... आणि खादाडीचं मनोगत - बिस्कीट आंबाडे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in पाककृती
3 Nov 2008 - 2:23 pm

मेघनाचं "... उर्फ सुगरणीचा सल्ला" वाचनात आलं आणि वाटलं "... आणि खादाडीचं मनोगत"पण लिहिलंच पाहीजे. पण खादाडी करायची तर तब्येतीत हे मात्र पक्कं ठरवलं होतं. कुठे हा प्रश्न होताच, माझी स्वयंपाककौशल्य आणि कष्ट करण्याची आवड बघता "स्वतः करून खाल्लं, आता पाकृ आणि फोटो चढवायचा" हे जरा कठीणच होता, पण इच्छा तिथे मार्ग आणि तो पण अनपेक्षितच!

"ठाण्याला येईनच दिवाळीला, तेव्हा तुम्हाला वेळ असेल तर भेटायचं आहे," असं विप्रकाकांना लिहिलं आणि त्यांचं लगेचच उत्तर आलं, "नक्की ये. काकूही तुझी वाट बघत आहे." मला हे वाचून फारच आनंद झाला. कारण काकूचा उल्लेख! काकू (यात मावशी, मामी, आत्या याही आल्याच) ही एक व्यक्ती नसते, तो एक स्वभाव असतो, माझ्यासारख्या सद्गुणी(?) पोराटोरांना मस्त काही बनवून पोट तुडुंब भरेपर्यंत खायला घालायचं. काकांच्या घरी गेले, काकू तिथे होतीच आणि "व्वा! ही काकू एकदम काकू-स्वभावाचीच दिसते; काहीतरी मस्त खायला मिळणार आज!", असा विचार करून मी ओळख करून दिली, "मी अदिती"! माझ्या आधीच अनेक ठिकाणी माझी "किर्ती" पोहोचलेली असते याचा पूर्वानुभव, नुसतं नाव सांगून पुरतं. पूर्वी आईचं किंवा बाबांचं नाव सांगायला लागायचं पण ते काका-काकू मित्र-मैत्रीण नंतर झालेले! विप्रकाका म्हणजे आधी मैत्री/ओळख मग काका झाले असल्यामुळे फक्त नावच पुरलं असावं.

काका आणि मी गप्पा मारत असतानाच काकू सारस्वत असण्याचा उल्लेख आला. आधी अनेक मित्र-मैत्रीणींकडून सारस्वतांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींची माहिती होती, तोंडाला पाणी सुटलं. काकूने तेवढ्यात विचारलं, "चहा चालेल?". "हो, नक्कीच!" आणि काकांशी गप्पा मारण्यात मी पुन्हा रंगून गेले. आतून तळणाचा वास यायला लागतो. "चहा तळतात की काय यांच्यात?" असला भाकड प्रश्न मला अजिबात पडला नाही. एकीकडे मिक्सरचाही आवाज येत होता. आणि माझ्या नाकाला होणार्‍या जाणीवेचा पोटाला त्रास सुरू होण्याआधीच काकू दोन ताटल्या घेऊन आलीच बाहेर! खाण्याच्या बाबतीत लाजायचं कसलं? मी सरळ नाकात आधीच शिरलेल्या खमंग वासाला स्मरुन "व्वा वडे! तसंही आता दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळाच आला होता", असं म्हणत वड्यांवर ताव मारला. आहाहा, काय भारी वडे होते म्हणून सांगू? "काकू, कसे बनवले वडे? मला सांगा ना पाकृ. आणि काका आता तुम्हीपण पाकृ लिहायला सुरूवात कराच." आगाऊ सल्ले देण्यात माझा हात कोणीही धरू शकणार नाही. "आधी खा पोटभर, मग सांगते तुला कसे बनवायचे ते", काकू पुन्हा आत गेली. व्वा, मला काकू फारच आवडली होती; सकाळी खाऊन घरून बाहेर पडले असले तरी ही माऊली मला एवढ्या प्रेमानी खायला घालत आहे म्हटल्यावर मी सरळसरळ घरात काही खाल्लं होतं हे विसरायचंच ठरवलं. दोन (का तीन?) बशाभरून वडे खाल्ले, त्याबरोबर मस्त नारळाची चटणीही ओरपली आणि मग काकू चहा घेऊन आली. गरमागरम वाफाळत्या कपातून चहा पिताना ऐकलेली ही पाकृ:

