आजच्या म.टा मधिल बातमी
झारखंडमधील धनबाद कोर्टातील मुख्य न्यायाधीश दीपक कुमार यांच्या कोर्टात मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात हत्या आणि देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.
राजू मलिक नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२,१४७,१४८,१४९ आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सुनावणी २९ तारखेला करण्यात येणार असून , राजू मलिकने आपला भाऊ सकल याच्या हत्येचा आरोप राज ठाकरे यांच्यावर लावला आहे.
दरम्यान, उत्तर भारतीयांवरील वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात बिहारमधील सर्व आमदार - खासदारांनी राजीनामे द्यावेत , असं आव्हान केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केले आहे. याशिवाय पत्रकार परिषदेत लालूप्रसाद यादव यांनी ठाकरे कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढवला.
' बिहारच्या लोकांची प्रतारणा करणा-या दोषींवर कारवाई करण्यासाठी आणि बिहारच्या हितासाठी राज्यातील सर्वंच पक्षाच्या आमदार , खासदारांनी राजीनामे द्यावेत ', असं लालूप्रसाद यादव पत्रकार परिषदेत म्हणाले. पुढे ते म्हणाले , ' कोणताही पक्ष ठाकरे घराण्यातील कुठल्याही पक्षाशी युती करेल , त्यांना देशद्रोही मानले जाईल '. हे स्पष्ट करताना लालू यांनी मराठी जनतेशी कोणतंही भांडण नसल्याचे सांगितले
प्रतिक्रिया
3 Nov 2008 - 10:27 am | घाशीराम कोतवाल १.२
काहि तांत्रिक अड्चणी मुळे लिन्क येथे पेस्ट करत आलि नाही
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
3 Nov 2008 - 11:04 am | वेताळ
खरच ह्या बिहारयाना काम नसल्यामुळे हे काहिही उद्योग करत असतात. पण न्यायाधिशानी खटला दाखल कसा करुन घेतला? ह्या बद्दल आश्चर्य वाटते.
वेताळ
3 Nov 2008 - 12:40 pm | llपुण्याचे पेशवेll
न्यायाधीश पण बिहारी असेल. :)
पुण्याचे पेशवे
3 Nov 2008 - 11:14 am | सुक्या
ह्या तर चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. त्या आझमगड मधुन देशविघातक काम करणार्या लोकांची फौज बाहेर येते आहे. त्यांनी केलेल्या स्फोटात कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. नेपाळ्मार्गे कित्येक कोटीच्या बनावट नोटा बिहार मार्गे देशात येतात. त्यांना देशद्रोही नाही म्हणनार. त्यांना आतंकवादी नाही म्हणनार. आतंकवादी कोण तर न्याय्य हक्कासाठी लढा देणारा माणुस. या भारतात जर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणे हे देशद्रोह कधीपासुन झाला. कुठे जातो आहे हा देश?
निषेध. निषेध. निषेध. . . ..
आग्यावेताळ (सुक्या)
आमच्या घरात (अन देशात) खुप उंदीर झाले आहेत.
3 Nov 2008 - 12:09 pm | रामपुरी
इथे निषेध व्यक्त करुन काय होणार? आणखी काही मार्ग नाही काय या बिहारी मुर्खांना थांबवण्याचा?
3 Nov 2008 - 12:41 pm | sanjubaba
देशद्रोहाचा अर्थ तरी कळतो का न्यायालायला हेच विचारण्याची वेळ आता आलीय असे वाटते
आपल्या मातृभाषेकारिता.......मराठी माणसाच्या अस्तिवकारिता......आपल्या संस्कृतीसाठी
लढणे, आवाज़ उठवणे हा आता देशद्रोह ठरतो........म्हणजे हे सरकार कॉंग्रेसचे आहे की ईग्रज़ाचे ?
भारतात जर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणे हे देशद्रोह कधीपासुन झाला या देशाचे काय होणार हे काही सांगू शकत नाही.......पण याविषयी तोडगा काढायचा सोडून सगळे नुसते भांडत सुटले......राज याना गुंड ठरवण्याचा
सर्वानी जणू विडाच उचलाय असे वाटते......काय तर सगळे बिहारी नेते या प्रश्नावर एक झालेत म्हणजे ते त्याच्या प्रान्ता साठी लढतात.....त्याच्या
बिहारी लोकाकरिता लढतात तेव्हा ती राष्ट्रीय एकात्मता आणि राज जर काही बोलले तर तो देश द्रॉह वा............हे चांगल्य !
पण काय करणार आपले सरकारच पु चाट आहे..........त्या कॉंग्रेसी मराठ्यानी आपला मराठी बाणा कधीच विकून टाकला आहे....ते नपून्सक काय
दिल्लीत बोलणार.....या सर्वात विलास ची जास्त गोची झालीय त्याला आता संस्कृतिक प्रोग्रँला जायला वेळ मिळता नाहीय.......
कुठे ते कर्नाटक सरकार ...जे स्वताच्या कन्नड भाषेत पाट्या लावाव्यात महणून स्वता कायदा करून तो काटेकोर रित्या अमलात आणतात सुधा
आणि हे सरकार.....राज वर्च बोलण्याची बंदी घालते............का तर खरे एकण्याची हिमत कुणाच्यात नाहीय......मग ते दिल्ली वाले असो नाही तर
हे पु चाट मराठी विचारवंत असो....!
आसामात बिहारी विरोधी सूर आहे....तो महाराष्ट्रात आता शिगेला पोहचलाय या मागचे कारण काय याचे आत्म् परीश्ण बिहारी नेत्यानी करावे....
बिहार हे राज्य मॅहणजे आज उपरो धिक विनोदाचा विषय झाल्य......या बिहारिना त्याचा राज्यात रोजगार असता तर हे कशाला आले असते....
इतर राज्यात याचा विचार बिहारी लालू ने करावा......उगीच कांगावा करू नये..... आज हा लालू नुसता
भालू सारखा नाचतोय...( अजुन आदोलन नीट झाले पण नाही ) अरे, भया...ई तो खाली ट्रेल र हे......असली फिल्म तो आभी बाकी हे !
3 Nov 2008 - 7:52 pm | घासू
जर स्वता:चे राज्य वाचवण्यासाठी आदोंलन करणं जर देशद्रोह असेल तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, टिळक, सावरकर आणि सर्व स्वातंत्र्य सैनिक यांना सुद्धा देशद्रोही म्हटलं पाहिजे.
घासू