ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
29 May 2019 - 3:16 pm
गाभा: 

"ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" हे अनेक अंकी दीर्घ नाटक आहे.

ते जेवढे ताणणे शक्य आहे तेवढे ताणत नेले जाईल. त्या कालखंडाचा उपयोग गांधी घराण्याच्या पायाखाली आपले स्वत्व अंथरण्यासाठी थोडासाही विरोध कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी केला जाईल (व त्यांचा नि:प्पात केला जाईल)... आणि सरतेशेवटी अध्यक्षपदाची माळ कोण्या एकाच्या गळ्यात घातली जाईल.

त्या उमेदवारीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत...

१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.

२. राहूल गांधी हे तसेही राजकारणासाठी तयार असलेले/होऊ शकणारे व्यक्तिमत्व नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. आपले हितसंबंध राखण्यासाठी जमा झालेल्या स्वार्थी कोंडाळ्याने जबरदस्तीने बोहोल्यावर उभे केलेले आणि त्यांच्या पढवणूकीप्रमाणे नाचणारे बाहुले बनण्याचा पुरेसा अनुभव घेतल्यावर, हे आपले काम नाही हे त्यांना समजले असावे. त्यामुळे, त्यांना अध्यक्षपदाचा खरोखरचा कंटाळा आला असणे शक्य आहे. उगा पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा फास सतत गळ्याभोवती ठेवण्याऐवजी; स्वच्छंद, जगभ्रमंतीचे, राजकारणतापहीन पण त्याचबरोबर पक्षामुळे मिळणारे फायदे ओरपण्याचे; सुखासिन पूर्वायुष्य त्यांना खुणावत असल्यास आश्चर्य वाटायला नको.

पण तरीही, कॉन्ग्रेस पक्षामुळे मिळणार्‍या मोठेपणा, सत्ता व अर्थकारणाची चावी दुसर्‍यांच्या हाती पूर्णपणे सुपुर्द करण्याइतके ते खुळे नाहीत... आणि त्यांनी तसे करावे म्हटले तरी, त्यांच्या 'मासाहेब' त्यांना तसे करू देणार नाहीत. याशिवाय, ज्यांना स्वबळावर महापालिकेची निवडणूकही जिंकणे शक्य नाही व ज्यांचे सर्वस्व गांधी घराण्याच्या चाकरीवरच अवलंबून आहे असे, 'मासाहेबांचे+युवराचांचे जवळचे शिलेदार', त्यांनी तसे करू नये यासाठी जिवाची बाजी लावतील, हे सांगायलाच हवे काय?

तर मग, युवराज नाही तर पक्षाध्यक्ष कोण होईल? याचे दोन पर्याय होऊ शकतात...

... २.अ) रागांना मनविण्याचे सर्व उपाय थकल्यावर, खुद्द मासाहेबांना गळ घातली जाईल.

* या पर्यायाला रागांचा किंवा जवळच्या शिलेदारांचा विरोध असण्याचा संभवच नाही (काय हिंमत आहे शिलेदारांपैकी कोणी विरोध करण्याची?!). पक्षाध्यक्षपद खुद्द आईच्या हाती असल्यावर, पूर्वीप्रमाणेच दाराआडून पक्षाच्या सत्ता आणि अर्थकारणामध्ये रागांची पाचही बोटे बुडालेली असतीलच !

... २.आ) मासाहेबही थकल्या असल्यास, शिलेदारांपैकी जो सर्वात इमानी, सर्वात नम्र आणि सर्वात मुका (आणि आई-बेटा सोडून इतरांसाठी बहिरासुद्धा) असेल असा एकजण निवडून, त्याला बोहोल्यावर चढवून, रिमोटकंट्रोलने चालवला जाईल. यासाठी, सचीन पायलट, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे, शीला दिक्षित, मीरा कुमार, ए के अ‍ॅथनी, इत्यादी अनेक नावे चर्चेत आहेत (पहिल्या वाक्यात दिलेल्या अटी पूर्ण करणार्‍यांची कमी कॉन्ग्रेसला कधीच भासलेली नाही ;) ) यापैकी, ए के अँथनी, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे हे तिघेही, अनेक कारणांमुळे, गांधी घराण्याशी (खुद्द गांधी परिवारपेक्षा जास्त) इमानी आहेत. त्यांच्यापैकी एक (त्याक्रमाने) निवडला जाईल अशी माझी अटकळ आहे. :)

* या पर्यायालाही मासाहेबांचा किंवा रागांचा विरोध असण्याचा संभव नाही (इतर शिलेदरांच्या विरोधाला विचारतोय कोण?). पक्षाध्यक्षपद रिमोट कंट्रोलने चालणार्‍या बाहुल्याच्या हाती असल्यावर, युपिए१+२ प्रमाणेच दाराआडून, पक्षाची सत्ता आणि अर्थकारण मायलेकांच्याच ताब्यात असेल ! शिवाय, "यश तेवढे आपले आणि अपयश मात्र दुसर्‍याचे" या नेहमीच्याच यशस्वी कॉन्ग्रेसी नाटकाचे प्रयोग, भविष्यातही यशस्वीपणे चालवता येतील, हा फार मोठा फायदा नजरेआड करून चालणार नाही. :)

======

अजून काहीसा चर्चेत असलेला तिसरा पर्याय म्हणजे, प्रियांका गांधी-वाद्रा.

* प्रियांकाशी निष्ठा वाहीलेल्या गटाचे जोरदार प्रयत्न चालू असले तरी, त्यांची ताकद फार कमी आहे आणि त्यांची डाळ शिजणार नाही. याशिवाय, त्या नावाला कॉन्ग्रेसमध्ये महत्व देण्यास खुद्द रागांचा विरोध असल्याचे मागील काही वर्षांच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय, जावयाच्या विक्रमी उपक्रमांमुळे वाद्रा या नावामागे असलेली वादग्रस्तता आड येईल, हेवेसांन. तसेच, गांधी नाव मागे पडून वाद्रा नाव पुढे येण्याची आणि पुढेमागे गांधी मायलेकांचीच गच्छंती होण्याची शक्यता, मायलेकांना (आणि त्यांच्या हुजर्‍यांनाही), परवडणारी नाही. तेव्हा माझ्या मते हा पर्याय सुरुवातीलाच बाद आहे.

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

29 May 2019 - 3:56 pm | श्वेता२४

पृथ्वीराज चव्हाण होतील
का? ते इथे सांगू शकत नाही.

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2019 - 11:31 pm | मराठी कथालेखक

वा वा ..
तुम्ही पण माझ्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थक आहात असे दिसते.. आता खुद्द चव्हाणांची महत्वाकांक्षा कधी जागी होते ते बघायचंं, यावेळी त्यांनी लोकसभा लढवण्यात रस नाही असं सांगितलं..

प्रियांका वडेरा पुढील अध्यक्ष होण्याची पुरेपूर संधी आहे ..

भंकस बाबा's picture

29 May 2019 - 5:22 pm | भंकस बाबा

वर उल्लेखलेल्या इतर नावाना पक्षातंर्गत विरोध आहे.
शिवाय आत्ताच आलेल्या बातमीनुसार रॉबर्ट वाड्राला पोटात ट्यूमर असल्याची माहिती पुढे आलेली आहे. देशसेवा करताकरता आमच्या ह्यांना हा जीवघेणा आजार झाला असा आक्रोश करायला बाईना बरे पडेल.
तरीही रागाला पायउतार नाही होऊ देणार कॉंग्रेसी असेच वाटते.

चौथा कोनाडा's picture

29 May 2019 - 5:40 pm | चौथा कोनाडा


२. राहूल गांधी हे तसेही राजकारणासाठी तयार असलेले/होऊ शकणारे व्यक्तिमत्व नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे.

हे विधान खुप आवडलंय.
लेख आणि समस्या परफेक्ट मांडलीय

काँगीचा यंग लीडरशिप डेव्हलोपमेंट बद्दल काहीच धोरण नाहीय.
आणि याच वेळी भाजपने कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज वापरत, मोदी कार्ड पुढे केले होते,
आता कर्नाटकात तेजस्वी सूर्यासारखा तरणाबांड धडाडीच्या युवकाला संधी देऊन पक्षाची कॉर्पोरेट रोडमॅप आखणी केलीय !
या डायनॅमिक्स मुळे इतर पक्षातले नेतृत्व सुद्धा भाजपाची दारं ठोठावत आहेत.
आता काँगी लोक असला विचार तरी करू शकणार आहेत का ? बरं, कन्हैया छाप सारखे लोक देखील काही प्रभाव पाडू शकलेले नाहीत !
एकंदरीत अशीच ढकल गाडी चालू ठेवतील अन काही कालावधी नंतर काँग्रेस नामशेष होईल यात काही शंका नाही.

भंकस बाबा's picture

29 May 2019 - 5:51 pm | भंकस बाबा

आमेन

सुबोध खरे's picture

29 May 2019 - 6:01 pm | सुबोध खरे

२.अ) खुद्द मासाहेबांना गळ घातली जाईल.
हा पर्याय व्यवहार्य वाटत नाही. कारण कर्करोगासारख्या जीवघेणा आजार झाल्यामुळे मासाहेब फारशा बाहेर पडत नाहीत. तेंव्हा एवढी मोठी जबाबदारी घेण्यास त्यांना वैद्यकीय दृष्ट्या परवानगी मिळेल असे वाटत नाही.