उडदाची डाळ जेमतेम भिजेल एवढंच पाणी घालून तीन ते चार तास भिजत घालायची. नंतर पुन्हा अगदी थोडंच, वाटण्यापुरतं पाणी घालून मिक्सरमधून भरडशीच वाटायची. त्याची घनता साधारण मेदूवड्याच्या पीठाची असते तशीच ठेवायची. चवीसाठी त्यात मीठ घालायचं. तळण्यासाठी कढईत तेल घ्यायचं आणि तेल तापलं की त्यात हातानी (किंवा चमच्यानी, तुम्ही चमचेबद्दूर आहात का हातवळणे यावर अवलंबून) साधारण लाडवाच्या आकाराचे गोळे सोडायचे. आणि मस्त खरपूस लाल रंग होईपर्यंत तळायचे. त्या पीठात हवं असेल तर कढीपत्ता, फोडणी असं काही घालता येईल; काकूनी साधेच केले होते आणि मला जाम आवडले तसेच! त्याबरोबर खायला सॉस किंवा नारळाची चटणी किंवा आणखी तुम्हाला जे आवडेल ते घ्या आणि ओरपा. मी एक वाटीभर नारळाची चटणी फस्त केली असणार.

माझं सगळं लक्ष बोलण्याकडे आणि खाण्याकडे असल्यामुळे मी काही फोटो-बिटो काढण्याच्या फंदात पडले नाही, पण इंटरनेट आणि गुगल जिंदाबाद.

काकूचं हे सांगून झाल्यावर काकांनी नाव सांगितलं, "सारस्वत पाकृ आहे ही, "बिस्किट आंबाडे" म्हणतात यांना!". मी नाव लिहूनच घ्यायला पाहिजे होतं, कारण अपेक्षेप्रमाणे लिहायला वेळ मिळेस्तोवर मी नाव विसरले. पण हरकत नाही, काका आहेतच ना वाचवायला! ;-)

(अवांतर: या पाकृमधे मी लिहिताना चुका केल्या असतील तर माझी सफाई गणिताचे कुलकर्णी मास्तर द्यायचे त्याप्रमाणे, "बघत होते त्या निमित्ताने काका पाकृंवर प्रतिक्रिया देतात का ते किंवा या निमित्ताने आणखी एक अन्नपूर्णा मिपावर येते का ते!")

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 2:31 pm | बिपिन कार्यकर्ते

ह्म्म्म...

तर हेच ते वडे काय? विप्रकाकांकडे आता आधी १-२ दिवस कळवूनच जायला पाहिजे. :)

अवांतरः लंच टाईम झालाय, वड्यांकडे नुसतं बघून फ्रस्ट्रेशन येतंय. :(
आणि यमी कधी पाकृ टाकेल असं वाटलं नव्हतं ;)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 2:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> विप्रकाकांकडे आता आधी १-२ दिवस कळवूनच जायला पाहिजे.
तीन-चार तास पुरतात हो, खोबरागड़चे राजे बिपीनचंद्र! ;-)

>> अवांतरः लंच टाईम झालाय, वड्यांकडे नुसतं बघून फ्रस्ट्रेशन येतंय.
म्हणूनतर मी माझं जेवण झाल्यावर लिहिलं हो! अर्थात कँटीनच्या जेवणात काही फार मजा नाही!

>> आणि यमी कधी पाकृ टाकेल असं वाटलं नव्हतं Wink
निशेद, निशेद, निशेद! हे वाचा आणि मग बोला!

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 2:42 pm | बिपिन कार्यकर्ते

ती सुद्धा ढापलेली. काही तरी ओरिजिनॅलिटी दाखवा की.

(अपने आप से वार्तालापः एखाद्या संपादकाचे लक्ष वेधून तो धागा उडवून टाकायला सांगू का? :? )

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 2:44 pm | बिपिन कार्यकर्ते

>> विप्रकाकांकडे आता आधी १-२ दिवस कळवूनच जायला पाहिजे.
तीन-चार तास पुरतात हो, खोबरागड़चे राजे बिपीनचंद्र!

