मतदानाची गोष्ट

Nitin Palkar's picture
Nitin Palkar in काथ्याकूट
30 Apr 2019 - 2:10 pm
गाभा: 
या वेळेस मतदान केंद्र मेरी इमॅक्युलेट विद्यालय, बोरिवली येथे होते. हे विद्यालय मंडपेश्वर टेकडीच्या पायथ्याशी, टेकडीचा बराच भाग व्यापून उभे आहे. टेकडीच्या नैसर्गिक उताराचा योग्य असा वापर करून शाळेच्या इमारती बांधल्या आहेत. या विद्यालयात मतदान कक्ष वेगवेगळ्या स्तरांवर(levels) होते, जिथे पोहचण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावे लागले. माझा मतदान कक्ष सुमारे सहाव्या मजल्याच्या उंचीवर होता. घामाघूम होऊन तिथे पोहोचलो व रांगेत उभा राहिलो. मतदान करून बाहेर आल्यावर बघितले तर तिथे पोहचण्यासाठी दुसऱ्या बाजूने उताराचा रास्ता (ramp) होता. प्रवेशद्वारापासून हे अंतर सुमारे शंभर ते दीडशे मीटर्स असावे. घरी आल्यावर सदर बाब मा. खासदार श्री गोपाळ शेट्टी यांना tweet केली. सुमारे तासाभराने मतदान केंद अधिकाऱ्याचा फोन आला. फोन वरील संभाषण. ‘नितीन पालकर साहेब बोलतायत का?’ ‘हो, बोला.’ ‘साहेब तुम्ही कुठे राहता? आत्ता मतदानाला येणार आहात का? मी तुमच्यासाठी गाडी पाठवतो.’ मी त्यांना म्हणालो, ‘मी मतदान केले.’ ‘साहेब, आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांकरता बूथ पर्यंत वाहनाची व्यवस्था केली आहे. तुम्ही कुठे तक्रार केलीत साहेब? ‘मी गोपाळ शेट्टींना tweeter द्वारे कळवले.’ ‘साहेब प्लिज आता योग्य व्यवस्था झाली आहे असे कळवाल का? ‘हो, नक्की.’ मी खासदार श्री. गोपाळ शेट्टींना पुन्हा एकदा ट्विट करून त्यांच्या तत्पर प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले. स्मार्ट फोनचा उपयोग whats app, सेल्फी व्यतिरिक्त तुमची बँक तुमच्या खिशात, शासन तुमच्या तुमच्या हातात असाही होतो. शासन, प्रशासन यंत्रणा आता तुमच्या जवळ आहे तुम्ही योग्यरित्या त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे हे सर्वांना कळावं एवढ्याचसाठी हा लेखन प्रपंच.

प्रतिक्रिया

mayu4u's picture

30 Apr 2019 - 8:23 pm | mayu4u

शासन, प्रशासन यंत्रणा आता तुमच्या जवळ आहे तुम्ही योग्यरित्या त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे

हे महत्वाचं!

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 9:17 pm | Nitin Palkar

तुमच्या प्रतिसादामुळे काही लिहिण्याची उर्मी होते.

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 9:18 pm | Nitin Palkar

तुमच्या प्रतिसादामुळे काही लिहिण्याची उर्मी होते.

धर्मराजमुटके's picture

30 Apr 2019 - 8:50 pm | धर्मराजमुटके

घरी आल्यावर सदर बाब मा. खासदार श्री गोपाळ शेट्टी यांना tweet केली.

एक चांगली गोष्ट केलीत त्याबद्दल अभिनंदन ! मात्र तुमच्या लेखामुळे तुमचा राजकीय कल कळला बरे ! :)

... गोपाळ शेट्टी आजी खासदार असल्यानं त्यांना ट्विट केलं असेल

-शेट्टींच्या मतदारसंघातला सामान्य नागरिक

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 8:38 pm | Nitin Palkar

गोपाळ शेट्टी किंवा उर्मिला मातोंडकर कोणाला तरी एकाला ट्विट करणे असे मनात होते. गोपाळ शेट्टी प्रतिसाद देतील असे वाटल्याने शिवाय ते विद्यमान खासदार असल्याने त्यांना ट्विट केले.
राजकीय कल तुम्हाला कळला असल्यास काही हरकत नाही. कारण तो लपवावासा कधीही वाटत नाही.

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 8:45 pm | Nitin Palkar

गोपाळ शेट्टी किंवा उर्मिला मातोंडकर कोणाला तरी एकाला ट्विट करणे असे मनात होते. गोपाळ शेट्टी प्रतिसाद देतील असे वाटल्याने शिवाय ते विद्यमान खासदार असल्याने त्यांना ट्विट केले.
राजकीय कल तुम्हाला कळला असल्यास काही हरकत नाही. कारण तो लपवावासा कधीही वाटत नाही.

सुजाण आणि जवाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
Keep it up!

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 8:28 pm | Nitin Palkar

_/\_

नाखु's picture

30 Apr 2019 - 10:40 pm | नाखु

सुद्धा भूक लागली म्हणजे रडावे लागते (किमान इतके श्रम घ्यावेच लागतात)
हेच सुजाण नागरिक विसरले आहेत.
आता केल्याचे कौतुकास्पद कामगिरीपेक्षा, शेट्टी,तुम्ही आणि अधिकारी यांनी आधी का नाही केलं यावर डझनभर विचारजंती सूचना सल्ले मिळणार.

