सर्जीकल स्ट्राईक रिटर्न

Primary tabs

शब्दानुज's picture
शब्दानुज in काथ्याकूट
26 Feb 2019 - 3:09 pm
गाभा: 

शत्रू सीमेच्या आत येईपर्यंत गाफील राहणे हे भारतीय इतिहासाचे व्यवच्छेदक लक्षण. (अर्थात यास नक्कीच सन्माननीय अपवाद आहेत)
आमचा आदर्श हनुमानाचा. पण तोही समुद्राकाठी आपली शक्ती विसरून हतबल झालेला.

वरून आदर्शवादाची पांघरलेली फाटकी चादर फारच उठून दिसायची. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असा आमचा सत्य अहिंसा दया करूणाचा अर्थ. कोट्यावधींची शस्त्रे विकत घेऊन ती केवळ पुजत ठेवुन कुजवण्यातच आम्हा कोण आनंद!

पुर्वी सागरी सिमा अोलांडल्या की पाप समजले जायचे. नंतर काही युद्धातही सीमा न अोलांडून आपण कोण मर्यादा राखली होती.

या प्रतिमेला छेद देणारी आजची घटना आहे. काहींना हे उदात्तीकरण वाटण्याची शक्यता आहे पण अशा गोष्टींचे उदात्तीकरण व्हायलाच हवे.

यावेळसा स्ट्राईक सर्वार्धाने वेगळा होता. यावेळेस पाकिस्तानला पुर्ण कल्पना होती की असे काही होणार आहे. थोडक्यात पाकिस्तान अलर्टवर असूनही आपण हा हल्ला साधारण २० मिनिटात करून दाखवला आहे.

या हल्यात भारतीय वायुसेनेने इंटरनॅशनल बॉर्डर पार केल्याचे दावे करण्यात आले आहेत. म्हणजे पी.अो.के च्याही पलीलडे जावून पाकिस्तानात हल्ला झाला आहे. कदाचित आधीच्या बैठकीत याची कल्पना इतर देशांना देण्यात आली होती.

सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व विमाने सुखरूप परत आणणे.

यातही आपली जागतिक प्रतिमा जपताना कोणताही नागरिक वा पाकिस्तानी सैनिक , सैन्यअड्डे यावर हल्ला न करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.

गुप्त माहिती मिळवणे आणि त्यावर कारवाई करणे यासाठी वेगवेगळ्या सरकारी विभागांना एकत्र काम करणे अर्थात आवश्यक असते. विभागातील समन्वय यावेळी अजून उठून दिसत आहे.

वायूसेना ही बंद केलेल्या जिनीसारखी होती असे माझे ब-याच दिवसापासुन मत होते. या जिनला बाहेर काढले आणि त्याने दिलेले काम चोख केले.

विषारी झाडाची आपण केवळ एक फांदी तोडली आहे ह्याचे मात्र भान हरपता कामा नये. संपूर्ण झाड कधी उपटून निघेल हे बघणे अौत्युक्याचे ठरेल. सद्ध्या पुढचे काही दिवस मात्र राजकिय चिखलफेकीत जाणार एवढेच आपण ठामपणे सांगू शकतो.

प्रतिक्रिया

कोणताही नागरिक वा पाकिस्तानी सैनिक , सैन्यअड्डे यावर हल्ला न करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.

पाकिस्तानी अतिरेकी आणि त्यांचे पाठीराखे ह्यांना धडा शिकवला ह्याचे कौतुक आहेच, पण त्यांच्याही नागरिकांना तोशीस लागू दिली नाही, ह्याचे खूप कौतुक वाटले!

दहशतवाद्यांना धक्का, पाकिस्तानात घुसुनपण लष्कर किंवा सामान्य नागरिकाना धक्का न लावता, स्वताची विमाने सुरक्षित परत आणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही आक्षेप येणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन भारताने एकाच तीरात अनेक निशाणे साधली आहेत. भारतीय लष्कराचे व सर्व संबंधईत यंत्रणांचे करावे तितके कौतुक कमीच. आणि देशवासियांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने ताबडतोब प्रत्युत्तर देण्याची हिंमत दाखविली हेदेखील अभिनंदनीय. मला वाटते अशावेळी यात राजकारण आणू नये.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Feb 2019 - 4:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भारतिय वायुसेनेचे अभिनंदन. पाकिस्तानी सैन्य 'हाय अ‍ॅलर्ट वर आहे हे माहित असूनही हे करता आले हे विशेष.

वायूसेनेस आदेश गो कोण देते माई?
तुझ्या ह्यांचे काय मत आणि?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

26 Feb 2019 - 7:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"तीन्ही सेनांना हवी तेव्हा कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे" असे मोदीच म्हणाले होते ना?

यशोधरा's picture

26 Feb 2019 - 8:01 pm | यशोधरा

म्हणजेच कोण गो उभे राहिले सेनेसोबत?
तुझ्या ह्यांना विचारून बघ ना गो माई.

नाखु's picture

26 Feb 2019 - 8:56 pm | नाखु

हल्ला झाला किंवा पाकिस्तानी अतिरेक्यांनी (द्विरूक्ती बद्दल क्षमस्व) तर अनुक्रमे मोदी, सरकार,गुप्तचर यंत्रणा जबाबदार.आणि त्याकरीता त्यांच्या समर्थकांना खिजवायचे,हिणवायचे असते.(आपले पक्षीय हितसंबंध लपवून) आपण कसे पक्षनिरपेक्ष आहोत ते दाखवण्यासाठी.
आणि एखाद्याने सरकारी धोरणांचे, पंतप्रधानांचे,मुख्यमंत्रयांचे अभिनंदन केले तर तात्काळ शिक्कामोर्तब करायचेच असा माईसाहेब यांच्या स्वारींचा आणि स्वारी दरबारींचा रिवाज आहे.

माईंच्या अगाध ज्ञान प्रकाशाने दिपून गेलेला चिल्लर वाचकांची पत्रेवाला नाखु

तेजस आठवले's picture

26 Feb 2019 - 4:32 pm | तेजस आठवले

अभिनंदन.

पुढचे काही दिवस मात्र राजकिय चिखलफेकीत जाणार

साधारण एका आठवड्याने कोल्हेकुई चालू होईल.

विनिता००२'s picture

26 Feb 2019 - 4:52 pm | विनिता००२

खूप खूप कौतुक भारतीय वायुसेनेचे __/\__

अभ्या..'s picture

26 Feb 2019 - 5:15 pm | अभ्या..

लै भारी काम,
भारताचे जवान मग ते आर्मीचे असो की सीआरपीएफचे, सामान्य नागरिक असोत की व्हीआयपी, ते काय रस्त्यावर पडलेले नाहीत. त्यांना हात लावला की मुळापासून उखडण्याची क्षमता हिंदुस्तानात आहे हे पाकिस्तानला निदान समजलं तरी बास झालं. आंतरराष्ट्रीय दबाव म्हणा की आर्थिक नाकेबंदी, राजकीय मजबूरी कुठल्याही कारणाने ह्या असल्या पाकपुरस्कृत दहशलवाद्यांचे पितृत्व पाकीस्ताननेच उघड नाकारले तर त्यासारखी चांगली बात नाही. दहशतवाद्यांनाही कळले पाहिजे आपण काय औकातीच्या आसर्‍याने आहोत. भारतीय सेनेने ती वेळोवेळी दाखवून दिली आहे. पाकीस्तानने पाळलेल्या भस्मासुराचा हात पाकीस्तानच्याच डोक्यावर एक दिवस बसावा, एवढीच मनोमन इछ्छा.

अर्धवटराव's picture

26 Feb 2019 - 5:49 pm | अर्धवटराव

पाकीस्तानने पाळलेल्या भस्मासुराचा हात पाकीस्तानच्याच डोक्यावर एक दिवस बसावा, एवढीच मनोमन इछ्छा.

किंबहुना आपल्या समस्येवर हाच अ‍ॅक्चुअल उपाय आहे. भस्मासुराचा हात 'काहि' ठिकाणि पोळुन काढतही असेल पाकला... ते त्यांना कळतही असेल...पण वळत नाहि.

सुबोध खरे's picture

26 Feb 2019 - 7:29 pm | सुबोध खरे

भारतीय वायुदलात मिराज २००० १९८५-८६ पासून आहेत. भारतीय वायुदलाचे वैमानिक तेंव्हाही शूर वीर होतेच.

मग आताच एकदम हा हल्ला का झाला? इतके दिवस का नाही?

त्यांना तुम्ही लढा, भारतीय जनता सर्व शक्तीनिशी तुमच्या पाठीशी आहे हे सांगणारा कोणी तरी आहे.

शस्त्र आणि अस्त्र कितीही शक्तिशाली असले तरी तो चालवणारा हात आणि त्याला आदेश देणारा मेंदू हा जास्त महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करणे आवश्यक आहे.

स्वलेकर's picture

26 Feb 2019 - 8:52 pm | स्वलेकर

मस्त प्रतिसाद

हरवलेला's picture

27 Feb 2019 - 9:18 am | हरवलेला

अक्षरशः हेच लिहिणार होतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2019 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

लोकशाहीमध्ये सामरिक निर्णयाची जबाबदारी सर्वोच्च मुलकी प्रशासनाची असते आणि त्यावर आधारलेल्या केलेल्या कारवाईची जबाबदारी सैन्याची असते. लोकशाहीत मुलकी राजकिय नेतृत्व सर्वोच्च असते. त्यामुळे, सैन्य कितीही बलवान असले तरी, दुर्बल राजकिय इच्छाशक्ती असलेल्या नेतृत्वाच्या निर्णयक्षमतेच्या अभावामुळे, सैन्याचे बल पडिक (अनप्रूव्ह्ड) राहते.

यामुळेच, आंतरराष्ट्रिय स्तरावर, यशाचे/अपयशाचे श्रेय, निर्णय घेणार्‍या देशाच्या सर्वोच्च नेत्याला प्रथम व सैनिकी प्रशासनाला नंतर दिले जाते.

तेथे, भारतीय राजकारणासारखे, "स्वतःच्या पक्षाच्या बाबतीत, जिकलो तर नेत्याचे यश व हरलो तर कार्यकर्त्यांचे अपयश" आणि "विरोधी पक्षांच्या बाबतीत, जिंकला तर जनतेची दिशाभूल केली आणि हरला तर हे आमच्या नेत्याचे यश आहे", अशी एकांगी व्यक्तीपूजा होत नसते.

