गाभा:
हा घ्या अजून दुवा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3674458.cms
शिवरायांच्या जन्मदिवसाचा, त्यांच्या गुरूचा गोंधळ कमी म्हणून की काय, आता हा अजून एक वाद!
माझ्या मते हा प्रश्न केवळ शिवरायांपुरता मर्यादित नाही. तर ऐतिहासिक साधनांकडे आम्ही जे दुर्लक्ष केले, त्याच्या जपणूकीची जी हेळसांड केली, त्याचा हा परिणाम आहे.
यातून आम्ही बोघ घेणार आहोत काय?
प्रतिक्रिया
5 Nov 2008 - 6:53 pm | विसोबा खेचर
माझ्या मते हा प्रश्न केवळ शिवरायांपुरता मर्यादित नाही. तर ऐतिहासिक साधनांकडे आम्ही जे दुर्लक्ष केले, त्याच्या जपणूकीची जी हेळसांड केली, त्याचा हा परिणाम आहे.
अगदी सहमत..!
परंतु जन्मावरून अन् गुरूंवरून अलिकडे एव्ह्री अल्टरनेट डे खुद्द शिवरायांनाही दावणीला बांधलं जात आहे याचं वाईट वाटतं!
त्यापेक्षा वयाच्या २६ व्या वर्षी सीमांचं महत्व ओळखून स्वतंत्र आरमार स्थापन करणार्या शिवरायांचं स्मरण करून, त्यांचा आदर्श ठेऊन भारताच्या सर्व सीमांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेऊन आजच्या घडीला वेगवेगळ्या शहरात बाँबस्फोट करून दहशतवाद माजवणार्या अतिरेक्यांना कसा प्रतिबंध करता येईल हे पाहिलं पाहिजे..
परंतु आम्ही इकडे महाराजांच्या जन्मावरून वाद घालण्यात मग्न आहोत आणि तिकडे पाकिस्तानी/बांगलादेशी घुसखोर रोज नव्याने इथे दहशतवाद माजवायला येत आहेत..!
असो..
आपला,
(शिवरायांचा भक्त) तात्या.
5 Nov 2008 - 9:47 pm | भास्कर केन्डे
तात्या, अगदी मनातलं बोललात.
शिवरायांसारखा राष्ट्रपुरुष आपल्याला लाभला हे आपले भाग्य समजून त्यांच्या मर्गदर्शनाचा फायदा घ्यायचा सोडून आम्ही काहीचे काही करत आहोत. खेदजनक आहे हे.
सुनील म्हणतात तसे आपण आपल्या ऐतिहासिक वारशांना नीट जपत नाही ही क्लेशदायक वस्तुस्थिती आहे. कधी सुधारणार आपण स्वतःला?
आपला,
(शिवरायांचा भक्त) भास्कर
5 Nov 2008 - 11:19 pm | सुक्या
शिवरायांचे गुरु, शिवरायांचा जन्म या गोष्टींवर वाद घालनारे सारे रिकामटेकडे आहेत. आदर्श पुरुषाचे जिवन डोळ्यासमोर ठेवुन आपले जिवन सम्रुद्ध करण्याचे सोडुन हे नसत्या गोष्टींवर वेळ अन पैसा वाया घालवत आहेत. तोच वेळ अन् पैसा विधायक कामांसाठी खर्च केला तर असता तर शिवरायांनी जिवाचे रान करुन बांधलेल्या गड किल्ल्यांना अशी मोडकळीस येण्याची वेळ आली नसती.
जय भवानी !! जय शिवाजी !!
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)