तुला क्रिप्टिक गेलं... मी म्हणत होतो की ३-४ तासात काकू जर इतके ए१ वडे करत असतिल तर १-२ दिवस आधी सांगितलं तर जंगी बेत करतिल ना त्या... ;)

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

3 Nov 2008 - 10:03 pm | टारझन

विप्र काका , भारतात असलो की ..मुंबईत तसाही विकेंडला पडिक असतो,,, एक दिवस गावजेवण घाला बॉ ...
तुमच्याही टार्झटाला भेटू (हे उगाच मस्का मारणं) .. आमची ही किर्ती आधीच पोचवून ठेवा .. उगाच आश्चर्याचे धक्के नको बसायला नायतर .... काकुंना सांगावे टार्झन येतोय .. किराणा अंमळ जास्त भरावा !!

आज्जींनी उत्तम लिहिलय .. बाकी आजकाल एलियन्स बाहेरगावी गेलेले दिसतात :)

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 10:07 pm | विनायक प्रभू

ये तर खरा

बेसनलाडू's picture

3 Nov 2008 - 2:33 pm | बेसनलाडू

चमचमीत सारस्वत पाककृती. आईच्या हातच्या बिस्कुट अंबाड्याची आठवण झाली. गेले ते दिन गेले :(
(सारस्वत)बेसनलाडू

झकासराव's picture

3 Nov 2008 - 2:37 pm | झकासराव

काकाना भेटायची इच्छा आहेच पण आता काकु सोबत असतील तरच भेटल पाहिजे. =P~

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सहज's picture

3 Nov 2008 - 2:39 pm | सहज

बिस्कीट आंबाडे नावाची अंमळ गंमत वाटली. :-) तशी असल्या प्रकाराची इतर नावे देखील मजेदार - बोंडा किंवा ऊलुंधू

मस्त!

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 2:40 pm | विनायक प्रभू

३५ वडे साधारण एका वेळी खाणे सहज शक्य असते. त्याचा जेवणावर काहीही परिणाम होत नाही. मात्र वातानुकुलित मंड्ळीनी जरा जपुन.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 2:46 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) वातानुकुलित =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 2:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणूनच मी आता (पुन्हा) वातानुकुलीत जिममधे जायला सुरूवात केली आहे. (पावती दाखवते तोच तो!) काकूनी पाकृ सांगितल्यावर घरी करुन बघायला नको का?

विसोबा खेचर's picture

3 Nov 2008 - 2:46 pm | विसोबा खेचर

काकू (यात मावशी, मामी, आत्या याही आल्याच) ही एक व्यक्ती नसते, तो एक स्वभाव असतो, माझ्यासारख्या सद्गुणी(?) पोराटोरांना मस्त काही बनवून पोट तुडुंब भरेपर्यंत खायला घालायचं.

क्या बात है! अगदी खरं..

वा! अदिती,

वड्यांइतकाच सुंदर आणि खुसखुशीत लेख...जियो..! :)

स्वगत: प्रभूमास्तराची बायडी सारस्वत आहे काय? हम्म! चला, म्हणजे केव्हातरी मास्तरांकडे मासळी खायला जायला हरकत नाही! :)

तात्या.

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 2:56 pm | विनायक प्रभू

तुम्हाला खाजवायला नाही फुरसद डोक. आंमंत्रण तर केंव्हाच दिले आहे. भाजीच्या फणसाच्या पानाच्या द्रोणातील इड्ल्या. सुंगटाच्या आमटी बरोबर.

विसोबा खेचर's picture

3 Nov 2008 - 3:01 pm | विसोबा खेचर

तुम्हाला खाजवायला नाही फुरसद डोक.

मास्तर वाक्यरचना जपून करा.. साला 'डोकं' हा शब्द मुद्दाम शेवटी टाकता काय? :)

स्वगत : साला, पोरान्चं आणि पालकांचं अशीच वेडीवाकडी वाक्य वापरून समुपदेशन करतो की काय हा प्रभूमास्तर? ! :)

आपला,
(चावट प्रभूमास्तरान्चा चावट विद्यार्थी) तात्या. :)

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 3:07 pm | विनायक प्रभू

विज जाण्याच्या भिती ने होत अस कधी कधी गड्बडीत. मुद्दाम नाय वो.

