असा बनवा Blogger वर स्वतःचा Blog फुकटात

Primary tabs

Ramesh Patil's picture
Ramesh Patil in तंत्रजगत
20 Feb 2019 - 11:53 pm


आपला स्वतःची वेबसाईट कशी बनवाल


website किंवा Blog कशी/कसा बनवायची या आधी वेबसाईट काय असते? आणी website आणी blog मध्ये काय अंतर असते ? हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. जेव्हा आपण एखाद पोर्टल website आहे अस म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात एक कंपनी येते. उदाहरण द्यायचं झाल्यास फेसबुक, तर फेसबुक जगातली सर्वात मोठी social Networking Website आहे. या website च मुख्य काम आहे आपल्या मित्रांशी जोडले जाणे व त्यांच्याशी online chat करणे. यासोबतच आपण इथे आपले फोटो विडीयो share करू शकतो.

तर blog म्हणजे एखाद्या माणसाचे विचार, एखादी माहिती देणारे पोर्टल

अर्थात म्हणूनच एखादा प्रश्न आपण गुगल केल्यास जे परिणाम आपल्याला दिसतात ते बहुसंख्य blogs च असतात.

blog कसा बनवाल ? किंवा website कशी बनवाल ते ही अगदी फुकट

गुगलच blogger.com नावाचे एक पोर्टल आहे, ते अगदी फुकटामध्ये तुम्हाला blog बनवायची अन त्यावर अगणित गोष्टी, चित्र, विडीयो जतन करून ठेवायची सुविधा देते. अन म्हणूनच जवळपास सगळे blogs हे blogger वरच बनवले जातात.
१. तुमच्या संगणकावर कोणताही web browser उघडा, अन www.blogger.com किंवा www.blogspot.com वर जा.
२. इथे तुम्ही तुमची gmail id व password देऊन लॉगीन करा. जर तुम्ही अगोदरच gmail वरून लॉगीन असाल तर तुम्हाला लॉगीन साठी विचारणार नाही.
३. Login झाल्यावर तुम्हाला डाव्या कोपऱ्यात "New Blog" अस एक button दिसेल. या बटनावर click करा.
४. तुमच्या browser मध्ये एक नवीन Pop Up window उघडेल. तिथे तुम्हाला तुमच्या blog ची माहिती भरायची आहे.
Title - इथे तुम्हाला तुमच्या blog च नाव लिहायचं आहे
Address- इथे तुम्हाला एक Unique नाव द्यायचं आहे. जर तुम्ही दिलेलं नाव available असेल तर "This Blog address is Available" अस लिहून येईल.
Template - ही तुमच्या blog ची design असते. तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे यावरून ठरते. तुम्ही हे नंतर बदलवू पण शकता
५. सगळ fill-up झाल्यानंतर "Create Blog" या Button वर Click करा.
आता तुमचा blog रेडी झाला आहे. address field मध्ये तुम्ही निवडलेल नाव हा तुमच्या blog चा address आहे. उदाहणार्थ xxx.blogspot.com. free blog नेहमी एका sub-domain सोबत येतो. जसे इथे .blogspot.com

प्रतिक्रिया

कंजूस's picture

21 Feb 2019 - 11:13 am | कंजूस

उत्तम.
वर्डप्रेस हेसुद्धा याच लेखात द्यावे.
आपला मराठी ब्लॅाग नेटवर जोडावा. मराठी_ब्लॅा्ल_नेट अशी काहीतरी ती साइट आहे॥

Ramesh Patil's picture

21 Feb 2019 - 4:09 pm | Ramesh Patil

नक्की आजच एडीट करतो

विनिता००२'s picture

21 Feb 2019 - 12:05 pm | विनिता००२

ऑडीओ अपलोड करायला चार्जेस आहेत का? वर्डप्रेसला आहेत म्हणूण विचारतेय.

Ramesh Patil's picture

21 Feb 2019 - 4:12 pm | Ramesh Patil

blogger वर तुम्ही मोफत करू शकता उपलोड. अन WordPress साठी तुम्ही hosting विकत घेत असता म्हणून तुमचा कोणताही data त्या hosting वर तुम्ही save करू शकता

विनिता००२'s picture

21 Feb 2019 - 3:10 pm | विनिता००२

ऑडीओ फाईल एम पी ३ कन्व्हर्ट केली एम पी ४ मधे, तर ब्लॉगवर व्हिडीओ अपलोड होत नाहीये.
काय करु??

तशी काही अडचण नाहीये, कारण होते सहसा upload. पण जर तरीही प्रोब्लेम येत असेल तर तुम्ही YouTube वर FIle Upload करून ती ब्लॉग वर वापरू शकता