राजीव गांधी, भा नौ पो विराट, लक्षद्वीप, सुट्टी वगैरे...

Primary tabs

mayu4u's picture
mayu4u in काथ्याकूट
11 May 2019 - 3:28 pm
गाभा: 

राजीव गांधींनी आय एन एस विराट विमानवाहु नौकेचा टॅक्सी सारखा वापर केला होता, असा आरोप मोदींनी केल्यानंतर जालावर थोडी शोधाशोध केली. त्यात खालील माहिती मिळाली:

डिसेंबर १६, १९८७

गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस राजीव गांधींनी आपली मित्रमंडळी व सोनिया गांधींचे कुटुंबीय यांच्या समवेत अंदमानमध्ये सुट्टी साजरी केली होती. यंदाच्या वर्षी त्यासाठी राजीव गांधी यांनी लक्षद्वीपमधल्या एका निर्मनुष्य बेटाची निवड केली आहे. सुरक्षारक्षक, कंत्राटदार व काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या या सहलीसाठी विशेष मेहनत घेत आहेत… सध्याच्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान व त्यांच्यासोबतचे पाहुणे ख्रिसमसनंतर एक आठवडा येथे व्यतित करणार आहेत.

अभियंते आणि कामगार हेलीपॅड, तात्पुरती निवासयोजना आदी उभारण्यात मग्न आहेत. नारळ व मासे वगळता बाकी प्रत्येक गोष्ट मुख्यभूमीवरून म्हणजे २०० ते ४०० किलोमीटरवरून आणावी लागत आहे, ज्याद्वारे आधुनिक सोयीसवलती देता येतील. या सगळ्या गोष्टी हवाई मार्गाने आणण्यात येत आहेत. यामध्ये आचारी, पाणी, जनरेटर्स आणि सुरक्षारक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

डिसेंबर २८, १९८७

सामान्यांसाठी बेटांवर जाण्याचा मार्ग बंद
पंतप्रधानांच्या निर्मनुष्य अशा आर्चिपेलागोतल्या बेटावरील सहलीसाठी मुख्यभूमीपासून लक्षद्वीपपर्यंतची माणसांची वाहतूक अक्षरश: बंद करण्यात आली आहे. ज्या कोणाला लक्षद्वीपला जायचं आहे त्यांना पंतप्रधानांची सहल संपेपर्यंत थांबावे लागणार आहे. जानेवारी १५ पर्यंतचं सगळ्या बोटींचं तिकिट वितरण बंद करण्यात आलं आहे.

जानेवारी २४, 1988
किमान आठ विदेशी नागरिकांचा समावेश पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांच्या नववर्षाच्या या सहलीमध्ये होता. या सगळ्या ताफ्यामध्ये पुरूष, महिला व मुलं मिळून २४ जण होते. विविध गोष्टींसाठी या २४ जणांची खातिरदारी करण्यासाठी ७० कर्मचाऱ्यांची फळी सज्ज होती. बंगारामच्या सर्व बाजुच्या सुरक्षेसाठी लक्षद्वीप पोलिस व मध्यप्रदेशच्या विशेष पोलिस पथकासह १,२०० पोलिसांची फौज बंगाराम बेटाच्या परीघावर तैनात होती.
नौदलाची २४ तास नजर या परीसरावर सुरक्षेच्या दृष्टीनं होती. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानुसार या सहलीसाठी चोख बंदोबस्त पुरवण्यासाठी भारतीय नौदलाच्या आएनएस विराट, आएनएस विंध्यगिरी, आएनएस तारागिरी व आएनएस मगर या युद्धनौका सज्ज होत्या.

बातम्यांमध्ये विराट किंवा अन्य युद्धनौकेवर पार्टी करण्यात आल्याचं म्हटलेलं नाही. मात्र, राहुल गांधी यांनी ते राजीव गांधींसोबत विराट वर गेल्याचं कबूल केलं आहे. तसेच, नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्यासमवेत इंदिरा गांधी आणि बालवयातले संजय आणि राजीव गांधी युद्धनौकेवर असल्याची प्रकाशचित्रं पाहिली. हे सर्व वाचल्यावर काही प्रश्न मनात आले:

१. पंतप्रधानांच्या कुटुंबियांना युद्धनौकेवर प्रवेशाची अनुमती असते का? असावी का?

२. पंतप्रधानांच्या सुटीकरता एवढा खर्च करावा का? त्यांच्या संरक्षणाकरता विराट आणि सोबत अन्य युद्धनौका तैनात करणं हा नक्कीच खर्चिक मामला असावा. शिवाय मुख्य भूमीवरून सगळी सामुग्री द्वीपांवर नेणं हे पण स्वस्त नसावं.