तेजस आठवले's picture

26 Feb 2019 - 7:50 pm | तेजस आठवले

(खालील संवाद पूर्णतया काल्पनिक, पण पूर्वानुभव बघता सत्यात येऊ शकतात, हलकेच घेणे)
: अंअंअं, असे हल्ले आम्ही आमच्या काळात कित्येक केले होते. पण आम्ही ह्याची कुठेही वाच्यता नाही केली.
: मृतात्म्यांना श्रद्धांजली.मला त्यांची नावे कळवा, रुग्णवाहिकेला द्यायचीत.
: ह्या हल्ल्यांमागे आरएसएस आहे.
: ग्वालियर वरून विमाने उडाली आणि तिथे आमचे सरकार आहे. मोदी सरकार ह्याचे फुकट श्रेय घेत आहे.
: २६/११ चा हल्ला झाला तेव्हा मी होतो, गप्प राहिलो. माझ्या डोळ्यांदेखत माझा अध्यादेश फाडला, मी गप्प राहिलो. माझ्या बुडाखाली हजारो कोटी
रुपयांचे घोटाळे झाले, मी एक चकार शब्द काढला नाही. आता मात्र मी गप्प बसणार नाही.(बरोबर बोललो ना मॅडम?)
: दिल्लीमध्ये एवढे सगळे घडत असताना मला काहीच माहित नाही? केंद्र सरकार मला काहीच सांगत नाही? हा भेदभाव का?सर्वाना विश्वासात घेण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.
: आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुमचे जवान मिराजमध्ये इंधन भरू शकले ह्याची जाण ठेवा. माझ्या पैश्यावर हवेत उडता काय ?
: काल रात्री ग्वालियर वरून उडालेली विमाने दिल्लीवरून गेली. त्यामुळे सगळीकडे धूळ उडाली आणि मला परत मफलर कानटोपी घालून बसायची पाळी आली.मला धुळीमुळे इतका सर्दी खोकला होतो हे काय ह्यांना माहित नव्हते?मुद्दामहून त्रास देतात.
: मोदी सरकारने पाकिस्तानवर हल्ला केला हे योग्यच, पण, हा प्रश्न असा सुटणारा नाही.काहीतरी करून दाखवण्यासाठी मोदी कुठल्याही थराला जाऊ शकतात.मेमनांच्या याकूबला फाशी दिल्यानंतर मी जो अस्वस्थ झालो आहे तो आता अजूनच अस्वस्थ होतो आहे. हे सरकार देशाला युद्धखोरीकडे नेत आहे.असहिष्णुता वाढली आहे.नोटबंदी आणि विकासातले अपयश ह्यावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी 'काहीतरी' करून दाखवणे गरजेचे होतेच.देशात युद्धज्वर निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. मोदींनी सापाच्या शेपटावर पाय दिला आहे. भविष्यात ह्याचे भीषण परिणाम होतील.(मी तेव्हापर्यंत राज्यसभेत गेलेलो असेन म्हणा !)
: आईभवानीच्या आशीर्वादाने आमचा मनसुबा आज सफल झाला.सरकारला हे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या आमच्या नाक्यानाक्यांवरच्या हजारो ढाण्या पेन्ग्विनांचेच हे श्रेय आहे. आमच्या गर्जनांनी दिल्लीचे तख्तही हादरले आणि सरकारने हा निर्णय घेतला.मिराज विमानांचे ह्यापुढे संताजी-धनाजी असे नामकरण करण्यात यावे अशी आमची मागणी आहे.
:आम्ही सगळे देशाबरोबर, जवानांबरोबर आणि जनतेसोबत आहोत(सरकारबरोबर आहोत असं पण म्हणायचं का ग मम्मा?). हे सरकार जरी असहिष्णू, हिटलरशाही लादणारे, सगळ्या संस्थात आरएसएसचे लोक घुसवणारे, दलित विरोधी, शेतकरीविरोधी, गरिबांना लुटून श्रीमंतांचे घर भरणारे, चोर असले तरी त्यांचे (शेवटी एकदाचे!)अभिनंदन.
: दहशतवाद्यांचा निषेध.मुळात दहशतवादाला धर्म नसतोच.पुलवामा हल्ल्यात स्वतःला उडवून घेणारा निधर्मी दहशतवादी रशीद गाझी हा मुळात धार्मिक प्रवृत्तीचा होता.काही लोकांनी त्याला भडकवले आणि ह्या हल्ल्यासाठी त्याला तयार केले.तो बिचारा गरीब होता हो. सरकारने अतिरेक्यांना प्रत्युत्तर दिले हे योग्यच केले. पण ह्या देशातील भगव्या, कडव्या, अतिजहाल हिंदू अतिरेक्यांना त्याचा उन्माद चढू देता कामा नये.बरं, मी जरा समोरच्या बाकावर बसून दहीभात खाऊन घेतो.
: मुझे पत्ता है कि हाफिज सैद साहेब को इस जबाबी हमले से बहुत दुःख पहूचा होगा.
: मोदीजी के नेतृत्व मी देश को दिख रहा है विकास का तारा |
दुसरा सर्जिकल स्ट्राईक करके पाकिस्तान के बजा दिये बारा ||
स्तुती करून करून थकलो, आली आता मला फीट |
लवकर द्या ना मला एक राज्यसभेची सीट ||

शब्दानुज's picture

26 Feb 2019 - 8:29 pm | शब्दानुज

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. आवडल.

mayu4u's picture

26 Feb 2019 - 9:03 pm | mayu4u

मस्त लिहिलंय!

शलभ's picture

26 Feb 2019 - 9:56 pm | शलभ

एकच नंबर लिहिलंय.
लोकसत्ता आणि सामना अग्रलेख तर तुम्हीच लिहायला घ्या आता.

ट्रेड मार्क's picture

27 Feb 2019 - 5:36 am | ट्रेड मार्क

एक नंबर तेजस!

युवराज आणि इतर सगळेच विरोधक अजून धक्क्यातून सावरायचे आहेत. एकदा सावरले की मग विरोधकांच्या खऱ्या प्रतिक्रिया येऊ लागतील, उदा. -

- पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे हा हल्ला अयशस्वी झाला आहे.

- किती अतिरेकी मेले याचा काहीच पुरावा नाही. एकदा ० पासून ते ३०० पर्यंत काहीही सांगितला जातोय, यावर कसा विश्वास ठेवायचा?

- यात मोदींनी काहीच केलं नाही.

- हा हल्ला निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आला.

- मोदी या हल्ल्याचा राजनैतिक फायद्यासाठी वापर करणार/ करत आहेत.

- आमच्या काळातही आम्ही असे अनेक हल्ले घडवून आणले, पण आम्ही जाहिरात नाही केली. यातले काही हल्ले एवढे गुपचूप केले की सैन्याला सुद्धा कळले नाहीत.

- LoC असे उल्लंघन करणे हे एखाद्या देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला आहे, इम्रान खानने बोलून प्रश्न सोडवू अशी साद घालूनही लगेच हा हल्ला करण्याचे कारण काय?

- हल्ला झाला तेव्हा मोदी आपल्या XX लाखांच्या किंग साईझ बेड वर एसी चे तापमान १८ करून काश्मिरी रजई घेऊन घोरत होते.

- १३ दिवस थांबण्याचं काय कारण होतं? या दिवसात सगळ्या विरोधकांनी आणि जनतेने दबाव आणला म्हणून मोदींना काहीतरी कारवाई करायला लागली. पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे मुद्दामून फार नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

- हल्ला करणे ठीक आहे पण त्यानंतर होत असलेला जास्तीचा राष्ट्रवाद हा धोकादायक आहे. यातून अल्पसंख्याकांना चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि तो त्यांना अतिरेकी बनण्यास प्रवृत्त करू शकतो.

- आणि शेवटची पण खतरनाक: निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून मोदी, शहा, डोवाल, आरएसएस यांनी मुद्दामून पुलवामाचा हल्ला घडवून आणला आणि आता जंगलात बॉम्ब टाकून अतिरेकी तळ उध्वस्त केले म्हणून खोटा प्रचार करत आहेत.

तेजस आठवले's picture

27 Feb 2019 - 2:51 pm | तेजस आठवले

हल्ला करणे ठीक आहे पण त्यानंतर होत असलेला जास्तीचा राष्ट्रवाद हा धोकादायक आहे. यातून अल्पसंख्याकांना चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि तो त्यांना अतिरेकी बनण्यास प्रवृत्त करू शकतो.

+१
साधारण उद्याच्या शुक्रवारपासून वरचे वाक्य वेगवेगळ्या माध्यमांतून सतत लोकांच्या मनात बिंबवले जाईल.सगळ्यातले सगळे कळणारे एक लाडके संपादक ह्यात आघाडीवर असतील.
असहिष्णू गॅंग : तसंच, ह्यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला किंवा पाकिस्तानकडून आगळीक किंवा काश्मीरमध्ये काहीही घडले तरी ती मोदींच्या जहाल राष्ट्रवादाने निर्माण केलेल्या उन्मादाची पाकिस्तानकडून आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया असेल.

संपादकाच्या डुलक्या : वायुसेनेच्या मिराज विमानांनी ग्वालियरमधून उड्डाण केल्याच्या सरकारच्या दाव्यावर आमच्या प्रतिनिधीने अधिक चौकशी केली असता ही सरकारने केलेली निव्वळ धूळफेक असल्याचे सिद्ध झाले आहे.ग्वालियर विमानतळाजवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या अबक नामक व्यक्तीने आपण त्या रात्री एकही विमान उडाल्याचे पाहिलेले नाही असा दावा आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.अबक हे ८० वर्षाचे असून जन्मजात रातांधळेपण आणि वयपरत्वे दोन्ही डोळ्यात झालेला मोतीबिंदू ह्यामुळे सतत चिडचिड होत असल्याने रात्रीची झोप फारशी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. आता ह्या सरकारच्या अतिरंजित, कडव्या, जहाल राष्ट्रवादी भावनेने उन्मादी वातावरण निर्माण करून निवडणुकीत लाभ उठवण्याच्या प्रयत्नांना किती साथ द्यायची ते जनताच ठरवेल.

तेजस आठवले's picture

27 Feb 2019 - 4:25 pm | तेजस आठवले

हा हल्ला निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आला.

२०१४ लोकसभा निवडणुकांच्या आधी अजमल कसाबला झटपट फाशी देण्यात कुठल्या सरकारच्या डोळ्यांपुढे निवडणूक नव्हत्या?
मोदी सरकार गेल्याशिवाय भारत पाक शांतता चर्चा पुनर्स्थापित होऊ शकणार नाही असे पाकिस्तानात जाऊन म्हणणारे मणिशंकर अय्यर यांच्या डोळ्यांपुढे निवडणूक नव्हत्या का?
कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनाला माजी आयएसआय प्रमुखाला बोलावून तावातावाने समारंभ करणाऱ्या ममता बॅनर्जी आणि केजरीवाल ह्यांच्या डोळ्यांपुढे कुठला उदात्त विचार होता म्हणे ?

मोदी आवडत नसतील किंवा ते एक नंबरचे खोटारडे आणि नालायक आहेत असे म्हणणार्यांनी त्यांच्यापेक्षा कमी खोटारडा उमेदवार जाहीर करावा आणि मोदींचा खोटारडेपणा पुराव्याने शाबीत करावा.

तेजस आठवले's picture

27 Feb 2019 - 4:13 pm | तेजस आठवले

समोरच्या बाकावरूनचा संदर्भ जर कोणाला कळला नसेल तर खालील लेख शांतपणे वाचावा.मोदी निवडून आल्यापासून समोरच्या बाकावरून ह्या प्रकारचे लेख दर आठवड्याला अधिकृतरीत्या पेपरात प्रसिद्ध होतात. एकीकडे विरोधकांचा आवाज दाबला जातोय म्हणत दुसरीकडून असे हल्ले चढवायचे ही ह्या गॅंगची मोडस ऑपेरांडी .भारतीय सैन्याने हवाई हल्ले केल्यावर एका तासाने खालील लेख छापायला गेलेला आहे.काही वाक्ये मी ठळक केलेली आहेत.
"February 26, 2019 04:32 am "
https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/pulwama-attack-jem-crpf-...
============================================
पी. चिदम्बरम

ज्युलिओ रिबेरो, लेफ्टनंट जनरलपदावरून निवृत्त झालेले डी. एस. हुडा व एस. ए. हासनैन, माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन हे सारे जण अनुभवातून आलेले शहाणपण सांगत आहेत.. त्यांचे ऐकूनही न घेता, आपल्या वेदना आणि संतापच महत्त्वाचे मानल्यास परिणाम काय होतील?

जानेवारी २०००मध्ये भारताने मसूद अझरला सोडून दिले त्याचे पश्चात-धक्के नियमितपणे बसत आले आहेत. पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेला दहशतवादी हल्ला हा त्याचाच एक भाग, या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले. यातील प्रत्येक धक्का हा देशाला भाजपप्रणीत एनडीए सरकारने आयसी १८४ विमानाचे प्रवाशांसह अपहरण करण्यात आल्यानंतर मसूद अझरला सोडून दिल्याच्या कृत्याची जाणीव करून देणारा आहे. त्या वेळी शेकडो विमान प्रवाशांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते, तत्कालीन संरक्षणमंत्री जसवंत सिंह हे दहशतवाद्यांना सोडण्यासाठी त्यांच्याबरोबर काबूलला गेले होते याची छायाचित्रे अजूनही त्या कटू स्मृती जाग्या करतात.

मसूद अझरला सोडून देण्यात आल्यानंतर जैश ए महंमद ही संघटना स्थापन केली. जैशने पहिला हल्ला केला तो १९ एप्रिल २००० रोजी. त्यात मानवी आत्मघाती दहशतवाद्याचाच वापर केला होता. श्रीनगर येथे १५व्या कोअरच्या परिसरात हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर नियमित कालांतराने जैशने दहशतवादी हल्ले केले आहेत. त्यात जम्मू-काश्मीर विधिमंडळ संकुल, संसद यांना लक्ष्य करण्यात आले. कुपवाडा, बारामुल्ला व श्रीनगरमध्ये या दहशतवादी संघटनेने सातत्याने हल्ले केले.

