रायरेश्वर - दुर्ग संवर्धन

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
4 Apr 2019 - 10:04 pm

नेहमी प्रमाणे एका नवीन गडाच्या मोहिमेसाठी बाहेर पडलो होतो, आजची माजी मोहीम होती ती "रायरेश्वर".
रायरेश्वर हे सह्याद्री डोंगररांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे.
या पठारा वरील रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे.

गडावर फिरत असताना तिथे वरती जाण्यासाठी लोखंडी जिना, मंदिरा पर्यन्त जाण्यासाठी tiles चा रस्ता, गडावर राहणाऱ्या लोकांसाठी पिण्याचे पाण्याचे बांधीव टाके, मंदिराच्या आवारातील स्वछता विशेष उल्लेखनीय होती.
हे सगळं कोणी केलं होतं हे जाणून घेत असतानाच हे महान निस्वार्थ शिवकार्य करणाऱ्या दुर्गवीरयांची योगायोगाने भेटच झाली आणि जाणून घेतली त्यांच्या कडूनच त्यांच्या कार्याची माहिती .
तुम्ही ही नक्की पहा दुर्ग संवर्धन साठी झटणाऱ्या लोकांच्या कार्याची माहिती आपल्या "youtube channel स्पॉटवर".
आणि विडिओ आवडल्यास नक्कीच like share आणि
Subscribe करायला विसरू नका ..

रायरेश्वर - दुर्ग संवर्धन

https://youtu.be/Xcw7MEGbaX4

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

4 Apr 2019 - 10:15 pm | कपिलमुनी

दुर्ग संवर्धन करणाऱ्या लोकांचे कार्य कौतुकास्पद आहे. आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल धन्यवाद !
मराठी vlogging बघायला छान वाटते. अजून पोस्ट येऊ द्या

व्लॉगर पाटील's picture

5 Apr 2019 - 12:13 pm | व्लॉगर पाटील

पुढच्या पोस्ट लवकरच share करू

शपथेचा प्रसंग काल्पनिक आहे, त्याला पुराव्याचा आधार नाही. पण त्यामुळे महाराजांच्या कर्तुत्वाला आणि मोठेपणाला बाधा येत नाही. वरती केलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे!

व्लॉगर पाटील's picture

5 Apr 2019 - 12:16 pm | व्लॉगर पाटील

दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2019 - 5:14 pm | चौथा कोनाडा

दुर्गसंवर्धन वाली भारी टीम आहे.

पावसाळ्यात रायरेश्वरला गेलो होतो तेव्हा त्यांनी केलेल्या सोयींचा खूप उपयोग झाला होता.
लोखंडी जिना चढत असताना तर त्यांना मनोमन धन्यवाद दिले होते आम्ही.

आणि व्हिडीओ तर मस्तच आहे. धन्यवाद, व्लॉगर पाटील !

व्लॉगर पाटील's picture

13 Apr 2019 - 10:29 pm | व्लॉगर पाटील

हो खूप चांगला काम करतात

सिक्रेटसुपरस्टार's picture

17 Apr 2019 - 12:29 pm | सिक्रेटसुपरस्टार

उत्तम प्रकल्प!

मधे महिन्यांपूर्वी सातारा येथे पहिले दुर्गसंमेलन पार पडले. गडकिल्ले संवर्धनाकरता कार्य करणाऱ्या कित्येक संस्था त्या ठिकाणी एकत्र आल्या होत्या. एकेकट्या काम करणाऱ्या संस्थांनी आता संयुक्त पणे चळवळ उभी केली आहे. यातुन गडकोट संवर्धन, वृक्षारोपण इत्यादी कामे श्रमदानातून सुरू आहेत.

व्लॉगर पाटील's picture

23 Jun 2019 - 8:58 pm | व्लॉगर पाटील

अशा काही उपक्रमाची आपल्यास माहिती असेल तर नक्की कळवावे

पद्मावति's picture

8 Jun 2019 - 3:22 pm | पद्मावति

खुप सुंदर व्हीडीओ. उत्तम उपक्रम.

व्लॉगर पाटील's picture

23 Jun 2019 - 8:57 pm | व्लॉगर पाटील

आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की subscribe करा

Youtube चॅनेल स्पॉटवर

मदनबाण's picture

9 Jun 2019 - 9:56 am | मदनबाण

मस्त !
एक सुचना... जमल्यास ऑडियो मध्ये सुधारणा करता आल्यास पहा कारण माहिती देताना आवाज कमी आहे आणि ऑडियो ट्रॅक मात्र मोठ्या आवाजात आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वे तू लौंग, वे मैं लाची तेरे पीछे आ गवाची... :- Laung Laachi

व्लॉगर पाटील's picture

23 Jun 2019 - 8:56 pm | व्लॉगर पाटील

आमचे नवीन विडिओ पहा, त्या मध्ये फरक जाणवेल नक्कीच !!
दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद

Youtube चॅनेल Spotvar ला नक्की subscribe करा

Rajesh188's picture

9 Jun 2019 - 10:40 pm | Rajesh188

रायरेश्वर नक्की कुठे आहे
उल्लेख नाही
कसे जायचे उल्लेख
उल्लेख नाही
लेखकाने काय सांगायचे आहे ते पाहिजे ठरवावे

Rajesh188's picture

23 Jun 2019 - 9:11 pm | Rajesh188

हा गड पूर्णतः दुर्लक्ष्य झालेला आहे.
एक मंदिर आहे पत्र्याच्या छताचे .
मूळ मंदिर बंद च असते .
विरान पठार आहे छत्रपतींचा फायदा घेणारे इथे येत नाहीत .
त्या विराण पठारावर वृक्ष रोपण करायची गरज आहे .लोकांना बसण्यासाठी जागा हवी .
पिण्याच्या पाण्यासाठी टाकी आहे अत्यंत दुर्लक्ष्य झालेली .
प्रदूषित पाणी आहे .
गडावर धरणातून पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे .
छत्रपतींचे नाव घेण्याचं आपल्याला अधिकार नाही असेच सर्व किल्ल्यांची अवस्था बघून वाटते

विनोदपुनेकर's picture

25 Jul 2019 - 10:30 am | विनोदपुनेकर

फक्त गडप्रेमी साठीच नाही तर तिथे वस्ती करून राहणारे जंगम (पुजारी) लोक जे मूळचे कर्नाटक मधील पण थोरल्या महाराजांनी त्यांना या शिवमंदिरासाठी नेमणूक देऊन त्यांची तिथे राहणायची सोय केली निवडणूक काळात तिथे एक निवडणूक केंद्र हि असते या संगळ्यांसाठी या सर्व कार्याचा फार मोठा फायदा होतो आहे