तेजस आठवले's picture

29 May 2019 - 6:09 pm | तेजस आठवले

काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये विलीन करून टाकावी आणि पवार साहेबांना अध्यक्ष करावे.

मम्मी : अरं पप्या बाळा, तू पार्टीबद्दल कायी विचार केलायस का न्हायी?
पप्या : अगा आये, आत्ताच आपुन हरलो आणि लगोलग पार्टी करनं बरं दिसलं व्हय !
भाजप (मनात विचार करताना) : अगं गुनाचं बाळ त्ये रावल्या ! तूच राह बरं का अध्यक्ष परत. लै ह्यूमरस हाईस...

म्हात्रे सर,
हा रिडंडंट धागा काढण्याचे काय प्रयोजन. त्यापेक्षा मस्तपैकी झक्कास प्रवासवर्णन येउद्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2019 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

पूर्वेतिहास आणि आपापली विचारशक्ती वापरून विश्लेषण करून मिपाकरांनी आपापले भविष्यासंबंधीचे होरे बांधावे आणि इथे मांडावे. व्यवहारात ती घटना घडल्यावर आपल्या निर्णयप्रक्रियेचे आणि निर्णयाचे विश्लेषण करावे... हा मस्तं अनुभव असेल आणि तो भविष्यात अनेक वैयक्तिक व सामाजिक निर्णय करताना कामी येईल. इतकाच सीमीत हेतू या धाग्यामागे आहे.

धर्मराजमुटके's picture

29 May 2019 - 7:57 pm | धर्मराजमुटके

काँग्रेसचे पुढील अध्यक्ष श्री. रेहान गांधी असतील.
आदरणीय राहूल गांधीजी लग्न करणार नाही आणि आपले भाचे मा. श्री. रेहान वाड्रा यांना दत्तक घेतील आणि त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवतील.

अर्धवटराव's picture

30 May 2019 - 10:28 am | अर्धवटराव

काँग्रेससारख्या पक्षावर हि वेळ येणारच होती. बर्‍या-वाईट अश सर्वच समाजघटकांच्या प्रचंड मंथनातुन ह्युमन रिसोर्सचा पुरवठा करणारी (रा.स्व.संघाचं योगदान असलेली) यंत्रणा वापरणारी भाजपाची प्रतिस्पर्धी कोण? तर एका परिवाराची लिमीटेड कंपनी असलेली काँग्रेस. सामना या वळणावर येणारच होता. एकानुचालकवर्तीत सिस्टीमची प्रगती आणि अधोगती सारख्याच वेगाने होत असते. भाजपची मातृसंस्था एकानुचालकवर्तीत असली तरी तिच्या शिर्शस्थ स्थळावर पोचायला प्रचंड कस लागतो. किंबहुना हेच तिचं बलस्थान आहे. ते गुण आपोआप भाजपात उतरतात. काँग्रेसची स्थिती नेमकी उलट. कुठल्यातरी स्वरुपात सेवादल टाईप संस्थेचं पुनरज्जीवन झाल्याखेरीज काँग्रेसला गत्यंतर नाहि.

१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.

सध्यातरी हाच पर्याय निवडला जाईल असं वाटतय.

अर्धवटराव's picture

30 May 2019 - 10:28 am | अर्धवटराव

काँग्रेससारख्या पक्षावर हि वेळ येणारच होती. बर्‍या-वाईट अश सर्वच समाजघटकांच्या प्रचंड मंथनातुन ह्युमन रिसोर्सचा पुरवठा करणारी (रा.स्व.संघाचं योगदान असलेली) यंत्रणा वापरणारी भाजपाची प्रतिस्पर्धी कोण? तर एका परिवाराची लिमीटेड कंपनी असलेली काँग्रेस. सामना या वळणावर येणारच होता. एकानुचालकवर्तीत सिस्टीमची प्रगती आणि अधोगती सारख्याच वेगाने होत असते. भाजपची मातृसंस्था एकानुचालकवर्तीत असली तरी तिच्या शिर्शस्थ स्थळावर पोचायला प्रचंड कस लागतो. किंबहुना हेच तिचं बलस्थान आहे. ते गुण आपोआप भाजपात उतरतात. काँग्रेसची स्थिती नेमकी उलट. कुठल्यातरी स्वरुपात सेवादल टाईप संस्थेचं पुनरज्जीवन झाल्याखेरीज काँग्रेसला गत्यंतर नाहि.

१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.

सध्यातरी हाच पर्याय निवडला जाईल असं वाटतय.

अर्धवटराव's picture

30 May 2019 - 10:28 am | अर्धवटराव

काँग्रेससारख्या पक्षावर हि वेळ येणारच होती. बर्‍या-वाईट अश सर्वच समाजघटकांच्या प्रचंड मंथनातुन ह्युमन रिसोर्सचा पुरवठा करणारी (रा.स्व.संघाचं योगदान असलेली) यंत्रणा वापरणारी भाजपाची प्रतिस्पर्धी कोण? तर एका परिवाराची लिमीटेड कंपनी असलेली काँग्रेस. सामना या वळणावर येणारच होता. एकानुचालकवर्तीत सिस्टीमची प्रगती आणि अधोगती सारख्याच वेगाने होत असते. भाजपची मातृसंस्था एकानुचालकवर्तीत असली तरी तिच्या शिर्शस्थ स्थळावर पोचायला प्रचंड कस लागतो. किंबहुना हेच तिचं बलस्थान आहे. ते गुण आपोआप भाजपात उतरतात. काँग्रेसची स्थिती नेमकी उलट. कुठल्यातरी स्वरुपात सेवादल टाईप संस्थेचं पुनरज्जीवन झाल्याखेरीज काँग्रेसला गत्यंतर नाहि.

१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.

सध्यातरी हाच पर्याय निवडला जाईल असं वाटतय.

अर्धवटराव's picture

30 May 2019 - 10:33 am | अर्धवटराव

आमच्या प्रतिसादाची इतकी दखल का घेतय मिपा? चक्क तीनदा पडला प्रतिसाद :ड

सं.मं, कृपया डुप्लीकेट प्रतिसाद डिलीट करावे.

नाखु's picture

30 May 2019 - 10:40 am | नाखु

म्हणतात ते हेच,
आपण संघाचे मूल्य मापन करताना केवळ एका घरातल्या म्हणून नेतेपदी निवडला जातो असं नाही हेच सूचकपणे सांगितले त्याबद्दल कौतुक.
नाहीतर संघ कसा विटाळ असल्यासारखे अस्पर्ष आणि त्याज्य ही भूमिका मांडण्यासाठी मिपावर अहमहमिका लागली असं वारंवार पाहिले आहे

अभ्या..'s picture

30 May 2019 - 11:08 am | अभ्या..

अरे काय लावलंय, संपल्या की निवडणुका.
काय गरज आहे काँग्रेसने कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायला पाहिजे त्याची चर्चा करायची आणि एकूणच काँग्रेस कशी एका कुटुंबासाठीच राबते हे सांगायची? इलेक्शनमध्ये काँग्रेस आली असती तर निदान त्यांचा अध्यक्ष पंतप्रधान बनुन आपल्या आयुष्यावर परिणाम करता झाला असता. त्यांची लायकी जनताजनार्दनाने दाखवली आहेच की. नीट विरोधी पक्षनेतेपदही मिळायची बोंब. हे म्हणजे माधुरी दिक्षीतने आता कुणाला सेक्रेटरी निवडावे पिक्चर मिळवण्यासाठी अशी चर्चा झाली. संपला तो काळ. कुणीही काँग्रेसचे अध्यक्ष झाले तरी फारसा लगेच दिसणारा फरक पडणार नाहीये आणि त्याचा परिणाम आपल्यावर व्हायला तर अजुन वेळ लागणार आहे. जनतेचा कौल मागायचाच असेल तर जनतेने ऑलरेडी त्यांना दिलाय. अजुन कशाला त्यांना सल्ले? काही जणांना सशक्त लोकशाहीसाठी सशक्त विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच हवी असा फुकट कळवळा आलाय. अरे जनतेनेच नाकारलीय ती व्यवस्था तर आता काय उरावर बसवता काय?
आणि मिपावर कशाची अहमहिका कधी दिसली नाही? सध्या चाललीय ही कशाची अहमहिका आहे? बाकी ज्या अस्पर्श संघाचे गुणगान गायले जाते त्याच्या सर्वोच्चपदाच्या नेमणुकासंदर्भात झालीय का कधी चर्चा, किंबहुना ऐकू तरी आलीय का? कोण निवडते त्यांना? कशा बेसिसवर? प्रथम आणि द्वीतीय वगळता बाकी सरसंघचालकाबाबत दहा दहा ओळींचा निबंध लिहिता येईल इतकी तरी माहिती आहे का? आणि निघाले तळी उचलायला.
प्रचार अजुन डोक्यातून उतरायला तयार नाहीये किंवा काही अजुन अपेक्षा आहेत इतकाच अशा धाग्यांचा मतितार्थ. बाकी काही नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 May 2019 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या लेका, २०२४ च्या वरातीत सुद्धा प.नेहरू टू राहुल गांधी आणि साठ वर्षात गाजलेली बिनाका गीत मालातीलच गाजलेली गाणी वाजवल्या जातील. आणि लोक त्याही वरातीत नागीन डॅन्स करुन 'यही बजा' 'हेच लाव' 'बस एवढं एकच गाणं'
'कैसा नै लगाता' 'चल बजा' म्हणतील अशा वेळी तुम्ही कितीही वरातीची गाडी पुढं घ्या म्हटलं तरी गाडी एक इंचही पुढं सरकत नसते. कारण तो उन्मादच तसा असतो .. अशा वेळी आपण गप्प मंडपात जाऊन बसलं पाहिजे असं म्हणावे वाटतं.