घुसखोरी व भरती

जैश ए महंमद ही संघटना दोन पातळ्यांवर कारवाया करते, एक म्हणजे दहशतवाद्यांना भारतीय प्रदेशात घुसखोरीच्या माध्यमातून पाठवले जाते. त्यांना विशिष्ट ठिकाणी हल्ले करण्याचे लक्ष्य दिलेले असते. पठाणकोट, उरी व नाग्रोटा येथील हल्ले याच प्रकारातील होते. दुसरे म्हणजे स्थानिक युवकांना भरती करून त्यांना आत्मघाती बॉम्बर म्हणून वापरण्यात येते. पुलवामा येथील हल्ला या प्रकारातील होता. त्यात अदिल अहमद दर याने आत्मघाती स्फोट घडवून आणला, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे त्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांवर कार धडकावून स्वत:ला उडवून दिले. त्यात ४० जवान शहीद झाले होते.

दुर्दैवाने २०१५ पासून घुसखोरांची संख्या वाढली असून स्थानिक व्यक्तींचा दहशतवादी कारवायांत सहभागही वाढला आहे, जास्तीत जास्त स्थानिक युवक दहशतवादी कारवाया करीत आहेत.

जम्मू-काश्मीरबाबत माझी मते सर्वज्ञात आहेत. पाकिस्तानातील नागरी सरकार कमकुवत आहे. तेथील लष्कराने आतापर्यंत काही धडा घेतलेला नाही, कुठलाही देश न मानणाऱ्या दहशतवाद्यांनी सतत जम्मू-काश्मीरला लक्ष्य केले आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी आर्थिक थडगे त्यांनी खणून ठेवले आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याच वेळी दुसरीकडे काश्मीरमध्ये सरकारने जी दंडशक्ती व लष्करी बळाचा वापर चालवला आहे त्याला माझा विरोध आहे. केंद्र सरकारनेही बळाचा वापर करून काश्मीरमधील लोकांनाच लक्ष्य केले आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने अनेक बाबतीत देशाला तोंडावर पाडले आहे. एक तर या सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण व घातक स्वरूपाचे जम्मू-काश्मीर धोरण यांचे ते परिणाम आहेत. याच स्तंभात १५ मे २०१८ रोजी मी म्हटले होते की, भारताने एक देश म्हणून एकता, अखंडता, विविधता, धार्मिक सहिष्णुता यांचे पालन करतानाच लोकांप्रति जबाबदार राहिले पाहिजे, मतभेद दूर करण्यासाठी चर्चा केली पाहिजे. जम्मू-काश्मीरमध्ये या तत्त्वांची परीक्षाच आहे, कारण देश म्हणून आपण या परीक्षेत नापास झालो आहोत.

पुलवामा हल्ल्यानंतर सरकार व अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्यांनी एक राक्षस उभा केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने त्याचा बळी दिला जाईल. दुसरीकडे काश्मीरमधील व्यापारी, विद्यार्थी यांच्यावर जम्मू व देशाच्या इतर भागांतील शहरात हल्ले होत आहेत. त्यांना वसतिगृहांतून हाकलण्यात आलेले आहे. समाजमाध्यमांवर काहींनी देशद्रोहाची भाषाही केली आहे. पाकिस्तानशी व्यापार-उदिमाबरोबरच क्रीडा संबंध तोडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यघटना शिरोधार्य मानण्याची जबाबदारी असलेल्या मेघालयच्या राज्यपालांनी तर काश्मीरलाही कुणी भेट देऊ नये, अमरनाथ यात्रेला जाऊ नये, काश्मिरी व्यापाऱ्यांच्या वस्तू ते जेव्हा हिवाळ्यात येथे येतात तेव्हा खरेदी करू नयेत, असे आवाहन केले आहे. युद्धज्वराचे हे चुकीचे सूर आहेत.

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्या दु:खात सगळा देश सहभागी आहे, त्यांच्या कुटुंबांचे दु:ख प्रत्येकाला जाणवत आहे, पण दुसरीकडे आपण काही प्रश्न विचारणे विसरून गेलो आहोत- देशाच्या सुरक्षेला जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचे काही अपयश होते का? एकाच वेळी दोन हजारांहून अधिक जवानांना एकीकडून दुसरीकडे हलवणे ही गंभीर चूक नव्हे काय? अदिल दर या २२ वर्षांच्या युवकाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांचा बळी घेणारा भीषण हल्ला का केला असावा?- असे अनेक प्रश्न यात आहेत, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोवर त्याच त्या चुकांची पुनरावृत्ती करण्याच्या आपल्या या सवयीला इतिहासात माफी नाही.

शहाण्यांचे आवाज

सुदैवाने अनेक लोक प्रश्न विचारत आहेत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. ए. हासनैन यांनी म्हटले आहे की, काश्मिरी लोकांचा आपण शारीरिक छळ करीत राहिलो, त्यांना समाजमाध्यमांवर सतत डागण्या देत राहिलो तर आपण काश्मीर प्रश्नातील धोरणात्मक उद्दिष्टे कधीही साध्य करू शकणार नाही. तेथील अल्पसंख्याकांची नाराजी आणखी वाढतच राहील.

निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, आपण काश्मीर प्रश्नाकडे डोळेझाक करता कामा नये, सरतेशेवटी ज्या दहशतवाद्याने पुलवामातील हा महाभयंकर हल्ला केला तो स्थानिक दहशतवादी आहे हे विसरता येत नाही. त्यामुळेच काश्मीरमध्ये अंतर्गत प्रश्न आहेत.

निवृत्त परराष्ट्र सचिव श्याम सरण यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की, काश्मीर प्रश्नाचा विचार एकंदर भारतासहच करावा लागेल. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंतच्या सर्वात कडक सुरक्षा प्रतिबंधांनी खूप यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे काश्मीर प्रश्नाचे देशांतर्गत व बाह्य़ पैलू यांचा एकाच वेळी विचार करून त्यावर तोडगा काढला पाहिजे.

निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी लिहिले आहे की, दहशतवादी ज्या समुदायाचे आहेत त्या समुदायाची मने आपण जिंकली नाहीत तर त्यांना सतत त्यांच्या सहधर्मीयांकडून रसद पुरवठा होत राहील, एक दहशतवादी मेला तर त्याची जागा लगेच दुसरा घेईल. किंबहुना भावनांच्या अतिरेकातून आणखी जास्त दहशतवादी काम करू लागतील.

मी वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचे काश्मीर प्रश्नाचे व तेथील दहशतवादाचे हे विश्लेषण बरेच काही सांगून जाणारे आहे. असे असताना लष्कराने जुनीच बळाची भाषा वापरली. लेफ्टनंट जनरल कंवलजित सिंग धिल्लाँ हे चिनार कोअरचे कमांडर आहेत. त्यांनी १९ फेब्रुवारी रोजी असे सांगितले की, काश्मीरमध्ये जो कुणी बंदूक उचलेल त्याने शरणागती पत्करली नाही तर आम्ही त्याला ठार मारू.

१४ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्याच्या कटु स्मृती विसरता येणार नाहीत, त्यात संताप व नैराश्य येणार हेही स्वाभाविक आहे, पण म्हणून आपण आशा सोडून चालणार नाही. सध्या देशातील सरकार जे करीत आहे त्यातून आपण अधिक मोठय़ा आपत्तीकडे जाऊ यात मला शंका नाही, कारण त्यातून लोकांचा एकमेकांवरचा विश्वास उडेल. जम्मू-काश्मीरमधील लोक मनाने आणखी आपल्यापासून दूर जातील. प्राणहानीचे दुष्टचक्र सुरू राहील. त्यातून आपण हा प्रश्न सुटण्याच्या जवळपासही जाऊ शकणार नाही. यात जे शहाणेसुरते लोक आहेत त्यांचे म्हणणे ऐकले जाईल व पुढचे सरकार अधिक समज, शहाणपण दाखवून चांगल्या नेतृत्वाचे उदाहरण घालून देत काश्मीर प्रश्नी राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

सदर लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत असं तुम्हीच किंवा मूळ लेखात म्हंटले असेल कदाचित...
माझं खुलं आवाहन आहे सर्व भारतीय जनतेला कि त्यांनी खुशाल काश्मीर मध्ये फिरायला जावे, (मी जम्मू बद्दल नाही बोलत आहे कारण तो हिंदुबहुल आहे) कोणाची टाप नाही तुमच्या केसालाही धक्का लावायची. हे मी स्वानुभवावरून सांगत आहे, गेल्या वर्षीच्या १२ दिवसांच्या काश्मीर सहलीबद्दल मी लिहिले नाहीये कारण मिपावर ह्या ठिकाणाबद्दलचे अनेक धागे आहेत.
कशासाठी काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ह्याची प्रचीती आल्या शिवाय राहणार नाही.... बाकी बातम्या वाचून/बघून ट्रीप प्लॅन करणारे कधीच हा स्वर्गीय अनुभव घेऊ शकत नाहीत हे हि तितकेच खरे. पण एकदा जाऊन बघा, कुठलाही त्रास नं होता तुमची सहल पार पडेल ह्याची खबरदारी तिथली स्थानिक जनता कशी घेते हा खरंच एक अनुभव आहे.
मान्य आहे जवळपास ३०% लोकं म्हणतात आम्हाला ना भारतात रहायचय ना पाकिस्तानात, आम्हाला आमचं स्वतंत्र राष्ट्र हवंय, पण बहुसंख्य लोकांना भारताबरोबर राहणे उचित वाटतंय....

टर्मीनेटर's picture

27 Feb 2019 - 6:36 pm | टर्मीनेटर

कृपया हे वैयक्तिक घेऊ नका... हे आवाहन समस्त मिपाकरांसाठी आहे.

तेजस आठवले's picture

27 Feb 2019 - 10:09 pm | तेजस आठवले

मी हा लेख फक्त घरभेदी आणि फुटीरतावादी मानसिकता स्पष्ट करण्यासाठी टाकला आहे.सत्ता हि सर्वोच्च आणि देश शेवटी असे असणारे कोण आहेत हे लोकांना कळण्यासाठी.
काश्मीरमधला पर्यटनाशी ह्याच काहीही संबंध नाही.

मराठी कथालेखक's picture

26 Feb 2019 - 7:59 pm | मराठी कथालेखक

इंजिनिअरिंगला असताना काही विद्यार्थी तीन वर्षे अभ्यासाचा कंटाळा करत कसे बसे द्वितीय वा उच्च-द्वितीय (हायर सेकंड) श्रेणी मिळवून पास व्हायचे . पण शेवटच्या वर्षी आटापिटा करुन प्रथम श्रेणी मिळवायचे..मग बायोडेटावर चार वर्षांची सरासरी न लिहिता केवळ शेवटच्या वर्षाचा निकाल B.E. - First Class असं काहीसं लिहायचे.

तेजस आठवले's picture

26 Feb 2019 - 9:00 pm | तेजस आठवले

प्रचंड हुशार असणारा माझा अभियांत्रिकीमधला जाड चष्मेवाला शीख मित्र आठवला.अभियांत्रिकीची पहिली दोन वर्ष त्याने भरपूर अभ्यास करून डिस्टिंक्शन मिळवले आणि नंतर फाजील आत्मविश्वास दाखवत अभ्यास न केल्याने सटासट केट्या लागल्या आणि मग ड्रॉपच लागला की हो त्याला.

चांगल्या डॉक्टर ला दाखवा. वेळीच उपचार झाले तर कदाचित बरे व्हाल.

ट्रेड मार्क's picture

27 Feb 2019 - 6:08 am | ट्रेड मार्क

29 September 2016 ला पण एक सर्जिकल स्ट्राईक झाला होता याचं तुम्हाला विस्मरण झालेलं दिसतंय. तेव्हा कुठली निवडणूक होती बरं?

बाकी पाकिस्तानला जगात एकटं पडायचे प्रयत्न गेल्या ४ वर्षात जोरात चालू आहेत -

Modi corners Pakistan on terrorism, advises China not to impinge sovereignty through OBOR

2018 foreign policy - team Modi goes beyond non alignment corners

G20 summit: World leaders vow to fight terrorism and its funding; PM Modi corners Pakistan again

Will approach India for Balochistan's freedom: Baloch leader

अजून शोधले तर सापडतील. बघा प्रयत्न करुन!

बादवे: २००८ मध्ये पाकिस्तानी अतिरेकी पार मुंबई पर्यंत येऊन हल्ले करून गेले. त्यावेळेलाही आपले एअरफोर्स, आर्मी आणि नौदल इतकेच सक्षम होते. पण कदाचित त्यावेळचा विद्यार्थी अर्थशास्त्राचा असल्याने आणि त्यातूनही ते रिमोटवर चालवले जात असल्याने काहीच केलं नसावं, काय म्हणता? २००९ ची निवडणूक एकहाती जिंकता आली असती की.

