मराठीतील एका नव्या आणि कौतुकास्पद उपक्रमाची अमेरिकेतील मिपाकरांना माहिती व्हावी म्हणून लिहितोय.
मटा मधील बातमी वाचल्यानंतर मी पहिल्या दृक्-श्राव्य दिवाळी अंकाच्या डिव्हीडी सेट्स च्या खरेदीसाठी आवर्तन ची चौकशी केली असता, मी अमेरिकेत सध्या वास्तव्यास असलेल्या (South Eastern US) भागात त्यांचे डिस्ट्रिब्युटर्स नसल्याचे त्यांनी कळवले, व मी मदत करू इच्छित असल्यास येथील महाराष्ट्रीय लोकांसाठी काही डिव्हीडी सेट्स पुण्याहून पाठवण्याची तयारी दर्शवली.
मोहन आगाशे यांच्या संपादकत्वाखाली निर्मित झालेले दोन डिव्हीडी चे हे डिव्हीडी सेट्स प्रत्येकी १५ डॉलर्स किंमतीचे आहेत. कालच हे डिव्हीडी सेट्स माझ्याकडे पोहोचले, आणि मी त्यातील पहिली अडीच तासांची डिव्हीडी माझ्या कुटुंबियांसोबत आज एकाच बैठकीत पाहिली. यातील कार्यक्रमांची सविस्तर माहिती त्यांच्या संस्थळावर मिळेलच, पण आम्हा सर्वांना तरी ही डिव्हीडी आवडली, विशेषतः मला वाटतं की बाबा आमट्यांच्या कार्यावरील डॉक्युमेंटरी मध्येच माझे १५ डॉलर्स वसूल झाले. इतरही बहुतांश कार्यक्रम प्रेक्षणीय आहेत.
माझ्या आसपासच्या कुटुंबियांसाठीचे डिव्हीडी सेट्स सोडून काही मोजकेच सेट्स माझ्याकडे उपलब्ध असू शकतील, तेंव्हा अमेरिकेतील मिपाकरांना व त्यांच्या मराठी आवडणार्या इतर परिचितांना हे डिव्हीडी सेट्स हवे असल्यास व्य नि द्वारे मला कळवावे. म्हणजे त्याचा १५ डॉलर्सचा मोबदला आवर्तन पर्यंत आणि सेट्स पाठवण्याचा स्थानिक पत्रखर्च माझ्यापर्यंत ;) कसा पोचवायचा ते कळवेन. माझा आवर्तनच्या प्रवर्तकांशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही, आणि मी हे केवळ आधी लिहिल्याप्रमाणे मराठीतील कौतुकास्पद उपक्रमाला माझा हातभार लागावा या भावनेने करतो आहे, हे कृपया लक्षात घ्यावे.
प्रतिक्रिया
6 Nov 2008 - 10:37 am | मुक्तसुनीत
तुम्हाला पाठवतोय. त्याद्वारे पुढील उलाढाल करू...
6 Nov 2008 - 11:20 am | ऍडीजोशी (not verified)
ज्यांना ही डि. वि. डि. हवी आहे त्यांनी ती क्रुपया विकत घ्या. एकाच डि. वि. डि. च्या कॉपी मारून मित्र मंडळींमधे वाटू नका :)
6 Nov 2008 - 11:38 am | इनोबा म्हणे
ज्यांना ही डि. वि. डि. हवी आहे त्यांनी ती क्रुपया विकत घ्या. एकाच डि. वि. डि. च्या कॉपी मारून मित्र मंडळींमधे वाटू नका
एड्या भो*** विनंतीच्या नावाखाली लोकांना आयडीया देतोस. (ह.घे रे!)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
6 Nov 2008 - 11:45 am | ऍडीजोशी (not verified)
न्हाय रे इन्या. पन ह्यो झ्याक उपक्रम आहे. त्याची पायरसीमुळे वाट लागू नये इतकीच विच्छा हाय :)