ता.क. अवांतर प्रतिसादाबद्दल दिलगीरी आहेच.

-दिलीप बिरुटे
(उन्हाळ्यातल्या पै पाहुण्याच्या लग्नातला त्रस्त पाहुणा)

अर्धवटराव's picture

31 May 2019 - 9:55 am | अर्धवटराव

काँग्रेसच्या वरातीत राहुलबाबाच जर गुढग्याला बाशिंग बांधुन नवरदेव म्हणुन घोडीवर बसला तर नगिन डान्स नक्की होईल.
त्यांच्या वरातीत लाईटींग वगैरे धरायला काहि ठरावीक लोकांची मांदियाळी असतेच. तेवढीच करमणुक.

उपेक्षित's picture

1 Jun 2019 - 1:34 pm | उपेक्षित

अभ्या लेका दंडवत घे, जबरदस्त प्रतिसाद.

मेलेल्याला अजून मारायच्या वृत्तीची मनापासून चीड आली, त्यात मिसळपाव वरील मोजक्या आदर असलेल्या व्यक्ती सामील बघून तर अजून जास्ती खेद वाटला साला.

माहितगार's picture

1 Jun 2019 - 2:36 pm | माहितगार

@उपेक्षित

(कोणत्याही) घराणेशाहीत एवढी भावनिक गुंतवणूक कशी होते ?

( हा प्रश्न दुसर्‍या धाग्यातून्ही माझ्याकडून उपस्थित केला गेलाय त्याच्या पुनरावृत्तीसाठी क्षमस्व)

आणि अभ्या रावांसाठी

...संघाचे गुणगान गायले जाते त्याच्या सर्वोच्चपदाच्या नेमणुकासंदर्भात झालीय का कधी चर्चा..,

संघाच्या सर्वोच्चपदावर सर्वजाती धर्मांना समान संधी असावी असे माझ्याकडून एका मिपा धाग्यात मांडून झाले आहे. इतरांचे माहित नाही पण संघ भाजपाने याचा विस्तार करावा आणि रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ? असे धागेही माझ्याकडून काढून झाले आहेत .

अभ्या..'s picture

1 Jun 2019 - 8:13 pm | अभ्या..

@माहीतगारसाहेब,
उपेक्षितरावांसाठी विचारलेला प्रश्न आणि मला दिलेला रेफरन्स ह्या दोन्हीबद्दल मला वाटते ते लिहितो. कमीजास्तीबद्दल अग्रिम माफी.
(कोणत्याही) घराणेशाहीत एवढी भावनिक गुंतवणूक कशी होते ?
एखादा माणसाच्या मताला इतके पोलराईज्ड करण्याचा हा आपला अश्लाघ्य प्रयत्न आहे, खासकरुन त्या प्रतिसादाआधीच उपेक्षितरावांचा प्रतिसाद आला असताना. अगदी भांडणे चालू असताना एखादा जखमी होऊन हार पत्करता झाला तर प्रतिस्पर्धी किंवा त्याचे पाठिराखे त्याच्यावर परत हल्ला करत नसतात. किंवा त्या जखमी पराभुताबद्दल जे कुणी बोलतात, बाजू घेतात ती त्याखेळाडूबद्दल गुंतवणूक नसते. एक साधा माणुसकीचा प्रकार असतो. आणि मी, उपेक्षितराव तेच म्हणताहोत. मेलेल्याना मारणे आहे हा धागा म्हणजे. किंबहुना असे जे कुणी करणार नाहीत ते एका घराण्यालाच निष्ठा वाहिलेले आहेत असे मत व्यक्त करणे म्हणजे सरळ सरळ आरोप आहे. त्याशिवाय का असा प्रश्न येतो?
बाकी आपल्या त्या दोन उपरोल्लेखित धाग्यामध्ये माझे मत चार पाच प्रतिसादात आहेच. ते परत वाचल्यास आपणास माझ्या मताचा अंदाज येईल आणि पुनरावृत्ती टाळली जाईल. अजुन एक गोष्ट नमूद करु इच्छितो, त्या दोन्ही धाग्यात आपण म्हणता तसे "संघाच्या सर्वोच्चपदावर सर्वजाती धर्मांना समान संधी असावी" ह्या एका मुद्द्यावरच काही निष्पन्न झालेले तथ्य असेल तर कृपया ते थोडक्यात इथेच विषद करावे ही नम्र विनंती.
.
.
अवांतर टाळण्याबद्दल, लिंका न देण्याबाबत, गोल गोल फिरुन मुख्य उत्तर टाळण्याबद्दल आणि महत्त्वाचे म्हणजे प्रतिसादातून माझा राजकीय कल न ठरवण्याबद्दल अग्रिम धन्यवाद.

उपेक्षित's picture

2 Jun 2019 - 1:46 pm | उपेक्षित

अगदी मनातील बोललास अभ्या, साला आम्हाला कधी जमायचं काय माहित इतके मुद्देसूद मांडणी कारण.

बाकी अभ्या उपेक्षित राव नको म्हणूस राव म्हातारा झाल्यासारखं वाटतंय :) आपण एका जहाजातीलच आहोत लेका वायीस पुढ माग असू :)

आता वळूयात माहितगार यांच्याकडे,

माहितगार साहेब थोड अवांतर उत्तर देतोय पण गोड मानून घ्या.

सर्वात आधी मला एक कळत नाही कि नेत्यांच्या मुलांनी राजकारणाकडे करियर म्हणून पहिले तर काय बिघडले ? अहो साधे उदाहरण एखाद्या माणूस business करतोय तर अहजीकच त्याची पोर (सरसकट नाही) पुढे धंद्यात येतातच आणि असू दे कि घराणेशाही (जोवर ती नुकसान करत नाही तोवर) काय बिघडतंय त्याने.

आताशा पक्षनिष्ठा/ विचारसरणी या गोष्टी हास्यास्पद आहे आता पक्ष म्हणजे खाडी कंपनी असते चांगले प्याकेज द्या / पोस्ट द्या नायतर म्या चाललो शेजारच्या कंपनीत अस चाललंय बघा.

आत्ताची BJP पहिली तर तिला मी नाव देईन "भारतीय जनता पक्षातील #राष्ट्रवादी #खान्ग्रेस"

बघा पटतंय का.

अभ्या लेका ते राव च बघ काय ते पुढच्या पोष्टीच्या वेळी. :)

अभ्या..'s picture

2 Jun 2019 - 3:20 pm | अभ्या..

बसू एकदा भावा ;)
जरा मुद्देसूद मांडणी करू आणि ठरवू.
काय म्हणतो?

उपेक्षित's picture

5 Jun 2019 - 2:03 pm | उपेक्षित

चालतंय कि पंढरीला भेटू सोलापुरास्न काय जास्ती लांब नाही पंढरपूर,

नाहीतर तू पुण्याला आलास कि नक्की मेसेज टाक.

माहितगार's picture

2 Jun 2019 - 4:17 pm | माहितगार

बघा पटतंय का.

*कसं काय पटायच ? :)

* = प्रत्यके गोष्टीवर !

आत्ताची BJP पहिली तर तिला मी नाव देईन "भारतीय जनता पक्षातील #राष्ट्रवादी #खान्ग्रेस"

आता समजा उपरोक्त किंवा अशा प्रकारची टिका समजा BJP भाजपा काळाच्या ओघात जेव्हा केव्हा हारेल त्यानंतर तुम्ही केली तर तुमचे टिका करण्याचे स्वातंत्र्य नाकारायचे का ? घराणेशाहीची बाजू अभ्यारावांनीही घेतली त्यावर आपण 'चीड', 'खेद' वगैरे भावनांची फोडणी सुद्धा दिलीत.

बरे या सर्व भावना निवडणूकीत शब्दशः मृत्यूमुखी पडलेल्या (कोणत्याही/सर्व पक्षीय) सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी उतू जाताहेत असेही नाही. थोरामोठ्यांच्या पोराने जरासा अबोला धरलेला आणि त्यात नाटकबाजी किती हेही माहित नाही अगदी मैदान सोडून पळालाय असेही नाही. धागा लेखकाने लेख लिहून ४८ तासही झालेले नाही मातोश्रीच संसदीय दलचे नेतृत्व करतील याची बातमी येते! एकवेळ कम्यूनीस्ट पक्षाची निवडणूकीत पार वाताहात झाली किंवा या निवडणूकीत राजकीय कारकीर्द संपलेल्या डझनभर वयस्कर नेत्यांची नावे पत्रकार शेखर गुप्तांनी वाचली. जन्मतःच जनतेच्या लाडकेपणाचा जन्मसिद्ध हक्कघेऊन जन्मलेल्यापैकीच असलेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना आणखी सहा-आठ लोकसभा लढवण्याची संधी आहे. मिपावरील धागा किंवा प्रतिसाद लेखकाच्या टिकेने कोणाच्या राजकीय कारकिर्दी बनत नाहीत आणि संपत नाहीत की त्यांच्या लेखन आणि विचार स्वातंत्र्यावरच आक्षेप नोंदवावेत.

