आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.

nashik chivda's picture
nashik chivda in काथ्याकूट
25 Dec 2018 - 4:03 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी
आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. पुढील वर्षी माझे चिरंजीव इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेणार आहेत. इयत्ता ७ वी पर्यंत त्याची इंग्लिश माध्यम शाळेतील प्रगती समाधान कारक व उल्लेखनीय आहे. आतापर्यंत त्याला कुठल्याही क्लासेस ची गरज पडली नाही. शाळेच्या अभ्यासासोबत त्याने तबला व गिटार वादन शिकून घेतलं, सोबत स्थानिक व्हॉलीबॉल क्लब कडून १८ वर्षाखालील वयोगटातून जिल्हास्तरावर खेळतो आहे. १ महिन्यापूर्वी त्याने अखिल भारतीय स्तरावरील RIMC ची प्रवेश परीक्षा दिली. परीक्षा त्याला अवघड गेलेली आहे हे त्याने स्पष्टपणे सांगितले. त्यांनंतर नुकतीच त्याने नवीन मागणी केलेली आहे ती म्हणजे कोटा, राजस्थान पॅटर्न च्या क्लासेस मध्ये प्रवेश घ्यायचा कारण त्याच्या वर्गमित्राने तिथे मागील १ वर्षांपासून प्रवेश घेतला आहे शिवाय प्रवेश घेतल्या नंतरची वर्गमित्राची प्रगती खूप चांगली आहे. वर्गमित्राचा मोठा भाऊ गेल्या ४ वर्षांपासून त्या क्लासचा विद्यार्थी असून त्याची प्रगती देखील लक्षवेधक आहे. माझ्या मुलाच्या म्हणण्यानुसार तो कुठलाही क्लास नसल्यामुळे वर्गमित्रापासून मागे पडत चालला आहे, RIMC ची प्रवेश परीक्षा देखील त्यामुळे अवघड गेली कारण शाळेमधील अभ्यासक्रम पुरेसा नाही. त्याची शाळा देखील नावाजलेली असून शाळेने आतापर्यन्त अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले आहेत. पण शाळेतील शिक्षिका व शिक्षक सुद्धा उघडपणे अशा क्लासेस ची पाठराखण करतात. मुळात माझा प्रश्न हा आहे कि, अशा क्लासेस ची अवाढव्य फी भरून अपेक्षित प्रगती होते का ? ह्याबद्दल तुमचे अनुभव काय आहेत ? खरोखरंच अशा क्लासेस मुळे जे ई ई मेन्स व अडवान्सड, नीट, इतर कॉम्पेटेटिव्ह परीक्षा, एन. डी. ए. आदी परीक्षेमधील यशाचा मार्ग सुकर होतो काय ? ह्या क्लासेस व्यतिरिक्त इतर कुठल्या पद्धतीने आपण ह्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतो ? सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत हाय पेड क्लासेस एक यशस्वी टूल बनले आहे का ? शालेय शिक्षणावर माझा पूर्ण विश्वास आहे पण त्याव्यतिरिक्त ह्या क्लासेस चा खरोखर उपयोग होतो का ?

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

25 Dec 2018 - 4:20 pm | तुषार काळभोर

मी स्वतः आयुष्यात एकही शैक्षणिक क्लास लावला नव्हता. त्यामुळे

शालेय शिक्षणावर माझा पूर्ण विश्वास आहे पण त्याव्यतिरिक्त ह्या क्लासेस चा खरोखर उपयोग होतो का ?

आणि

ह्या क्लासेस व्यतिरिक्त इतर कुठल्या पद्धतीने आपण ह्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतो ?

यावर उत्तरे वाचण्यास उत्सुक आहे.