श्वेता२४'s picture

27 Feb 2019 - 11:08 am | श्वेता२४

Finally terrorist camps in POK hit by Laser Guided Bombs from IAF Mirage 2000. We were about to hit POK camps in Muzzafarrabad after Mumbai attacks in 2008. Finally the Govt did not decide. Our Sukhoi Sqn under my Command was involved. Der Aaye Par Durusht Aaye. Cheers!!

— Mohonto Panging (@MontyPanging) February 26, 2019

मोहंतो पेगिंग या निवृत्त वैमानिकाने या संदर्भातले ट्विट केले आहे. भारतीय वायुसेनेने मिराज 2000 विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानवर हवाई हल्ला केलाच हे बरे झाले. उशीर झाला पण हरकत नाही. 2008 मध्ये जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा आम्ही मुजफ्फराबाद या ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांवर आम्ही हल्ला करणार होतो. मात्र त्यावेळी देशातील सरकारने आम्हाला त्याची संमती दिली नाही म्हणून ती मोहीम रद्द झाली असंही मोहंतो पेंगिग यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने करवाई करण्यास नकार दिल्याने 2008 मध्ये ही कारवाई होऊ शकली नाही. वायुसेनेकडे कायमच चांगली क्षमता आहे. मात्र असा एअर स्ट्राईक करायचा असेल तर राजकीय इच्छाशक्तीची गरज लागते. त्यावेळच्या सरकारने ती दाखवली नाही.

मराठी लेखक यांचा प्रतिसाद याठिकाणी पूर्णपणे अप्रस्तुत वाटतो.
दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल भारतीय सेना, गुप्तचर यंत्रणा आणि सर्व सम्बंधितांचे मनापासून अभिनन्दन.
आणि हो, मोदींचे देखील अभिनन्दन. इतकी वर्षे आम्ही भारतीय - तीव्र निषेध, आमचा संयम म्हणजे आमचा दुबळेपणा समजू नये असलंच काही तरी ऐकायचो. निदान आताचे पंतप्रधान ज्यांनी केलंय त्यांना धडा शिकवू असं स्पष्ट तरी बोलताहेत आणि लगेच अंमलबजावणी सुद्धा होताना दिसते आहे.
मी बीजेपी समर्थक नाही, पण जे चांगले दिसतेय त्याला चांगलेच म्हटले पाहिजे.

झेन's picture

26 Feb 2019 - 8:14 pm | झेन

इंजिनिअरींगच्या परीक्षा पूर्व नियोजित असतात, शत्रू राष्ट्र आणि अतिरेकी आधी तारखा देत नाहीत. सरकार, पक्ष सोडा निदान सेनेचे तरी निर्मळ मनान अभिनंदन करा.

नाखु's picture

26 Feb 2019 - 9:01 pm | नाखु

निर्मळ मन काय करील साबण,असं सुभाषित आमच्या गावाकडे शाळेतील आढ्यावर लिहीलेले होते खरे.

मुदल्लातला वाचकांची पत्रेवाला नाखु

दिगोचि's picture

27 Feb 2019 - 3:59 am | दिगोचि

ते वचन "नाही मन निर्मल काय करील साबण" असे आहे.

दिगोचि's picture

27 Feb 2019 - 4:12 am | दिगोचि

ते वचन "नाही मन निर्मल काय करील साबण" असे आहे.

स्पार्टाकस's picture

26 Feb 2019 - 8:42 pm | स्पार्टाकस

भारतीय हवाईदल, सेना आणि सरकारचे मन:पूर्वक आभार!
जिगरबाज सैन्याचे पाय न ओढता त्याच्या पाठीशी ठामपणे उभं असणारं राजकीय नेतृत्वं असलं की काय होतं हे दिसून आलं!

कुत्सितपणाच्या आणि कोत्या मनोवृत्तीच्या परंपरेला जागून या हल्ल्याचं श्रेय फक्तं हवाईदलाचं आहे, यात मोदी किंवा डोवाल यांचं काही कर्तृत्व नाही असा सूर लावणारे निपजतीलच, त्यांना फक्त एकच प्रश्न आहे, १९७१ च्या बांग्लादेश निर्मितीच्या युद्धाचं श्रेयही फक्तं भारतीय सैन्याला दिलेलं त्यांन खपेल का?

फेसबुकवर आजच्या या हल्ल्याचं श्रेय राजीव गांधीना देण्याचाही एक प्रयत्न झालेला दिसला. कारण काय तर ही विमान फ्रान्सकडून घेण्याचा करार १९८४ मध्ये राजीव गांधींनी केला होता! ही विमानं तेव्हापासून भारतीय विमानदलात आहेत तर २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने ती अंडी उबवायला ठेवली होती का?

सगळ्यात वांधे झाले ते मात्रं केजरीवालचे....

सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे यावेळी पुरावा मागायला तोंड उचकटलं तर लोक दाभण घालणार आणि आमरण उपोषणाकडे 'मर एकदाचा' म्हणून कोणीही बोंबलायला लक्षच देणार नाही! झाकली मूठ म्हणून उपोषण मागे घेतल्याचं जाहीर करुन पुन्हा एकदा स्वहस्ते तोंड फोडून घेतलं!

अर्धवटराव's picture

26 Feb 2019 - 9:25 pm | अर्धवटराव

सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे यावेळी पुरावा मागायला तोंड उचकटलं तर लोक दाभण घालणार आणि आमरण उपोषणाकडे 'मर एकदाचा' म्हणून कोणीही बोंबलायला लक्षच देणार नाही! झाकली मूठ म्हणून उपोषण मागे घेतल्याचं जाहीर करुन पुन्हा एकदा स्वहस्ते तोंड फोडून घेतलं!

=)) =)) =))

ट्रम्प's picture

26 Feb 2019 - 9:54 pm | ट्रम्प

तुमचा हा प्रतिसाद जर केजरीवाल ने जर वाचला तर तो रोज तोंड फोडून घेईल !!! = )

इरसाल's picture

27 Feb 2019 - 4:08 am | इरसाल

त्या हलकट प्रवृत्त्या या धाग्यावर नाहि येणार

पाकिस्तानच्या प्रॉक्सि-वॉर स्ट्रॅटेजीला उशिरा का होईना पण उत्तर शोधलं जातंय हे खूप महत्वाचं आहे.
१) या कारवाईने पाकिस्तानचं प्रमुख अस्त्र -- दहशतवादी -- हे बोथट होणार आहे.
२) प्रत्यक्ष युद्धभूमीतल्या यशापेक्षाही पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या मनात *कायमची भीती* निर्माण करण्यात आलेलं यश हे खूप मोठं आणि दूरगामी परिणाम करणारं आहे.
३) या कारवाईतून मिळालेला अनुभव हा आपल्या सैन्यासाठी अत्यंत ,मोलाचा आहे.

शुचि's picture

26 Feb 2019 - 11:03 pm | शुचि

https://s3.india.com/wp-content/uploads/2016/07/collage891.jpg

शब्दानुज's picture

26 Feb 2019 - 11:09 pm | शब्दानुज

मिसाईल हल्ल्याबाबत कोण सांगू शकेल काय ?
म्हणजे आपण थेट विमाने न पाठवता फक्त मिसाईलने हल्ला करु शकतो का ? याचे फायदे तोटे काय असतील ?

गणेश.१०'s picture

27 Feb 2019 - 12:52 am | गणेश.१०

१) क्षेपणास्त्र हल्ला अणुहल्ला म्हणून समजला जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कदाचित त्याचा विचार होत नसावा.
२) आणि विमानातून केलेले हल्ले हे जास्त अचूक असावेत.
... असं वाचलंय.

इन्दुसुता's picture

27 Feb 2019 - 1:03 am | इन्दुसुता

जय हिन्द ! जय हिन्द की सेना !!

आज अगदी हमसुन रडले. उभ्या आयुष्यात हा दिवस बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं.

आपण दरच वेळी मार खातच राहणार!! शक्य असून सुद्धा आपल्या देशाकडून काहीतरी होईल या बद्दल आशा सोडून किती तरी वर्षं झाली असतिल.
आज मात्र भारतानी जे करून दाखवलं त्या साठी एक कडक सॅल्युट!!

आजी सोनियाचा दिनु, वर्षे अमॄताचा घनु

Chandu's picture

27 Feb 2019 - 5:26 pm | Chandu

+11111

अहो, इथे सोनिया कुठून आली ?

आजी मोदीयाचा दिनु, वर्षे कौतुकाचा घनु असे म्हणा हवे तर.

फक्त सीमित हल्ला करून दहशतवादी निर्माण करणारे तळ उध्वस्त केल्या बद्दल भारतीय वायुदलाच्या सर्व शुर योध्यांच अभिनंदन .
आणि गंभीर भूमिका घेवून अत्यंत धाडसी निर्णय घेतल्या बद्दल भारत सरकार च अभिनंदन.
आणि ह्या भारताच्या हल्लात शत्रू राष्ट्राच्या सुधा सामान्य जनतेचे बिलकुल नुकसान झालं नाही आणि जगाला माहीत झालं की भारत हा अतिशय ताकदवान देश आसला तरी संयमी सुधा आहे .

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Feb 2019 - 9:51 am | ज्ञानोबाचे पैजार

या दोन प्रतिहल्ल्यां नंतर मोदी सरकार बद्दल अपेक्षा जास्ती वाढल्या आहेत. दोन्ही सर्जिकल स्ट्राइक ह्या आपल्यावर झालेल्या हल्ल्यांच्या केवळ प्रतिक्रीया होत्या.

पण आता केवळ अशा प्रतिक्रीया देत बसण्या ऐवजी "जर आमच्या कडे डोळे वर करुन बघायचा विचार जरी केलात तरी डोळे काढून घेउ" अशी दहशत बसवणारी कारवाई करण्याची वेळ आता आली आहे.

भारत केवळ प्रतिहल्ला नाही तर आक्रमणही करु शकतो हे जेव्हा जगाला समजेल तेव्हाच भारता कडे वाकडा डोळा करुन पहाण्या आधि १००० वेळा विचार केला जाईल.

अशी कारवाई करण्याची ताकद आणि हिम्मत मोदी सरकार मधे आहे हे आता सिध्द झालेच आहे.

पैजारबुवा,

राजाभाउ's picture

27 Feb 2019 - 10:15 am | राजाभाउ

पण आता केवळ अशा प्रतिक्रीया देत बसण्या ऐवजी "जर आमच्या कडे डोळे वर करुन बघायचा विचार जरी केलात तरी डोळे काढून घेउ" अशी दहशत बसवणारी कारवाई करण्याची वेळ आता आली आहे.

भारत केवळ प्रतिहल्ला नाही तर आक्रमणही करु शकतो हे जेव्हा जगाला समजेल तेव्हाच भारता कडे वाकडा डोळा करुन पहाण्या आधि १००० वेळा विचार केला जाईल.

+१

इरसाल's picture

27 Feb 2019 - 10:12 am | इरसाल

खेळाडु दिसत नाहीत या धाग्यावर. या कारवाईने "साप सुंघ गया क्या ?????????"

तेजस आठवले's picture

27 Feb 2019 - 3:18 pm | तेजस आठवले

त्यातलं खालील वाक्य विचार करण्यासारखं आहे.

भारताला अजून राफ़ायलची भेदक लढावू विमाने मिळालेली नसली, तरी हाती असलेली विमानेही पाकिस्तानला नामशेष करायला पुरेशी असल्याचे हे प्रात्यक्षिक होते. किंबहूना ३५ वर्षे जुन्या मिराजने ही कामगिरी केली असेल, तर राफ़ायलची अत्याधुनिक विमाने भारताच्या हाती लौकर मिळू नयेत, म्हणून चाललेला आटापिटा कशासाठी आहे, त्याचाही अंदाज येऊ शकतो.

स्पार्टाकस's picture

27 Feb 2019 - 10:32 am | स्पार्टाकस

काँग्रेसच्या षंढ सरकारचा आणखीन एक नाकर्तेपणा उघडकीला आला आहे.

२६ / ११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरही भारतीय हवाईदलाने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक्स करण्याची तयारी केली होती, पण तत्कालीन सरकारने शेपूट घातली आणि परवानगी नाकारली. पाकिस्तानच्या भल्याची काँग्रेसला एवढी चिंता का होती?

https://www.timesnownews.com/india/video/2008-mumbai-terror-attack-iaf-i...

शाम भागवत's picture

27 Feb 2019 - 11:20 am | शाम भागवत

साॅरी.
काॅपीराईटचा भंग होऊ नये म्हणून व्हिडीओ डिलीट केलाय.

