भाग 2 - सिंहगड शौर्यागाथा - मिलिटरी कमांडरांची नियोजनाची मांडणी!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
22 Mar 2019 - 7:33 pm
गाभा: 

भाग 2 - सिंहगड शौर्यागाथा - मिलिटरी कमांडरांची नियोजनाची मांडणी!

या स्वारीसाठी कोण कोणती सिद्धता केली असावी. तानाजींची निवड महाराजांनी या मोहिमेसाठी निवड केली. आदि विस्तृत माहिती

1 1

2 2

3 3

4 4

5 5

हा नकाशा गुगल तर्फे पायी जायचे मार्ग सुचवतो. त्याच मार्गांनी ताानजींचे सैनिक तुकड्या तुकड्यानी गेले असावे असे नाही. परंतु साधारण 35 ते 45 किमी अंतर व ते पार करायला 8 ते 10 तास आजही लागतील इतकी माहिती मिळते.

6 6

7 7

8 7

...गडावर चढायला वेळ आणि गतीचे काय महत्व?, दोणागिरी कड्याची निवड का?, रात्री 2 नंतर हल्ला करायची मसलत घड्याळ नसताना कसे अमलात आणली असावी? पुढील भागात...

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

23 Mar 2019 - 10:17 am | दुर्गविहारी

विचार प्रवर्तक लिखाण ! अर्थात काही प्रश्नांची उत्तरे आजही सापडत नाहीत. एकतर तानाजी आठशे ते एक हजार मावळ्यांची फौज घेउन कोंढणपुर परिसरात आला असे ग्रुहित धरलं तरी राजगडावरुन सिंहगडावर येणाऱ्या वाटेवर हि सैनिकी हालचाल उदयभानला कशी समजली नाही ? ईथै उदयभान हा दक्ष मोगली किल्लेदार होता हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ईतर मोगली किल्लेदारांसारखा तो गलथान नव्हती. शिवाय दिवस फेब्रुवारीचे आहेत, म्हणजे पानगळ झाल्यामुळे लपून हालचाल करायला झाडांची दाटी नाही. शिवाय हल्ला लगेच केला नाही असे ग्रुहित धरले तर ईतके सैन्य पायथ्याशी लपून कसे बसले हा प्रश्न ही उपस्थित होतो.
कदाचित आपल्या पुढच्या लिखाणात याची उत्तरे असतील अशी अपेक्षा करतो. पुढील धाग्याच्या प्रतिक्षेत !

राजगडावरुन सिंहगडावर येणाऱ्या वाटेवर हि सैनिकी हालचाल उदयभानला कशी समजली नाही ?

ईतके सैन्य पायथ्याशी लपून कसे बसले हा प्रश्न ही उपस्थित होतो.

पुढच्या लिखाणात याची उत्तरे असतील अशी अपेक्षा करतो.

धन्यवाद आपल्या अभ्यासपूर्ण विष्लेषणा बद्दल..
वरील प्रश्नांची उत्तरे या मांडणीतून मिळतील असे नाही पण लढाईची मांडणी करण्याच्या पार्श्वभूमिचे कथन यात केले आहे.

करमरकर नंदा's picture

24 Mar 2019 - 10:40 am | करमरकर नंदा

कामांची यादी वाचून मधमाश्या, खाजरी, झुडुपे यांचा बंदोबस्त केला नाही तर ऐनवेळी मोहिम रद्द करायची वेळ आली असती...
नियोजनात किती बारीक सारीक गोष्टींचा समावेश करावा लागतो याची जाणीव झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2019 - 4:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

26 Mar 2019 - 10:44 pm | शशिकांत ओक

धन्यवाद आपल्या प्रतिसादाकरिता...

भावतात.
तानाजींवर अत्यंत विश्वास की तेच ही कामगिरी करून दाखवतील.

मित्रहो's picture

25 Mar 2019 - 9:09 pm | मित्रहो

सारे बारकावे लक्षात घेतले होते हे दिसते.
वाघ दिसला नव्हता
याचा अर्थ जंगल सैन्याची हालचाल करायला सुरक्षित होते असा होतो का.

तसेच वर दुर्गविहारी यांनी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारीत जंगल विरळ असताना ही मोहीम का हाती घेतली कशी तडास नेली.

प्रमोद देर्देकर's picture

26 Mar 2019 - 1:28 pm | प्रमोद देर्देकर

ज्या महाराजांनी आंबा न विचारता आणला म्हणून स्वतःच्या गुरुजींना हात कलम करावा अशी शिक्षा सांगितली
ते नाग , मुंग्या ची वारुळ मधमाशा यांचा बंदोबस्त करतील असं वाटतं नाही ..

शशिकांत ओक's picture

26 Mar 2019 - 10:41 pm | शशिकांत ओक

ते (महाराज) नाग , मुंग्या ची वारुळ मधमाशा यांचा बंदोबस्त करतील असं वाटतं नाही ..

ते आपले मत आहे... आपल्या मताबद्दल धन्यवाद...

पुष्कर's picture

11 Apr 2019 - 6:46 am | पुष्कर

मला वाटते अश्या मांडणी आधी हा डिस्क्लेमर देणे आवश्यक आहे की ही माहिती तंतोतंत पुराव्यांच्या आधारावर नसून उपलब्ध ऐतिहासिक माहिती आणि आजच्या सैन्यदलातील (आजी/माजी) मोठ्या हुद्द्यातील अधिकार्‍यांच्या सैन्यानुभवातून बांधलेल्या अंदाजांच्या आधारावर आहे. जिथे शक्य आहे, तिथे, तुम्ही जर कोणत्या उपलब्ध साधनांचा वापर केला असेल, तर त्या साधनांची माहिती वाचकास देणे आवश्यक वाटते. उदाहरणार्थ, ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी, इतिहासतज्ञांची मते, उत्खननातून पुढे आलेले संशोधन - यांपैकी काही तुमच्या मांडणीमध्ये उपयोगी पडले असेल, तर त्याचा संदर्भ देणे गरजेचे आहे. नसल्यास ती केवळ ऐकण्या/वाचण्यासाठी एक रंजक कथा होईल, पण वस्तुनिष्ठ इतिहास मांडणीच्या दृष्टीने तिचा उपयोग नाही.

शशिकांत ओक's picture

11 Apr 2019 - 12:19 pm | शशिकांत ओक

याचे भान ठेवून खालील डिस्क्लेमर दाखवून पुढे सादरीकरण केले जाते...

१. 1

२. २

३. ३

४. ४

पुष्कर's picture

11 Apr 2019 - 1:42 pm | पुष्कर

कदाचित माझ्या नजरेतून हे डिस्क्लेमर सुटले असावेत, क्षमस्व. अतिशय योग्य आणि समर्पक आहेत. ते लक्षात आणून दिल्याबद्दल तुमचे आभार.