३. पंतप्रधानांचं संरक्षण करताना राष्ट्राची सुरक्षा कमजोर झाली असावी का?

जाणकारांच्या आणि अन्य सदस्यांच्या मतांच्या प्रतीक्षेत.

===========================================================================
संदर्भ:
https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19880131-idyllic-vac...

https://www.tv9bharatvarsh.com/loksabhaelections/nehrus-grandsons-rajiv-....हटमळ

https://www.inmarathi.com/rajiv-gandhi-family-picnic-photos-revealed/

https://news.google.com/newspapers?nid=P9oYG7HA76QC&dat=19871230&printse...

https://www.indiatoday.in/elections/lok-sabha-2019/story/ins-viraat-raji...०९

https://indianexpress.com/article/explained/30-yrs-ago-rajiv-gandhi-in-l...

https://www.loksatta.com/elections-news/indian-express-archives-30-years...

प्रतिक्रिया

mayu4u's picture

11 May 2019 - 3:33 pm | mayu4u

१. पंतप्रधानांच्या कुटुंबियांना युद्धनौकेवर प्रवेशाची अनुमती असली, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी युद्धनौकेवर जाऊ नये. नैतिकदृष्ट्या ते योग्य नाही, असं मला वाटतं.

२. पंतप्रधानांच्या सुटीकरता झालेला खर्च त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या भरून घ्यावा. आणि अशा प्रसंगात शासकीय कर्मचारी, सेनादले यांना कमला लावू नये.

३. राष्ट्राची सुरक्षा सदैव महत्वाची. कोणत्याही कारणाने त्याला बाधा येईल असं वर्तन कुणीही करू नये. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने याविषयी अधिक आग्रही आणि सतर्क असायला हवं.

शशिकांत ओक's picture

12 May 2019 - 11:49 pm | शशिकांत ओक

मोदी काय म्हणाले?

At a campaign rally on Wednesday, Prime Minister Narendra Modi said Rajiv Gandhi and his family, including his in-laws from Italy, had used the aircraft carrier INS Viraat as a “personal taxi” on a private “10-day vacation” on an island.

मोदींनी राजीव गांधीेेच्या सहकुटुंब जाण्याबाबत नेव्हीच्या बोटींचा टॅक्सी म्हणून वापरायचा उल्लेख केला पण त्या सोबत एक महत्वाचा उल्लेख की त्यांचे इन लॉज पण सोबत होते. ते त्यांनी असे लपेटून सांगितले की मीडियावाले बाकीची बकवास करत नेव्हीतल्या वरिष्ठांची साक्ष काढायला धावले...
अहो साध्या परदेशी व्यक्तीला भाड्याने घर यायचे असेल तर पोलिस खाक्याचा किती त्रास असतो. मिलिटरीच्या कुठल्याही युनिट मधे विदेशी व्यक्तीच्या प्रवेशाला सक्त मनाई असते...रक्षा मंत्रालयातून परवानगी आणावी लागते.
पंत प्रधान म्हणून सुटीवर आपल्या बायको मुलांंना नेण्याला मुभा असावी. तो खर्च त्यांनीआपल्या पदरच्या पैशातून करावा अशी माफक अपेक्षा जरूर असावी.
पुढील काही काळानंतर याबाबत काही बिंगे बाहेर काढली जाणार असल्याचे ते बिगुल आहे. कारण मोदींना एकूण 24 जणांपैकी 8 परदेशी नातलगांच्या कारवायांबाबतची अधिक माहिती विविध इंटलिजन्स कडून मिळाली असली पाहिजे.
जितक्या लवकर काँग्रेस गांघींमुक्त होईल तितके बरे अशी आतापासून तयारी चालू असल्याची कुणकुण आहे.

तिकडे इमरान खान ने 2 आठवड्यापुर्वीच आपला राजिनामा आर्मीला सादर केला आहे. ही पण बातमी आहे...

माहितगार's picture

11 May 2019 - 4:13 pm | माहितगार

तत्वतः पंतप्रधान आणि राष्ट्रपती जिथे सुट्टीवर असतील तिथे अगदी मिडल रेंज विमान आणि युद्धनौकांकरवी सुरक्षा देण्यास काहीच हरकत नाही पण

१) युद्ध दृष्ट्या सामरीक दृष्ट्या महत्वाची सामग्रीस पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी प्रियॉरीटीने वापरली जाणे प्रियॉरीटीने टाळले पाहिजे. यात पंतप्रधान राष्ट्रपती यांना शुत्रुपक्षाकडून सरळ धोका संभवतो.

