनही तिला रोजगारच मिळालेला नाही. उलट बेरोजगारीचे प्रमाणच दर वर्षी आणखी आणखी वाढत राहिले.
30 Jun 2019 - 12:26 pm | मदनबाण
खरेच !?
अर्थसंकल्प सादर करण्याआधी २०१८च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात राज्यातील अविवाहित पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात आज ५४.४ टक्के पुरुष, तर ४४.८ टक्के महिला अविवाहित आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
30 Jun 2019 - 12:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे ठरविण्यासाठी कोणता वयगट विचारात घेतला आहे हे फार महत्वाचे आहे.
कारण, भारतातील ५०% टक्के व्यक्तींचे वय २५ पेक्षा कमी आहे आणि ६५% व्यक्तींचे वय ३५ पेक्षा कमी आहे आणि सद्या विवाहचे वय सर्वसाधारणपणे वाढलेले आहे. म्हणून, जर लग्नासाठीच्या कायदेशीर किमान वयावरील सर्व व्यक्ती अविवाहित समजल्यास, वरील आकडे मिळणे शक्य आहे.
30 Jun 2019 - 1:12 pm | गवि
हेच विचार मनात आले.
शिवाय तो नोकऱ्या निर्माण करण्याचा एक मुद्दा. अधिकाधिक लोकांना काम मिळावं म्हणून तंत्रज्ञान कमी करुन मानवी श्रम अधिकाधिक वापरणाऱ्या नोकऱ्या तयार करण्याचा सूर अनेक ठिकाणी दिसतो.
असं मत मांडणारे लोक कुठल्या लॉजिकने असं समजतात की व्हॅल्यू क्रिएशन नसलेले जॉब्स तयार करण्याने खरा रोजगार निर्माण होईल?
मोबदला द्यायला निमित्त म्हणून व्हॅल्यूलेस रोजगार निर्माण करणं हे रोजगार निर्माण न करण्यासारखंच आहे. पन्नास टक्के बेरोजगारांना खड्डा खणण्याचं काम देऊन पगार दिला आणि उर्वरित पन्नास टक्के बेरोजगारांना तो खड्डा भरण्याचं काम देऊन पगार दिला तर पुष्कळ जॉब्ज निर्माण होतील. पण व्हॅल्यू क्रिएशन शून्य. (उदाहरण केवळ सुलभीकरणासाठी, सामान्यपणे दिलं जाणारंच उदाहरण आहे)
"तो खड्डा बनावा हे तो माझी इच्छा" अशी वाढीव मागणी बाजारात कोणातरी मोबदला देऊन करत असेल तरच त्या पगाराला अर्थ आहे. एरवी टॅक्सपेयर्सच्या खिशातून पैसा त्या बेरोजगार लोकांना थेट अनुदान म्हणून देणे हाच प्रकार झाला. अशी कृत्रिम मागणी बनवून सरकारने स्वतःच बाजारात (टॅक्सपेयर्सच्या इच्छेविना पण त्यांच्या पैशांतून) स्युडो ग्राहक बनून उभे राहण्यापेक्षा थेट बेकारभत्ता द्यावा. नाटक कशाला?
30 Jun 2019 - 1:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
... म्हणून या आकड्यांची दोन-तीन दशके किंवा जास्त जुन्या आकड्यांशी (सामाजिक बदल सोडून) तुलना करता येणार नाही.
30 Jun 2019 - 2:48 pm | मदनबाण
हे ठरविण्यासाठी कोणता वयगट विचारात घेतला आहे हे फार महत्वाचे आहे.
ह्म्म, हे मात्र खरंय ! बाकी मी जेव्हा आजुबाजुला बघतो तेव्हा माझे काही मित्र जे कॉलनीत,कंपनीत किंवा इतरत्र आहेत ते अविवाहित असल्याचे पाहतो. एक हापिसातला मित्र जॉबचा स्ट्रेस आणि लग्न न होण्याचे फस्ट्रेशन सहन न होउन देश सोडुन गेलेला आहे.
पाणी, नोकरी आणि छोकरी हे गंभीर मुद्दे झालेले आहेत. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
30 Jun 2019 - 1:43 pm | Rajesh188
ऑटोमेशन खूप प्रश्न निर्माण करेल .
ड्रायव्हर सहज उपलब्ध असताना आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असताना .
सेल्फ drive car chi गरजच नाही त्या मुळे खूप लोकांच्या नोकऱ्या जातील .
विविध वस्तूंचे प्रोडक्शन करणारे कारखाने माणसा चा उपयोग न करता यंत्राचा वापर केला तर खूप लोक बेरोजगार होतील .
असे सर्वच क्षेत्रात बेरोजगारी वाढेल .
लोक स्वतःच्या गरजा कमी करायला सुरावत करतील नोकरी नाही पैसे नाहीं तर ते कमीत कमी गरजेच्या वस्तू खरेदी करतील .
