छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

युती आणि राणे

Primary tabs

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in राजकारण
19 Feb 2019 - 9:29 pm

स्वाभिमानी नेते नारायण राणे यांणी सिव्सेना भाजप युतीवर पत्रकार परिषद घेऊन आगपाखड केली आहे. युतीमुळे दोघांपैकी कुणाचाही फायदा होणार नाही असे भाकितही त्यांनी वर्तविले आहे.
राणे केवळ शिवसेनेचे शत्रू नव्हेत, तर अनुभवी राजकारणीही आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेतील टीका बेदखल करावी एवढे ते अद्याप दुर्लक्षित नाहीत.
शिवाय, भाजपच्या जाहीरनामा समितीतही राणे हे एक सदस्य आहेत.
आता लवकरच निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करावा लागेल. युती असल्याने सेना-भाजपला संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागेल. विशेष म्हणजे, भाजपच्या जाहीरनामा समितीवर महाराष्ट्रातून राणे हे एकमेव सदस्य असले तरी आगामी लोकसभा निवडणूक मात्र ते स्वबळावरच, म्हणजे स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याखालीच लढणार आहेत.
अशा वेळी, भाजपच्या जाहीरनामा समितीवर असलेले स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांची युतीच्या जाहीरनाम्याबाबतची भूमिका काय असेल?
सेना भाजपचा जाहीरनाम्यावर राणे यांची मोहोर कशी उमटेल?

प्रतिक्रिया

राणे कोणत्याही पक्षातून निवडून येणारे नेते आहेत.
पण
पण
कॅान्ग्रेसने जैतापुरचं घोडं दामटायचं काम त्यांना दिल्याने आणि ते दामटू लागल्याने कोकणवासीय चिडले.
बाकी शिवसेनेलाच राणे आणि इतर जुने नेते नको आहेत.