जैनाचं कार्ट's picture

3 Nov 2008 - 4:22 pm | जैनाचं कार्ट (not verified)

=))

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

अवलिया's picture

3 Nov 2008 - 2:50 pm | अवलिया

जोशी बै
मस्त लेख लिहिलात हो तुम्ही... आवडला.

नाना

अभिरत भिरभि-या's picture

3 Nov 2008 - 4:08 pm | अभिरत भिरभि-या

मस्त मजा केलीस हो आदिती-तै.
जरा एका शंकेचे उत्तर दे हो ( बघु आता हिला किती कळलीये पा.कृ :? )

दोन्ही प्रकार जर उडदानेच बनवतात तर यात आणि नेहमीच्या उडिदवड्यात काय फरक असतो ?

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 4:11 pm | बिपिन कार्यकर्ते

अभिरत, जबरी गूगली टाकलास. आता बघू काय उत्तर देते ती. :)

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

3 Nov 2008 - 4:21 pm | छोटा डॉन

बिस्कीट आंबाडे हे नेहमी सॉस, नारळाची चटणी किंवा आखणा काही आवडेल ते ह्याबरोबर चांगले लागतात
आणि
नेहमीचे मेदु वडे उर्फ उडदाचे वडे हे सांबारासोबत चांगले लागतात ...

बिस्कीट वडे तुम्ही ३०-३५ च्या संख्येने खाऊ शकता ( प्रभुजींना विचारा कसे ते ? )
आणि
जास्तीज जास्त ४-५ मेदुवड्यात कमीत कमी मी तरी आउट होतो ...

बिस्कीट वड्यानंतर वाफाळता चहा लै भारी लागतो
आणि
मेदुवड्यानंतर स्पेशल दाक्षिणात्य फिल्टर कॉफीच प्यावी ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 4:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दोन्ही प्रकार जर उडदानेच बनवतात तर यात आणि नेहमीच्या उडिदवड्यात काय फरक असतो ?
आधी उडीद वडे काय असतात ते खाऊ देत मला.
बाकी माझ्या मते मेदूवड्यात तांदूळपण असतात.

विप्रकाका आणि काकूनी सांगितल्याप्रमाणे या बिस्कुट आंबाड्यांबरोबर एक खास सांबार असतं कारवारी पद्धतीचं, ते नाही मिळालं मला! (काका मी पुढच्या वेळेला येईन तेव्हासाठी फर्माईश काकूला सांगा.) त्याची पाकृ काकूलाच विचार.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 4:49 pm | बिपिन कार्यकर्ते

दोन्ही प्रकार जर उडदानेच बनवतात तर यात आणि नेहमीच्या उडिदवड्यात काय फरक असतो ?
आधी उडीद वडे काय असतात ते खाऊ देत मला.
बाकी माझ्या मते मेदूवड्यात तांदूळपण असतात.

माज्या आयेला नाय तर बायेला विचारून सांगतो. मी थोडाच पाकृनिपुण आहे (म्हणूनच नाही टाकत कधी पाकॄ, मला नाही जमत ते) :)

विप्रकाका आणि काकूनी सांगितल्याप्रमाणे या बिस्कुट आंबाड्यांबरोबर एक खास सांबार असतं कारवारी पद्धतीचं, ते नाही मिळालं मला! (काका मी पुढच्या वेळेला येईन तेव्हासाठी फर्माईश काकूला सांगा.) त्याची पाकृ काकूलाच विचार.

आता डायरेक्ट वशिला लागला आहे ना तुझा, काकूंकडे? तू स्वतःच सांग त्यांना. विप्रकाका लै बिज्जी असतात, ३६५ दिवसांपैकी ३५९ दिवस काम करतात, त्यांनीच सांगितलंय परवा. तुझा निरोप काहीतरी भलताच सांगतिल काकूंना.

