संदर्भ
पालक होण्यामुळे झालेले बदल
मी एकेकाळी अगदी बेछूट माणूस होतो. काहीही खायचो - रात्री ९ वाजता सुरु झालेली खादाडी सकाळपर्यंत चालायची. ट्रेकला गेलो कि काहीही खायचे धाडस करायचो, शेकडो गोष्टी हादडायचो. मजबूत खादाडखाऊ होतो, गाडीत कायम एक शॉपिंग बॅग असायची आणि कुठेही रस्त्यावर टपरी दिसली तर ती काढण्याचीही तयारी असायची. महिन्याच्या पगारातले १०० रुपयेही शिल्लक ठेवण्याची आसक्ती नसायची.
लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या पण मूळ खादाड स्वभाव जवळ जवळ तसाच होता.
आता, एका बाळाच्या जन्मानंतर पूर्ण बदललोय, कोणी काहीही ना सांगता.. अगदी कंटाळाच आला असेल तर मी उबेर इट्स बुक करतो, बायको महिनोन महिने किचनमध्ये उभी असते. रस्त्यात पालक विकणारे दिसले कि पैसे देतो ( याची चर्चा करायला हा धागा नाही) . हॉटेलिंग वगैरे जवळजवळ बंद झाले आहे, जी काय खादाडी करतो ती घरगुती म्हणावी अशी असते. पालक सूप आणि उकडलेलं अंडं असा ब्रेकफास्टआवर्जून करतो, हेल्थ इन्शुरन्स बंद केला आहे.
बराच बारीकही झालोय, चिप्स केक पाहून डोळ्याच्या कडा ओलावतात. (किती उदाहरणं देऊ?).
तुमचा स्वतःचा असा अनुभव आहे का? पालक खाल्ल्यावर असे बदल होणे तुमच्या पाहण्यात आहे?
प्रतिक्रिया
1 Apr 2019 - 7:00 pm | खंडेराव
चालुद्या :-)
2 Apr 2019 - 12:44 am | सोन्या बागलाणकर
खंडेराव साहेब,
माफी असावी, कृ ह घेणे.
1 Apr 2019 - 7:19 pm | कंजूस
पालक भजींचा फोटो तुमच्या घरात भिंतीवर असेलच.
2 Apr 2019 - 12:43 am | सोन्या बागलाणकर
अर्थात!
आमच्या कडे पालक, कांदा आणि बटाटा भजी या त्रिमूर्तीचा फोटो आहे.
1 Apr 2019 - 8:24 pm | प्रचेतस
पालक खाल्यामुळे लै पावर येते, मग एका फटक्यातच ब्लूटोला हानता येतं, ते बघून ऑलिव्ह आपसूक जवळ येतीया.
2 Apr 2019 - 2:13 am | सोन्या बागलाणकर
आक्शी बराबर बोललात प्रचेतस साहेब!
म्हणून तर आपला पोपेय रोज पालक खातंय.
1 Apr 2019 - 8:44 pm | धर्मराजमुटके
अजुनही गाडीत शॉपींग बॅग असते काय आणि असली तर कुठेही काढायची तयारी असते का ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास पुढील चर्चा चालू ठेवता येईल.
प्रेरणास्थानाच्या धागाकर्त्याने उत्तरादाखल "बेबी ऑन बोर्ड" असा अभिप्राय दिला आहे. त्याच धर्तीवर तुम्ही "बेबी आपलं घरचचं पिठलं भाकरी बरी" असं म्हणता काय ?
2 Apr 2019 - 12:41 am | सोन्या बागलाणकर
आम्ही "कोबी ऑन बोर्ड" चे पोस्टर लावले आहे.
1 Apr 2019 - 10:13 pm | पाषाणभेद
तुम्ही लवकरच एका मोठ्या किडनी स्टोनचे मालक व्हाल. तो खडा अंगठीत बसवा.
1 Apr 2019 - 10:14 pm | पाषाणभेद
अन कसं सुचतं हे सारं!
1 Apr 2019 - 10:44 pm | नाखु
ज्या मंडईच्या मेथी त्याच मंडईचे पालक!!
बालकांकडून चुकतमाकत शिकणारा पालक नाखु
2 Apr 2019 - 2:20 am | सोन्या बागलाणकर
आम्हाला किडनी स्टोन होत नाही कारण आम्ही बारा गावचं पाणी प्यालेलो आहे. (पाठाऱ्यांच्या टँकरचे सुद्धा)
ता. क. पाठाऱ्यांवाला विनोद फक्त पुणेकरांना कळेल.
