लोकहो,
काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत.
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का?
२. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का?
३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते.
४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय?
५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय?
झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील?
६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=147
यांत ते म्हणतात की ३ पातळ्यांवर संरक्षणकार्य चालतं.
क. निव्वळ बचाव : यांत शत्रू आक्रमक असतो व आपण फक्त बचाव करतो.
च. आक्रमक बचाव : यांत भारत आक्रमणाचं मूळ सक्रीयपणे नष्ट करतो. पण आक्रमकांचं मूळ तसंच राहतं.
ट. उघड आक्रमण : यांत भारत आक्रमकांवर प्रत्याक्रमण करून त्यांना नष्ट करतो.
या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल?
असो.
जाणकारांनी कृपया उत्तरे सुचवावीत. तसेच अधिक प्रश्न जरूर विचारावेत.
धन्यवाद!
आपला नम्र,
-गामा पैलवान
प्रतिक्रिया
22 Feb 2019 - 11:34 pm | खंडेराव
स
पुलवामा हल्ल्यानंतर मोदिजींच्या जंगल सफारीच्या सुरस बातम्या बाहेर यायला लागल्या नंतर हेडलाईन व्यवस्थापन करायला गडकरींची पाकिस्तानच पाणी अडवणे/वळवणे ह्या बातम्या पुढे आल्यात.
आपले मुद्दे सोडू नका.
पाणी अडवणे / वळवणे ह्या बातम्यांवर उर्जा, वेळ, नेट खर्च करू नका.
#पुलवामा बद्दल थेट प्रश्न विचारा
देशाच्या प्रधान मंत्र्यांच्या सुरक्षेत वायरलेस, उपग्रह फोन असताना बातमीच समजली नाही हे हास्यास्पद आहे.
मग मोदिजी का गेले नाहीत किंवा डोभाल का घरी गेले नाहीत ?
दोन्ही पैकी काय ?
23 Feb 2019 - 9:43 am | ट्रेड मार्क
टाइम्स ऑफ इंडिया चे फॅक्ट चेक वाचा.
Congress makes false claim of PM Modi shooting for film at Corbett 3 hours after Pulwama attack.
पप्पू आणि त्याचे जोकर कितीवेळा तोंडघशी पडणार आहेत कोण जाणे. पण बरंय तेवढीच एंटरटेनमेंट होते.
23 Feb 2019 - 10:22 am | सॅगी
भरीस भर म्हणून मिपावरील पप्पू भक्तांची गँगही इतकं मनोरंजन करते की बस :)
25 Feb 2019 - 9:23 am | शब्दबम्बाळ
तोंडावर पडणे हा काही लोकांचा ट्रेड मार्क झाला आहे! :D
तुम्हीच दिलेल्या बातमीवर आता अपडेट दिलेली आहे TOI ने!!
UPDATE: Times Fact Check had earlier delivered a verdict on this story based on the response it received from the government on Congress' charges. However, the Fact Check team was unable to independently verify claims from both sides and as such our original verdict on this issue was premature. We are therefore issuing this story with an update.
VERDICT Times Fact Check is not in a position to deliver a verdict in this case, so it is merely placing here the points made by both sides.
असो! जोकर कोणाचा झाला ते वेगळे सांगायला नको! ;)
25 Feb 2019 - 11:08 pm | ट्रेड मार्क
जोकर रागाच आहे आणि त्याबरोबर तुमचा पण जोकर झाला आहे. मी प्रतिसाद २२ ला दिला आहे त्यावेळेला त्याच लेखात टाइम्सने काँग्रेसने केलेला क्लेम खोटा आहे असं सांगितलं. आता २४ ला तोच लेख बदल करून आम्ही निर्णय देऊ शकत नाही म्हणालेत. मतस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसने दबाव आणलेला दिसतोय.
त्यामुळे माझ्या तोंडावर पडण्याचा प्रश्नच येत नाही. उगाच शब्दबंबाळ प्रतिसाद दिले म्हणजे आपण शहाणे होत नाही.
आता सिद्ध करा बघू की मोदींना हल्ला झाल्याचे कळल्यावरसुद्धा पुढचे ३ तास मोदी बोटीतून फिरत फोटोशूट करत राहिले. दुसरं म्हणजे मोदींचा दिवसभराचा कार्यक्रम काय होता हे सरकारकडूनच सांगितले जाणार ना?