उपेक्षितसाहेब आपण स्वतःच नोंदवता की विचारसरणीं शुद्ध स्वरुपात शिल्लक नाही मग आपल्या भावनातून जी काही बांधली जाते ती केवळ व्यक्ती आणि घराणे पूजा नव्हे काय. कोणत्याही व्यक्तिंच्या कृती आणि विचार अथवा घराणी कोणतीही पुस्तके कोणतेही राजकीय पक्ष आपण म्हणतातसे अगदी इतिहासात अस्तंगत झाले तरी टिकेच्या बाहेर का असावेत ?

आणि जे खर्‍या अर्थाने अद्याप राजकीय दृष्ट्या अस्तंगत झालेलेच नाहीत त्यांच्या एखाद दोन माघारिंनी लगेच अश्रू ढाळून अहो त्यांना असे कसे म्हणताहो ? घराणेशाहीतील एखाद्या व्यक्तीचे समर्थन वेगळे आपल्या दोघांच्या प्रतिसादानंतरही मला यातील भावनिक गुंतवणूकीचा उलगडा झालेला नाही.

मोहनदास गांधींच्या नेतृत्वा खालील काँग्रेसला जनतेचा पाठींबा मिळाला कारण त्यांनी काँग्रेसपक्ष आणि त्याची उद्दीष्ट्ये सर्वसामान्याम्ची आणि लोकशाहीच्या आश्वासनासहीत दिली. लोकशाहीची बेसिक व्याख्याच लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य अशी आहे. ज्या क्षणी लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य या व्याख्येस तडा जातो त्या क्षणी लोकशाहीत सहभागी व्यक्तींचा आणि लोकशाही संकल्पनेचा घोर अपमान होत असतो. व्यापार किंवा संपत्तीतील इनहेरीटन्सशी तुलना करून राजकारणातील घराणेशाहीचे समर्थन हे मागच्या दाराने केलेले सरंजामशाही आणि राजेशाहीचे मागच्या दाराने केलेले समर्थन असते.

जन्माने झालेला राजा आणि लोकांनी निवडलेला राजा यात राजेशाही आणि लोक्शाहीतील फरक असतो. लोक जन्माने असलेल्या राजपुत्रासच राजाची माळ घालत राहीले तर लोक्शाहीचा उद्देश संपलेला असतो. मग उघड डोळ्याने सरंजामशाही आणि राजेशाहीच राबवा लोकशाहीचे नाटक वठवण्याची मुदलात गरजच काय.

एखादी व्यक्ती सर्वसामान्यामध्ये जन्मून सर्वसामान्यांच्या सोबत टक्के टोणपे खाल्ली नसेल बहुसंख्य सर्वसामान्यांची संस्कृती सर्वसामान्यांमध्ये राहून जगली नसेल अशा व्यक्तिस सर्वसामान्यांबद्दल समजा खरा कळवळा आहे तरीही प्रत्येक बारकावा प्रत्येक भावना कशी समजू शकेल.

जे आमच्या बांधवांसोबत सर्वसामान्य टक्के टोणपे खात वाढलेच नाहीत त्यांनीच आमच्या देशाचे निर्णय घ्यायचे तर इंग्रजही वाईट नव्हते, १९४७ मध्ये घालवलेले सरंजामदार राजवाडेही वाईट नव्हते, बाबरही वाईट नव्हता आणि अलेक्झांडरही.

पण एव्हाना भारतातील लोक्शाहीने अद्याप दम तोडलेला नाही. आमच्या देश चालवलेल्या, चालवणार्‍या आणि चालवू शकणार्‍या राजकीय पक्षाचे अधिकृत कार्यकर्ते आम्ही भले नसू आमचा देश चालवण्याची त्यांची इच्छा होती किंवा असेल एवढ्या एवढ्या एका कारणाने त्यांच्या राजकीय योग्यतेची यथासांग चिकित्सा करणे एक भारतीय नागरीक म्हणून प्रत्येक भारतीय नागरीकाचा जन्मसिद्ध अधिकारच नव्हे तर कर्तव्य सुद्धा आहे, आणि या अनुषंगाने लेखन स्वातंत्र्यावर पडद्या आडूनही मर्यादा आणण्याची साधी इच्छाही व्यक्त केलीगेली तरी त्यातील तार्कीक उणीवांची चिकित्सा आम्ही अशीच परत परत करू अशी संधी देण्यासाठी आपल्या दोघांचेही अनेक आभार.

"संघाच्या सर्वोच्चपदावर सर्वजाती धर्मांना समान संधी असावी" ह्या एका मुद्द्यावरच काही निष्पन्न झालेले तथ्य असेल तर कृपया ते थोडक्यात इथेच विषद करावे ही नम्र विनंती.

रा.स्व.संघांचे निर्णय मला अथवा मिपाकरांना विचारून होत नाहीत (मी रास्वसंघ कार्यकर्ताही नाही) तरीही आपल्याला आंनददायक अशी शेअर करण्याची माहिती म्हणजे रा.स्व. संघाचे सर्वोच्चपद यापुढे देताना जातीधर्माचा विचार केला जाणार नाही याचे सुस्पष्ट आश्वासन सध्याच्या सरसंघचालकांनी दिल्याचे मी मागेच वाचले आहे.

(शिवाय त्यांच्या पुर्वाश्रमींच्या समुहलक्ष्य द्वेषभावनेपासून दूर जात असल्याचेही सुतोवाच सरसंघचालकांनी केल्याचे माझ्या वाचनात आले आहे.) या गोष्टी खरे म्हणजे संघ आणि भाजपा समर्थकांनी चर्चेत येऊन नोंदवायच्या. त्यांच्या कार्यकर्ता मंडळींची खरी अडचण सुधारणा तर स्विकारायच्या पण काचकुच करत अंगिकारायच्या , पण स्वतःच स्विकारलेल्या अंगिकारलेल्या सुधारणावादाचे समर्थन करायचे नाही . त्यामुळे संघीष्टांनी बर्‍याच परंपरागत गोष्टीवर माघार घेतलेली असते. त्यांनी माघार घेतलेल्या बाबतीतही पुन्हा पुन्हा मारण्याचा प्रकार संघ आणि भाजपा विरोधक करताना दिसतातच. आणि असे एकमेकांवर राजकिय दबाव बनवण्यातूनच सुधारणा नकळत आणि सावकाशीने घडत असतात.

काहीतरी कारणे देऊन टिकाच करू नयेत या भूमिकांबद्दल रास्त विरोधी भूमिका नोंदवणारा माहितगार

सुबोध खरे's picture

6 Jun 2019 - 9:50 am | सुबोध खरे

घराणेशाही बद्दल "आपला तो बाब्या" हे बऱ्याच वेळेस दिसून आलं आहे.

बापाच्या गादीवर बसणे चूक आहे असे मुळीच नाही परंतु त्याला काही तरी नियम, जनाची नाही तरी मनाची लाज, नीतिमत्तेची चाड असावी लागते.

सर्जनाचा मुलगा सर्जन होण्यात चूक काहीच नाही परंतु त्याला साडे पाच वर्षाचे एम बी बी एस पास करावे लागते त्यानंतर ३ वर्षे सर्जरीत एम एस करावे लागते यानंतर काही वर्षे अनुभव घ्यावा लागतो.

न्यायाधीशांचा मुलगा न्यायाधीश होतो हे मान्य आहे. उदा. सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांचा मुलगा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाला आहे ( न्या.. धनंजय चंद्रचूड. परंतु त्याला सुद्धा एक तीन वर्षाची पदवी घ्यावी लागते त्यानंतर तीन वर्षे एल एल बी करावे लागते. यानंतर बरीच वर्षे वकील म्हणून काम केल्यावर त्यांना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमले आणि नंतर बढतीने ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.

नौदल प्रमुख जयंत नाडकर्णी यांचा मुलगा राजेश नाडकर्णी नौदलात सब लेफ्टनंट म्हणून भरती झाला आणि बढती मिळत आता रिअर ऍडमिरल या पद पर्यंत पोचला आहे.

यापैकी कोणावरही "मोठेपणा" लादलेला नाही.

राहुल गांधी राजकारणात आले आणि काही वर्षात काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी नंतर उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष झाले

प्रियांका गांधी २०१९ मध्ये राजकारणात आल्या आणि लगेच जनरल सेक्रेटरी पण झाल्या.

१९७८ ते १९९१ आणि १९९८ ते २०१९ या

३४ वर्षात काँग्रेसचे अध्यक्ष पद केवळ इंदिरा गांधी आणि त्यांचे वंशज यांच्यातच आहे.

आणि हे म्हणे काँग्रेसमध्ये घराणेशाही नाहीच

तरी बरं ज्या काँग्रेसचा वारसा हे लोक सांगतात ती काही यांच्या "बापाने" स्थापन केलेली नाही.

( निदान हा वारसा तरी सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील)

१३५ कोटी भारतीयांत गांधी परिवार सोडला तर नेते नाहीतच का?

लांगुलचालन आणि वैचारिक दिवाळखोरीची परिसीमा आहे

या धाग्यावरचे अभ्या..चे सगळेच प्रतिसाद आवडले.

सुबोध खरे's picture

30 May 2019 - 11:28 am | सुबोध खरे

चूक विश्लेषण

सबळ विरोधी पक्ष असणे हे आवश्यक आहे अन्यथा सत्ताधारी पक्ष कुणालाच जुमानेनासा होऊ शकतो.