२) कुतूहल म्हणून काही मिनीटे संरक्षण स्थळे सिव्हीलीयन्सना दाखवणे वेगळे , पण सैनिकी स्थळे आणि साधने हि सिव्हीलीयन्सच्या उपस्थितीच्या सुरक्षीत जागा नव्हेत याचे भान हवे खास करून मंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या कुटूंबाच्या सुरक्षीततेच्या जागा नव्हेत सैनिकी सामग्री या शत्रुपक्षाचे कोणत्याही क्षणी लक्ष्य होऊ शकतात. भारताच्या गृहमंत्र्याच्या मुलीचे अपहरण अशा वेळी आठवते.

पंतप्रधानांचे कुटूंबीय युद्ध साधने जसे नौकांवर असता शत्रुपक्षाचा हल्ला होणे सैन्याने पंतप्रधानांच्या नाते वाईकांना बघायचे कि शत्रुशी सामना करायचा ?

३) लक्षद्विप सुट्टीबद्दल म्हणाल तर सुट्टीची जागा आणि युद्धनौकेच्या प्रवासाची दिशा दोन्ही काही महिने आधी पासून पूर्व नियोजित असावे असे दिसते. मिडल लेव्हलची एखादी युद्ध नौका सुरक्षेसाठी तैनात करण्यास हरकत नाही. शत्रूपक्षापासून गोपनीयता म्हणून खासगी दौर्याची दिशा सरकारी दौरा म्हणून दाखवण्यासही हरकत नाही. पण सुरक्षेसाठी म्हणून खासगी दौर्‍याच्या दिएशेने सरकारी दौरा दाखवला गेला असेल तर मध्ये काही दशकांचा काळ गेल्यावर खोटे रेटण्याची संबंधीत आधीकार्‍यांना गरज नसावी. असे मला वाटते.

महासंग्राम's picture

11 May 2019 - 5:24 pm | महासंग्राम

पं

  1. पं तप्रधानांनी खासगी सुट्टीवर जाणे गैर नाही.
  2. पंतप्रधानांनी कुटुंबाला म्हणजेच बायको आणि मुले (स्वतःची) सोबत नेणे गैर नाही.
  3. पंतप्रधानांनी शासकीय दौऱ्यावर म्हणजेच बायको आणि मुले (स्वतःची) सोबत नेणे गैर नाही.
  4. पंतप्रधानांनी शासकीय दौऱ्यावर कुटुंब सोडून इतरांना स्वखर्चाने नेणे गैर नाही .
  5. पंतप्रधानांनी शासकीय दौऱ्यावर कुटुंब सोडून इतरांना शासकीय खर्चाने नेणे गैर आहे.
  6. पंतप्रधानांनी खासगी सुट्टीवर जाण्यासाठी नौदलाच्या जहाजाचा वापर करणे गैर आहे.

३. पंतप्रधानांचं संरक्षण करताना राष्ट्राची सुरक्षा कमजोर झाली असावी का?

नौदलाने अद्याप तसा खुलासा केल्याशिवाय व्यक्त होऊ शकत नाही.

नाखु's picture

11 May 2019 - 5:20 pm | नाखु

तसा खुलासा करेल हे मानणे उच्च भाबडेपणाचे लक्षण आहे.
तत्कालीन वरीष्ठ अधिकारी आणि संबंधित सचिवपदी असलेल्या सनदी अधिकाऱ्यांना नोंदी ठेवल्या तर काय होईल ते माहीत नसेल का??
त्यांची परवानगी वगैरे फिजूल बाबी आहेत.
राहीला प्रश्न खरेच अशी कौटुंबिक सहल आयोजित केली होती का?
तर तथाकथित हितचिंतक म्हणतात अशी सहल नव्हती फक्त शासकीय दौरा होता आणि युवराज म्हणतात मी सुद्धा होतो

आता आली पंचाईत.
बाकी नेहरू गांधी म्हणजे होली काऊ आहे मिपावर,ते कधीच चुकू शकत नाहीत यावर असिम आणि अंबुजा सिमेंट विश्वास असलेली बरीच प्रकांडपंडीत विचारवंताची मांदियाळी आहेच.
काहींनी वेगळी चूल मांडली असली तरी,चूळ ओकारी साठी सटी सहामाशी इथे मोकळे होतात.
इथले होयबा सुद्धा माहेरवाशिणी चे कोडकौतुक अगदी आनंदाने करतात.

फक्त नेहरू गांधींमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले अशा भाकडकथांवर विश्वास नसलेला कांची पत्रेवाला नाखु

सुबोध खरे's picture

11 May 2019 - 9:05 pm | सुबोध खरे

१) पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि राष्ट्रपती हि घटनात्मक पदे आहेत तेंव्हा त्यांना कोणत्याही लष्करी ठाण्यावर/ जहाजात जाण्याचा पूर्ण हक्क आहे.