बाकी राहुल गांधी नाचत असल्याचा व्हिडीओ संध्याकाळी ४.४४ ला ट्विटर वर टाकलेला तुमच्या चष्म्यातून दिसलाच नसेल.
25 Feb 2019 - 3:18 pm | lakhu risbud
रा.कॉ च्या IT सेल ची काही आतली बातमी असेल तर सांगा कि राव. लई दिस झाले तुम्ही दम दिलेला न्हायी
25 Feb 2019 - 8:04 pm | ट्रम्प
प्रत्येकाचे 100 अपराध होईपर्यंत ते सौजन्यसप्ताह साजरा करत आहेत =)
26 Feb 2019 - 1:30 pm | विशुमित
जोडे खाल्याशिवाय पोटच भरत नाही वाटतं तुमचं!!
21 Feb 2019 - 10:04 pm | Rajesh188
Pm ,cm, var आरोप करताना मग तो कोणत्या ही पार्टी चा आसू द्या तारतम्य पाळल पाहिजे .
देस आणि राज्यात प्रतेकाची जबाबदारी फिक्स आहे आणि त्या साठी लाखो करोड tax मधून खर्च होतात .जी समस्या त्यांच्या (pm ,cm), पर्यंत पोचते त्याचा अंतिम निर्णय हे घेतात .
पण प्रत्येक गोष्टीत pm cm la दोषी ठरवले हे नाईलाजाने मूर्खपणाचे लक्षण आहे असाच म्हणावे लागेल
25 Feb 2019 - 6:29 am | Blackcat (not verified)
अशा गोष्टीना पी एम आन्सरेबल असतात , असे पूर्वी मोदीच बोलले होते.
--------------
"प्रधान मंत्रीजी आप मुझे बताईये, सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हात मे है, आप कोई भी फोन टॅप कर सकते हो, आप् ने अभीतक क्या किया? अभीभी घुसपेटी भारत के अंदर कसे आते है ? कितने आतण्कवादीयोंको आपने विदेशसे भारत लाया?
आतंकवादीयोंके पास बाहर से गन आता है, गोला बारूद आता है, हवाला के माध्यमसे पैसा आता है, पैसा बँको के माध्यमसे आता है, प्रधान मंत्री, आप ईतनी निगरानी नही रख सकते? ये राज्योंका विषय नही है.. ये आपका विषय है.. काय किया है आपने ?"
नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये मनमोहन सिंगांना भाषणात विचारलेले हे काही प्रश्न.
(https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s२०:०० ते २३:००)
25 Feb 2019 - 8:48 am | भंकस बाबा
या न्यायाने मग तुमच्यावर पण कड़क लक्ष ठेवले पाहिजे.
उद्या तुम्ही कोणाच्यातरी गाड़ीखाली कडमडलात तर हे मोदीचे कारस्थान म्हणून बोंबा मारायला कमी पडणार नाही.
मोदींच्या काळात देशात इतरत्र दहशतवादी हल्ले फारच कमी झाले, काश्मीर ही समस्या आता तळागाळात जाउंन पोहोचलि आहे. कारण त्याला मिळणारा ढोंगी मानवतावादी पाठिंबा!
काशमीरबददल बोलताना एकाही मानवतावाद्याला काश्मीरी पंडिताविषयी बोलताना बघितले नाही. पण आता हेच मानवतावादी चारपाच काश्मिरिना फटके क़ाय पडले तर बोंबा मारायला लागले आहेत.
25 Feb 2019 - 9:25 am | Blackcat (not verified)
ते मोदीना जाऊन सांगा,
ते त्यांचे बोल आहेत
25 Feb 2019 - 9:50 am | भंकस बाबा
अहो दर वेळेला क़ाय मोदिना जाउंन सांगा?
आपली सारासारविवेकबुद्धि वापरा ना!
असेल तर
25 Feb 2019 - 10:36 am | Blackcat (not verified)
बोलले ते , काय सार , अतिसारबुद्धी त्यांना वापरायला सांगा
25 Feb 2019 - 1:44 pm | भंकस बाबा
आता मोदी ऐकत नाहीत!
क़ाय करावे बरे?
अमेरिकेला पत्र लिहावे ....
पाकिस्तानकडे मद्त मागावी......
चीनी राजदूताना भेटावे.....
