.

फ्लॅट विकणे बाबत

Primary tabs

अश्विनी मेमाणे's picture
अश्विनी मेमाणे in काथ्याकूट
31 May 2019 - 2:15 pm
गाभा: 

आमचा एक फ्लॅट आहे जो आम्ही बिल्डर कडून घेतला होता. या फ्लॅटवर SBI बँकेचे लोन आहे.
ज्या व्यक्तीस आम्ही फ्लॅट विकतोय तो विजया बँकेचे लोन करणार आहे. त्यांच्या बँकेच्या डिमांड प्रमाणे आम्ही sale to agreement केले आहे. जेणे करून ते लोन करून देतील. त्या व्यक्तीचे own contribution आम्हाला मिळाले आहे. विजया बँक आता आमच्याकडे बिल्डर कडून फ्लॅट घेताना ज्या receipt मिळाल्या त्याचे ओरिजिनल मागत आहे. झेरोक्स आधीच दिलेली आहे. तर त्या ओरिजिनल receipt खरंच गरजेची आहे का? आम्ही SBI लोन केले तर तेव्हा त्यांनी त्या मागितल्या नाहीत. SBI लोन असूनही विजया बँक ने भरपूर वेगवेगळे documents मागितले. आपल्या मधली जाणकार मंडळी सांगू शकतील का कि आम्ही paymnet केलेल्या recipt लोनसाठी गरजेच्या आहेत काय?
धन्यवाद

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

31 May 2019 - 3:04 pm | चौकटराजा

दुर्दैवाने भारत देशात सर्व बँका साठी सारखी प्रणाली नाही सबब असं बी आय व विजया बँक यांची तुलना करण्यात मतलब नाही !

हस्तर's picture

31 May 2019 - 3:06 pm | हस्तर

त्या ओरिजिनल receipt खरंच गरजेची आहे का

हो
प्रत्यक्ष बँकेचा वेगळा क्रिटेरिया आहे

उपेक्षित's picture

31 May 2019 - 4:41 pm | उपेक्षित

हो मूळ पावत्या बंधनकारक आहे तुमच्या वेळी कदाचित तुमच्या बिल्डरने पूर्ण फाईल आधीच अप्रूव करून घेतली असेल आणि बँकेला direct (परस्पर) दिल्या असतील, माझ्या flat च्या वेळी असेच केले होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2019 - 10:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

दर बँकेचे नियम वेगवेगळे असू शकतात. परंतू, लोन ट्रान्सफरसाठी अनेक बँकाची (पहिल्या बँकेने कर्जप्रक्रिया पुरी केलेली असल्यामुळे) तुलनेने फार सोपी प्रक्रिया असते. तुम्ही इतर दोन-तीन बँकांकडॅ चौकशी करावी हे उत्तम.

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2019 - 1:34 pm | चौथा कोनाडा

हाडेफाका ( HDFC ) बँके कडून ऋण घेताना त्यांनी मूळ पावत्या घेतल्या होत्या.
ऋण परत केले तेंव्हा त्या पावत्या स कत सर्व कागदपत्रे सुस्थित एका पाकिटात बंद करून दिली होती.

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2019 - 1:35 pm | चौथा कोनाडा

*सकट