२) त्यांचे नातेवाईक कोणत्याही घटनात्मक पदावर नसतील तर त्यांना अशा ठिकाणी जाण्याचा सामान्य नागरिक म्हणून तेवढाच हक्क असेल जेवढा इतर कोणत्याही नागरिकासाठी.

३) म्हणजेच जेंव्हा नौदलाचे जहाज सामान्य जनतेच्या भेटी साठी नौदल सप्ताहात खुले केले जाते किंवा इतर वेळेस जेंव्हा नौदल अधिकाऱ्यांच्या मित्र नातेवाईक याना पाहण्यास खुले असते तेंव्हा( उदा. रविवार किंवा सुटीच्या दिवशी) ते सुद्धा जहाज बंदरात असते तेंव्हाच.

४) जहाज सराव किंवा गस्त घालत असेल किंवा तैनात असेल तर तेंव्हा कोणाच्याही कुटुंबाला परवानगी नाही. (केवळ नौदलाचा कुटुंब दिवस असेल तेंव्हा खास परवानगीने कुटुंबियांना( आई वडील बायको आणि मुलांना) समुद्रात फेरफटका मारण्यासाठी नेले जाते तो अपवाद सोडल्यास)

५) नौदलाचे/ वायुदलाचे हेलिकॉप्टर वापरायला नागरिकांना इतर परवानगी नाही परंतु नैसर्गिक आपत्ती किंवा जीवरक्षणाचे वेळेस (माणूस अडकला असेल बुडत असेल पूर भूकंप सारखी नैसर्गीक आपत्ती इ) जेंव्हा मुख्यालयाच्या आदेशाने त्यांना त्याचा वापर करता येतो

६) सुटीवर असताना कोणत्याही नागरिकाला नौदलाचे/ वायुदलाचे हेलिकॉप्टर वापरायला परवानगी नाही. फक्त अंदमान पोर्ट ब्लेअर ते ताम्बरम किंवा पूर्वांचलातून(गुवाहाटी ते दिल्ली) किंवा सियाचेन वरून( लेह ते चंदीगड) सुटीवर परत येण्यासाठी नेहमी फेऱ्या मारणाऱ्या वायुदलाच्या विमानाने त्यात जागा असेल तर येता येते

७)एखाद्या अतिमहत्त्वाच्या माणसाच्या सुरक्षिततेसाठी "देशाच्या हद्दीत" "विमानवाहू नौका" वापरण्याची परिस्थिती एखाद्या देशावर आली तर त्या देशाच्या संरक्षण सिद्धतेची पार वाताहत झाली आहे असे समजावे लागेल. कारण या नात्याने दिल्लीत फिरण्यासाठी त्यांना रणगाड्यातूनच फिरावे लागेल. कारण जर भर समुद्रात त्यांच्यावर एखादे दुसरे राष्ट्रच हल्ला करू शकेल फडतूस दहशतवादी किंवा नक्षलवादी जर समुद्रातील विमानवाहू नौकेपर्यंत पोचू लागले तर हि अत्यंत गंभीर स्थिती आहे असेच म्हणावे लागेल. विक्रांत किंवा विराट वर हल्ला करण्याची जीवावर उदार झालेल्या एल टी टी ई च्या दहशतवाद्यांची पण हिम्मत होणार नाही.

८) अशा हल्ल्यासाठी विमानवाहू नौका तैनात करण्याची आवश्यकता होती असे म्हणणे म्हणजे उंदीर मारण्यासाठी ब्राम्होस या जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्राची गरज आहे म्हणण्याइतका हास्यास्पद दावा करण्यासारखे आहे.( तेंव्हा श्री राजीव गांधी यांच्या सुरक्षेसाठी विराट नौकेला तेथे तैनात केले होते हा दावा तितकाच भंपक आहे)

९) किट्टू या एल टी टी ई च्या दहशतवाद्यांच्या उप प्रमुखाला मारण्यासाठी तटरक्षक दलाचे १२०० टनाचे (सी जि एस विवेक) गस्ती जहाज त्यावरील एका तोफेसकट पुरेसे होते. विराटचा आकार २८००० टन इतका होता आणि त्यावर १८ लढाऊ हॅरियर विमानांची स्क्वाड्रन तैनात असे. ( पाकिस्तानच्या अख्ख्या वायुदलात तेंव्हा फक्त २८ F-१६ विमाने आणि इतर मिराज ३ मिराज ५ इ जुनी विमाने होती)