समीरसूर's picture

25 Dec 2018 - 4:40 pm | समीरसूर

माझ्यामते क्लासेसचा उपयोग होतो. कितीही म्हटलं तरी आपल्या इथे सध्या शाळा-कॉलेजेसमध्ये शिक्षणाचा दर्जा तितकासा चांगला राहिलेला नाही (अपवाद असतील). शाळा-कॉलेजेसमधल्या शिक्षकांना खूप जीव तोडून शिकवल्याने काही विशेष इन्सेन्टिव्ह मिळत नाही म्हणून अगदी "शिकवलं आहे" म्हणण्यापुरतं शिकवलं जातं. क्लासेसमध्ये पैसे भरून विद्यार्थी जात असल्याने दोन्ही बाजूंना एक निराळ्या प्रकारची बांधिलकी असते. शिवाय क्लासेस आपलं नाव टिकून रहावं म्हणून खूप आत्मीयतेने शिकवतात व स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुलांना तयार करून घेतात. त्यांच्या पद्धतींबद्दल आक्षेप असू शकतो पण सध्या तरी असेच चित्र आहे. उद्या क्लास लावला नाही म्हणून हवं ते यश मिळालं नाही अशी रुखरुख मनात राहून जायला नको म्हणून तरी क्लास लावावा या मताचा मी आहे. लावल्याने पैसे जास्त जातील; याव्यतिरिक्त दुसरे काहीच दुष्परिणाम नाहीत. कोटा वगैरे सारख्या ठिकाणी अतिशय अवघड अशा पद्धतीने मुलांना तयार करून घेतलं जातं. त्याच्या दुसर्‍या नकारात्मक बाजूदेखील आहेत (ताण, व्यसनं, वगैरे) पण सध्याच्या अतिस्पर्धात्मक जगात त्याला पर्याय नाही. मुलामध्ये ती जिद्द, मानसिकता, बौद्धिक पातळी, आवड, आणि कष्ट घेण्याची तयारी दिसत असेल तर क्लास लावावा असे मला वाटते. सध्या तरी ही शिक्षण पद्धती बदलता येणं व्यावहारिक दृष्टीने अशक्य दिसतंय. मुलामध्ये हे गुण दिसत नसतील तरी क्लास लावण्यात काही गैर/अवाजवी नाही असे मला वाटते. मुलाचा कल कळण्यास मदतच होईल.

* माझा कुठलाही क्लास नाही. माझा कुठल्याही क्लासशी दुरान्वयेदेखील संबंध नाही. मी शाळा-कॉलेजला असतांना क्लासेस होते लावले होते पण ते खाजगी शिकवणीच्या स्वरुपात होते. स्पर्धात्मक परीक्षांचे क्लासेस मी कधीही लावले नाहीत (तेवढी "झेप" नव्हती).

सध्या तरी ही शिक्षण पद्धती बदलता येणं व्यावहारिक दृष्टीने अशक्य दिसतंय. मुलामध्ये हे गुण दिसत नसतील तरी क्लास लावण्यात काही गैर/अवाजवी नाही असे मला वाटते. मुलाचा कल कळण्यास मदतच होईल.

१०० टक्के सहमत

क्लासेसचं 'मटिअरिअल', नोट्स वगैरे कोणत्यातरी दुकानात लिकत मिळतात त्या आणा. त्यात प्रश्नसंच असतात. ते स्वत: सोडवायची सवय लावा. ते जमलं की पुढचं सोपं असतं.
२ ) पाठ्यपुस्तकं ही उरकणे पद्धतीने लिहिलेली असतात. त्यातून 'रेल्वे टाइमटेबलातून गाडी शोधणं'छाप धडे असतात. गणित, सायन्ससारखे विषय आताच पूर्ण समजले तर कॅालेजमध्ये फारच सोपं जातं.
तर मग अशी पुस्तकं असतात का? -
हो. म्हणजे १९७० अगोदर होती. नंतर बाजारू पुस्तकांमुळे ती मागे पडली. उदाहरणार्थ
शॅाम सिअरिजची पुस्तकं पाहा. SHAUM SERIES. त्यामधले धड्याखालचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत.
क्लासवाले हेच रेडिमेड देतात .
३) इकडे मुंबईत दादरला अग्रवाल क्लासिज आहेत. आआइटीला जाऊ इच्छिणारी मुले इथेच जातात.

रानरेडा's picture

26 Dec 2018 - 11:13 pm | रानरेडा

सर नवीन माहिती द्यावी .
अगरवाल क्लासेस यांनी आय आय टी चे ल्कासरून कोचिंग बहुदा १९८९ किंवा १९९० ला बंद केले ( १९८९ ला माझा मित्र अग्रवाल क्लासिज - क्लासरूम मधून आय आय टी मध्ये गेला होता )
नंतर अनेक वर्षे ते १२ वी सि क्लासेस आणि आय आय टी साठी पत्रद्वारा क्लासेस चालवायचे
२०१० साली त्यांनी सर्व क्लासेस बंद केले . हि फार मोठी बातमी होती .

