पोहे

Primary tabs

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
28 May 2019 - 5:13 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
"माझा आवडता पदार्थ" असा निबंध मला कोणी लिहायला सांगीतला तर मी अगदी परात भर लिहू शकेल. अगदी रोज तिन्ही त्रिकाळ पोहे खायला घातले तरी मी नाही म्हणणार नाही. लग्न जुळविण्या निमित्त अजून ५-२५ घरी पोहे खायला मिळतील म्हणून एकेकाळी मी कोण आनंदलो होतो पण हाय रे दैवा, १-२ प्रयत्नांतच लग्न जमले आणि ती इच्छा अपूर्णच राहिली.
एवढेच काय पण पुढचा जन्म मला मानवाचा मिळाला तर साबूदाण्या सारखेच पोहे देखील उपवासाला मंजूर असावेत म्हणून मी देवाला साकडे घालणार आहे.

पण हल्ली चांगले पोहे मिळणं दुर्मिळ झालयं काय ? मी आमच्या घराच्या बाजूला मिळणार्‍या दुकानातून "स्वस्तिक" ब्रॅन्ड चे पोहे घेतो. पण त्यांच्या चवीत देखील बदल झाल्यासारखा जाणवतो. डिमार्ट सारख्या ठिकाणी मिळणारे सुटे पोहे खाण्यालायकच नसतात. मध्यंतरी "बिग बजार" मधे सुरती पोहे, इंदोरी पोहे नामक काही पोहे घेऊन बघीतले पण मजा नाही आली. एकदा नाशिक वरुन पोहे आणले होते ते अप्रतिम होते. ब्रॅन्ड चे नाव आता आठवत नाहिये. डिमार्ट मधे बासमती पोहे नावाचा एक प्रकार उपलब्ध आहे तो कोणी खाऊन बघीतला आहे काय ?

तर ठाण्या, मुंबईत कोठे उत्तम प्रति चे पोहे मिळत असतील तर नक्की सांगा ! अलिबाग, रोहा इकडे चांगले पोहे होतात असे ऐकून आहे, इथे त्यांची विक्री होते काय ? नक्की सांगा !

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 May 2019 - 5:46 pm | यशोधरा

अगदी अस्साच अनुभव कोकणात मिळणाऱ्या लाल गावठी पोहयांबद्दल आला. मोठ्या कौतुकाने घरी आणले पण चव बिघडलेली आहे.. :(. हे पोहे खरे तर नुसते खायला सुद्धा चविष्ट असतात - जराशे गोडसर असे. पोहे भिजवून त्यात गूळ, किसलेले खोबरे घालून जराशी वेलची लावली की अगदी अहाहा! तिखटे करायचे असले तरी तसे करून वरून खोबरे भुरभुरवले आणि सोबत चहा!

आता पोह्यांची चव राहिली नाही आणि गेले ते दिन गेले..!

धर्मराजमुटके's picture

29 May 2019 - 10:14 am | धर्मराजमुटके

लाल पोहे फक्त बघितले आहेत. अजून चव घेतली नाही. एकदा खाऊन बघावे म्हणतो.

प्रमोद देर्देकर's picture

28 May 2019 - 7:43 pm | प्रमोद देर्देकर

आमच्या इथे 15 वर्षापूर्वी पनवेल इथून येणारे एक आजोबा आणि त्यांची मुलगी ह्यांच्याकडून आम्ही हातसडिचे पोहे घेत होतो.
पण ते दोघेही वारल्यानंतर पोहे बंद. आता दुकानातून घेतो.
तसेही आपल्या लहानपणी मिळणारे सगळे हाताने तयार करण्याचे पदार्थ आताशा मिळेनासे झालेत.
नाचणीच्या सालींच्या वड्या, कासाळुच्या कंदाचे सांडगे ,
भोपळ्याचे बियांची चटणी
असे अनेक पदार्थ माहिती अभावी वा वेळेअभावी दुर्मिळ झाले आहेत होतं आहेत.