आणि नावात 'बिस्कुट' का आहे ते काय कळलं नाही अजून. :(

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 6:14 pm | विनायक प्रभू

बिस्कीटा सारखे लागतात म्हणून बिस्कीट आंबाडे. मेदुवडया सारखे पण भोकाशिवाय.
चवीत फरक असतो.
मेदुवडे जास्त म्हणजे ४ खातो आपण.
हे मी सांगितल्याप्रमाणे ३५ आरामात.
म्हणजे साधारण १० मेदुवडे.
मुख्य म्हणजे जेवणावर परिणाम होत नाही ही खासियत

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2008 - 10:28 pm | प्रभाकर पेठकर

बाकी माझ्या मते मेदूवड्यात तांदूळपण असतात.

अजिबात नाही. मेदूवड्यात फक्त उडिदाची डाळच असते. (बाकी जिरे, क्वचित मिरे आणि खोबर्‍याचे बारीक तुकडेही असतात.)

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2008 - 4:30 pm | स्वाती दिनेश

काकूंच्या वड्यांइतकाच तुझा लय भारी लेख आहे ग अदिती, मस्त!
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 4:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काकूंच्या वड्यांइतकाच तुझा लय भारी लेख आहे ग अदिती, मस्त!
स्वातीताई, नुसतेच वडे कुठे भलतीकडे खाल्ले असते ना तर एवढं भारी लिहिता नसतं आलं; पण हा अनेकांना आवडलेला लेख "काकू-इफेक्ट" आहे.

आता कळलं विप्रकाका एवढं भारी लिहितात ते कोणामुळे ते!

नंदन's picture

3 Nov 2008 - 6:16 pm | नंदन
चतुरंग's picture

3 Nov 2008 - 4:32 pm | चतुरंग

खाऊन आली ते आलीस पुन्हा वर स्वतः न केलेली पाकृ! अरे वा हे तर विप्र.काकूंच्या पाकृवर तुळशीपत्र झालं की?
बाकी वर्णन जबराच केलं आहेस! =P~ =P~

(खुद के साथ बातां : रंग्या ह्या भारतवारीला ठाणे दर्शन सहल नक्की! योग्य त्या लोकांना व्यनि पाठवशीलच आधी!! ;) )

चतुरंग

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 6:19 pm | विनायक प्रभू

प्लेझर विल बी माइन रंगासेठ्.

शितल's picture

3 Nov 2008 - 6:34 pm | शितल

आदिती
मस्त लिहिले आहेस.
:)

ललिता's picture

3 Nov 2008 - 7:29 pm | ललिता

बिस्कुट आंबाड्याच्या पिठात, ओल्या खोबर्‍याच्या बारीक कातळ्या, थोडं आलं व कढीपत्ता बारीक चिरून घातला तर वड्यांची लज्जत आणखी वाढते :)
विप्रजी, हे डाळीचं सांबार काय असतं? कॉळंबॉ तर नाही?

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 7:35 pm | विनायक प्रभू

कॉळ्बॉ कुठे? सांबार कुठे?
मशिका सांग आणि वायंगण घाल्न केलेलो कॉळंबॉ मुकार सांबार खंय.

ललिता's picture

3 Nov 2008 - 7:44 pm | ललिता

कॉळंब्या सर सांबारा ना! प्रश्न पडलेलो, आदितीन म्हळिल्लो डाळी सांबार कॉळंबो ना मूं?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 7:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला तुमची भाषा येत नाही तरी थोडी समजते. मी नाही म्हटलं डाळीचं सांबार, मी नुसतंच खास कारवारी पद्धतीचं सांबार म्हटलं. "काका, मला वाचवा".

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 7:52 pm | विनायक प्रभू

केले तुझे काम

ललिता's picture

3 Nov 2008 - 7:55 pm | ललिता

सांबार म्हणजे डाळीचं सांबार असं वाटलं गं! मी कारवारीच आहे.... मला बिस्कुट आंबाड्याबरोबरचं सांबार कुठलं ते आठवत नव्हतं म्हणून विचारलं!
बचावले! हुश्श! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 8:01 pm | बिपिन कार्यकर्ते

ललिता ताई, एक अवांतर माहिती.... ती आदिती नाही अदिती आहे. डेंजर हाय ती. नाव नीट घ्या तिचं, नाही तर गेलात तुम्ही.