हार्दिक, टुकड़े गैंगला पीसाळायला लावावे.....
मणिशंकर ! जाउदे ... हायला हे येड़ बोलले की आपल्याच बुड़ाखाली फटाका फुटतोय....
आता बोला मनींमाउ , की हा तर कल्पनाविलास आहे
25 Feb 2019 - 1:45 pm | भंकस बाबा
आता मोदी ऐकत नाहीत!
क़ाय करावे बरे?
अमेरिकेला पत्र लिहावे ....
पाकिस्तानकडे मद्त मागावी......
चीनी राजदूताना भेटावे.....
हार्दिक, टुकड़े गैंगला पीसाळायला लावावे.....
मणिशंकर ! जाउदे ... हायला हे येड़ बोलले की आपल्याच बुड़ाखाली फटाका फुटतोय....
आता बोला मनींमाउ , की हा तर कल्पनाविलास आहे
22 Feb 2019 - 11:31 pm | खंडेराव
22 Feb 2019 - 11:34 pm | खंडेराव
22 Feb 2019 - 11:34 pm | खंडेराव
26 Feb 2019 - 9:13 am | भंकस बाबा
भारताने पाकला प्रत्युत्तर दिले,
पाकने मान्य केले की भारताने वायुसेना हल्ला केला आहे.
पण आपले काही पाकसमर्थक व फेकूलर मिपाकर हे मान्य करणार नाही
26 Feb 2019 - 9:13 am | भंकस बाबा
भारताने पाकला प्रत्युत्तर दिले,
पाकने मान्य केले की भारताने वायुसेना हल्ला केला आहे.
पण आपले काही पाकसमर्थक व फेकूलर मिपाकर हे मान्य करणार नाही
26 Feb 2019 - 12:53 pm | ट्रम्प
भंकस बाबा !!!
हिच वेळ आहे रस्ता चूकलेल्या पुरोगम्या बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याची .
26 Feb 2019 - 2:38 pm | भंकस बाबा
अहो आले पाहिजेत ना संवाद साधायल!
सदमा लागलाय त्यांना
26 Feb 2019 - 2:40 pm | प्रसाद_१९८२
26 Feb 2019 - 2:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
आजच्या कारवाईचे व्हिडीओ यायला अजून वेळ लागेल. वर वर पाहता हा अफगाणिस्तानमधील अमेरिकन कारवाईचा असावा असे वाटते.
26 Feb 2019 - 6:20 pm | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
हा पाकिस्तानास संदेश आहेच. पण त्याचसोबत अमेरिकेसही आहे.
ट्रंपतात्यांना भारत गांधारात अधिक सक्रिय व्हायला हवाय : https://economictimes.indiatimes.com/news/defence/india-emerging-as-impo...
एकदा का भारत सक्रिय झाला की मग अमेरिकेस तिथे अडकलेली मान अलगदपणे सोडवता येईल. मात्र त्याआधी भारतास आपलं बूड स्थिर करायला हवं. खैबर पख्तूनखव्यातला उपरोक्त हल्ला ही भारताने वसूल केलेली किंमत आहे, असं मानायला हरकत नाही.
आ.न.,
-गा.पै.
26 Feb 2019 - 9:35 pm | अर्धवटराव
सॅम काका आपल्यासाठी त्यांच्या तिजोरीतुन योग्य रक्कम काढुन द्यायला तयार असेल तर काय मज्जा येईल. पैसा सॅमकाकांचा, सैन्य आणि हितसंबंध आपले. आजवर
आपल्या आदरणीय शेजार्याने खुप ताव मारला परक्याच्या मलाईवर. आपल्याला देखील संधी मिळाली तर होऊ दे खर्च... :ड.
27 Feb 2019 - 10:42 am | राघव
मला नाही वाटत तसं.
जर अमेरिका पैसा देईल तर त्याबदल्यात काय काय घेईल याची गणती करणं शक्य नाही. जिथं जिंं अमेरिका जाते तिथं तिथंं प्रॉब्लेम्स आणिक वाढत जातात असा इतिहास आहे. त्यामुळं फुकटच्या पैशासाठी आपण काय पणाला लावतोय ते फार महत्त्वाचं .