१०) श्री राजीव गांधी विराट वर गेले असतील तर ते सुटीला जोडून अधिकारीक तत्वावर( OFFICIAL DUTY COMBINED WITH HOLIDAY) साठी गेले तर त्यात काहीही गैर नाही. पण त्यांच्या कुटुंबाला समुद्रात असणाऱ्या विमानवाहू नौकेवर कोणतयाही कारणासाठी कशाही तर्हेने नेणे हे संपूर्णपणे गैर आहे आणि पदाचा गैरवापर करणारे आहे याबद्दल मला कोणतीही शंका नाही

११) मी विक्रांत या भारताच्या विमानवाहू नौकेवर २ वर्षे वैद्यकीय विभागप्रमुख म्हणून काम केलेले आहे (आणि विराट वर १५ दिवस) VIKRANT STANDING ORDERS या विक्रांतवर काम करण्यासाठी असणारे नौदलप्रमुखानी जरी केलेले आदेश हे मी पूर्ण वाचले आहेत. त्याचीच एक नक्कल विराट VIRAAT STANDING ORDERS साठी केलेली होती. त्यात मी वर लिहिलेल्या गोष्टी लेखी स्वरूपात आहेत.

१२) या नियमात "बदल करणे" हे राष्ट्रपतींच्या आदेशाने( त्यांना घटनेने तो अधिकार दिलेला आहे) नौदलप्रमुखानी करणे शक्य आहे. पण नियमाना अपवाद करणे हे नक्कीच अनुचित आहे असे माझे मत आहे.

mayu4u's picture

11 May 2019 - 10:22 pm | mayu4u

तुमच्याकडून मिळालेल्या माहितीने अनेक शंकांचं निरसन झालं, आणि काही गोष्टींवरचा विश्वास दृढ झाला. पुनश्च धन्यवाद!

माहितगार's picture

11 May 2019 - 10:28 pm | माहितगार

खालील कॉमेंट आवडल्या गेल्या आहेत. पण त्या खाली शंका विचारतोय

७)एखाद्या अतिमहत्त्वाच्या माणसाच्या सुरक्षिततेसाठी "देशाच्या हद्दीत" "विमानवाहू नौका" वापरण्याची परिस्थिती एखाद्या देशावर आली तर त्या देशाच्या संरक्षण सिद्धतेची पार वाताहत झाली आहे असे समजावे लागेल. कारण या नात्याने दिल्लीत फिरण्यासाठी त्यांना रणगाड्यातूनच फिरावे लागेल….

८) अशा हल्ल्यासाठी विमानवाहू नौका तैनात करण्याची आवश्यकता होती असे म्हणणे म्हणजे उंदीर मारण्यासाठी ब्राम्होस या जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्राची गरज आहे म्हणण्याइतका हास्यास्पद दावा करण्यासारखे आहे.( तेंव्हा श्री राजीव गांधी यांच्या सुरक्षेसाठी विराट नौकेला तेथे तैनात केले होते हा दावा तितकाच भंपक आहे)

एक ) पाकीस्तानने २६/११ ला जसा मुंबईवर हल्ला केला, पठाणकोट विमानतळावर केला तसे प्रयोग पाकिस्तान भारतीय युद्ध नौकांवर करणारच नाही याची शाश्वती कशा पद्धतीने देता येते.

दोन) इंदिरा गांधींचा रक्षकच भक्षक झाला, समजा युद्धनौकेवर पंतप्रधानचिची पत्नी असेल आणि पाकीस्तानला विकल्या गेलेल्याने गृहमंत्र्याची मुलगी किडनॅप केली अशी स्थिती पंतप्रधानाच्या पती/पत्नीवर न होवो आली तर काय ?

१२०० टनाची एक युद्धनौका पुरली असती.. विराटची गरज नव्हती असे त्यांना म्हणायचे आहे.
बाकी, तटरक्शक दलाच्या नाकाखालून हे अतिरेकी भारतात आलेच, तसे तर ते कुठेही जाऊ शकतात, अगदी वर्ल्ड ट्रेड सेंटर पण पाडलेच की.

त्याची तुलना अनाठायी आहे.

व्यक्तिशः मला पंतप्रधानाने कुठेही जाताना सुरक्षा घेऊनच जावे असे वाटते. अगदी सुट्टी असली तरीही. अर्थात अख्खी युद्धनौका पंतप्रधानांच्या सुरक्षेला लागते का हा प्रश्न आहेच!