2 Apr 2019 - 6:44 am | चामुंडराय
हा हा ... हे भारीय्ये, कस्स काय सुचतं बुवा !
आता पुढे ...
बालक झाल्यामुळे झालेले बदल
मालक झाल्यामुळे झालेले बदल
चालक झाल्यामुळे झालेले बदल
मिपाकरांच्या सर्जनशीलतेला आव्हान (यातील सर्जन हा मराठी शब्द आहे).
2 Apr 2019 - 6:56 am | उगा काहितरीच
लै भारी ! :D
2 Apr 2019 - 7:30 am | विजुभाऊ
या बद्दल पण काही लिहा की
2 Apr 2019 - 8:17 am | सोन्या बागलाणकर
लिहिलंय की...
2 Apr 2019 - 9:50 am | ज्ञानोबाचे पैजार
शेपू पालक खाण्याची सुरुवात डाएट पासूनच होते, डाएट सुरु केल्यावर मी तर शेळीच बनलो.
डाएट सुरु करण्या आधी मी पण पट्टीचा खवय्या होतो, ५० जिलब्या खायला अजिबात मागे हटायचो नाही, कोणी खाण्याची पैज लावली की आपण ती जिंकल्यतच जमा असायची.
परवाचीच गोष्ट (त्या स्कॉर्पिओ वाल्याला नडून) एका लग्नाला गेलो होतो. स्वागतालाच प्रत्येकाच्या हातात गुलाबाचे फुल आणि पेढा देत होते. मी निमूट एक(च) पेढा घेतला आणि तो सुध्दा मुलीच्या हातात दिला. डाएट करत नसतो तर कमीत कमी सात आठ उचलले असते. हॉल मधे एकजण सरबताचा ट्रे घेउन फिरत होता. तो जसा जसा फिरेल तसतसा त्याच्या कडे पाठ करत मी उभा रहात होतो. लग्नाच्या पंगतीला बुफे मधे अनेक पर्याय होते. पण भेळपुरी, चायनीज मॅक्सिकन इत्यादी कडे पाठ करुन मी भारतिय भोजना कडे वळलो. पलिकडे पाणीपुरी मला खुणावत होती पण मी निग्रहाने बाउल भर पालक सुप नरड्यामधे ओतले. त्यानंतर विविधप्रकारच्या सॅलेडनी मी माझी डिश भरली, त्याच वेळी माझा मित्र पनिर लबाबदार कसे भारी झाले आहे ते बोटे चाटत सांगत सांगत होता. शेवटी दम बिर्याणी ऐवजी दहीभात मिटक्या मारत खाल्ला आणि आइसक्रीम ऐवजी ताकाचा ग्लास उचलला.
एकेकाळी श्रीखंडाच्या आठ दहा वाट्या सहज खाणारा मी आज रसगुल्यांना हातही लावत नव्हतो. त्या ऐवजी आजकाल शेपूची भाजी आणि भाकरी, मोड आलेली कडधान्ये, गोडंवरण भात (तो सुध्दा हातसडीच्या तांदळाचा) विविध प्रकारच्या लाह्या आणि फळे खाण्यात मी धन्यता मानू लागलो आहे.
असो गेले ते दिवस आणि राहिल्या ता आठवणी
पैजारबुवा,
2 Apr 2019 - 10:26 am | सोन्या बागलाणकर
पैजारबुवा,
तुमची दर्दभरी दास्तान दिलाला भिडली.
अहो काय सांगावं, बायकोचे केले नाही एवढे जिभेचे लाड केले पण शेवटी तिनेच घात केला.
आधीच लोक व्हेजिटेरियन म्हटलं कि सुतकी चेहऱ्याने बघतात त्यात कोलेस्टेरॉल आणि शुगर असल्या भानगडी चालू झाल्या कि खेळ खल्लास!
2 Apr 2019 - 4:08 pm | आनन्दा
नशीब हातसडीचा म्हणालात.
काही लोक सडलेला म्हणतात त्याला
2 Apr 2019 - 5:06 pm | धर्मराजमुटके
मग काय झालं ! ताक कधीही आईसक्रीमच्या तोंडात हाणेल ! आपल्याला तर मध्यरात्री उठून दिले तरी चालेल. उगाच नाही त्याला कच्छी बिअर म्हणत !