त्यापेक्षा वेगळ्या स्तरावरच्या मांडवलीचा फायदा जास्त होईल असं वाटतं. :-)
राघव
27 Feb 2019 - 4:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारताने पाकिस्तानसारखा "दाता-घेता" असा संबंध अजिबात ठेऊ नये. कारण यात देणारा वरिष्ठ आणि घेणारा कनिष्ठ असे समिकरण असते आणि वरिष्ठ त्याचा अधिकार गाजवणारच... तो अधिकार टाळून आपला फायदा साधण्यासाठी पाकिस्तानसारखी नीच, निर्लज्ज, खोटेपणा व चलाखी करण्याची प्रवृत्ती असायला हवी, जी भारताकडे नाही आणि नाही तेच चांगले आहे.
याविरुद्ध, सद्या भारताचे जगाशी बरोबरीच्या स्तरावर (काही बाबतीत मोठेपणाच्या हक्काचे) संबंध प्रस्थापित झाले आहेत आणि ते अधिकाधिक सुधारत आहेत. त्यांची चाड ठेऊन जे काय करता येईल ते करावे आणि ते करताना स्वदेशाच्या भल्याचा विचार सर्वात वर ठेवावा.
27 Feb 2019 - 8:28 pm | सुबोध खरे
कोणताही देश, कुणालाही, कधीही, काहीही फुकट देत नाही हे आंतर राष्ट्रीय राजकारणातील सत्य आहे.
पाकिस्तानला दिलेली आर्थिक/शस्त्रास्त्रांची मदत यातून पाकिस्तानला काय फायदा झाला? केवळ दहशतवादाचा कारखाना सुरु झाला ना पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारली ना त्यांच्या जनतेची स्थिती. पाकिस्तानात कोणते नवे उद्योगधंदे आले किंवा शेतीमध्ये काय फायदा झाला? सामान्य जनतेची स्थिती आहे तशीच आहे.
फक्त राजकारणी आणि लष्करी अधिकारी यांची चंगळ झाली. नाही तरी मादक द्रव्याच्या तस्करीत ती होतच होती मादक द्रव्ये कमी झाली तर अमेरिकेकडून मलिदा मिळाला. पाकिस्तानातून अफगाणिस्तानात सामान नेणारे ट्रक अशाच लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यांच्या मालकीचे होते त्यात दिले भरणारे पापं पण यांच्याच मालकीचे आहेत. कुठूनही पैसे आला तरी या १ % लब्धप्रतिष्ठित लोकांचंच भलं होतं आणि सामान्य जनतेच्या हाती काहीच लागत नाही.
आणि या दहशत वादात त्यांचे १० वर्षात ६८ अब्ज डॉलर्स चे नुकसान झाले आणि ३५००० पाकिस्तानी नागरिक मारले गेले.
https://en.wikipedia.org/wiki/Terrorism_in_Pakistan
आज पाकिस्तानच्या उत्पन्नापैकी ६० % केवळ कर्जाचे व्याज फेडण्यात आणि लष्करावर खर्च होत आहेत.
मागच्या वर्षी जुने कर्ज फेडण्यासाठी २२ लाख कोटी रुपयांचे नवे कर्ज घेण्यासाठी पाकिस्तान लोकसभेची मंजुरी घेण्यात आली.
https://tribune.com.pk/story/1710152/2-service-maturing-debt-pakistan-bo...
शेवटी विषवल्ली अंगणात लावली तर त्याचे परिणाम स्वतःलाच भोगावे लागतात.
28 Feb 2019 - 8:00 am | भंकस बाबा
अमेरिकेकड़े भारताला मदत करण्याशिवाय पर्याय दिसत नाही आहे. अमेरिका नेहमीच आपल्या भूभागाला युद्धभूमिपासून लांब ठेवू इच्छितो, त्यामुळे तो भारताला ढाल बनवनार. जर अफगनिस्तानात आपल्याला अमेरिकन पाठिम्बयाने सैनिक सामर्थ्य ठेवायला मिळाले तर ती सुवर्णसंधि असेल . ह्या घडामोडीमुळे आपण पाकच्या पिछाडिवर राहून त्यांच्यावर कमालीचा अंकुश ठेवू शकतो .