मग जे विशाल प्रोडक्शन यंत्रा मार्फत केले जाईल ते खरेदी कोण करणार .
आज समजा १०० साबण विकले जातात ते २५ च विकले जातील म्हणजे साबण उत्पादन बंद करावे लागेल .
लोकांची purchasing power Kami झाल्यावर आर्थिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल हा सुद्धा धोका आहेच की .
बेरोजगार लोक कसे ही सुखी भाकरी वर जागतिक नाही तर गुन्हेगारी कडे वळतील .
असंख्य अस्वस्थ तरुण असलेल्या जगात कायदा सुव्यवस्था टिकवणे एक आव्हान बनेल .
जगाच्या बऱ्याच भागात असुरक्षित वातावरण निर्माण होईल
30 Jun 2019 - 1:52 pm | गवि
चक्र वास्तवात याच्या बरोब्बर उलट्या दिशेत फिरतं. मुद्दे अगदी हेच. ते योग्य. पण परिणामांचा अंदाज उलट दिशेने केलेला दिसतो.
यंत्राने केलेला साबण बनवायला जो पर युनिट खर्च येतो त्यानुसार तो स्वस्तात विकता येतो आणि अधिक लोक तो घेऊ शकतात. याउलट हाताने बनवलेले साबण लेबर कॉस्टने इतके महाग पर युनिट पडतात की ते फार कमी एलिट क्लासलाच परवडू शकतात.
इथे साबण ऐवजी वस्त्र किंवा अन्य काही ठेवून पहा.
अतिरेक अयोग्य, तारतम्य हवं हे सर्व मान्यच. पण मनुष्य श्रम बळेच वापरात आणायचे असं ठरवलं तर त्यात "व्हॅल्यू क्रिएशन" होत नाही. हा मुद्दा सहज चर्चेत नोंदवला जातच नाही आणि तोच मूलभूत आहे.
30 Jun 2019 - 2:13 pm | Rajesh188
ऑटोमेशन मुळे आर्थिक मंदी येईल ही भीती निराधार आहे असे तुम्हाला सुचवायचे आहे का.
वस्तू खरदी करणाऱ्या लोकांच्या संख्येत घट होणारच नाही ह्याला काय आधार आहे
30 Jun 2019 - 2:55 pm | मदनबाण
How robots change the world
We estimate up to 20 million manufacturing jobs are set to be lost to robots by 2030.
In Middle of Trade War, America’s Busiest Port Gets Ready for Robots
Exclusive: Amazon rolls out machines that pack orders and replace jobs
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
30 Jun 2019 - 3:41 pm | गवि
ही अतिरेकाची , एका टोकाची उदाहरणं असू शकतील. त्यामागेही काही हिशोब असेल.
पण एकूणात एफिशियन्ट आणि वेगामुळे किफायतशीर उत्पादन पद्धती उपलब्ध असताना केवळ अधिक माणसांचे श्रम उपयोगात आणता यावेत म्हणून इनएफिशियन्ट मार्गाने उत्पादन करणं यातून तेजी किंवा कोणतीही प्रगती अजिबात होत नाही. प्रगती सोडा, खऱ्या अर्थाने "पगार"ही नसतो तो.
30 Jun 2019 - 4:00 pm | गवि
तू (एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून हं मबाशेठ) कार, बस, रिक्षा, बाईक ऐवजी चार मजुरांनी उचललेल्या मेण्यातून / पालखीतून ऑफिसला जाशील का? त्यांना किमान रोजगाराच्या नियमानुसार समजा 300 रुपये प्रत्येकी रोज द्यायचा आहे. (किंवा 50 देतो, घेणार तर घे, असं म्हणून त्यांचं शोषण करणे हा दुसरा मार्ग) म्हणजे 1200 रुपये देऊन रोज ऑफिसला जाशील का? (अंतर जास्त असेल तर 10 - 10 किमीवर मजुरांची टीम बदलेल. त्यांना पुन्हा 1200 रुपये). ऑफिसात पोचायला सहा तास आणि परतायला सहा तास.
आठ रोजगार उत्पन्न होतील. एकट्या तुझ्यासाठी.
तुला 1200 रोज प्रवासाला परवडतील इतका उत्तम पगार तुला देणारी कंपनी कोणत्या क्षेत्रात असेल ? तिथेही भरपूर मानवी श्रम वापरून उत्पादन होत असेल तर तू जे उत्पादन कंपनीसाठी करशील त्यातून ते 1200 वाढीव वसूल व्हावे लागतील. म्हणजे तुझ्या कंपनीची उत्पादने अगदीच गडगंज श्रीमंत अशा 2 टक्के लोकांसाठी असतील. सध्या ते विसरून जाऊ.
आता हे काल्पनिक उदाहरण उलट बाजूने पाहू.
