गाभा:
पुर्वीच्या लढाया आणि स्मारके यांचा सैनिकी दृष्टीने अभ्यास करा!
एका समर्पक वार्तांकनातून...
धूर्त युद्ध तंत्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतिचे वैशिष्ट्य होते. विश्वभरातील इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राला गौरवले आहे. भारतामध्ये लक्षावधींच्या संख्येने स्मारके आहेत. निवृत्त सैनिकी अधिकार्य या लढाया आणि स्मारके यांचा सैनिकी दृष्टीने अभ्यास करावा आणि तंत्रकुशल युवकांची साथ घेऊन तो समाजासमोर मांडावा. असे प्रतिपादन विंग कमांडर शशिकांत ओक (नि) यांनी केले.
या व्याख्यानाची सुरवात अशी झाली...
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
प्रतिक्रिया
21 Mar 2019 - 10:16 am | मित्रहो
सध्याच्या सैनिक व्यवस्थेतून त्यावेळेचे युद्ध समजून घ्यायला आवडेल
21 Mar 2019 - 11:06 am | डॉ सुहास म्हात्रे
भूतकाळातील सामरिक मोहिमांचे अधुनिक सामरिक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर विश्लेषण करण्याचा प्रयत्न आवडला. सुरुवात उत्तम झाली आहे. पुभाप्र.
एक छोटीशी टंकनचूक दुरुस्त करावी : "सद्याचे लष्करी हुद्दे आणि संख्या" या स्लाइडमध्ये पहिल्या ओळीत "१ शिपाई" असे आहे ते "९ शिपाई" असे हवे.
21 Mar 2019 - 11:51 am | शशिकांत ओक
मी जो फाँट वापरला आहे. त्यात ९ आकडा १सारखा येतो. शिवाय अनुस्वार अक्षरावर न येता जरा पुढे पडतो. त्या त्रुटी सोडून
बाकी रेखीवपणा आवडल्याने तोच फाँट वापरला आहे.
21 Mar 2019 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
अच्छा. मग, गैरसमज टाळण्यासाठी "नऊ शिपाई" असे लिहिता येईल, असे सुचवतो.
21 Mar 2019 - 10:42 pm | शशिकांत ओक
चांगली सुचना. पुढील साठी लक्षात ठेवेन.
21 Mar 2019 - 12:41 pm | दुर्गविहारी
खुपच छान ! पुढची माहिती वाचायची उत्सुकता लागली आहे. पु.ले. शु.
21 Mar 2019 - 1:50 pm | शशिकांत ओक
आपल्या प्रतिसादाच्या पुढाकाराने लिहीत राहायला उत्साही वाटते.
21 Mar 2019 - 1:42 pm | आनन्दा
पु भा प्र
21 Mar 2019 - 5:46 pm | चौथा कोनाडा
सुंदर ..... रोचक .... आणि .. थरारक ही !
पु भा प्र
22 Mar 2019 - 12:59 pm | पुष्कर
फक्त एक छोटी शंका. स्लाईड क्र. ११ वर तुम्ही 'शिपाई, नाईक, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कमांडर, कर्नल' हे हुद्दे आत्ताच्या पद्धतीप्रमाणे दिले आहेत आणि पुढे 'तानाजी हे ब्रिगेडियरच्या हुद्द्याचे, सूर्याजी लेफ्टनंट कर्नल....' असे म्हटले आहे. आता वरच्या यादीमध्ये ब्रिगेडियर आणि लेफ्टनंट कर्नल हे दोन्ही हुद्दे नाहीत (लेफ्टनंट कमांडर आणि लेफ्टनंट कर्नल एकच असतात का हे सामान्य वाचकाप्रमाणे मलाही माहित नाही). कृपया ते हुद्दे (तश्याच नावासकट) दिल्यास तुम्ही नक्की कोणत्या लेव्हलच्या हुद्द्याशी तुलना करत आहात ते कळेल.
22 Mar 2019 - 1:31 pm | शशिकांत ओक
1. लेफ्टनंट कमांडर हा हुद्दा नाही. कमांडर ऐवजी कर्नल हवे.
2 दोन किंवा तीन पेक्षा जास्त ब्रिगेड्स ब्रिगेडियरच्या हाताखाली...
3 यापुढे यादीत जरा घोळ आहे...
वस्तुतः मेजर ही रँक लेफ्टनंट पेक्षा वरचा हुद्द्याची पण "मेजर जनरल" नंतर पुढचा वरचा हुद्दा "लेफ्टनंट जनरल" आहे, हे असे का याचे उत्तर कोणी सांगेत तर बरे.
4 शिवाय आर्मीतला कॅप्टन आणि नेव्हीतला कॅप्टन समान दर्जाच्या हुद्द्याचे नाहीत... !
असो...
11 Apr 2019 - 6:29 am | पुष्कर
तुम्ही दिलेल्या उत्तरावरून (मुद्दे १ आणि २) आता अर्थबोध होत आहे. परंतु मूळ स्लाईड मध्ये बदल केलात तर वाचकांना समजणे सोपे जाईल.
शिवाय तुमच्या प्रतिसादातला मुद्दा क्र ३ हा आणखी गोंधळ वाढवतो आहे. तुम्ही मूळ स्लाईडमध्ये मेजरच्या वरचा हुद्दा लेफ्टनंट कमांडर (जो लेफ्टनंट कर्नल हवा असं तुम्ही म्हणता) लिहिला आहे. मग हा 'लेफ्टनंट जनरल' कोण? शिवाय तुम्ही दिलेल्या यादीत 'मेजर जनरल' कुठे आहे? आणि तुमच्या मुद्दा क्र. ४ मधली माहिती एक सामान्यज्ञान म्हणून ठीक आहे, पण इथे अप्रस्तुत आहे, कारण तुम्ही तुलना जुनी आर्मी टू नवी आर्मी केली आहे तर मग नेव्हीचा प्रश्नच कुठे येतो? मी तसा प्रश्नही विचारला नव्हता. कदाचित कुणी चिकित्सकाने हा प्रश्न विचारला तर काय, म्हणून तुम्ही हे आधीच उत्तर दिलेले दिसते. असो.
क्षमा करा, पण एकंदरीत हे असंदिग्ध आणि वाचकाला गोंधळात टाकणारे आहे. तुम्ही जितके प्रिसाइझ लिहाल तितके ते समजावयास सोपे जाईल.
11 Apr 2019 - 12:30 pm | शशिकांत ओक
असे वाटते की बरेचदा अनेकांची वरवर नजर टाकली जात असावी. पण आपण नेमके प्रश्न विचारून चिकित्सकपणे वाचन होते आहे याचा आनंद झाला.
१. मेन स्लाईड मधेही कमांडर ऐवजी कर्नल लिहून दुरुस्ती केली आहे.
२. काही माहिती न विचाताही अवांतर म्हणून सादर केली होती.
या प्रेझेंटेशन मधे अधिक रंजकता व अचुकपणा आणलेला गेला आहे. तो अन्य वेळी व्याख्यानातून कळून येईल.
11 Apr 2019 - 1:45 pm | पुष्कर
अनेक आभार!
22 Mar 2019 - 1:33 pm | शशिकांत ओक
लवकर प्रस्तूत होत आहे.
22 Mar 2019 - 6:14 pm | अनिरुद्ध प
धन्यवादशशिकान्तजी,
छान सुरुवात पु भा प्र