अनिरुद्ध प's picture

28 May 2019 - 7:52 pm | अनिरुद्ध प

डी मार्त मध्ये मिळणारे बासमती पोहे चान्गले असतात, लवकर संपुन जातात, त्यामुळे बर्याचद मिळत नाहीत, असा अनुभव आहे.

असो

अनिरुद्ध

धर्मराजमुटके's picture

29 May 2019 - 9:50 am | धर्मराजमुटके

आता या खेपेस डिमार्ट मधून बासमती पोहे घेऊन एकदा प्रयोग करुन पाहतो. खरे तर हे पोहे नेहमीच्या पोह्यांपेक्षा पातळ दिसत असल्यामुळे मी घ्यायला थोडासा घाबरत होतो.

पोह्याच्या गिरणिवर मिळणारे पोहे गोडसर छान लागतात. तेच एक/दोन/तीन आठवड्याने खाऊन पाहा - चव गेलेली असते.
कारण भात(फोलासह) गरम पाण्यात घालून काढतात तेव्हा किंचिंत शिजते. मग रोलरमध्ये चेपतात. शिजलेले असल्याने काळाने चव उतरत जाते.

धर्मराजमुटके's picture

29 May 2019 - 10:09 am | धर्मराजमुटके

मला वाटते की तुमचा अंदाज बरोबर आहे. एकाच ब्रॅन्ड चे पोहे दरवेळी वेगळ्या चवीचे लागतात. बहुतेक बराच काळ दुकानात पडून राहिल्यामुळे चव बदलत असेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2019 - 8:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख आणि प्रतिसादांतील पोह्यांसंबंधीचा उहापोह आवडला ! :)

पोहे वापरून केलेले सर्व प्रकारचे पदार्थ आवडता हेवेसांन... पोह्यांचे पापड तर जीव की प्राण, वालाच्या बिरड्यासह तळलेले पोह्यांचे पापड एकदम वट्ट !

(स्वगत : हा लेख विडंबन असावा असा संशय मनात वारंवार उसळी का बरे घेत आहे? ;) :) )

यशोधरा's picture

28 May 2019 - 8:47 pm | यशोधरा

हा लेख विडंबन असावा

अय्यो! ऐसन हय का?

धर्मराजमुटके's picture

28 May 2019 - 8:51 pm | धर्मराजमुटके

नाही हो ! पोह्यांवर खरेचं माझं प्रेम आहे.

केदार-मिसळपाव's picture

28 May 2019 - 10:05 pm | केदार-मिसळपाव

तुळशीबागेजवळ एक दुकान आहे. तिथे विविध प्रकारचे पोहे मिळतात. तिथे प्रयत्न करा. तिथे बाजुला पाणीपुरी छान मिळते.

धर्मराजमुटके's picture

29 May 2019 - 10:08 am | धर्मराजमुटके

धन्यवाद ! पण ठाण्यावरुन इतक्या लांब केवळ पोहे आणण्यास जाणे जमेलसे वाटत नाही.

सुचिता१'s picture

28 May 2019 - 11:01 pm | सुचिता१

ग्राहक संघा त मीळणार पोहे डीमार्ट , बीग बजार पेक्शा खूप
चांगले असतात, पण त्यासाठी मेंबर बनायला लागेल.

विजुभाऊ's picture

28 May 2019 - 11:24 pm | विजुभाऊ

पोहे / चुरमुरे बनवायची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कोणी सांगेल का?

सुनील's picture

7 Jun 2019 - 6:48 pm | सुनील

चुरमुर्‍याचे ठाऊक नाही. पण पोहे बनवण्याची घरगुती पद्धत अशी.

भात सलग तीन दिवस पाण्यात भिजवून घ्यावा. पाणी दरदिवशी बदलावे. त्यानंतर तो वाळवून घ्यावा. वाळलेला भात नंतर उखळीत घेऊन कांडावा.

तीन दिवस पाणी पिऊन भात टम्म फुगलेला असतो! तो लगेच चप्पट होतो. फोले पाखडून घेतलीत की पोहे तयार!