हीच मेणा वाहतूक सर्व्हिस त्यातल्या एका मेणावाहक मजुराला खुद्द वापरायची आहे असं समजू. (आयुष्यात प्रगतीचं लक्षण म्हणून किंवा कधी गरज पडली म्हणून) तर तो 1200 रुपये देऊन ती घेऊ शकेल? नाही.
(त्यातून तो 300 या न्याय्य रोजगाराऐवजी तुम्ही 50 रुपयांत पिळून घेतलेला मजूर असेल तर त्याला कोणतीच सेवा वस्तू परवडणार नाही.)
इथे "चरखा, कापूस सूत, हातमाग, खादी" विरुद्ध "यंत्रमाग, कृत्रिम धागा रेयॉन, वेगवान उत्पादन"
किंवा अन्य काहीही कल्पून बघ.
वस्त्रनिर्मितीत जास्त मानवी श्रम वापरायचे (पगार देता येण्यासाठी) तर तो पगार इतक्या मजुरांना देऊन बनलेली खादी खुद्द त्या मजुरांनाच परवडणार नाही आणि सामान्य लोकांनाही. तिला मागणी कशी असेल.
ही मंदीची केस बनते.
यंत्रमागाने कमी लोकांना रोजगार मिळेल. पण कापड खूप मोठ्या लोकसंख्येला परवडेल अशा दरात मिळेल. त्याला मागणी असेल. असे व्यवसाय स्वतःसोबत अन्य रोजगार संधी उत्पन्न करतात.
विषय गहन आहे.
30 Jun 2019 - 3:45 pm | गवि
योग्य त्या अर्थपूर्ण आणि सध्या असलेल्याच नोकऱ्या अर्धवेळ करणे, अधिक कर्मचारी नेमणे आणि पगार विभागून जास्त लोकांना देणे हा मार्ग त्यातल्या त्यात प्रभावी ठरु शकतो.
जिथे पगार किमान गरजेच्या दुपटीहून जास्त आहेत तिथे हे शक्य आहे. किमान पुढील नवीन भरतीच्या वेळी.
पण मग भरपूर पगार मिळवणारे लोक हे सहन करणार नाहीत. तिथे सामूहिक हित वगैरे विचार फालतू ठरतील.
30 Jun 2019 - 9:27 pm | मदनबाण
गवि सेठ नविन तंत्रज्ञान येत राहते आणि आधीचे जाते त्यानुसार माणसांचे काम देखील जाते आणि नविन काम देखील उपलब्ध होत राहते, परंतु गेल्या काही वर्षात मात्र तंत्रज्ञान बदलण्याचा काळ त्याचा अपडेट होण्याचा कालावधी देखील झपाट्याने बदलला आहे आणि बदलतो आहे ! अगदी रोजच्या मोबाइल वापरात देखील हल्ली अॅप्स ना देखील आता जवळपास रोज अपडेट अव्हेलेबल असतो.
पुर्वी कंपनीत इमेलसाठी लोटस डॉमिनो सर्व्हर वापरला जायचा आणि लोटस इमेल क्लायंट असायचे मग आउटलुक मेल क्लायंट आले आणि मायक्रोसॉफ्ट सर्व्हर्स आले, परंतु टेक्नॉलॉजी बदलुन सुद्धा त्यावर काम करणारी माणसे कमी झाली नव्हती फक्त फंक्शन्ल चेंज झाला ! मात्र क्लाउड आल्यावर अख्खा सेटअप बदलला आणि कंपनीच्या आत असलेल्या सर्व्हस पासुन डेटा सेंटर / डेटा बेस हे सगळच क्लाउडवर मुव्ह झालं आणि कंपनीच्या मेलिंग सिस्टिमसाठी असलेला अख्खा सेटअप त्यांच्या माणसां सकट गायब झाला ! म्हणजेच या सेटअप मध्ये असलेल्या सगळ्यांच्या नोकर्या गेल्या.
ट्रक मधुन सामान भरण्याचा किंवा काढण्याचा अगदी लो-स्किल जॉब देखील आता नष्ट होणार आहे, बर्गर बनवणारा रोबोट बाजारात आहे आणि रोबो वेटर देखील हाजिर आहे.
