Skip to main content

[शशक' १९] - ढवळाढवळ

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
टीडिंग...फोन वाजला, व्हॉट्सॲपचा कस्टम टोन असल्याने तो संपदाचा मेसेज असल्याचे आशिषच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी परतण्याच्या बोलीवर, आईच्या वाढदिवसानिमित्त ऑफिसमधून परस्पर माहेरी गेलेल्या संपदाने तब्बल अठरा दिवसांनी काय मेसेज पाठवला असेल हा विचार करत आशिषने मेसेज वाचला. “तुला वेळ असेल तर थोडं बोलायचं होतं” हनिमूनला गेलेल्या दिवसापासून आशिषच्या सासूने सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री मेसेज / फोन करून दोघांच्या वैवाहिक जीवनात अक्षम्य ढवळाढवळ करून त्यांचे आयुष्य निरस करून टाकले होते. प्रेमविवाहाला तीन वर्षे उलटूनही बायकोचा खूपच कमी सहवास लाभल्यामुळे उद्विग्न मन:स्थितीतल्या आशिषला संताप अनावर होऊन त्याने उत्तर टाईप केले, “माझ्याकडे आता बोलण्यासारखे काही नाही. घटस्फोटाची नोटीस पाठवणार आहे. माहेरीच खुश रहा”

वाचने 5759
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by चांदणे संदीप

:D

+१

तो प्रेमविवाह नव्हताच मुळी! आकर्षणाला प्रेम समजणारी तमाम जमात रागवेल अशाने! कथा आवडली+१

भावस्पर्शी... पटलं

प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेला असो कोणतीही बायको किंवा तिची आई असं वागेल असं वाटत नाही. लाखात एक केस असेल अशी. अतिरंजीत आहे.

In reply to by श्वेता२४

हागल्या पादल्या गोष्टी लगेच फोन वर आईला सांगून, सल्ला मीळेल तशा वागणार्‍या बिनडोक मुली तुम्ही बघितलेल्या दिसत नाहीत :)

.हो माझ्या नात्यात किंवा अगदी मैत्रिणींमध्ये देखील नशिबाने "अशा" कोणी नाहीत. त्यामुळे विश्वास बसणे कठीण आहे.

+१

+१

+1