गिरणीतही बहुदा हीच पद्धत असावी. अर्थात, तीन दिवस भिजवण्यात आणि एक दिवस वाळवण्यात वेळ घालवणे त्यांना परवडणारे नाही. तेव्हा गरम पाण्यात भात घालून तो नरम केला जात असावा. त्यानंतर प्रेसमध्ये घालून तो चप्पट केला जात असावा.

टीप - फोलपटासहित असलेल्या तांदळालादेखिल भातच म्हणतात!

पेणला चांगले पोहे मिळतील. आणि ठाण्यापासून जाऊन यायला हरकत नाही.

टर्मीनेटर's picture

9 Jun 2019 - 5:18 pm | टर्मीनेटर

+१
पेणला पोहे आणि पोह्याचे इतर पदार्थ उदा. पोह्याचे पापड, पोह्याचे पीठ, मिरगुंडे देखील चांगले मिळतात.

तेजस आठवले's picture

29 May 2019 - 2:58 pm | तेजस आठवले

जाडे हवेत का बारीक, मुंबई ग्राहक पंचायतीचे पोहे उत्तम प्रतीचे आणि स्वस्तही असतात. पण त्यासाठी मेंबर असायला हवे.
ठाण्यात आर्यक्रीडा मैदानामागे शाहू मार्केट जवळ त्यांचा डेपो आहे. तिकडे शिल्लक राहिलेल्या वस्तू मिळतात(माझ्या मते फक्त मेम्बरांना, तरी पण एकदा विचारून खात्री करा)
नाहीतर मला सांगा मी पुढच्या महिन्यात मागवून ठेवतो. किती हवेत?
अलिबाग, रोहा, पेण, नागोठणे ह्या ठिकाणी उत्तम पोहे मिळतात. पण त्यासाठी तुम्हाला ST स्टॅन्डपासून थोडे दूर असणारा गल्लीतला टपरीवजा कळकट वाणी गाठावा लागेल. किंवा स्वतःच्या गाडीने जात असाल तर पेण-नागोठणे वाटेत पोह्यांच्या गिरण्या आहेत, तिकडून डायरेक्ट उचलायचे पोहे. मस्त ताजे असतात.

अलिबाग, रोहा, पेण, नागोठणे ह्या ठिकाणी उत्तम पोहे मिळतात.

मला वाटते की हे जमविता येईल. शिवाय अधून मधून ठाण्यात कोकण बाजार ही असतात. तिथेही मिळू शकतील.

नाहीतर मला सांगा मी पुढच्या महिन्यात मागवून ठेवतो. किती हवेत?

मदतीबद्द्ल धन्यवाद ! वरील ठिकाणास भेट देण्यास जमले नाहीच तर नक्की व्यनि करेन.

वरुण मोहिते's picture

29 May 2019 - 4:08 pm | वरुण मोहिते

जायचे नसेल तर ग्राहक संघ मधून मागवा नाहीतर पेण ला रायगड बाजार आहेच.

परळी (खोपोली - पाली रस्ता, जांभूळपाडा स्टॉप अगोदर) इथून एकजण डोंबिवलीत आणतो. ४२रु/किलो . ज्या दिवशी स्टॉक येतो तेव्हाच्या आणि नंतरच्या चवीत फरक पडतो.

दिनेश५७'s picture

4 Jun 2019 - 9:08 am | दिनेश५७

मुंबई हून नाशिकला जाताना, घोटीजवळ किंवा भंडारदरा रोडवर मिळणारे पोहे चांगले असतात. मी एकदोन वेळाच तिथून घेतले होते , अलिकडे बरेच दिवसांत तिकडे गेलो नसल्याने ती चव अजून टिकून आहे का माहीत नाही.

धर्मराजमुटके's picture

4 Jun 2019 - 9:28 am | धर्मराजमुटके

हा माझा ने हमीचा रस्ता आहे. हे जमू शकेल नक्कीच ! माहिती बद्दल धन्यवाद !
मिपावर इतके पोहेप्रेमी लोक्स आहेत हे बघून आनंद झाला.

धर्मराजमुटके's picture

7 Jun 2019 - 1:50 pm | धर्मराजमुटके

आज जागतिक पोहे दिन आहे ! पोहेप्रेमींना शुभेच्छा !