Robots Edge Closer to Unloading Trucks in Amazon-Era Milestone
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah
30 Jun 2019 - 4:54 pm | चौकटराजा
आज एक व्हिडीओ गोवा भागातील काजू फॅक्टरी चा पाहिला . सर्व कामे लोक हाताने करीत होते. उलट टर्की मधला काज्यू फॅक्टरी चा ही व्हिडीओ पाहिला . त्यात सर्व कामे यंत्रे करीत होते . माझ्या माहिती प्रमाणे हे काम खूप क्लिष्ट असल्याने त्यात अनेक प्रक्रिया आहेत म्हणून काजू फार महाग आहेत .टर्की मधील काजूचा भाव भारतातील भावाच्या खूपच खाली आहे . मी काम करीत असलेल्या कारखान्यातून सुमारे दहा हजार कामगारांना निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले व कामे यंत्रावर करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले कारण स्पर्धेत टाकून राहायचे असेल तर मालाचा दर्जा तर टिकवावा लागतो सबब प्रक्रिया खर्च कमी करण्यासाठी प्रथम बळी पर्याय असलेल्याचा देण्यात येतो . उदा कारकून मंडळी , शिपाई ई. बागकाम, सिक्युरिटी ई कामे आता सर्रास ठेकेदाराकडून करून घेतली जातात . आज शाळेत प्रवेश घेणार्या इतक्या बाळकांना कोण काम देणार हा प्रश्न माझ्यासमोर सतत पिंगा घालीत असतो.अनेकांनी एका मुलावर ( मुलगा बरे ) समाधान मानण्याचे सुरू केले आहे पण बाकीच्यांचे काय ? खर्च वाढवून अर्थव्यवस्था चालविता येते पण तो काही दीर्घकाळ चालणारा उपाय नव्हे . शेवटी साधनसंपती व मागणी यांनीच मूळ अर्थव्यवस्था बनत असते. आज बँक ,पोस्ट , सरकारी खाती यांच्यात ७० ८० च्य दशकाप्रमाणे भरती होते का ? मानवाचे शरीर ज्याप्रमाणे काही काळ औषधानी ,कृत्रिम प्राणवायूने जगावितां येते पण त्याला जशी मर्यादा आहे तरी अर्थव्यवस्थेला ही .
30 Jun 2019 - 5:48 pm | Rajesh188
स्वतःची बुध्दी असणारी यंत्र फक्त उत्पादन क्षेत्रात च वापरली जातील असे नाही .
माणूस आणि यंत्राच्या कार्य क्षमतेत फरक आहे .मानवाला शारीरिक मर्यादा आहेत .
यंत्र म्हणजे अफाट ताकत आणि परत ती बुद्धिवान पण झाली (आपणच त्यांना बुद्धिवान करतो)तर लष्करात सुद्धा माणसाचे output यंत्र पेक्षा कमी असेल तिथे सुद्धा माणसाची जागा यंत्र घेतील .
पोलिस,न्यायधिष,ड्रायव्हर,pilot, train Che driver,salesman,waitor,asha खूप साऱ्या ठिकाणी माणसेच लागणार नाहीत .
आणि समाजातील खूप मोठा हिस्सा हा निर्धन
होईल .उत्पादने जी निर्माण होतील भले यंत्र वापरून उत्पादित होत असतील पण ती उत्पादने असतील तर माणसा साठी किती ही स्वस्त असली तरी रोजगार च नसलेला समाजाचा मोठा हिस्सा ते खरेदी कशाला करतील .
टूथपेस्ट,साबण,कपडे,चमचमीत अन्न,हे तो नक्की टाळेल कारण ते विकत घेण्याची त्याच्या कडे ताकत च नसेल.
मुंबई मध्ये बरेच फ्लॅट विक्री वाचून पडून आहेत कारण ते विकत घेण्याची ताकत लोकांकडे आहे .
बँके चे कर्ज घेवून ती ताकत ग्रहकडे येते पण त्या फ्लॅट चे खरे मूल्य हे घरेदी किमती पेक्षा खूप कमी असते.१० लाखाचा फ्लॅट चे भाडे २००० रुपये सुद्धा मिळत नाही .उद्या कर्ज फेडले गेले नाही तर ती प्रॉपर्टी विकून बँकेचे पैसे वसूल होवू शकत नाही कारण मुळातच त्याच्या वर असलेले कर्ज खऱ्या मूल्य पेक्षा खूप जास्त असते (एक उदाहरण म्हणून घावे)
30 Jun 2019 - 6:05 pm | Rajesh188
आज आपण ज्या वस्तू रोजच्या जीवनात वापरतो त्याचे उत्पादन यंत्राचा वापर करून केलेला आहे .
कोणती वस्तू स्वस्त आहे बाईक चा विचार केला तर तिची कमीत कमी किंमत ६०००० आहे .
तिचे उत्पादन मूल्य किती असेल २५००० रुपये .
मग हा जो फरक आहे तो फायदा म्हणून मोजला जातो .
आणि तो फायदा मधल्या साखळीत कमी प्रमाणात विभागला जातो आणि उत्पादन करणाऱ्या ला जास्त प्रमाणात मिळतो एकच व्यक्ती कडे साधनसंपत्तीचा खूप मोठा हिस्सा जातो .
आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून काही ठराविक लोकांकडे खूप मोठी संपत्ती जमा झाली आहे .
उत्पादन खर्च वाढतो म्हणून कामगार नकोत हे कारण पटत नाही .२० percent होणारा फायदा ४० percent झाला पाहिजे म्हणून कामगर नकोत हे खरे कारण आहे असेच मला वाटत
30 Jun 2019 - 6:20 pm | गवि
हा मुद्दा / विचार अयोग्य नाही. पण केवळ कामगारांचा पगार हाच उत्पादनखर्च वाढण्यामागचा घटक नाही. उत्पादकता, वेग, volume, अचूकता, प्रमाणितपणा अशा अनेक गोष्टींनी उत्पादन घेण्यातली किफायत ठरते.