बिपिन कार्यकर्ते

अभिरत भिरभि-या's picture

3 Nov 2008 - 8:11 pm | अभिरत भिरभि-या

आता ललिता ताईंचा माहित नाय बिपिन भाऊंचाच "खोबार-गोटा" (आय मीण गोटा-खोबरे) होणार हे नक्की .

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 8:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता ललिता ताईंचा माहित नाय बिपिन भाऊंचाच "खोबार-गोटा" (आय मीण गोटा-खोबरे) होणार हे नक्की .
नाही नाही, बिपीनचंद्रराजे तर आतल्या गोटातलेच आहेत. पण ललिता ताईंनी मुद्दामून चूक केली नाही त्यामुळे त्यांना काहीही त्रास होणार नाही. वर त्या भारीपैकी रेसिप्या टाकतात. मी शाकाहारी असले तरी काय झालं, त्या अन्नपूर्णा आहेतच!

ललितातै, माझं नाव अदितीच आहे, आदिती नाही. मी काही संस्कृत शिकलेली नाही फार, नाना, उर्मिला वगैरे लोकं जास्त नीट सांगू शकतील.
आणि ते बिपीनचंद्रराजेंचं म्हणणं फार नका घेऊ मनावर. त्यांना खोड्या काढायची अंमळ सवयच आहे.

ललिता's picture

3 Nov 2008 - 8:10 pm | ललिता

बिपिनभाऊ, आभार हो! आता काळजी घेईन!
एक शंका: आदिती असंच नाव असतं ना? निदान मला तरी असं वाटतं!
अदिती - "ज्याचं त्याचं स्वातंत्र्य"! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 8:18 pm | बिपिन कार्यकर्ते

ललिता ताई, गंमत बरं का.... असा टीपी चालतो आमचा मधून मधून. आणि अदिती असेच आहे. :)

बिपिन कार्यकर्ते

ललिता's picture

3 Nov 2008 - 8:30 pm | ललिता

मी देखिल हलकेच घेतलं होतं.... कुठे काय जड वाटलं तुला?
काय फरक पडतो... आम्हाला छान रेसिपी मिळाल्या, छान छान वाचायला मिळालं की बास! हो की नाही ग दिती?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 9:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय फरक पडतो... आम्हाला छान रेसिपी मिळाल्या, छान छान वाचायला मिळालं की बास! हो की नाही ग अदिती?
अगदी! काय बिपीनभौ, दोन बायकांच्यामधे पडलात आता दोघींनी मिळून तुम्हालाच कटवलं बघा!

आणि प्राजू, मी विप्रकाकांनाच लिहा म्हणत होते, पण ते नाही म्हणाले. मग मी पण थोडी फटकेबाजी करुन घेतली. काकूने एवढी मेहेनत करुन मला खायला घातलं, थोडं जास्त नको का लिहायला तिच्याबद्दल?

ऋषिकेश, तू दाखव रे फोटो हवे तेवढे! मी माहेरी जाऊन जशी मजा करते तशी तुला नाहीच करता येणार! ;-)

मेघना भुस्कुटे's picture

3 Nov 2008 - 8:45 pm | मेघना भुस्कुटे

आयला, धमाल चाललीय राव तुमची!
यमे, पाकृ लय भारी. पण मी तुझ्याकडे आल्यावरच खाईन.. इथे मिक्सरपर्यंत भिजवलेली डाळ नेण्याची यातायात कोण करतो...
माझ्याकडे सध्या फराळाचा फुल्ल ष्टॉक आहे. तो संपेस्तोवर तरी नाई बॉ मी काही ट्राय करणार. शिवाय मीदिखील नव्या जिममधे नवे पैसे भरलेत...
आता काही दिवस फलाहार आणि कच्च्या भाज्या-बिज्यांना प्राधान्य... :(

सूर्य's picture

3 Nov 2008 - 9:04 pm | सूर्य

फोटो तर लै भारी आहे. तोंडाला पाणी सुटतय. प्रभुकाका (स्वगत : उगाच मस्का मारु नकोस ;) ), ठाण्याला माझे काका रहातात तेंव्हा तुमच्याकडे एखादी चक्कर मारावी म्हणतो.