शाम भागवत's picture

27 Feb 2019 - 3:18 pm | शाम भागवत

पूर्ण व्हिडीओ येथे आहे
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदरचा आहे. २२:२८ पासून पुढे १ मिनीट पहा.

अनुप ढेरे's picture

27 Feb 2019 - 11:59 am | अनुप ढेरे

हल्ल्यांमध्ये गेलेली मिराज विमानं HAL ने बनवली आहेत अशी खोटी माहिती काँगी लोक पसरवत आहेत. HAL मिराज बनवत नाही. HAL ने मिराज बनवलेली नाहीत.

( सद्ध्या मिराजमध्ये काही सुधारणा करण्याचं काम तिथे चालु आहे पण ते पूर्ण झालेलं नाही. HALने अपग्रेड केलेल्या मिराजचा अपघात होऊन एक चचणी पायलट गेल्या महिन्यात वारला. )

पाकिस्तान आतापर्यंत आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही अणुबॉम्ब फेकू अशी धमकी देत आला आहे आणि आणि या आवेशाला आपले अगोदरचे नेतृत्व बळी पडत आले.

आता नेतुत्व बदल झाल्यावर नव्या नेतृत्वाने पाकिस्तानला सरळ शब्दात धमकी दिली आहे कि आमच्या वाकड्यात शिरलं तर तुमच्या घरात घुसून मारू आणि अणुबॉम्बच्या धमकीला आम्ही अजिबात घाबरत नाही. तुमच्याकडे असतील त्यापेक्षा जास्त मारक क्षमतेचे अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब आमच्याकडे पण आहेत.

आतापर्यंतच्या पाकिस्तानच्या डावपेचांमध्ये अणुबॉम्बच्या भीतीमुळे भारत आपल्यावर हल्ला करणारच नाही असेच गृहीत धरलेले होते. पण भारताने हल्ला केलाच तर त्यासाठी आपले डावपेच काय असावंत हा विचारच केलेला नव्हता. पाकिस्तानने एक अणुबॉम्ब टाकला तर प्रत्युत्तर म्हणून आम्ही अख्खा पाकिस्तान भूतलावरून नष्ट करून टाकू असा आपला डावपेचांचा मतितार्थ आहे.(massive retaliatory strike).

पाकिस्तानला माहिती आहे कि त्यांच्याकडे असलेल्या एकंदर अणुबॉम्ब आणि ते टाकण्याची प्रणाली अजून बरीच अर्धवट आहे त्यामुळे पहिल्या हल्ल्यात भारत संपूर्णपणे नष्ट करणे त्यांना शक्य नाही. पण भारताकडून होणार प्रतिहल्ला हा इतका जबरदस्त असेल कि पाकिस्तान बेचिराख होईल.

यामुळे आतापर्यंत त्यांच्या वल्गना आणि गर्जना चालू होत्या त्या आपल्या बुळबुळीत आणि कणाहीन निषेधाच्या खलित्यांवर. पण आता असे खलिते देण्याऐवजी आताच्या नेतुत्वाने सरळ प्रतिहल्ला केला असल्याने पाकिस्तानी नेतृत्व बावचळले आणि गोंधळले आहे. भारताला उत्तर कसे द्यायचे आणि ते देताना जर आपली अपरिमित हानी झाली ( जी होणारच) तर आपले राजकीय अस्तित्व टिकवायचे कसे हा प्रश्न त्यांना डाचतो आहे. प्रतिहल्ला केला तर भारताकडे असलेल्या लष्करी सामर्थ्यापुढे आपला टिकाव लागणार नाही हे त्यांना माहिती आहे आणि त्याला लागणार पैसे पण त्यांच्याकडे नाहीत. (भिकेची वाटी घेऊन अरब देशांकडे भीक मागणे चालू आहे). नाही तर चीन आहेच सावकार म्हणून ८ % व्याजाने पैसे द्यायला( आणि दामदुपटीने वसूल करून घ्यायला)

धरलं तर चावतं
आणि
सोडलं तर पळतं
अशा स्थितीत ते आहेत.

आनन्दा's picture

27 Feb 2019 - 1:19 pm | आनन्दा

खरे सर एक प्रश्न आहे.

पाकिस्तान failed state होणे अरब राष्ट्रांना आणि चीनला परवडेल का? नसेल तर या परिस्थितीत ते लोक काय करु शकतात..
मला पर्सनली पाकिस्तान नकाशावरुन निघुन जावे असे वाटते. पण पाकिस्तान पडले तर त्याची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे..

सुबोध खरे's picture

27 Feb 2019 - 8:00 pm | सुबोध खरे

पाकिस्तानच्या जागी जे काही सरकार आहे ते लष्करी असो किंवा नागरी असो, कितीही भ्रष्ट असो निर्नायकी असणे जगात कुणालाच परवडणारे नाही कारण त्यांच्या कडील अणुशस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडली तर ते जगभरात हाहाःकार माजवतील.

पाकिस्तान नकाशावरून नाहीसा होणे हे स्वप्नातच घडू शकते. २० कोटी जनता जाणार कुठे?

पण या जनतेला भारताशी शत्रुत्व घेऊन आपला कोणताही फायदा होणार नाही हे समजेल तो सुदिन.

परंतु तोवर पाकिस्तानी लष्कराला आणि मुलकी सरकारला भारताशी सारख्या कुरबुरी करणे परवडणार नाही हे सज्जड शब्दात समजावणे आवश्यक आहे.

आतापर्यंत आमच्या भूमीवर आलात तर आम्ही अणुबॉम्ब टाकू हे असत्य( sabre rattling) ते तुमच्या माथी मारत आले होते आणि आपले नेभळट नेते ते आतापर्यंत मान्य करत आले.
त्यामुळे पाकिस्तानातील जनतेची अशी समजूत करून देण्यात आली कि भारताला तुम्ही गृहीत धरले तरी ते काहीही करणार नाहीत.

परंतु आता या त्यांच्या समजुतीच्या उलट प्रत्यक्ष त्यांच्या भूमीवर जाऊन मारा करून आलो तर नक्की काय करायचे हे पाकिस्तानी नेत्यांना (आणि जनतेला) समजत नाहीये. मुळात पाकिस्तानकडे विमानाच्या इंधनाची भयंकर टंचाई आहे. त्यातून त्यांची अर्थव्यवस्था अत्यवस्थ आहे. जागतिक रंगभूमीवर त्यांच्याकडे कोणीही मित्र नाही. जो आहे(चीन) त्याचे नाते धनको आणि कृणको असेच आहे. आणि चीन आपल्या मैत्रीची किंमत दामदुपटीने वसूल करीत आहे. अशा स्थितीत प्रत्यक्ष युद्ध करणे पाकिस्तानला फार म्हणजे फार महागात पडेल.

परंतु जनतेला काही तरी करून दाखवायला पाहिजे. आम्ही नेते किंवा लष्कर म्हणून बुळचट आहोत हा संदेश जनतेला जाऊ नये म्हणून आज त्यांनी आपली विमाने भारतीय भूमीत घुसवली आणि एक विमान पाडले गेले ते नुकसान स्वीकारून आता ते आम्हाला शांती हवी आहे असे म्हणायला मोकळे झाले आहेत.

युद्ध भारताला सुद्धा नको आहे. कारण पाकिस्तानला धडा शिकवण्यातुन (अगदी पाकिस्तानची भूमी वैराण करून) तुमचा फायदा काहीच होणार नाही.

उंदीर आणि झुरळे फार झाली म्हणून घराला आग लावणे हे शहाणपणाचे नाही.

परंतु याचा अर्थ असाही नाही कि त्यांचा उच्छाद होईपर्यंत शांत बसणे.

घराची स्वच्छता आवश्यक आहे आणि या उंदरानं आणि झुरळांना खायला कोण देत आहे त्याची वासलात लावणे आवश्यक आहे.

उंदरानं आणि झुरळांना खायला कोण देत आहे त्याची वासलात लावणे आवश्यक आहे

हे सगळ्यात महत्वाचे

Rajesh188's picture

27 Feb 2019 - 12:31 pm | Rajesh188

अवॉर्ड परत करण्याचे गरम वरे देशभरातून जोरदार आवाज करत Delhi chya दिशेनी वाहण्याची शक्यता आहे .
जनतेनी विचलित होवू नये ह्या हवेचा फक्त आवाज होतो .जनतेनी दुर्लक्ष करावे

यशोधरा's picture

27 Feb 2019 - 12:53 pm | यशोधरा

कोणी करत नाही अवार्ड परत! सगळं देखावाच असतो जोवर खरेच काही घडत नाही तोवर. वेळ आली की सगळे बोलबच्चन चिडीचूप असतात.

सागर गुरव's picture

27 Feb 2019 - 12:58 pm | सागर गुरव

अहो परत करायला अवार्ड उरले तर पाहिजेत ना? आधीच परत करुन सगळे अवार्ड संपले असतील!!!

नाखु's picture

27 Feb 2019 - 11:08 pm | नाखु

अवार्ड वापसी नाटक्याला या सोबतच पैसे का परत करीत नाहीत,असे विचारले तर,ते जनतेचे (कर रूपाने) आलेले पैसे आहेत अशी निर्लज्ज समर्थन बतावणी करून आपले अस्सल रंग दाखवले.

अर्थात नेहमीचे यशस्वी खेळाडू अगदी चांगल्या कामाचे अभिनंदन करायला आले नाहीत, किमान मिपावर तरी लोकशाही निकोप आणि सशक्त असावी.

टीका करायला चढाओढ आणि कौतुक करायला काचकुच कोतेपणा असं नको.
माईंच्या यांना विचारले पाहिजे.

अज्ञ बालक वाचकांची पत्रेवाला नाखु

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Feb 2019 - 1:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पाकिस्तानने दोन विमाने पाडून भारतिय वैमानिकांना ताब्यात घेतले आहे.
https://www.dawn.com/news/1466347/ispr-dg-press-conference-two-indian-pi...

जालिम लोशन's picture

27 Feb 2019 - 2:43 pm | जालिम लोशन

माई बातमीच्या तळाला desclaimer पण दिला आहे हि बातमी खरी असेलच असे नाही. म्हणुन. पापीस्तान वर कोणीही विश्वास ठेवत नाही चीन सुध्दा.

शाम भागवत's picture

27 Feb 2019 - 2:53 pm | शाम भागवत

हे पण वाचा. तासापूर्वी आलय.
https://www.timesnownews.com/india/article/pakistan-peddles-fake-news-jo...

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2019 - 3:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. पाकिस्तानी मेडिया, राजस्थानातील जुन्या मिग क्रॅशचे फोटो देऊन, फेक बातम्या देत आहे. १००% खात्रीसाठी विमानाच्या शेपटीवरचे विमान क्रमांक पहा.

२. या कारवाईत भारताने सु-३० व मिग २१ बायसन विमाने वापरली होती. त्यातील मिग २१ बायसनने पाकिस्तानी एफ१६ पाडले.

नेहमीप्रमाणेच, पाकी फेकन्युज फॅकरीने शॉडी जॉब केला आहे. जाधव प्रकरणात फेक फोटो/व्हिडिओ वापरल्याचे आठवत असेलच. तसेच खुद्द युनो मध्ये पाकिस्तानी प्रतिनिधी मलिहा काश्मीरमधल्या मुलांवर होणार्‍या अत्याचारांबद्दल बोलताना पॅलेस्टाईनमधील मुलीचा फोटो दाखवून सर्व जगासमोर तोंडावर पडली होती. :)

थोड्या वेळापूर्वीच मेजर जनरल स्तराच्या पाकिस्तानी सैन्य अधिकारी प्रवक्त्याने, "आम्ही भारताचे एकही विमान पाडलेले नाही" असे स्पष्ट सांगितले आहे आणि पाकिस्तानी मेडियाला

बहुतेक, अश्या बातम्यांचा फायदा घेऊन, भारतिय वायूदल अजून हल्ले करेल, अशी भिती वाटली असावी. :) कारण, पाकिस्तानने, त्यांचे एक विमान पाडल्यावरही "आम्हाला एस्कॅलेशन करायची इच्छा नाही" असे स्वतःहून जाहीर केले आहे. मुख्य म्हणजे, सतत जप चालणार्‍या अणूबाँबमधील अ सुद्धा उच्चारला गेला नाही ! =)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2019 - 3:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरची चित्रे फेक बातमी आहेतच पण, आताच झालेल्या संरक्षण खाते व विमानदलाच्या प्रेस ब्रिफिंगच्या प्रमाणे...