दोन टोकं आहेत , दोन्ही टोकाच्या परिस्थिती सदोषच. दोरीवर तोल सांभाळत कसरत करत पुढे जावं लागतं.
उजवीकडे तोल जावो किंवा डावीकडे .. कपाळमोक्ष होणारच.
शेवटचा विचार, श्रेय : श्री. राजीव साने (युगांतर पुस्तकाचे लेखक)
30 Jun 2019 - 6:57 pm | चौकटराजा
संपत्तीचे वाटप हा सामाजिक, नैतिक. राजकीय प्रष्ण आहे अर्थशास्त्रीय नाही . एका कडे संपत्ती जमा होते याचे कारण नुसते भांडवल नाही , तर उद्यमशीलता , महत्वाकांक्षा , कल्पकता , संशीधकता व बुद्धी हे ही त्यात येतात . हे सारे गुण एकत्रीतपणे समाजाकडे म्हणजेच सरकारकडे असतील तर अंबानी ,बजाज यांची गरज नाही . पण असे सरकार निदान लोकशाहीत तरी अस्तित्वात नसते.
30 Jun 2019 - 6:50 pm | चौकटराजा
एक सोनोग्राफिस्ट सांगत होते काही वर्षात अल्ट्रा सोनो ग्राफी रोबोच करेल. त्याला निर्दोष शरीर रचनेचे काही शेकडा फोटो पुरविण्यात येतील व तो सर्व स्वतः: करून रिपोर्ट देखील प्रिंट करेल.
30 Jun 2019 - 7:29 pm | Rajesh188
मध्ये काही वर्षा पूर्वी एक बातमी होती
मायक्रोसॉफ्ट ला तिचे पाय windows saftware साठी एका विशिष्ट सॉफ्टवेअर( किंवा हार्डवेअर) गरज लागायची आणि ते दुसरी कंपनी पुरवायची पण तेच मायक्रोसॉफ्ट नी फुकट द्यायला survat केली त्यामुळे ती दुसरी कंपनी बंद झाली .
आणि केस कोर्टात गेल्यावर मायक्रोसॉफ्ट ला दोषी ठरवून मोठा दंड भरावा लागला ही मनोवृत्ती काय दर्शवते .
खूप लोकांना आठवत असेल पाहिले जागोजागी गाड्यांना रंग देण्याची garage होती.
कारण ठराविक वर्षांनी गाडीचा रंग उडायचं आणि त्या मुळे रंग देण्याचा रोजगार स्थानिक पातळीवर निर्माण झाला होता .
आता गाड्यांचे रंग उडतच नाहीत त्या मुळे हा रोजगार बंद झाला
ही सुद्धा जी मनोवृत्ती car उत्पादक कंपनीच्या द्वारे दाखवली गेली त्याच्या पाठीमागे असलेले कारण मायक्रोसॉफ्ट chya उदाहरणातील कारण एकच आहे .
मी सर्वात मोठा takatwan व्यक्ती झालो पाहिजे .
आणि ह्या मुळे बऱ्याच क्षेत्रात स्वयं रोजगार निर्मिती बंद झाली आहे .
मोठ्या कंपन्या पैसे chya जोरावर एकाधिकार शाही गाजवत आहेत
30 Jun 2019 - 7:48 pm | मराठी कथालेखक
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ? कारचे रंग उडत रहायला हवेत ? रोजगार निर्मिती व्हावी म्हणून मुद्दम कमी दर्जाची उत्पादने बनवून विकावीत ?
काहीही हं राजेश :)
30 Jun 2019 - 7:54 pm | मराठी कथालेखक
Automation चे बरे (चांगले, स्वस्त उत्पादन) वाईट (रोजगार जाणे) परिणाम आहेतच पण टोकाचे Automation एकदम एका टप्प्यात होवू शकणार नाही. अनेक कंपन्यांकडे त्याकरिता लागणारे भांडवल नसेल तर ज्यांच्याकडे असेल त्याही खप , बाजारातली स्थिती याचा अंदाज घेत सावध पावले टाकतील. driver less car तर २०३० पर्यंत भारतासारख्या देशात रस्त्यांवर अवतरतील हे अशक्य वाटते. विमानाच्या पायलटला जरी Automation ने replace केले तरी खूप झाले. पायलटचा पगार प्रचंड असतो..
30 Jun 2019 - 8:32 pm | Rajesh188
ऑटोमेशन मुळे रोजगार जातीलच असे पण नाही .
फक्त हे कोलीत माकडाच्या हातात नसावे.
घरात किंवा ऑफिस मध्ये विजेचे दिवे,साऊंड सिस्टीम,पडदे बंद किवा चालू करण्यासाठी मोठ्या शहरात ऑटोमेशन चा वापर केला जातो.