देवआंनद यांच्या " हम दोनो " या जुन्या चित्रपटातील माझे एक आवडते गाणे आहे .ते असे "कभी खुदपे,कभी हलातसे ,रोना आया,बात निकली तो हर बातपे रोना आया. पण मी या पोह्यांना कंटाळून माझ्या भावना आशा व्यक्त करतो "कभी दडपे ,कभी सुजके, रोना आया. बात बदली तो ,हर बारमे उपमा खाया .

प्रमाणाच्या बाहेर अवांतर.... ;)
कोणी गव्हाचे कुरमुरे [ मुरमुरे ] खाल्लेत का ? मस्त चव लागते त्याची. :)
बादवे... माझ्या पाहण्यात आलेला कुरमुरे बनविण्याचा इडियो इथे देउन जातो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jiyo Re Baahubali |Drums Version | Baahubali 2 The Conclusion | Prabhas & Anushka Shetty |M.M.Kreem

कंजूस's picture

11 Jun 2019 - 7:15 am | कंजूस

गव्हाचे कुरमुरे
गव्हाचे कुरमुरे फार खारट असतात.

जॉनविक्क's picture

11 Jun 2019 - 10:05 pm | जॉनविक्क

तसे भिजवलेले पोहे तिखट, मीठ, कांदा, टोमॅटो आणि फोडणी टाकून मस्त बनवले जातात ते कोणी खाल्ले आहेत का ?

जॉनविक्क's picture

12 Jun 2019 - 2:53 am | जॉनविक्क

जसे पोहे पाण्यात भिजवून बनवले जातात तसे ते पाण्याऐवजी ताकात भिजवूनही बनवायची पध्दत आहे. छान लागतात.

"पोहे" "कुरमुरे " या सारखा विषय प्रथमदर्शनी साधा वाटला तरी मराठी माणसाचे या गोष्टीशी फार जिव्हाळ्याचे सबंध आहेत ." कठीण काळात मी माझे नशीब अजमावीत होतो त्या वेळी मी रात्री फळीवर झोपत असे आणि चुरमुरे खाऊन दिवस काढले कि हो!!! अशा सारखी " विधाने आपण बऱ्याच थोर मोठ्या लोकांच्या तोंडून ऐकली असतील . महाराष्ट्रात प्रत्येक पोह्यची चव मात्र भाषे प्रमाणे बदलत जाते .या धाग्यात तशी अनेक उदाहरणे आली आहेत . माझ्या लहानपणी, माझी आई घरातच रात्री गरम पाण्यात भात भिजवत असे व सकाळी भट्टीतून पोहे तयार करून आणले जात .एक भल्या मोठ्या चुलीवर ,मोठ्या कढईत ते वाळुत भाजून घेतले जात , त्या लाल भडक कढईत ,सारी सूर्य मालिका दिसत असे आणि जळणासाठी भट्टीत कोंडा टाकणारा माणूस म्हणजे दिव्य . उघडाबंब ,घामाने डबडबलेला, त्यातूनच भट्टीत बीडी पेटवून शिलगावणारा किंव्हा भट्टी समोर बसून गरम चहा पिणारा . दिवाळीत हा व्यवसाय फारच जोरात असतो .मशीन मधून पोहे तयार करताना " ताई !! पव जाड काढू कि पाताळ ''असं आपुलकीने विचारणारा भक्त सुदामा .ज्यांनी हे अनुभवले आहे तेच सांगतील . कोल्हापुरा सारखे चुरमुरे जगात कुठेही मिळणार नाहीत .एखाद्या ढेर पोट्या माणसाने नवीन पांढराशुभ्र हाताचा बनियन घालावा ,तसे ते दिमाखदार दिसतात तर पंढरपुरी कुरमुरे मगरीच्या पाठी सारखे दिसतात . जयसिंगपूरच्या पुढे आल्यावर तिथे भडंग खूप छान मिळतो . हा चरमुरा "हवळा "ह्या विशिष्ठ भाता पासून करतात कि जे आता कालबाह्य होत आहे . याचे वाण कोल्हापुरातून केरळला पोहचले आहे व तेथून भात ,कोल्हापुरात येते . हा चुरमुऱ्याचा कारखाना पहायला, मी एकदा गेलो होतो . गुप्ततेसाठी या कारखान्याचे मालक मला आत पाहण्यास मज्जाव करतील असे मला प्रथम वाटले पण या उलट त्यानीं माझे स्वागतच केले. कुठलाही आडपडदा न ठेवता संपूर्ण कारखाना त्यांनी मला दाखवला कारण त्यांना ठाम आत्मविश्वास होता कि या माणसांना पोह्याची किव्हा भडंगाची चांगली चव कळते,याचा व्यवसाय मात्र यांना अजिबात कळत नाही.