यास्तव राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष म्हणून काम करू शकतो त्याचीच चर्चा होणार.

द्रमुक किंवा तृणमूल मध्ये कोण अध्यक्ष होतो याबद्दल कोणी चर्चा करताना का आढळत नाही?

विरोधी पक्ष म्हणून दुसरा कोणता पक्ष आपल्या नजरेसमोर आहे ? सपा, बसपा, राजद, तृणमूल, राष्ट्रवादी, द्रमुक, अण्णा द्रमुक, ज द (से), ते रा स, तेलगू देसम, एम आय एम यापैकी एक तरी पक्ष राष्ट्रीय पातळीवर आहे का?

आपला रा स्व संघाबाबत "आकस" मात्र यातून स्पष्ट दिसून येतो

अभ्या..'s picture

30 May 2019 - 12:50 pm | अभ्या..

हे आले लेबल भाद्दर.
कुठे दिसला हो आकस तुम्हाला? प्रत्येक पक्षाची, संघटनेची पध्दत असते ती विषद केली आहे. बाकी जनप्रतिनिधी म्हनून जे निवडले जातात त्यांची निवड ऑलरेडी झालेली आहे. भाजपा, संघ (हेही उदाहरण माझ्या प्रतिसादात आलेय कारण त्याचे गुणगान त्यावरील प्रतिसादात आहे) हे त्यांचा अध्यक्ष निवडतात ती पध्दती त्यांचा प्रश्न आहे, त्यात ढवळाढवळ शक्यच नाही आणि करुही नये. कुणी त्या पधदतीविषयी नुसते बोलले तरी काय लेबले लावली जातात हे तुम्हीच दाखवून दिले आहे. सो काँग्रेसने काय करावे हा त्यांचा प्रश्न झाला. आणि त्यामुळे संघाबद्दलचा आकस किंवा प्रेम अशी लेबले तुम्ही लावायची गरजच नाहीये.
आता सशक्त विरोधी पक्ष पाहिजे म्हणून नक्राष्रु ढाळण्यापेक्षा जनतेनेच केले असते ना काँग्रेसला सशक्त. निदान विरोध करण्याइतके.
बाकी सशक्त विरोधी पक्ष म्हनजे काय? पार्लेमेंटात संख्याबळाने? की गुणात्मक? कि पक्षांतर्गत काही निर्णय घेऊन ते राबवायचे?
पार्लमेंतातली संख्या तर आता वाढू शकणार नाही, तो चान्स २०२४ लाच. गुणात्मक म्हनले तरी निवडून आलेले गिनेचुने काय करतील ते त्यांचेवर. अगदी दोनचार सहकार्‍यासह अटलबिहारी लोकसभा गाजवायचे तो काळ आणि तशी माणसे आता नाहीत.
राहता राहिले पक्षांतर्गत निवडीने. तर तो निवडायला चाराणे सदस्य तरी असायला पाहिजे. तो निर्णय त्यांचा. आपण चर्चा करुन काय होणार. कॉंग्रेसवाल्यांचे गणित जर चुकतेय असे त्यांना स्वतालाच वाटले तर करतील उपाययोजना, नसल्यास शकले होऊन नष्ट होतील. हाकानाका. ज्यांना खरी गरज आहे सशक्त विरोधी पक्षाची त्यांनीच हे काम केले पाहिजे आणि जनतेने ते करुन दाखवले आहे.
आता ते तसे झाले नाही म्हणून संपूर्ण लोकशाही पध्दतीविषयीच आपल्याला आकस आहे असे म्हणावे का?

उपेक्षित's picture

1 Jun 2019 - 1:42 pm | उपेक्षित

मला अजून एक काळात नाहीये कि मोदीला विरोध म्हणजे खान्ग्रेस समर्थक हे गणित अन्डून लोक का मोकळी होतात ? मधला मार्ग नाही का कोणता/?

च्यायला आम्हाला मोदी - शहा सारखी हुकुमशाही जोडगोळी नको आणि ओ पप्पू राहुल्या बी नको.

अटलबिहारी वाजपेयीनसारखी सर्वसमावेशक माणसे खर तर आत्ता पाहिजे होती, त्यांच्याबद्दल वेगळाच आपलेपणा वाटायचा राव.

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2019 - 11:41 pm | मराठी कथालेखक

माझे अगदी हेच विचार आहेत

आम्हाला मोदी - शहा सारखी हुकुमशाही जोडगोळी नको
आमची घोषणा : भाजप चालनको, मोदी नको ; काँग्रेस चालेल, रागा नको

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2019 - 11:49 pm | मराठी कथालेखक

आमची घोषणा : भाजप चालनको, मोदी नको ; काँग्रेस चालेल, रागा नको

अरेरे .. विंडोज ७ मधून टाकलेलं हे काहीतरी गंडलंय
हे असं वाचावं
आमची घोषणा : भाजप चालेल मोदी नको ; काँग्रेस चालेल, रागा नको

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2019 - 11:44 pm | मराठी कथालेखक

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जोडीने मी दुसरं नाव घेईन ते नरसिंह राव

नरसिह रावांचं नाव आदराने / कौतुकाने घेईल तो भाजपवाला आणि वाजपेयींना आदर देईल तो काँग्रेसवाला हे केवळ कल्पनेतच भेटतील का ? मनाचा मोठेपणा दाखवणारे राजकारणी लोक संपलेत का ?

सुबोध खरे's picture

30 May 2019 - 1:22 pm | सुबोध खरे

हे आले लेबल भाद्दर.

कुठे दिसला हो आकस तुम्हाला?

ज्या अस्पर्श संघाचे गुणगान गायले

आणि निघाले तळी उचलायला.

प्रथम आणि द्वीतीय वगळता बाकी सरसंघचालकाबाबत दहा दहा ओळींचा निबंध लिहिता येईल इतकी तरी माहिती आहे का?

दुसऱ्यांच्या माहितीबद्दल इतके छातीठोक पणे कसे बोलता येते?

इतकी जळजळ का होते आहे?

अभ्या..'s picture

1 Jun 2019 - 8:22 pm | अभ्या..

दुसऱ्यांच्या माहितीबद्दल इतके छातीठोक पणे कसे बोलता येते?
कारण जी माहिती मला आहे त्याबद्दलच छातीठोकपणे बोलतो, आणि लिहिलेले खोटे ठरवायचे काम संबधिताने केलेलेही नाही त्यामुळे तो पक्का असणारच.
जगातल्या सगळ्या गोष्टींची माहीती मला आहे असा माझा समज बिल्कुल नाही, तो करुन घ्यायची इच्छाही नाही.
इतकी जळजळ का होते आहे?
टिपिकल निरर्थक शेरा आहे हा. इतक्या वर्षात असे शेरे कधी येतात ते चांगलेच कळलेले आहे,
सो...नमस्कार.

सुबोध खरे's picture

1 Jun 2019 - 8:43 pm | सुबोध खरे

लिहिलेले खोटे ठरवायचे काम संबधिताने केलेलेही नाही

आपल्याला अनुल्लेखाने मारायचे असेल किंवा आपण त्यांच्या खिजगणतीतही नसाल किंवा आपल्याला खोटे ठरवायची त्यांना गरजच वाटत नसेल.

पण "मीच बरोबर" म्हणून तुम्ही त्यांच्या वर निवाडा देऊन मोकळे होताय.

बाकी चालू द्या आपले आत्मकुंथन

उपेक्षित's picture

2 Jun 2019 - 2:53 pm | उपेक्षित

अहो तुम्ही स्वतः कुंथत आहात आणि दुसर्याला अक्कल कशाला शिकवताय ?

इतके दिवस आदर दाखवत होतो पण तुम्हाला तो मानवतच नाहीये बहुतेक कारण जरा विरोध दिसला कि पिसाळलेसारखे धावून येत अंगावर.
इथे बाकीचे पण BJP समर्थक आहेत पण ते तुमच्या इतके कधी डेस्परेट होऊन वयक्तिक हल्ला / विषारी भाषा वापरत नाही,

असो बाकी तुमचे लांगुलचलन चालू द्या.

जालिम लोशन's picture

30 May 2019 - 2:54 pm | जालिम लोशन

अभय दादा' सुबोध साहेब. शांती शांती.

अगं अगं म्हशी ( किंवा म्हसोबा) म्हणत मोठी घरवापासी होणार वाटतं! अध्यक्षपदावर डोळा ठेवून की काय?

भंकस बाबा's picture

30 May 2019 - 6:06 pm | भंकस बाबा

लक्षणे तर अशीच दिसत आहेत.
अजुन एक भरकटलेले तरुण देखील मानसन्मान विसरून चाटुगिरी करायला येऊन मिळतील वाटते.

नाखु's picture

30 May 2019 - 11:08 pm | नाखु

अत्यंत स्वभिमानी असल्यानेच फक्त तीनदा बाहेर पडून दोनदाच पाय पकडले आहेत.बाहेरून,आतून, सोबतीने पाठींबा देताना परकीय नागरिकत्व मुद्दा सोयीस्कर दुर्लक्ष झाला होता
आता किमानपक्षी माजी अध्यक्ष हा टिळा लागला तर लागला

विश्र्वासघातकी इच्छाशक्ती आणि अत्यंत जातीय विद्वेष यामुळेच ही अवस्था करून घेतली आहे आणि तरीही शहाणपण येत नाही हीच शोकांतिका आहे.