ऑटोमेशन करणाऱ्या कंपनीचं app mobile वर डाउनलोड करून त्या मार्फत तुम्ही घरातील विजेचे दिवे,साऊंड system , पडदे ह्या मोबाईल मार्फत नियंत्रण ठेवू शकता .
फक्त ह्या कामासाठी नोकरी कधीच उपलब्ध नव्हती .
पण ऑटोमेशन मुळे रोजगार निर्मिती झाली .
System installation साठी ,ती repair करण्यासाठी माणसाची गरज लागली .
म्हणजे ज्या क्षेत्रात रोजगार च नव्हतं तिथे रोजगार निर्माण झाले
असे सुधा होवू शकत ऑटोमेशन मुळे रोजगार कमी न होता रोजगार चा प्रकार बदलू शकतो
30 Jun 2019 - 8:41 pm | वामन देशमुख
प्रश्न: अधिकाधिक यांत्रिकीकरणामुळे मानवाला रोजगार शिल्लक राहील का?
उत्तर: नक्कीच राहील, एवढेच नव्हे तर रोजगार वाढतच जाईल.
दोन प्रकारे या उत्तराचे स्पष्टीकरण देता येईल -
१. ऐतिहासिक दृष्टीने -
ज्या दिवशी मानवाने पहिला दगड उचलून प्राण्याची शिकार केली त्या दिवसापासून खरंतर यांत्रिकीकरणाला सुरुवात झालीे. तेव्हापासून आजवर, आर्थिक मंदीच्या काही क्षणभंगुर लाटा वगळता मानवी रोजगाराला मागणी सतत वाढतच राहिली आहे. अर्थात अपेक्षित स्किल-सेट अधिकाधिक वेगाने बदलत राहिलेला आहे ही बाब वेगळी.
२. तार्किक दृष्टीने -
वेगवेगळ्या देशांची सरकारे आणि खाजगी कंपन्या या, सध्याच्या जगातील सर्वशक्तिमान entities आहेत आणि त्या लोकांच्या पैशांवर चालतात. लोकांना रोजगार नसेल आणि पर्यायाने त्यांच्याजवळ पैसा नसेल तर ते कर भरु शकणार नाहीत आणि वस्तू सेवा विकत घेऊ शकणार नाहीत; पर्यायाने अनुक्रमे सरकारे आणि कंपन्या बंद पडतील. त्यामुळे रोजगारविहीन समाज अशी परिस्थिती या दोन्हीही entities (सर्वशक्तिमान असल्यामुळे) येऊ देणार नाहीत.
30 Jun 2019 - 8:50 pm | वामन देशमुख
Afterthought -
कदाचित असंही होईल, रोजगार-विहीन लोकांना निरुपयोगी ठरवून नष्ट केले जाईल.
... पण आजवर असं कधी झालंय का?
1 Jul 2019 - 7:36 am | कुमार१
आणि चर्चा. सर्वांना धन्यवाद !
1 Jul 2019 - 8:34 am | चौकस२१२
यांत्रिकीकरणामुळे नोकऱ्या जातील किंवा अजिबात जाणार नाहीत हि दोन टोकं शक्य नाहीत
अर्थात हे सर्व हे यांत्रिकीकरण कोणत्या समाजात ( देशात) आणि कोणत्या क्षेत्रात घडत आहे यावर अवलंबून नाही का? सर्वांसकट ( ब्लॅंकेट स्टेटमेनेट) करणे कितीपत योग्य आहे?
कोणता देश / समाज असा जर विचार केला तर : सर्वसाधारण ढोबळ मानाने असे म्हणता येईल कि जिथे अति लोकसंख्या आणि गरीबी असे दोन्ही आहे तिथे यांत्रिकीकरणाचा त्रास जास्त होणार, कितीतरी उदाहरणार्थ : इमारतीकचे स्लॅब करण्यासाठी घमेलं आणि बांबू च्या शिड्या ( SCAFOLDING ) वापरून शेकडोंनी रोजगार कि काँक्रिट पंप वापरून थोड्यांना रोजगार?
विटा भट्टीतून विटा पॅलेट वरून वाहतूक करून न्यायाच्या कि अख्खा ट्रक मजुरांनी नि डॉक्व्यावरून वाहवायच्या?
काही ठिकाणी यांत्रिकरण हा उत्तम पर्याय असतो पण काही ठिकाणी नाही
प्रगत देशात बहू उत्पादन क्षेत्रात ( मास प्रोडूकशन ) एखाद्या गोष्टीला चकचकीत पणा आणण्यासाठी ते हाताने घासावे लागते त्याला ताशी मनुष्यबळ दराने करायचे तर परवडणार नाही पण असे पोलिश करायचे मात्र स्थानिक च मग करणार कसे? [अर्देशातून अख्खा सुटत बग आणणे काही कारणाने शक्य नाहीये असे असेल तर?