श्वेता२४'s picture

12 Jun 2019 - 11:15 am | श्वेता२४

कोल्हापुरा सारखे चुरमुरे जगात कुठेही मिळणार नाहीत

माझ्यासाठी हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.

नीलकांत's picture

12 Jun 2019 - 1:16 am | नीलकांत

एक नंबर टेस्टी पोहे खायचे असल्यास इंदोर जावे. खास इंदोरी पोह्यांवर खास जाड शेव भुरभुरून खावेत ते इंदोरला. मस्त शेव पोहे खावे आणि व गरमा गरम जिलेबी.
इंदोरचे पोहे हे खास चवीचे आहेत असं निरीक्षण आहे. इंदोरची चौकाचौकात मिळणारी साबुदाना खिचडी सोबत आलुचिप्स मस्तच लागतात.

नागपुरात पोहे खावेत ते चनारस्सा टाकून. मस्त पोह्यांवर चना आणि तिखट रस्सा टाकून तो भुरकावा.

तुमच्या मुंबई ठाण्याला पोहे कुठे मिळतील ते सांगता येणार नाही मात्र कधी या दोन्ही गावी गेलात तर पोहे खायला विसरू नका.

- नीलकांत

माहितगार's picture

12 Jun 2019 - 8:02 am | माहितगार

अनुषंगिक अवंतरासाठी क्षमस्व

मी पोह्यात आयर्न असते असे क्लेम्स काही वेळा वाचले ऐकले आहेत. पण तोच क्लेम तांदुळ भाता बाबत ऐकल्याचे आठवत नाही. तांदुळात नाही केवळ भिजवणे दाबणे या प्रक्रीयेतून आयर्न कसे अ‍ॅड होत असेल असा प्रश्न बर्‍याचदा डोक्यात येतो .

पोह्यात आयर्न यात तथ्य आहे का ?

असेल तर पालकशी तुलना केली तर किती प्रमाणात उपलब्ध होते ?

तांदुळात नाही मग पोह्यात कसे येते ?

कुणा जाणकारांना माहित असल्यास जाणून घेण्याची इच्छा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jun 2019 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे

तांदूळ आणि किंवा पोह्यांत, लक्षणिय प्रमाणात, लोह दोन प्रकारे असू शकते :

१. पाककृती करताना सर्वसामान्य भातापासून बनवलेले पोहे लोखंडी कढईत अथवा तव्यावर शिजवले असता त्यांच्यात लोहाचा अंश जातो.

२. जेनेटिक इंजिनियरिंग : सर्वसाधारण भातात ०.२ मिग्रॅ / १०० ग्रॅ लोह असते (स्त्रोत : USDA).

२.अ) सोयाबीनमधील फेरिटिन या प्रोटीनचे जनुक (soybean gene for the iron-storage protein, ferritin) भाताच्या जनुकांत संक्रमित करून बनविलेल्या भाताच्या वाणात नेहमीपेक्षा तीनपट जास्त लोह असते.
https://www.researchgate.net/profile/Toshihiro_Yoshihara/publication/131...

२.आ) भातामधील nicotianamine synthase तयार करणार्‍या जनुकाला सक्रिय करणे.
https://www.pnas.org/content/106/51/22014

यासंबंधी अजूनही काही प्रकारचे संशोधन चालू आहे.

चिनार's picture

12 Jun 2019 - 12:54 pm | चिनार

आओ कभी नागपूर में..
सावजी चना पोहा खिलाते है..