पाकिस्तानच्या एफ१६ विमानाला पाडण्याच्या कारवाईत भारताचे एक मिग२१ विमान पडले आहे आणि त्याच्या वैमानिकाचा शोध चालू आहे.


सतत जप चालणार्‍या अणूबाँबमधील अ सुद्धा उच्चारला गेला नाही !

ह्याच कारण त्यांच्या कडचे अणु बॉंम्ब हे मिनीएचर बॉंम्ब आहेत ! सेंट्रिफुज पद्धतीने युरेनियम वेगळे करण्याची पद्धत लॅब मध्ये वापरली जाते ! त्या प्रोसेसचा यील्डही कमी असतो !! शुद्ध युरेनियम खुप कमी प्रमाणात हाती येत ! अश्या युरेनियम पासुन त्यांनी (पाकिस्तानने) लहान Intensity चे बॉंम्ब बनवले आहे जे युद्ध क्षेत्रात वापरता येउ शकतात पण डीटरेंस म्हणुन हुशार शत्रुसमोर चालणार नाही ! मोदी अगोदरपर्यंत त्यांच्या अणु बॉंम्बची भिती सरकारला होती !

श्वेता२४'s picture

27 Feb 2019 - 2:09 pm | श्वेता२४
Rajesh188's picture

27 Feb 2019 - 2:09 pm | Rajesh188

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन

भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर पाकिस्तान हवाई दलाचे एफ-१६ हे विमान भारताने पाडले. मात्र, पाकिस्तानने सुरुवातीला दावा केला होता की, आम्ही भारताची दोन विमान पाडली असून एका वैमानिकाला अटक केली. आता हा पाकने केलेला दावा स्वतःच खोटा असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांच्या प्रवक्त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, भारताचे एक विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडण्यात आले. तर दुसरे विमान जम्मू आणि काश्मीरमध्ये पाडले. तर भारतीय हवाई दलाच्या एका वैमानिकाला अटक केली आहे. तर त्यानंतर आणखी एक ट्वीट करत पाकचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी बडगाममध्ये कोसळलेल्या विमानाशी आमचा कसलाही संबंध नाही. आम्ही ते पाडलेले नाही, अशी कबुली दिली आहे.

दरम्यान, पाकिस्तानची तीन विमाने आज, बुधवारी (दि.२७) जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसली. मात्र, भारतीय हवाई दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानची विमाने पिटाळून लावली. तसेच नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसलेले पाकिस्तान हवाई दलाचे एफ-१६ हे विमान पाडण्यात भारतीय हवाई दलाला यश आले आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Feb 2019 - 3:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हे तासाभरापुर्वीचे.
पकडलेल्या भारतिय वैमानिकाचे नाव- अभिनंदन वर्तमान-
https://www.youtube.com/watch?v=rJV0dVhl_Y8

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Feb 2019 - 4:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भारतिय वैमानिक- अभिनंदन वर्तमान ह्यास पाकिस्तानात पकडले.
https://www.youtube.com/watch?v=O7_tvE83Sxw

ट्रम्प's picture

27 Feb 2019 - 4:37 pm | ट्रम्प

पायलट पकडला गेल्या मुळे भारताला क़दाचित बैकफुट वर यावे लागेल .

युद्धामध्ये जे सैनिक बंदी होतात, त्यांच्याबाबत काय नियम असतात?

शब्दानुज's picture

27 Feb 2019 - 5:00 pm | शब्दानुज

बातम्यानुसार त्या पायलटला जिनिव्हा करारानुसार केवळ आपले नाव , हुद्दा , युनिट नंबर सांगणे बंधनकारक आहे. या शिवाय पाक त्यांन अजून माहिती विचारु शकत नाही. पायलटला योग्य त्या मेडिकल सुविधा देणेही अपेक्षित आहे

अर्थात पडद्याआड काय होईल हे सांगता येणार नाही.

पण अॉन ड्यूडी असलेल्या पायलटला पाक त्रास देवू शकला तरी एका मर्यादेबाहेर जावू शकणार नाही.

यशोधरा's picture

27 Feb 2019 - 5:08 pm | यशोधरा

पण युद्ध बंदी असलेल्या सैनिकाला परत त्याच्या देशाच्या ताब्यात देणे बंधनकारक आहे की नाही? त्यासाठी काही राजकीय किंवा diplomatic दबाव आणता येईल की नाही?

शब्दानुज's picture

27 Feb 2019 - 5:05 pm | शब्दानुज

आज पाकने केलेला हल्ला हा भारताच्या मिलिटरी कॅंपच्या जवळ (?) करण्यात आला आहे. ह्यास भारत युद्धाची चिथावणी मानण्यास पुरेशी जागा आहे. कदाचित पाककडून नसली तरी भारताकडून युद्धाची घोषणा होवु शकण्याची चिन्हे आहेत. एकूण गंभीर मामला आहे एवढे खरे.

आता हा मामला गंभीर झालाच पाहिजे....आर या पार....

.

गामा पैलवान's picture

27 Feb 2019 - 6:40 pm | गामा पैलवान

लोकहो,

हा मोदींचा चुनावी जुमला (= निवडणुकीच्या वल्गना) आहे हे नक्की. दोनंच दिवस अगोदर 'मोदी है तो मुमकिन है' ही घोषणा हवेत सोडून दिली ती निवडणूक ज्वर माजवायलाच ना?

मात्र गंमत अशी की या चुनावी जुमल्यात दहशतवादी बळी गेले आहेत. दर वेळेस राजकीय पक्षांच्या चुनावी जुमल्यात भारतीय जनतेचं नुकसान व्हायचं. पण या वेळेस उलट घडलंय. मोदींनी असेच अनेक उत्तमोत्तम चुनावी जुमले सादर करावेत ही इच्छा.

बाकी, पाकिस्तानची लायकी तरी काय आहे? भारतात निवडणुका आल्या की त्यांची टरकली पाहिजे. पाकी सैन्यप्रमुख सत्तेस धोका उत्पन्न झाला की भारताची आगळीक काढायचे. त्याच्या बरोबर उलटा प्रकार घडायला पाहिजे ना? मग मोदींना मत द्याच.

आ.न.,
-गा.पै.

प्रसाद_१९८२'s picture

27 Feb 2019 - 8:52 pm | प्रसाद_१९८२

सध्या या पकडल्या गेलेल्या पायलटचे काही व्हिडीओ व्हॉट्सअपवर फिरत आहेत. या वैमानिकाला जीवंत पकडल्यानंतर तिथली पाकिस्तानी जनता, त्याला बेदम चोपताना हया व्हिडीओत दिसत आहे व नंतर त्याला पाकिस्तानी आर्मीकडे सोपवताना देखिल दिसत आहे. पाकिस्तानी आर्मीने त्याचे, आतापर्यंत काय हाल केले असतील हे देवजाणे !
--
मारहाणीचा हा व्हिडीओ पाहताना मलाच कसे तरी वाटत होते, तर तो व्हिडीओ पाहून त्याच्या कुटुंबियांचे काय हाल होतील ह्याची कल्पनाच करवत नाही.

पायलटच्या कुटुंबीयांच्या मनस्थितीचा विचार करून हा आणि असले व्हिडिओ इथे तिथे ढकलू नये असे वायूसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगितले आहे, असे वाचले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2019 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे


कारवायांत भाग घेणार्‍या कोणत्याही व्यक्तीचे नाव, फोटो किंवा व्हिडिओ प्रसिद्ध करू नये.

त्यांची ओळख प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो.


प्रसाद_१९८२'s picture

28 Feb 2019 - 12:03 pm | प्रसाद_१९८२

आपल्याकडे पाकिस्तानी एफ १६ विमानांना टक्कर देऊ शकणारी सुखोई विमाने असताना , मिग २१ सारखी ४०-५० वर्षे जुनी विमाने कालच्या ऐरियल डॉग फाईटसाठी वायुसेनेच्या पायलट्सना का देण्यात आली ?

सागर गुरव's picture

28 Feb 2019 - 12:12 pm | सागर गुरव

सहमत आहे, मिग २१ या "उडत्या शवपेट्या" आहेत असे वाचल्याचे आठवतेय. नियमित सरावासाठी उड्डाण केलेले मिग २१ दुर्घटनाग्रस्त झाल्याची कितीतरी उदाहरणे आहेत आणि हवाई दलाला त्यामुळे कितीतरी पायलट्स गमवावे लागले आहेत.

शाम भागवत's picture

28 Feb 2019 - 1:08 pm | शाम भागवत

भारतीय हद्दीत शिरणाऱ्या पाकी विमानांच सैन्याचा बिग्रेड मुख्यालयावर हल्ला करण्याचा इरादा असल्याचे लक्षात आल्याने, सुखोई विमाने तेथे पोहोचेपर्यंततरी त्यांना तात्काळ थोपवणे आवश्यक होते. यासाठी जवळचा तळ श्रीनगर होता व त्या तळावर मिग२१ असल्याने दोन विमानांवर ही जबाबदारी सोपवली गेली.
त्याप्रमाणे ती विमाने तेथे वेळेत पोहोचलीही. इतकेच नव्हे तर त्यवर बसवलेल्या आर७३ या मिसाईलने एक एफ१६ पाडलेसुद्दा!!!!!!
खरच हे आश्चर्यकारक आहे. समोरची विमाने अत्याधुनिक आहेत हे माहीत असूनही त्यावर चाल करून जाणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
व त्यांना हल्ला करण्यापासून परतावणे हेही विलक्षणच.

आयुधांपेक्षा त्यामागील असलेल ताकदवान मन महत्वाचे

आयुधांपेक्षा त्यामागील असलेल ताकदवान मन महत्वाचे

भारतीय संरक्षणदल कोणत्या परिस्थीतीत काम करत हे लोकांच्या कधीच लक्षात येणार नाही. त्यामुळे युद्ध क्षेत्रात आयुधांपेक्षा त्यामागील असलेल ताकदवान मन महत्वाचे ठरते.

मिग -२१ सारखी अति जुनी विमाने अजुन चालु स्थीतीत ठेवणे हे एक दिव्यच आहे . काही वर्षांपुर्वी (२००५ - ०६ ) ओमान मधिल सर्विस मधुन रिटायर केलेली जॅग्वार विमान बघण्यासाठी वायुदलाचे लोक ओमान मध्ये आलेले होते. गपचुप विमानांच निरीक्षण करुन ते निघुन गेले , नंतर नौदलातील मित्राशी बोलताना हा विषय निघाला तेंव्हा तो म्हणाला की आपल्या कडची जॅग्वार विमाने चालवण्याच्या कंडीशन मध्ये ठेवण्यासाठी हे लोक ओमान व ईतर देशांतुन रिटायर केलेली विमाने घेऊन भारतात जातात तिथे त्यातले चांगले पार्ट काढुन आपली विमाने
कंडीशन मध्ये आणतात. त्यावेळेला युपिए सरकारने संरक्षण दलाला अनाथ करुन टाकलेल.

ट्रम्प's picture

28 Feb 2019 - 2:31 pm | ट्रम्प

ही विमाने 1963 पासून भारतात सराव करण्यासाठी वापरली जात आहेत, 1200 मीग ( शवपेटी ) पैकी 283 दुर्घटनाग्रस्त झाले आहेत , आणि त्यात 100 पायलट्स मृत्युमुखी पडले आहेत
https://en.m.wikipedia.org/wiki/2002_Jalandhar_MiG-21_crash

श्वेता२४'s picture

28 Feb 2019 - 5:18 pm | श्वेता२४

पाकिस्तानी पंतप्रधानांनी संसदेत दिली माहिती.बातमी लोकसत्ता

खर म्हणजे पुलवामा हत्याकांड नंतर ज्या प्रकारे मा .मोदींची देहबोली , वक्तव्य होती त्या वरुन मा .मोदीं अतेरिकयाना धड़ा शिकवणार याची खात्री होतीच . झाले ही तसेच 12 मिराज विमानानीं पाकिस्तान मध्ये जावून अतेरिकयाचें तळ उध्वस्त केले व सुखरूप सगळी विमाने परत आली .

इथ पर्यंत सगळ ठीक होते !!!!!!!

भारतीय 12 मिराज विमानानीं पाकिस्तान मध्ये खोलवर केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान चवताळून प्रतिहल्ला करण्याची शक्यता गृहित धरून भारतीय हवाई दल आणि सरकारी पातळीवर पूर्वतयारी कमी पडली अस सारख वाटतंय !!

