मून शॉट !

Primary tabs

उन्मेष दिक्षीत's picture
उन्मेष दिक्षीत in काथ्याकूट
24 Jan 2019 - 12:24 am
गाभा: 

आज एक बातमी वाचली, ती ही, कि जगभरातील लाखो लोकांनी चंद्रावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे (शाहरुख खान, मायकल जॅक्सन वगैरे ) ! वाचुन थक्क झालो! अनेक प्रश्नांचे तारे एकाच वेळी टिम्टिमले ! एका व्यक्तीने तर जमीन खरेदी करून नंतर फ्रॉड म्हणुन तक्रार केली आहे ! बघा !

कुणाला वरचा आकाशातला पसारा बघुन कुतूहल वाटेल , कुणाला काहीतरी संशोधन करावे वाटेल, कुणाला शांत वाटेल, कोण तारे मोजेल, कुणाची नुसतीच मान दुखेल, पण कुणाला चक्क प्रॉपर्टी दिसू शकेल !?

lunarland नावाची एक सो कॉल्ड "व्हिजनरी" कंपनी आहे, यांनी १९८० च्या सुमारास असा पराक्रम करुन दाखवलाय! यांना सादर प्रणाम.

ते म्हणे Earth's Oldest Most Recognized Celestial Real Estate Agency आहेत ! आणि ते सुद्धा "आपल्या गॅलॅक्सी पुरते मर्यादित" असे नमुद केलंय ! हाहा !

नुसतं सेलेब्रिटी , रिच पीपल फॅड म्हणावं, तर यांनी ठरवलेल्या एकर च्या किंमतीमधे कुणीही मल्टीएकर जमीन घेउ शकेल. सो दे आर सिरीयस अबाउट ईट !

त्यांची गिफ्ट पॅकेजेस पण आहेत ! 29.95$ Standard, 39.95 Premium. त्याच्यात म्हणे तुम्हाला एकरचा मॅप, फ्रेम्ड लूनार डीड मिळेल !
लूनार डीड ?? लुनॅटीक वर्ड असाच आला असाव !

मला सांगा, हे कोण टिकोजीराव चंद्रावरची जमीन क्लेम करणारे आणि विकणारे ? कोण कुणाला कसा काय हक्क देउ शकेल असले काहीतरी करण्यासाठी ? आणि लोक कसे काय घेतायत ? म्हणजे How people are Buying Into it ?

मुळात हे असलं काही करण्याचं सुचतं कुठून ? जगभरातले आयलंड सुद्धा क्लेम करुन झाले! पण आता चंद्र चक्क ? चंद्र तर काही नाही म्हणणार यान ! याय्चं तर या, जायचं तर जा ! पण म्हणजे एक्जॅक्ट्ली चाल्लय काय ?

यावर कुणीतरी मूनलाईट पाडावा ही नम्र विनंती !

- मून्मेष

प्रतिक्रिया

एखाद्या वस्तूची / असेटची किंमत ही खरेदी करणाऱ्याच्या मनात असते. जितके जास्त लोक ती किंमत मान्य करतात तितकी ती जास्त होते आणि तो असेट वास्तव होतो.

इतर कोणीही हक्क सांगितलेला नाही याचा कागदोपत्री पुरावा अशा कंपन्या बनवत असाव्यात. प्रथम लिखित हक्क सांगणारा तो आदिमालक हे लॉजिक पुढे कायद्याच्या गळी उतरवता येऊ शकत असावं. समजा खूप दशकांनी चंद्रावर ठराविक जागी यान उतरवणे, खोदकाम, संशोधन, प्रयोग करणं असं काही आयोजित करायचं असेल तर ती जागा ज्याने क्लेम करुन ठेवली आहे त्या इसमाची परवानगी घेणं प्राप्त होऊ शकतं. त्याबद्दल मोबदला, भाडे, अन्य परतावा तो इसम मागू शकावा. किमान कायदेशीर आव्हान देऊन पूर्वी कधीही न झालेली केस उभी करुन अडथळा (उपद्रवमूल्य) निर्माण करु शकेल.