सुबोध खरे's picture

13 May 2019 - 9:53 am | सुबोध खरे

युद्ध नौका खोल समुद्रात सुरक्षित असतात.
१९ मे १९९१ या दिवशी( रविवारी सकाळी) आम्ही विक्रांतवर १ महिना समुद्रात गस्त घालून परत आलो होतो परंतु रविवारी संध्याकाळी म्हणजेच १९ मे रोजी आम्हाला सगळ्यांना परत बोलावून घेतले आणि सर्व युद्धनौकांचा ताफा परत समुद्रात पाठवला गेला. मी बोटीच्या कॅप्टनना विचारले कि एवढ्या तातडीने का परत बोलावले त्यावर ते काही तरी घातपाताची शक्यता आहे असे मोघम बोलले.( जास्त बोलण्याची किंवा विचारण्याची प्रथा नाही लष्करात)
२० मे रोजी आम्ही रत्नागिरीच्या समुद्रात किनाऱ्यापासून साधारण ८-९ किमी आत नांगर टाकून थांबलो होतो
२१ मे १९९१ मंगळवार या दिवशी रात्री मी कॅप्टन बरोबर बोलत होतो तेंव्हा एक बिनतारी संदेश आला हा संदेश आल्याबरोबर कॅप्टनने अधिष्ठासी अधिकाऱ्याला बोलावून शास्त्रागाराच्या तिन्ही चाव्या मागवून घेतलेल्या आणि स्वतःकडे ठेवल्या. सगळे स्थिर स्थावर झाल्यावर त्यांनी मला सांगितले कि श्री राजीव गांधी यांची हत्या झाली आहे आणि श्रीमती गांधी यांच्या हत्येनंतर झाली तशी गोंधळाची स्थिती होऊ नये म्हणून मी शस्त्रागार बंद करून चाव्या माझ्या कडे घेतल्या आहेत. जहाज जेंव्हा समुद्रात असते तेंव्हा समुद्रातून कोणी येऊ न घातपात करू नये म्हणून त्याच्या भोवती दिवसा आणि रात्री असा २४ तास खडा पहारा असतो शिवाय विमानवाहू नौकेच्या आसपास समुद्रात खाली एक पाणबुडी सतत फिरत असते. कोणत्याही होडक्याला / माणसाला कोणत्याही कारणास्तव जहाजाच्या ३०० मीटर मध्ये पण येऊ दिले जात नाही.
लष्करी गुप्तचर खात्याने श्री राजीव गांधी याना हत्या होण्याची शक्यता आहे हे स्पष्ट शब्दात सांगितले होते. पण तरीही त्यानी श्रीपेरुम्बदूर येथे जाण्याचे ठरवले.
अशीच बातमी श्रीमती इंदिरा गांधी याना लष्करी गुप्त हेर खात्याने दिली होती त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि आपला जीव गमावून बसल्या. मृत व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये असा शिष्टाचार आहे परंतु दोन्ही बाबतीत नेत्यांचा निष्काळजीपणा, आगाऊपणा आणि अंधविश्वास त्यांच्या हत्येला कारणीभूत ठरला हि वस्तुस्थिती आहे.

गामा पैलवान's picture

13 May 2019 - 7:32 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

तुमची माहिती रोचक आहे. काहीतरी गडबड होणार याची चाहूल आधीपासनं लागलेली होती तर.

मी ऐकलंय की राजीव गांधी पेरुम्बुदूरास जाण्याआधी महाराष्ट्रात (मुंबई व कदाचित बाहेर) प्रचारार्थ आले होते. तेव्हा भोवती शरद पवारांचा पहारा होता. महाराष्ट्रात असतांना राजीव गाधींना दगाफटका होऊ नये म्हणून पवारांनी जातीनं लक्षं घातलं होतं.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

13 May 2019 - 8:47 pm | सुबोध खरे

महाराष्ट्रात येऊन श्री राजीव गांधी याना उडवणे हि गोष्ट अगदी अशक्य नाही तरी फारच कठीण गेली असती.

कारण महाराष्ट्रातील तामिळी लोक( हे बहुतांशी तेथून द्राविडी क्रांती नंतर हाकलले गेलेले उच्च शिक्षित ब्राम्हण आहेत किंवा अगदी पोटार्थी असे गरीब लोक आहेत) एल टी टी ई बद्दल फारशी सहानुभूती बाळगून नाहीत / नव्हते.

तामिळनाडू आणि श्रीलंकेतील तामिळी यांचे आपसात रोटीबेटी व्यवहार आहेत उदा. मुथ्थय्या मुरलीधराचे लग्न भारतीय तामिळ मुलीशी झालेले आहे.

त्यामुळे तामिळनाडूत एल टी टी ई ला भरपूर आर्थिक आणि वैचारिक साहाय्य्य मिळत आले आहे. तेथे हा कट जमवून आणणे त्या मानाने फार सोपे होते.