28 Feb 2019 - 9:57 am | सुबोध खरे
अमेरिकेला अफगाणिस्तान शी काहीही घेणे देणे नाही. ते राष्ट्र बुडाले कि तरले? तेथे उपस्थिती असण्याचे एकच कारण -- पूर्वी रशियाच्या पिछाडीस मोक्याच्या जागी आपण असणे आणि आता चीनच्या पिछाडीस. कारण चीनचा आफ्रिकेबरोबर होणार व्यापार आणि सोव्हिएत युनियन मधून फुटून निघालेली राष्ट्रे यांच्या बरोबर व्यापारी संबंध यात त्यांना रस आहे. याशिवाय इराणच्या गळ्याशी असणे हे तेथे जास्त सोयीचे आहे.
त्याबरोबरच उगीर(UIGHUR) मुसलमानांची चीनने चालवलेली मुस्कटदाबी यात अमेरिकेला आपला स्वार्थ दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी इस्लामी दहशवादी लोकांना "छू करणे" हे उद्या ते करतीलच. तेंव्हा इस्लामी दहशतवाद्यांवर संपूर्णपणे नियंत्रण आणणे हे अमेरिकेच्या दूरच्या डावपेचात बसत नाही. अन्यथा पाकिस्तानला सज्जड दम देऊन इस्लामी दहशतवाद्यांच्या बऱ्याचशा कारवाया थांबवणे सहज शक्य आहे.
चीन अर्थात अशा मानवाधिकार भंगाबद्दल केलेल्या टीकेला अजिबात भीक घालत नाही हे अमेरिकेचे दुःख आहे. चीनचा पवित्रा स्पष्ट आहे मानवाधिकार वगैरे तुमच्या भूमीवर काथ्याकूट करा. आम्ही आहोत असे आहोत आमच्याशी व्यापार करायचा असेल तर करा नाही तर सोडून द्या.उद्या आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी चीनचा पाकिस्तानवर दहशतवाद कमी करण्यासाठी दबाव आला तर आश्चर्य वाटू नये. पण आज तरी भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी आणि भारताला जेरीस आणण्यासाठी चीन इस्लामी दहशतवाद्यांना संरक्षण देत आहे.
भारतावर जसा हल्ला झाला तसाच इराणच्या सशस्त्र दलाच्या बसवर आता १३ फेब्रुवारीलाच झाला आणि त्यात त्यांचे २७ सैनिक मारले गेले आणि १३ जखमी झाले. हा हल्ला सुन्नी मुसलमानांच्या जैश अल अद्दल या गटाने केला. अमेरिकेने हा हल्ला घडवला आणि पाकिस्तानची त्याला साथ आहे असे इराणचे म्हणणे आहे.
https://en.wikipedia.org/wiki/2019_Khash%E2%80%93Zahedan_suicide_bombing
कोण नक्की काय करतो आहे आणि त्याचा कशात रस आहे हे ठरवणे कठीण असते.
आंतरराष्ट्रीय राजकारण हे असे अत्यंत गुंतागुंतीचे असते.
आणि कोणतेही राष्ट्र कुणालाही, कधीही, कोणतीही मदत फुकट करत नसते हे ब्रम्हवाक्य आहे.
28 Feb 2019 - 10:39 am | भंकस बाबा
माझे म्हणणे असेच आहे की दूर पल्ल्याच्या क्षेपनास्त्रमुळे आता युद्धभूमि संकुचित झाली आहे, उद्या चीन वा रशिया यांच्याशी युद्ध पेटले कि अफगनिस्तान ही अमेरिकेसाठी युद्धभूमि असेल , याचसाठी तर त्यांनी लादेन व पाकिस्तान पोसला. चीनला देखील पाकिस्तानात केलेल्या गुंतवणूकीची काळजी आहे. उद्या जर चीनने भारताशी हात मिळवून पाकिस्तानचे तुकडे करण्याची भाषा केली तर त्यात आश्चर्य करण्याची गरज नाही, पण जर अफगनिस्तानात आपला हस्तक्षेप नसेल तर आपले महत्व कमी होते हा माझा तर्क
27 Feb 2019 - 7:43 pm | डँबिस००७
अर्बन नक्षल, तुकडे गँगला , अर्नब गोस्वामी, रिपब्लिक टीव्हीवर बोलवुन इज्जत काढत आहे !
नॅशनल टिव्हीवर देशाविरुद्ध बोलायला ह्यांना लाजा कश्या काय वाटत नाही ?
राजदिप सरदेसाईनी नेहमी प्रमाणे सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असा दावा केलेला आहे जो पाकिस्तानच्या फायद्यात होत.