प्रसाद_१९८२'s picture

31 May 2019 - 10:43 am | प्रसाद_१९८२

कालच्या शपथविधी सोहळ्यात,
आमच्या महाराष्ट्राचे लाडके, जाणता राजा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना पाचव्या रांगेत स्थान देऊन त्यांचा अपमान केल्याबद्दल नवनिर्वाचीत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध !
--
-
महाराष्ट्र हा अपमान कधीच विसरणार नाही.
दिल्लीश्वर बादशहा आलमगीर औरंगजेबाने जसे छत्रपती शिवरायांना स्वत:च्या वाढदिवसाला दिल्लीला बोलावून, दरबारात तिसर्‍या की पाचव्या रांगेत उभे करुन त्यांचा अपमान केला होता अगदी तसाच अपमान पंतप्रधान मोदी नामक आधुनिक दिल्लीश्वरांनी आमच्या जाणत्या राजाचा केला आहे. दिल्लीश्वरांनो लक्षात ठेवा तुमच्या ह्या कृत्याचा बदला महाराष्ट्रातील प्रजा येणार्‍या विधानसभा निवडणुकीतून घेईल.

जाणत्या राजाच्या नावाचा याहून मोठा अपमान नसेल. हे नाव इतके वापरून वापरून गुळगुळीत झाले आहे की बास!

मूळ जाणता राजा पण वैतागला असेल एव्हाना.

प्रसाद_१९८२'s picture

31 May 2019 - 1:53 pm | प्रसाद_१९८२

NDA सरकारच्या सत्ताकाळात सिवसेनेला नेहमी 'अवजड उद्योग मंत्रालय' हेच खाते का दिले जाते, हा एक प्रश्नच आहे.
.
.
.
.
.
.
--
.
--
[खातच अस दिलेय, की काईच खाता येत नाही.]
इती : मक्या अनासपूरे.

माहितगार's picture

1 Jun 2019 - 2:22 pm | माहितगार

:))

चौकटराजा's picture

31 May 2019 - 3:15 pm | चौकटराजा

कुमार केतकर हे आपले नाव ग्याजेट मध्ये कुमार गांधी असे करून घेतील. बायोलॉजिकली गांधी घराण्याच्या बाहेरचा हा राहुल यांचा हट्ट पुरा होईल , कुमार उघडपणे सी डब्लू सी च्या बैठकीत मोदीना शिव्या देण्याचा ठराव आणत्तील व हा गांधी नावाच्या माणसाने आणला म्हणून खर्गे , शिंदे, गुलाम नबी ,अहमद,, ऍंथोनी सगळे धन्य होतील. दुसरा असाच पर्याय पुण्याचे विश्वंभर चौधरी हे बिशंभर नेहरू असे नाव बदलतील व वरील प्रमाणे सर्व होईल .

चित्रगुप्त's picture

1 Jun 2019 - 8:48 am | चित्रगुप्त

कल्पांत मांडला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडवाया |
कैपक्ष घेतला देवी |आनंदवनभुवनी ||२७||

बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्थान बळावले |
अभक्तांचा क्षयो जाला |आनंदवनभुवनी || २८||

पूर्वी जे मारिले होते | ते ची आता बळावले |
कोपला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||२९ ||

त्रैलोक्य गांजिले मागे |ठाउके विवेकी जना |
कैपक्ष घेतला रामे | आनंदवनभुवनी ||३०||

भीम ची धाडिला देवे | वैभवे धाव घेतली |
लांगूल चालिले पुढे | आनंदवनभुवनी ||३१ ||

येथून वाढला धर्मू | रमाधर्म समागमे |
संतोष वाढला मोठा | आनंदवन भुवनी ||३२ ||

बुडाला औरंग्या पापी | म्लेंच संहार जाहाला |
मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी || ३३ ||

बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी |
ताडिले पाडिले देवे | आनंदवनभुवनी ||३४ ||

गळाले पळाले मेले |जाले देशधडी पुढे |
निर्मळ जाहाली पृथ्वी | आनंदवनभुवनी ||३५ ||

मदनबाण's picture

2 Jun 2019 - 11:20 am | मदनबाण

प्रथम प्रामाणिकपणे तळवे चाटण्याची परिक्षा घेतली जाईल आणि त्यात जो सगळ्यात जास्त गुण मिळवेल तो अर्थातच...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू शायर है मैं तेरी शायरी, तू आशिक़ है मैं तेरी आशिकी... :- Saajan

इरसाल's picture

3 Jun 2019 - 3:52 pm | इरसाल

निवडणुकीत रिजेक्ट केलं तर केल... .. ज्यायला राजीनामा पण रिजेक्ट (इति. श्री. रा. रा. गांधी)

नितिन थत्ते's picture

5 Jun 2019 - 3:05 pm | नितिन थत्ते

मी नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2019 - 6:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखात व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे घटना उलगडत आहेत...

१. पक्षाला टांगणीला लावून, पक्षाध्यक्ष रागा त्यांच्या रिवाजाप्रमाणे, परदेशात निघून गेले आहेत. काँन्ग्रेसी नेते याबाबत कधीच बोलत नाहीत (काय बिशाद आहे !). परंतू, 'लोकशाहीच्या भल्यासाठी एक भक्कम विरोधी पक्ष असायलाच हवा' असा सतत गळा काढणार्‍या 'तथाकथित' विचारवंतांना किंवा इतर पक्षांच्या नेत्यांनाही त्याबद्दल काय म्हणावे हे सुचत नाही आणि ते तोंडात गुळणी धरून बसल्याचे नाटक करत आहेत. इतर कोण त्याबाबत काही बोलले तर, 'तो पक्षाचा अंतर्गत मामला आहे' हा हुकुमाचा एक्का असलेला मुद्दा आहेच ! मात्र तो मुद्दा मांडताना, (अ) कॉन्ग्रेस स्वतःला राष्टिय स्तरावरचा पक्ष आहे व (आ) सद्या लोकसभेत खासदारांच्या संखेनुसार दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे... त्यामुळे कोणत्याही भारतियाला त्या पक्षाच्या अवस्थेबद्दल (किंबहुना, दुरावस्थेबाबत) बोलायचा आणि काळजी व्यक्त करायचा हक्क आहे, हे ते महोदय (सोईस्कररित्या) डोळ्याआड करत आहेत.

२. घराण्याचे महत्वाचे "विश्वासू" शिलेदार (उदा : विरप्पा मोईली, इ) 'रागां'नी कडक निर्णय घेऊन पक्षावर शस्त्रक्रिया करायला हवी" असे माध्यमांत म्हणत, स्वतंत्र विचार असलेल्या (आणि काँन्ग्रेसमध्ये उरलेल्या) नेत्यांची गळेदाबी/गच्छंती करण्याची तयारी करत आहेत. हे म्हणजे, युद्धात हारलेल्या राजाने आपल्या सरदार-सैनिकांना जबाबदार ठरवून सुळावर चढविल्या सारखे होईल, नाही का? पण, एकंदरीत, "घराण्याचा मक्तेदारी हक्क एकदम निर्वेध करणे" हा प्रकल्प चालू असल्याने, तिकडे दुर्लक्ष करणे सहाजिकच आहे !

३. "सोनिया आणि प्रियांका गांधी, पराभवाचे मूळ "पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या क्षमतेच्या कमतरतेत आणि अपयशांत आहे", असे म्हणत आहेत... कारण, नेहमीप्रमाणेच, "The King can do no wrong" !!! प्याद्यांना दोष दिला तरी ती बिचारी काय करू शकतात? मामला थंड होईपर्यंत जनतेची नजर (जबरदस्तीने का होईना पण) दुसरीकडे वळवता आली तरी खूप झाले... तसेही, जनता हल्ली त्या सगळ्याकडे फारसे लक्ष देण्याची तसदी घेत नाही, हे पण खरे आहेच !

अश्या तर्‍हेने, पक्षाला "थंड करून खाल्ल्यावर" मग, घराण्याचाच एखादा "ठप्पाबहाद्दर पाईक" बोहोल्यावर चढवून त्याला रिमोट कंट्रोलने चालवले जाईल अशीच लक्षणे दिसत आहेत. मग असा आयता बळीचा बकरा असल्यावर, पडद्यामागून राजकारण करून, सुखेनैव मलई खाण्यास, घराणे मोकळे राहील. अर्थातच, भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची तलवार डोक्यावर सतत टांगत असेल आणि ती तशी ठेवणारे सुब्रमण्यम स्वामी रोज स्वप्नात येऊन भिती दाखवत राहतीलच... त्याला नाईलाज आहे ! :)

प्रसाद_१९८२'s picture

18 Jun 2019 - 11:51 am | प्रसाद_१९८२

१. पक्षाला टांगणीला लावून, पक्षाध्यक्ष रागा त्यांच्या रिवाजाप्रमाणे, परदेशात निघून गेले आहेत.
--
राहूल गांधींना परदेशात जायची इतकी घाई झाली होती, की काल खासदारपदाची शपथ धेतल्यानंतर सही करायला देखील त्यांच्याकडे वेळ नव्हता.
.....

चौथा कोनाडा's picture

18 Jun 2019 - 5:24 pm | चौथा कोनाडा

काय ठरलं मग ?
"पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" ही चर्चा काही दिवस थांबवायची ?