श्रीलंकेतील तामिळ बहुल विभाग आणि भारतातील तामिळनाडू यांचा एक स्वतंत्र देश बनवावा या विचहरसरणीला पाठिंबा देणारे लोक तामिळनाडू मध्ये आजही आहेत

डँबिस००७'s picture

12 May 2019 - 7:07 pm | डँबिस००७

मोदीजींनी राजीव गांधीच्या विरुद्ध एक बातमी काय सांगीतली, मिडीयातले सर्व अर्बन नक्षल , डावे लोक खवळले.
द हिंदु, प्रिंट, वायर सारख्या ईंटरनेट मिडीयला तर मोदींची अ‍ॅलर्जी जग जाहीर आहे.

मोदीजींना खोट पाडण्यासाठी लगेच द हिंदु दैनिक पुढे आला, ह्या वरच्या बातमीला खोट पाडण्यासाठी अ‍ॅडमिरल रामदासला पुढे करण्यात आले. अ‍ॅड रामदासने ही बातमी चक्क खोटी असल्याच म्हंटल. ही अ‍ॅडमिरल रामदास याम्ची साक्ष द हिंदु वर्तमान पत्राने छापलेली आहे. https://www.thehindu.com/news/national/rajiv-gandhi-was-onboard-ins-vira..
अ‍ॅड रामदासना खोट बोलल्या बद्दल तिथे कोणीही आरसा दाखवला नाही.
ह्या विषयाची बातमी त्यावेळच्या १९८८ सालच्या वृत्तपत्रात आलेली होती.
https://www.opindia.com/2019/05/did-india-today-modify-1988-report-on-ra...

आता ह्या अ‍ॅडमिरल रामदास बद्दल : हा माणुस पुर्ण पणे विकला गेलेला आहे. अ‍ॅडमिरल रामदास हा आप पक्षाचा मेंबर होता. आप पक्षाने त्याला आंतरीक लोकपाल म्हणुन नेमला होता. मग केजरीवाल ने त्याला धक्का मारुन हाकलुन लावले होते.
ह्याची बायको ग्रीन पिस ह्या एन जी ओ मध्ये सल्लागार होती. ग्रीन पिस एन जी ओ ला भारतात मोदी सरकारने बॅन केलेले आहे. कित्येक कोटींचा गैरव्यवहार ह्या ग्रीन पिस एन जी ओ ने केलेला आहे. कलपक्कम आण्विक प्रकल्पाच्या विरुद्ध आंदोलनाच्या मागे हा ग्रीन पिस एन जी ओ ह्नोता. ह्या रामदासची मुलगी फोर्ड फाँऊडेशन च्या भारतातल्या ऑफिसात वरीष्ठ सल्लागार आहे. अश्या माणसाला मोदी वर राग असणारच !!

हल्लीच दिललीच्या गौतम गंभिरवर एका पाकिस्तानी क्रिकेटरने (शाहीद आफ्रिदी) वाईट लिहीले लगेच त्याची बाजु शेखर गुप्ता नावाच्या एका वरिष्ठ पत्रकाराने घेतली. पाकिस्तानच्या क्रिकेटर ची बाजु एका भारतीय पत्रकाराने का घ्यावी ? कारण गौतम गंभिर हा भाजपासाठी उभा असलेला उमेदवार आहे. शेखर गुप्ता अगुस्ता वेस्टलँड भ्रष्टाचारात अडकलेला आहे त्याचे पुर्ण पुरावे सरकारकडे उपलब्ध झालेले आहेत.

Rajesh188's picture

12 May 2019 - 11:05 pm | Rajesh188

डावे ,थोडीफार काँग्रेस हे कधीच भारतीय भूमी वर प्रेम करत नाहीत.
डाव्या पक्षाने आंबेडकर चळवळ hack करून नक्षल वादी लोकांना samardhan देण्याचे उद्योग चालू केले आहेत
Ngo वर एकतर कडक कारवाई करावी नाही तर त्याना कोण funding करत आहे त्याची कठोर chokshi
करावी
देशविरोधी लोक funding नक्की करत असणार

जालिम लोशन's picture

13 May 2019 - 12:15 am | जालिम लोशन

तर नानाच्या हौदाला पाणी किती?

विजुभाऊ's picture

13 May 2019 - 10:10 am | विजुभाऊ

शरद पवार संरक्षण मंत्री असताना त्यांनी हवाईदलाच्या विमानातून सोबत जे जे हत्याकाम्डातील दोन आरोपींसोबत प्रवास केला होता ते प्रकरण कुठे दबले गेले कोण जाणे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 May 2019 - 1:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

१. पंतप्रधानांच्या कुटुंबियांना युद्धनौकेवर प्रवेशाची अनुमती असते का? असावी का?
अनुमती तत्कालीन अधिकार्यानी नाकरली होती का ? नसल्यास का नाही ?