पाकिस्तानी एफ 16 च्या प्रतिकारासाठी 50 वर्षांपूर्वीची मीग 21 नक्कीच योग्य नव्हती , आपली दोन मीग पाडली गेली त्यातील एक पायलट पाकिस्तान च्या ताब्यात असल्या मुळे मिराज हल्ल्यामुळे निर्माण पाकिस्तान वरील दबदबा नाहीसा झाला आणि आता त्या पायलट साठी वाटाघाटी करत बसण्याची वेळ भारतावर आली आहे .

प्रश्न असा उपस्थित होतो की संभाव्य हल्ला गृहित धरून सुखोई विमाने अगोदरच तैनात का केली गेली नाही ?
मला लष्करीदृष्ट्या , व्यूहरचनात्मक वैगेरे ज्यास्त समजत नाही पण मीग प्रकरणात काही तरी चुकले आहे असच वाटतंय .
जाणकार काही प्रकाश टाकतील का ?

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Feb 2019 - 10:26 pm | अनिरुद्ध.वैद्य

हे काहि अत्याधुनिक प्लेन नाहिये, अर्थात ते मिग पेक्शा जरुर ताकदवान आहे. पण जेव्हा डॉगफाइट होते, तेव्हा सगळं काही वैमानिकाच्या स्किल्स्वर असत. इथ डॉग फाईट झालेली आहे हे लक्षात घेणे महत्वाचे.

जाता जाता: एक अजुन मतप्रवाह असाही आहे, की एफ १६ अन जे एफ १७ हे पाकीस्तानी वायुदलाचे स्ट्राईक प्लेन्स आहेत. पण ते फक्त डिफेन्स करता वापरायचे ह्या मुख्य अटीवर अमेरिकेने त्यांना दिलेले. आजची प्रेस कॉन्फरंस बघतांना ज्या पद्धतीने पाकिस्तानी हल्ला हा अग्रेसिव्ह प्रकारात मोडणारा हल्ला होता अन सोबत एफ १६ चे अवशेष अन त्याच्या खास क्षेपणास्त्राचा दिलेला पुरावा बघता, मिग १६ हे प्यादे म्हणुन एक तरी एफ १६ पाडता याव ह्यासाठी केला गेलेला जुगार असु शकतो. दुर्दैवाने अभिनंदन ह्याचे मिग पडले अन ते तिकडे पकडल्या गेले, पण एफ १६ चे पुरावे आपल्या हातात आले. कराराचा भंग झालाय हे ट्रंपकाकांपर्यतपोचला असेलच. आता अमेरिका काय स्टँड घेते ते बघायला हवे. जर अपेक्षीत परीणाम साधला गेला तर एफ १६ वापरु नये असा अमेरिकेचा दबाव वाढला तर मेजर कॉन्फ्लिक्टमध्ये आपलाच फायदा होइल ;)

(असो सध्यातरी ही एक कॉन्स्पिरसी थेअरिच आहे)

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Mar 2019 - 8:44 am | अनिरुद्ध.वैद्य

आंतरराष्ट्रीय डिफेन्स मासिकाच्या साईटवर वाचलं की फक्त मिग 21 नाही तर 4 सुखोई 2 मिराज अन 2 मिग 21 होते!

त्यात अभिनंदन ह्यांनी लीड घेऊन हल्ला केला.

http://tass.com/world/1046940

शाम भागवत's picture

3 Mar 2019 - 9:48 am | शाम भागवत

ते NDTV broadcaster चा हवाला देत आहेत. :)

गेल्या दोनेक दिवसात झालेल्या भारत - पाक हवाई घमासानात सरफेस टू एअर मिसाईल च्या प्रतिस्पर्धी विमान विरोधी वापराचे काही ऐकण्यात आले नाही. डॉ. खरे आणि जाणकारांकडून या बद्दल अधिक समजून घेणे आवडेल.

जानु's picture

28 Feb 2019 - 10:49 pm | जानु

F १६ मिग कडून पाडले जाणे अमेरिकन सरकार ला अजिबात चालणार नाही. त्यात अमेरिकन सरकारची नाचक्की आहे.

कायप्पा वर आलेला हा लेख , छान वाटला म्हणून टाकला !!!!

..... मोदी,डोवाल आणि सुषमा स्वराज यांचे हे कार्य म्हणजे एक जादू मानायला हवी.... ...

कोणत्याही क्षणी चीन चा घास बनू शकणारा भारत मान्यवर मोदी यांनी किती मजबूत केला आहे हे अभ्यासण्या सारखे आहे.

हा अभ्यास करतांना आम्हाला अन्न, वस्र,निवारा, कमि कामात अधिक पैसा देणारी नोकरी, भाजी-मिरची आणायला गाडी नेता येत नाही कारण महाग पेट्रोल-डिझेल, नंबर दोन करून पैसा दामदुप्पट करता येत नाही, इ. कारणे बाजूला सारून विचार करावा लागेल कारण पुन्हा एकदा पारतंत्र्य आले की कल्पांती ही सुटका नाही. कांग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, ह्यांना अस्तित्व टिकवून राहण्याशिवाय इतर कशातच इंटरेस्ट नव्हता आणि नाही सुद्धा. आज सर्व विरोधक चीन व पाकिस्तानशी उघड उघड जवळीक करत आहेत हे काय दर्शवते?

चीनचा भारताला बरीच वर्षे धोका आहे. एकदा युद्ध झाले आहे आणि गेली काही वर्षे चीन फार आक्रमक झाला आहे.भारताच्या बाजूचे छोटे देश हे परंपरेने भारताकडे मदतीसाठी पाहत असतात. पण UPA च्या काळांत सरकारने ह्या देशांशी काहीही संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे नेपाळ, म्यांमार,श्रीलंकेसारखे देश चीनकडे वळले होते.

चीनने भारताच्या सरहद्दीवर पक्के रस्ते बांधले, रेल्वे सरहद्दीजवळ आणून ठेवली. विमानांचे बरेच ताफे सरहद्दीवर आणून ठेवले. सीमेवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सैन्य आणून ठेवले.पण ,भारताची मात्र तशी तयारी नव्हती.नेहरूंचे चीनविषयीचे धोरण पूर्ण फसले होते आणि चीनने भारताचा पराभव केला होता.पण त्यापासून राज्यकर्ते काही फारसे शिकले नव्हते.वाजपेयी सरकारने काही पावले उचलली होती. . मॉरिशसच्या जवळ एक बेट विकत घेऊन त्यावर सैन्य तळ उभा केला. कझाकिस्तान मध्ये एक सैन्य तळ उभा केला. अंदमान निकोबार वर लक्ष्य देऊन तिकडे सैन्य तळ मजबूत केला. वाजपेयी सरकार जाऊन मनमोहन सिंगचे सरकार आले आणि परत दिशा हरवली. चीनने श्रीलंकेमध्ये २ बंदरे विकसित करायला सुरवात केली . नेपाळमध्ये चीनच्या विचारांचे सरकार आणले.

बांगलादेश,भूतान वर दडपण आणायला सुरवात केली. चीनने भारताच्या सरहद्दी पर्यंत रेल्वे आणली. ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधले. मनमोहन सिंगच्या सरकारांनी काहीही कृती केली नाही.चीनने पाकमध्ये ग्वादार बंदर विकसित करायला सुरवात केली. समुद्रात कृत्रिम तळ उभे करून भारताला धमकी द्यायला सुरवात केली. पण तरीही भारत सरकार गप्प बसून राहिले. इतका निर्लज्जपणा होता की चीन "धरण" बांधत आहे हे भारताचे सरकार नाकारत राहिले आणि देशाला खोटी माहिती देत राहिले.
मोदी सत्तेवर आले तेव्हा परिस्थिती खूपच बिकट होती.नेपाळ,बांगलादेश,लंका हे देश चीनच्या गळाला लागले होते.. चीन, पाकिस्तान मध्ये 'चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर' (cpec )ह्या नावाने एक रस्ता विकसित करत आहे. ह्या रस्त्यामुळे बलोचिस्तान मधील ग्वादार बंदर काश्मीरमार्गे चीनला जोडले जाणार आहे. श्रीलंकेची २ बंदरे चीनने विकास करण्यासाठी ताब्यात घेतली होती. नेपाळ,बांगलादेश,
म्यानमार,श्रीलंका,पाकिस्तान हे सर्व देश चीनच्या बाजूनी होते आणि भारत वेढला गेला होता.

त्याच वेळेला चीनने साऊथ चीन समुद्रात कृत्रिम बंदरे तयार केली आणि भारताला त्या भागात व्यापार करायला मनाई केली. ह्या घडामोडी पाहून सैन्यातील जाणकारांना समजत होते की चीन भारताशी मोठ्या युद्धाची तयारी करत आहे. पण भारताकडे पुरेसा शस्त्रसाठा नव्हता.विमाने जुनी झाली होती. दारुगोळा पुरेसा नव्हता. सरकार काहीही करायला तयार नव्हते. मोदींनी अजित दोवालना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नियुक्त केले आणि परिस्थिती झपाट्याने बदलू लागली.

मोदींनी आजूबाजूच्या देशांना भेटी देण्याचा धडाका लावला.आणि नेपाळ,भूतान,बांगलादेश, म्यानमार परत भारताकडे वळू लागले.मोदींनी व्हिएतनाम,ऑस्ट्रेलिया,जपान सारख्या देशांना भेटी दिल्या आणि त्यांना भारतीय सैन्याची मदत देऊ केली.२ वर्षाच्या काळात भारताने चीनच्या बाजूच्या देशांची साखळी उभी केली आणि चीनला फास लावला. व्हिएतनाम सारख्या देशांना भारत आता मिसाईल ,युद्धनौका,तोफा विकत आहे. व्हिएतनाम जवळच्या समुद्रांत युद्धनौकांच्या संरक्षणांत भारतीय कंपन्या तेलाचे उत्खनन करत आहेत. . अमेरीकेचे भारताशी संबंध खूप सुधारले. श्रीलंकेमध्ये "रॉ" नी कारवाईकरून सत्ता बदल घडवून आणला. नवीन सरकार हे चीनच्या विरोधी आहे. त्यांनी आल्या आल्या चीनशी बंदर विकसित करायचा करार मोडून टाकला. त्याच वेळेला सैन्याचे आधुनिकीकरण करून नवीन शस्त्रे विकत घेण्याचा सपाट लावला.
नकाशा पहिला तर समजते की चीनला मोठ्या युद्धाच्या वेळेस सतत तेलाचा पुरवठा फक्त समुद्रातून होऊ शकतो. पण, समुद्रात भारताच्या नाविक दलाचे साम्राज्य आहे. अंदमान निकोबार वर असणाऱ्या सैन्य तळामुळे चीनची रसद भारत तोडू शकतो. मौरिशस जवळच्या सैन्य तळामुळे चीनची रसद तोडता येऊ शकते.त्यामुळे चीनने ग्वादार बंदर विकसित करायला सुरवात केली. त्यामुळे चीनला सतत तेलाचा पुरवठा होऊ शकतो.

त्यावर उपाय म्हणून भारताने इराण मधील चाबहार बंदर विकसित केले आणि एका दगडांत अनेक पक्षी मारले.
आता युद्धाच्या वेळेस भारत ग्वादार बंदरांची रसद तोडू शकतो.
आज पर्यंत अफगाणिस्तानला गहू पाक मधून जात होता. पण आता भारतातून जाणार आहे. त्यामुळे पाकची अर्थव्यवस्था मागे पडेल. अफगाणिस्तान आणि इराण मुस्लिम देश पाकच्या विरोधांत भारताच्या बाजूनी उभे आहेत.

इराणचा चाबहार हा भाग बलुचिस्तानला लागून आहे. त्यामुळे भारताला बलुचिस्तान मध्ये कारवाई करणे शक्य होणार आहे.पाकमध्ये यामुळे काळजीचे वातावरण आहे. इराण मधून चाबहार मधून रेल्वे मार्ग अफगाणिस्तानला जोडणार आहे. त्यामुळे भारताला अफगाणिस्तान,इराण आणि इतर देशांबरोबर व्यापार करणे सोपे जाणार आहे. ह्यामुळे चीनचा ग्वादार मार्ग (cpec) निरर्थक ठरण्याची शक्यता आहे.

आता नीट पहिले तर भारताने चीनच्या बाजूनी अनेक देशांची (जवळ जवळ ९ देश) साखळी उभी केली आहे.ह्या देशांना भारत शस्त्रे पुरवणार आहे.ह्या सर्व देशांशी चीनचे भांडण चालू आहे.
त्याच वेळेला पाकच्या भोवती सुद्धा तसाच फास आवळला आहे. इराण,अफगाणिस्तान,बांगलादेश सारखे मुस्लिम देश भारताच्या बाजूनी आणि पाकच्या विरोधांत उभे आहेत. मोदी वर कट्टर हिंदुत्वाचे आरोप झाले, जातीयवादाचे,मुस्लिम द्वेषाचे आरोप झाले. त्याच मोदींनी इराण,अफगाणिस्तान,बांग्लादेश सारख्या मुस्लिम देशांना पाक विरुद्ध उभे करून दाखवले.