कल शोधून कलकलाट करण्यात धन्यता न मानता मुकाट वाचकांची पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

मतदानाच्या दिवशी ज्या तत्परतेने सरकारी यंत्रणा काम करते त्या तत्परतेने महिन्यातील १० दिवस काम केले तर देशाचा कायापालट होईल.

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 9:13 pm | Nitin Palkar

हे खरे असू शकेल , पण तुम्ही कधी असा असा प्रयत्न केला आहे आहे का ?

Rajesh188's picture

1 May 2019 - 12:30 am | Rajesh188

फक्त मतदान असेल त्याच दिवशी जनता किंग असते बाकी दिवशी जनतेला प्रशासन आणि लोप्रतिनिधी कुत्र्याची
सुधा किंमत देत नाहीत

म्हणून लोकशाही हवी पण मतदान नको . कोणत्याही नेता वा राजकीय पक्षात खालील मुद्द्यांना हात लावणीची हिम्मत नाही आहे
आरक्षण
समान नागरिक कायदा
झोपडपट्या
राममंदिर etc...

कुमार१'s picture

1 May 2019 - 1:19 pm | कुमार१

सुजाण आणि जवाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 8:43 pm | Nitin Palkar

धन्यवाद! कुमार१
तुमचा प्रतिसाद आल्याने बरे वाटले.
_/\_

दुर्गविहारी's picture

1 May 2019 - 1:26 pm | दुर्गविहारी

लोकशाही देशाचे जागरूक नागरिकत्व दाखवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 8:49 pm | Nitin Palkar

_/\_

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 8:56 pm | Nitin Palkar

_/\_

कानडाऊ योगेशु's picture

1 May 2019 - 9:00 pm | कानडाऊ योगेशु

सिविजिल अ‍ॅप द्वारे निर्वाचन नियुक्त सरकारी अधिकार्यांनी दाखल झालेली तक्रारीचे ठराविक वेळेत निराकरण करणे बंधनकारक आहेत.

Nitin Palkar's picture

1 May 2019 - 9:07 pm | Nitin Palkar

सिविजिल अ‍ॅप म्हणजे नक्की काय हे मला माहित नाही . त्यामुळे मी थेट खा. गोपाळ शेट्टी ट्विट केले.

दादा कोंडके's picture

1 May 2019 - 9:45 pm | दादा कोंडके

मतदानाचे कर्तव्य पार पाडल्या बद्द्ल अभिनंदन.
पण मतदानाच्या दिवशी राजकारण्यांनी फक्त मतदान करण्यासाठी गाडी पाठवणं म्हणजे झोपडपट्टीतल्या लोकांना दारूची बाटली देण्यासारखं आहे.
इतरवेळी विआयपी ट्रिटमेंट ओरबडून घेणारी मोठमोठ्ठे राजकारणी यावेळी सामान्यांसारखी रांगेत थांबून मतदान कराताना मौज वाटली. सिलेब्रीटी तेव्हडी हिपोक्रिटीकल निघाली नाहीत.

Nitin Palkar's picture

2 May 2019 - 3:10 pm | Nitin Palkar

तुमचा काही तरी गैरसमज होतोय. 'गाडी पाठवतो ' असे खा. गोपाळ शेट्टी म्हणाले नाहीत अथवा त्यांनी मला फोन केला नाही. मला मतदान केंद्रावरून तेथील अधिकाऱ्याचा फोन आला होता. तेथील गैरसोयींमुळे मी मतदान न करताच गेलो असं त्यांना वाटल्याने गाडी पाठवतो असं ते म्हणाले. सुमारे सहा माजले उंचीच्या पायऱ्या चढणे अथवा चढावावरून शंभर ते दीडशे मीटर्स चालणे ज्येष्ठ नागरिकांकरता आणि दिव्यांग व्यक्तींकरता कष्टप्रद होते, या सर्वांकरता शाळेच्या आवारातच गाडीची व्यवस्था करण्यात आली (मी केलेल्या ट्विट नंतर, खरं तर ती आधीच करणे आवश्यक होते).

दादा कोंडके's picture

4 May 2019 - 12:37 am | दादा कोंडके

हो, पण तुम्ही कुठल्यातरी विशिष्ठ पक्षातल्या खासदारांना ट्वीट केल्यावर ते घडलं. त्यांनी मतदानाला स्वतः गाडी पाठवली असती तर निवडुक आयोगाची नाही म्हणली तरी आता थोडी भिती असते. मी लहानपणा पासून निवडणुकीच्या वेळी सगळ्या पक्ष-कार्यकर्त्यांची मतदारांच्या 'सोयीसाठी' पळापळ बघत आलोय. एव्हड्या कमी श्रमात, लगेच गुड वील कमावण्याची आणि रिजल्ट देणारी संधी ते तरी का सोडतील म्हणा.
तुम्ही फक्त निवडणुक अधिकार्‍याला सांगून काम झालं असतं तर आश्चर्य वाटलं असतं. असो.

नमकिन's picture

2 May 2019 - 10:46 pm | नमकिन

मतदान केंद्रांची जागा उंचावर काठेवतात हे कोडं?
जेष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींना इतर जनांच्या आधारावरच मतदान करतील अशी सोय असल्यासंच आहे.
कमी मतदान करतील तर सत्ताधारी निर्धास्त होतो.