सत्ताधार्‍यांना टेन्शनच आहे, एका नामधारी विरोधकाला वारंवार झोडप पायची संधी हळूहळू क्षीण होत जाणार !

भंकस बाबा's picture

18 Jun 2019 - 6:13 pm | भंकस बाबा

चालुद्या की वं!
करमणुकीला कायत्री पायजेल ना?
सारखं सुध्दलेकनाच्या मागे लागून थोडीच करमनुक व्हनार हाय

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jun 2019 - 9:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

'लोकशाहीच्या भल्यासाठी एक भक्कम विरोधी पक्ष असायलाच हवा' असा सतत गळा काढणार्‍या 'तथाकथित' विचारवंतांना किंवा इतर पक्षांच्या नेत्यांनाही त्याबद्दल काय म्हणावे हे सुचत नाही आणि ते तोंडात गुळणी धरून बसल्याचे नाटक करत आहेत. इतर कोण त्याबाबत काही बोलले तर, 'तो पक्षाचा अंतर्गत मामला आहे' हा हुकुमाचा एक्का असलेला मुद्दा आहेच ! मात्र तो मुद्दा मांडताना, (अ) कॉन्ग्रेस स्वतःला राष्टिय स्तरावरचा पक्ष आहे व (आ) सद्या लोकसभेत खासदारांच्या संखेनुसार दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे... त्यामुळे कोणत्याही भारतियाला त्या पक्षाच्या अवस्थेबद्दल (किंबहुना, दुरावस्थेबाबत) बोलायचा आणि काळजी व्यक्त करायचा हक्क आहे, हे ते महोदय (सोईस्कररित्या) डोळ्याआड करत आहेत.

हे इतक्या लौकर इथे मिपावरही सिद्ध होईल असे वाटले नव्हते. =))

सजग नागरिकांनी सरकारवर नजर ठेवून त्याला सरळ मार्गावर राहण्यास जेवढे भाग पाडायचे असते, तेवढेच विरोधी पक्षांना त्यांच्या वैधानिक जबाबदार्‍यांची जाणीव करून देण्याची गरज असते.

मुख्य म्हणजे, "निवडणूक हरले म्हणून आता विरोधी राजकीय पक्ष आराम आणि मजा करायला मोकळे झाले, आता त्यांच्यावर काहीच जबाबदारी नाही. त्या बिच्च्यार्‍यांना पाच वर्षे मोकळे सोडा." असा (वेडगळपणे किंवा (विरोधी पक्षाच्या पाठिराख्यांनी) हेतुपुर्रसर चलाखपणे) विचार न करता, "विरोधी पक्षांवर आता सकारात्मक कृती करून सरकारला सरळ मार्गावर ठेवण्याची जबाबदारी आहे", हा विचार जेथे रुजलेला असतो, तेथेच उत्तम लोकशाही व्यवस्था बनते. पूर्णविराम.

मात्र, ती जबाबदारी म्हणजे, केवळ "विरोधी पक्षांनी बेजबाबदार आणि खोटी विधाने/कृती करून सरकारला जेरीस आणणे" नव्हे, हे सुद्धा नागरिकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे... नाहीतर देशाच्या विकासाला खीळ लावण्याचे पाप, विरोधी पक्षांइतकेच, नागरिकांच्याही माथी असेल.

महेश हतोळकर's picture

18 Jun 2019 - 6:24 pm | महेश हतोळकर

बॉक्सरभाई म्हणताहेत अधीर रंजन चौधरींना लोकसभा नेतेपद दिलंय. ते ममतादिदींचे "कट्टर शत्रू" असल्याने बॉक्सरभाईंना महागठबंधनाची फारच काळजी वाटू लागली आहे.

So Adhir Ranjan Chaudhary is set to be Cong leader in LS. Among his qualifications, the 5 time MP from Bengal is Mamata’s prime enemy. So much for opposition unity in parliament. Ekla chalo re seems to be the Cong motto: when down and out, stay lonely in defeat!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jul 2019 - 11:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाटकाचा पुढचा अंक सुरु झाला.

राहूल गांधींनी दिला दिला असे चर्चेत असलेल्या राजीनाम्याचे पत्र आज पाठवले. एका वाक्यात कॉन्ग्रेसच्या पराभवाची वरवर जबाबदारी स्वतः स्विकारून, नंतर सगळ्या चुका/चुकीच्या गोष्टींची जबाबदारी इतरांवर... आणि तीही अत्यंत उद्धट भाषेत... टाकली आहे. मुख्य म्हणजे, त्यांनी केवळ मोदी/भाजपलाच नाही तर भारतातल्या सर्व संस्थांना आणि सर्व जनतेला दोष दिलेला आहे... त्यांच्या मते, मी जगातील सगळी तत्वे बाळगून होता आणि इतर सर्व एकतर विकले गेले आहेत किंवा निव्वळ मूर्ख आहेत !

आता "पक्षाध्यक्ष कौन?" या नावाचा पुढचा (अजून एक) अंक सुरु झाला. हा अंकही दीर्घ असणार असे दिसते कारण "अंतरिम अध्यक्ष" म्हणून ९२ वर्षे तरूण असलेल्या व्होरा (ज्यांना काहीजण कॉन्ग्रेसचे "मिस्टर इंडिया" म्हणतात) यांची कॉन्ग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निवड केल्याच्या बातम्या चर्चेत आहेत.

इतर काही नाही तरी, येते अनेक दिवस विनोदी चर्चा करण्यासाठी माध्यमांना उत्तम खाद्य मिळाले आहे.

राजीव गांधी नी राजीनामा देणे ही एक राजकीय खेळी असू शकते .ती सुद्धा पूर्ण विचार करून .
राजकीय डावपेच समजण्यासाठी सरळमार्गी विचार करून चालत नाही.
जी परिस्थिती आपल्याला दिसत आहे ती तशीच आहे असे वाटत नाही .
काँग्रेस च नेटवर्क पूर्ण देशात आहे किती ही नाकारले तरी त्यांच्या विचारला मानणारा समाज भारतात आहे भले कमी असेल.
अध्यक्ष कोण होईल हे महत्त्वच नाही तर जो होईल तो गांधी घराण्याचं
बटिक असेल हे नक्की .
ह्यातून एक फायदा होईल हुकूमत गांधी घराण्याची चाललं पण घराणेशाही चा आरोप करता येणार नाही .
मुलायम सिंग ची जशी जनतेवर पकड होती तशी अखिलेश ची नाही .
लालू जसे जनप्रिय होते तशी त्यांची मुलं नाहीत
शरद पवार जसे लोकांच्या मनात होते तसे सुप्रिया किंवा अजित नाही .
बाळासाहेब ची सर उध्दव ला कधीच येणार नाही.
त्याच न्यायाने इंदिराजी नी जशी हुकूमत गाजवली तशी हुकूमत गाजवणारा आता गांधी घराण्यात कोण्ही नाही.

इरसाल's picture

6 Jul 2019 - 5:48 pm | इरसाल

सचिन पगारे का ???????

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2019 - 11:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

Sonia Gandhi named interim Congress president after day-long CWC meet

घराण्याला कॉन्ग्रेसच्या अध्यक्षपदावरची पकड सोडणे आणि घराण्याच्या पाठीराख्यांना माता-पुत्राचे पाय सोडणे शक्य होणार नाही, असे म्हटले तर काही लोकांना राग येतो. मात्र, रागांनी रागारागाने राजिनामा देऊन पाच आठवडे लोटले तरी नवीन पक्षाध्यक्षाचे नाव ठरवणे कॉन्ग्रेसला अजून शक्य झालेले नाही आणि आज मातोश्रींच्या गळ्यात हंगामी पक्षाध्यक्षपदाची माळ घातली गेली... याला काय म्हणायचे ?! १२५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आणि भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या व नंतरच्या सगळ्या (फक्त) चांगल्या गोष्टींवर जन्मजात हक्क सांगणार्‍या पक्षामध्ये एक पक्षाध्यक्ष निवडायला एवढी समस्या? काय ही अवस्था ?! :(

माहितगार's picture

11 Aug 2019 - 8:46 am | माहितगार

धागा लेख भविष्यवाणीतील पर्याय २अ चपखल ठरली, तेव्हा काँग्रेसची राजकिय नाडी परीक्षा सुयोग्य पद्धतीने केल्या बद्दल डॉक्टरांचे अभिनंदन

जेवढा काळ पक्षाध्यक्ष पदाची माळ सोनीयाजींनी स्वतःच्या गळ्यात ठेवली तेवढी नेहरू आणि इंदीराजींनीही न ठेवता किमान नामधारींच्या गळ्यात ठेवण्याचे उपकार कोंग्रेस पक्षावर केले. काल वर्किंग कमिटीने पुन्हा एकदा सोनीयावर शिक्का मोर्तब केले तेव्हा 'खोदा पहाड निकली बुढीया !' हे ट्विट लगोलग आले.

२ आ या आपल्या पर्यायासाठी बुलढाणा-रामटेकचे मुकुल वासनीक यांचे नाव मागचे दोन तीन दिवस नाव दिसत होते . कोण हे मुकुल वासनिक म्हणून शोध घेतला तर आपल्या पिताश्रींच्या पिढीपासून हे नेहरु-गांधी-वड्रा घराण्याच्या सेवेत आहेत आणि राहुल गांधींसाठी सारखी उठबैस करतात. बुलढाणा किंवा रामटेक मधून एक निवडनूक जिंकणे एक हरणे असा मुकुलरावांचा क्रम असतो असे कळले.