अफगाणिस्तान मध्ये आतापर्यंत पाकचा प्रभाव होता. अमेरिका पाक सांगेल तसे अफगाणिस्तानांत करत होते. पाक ह्याचा फायदा घेऊन तालिबानला पुढे करून अफगाणिस्तान अस्थिर करत होते आणि अस्थिरता दाखवून अमेरिकेकडून भरपूर पैसे उकळत होते. अफगाणिस्तानला पाक स्वतःचे एक राज्य समजते. आता अमेरिकेने भारताला अफगाणिस्तानात प्रमुख भूमिका बजावायला सांगितले आहे. त्यामुळे पाकचा डाव पूर्ण फसला आहे आणि भारताच्या फौजा आता अफगाणिस्तानमध्ये काम करत आहेत. आता इराण,अफगाणिस्तान,बांगलादेश,श्रीलंका,भूतान,म्यानमार भारताच्या बाजूने उभे आहेत.

भारताने "अग्नी" सारखी अस्त्रे चीनच्या महत्त्वाच्या शहरांवर रोखून तयार ठेवली आहेत. चीनच्या सीमेवर "सुखोई विमाने" तयार ठेवली आहेत. नवीन ड्रोन्स विकत घेऊन समुद्रात चिनी पाणबुड्यांवर नजर ठेवली जात आहे.जगभरांतून नवीन आधुनिक शस्त्रे विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. २०२० पर्यंत भारत दोन्ही सीमेवर युद्ध करू शकेल, अशी तयारी भारत करत आहे. एक नवी सैन्य डिवीजन तयार करून १ वर्षात चीनच्या सीमेवर तैनात केले जाणार आहे.

.आणि हे सगळे केले आहे फक्त ३ वर्षांमध्ये. मोदी,डोवाल आणि सुषमा स्वराज यांचे हे कार्य म्हणजे एक जादू मानायला हवी.
पक्षीय राजकारण दूर सारून देशाचा विचार केला तर २०१९ मध्ये कोण लोकसभेमध्ये जिंकायला हवे, हे सांगण्याची गरज नाही.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा msg पाठवा आणि सर्वजण हा msg नीट वाचा,फक्त पेट्रोल वाढ झालं कि सरकार वाईट होत नाही अश्या अनेक गोष्टी आहेत जिथे सरकारने खूप चांगलं काम केलं आहे.*```*

ट्रेड मार्क's picture

1 Mar 2019 - 8:03 am | ट्रेड मार्क

काँग्रेस आणि सहयोगी -

हे असं चित्र उभं करणं ही मोदींची चाल आहे. सत्तेची लालसा त्यांना हे करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. आमच्या सरकारने सर्व देशांशी सारखे संबंध ठेवले होते. आमच्यासाठी सगळे सारखे आहेत, सर्वधर्मसमभाव हा आमचा नारा आहे. प्रत्येकाला स्वतःचा फायदा बघण्याचा अधिकार आहे, त्यात चीन आणि पाकिस्तान पण आले. खरं तर या देशाच्या सीमा उगाच आहेत, सगळे एकत्र राहू शकलो तर बरंच होईल. आमचा राहुल सगळ्यांचं नेतृत्व करायला सक्षम आहे.
मोदी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी सगळं करतात. खरं तर काय करतात हा प्रश्नच आहे, जाहिरातच जास्त करतात. ममो सिंग सगळं करायचे पण काही बोलायचे नाहीत, म्हणजे जाहिरात करत नव्हते.

सेक्युलर मोड -

मोदी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी सगळं करतात. खरं तर काय करतात हा प्रश्नच आहे, जाहिरातच जास्त करतात. ममो सिंग सगळं करायचे पण काही बोलायचे नाहीत, म्हणजे जाहिरात करत नव्हते.

कम्युनिस्ट मोड -

चीनचा एवढा द्वेष करण्याचे काही कारण नाही. जर आपण चीन बरोबर संबंध वाढवले तर सिपेकचा फायदा आपल्यालाही होऊ शकतो. पण या फॅसिस्ट सरकारला स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी चीन आणि पाकिस्तान दुश्मन म्हणून दाखवावे लागतात. चीनला बरोबर घेऊन आपण आशिया खंड ताकदवर बनवू शकतो आणि अमेरिका युरोपला आव्हान देऊ शकतो. त्यांच्या सहयोगाने भारतात पण कम्युनिस्ट राजवट आणता येईल ज्याने सर्व गरिबांना फायदा होईल. लाल सलाम!

मोदींनी व्हिएतनाम,ऑस्ट्रेलिया,जपान सारख्या देशांना भेटी दिल्या आणि त्यांना भारतीय सैन्याची मदत देऊ केली

या बाबतीत अधिक माहिती मिळेल काय ?

पण इतकं बालीश कौतुक?

कांग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, ह्यांना अस्तित्व टिकवून राहण्याशिवाय इतर कशातच इंटरेस्ट नव्हता आणि नाही सुद्धा. आज सर्व विरोधक चीन व पाकिस्तानशी उघड उघड जवळीक करत आहेत हे काय दर्शवते?

विरोधी पक्षांना, किंबहुना सर्वच पक्षांना, सत्तेची लालसा असतेच. अस्तित्व पणाला लागलं कि इकडे तिकडे थोडीफार आगळीकही होते. पण म्हणुन विरोधी पक्ष शत्रुच्या वळचळणीला वगैरे लागलेला नाहि.

मोदींनी आजूबाजूच्या देशांना भेटी देण्याचा धडाका लावला.आणि नेपाळ,भूतान,बांगलादेश, म्यानमार परत भारताकडे वळू लागले.

मोदिंच्या भेटींमुळे हे देश भारताकडे कसे काय वळतील? आपला जीडीपी खुप वाढला, आपल्याकडे बिझनेस खुप वाढला, आपल्या शेजार्‍यांना भरपूर अर्थसहाय्य केलं, जॉब आउटसोर्स केलं, तिथल्या सरकारांना स्थीर करण्यात मदत केली... असलं काहि करुन शेजार्‍यांना अपल्याबाजुने वळवता आलं असतं... पण नुसतं भेटी देऊन
काय साधणार?

नकाशा पहिला तर समजते की चीनला मोठ्या युद्धाच्या वेळेस सतत तेलाचा पुरवठा फक्त समुद्रातून होऊ शकतो.

म्हणुनच चीनने डायरेक्ट रशीयावरुन एक पाईपलाईन त्यांच्या अंगणात उतरवली आहे. न जाणो उद्या ते अणु इंधनावर चालणार्‍या रेल्वे देखील विकसीत करतील. तसंही त्यांच्या रेल्वेचं जाळं युरोपपर्यंत धडका द्यायचा प्लॅन आहेच.

ह्यामुळे चीनचा ग्वादार मार्ग (cpec) निरर्थक ठरण्याची शक्यता आहे.

भारताच्या चाबहारमधल्या गुंतवणुकीचं चीनच्या ग्वादारमधल्या गुंतवणुकीशी गुणोत्तर काढलं तर असं अजीबात वाटत नाहि

आता नीट पहिले तर भारताने चीनच्या बाजूनी अनेक देशांची (जवळ जवळ ९ देश) साखळी उभी केली आहे.ह्या देशांना भारत शस्त्रे पुरवणार आहे.ह्या सर्व देशांशी चीनचे भांडण चालू आहे.

केवळ भारताच्या भरीस पडुन हे देश चीनशी पंगा घ्यायची सुतराम शक्यता नाहि.

त्याच मोदींनी इराण,अफगाणिस्तान,बांग्लादेश सारख्या मुस्लिम देशांना पाक विरुद्ध उभे करून दाखवले.

एकदम कट्टर शत्रुत्व नसेल कदाचीत, हे तीनही देश वेगवेगळ्या कारणांनी तसेही पाकच्या विरुद्धच होते.

भारताने "अग्नी" सारखी ... १ वर्षात चीनच्या सीमेवर तैनात केले जाणार आहे.

म्हणजे जुन्या काळात बंदुकींच्या पलटणींविरुद्ध भाला-तलवार घेतलेली फौज उभी करतोय भारत. क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं वगैरेंचं महत्व निर्वीवाद आहे, पण चीनचं युद्धतंत्र अत्याधुनीक सायबर वॉर वगैरे पद्धतीचं असणार आहे. २१व्या शतकाला साजेसं युद्धतंत्र चीन वापरणार हे नक्की. त्याचा पहिला फटका भारताला बसु नये हिच इच्छा.

आणि हे सगळे केले आहे फक्त ३ वर्षांमध्ये. मोदी,डोवाल आणि सुषमा स्वराज यांचे हे कार्य म्हणजे एक जादू मानायला हवी.

मोदी आणि कंपनीचा कामाचा धडाका थक्क करणारा आहे हे सत्य आहे.

पक्षीय राजकारण दूर सारून देशाचा विचार केला तर २०१९ मध्ये कोण लोकसभेमध्ये जिंकायला हवे, हे सांगण्याची गरज नाही.

पसंतीच्या दृष्टीने मोदी इतरांपेक्षा बरेच पुढे आहेत हे ही सत्य आहे. देशापुढे उभी असलेली आव्हानं बघता उगाच वेगळा प्रयोग करण्यात अर्थ नाहि... तरिही... बारामतीकर काकांच्या नेतृत्वात गांधी-ममता-मायावती वगैरे मंडळी विरहीत मजबूत सरकार बनणार असेल तर आम्हाला चालेल :)

अर्धवटराव's picture

1 Mar 2019 - 9:34 am | अर्धवटराव

कायप्पावर हे सगळं टाईपण्याचा कंटाळाअ येतो :)

तेजस आठवले's picture

3 Mar 2019 - 4:36 pm | तेजस आठवले

मोदींचं कौतुक आहे, पण ह्या ढकलपत्रात लिहिणारा वाहवत गेला आहे.तोंड फाटेस्तोवर स्तुती करताना वास्तवाशी परखड राहणे त्याला जमलेले नाही.

चिगो's picture

4 Mar 2019 - 1:20 pm | चिगो

पक्ष आणि सरकार वेगवेगळे असतात, हे जनतेला कळेल, तो सुदीन.. जरा जास्तच वाहवला आहे कौतूककर्ता. सद्यसरकारचे कौतूक आहेच त्यांनी केलेल्या कार्यासाठी, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संबंध आणि कार्य हे 'लॉन्ग टर्म' असतात. चाबहारसाठी भारताचे प्रयत्न बरेच पुर्वी सुरु झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील जनतेचा धर्म हा नगण्य मुद्दा असतो. तिथे इंधनसुरक्षा, नैसर्गिक स्त्रोतांची उपलब्धता, आर्थिक फायदे इत्यादी महत्त्वाचे असतात.

पण चीनचं युद्धतंत्र अत्याधुनीक सायबर वॉर वगैरे पद्धतीचं असणार आहे. २१व्या शतकाला साजेसं युद्धतंत्र चीन वापरणार हे नक्की.

बरोबर.. चीन कदाचित भारताशी पारंपारीक युद्ध करणार नाही. सिंगल चाईल्ड पॉलिसी राबवल्यामुळे चीनसाठी सीमेवरुन 'बॉडीबॅग्स' परत येणं परवडणारं नाही, असं लष्करीतज्ञांचं मत आहे.

'चायनीज मनी ट्रॅप' बद्दल नेटवर बरंच साहीत्य उपलब्ध आहे.

ट्रम्प's picture

1 Mar 2019 - 3:26 pm | ट्रम्प

/\ /\. = )

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Mar 2019 - 7:05 am | अनिरुद्ध.वैद्य

https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/pakistani...

कोणी काहीच केलेलं नाही तरी धुमाकूळ सुरुय पब्लिकचा ट्विटरवर!

गामा पैलवान's picture

5 Mar 2019 - 1:43 pm | गामा पैलवान

अनिरुद्ध.वैद्य,

अहो, साहजिकच आहे पब्लिकने धुमाकूळ घालणं. चौकीदार म्हणाले ना की पायलट प्रोजेक्ट ठीक झाला, आता प्रत्यक्ष काम करायचंय म्हणून!

आ.न.,
-गा.पै.