उन्मेष दिक्षीत's picture

24 Jan 2019 - 10:23 pm | उन्मेष दिक्षीत

लिहीताना मी सुरुवातीलाच लिहिणार होतो कि This is height of Madness ! पण मला टोन लाईट ठेवायचा होता. संक्षी नी मला यावर एक जोक पाठवला तो वाचल्यानंतर मला सांग.

>>
There was a Sale of Invisible Hair Pins at a Super Market !

A Lady Rushes just about the time the Store was to Close. Recovering her breath she asks the Sales Girl

" Dear, I managed to Come a long way to catch up this Sale, May I Get One Packet ? "

" Yes Mam, You are really lucky, take this One and she hands over an Empty Packet "
" Are You sure the Packet has Invisible Pins?" The Lady asks with a great delight, looking at the Empty Box.

"Of Course, Mam, this was the last One ! After the Sale was Declared We were actually running Short of the Product "

लौंगी मिरची's picture

25 Jan 2019 - 12:24 am | लौंगी मिरची

शॉक्ड ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2019 - 7:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चंद्रावर आपल्याला दोघांसाठी एक वीस बाय चाळीसचा प्लॉट घ्या.
मस्त गाणी, शायरी गझला आणि अधुन मधुन 'बसत' जाऊ...!

बाय द वे, चाँद, तारेचं मालक कोण हा एक वेगळा मुद्दा आहे. ज्या जागेचं मालक कोणी नाही, त्या जागेचं मालक सरकार असतं त्या प्रमाणे चंद्राच्या एकूण क्षेत्रफळ भागीले जगातील सर्व (इच्छुक ) देश आणि त्यांच्या वाटेला जी जागा येईल ती त्यांनी सार्वजनिक हितासाठी योग्य किंमतीत विकावी. एकुणच काय जगातील सर्व धनाढ्य लोक परग्रहावर असतील आणि इतर सर्व लोक पृथ्वीवर हानामा-या करत जगत राहतील. कल्पना मस्त आहे.

-दिलीप बिरुटे

उन्मेष दिक्षीत's picture

25 Jan 2019 - 10:48 pm | उन्मेष दिक्षीत

मी नव्हे. त्यांनी तो वरचा जोक पाठवला होता तेव्हडा फक्त इथं पोस्ट केला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2019 - 2:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण लिहिण्याची ष्टाईल डिक्टो सेम टू सेम सारखी आहे त्यामुळे तसं वाटलं.

बाय द वे भेट झाली तर या म्हणा मिपावर. डीबीसर आठवण करतात म्हणुन सांगा. मागधी, अर्धमागधी,पैसा प्राकृत बोली आता राहिल्या नाही म्हणावं. ;)

-दिलीप बिरुटे

चंद्रावर जी प्रायव्हेट लोक जमिनी विकत घेत आहेत आणि विकत आहेत त्याला जागतिक मान्यता आहे का .
हा प्रश्न uno मध्ये मांडून सर्व देशांची समती घेतली आहे का ?
समजा कायदेशीर मान्यता नाही मग लष्करी ताकत आहे का जमीन विकणाऱ्या लोकांच्या पाठी .नाही तर विकणारल्या पृथ्वी वर सुधा लष्करी ताकतीने चिरडून टाकतील बाकी देश .
आणि चंद्रा वर चिरडून टाकतील

उन्मेष दिक्षीत's picture

25 Jan 2019 - 11:15 pm | उन्मेष दिक्षीत

असू दे किंवा आणि कोण, यामधे कुणाच्याही कसल्याही मान्यतेला काय अर्थ आहे ? :) कायदा हा फक्त सोयीसाठी आहे इथंसुद्धा.

उन्मेष दिक्षीत's picture

25 Jan 2019 - 11:17 pm | उन्मेष दिक्षीत

कायदा हा सगळ्यांच्या सोयीसाठी आहे असं म्हणायचय.

मग काय ठरवलं? घेताय का जमीन चंद्रावर?

स्वलिखित's picture

26 Jan 2019 - 9:51 pm | स्वलिखित

देख जानेमन पुरा चांद हि ना सही एक गुंठा तर घेऊन आलो बघ तुझ्यासाठी - इति शाहरुख