मुकुलरावांची आणखी माहिती युट्यूबवर शोधली तेव्हा ते महाराष्ट्रातील मतदार संघातही आपण काय बोलतो ते गांधी घराण्यास वापस गेल्यावर दाखवता यावे म्हणून आवर्जून मराठी टाळून हिंदीतून बोलत असण्याची शक्यताही जाणवली.

मुकुल वासनिकांचे हिंदी भाषण कौशल्य चांगले आहे. पॉलीटीकली राईट बोलण्याचे आणि गांधी घराणे ते स्वपक्षीय ते विरोधकांनाही न दुखावण्याचे कौशल्य अफलातून आहे पण राजकीय विचार आणि धार यांचा अभाव आहे. बहुधा डिग्गी राजांची जराशी सलगी का काय देशप्रेमी माजी उपराष्ट्रपतींच्या काळात राज्यसभा टिव्हीवर झिंग्यांची भुर्जी दाखवुन परिवाराची सेवाकरून एन्डीतीव्हवर बातम्या आनूनही काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडत नाही . स्वैपांक किती छान केला तरी हुजरेकरी स्वैपाक्या अशी हैसियत करून घेतल्यावर लुटूपुटूचेही मालक होता येत नाही हे काल मुकुल वासनिकांना समजले असावे. स्वाभिमानी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून काँग्रेसला हुजरेकरी मिळवता येतात या महाराष्ट्रीय गतीचे वाईट वाटले .

सोनीयाच्या पुनश्च घोषणेपुर्वी काही मिनीटे राहुल गांधी बाहेर आल्या नंतर काँग्रेस अध्यक्ष पदा बाबत राहुल गांधी काही बोलतील म्हणून गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर राहुल गांधींनी मला तर काश्मिर प्रश्ना संबंधात बोलवण्यात आले होते हे सांगुन थांबले असते तर राहुल गांधी कसले त्यांनी काश्मिर मध्ये हिंसक घटनेच्या बातम्या असल्याची पाकीस्तान्यांना शोभेलशी संतापजनक भाषा वापरली. त्या नंतर एनडी टिव्हीचा रिपोर्टर सुद्धा त्या अफवा आहेत आणि काश्मिर मध्ये आलबेल असल्याचे सांगत होता. राहुल गांधींना काश्मिरची काळजी वाटते एवढे म्हणूनही सरकारला प्रश्न विचारता आला असताच पण देशाचे काही होवो देश विरोधी बोलणे थांबवणार नाही असा पणच लांगलचलक पक्षाने घेतलेला अद्याप सोडलेला नाही आणि बुढीया आणि तिचा राजदुलारा सुद्धा :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. असे म्हणतात की कॉन्ग्रेस वर्किंग कमिटिच्या सभेत प्रियंका वद्राचे नाव पुढे येऊ लागल्यावर, "पुढचा पक्षाध्यक्ष गांधी नसावी" असा हट्ट धरला. कारण, प्रियांका पक्षाध्यक्ष झाल्यास, "रॉबर्ट वाद्राची पकड कॉन्ग्रेसवर बसून आपल्या 'महत्व व मलाई'ला धोका पोहोचेल", हे न समजण्याइतके रागा बुद्दू नाहीत.

२. याशिवाय, जुने आणि तरूण कॉन्ग्रेसी, या दोन गटांत इतके मतभेद आहेत आणि त्यांनी एकमेकाचे पाय इतक्या वेळा ओढले आहेत की, त्यांच्यापैकी कोणा एका गटाला अध्यक्षपद मिळणे म्हणजे दुसर्‍याची गछंती नक्की, असे समीकरण बनले नक्की आहे... अर्थातच, नॉन-गांधी पक्षाध्यक्ष्याची निवड तेव्हाच होऊ शकते, जेव्हा या दोन्ही गटांत नसलेला आणि गांधी घराण्याची हुजरेगिरी करण्यात तरबेज असलेला उमेदवार पुढे येईल. त्याला अर्थातच वरच्या दोन्ही गटांचा (अंतर्गत विरोध) आहे... (रिमोट कंट्रोलच्या ताब्यातल्या का होईना, पण) राजकारणात महत्वाचे असण्याने मिळणारी मलाई हातून जाणे कोणाला परवडेल?!

वरचे दोन मुद्दे पाहता, बिनविरोधी ठरू शकेल (किंबहुना, ज्याला कॉन्ग्रेस वर्किंग कमिटीमध्ये विरोध करण्याची कोणामध्येच हिंमत नसलेला) असा उमेदवार म्हणजे निर्विवादपणे, केवळ मातोश्री... दुसरा अजून कोण?

कॉन्ग्रेसच्या चालीचा अंदाज लावण्यासाठी, दिवसागणिक कमी कमी बुद्धीची गरज पडत आहे. याचे मुख्य कारण, कॉन्ग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत भाग घेणार्‍या लोकांची बुद्धी (अ) घराण्याची हांजीहांजी आणि (आ) व्यक्तिगत स्वार्थ, या दोनच गोष्टींवर केंद्रिभूत झालेली आहे, हेच वारंवार दिसत आहे... त्यांना पक्षाचीच पर्वा नाही, तर त्यांनी (लोकांचा विश्वास जिंकणारा सबळ विरोधी पक्ष बनूया असा विचार करून) देशाची पर्वा करणे दिवास्वप्न ठरेल. हे भारतासाठी कटू व दुर्दैवी आहे पण सत्य आहे ! :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर राहुल गांधींनी मला तर काश्मिर प्रश्ना संबंधात बोलवण्यात आले होते हे सांगुन थांबले असते तर राहुल गांधी कसले त्यांनी काश्मिर मध्ये हिंसक घटनेच्या बातम्या असल्याची पाकीस्तान्यांना शोभेलशी संतापजनक भाषा वापरली.

हे सुद्धा नेहमीचे झाले आहे. रागांनी एखाद्या मुद्द्यावर पाकिस्तानची तळी उचलली नाही तर ती "अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट" असेल. त्यांचे हे पाकिस्तानला सोईचे बोलणे/वागणे, राजकिय विरोधाच्या सीमा ओलांदून जाणारे आहे... त्याबद्दल काही प्रवाद आहेत, पण ते बोलायची ही वेळ व स्थळ नाही.

माहितगार's picture

11 Aug 2019 - 3:02 pm | माहितगार

आपण जे पाळता ते वेळ आणि स्थळाचे भान काल रागांनी पाळले नाही. बर काश्मीरच्या जनतेबद्दल एवढे भरते आले तर भारतभारात पूरग्रस्थांनी काय घोडे मारले की अध्यक्षपदाचे निवडणे चालू असताना नेमकी काश्मीरींच्या अडचणींची चर्चा काँग्रेस वर्कींग कमिटीला करता येते पण पूर ग्रस्थांची नाही ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 4:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

कॉन्ग्रेसला सद्या पाकिस्तानची तळी उचलायचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे... भारताची आणि भारतिय जनतेच्या भल्याबुर्‍याची काळजी त्यांना असण्याचे कारण नाही....असेच रागा आणि त्यांचे पाठीराखे वागत आहेत. केवळ सत्तेबाहेर गेले आहेत आणि जनता विचारत नाही म्हणून इतके अधःपतन ?! :(

चौकटराजा's picture

11 Aug 2019 - 9:10 am | चौकटराजा

माझ्या पत्नीस फिकेपण ( अनिमिया) याचा त्रास २०११ पासून आहे. एकदा आमचे पथोलोजिस्ट मला म्हणाले " तुम्ही ही केस एखाद्या हेमेटोलोजिस्ट ला का दाखवीत नाही ? पत्नीने ते अमान्य केले . सुमारे १८००० रूपये होमिओपाथ कडे घालवले . परिणाम शून्य. मग एकदा तिच्या पाठीत दुखू लागले. तिला अर्थो कडे नेले . त्यानेच एक्स रे काढला . एक्स रे ओ के. त्याने ८ दिवसाची औषधे लिहून दिली. मग मला शन्का आली की किडनी स्टोन असावा. सोनोग्राफी केली ३ स्टोन आढलले. अर्थो कडे जाण्यात पैसा व वेळ बरबाद.अनिमियाचा सम्बन्ध, बी १२, वेन्ट्रीक्य्लर कार्य तसेच स्टोन यान्चे शी ( पर्यायाने क्रिआटीनीन ) शी असल्याने सम्बन्धित सर्व टेस्ट झाल्या. नुकत्याच घेतलेल्या पेन किलर मुळे किडनीला त्रास होत आहे असे नेफ्रोलोजिस्ट म्हणाले. ( फक्त ६ दिवस गोळ्या ). रक्ताची बाटली, इन्जेक्टेट लोहाची ३ एपिसोडस सर्व झाले. परिणाम शून्य. मी बोन म्यारो सप्रेशन ची शन्का व्यक्त केली तर डॉक माझ्यावर सन्तापले. ३० वर्शाचा अनुभव वगरे सान्गून झाले. आता पुन्हा हेमोटोलॉजिस्ट कडे जाणे आहे.
सर्कल पूर्ण झाले. वरील केस बरोबर रक्तक्षय झालेल्या कोन्ग्रेसची आहे. त्याना आप्ल्या र्‍हासाचे कारणच सापडत नाही. आता डॉ सोनिया यान्चेकडे जाणे आहे !