उदाहरण :
- दरवाजाचे हॅण्डल; ( मूठ) झिंक ओतणे ( डाय कास्टिंग )> त्याचे मशीनिंग करणे > त्याला पॉलिशिंग करणे आणि त्याला मुलामा ( प्लेटिंग ) प्लांट च्या रॅक वर लावणे हे सर्व विविध रोबो वापरून केले जाते,
- परंतु या डाय कास्टिंग चा जो साचा असतो त्याला आतून जो ठराविक दर्जाचा चकचकीत पणा लागतो तिथे विविध प्रकारच्या पोलिश कागद आणि फाईल वापरवाय लागतो
त्याचे यांत्रिकरण अजून अवघड आहे तिथे टूल मेकरच लागतो.
यांत्रिकीकरण अर्थात हे काही फक्त उत्पादन क्षेत्रात च आहे असे नाही , वैद्यकीय , रचना ( DESIGN ) क्षेत्रात हि होत आहे
एक मित्र यूरोपात अति उच्च ( फेरारी, एरबस, मर्सिडिस ) वगैरे लोकांबरोबर काम करतो, मेकॅनिकल DESIGN मध्ये , गाडीच्या वायपर कुठे असावा याचे नियम हे गोळा करून त्या "निर्णयाचे" यांत्रिकरण केले आहे,
अशी अनेक उदाहरणे आहेत
आधी लोकांनी यावर केलेली सर्व चर्चा रोचक आहे ,
2 Jul 2019 - 9:18 am | चौकटराजा
एका अंदाजानुसार ( आत्ता नक्की संदर्भ देता येत नाही ) २१३० पर्यंत जगातील ४० टकके लॊकांना आपला जॉब गमवावा लागेल ! माझ्या मते अमेरिका फर्स्ट ही त्याची एक सुरुवात आहे . ब्रिटन ला बाहेर पडायचे आहे याचा संबंध सर्व्हायव्हल शी असू शकेल . १९४० ते २०१० या काळात अनेक लोक हे फक्त कारकुनी स्वरूपाची कामे करीत होते. त्या पैकी अनेक जागा आता भरल्या जाणारच नाहीत . अर्थात संगणक आल्यावर स्टेशनरी , प्रिंटर यांचा व्यवसाय निर्माण झाला असे प्रत्येक क्षेत्रात होऊन काही प्रमाणात रोजगाराची शक्यता चालू राहिलच यात शंका नाही . त्यामुळे यांत्रिकीकरणामुळे नोकऱ्या जातील किंवा अजिबात जाणार नाहीत हि दोन टोकं शक्य नाहीत या तुमच्या विधानाला मी दाद देतो. धान्य महाग झाले तर मासेमारी जोरात येईल व अन्नास पर्याय उत्पन्न होईल असेही काहीतरी घडेल . आपण म्हणता त्यानुसार बेकारीची कुऱ्हाड ही कोणत्या देशावर पडेल हे ही महत्वाचे आहेच . जिथे लोकसंख्या बेसुमार आहे तिथे लोकांना कमी मुले निर्माण करणे किंवा परदेशी स्थलांतर करणे एवढेच उपाय राहातील . पैकी परदेशी नागरिकत्व मिळविणे म्हणजे काही मेथीची भाजी आणणे नव्हे . आता विकसनशील देशानाही यांत्रिक प्रगती पासून फारकत घेऊन मुद्धामहोऊन रोजगार टिकविणे सर्रास शक्य होणार नाही . वाढत्या लोकसंख्या च्या हिशेबाने जरी भारतात ए टी एम आली असली तरी त्यात काही आर्थिक फायदा आहे की नाही हे बँकेचे कॉस्टिंग तपासून पाहिले जाईलच . एकूणात कॉस्ट अकौंटन्सीचा जोर सर्व ठिकाणी राहाणार . त्याचा परिमाण रोजगारावर होणार .
2 Jul 2019 - 9:19 am | चौकटराजा
वर २१३० ऐवजी २०३० असे वाचावे !
1 Jul 2019 - 10:43 am | Rajesh188
एक माणूस फॅक्टरी असू नाही तर ऑफिस विविध प्रकारची कामे करू शकतो .
तो साफसफाई करू शकतो ,ड्रायव्हिंग सुधा करू शकतो,computer var kam sudha Karu शकतो.
पण ही सर्व काम करायला विविध प्रकारची यंत्रे लागतील.
माणूस हा विविध काम करण्या बाबत रोबोट chya खूप पुढे आहे .