२. पंतप्रधानांच्या सुटीकरता एवढा खर्च करावा का? त्यांच्या संरक्षणाकरता विराट आणि सोबत अन्य युद्धनौका तैनात करणं हा नक्कीच खर्चिक मामला असावा. शिवाय मुख्य भूमीवरून सगळी सामुग्री द्वीपांवर नेणं हे पण स्वस्त नसावं.
खरे आहे पण सामान्य माणसावर हुकुमत गाजवणारे सरकारी/लषकरी अधिकारी उच्च्पदस्थांसमोर नांगी का टाकतात? "आम्ही हे करू शकत नाही.. ह्यासाठी खर्च जास्त येईल.". अशी स्वच्छ भूमिका कोणी घेतली का तेव्हा?

सुबोध खरे's picture

13 May 2019 - 6:18 pm | सुबोध खरे

लष्करी अधिकाऱ्यांना संरक्षण मंत्रालयातून हुकूम येतो कि माननीय श्री पंतप्रधान त्यांच्या इतर कर्मचारी वर्गासह दिनांक "क्ष ते य" या काळात भा नौ जहाज अबक ला भेट देणार आहेत. त्यासाठी सर्व तयारी करण्यात यावी.

त्याच्या बरोबर येणाऱ्या सर्व लोकांना खास परवानगी आणि पासेस संरक्षण मंत्रालयाकडून दिले जातात.

प्रत्येक गोष्टीचे विस्तृत खुलासेवार वर्णन कागदोपत्री येते. यात अति महत्त्वाच्या व्यक्तीचे आजार आणि त्याला लागणारी औषधे सुद्धा कळवले जातात. हि माहिती त्या त्या विभागाला लेखी कळवली जाते. उदा डॉ. राजा रामण्णा ( संरक्षण राज्यमंत्री असताना) विक्रांतवर येणार होते त्यांना अतिरक्तदाबाचा विकार आहे आणि ते amlodipine हे औषध घेतात हे मला वैद्यकीय विभागाचा प्रमुख म्हणून लेखी कळवण्यात आले होते. त्यांच्यासाठी अतिरक्तदाबाच्या विकारात होणाऱ्या सर्व गुंतागुंतींसाठीची औषधे मी गोव्याच्या नौदलाच्या रुग्णालयातून आणून ठेवली होती.

त्यांना लागणारे खाद्यपदार्थ मद्य इ. ची माहिती लॉजिस्टिक विभागाकडे येते. त्याप्रमाणे त्यांना त्याची पूर्ती करावी लागते. उदा. क्ष संरक्षण मंत्र्यांची बायको कलिमपोंग येथे लष्करी ठाण्याला भेट देणार होते त्यांना रोज नारळाचे पाणी लागते या साठी नारळ जलपाई गुडी वरून मागवून ठेवलेले होते.

हे "नियमात बसवणे" हे संरक्षण मंत्रालयाचे काम असते. ( हा खर्च बहुतेक वेळेस इतर miscellaneous या सदरात टाकला जातो)

नागरी सरकारचा हुकूम मोडणे हे लष्कराच्या शिस्तीत बसत नाही.

सुबोधजी, केवळ तुमचा प्रतिसाद वाचण्यासाठी ह्या धाग्यावर आलो, आणी तुमचे दोन्ही तपशीलासकट असलेले, एक्स्पर्ट प्रतिसाद वाचून धागा उघडल्याचं सार्थक झालं. धन्यवाद!

सुबोध खरे's picture

13 May 2019 - 8:33 pm | सुबोध खरे

__/\__

Rajesh188's picture

13 May 2019 - 1:37 pm | Rajesh188

आपल्या साठी आणि कुटुंबासाठी देशाचे करोड रुपये खर्च करायला(गरीब देशाचे)राजीव गांधी ना लाज ,लज्जा,शरम काही वाटलं नाही
विराट सारखी युद्ध noka घेऊन जाऊ शकतो असा नियम जरी असला तरी pm ला आपण गरीब देशाचे pm आहोत ह्याचे भान असावे

मोदी है तो (कुछ भी) मुमकिन है. रडार, ई-मेल, डिजिटल कॅमेरा न काय काय.

महासंग्राम's picture

14 May 2019 - 3:35 pm | महासंग्राम

अस्थानी प्रतिसाद बाकी चालुद्या