काही लोकाम्नी आताच २०१९ ची निवडणुक जिंकल्याबद्दल श्री मोदींजींचे अभिनंदन केलेले आहे. किती तो त्रास !!
28 Feb 2019 - 7:46 am | भंकस बाबा
ह्या भारतीय आक्रमणातून एक गोष्ट मात्र चांगली झाली, तमाम आघाडीच्या न्यूज़ चॅनेलवरुन फोकस रागा, ममता, मायावती वा ऐसे तत्सम प्रसिद्धिलोलुप व्यक्तिवरुन हटूंन मुख्य बातम्यावर आला. याचा अर्थ सरळ आहे की 2019च्या निवडणुका एकतरफ़ी होणार!
एक तोटा मिपाचा मात्र झाला आहे, कोल्हेकुई करणारे अनेक मनोरंजनकार मिपावरुन गायब झाले आहेत, आता आपली करमणुक आपल्याला काही माहितिपर लेख वाचूनच करावी लागेल. छया जीवन अगदी अळणी होऊन गेले बुवा!
28 Feb 2019 - 7:47 am | भंकस बाबा
ह्या भारतीय आक्रमणातून एक गोष्ट मात्र चांगली झाली, तमाम आघाडीच्या न्यूज़ चॅनेलवरुन फोकस रागा, ममता, मायावती वा ऐसे तत्सम प्रसिद्धिलोलुप व्यक्तिवरुन हटूंन मुख्य बातम्यावर आला. याचा अर्थ सरळ आहे की 2019च्या निवडणुका एकतरफ़ी होणार!
एक तोटा मिपाचा मात्र झाला आहे, कोल्हेकुई करणारे अनेक मनोरंजनकार मिपावरुन गायब झाले आहेत, आता आपली करमणुक आपल्याला काही माहितिपर लेख वाचूनच करावी लागेल. छया जीवन अगदी अळणी होऊन गेले बुवा!
28 Feb 2019 - 7:49 am | भंकस बाबा
ह्या भारतीय आक्रमणातून एक गोष्ट मात्र चांगली झाली, तमाम आघाडीच्या न्यूज़ चॅनेलवरुन फोकस रागा, ममता, मायावती वा ऐसे तत्सम प्रसिद्धिलोलुप व्यक्तिवरुन हटूंन मुख्य बातम्यावर आला. याचा अर्थ सरळ आहे की 2019च्या निवडणुका एकतरफ़ी होणार!
एक तोटा मिपाचा मात्र झाला आहे, कोल्हेकुई करणारे अनेक मनोरंजनकार मिपावरुन गायब झाले आहेत, आता आपली करमणुक आपल्याला काही माहितिपर लेख वाचूनच करावी लागेल. छया जीवन अगदी अळणी होऊन गेले बुवा!
1 Mar 2019 - 6:31 pm | ट्रम्प
तुमच्या घरी मोबाइल चे नेट वाईच स्लो दिसतय !!
का तुम्हाला ठाम प्रतिपादन करायचे म्हणून डबल ! डबल !!
प्रतिसाद टाकताय =)
26 Jun 2020 - 4:14 pm | Dev Raj Singh
एसएसबी में परीक्षा
PPDT Test
31 Oct 2020 - 11:42 am | प्रसाद गोडबोले
५ मिनित ३५ सेकन्द पासुन पहा , , खुद्द पाकिस्तानात , संसदेत कबुल करत आहेत कि पुलवामा अटॅक त्यांनी केला होता.
आता तरी माफी मागा निर्लज्ज लोकांनो !
मिसळपाव प्रशासन , किमान आता तरी जागे व्हा , अभिब्यक्ती स्वातंत्य्राच्या नावाखाली जे लोकं मोदी भाजप आरेसेस आणि इनजनरल हिंदु धर्माविरुध्द गरळ ओकत असतात त्यांच्या विरुध्द काही तरी कारवाई करा !!
31 Oct 2020 - 12:25 pm | रात्रीचे चांदणे
एक वेळ भाजपा वर ती टीका करणे मी समजू शकतो पण काही लोकांनी अजित डोवाल वरती पण चिखलफेक कलेली होती.
2 Apr 2021 - 10:58 pm | हस्तर
https://www.youtube.com/watch?v=4QU-Lj46h3I