आपला
- (खादाड) सूर्य

आदितीला दिवाळी मानवली आहे.. ;)
हो ना?? म्हणून अशी पाकृ देत सुटली आहे ती ही स्वतः न केलेली. ;)
असो.. आदिती, कोणीही नाही तरी मी म्हणते की, ही पाकृ. आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद.
आवांतर : प्रभू सर... सॉरी प्रभू काका, मी एप्रिल मध्ये येते आहे भारतात. तेव्हा आपली भेट घेईन म्हणते ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 9:12 pm | विनायक प्रभू

वाट बघतो.

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 9:10 pm | विनायक प्रभू

कधी येतोस ते कळव

रेवती's picture

3 Nov 2008 - 9:21 pm | रेवती

उतरलाय गं लेख अदिती.
मज्जा चाललीये तर!
विप्र काकू मिपाच्या सदस्य आहेत का गं?

रेवती

ऋषिकेश's picture

3 Nov 2008 - 9:31 pm | ऋषिकेश

आम्हाला टुकटुक करून बिस्कीट आंबाडे खातेस काय! लक्षात ठेवीन! बाकी पाकृ वाचून चविष्ट असणार हे नक्की

तसंही दहिसरहून ठाणा काहि फार दूर नाहि :) विप्रंनी बोलावलं की मी हजर ;) मग फोटोसकट तुम्हाला जळवेन :प

-(हजर) ऋषिकेश

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2008 - 10:26 pm | प्रभाकर पेठकर

'बिस्किट आंबाडे' हे बिन भोकाचे 'मेदूवडेच' आहेत. (अदितीने दिलेली पाकृ पाहता.)
दहिवड्यांसाठी असे केले जातात.
गरम गरम खाताना मोजायचे नाहीत.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 10:28 pm | विनायक प्रभू

चुलत म्हणायला हरकत नाही. बिनभोकाचे

पिवळा डांबिस's picture

4 Nov 2008 - 1:08 am | पिवळा डांबिस

अदिती, चांगला लिहिलायस लेख!!
बाकी आता पुढल्या भारतभेटीच्या वेळेस ठाण्यातच तंबू ठोकायला पाहिजे.....
अभ्यंकरकाकूंची साबुदाण्याची खिचडी, प्रभूदेवाकडे करलीची उडदामेथी!! (रामदासबुवांकडे काय मिळेल माहिती नाही) :)
बाकी विप्र, तुमचे सासर सारस्वत हे वाचून आनंद झाला!!

सारस्वत तितुका मेळवावा,
मासळीधर्म वाढवावा,
श्रावण महिना लावावा,
धूडकावूनी ||

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2008 - 10:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी आता पुढल्या भारतभेटीच्या वेळेस ठाण्यातच तंबू ठोकायला पाहिजे.....
नक्कीच! आता माझी माहेरची तशी तीन-तीन घरं झाली आहेत ठाण्यात ... त्यामुळे मला सुट्टी घेऊन तिकडे यायला निमित्तच मिळेल.

माझी बायको कानपूरची आहे.बघा अंदाज करून मेनू कसा असेल.

माझी बायको कानपूरची आहे.बघा अंदाज करून मेनू कसा असेल.

लिखाळ's picture

4 Nov 2008 - 4:13 pm | लिखाळ

अरे वा ! छान खुसखुशित लेख आणि पाकृ :)
--लिखाळ.

आनंदयात्री's picture

4 Nov 2008 - 4:37 pm | आनंदयात्री

>>माझ्या आधीच अनेक ठिकाणी माझी "किर्ती" पोहोचलेली असते

आयला तुला पोरगी पण आहे ??
कोणत्या शाळेत आहे ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2008 - 4:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आयला तुला पोरगी पण आहे ??
कोणत्या शाळेत आहे ?

तुम्ही फक्त मुलीच शोधा! काय रे प्राण्यांच्या वर्गीकरणात तुझा फायलम पॉरीफेरा का रे? ;-)
माझ्याशी मैत्री कर ना आधी! ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2008 - 4:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आयला तुला पोरगी पण आहे ??
कोणत्या शाळेत आहे ?

तुम्ही फक्त मुलीच शोधा! काय रे प्राण्यांच्या वर्गीकरणात तुझा फायलम पॉरीफेरा का रे? ;-)
माझ्याशी मैत्री कर ना आधी! ;-)