हे माणसाचे बलस्थान च आहे
1 Jul 2019 - 6:54 pm | स्वधर्म
बर्याच दिवसांनी एक सकस चर्चा झाली. सर्वांनी खूप चांगले मुद्दे मांडले अाहेत. हा विषय युवाल हरारीच्या होमो ड्युअाॅस या पुस्तकात अतिशय सर्वंकषपणे मांडलेला अाहे. त्यात त्याने एक ‘यूसलेस’ क्लास तयार होईल अशी शक्यता वर्तवली अाहे. अायुष्याचा अर्थ काय? हे नव्या पिढीला सतत शोधत रहावे लागेल. तत्वज्ञान हा विषय अात्तापर्यंत खूप लोकांनी अाॅप्शनला टाकला होता, तो महत्वाचा ठरू शकेल असे तो म्हणतो. अत्यंत वाचनीय पुस्तक.
2 Jul 2019 - 6:40 pm | Rajesh188
यांत्रिकी करण हे मानवी सुखासाठी आहे .
पण त्या मुळे यंत्र माणसालाच replace Karu लागली तर मानव जातीचा फायदा न होता खूप मोठा तोटा होईल .
ही अस्वस्थ लोक बाकी संपन्न लोकांना सुखाने जगू देणार नाहीत .
त्या साठी गरीब हटाव ही मोहीम हाती घ्यावी लागेल आणि त्यात बेरोजगार गरीब जिंकेल की यांत्रिकारण चे समर्धक जिंकतील हे काळच ठरवेल.
यांत्रिकी कारण पर्यावरणाची नक्कीच हानी करेल.
निसर्ग ग्रीन हाऊस gas chya दुष्परिणाम मुळे
मानव वर संकटाची अनेक प्रसंग आणेल .
आणि त्या पुढे मानव कधीच जिंकू शकणार नाही.
किती ही प्रगत झाले तरी ऑक्सिजन,पाणी, अन्न हैच मूलभूत गरजा असतील .
आणि त्या गरजा पूर्ण होण्यासाठी निसर्ग शिवाय कोणताच मार्ग नसेल .
दलदली मध्ये माणूस जेवढं बाहेर निघायचं प्रयत्न करतो तेवढं जास्त तो दलदली त फसतो अशी अवस्था माणसाची होईल .
विविध रोग, व्हायरस चे आक्रमण,असे विविध अडचणी येतील .
त्या मुळे enough is enough ase समजून वाटचाल करायला हवी
3 Jul 2019 - 2:23 pm | उपयोजक
ज्या संस्थेतून शिकला ती निकृष्ट दर्जाची आहे की याच्या अपेक्षाच जास्त होत्या?
https://www.loksatta.com/desh-videsh-news/iit-hyderabads-student-suicide...
3 Jul 2019 - 7:37 pm | झेन
संस्था निकृष्ट म्हणणे जनरलायझेशन होईल.
“Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference.”
हे शिकवल पाहिजे, कुणाचाही असा जिव जाणं.....
3 Jul 2019 - 7:50 pm | गवि
इतक्या मोठ्या संस्थेत पोहोचू शकलास, लाखात एक संधी मिळाली, आईबापांनी खूप खस्ता खाल्ल्यात, आता सर्व आशा तुझ्यावर आहेत...
परतीचे दोर कापलेत, ... ऊर्फ इथून पुढे हरण्याचा , कमी पडण्याचा ऑप्शन तुला शिल्लकच नाही..
अशा परिस्थितीची इतकी खात्री मनोमन पटली असावी की पूर्ण एकटा पडून हाराकीरी केली असावी. इंग्रजी बातमीत दिलेल्या मजकुरानुसार हेच जाणवतं. इतकी भारी संस्था, इतके भारी लोक इ इ. म्हणजे असं सर्व असूनही मी घरच्यांना यश देऊ शकलो नाही अशी अपराधी भावना जाणवते. इतर साध्या कॉलेजपेक्षा आय आय टी वगैरे संस्थेत त्या संस्थेच्या नावाच्या दबदब्यामुळे हे ओझं "पॉईंट ऑफ नो रिटर्न"ला पोचत असावं.
अनेक मेडिकल स्टुडंट्सबाबतही असं जाणवतं बातम्या वाचून.
4 Jul 2019 - 6:54 pm | उपयोजक
https://www.moneycontrol.com/news/technology/auto/job-loss-series-part-1...
https://www.moneycontrol.com/news/business/economy/job-series-part-2-no-...
https://www.google.com/amp/s/www.moneycontrol.com/news/business/job-seri...
https://www.moneycontrol.com/news/business/companies/job-series-part-4-h...
14 Feb 2020 - 2:02 pm | दीपक११७७
मुळात कोणतीही activity न करता, काय करू, सांगाल ते करतो असे म्हणणारे बरेच आहेत, पण प्रत्यक्षात काम करतांना मनलावुन किंवा चिकाटीचा खुप अभाव असतो.... असो
आश्या तरूणांना एकच सल्ला देतो, जे काम त्यांना आवडतं त्या कामाची सखोलं माहिती घ्यावी त्याच मास्टर की मिळवावी (pg degree नव्हे ......निपुनता) , मग त्यासाठी जेथे जावे लागेल तेथे जावे, then after money will start following him
सध्या इतकचं