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Coaching-centre-downs-sh...

त्यामुळे आपण फार फार जुनी माहिती देत आहात

कंजूस's picture

27 Dec 2018 - 7:21 am | कंजूस

अररर.
बंदही झाले का?
-----
यासारख्या दुसऱ्या क्लासचे ( कोटा म्हणता ते) संच घेऊन तयारी करता येते का पाहा.

बंदही झाले का? म्हणजे आय आय टी - क्लासरूम १९८९-९० ला बंद झाले - म्हणजे ३० एक वर्षे होतील - जरा जास्तच काळ झाला ना ? ;)
आणि त्यांचे पत्रद्वारा मला वाटते पुढची १०-१२ वर्षे चालू होते - म्हणजे ते हि बरेच आधी झाले कि

म्हणजे आपले बोलणे हे बरेच जुनाट माहितीवर दिसते . त्यामुळे बाकीचे सल्ले पण तसेच असावे .

मला वाटते कि गेल्या २-३ वर्षात आय आंय टी मध्ये गेलेले योग्य काय ते सांगू शकतील . फार जुने हि नाही . कारण परीक्षे चे pattern खूप बदलत आहेत . बरीच मुले नेट वर शोधली तर मिळतील .

nashik chivda's picture

27 Dec 2018 - 12:49 pm | nashik chivda

धन्यवाद कंजूस काका !

... कोटा, राजस्थान पॅटर्न च्या क्लासेस मध्ये प्रवेश जरूर घ्या...

कारण सध्या तरी...

कोटा मग ..IIT Entrance आणि BITS Entrance.... आणि मग इंजिनियरिंगच्या ३र्‍या वर्षी, GRE आणि TOEFLच्या परिक्षा देऊन मग अमेरिका गाठायची असा एक मार्ग तयार झाला आहे.यश आणि अपयश मिळालेली दोन्ही प्रकारची उदाहरणे ऐकिवात आहेत.

३-४ % पोहोचतात. त्या ३-४%त येण्यासाठी, अभ्यास मात्र मुलालाच करायचा आहे.

मुलगा ८ वीत आणि पुढील ९-१० वर्षे शिक्षण म्हणजे किमान एक कोटीची आर्थिक तयारी लागेल आणि शिवाय इतके करूनही नौकरीची शाश्वती नाही.

आर्थिक गणित जमत असेल आणि मुलगा जर अमेरिकेत शिक्षण घेवून, नौकरी न मिळाल्याने परत आला तर, त्याच्या साठी दुसरा मार्ग तयार असेल तर, जरूर रिस्क घ्या.

nashik chivda's picture

27 Dec 2018 - 12:27 pm | nashik chivda

धन्यवाद मुवि,
मुळात अमेरिका हे उद्दिष्ट अजून तरी नाही आहे. सध्या फक्त जेवढे झेपते तेवढे करणे हेच करणे आहे. पुढील स्पर्धेला तोंड देण्यासाठी कशी तयारी असावी हेच महत्वाचे आहे. यश, अमेरिका नोकरी ह्या गोष्टींना माझ्या दृष्टीने फार महत्व नाही उद्या जाऊन माझ्या मुलाने शेती केली तरी मला काहीही हरकत नाही.

उलट आहे....

शेतीत जितके यश मिळवाल तितके कमी...

शेती आधारित पुरक उद्योग असतील तर फारच उत्तम....बदलापूरला, (बहूतेक "बेंडशीळ नावाच्या गावांत) राजू भट नावाच्या व्यक्तीने, पाच एकरात विविध प्रयोग केलेले आहेत.

असो,

उत्तम शेतीच आहे, असे माझे मत.

आणि आता, सामुदायिक शेतीला पर्याय नाही, असे निरिक्षण.

=====

यश, अमेरिका, नोकरी ह्या गोष्टींना माझ्या दृष्टीने फार महत्व नाही....

मग तर एकदम भिंधास्त रहा.नौकरी पेक्षा व्यवसाय कधीही जास्त आर्थिक स्थैर्य देतो.फक्त व्यवसाय अन्ना आधारित असला तर पिढ्या न पिढ्या नक्कीच टिकतो.

आज-उद्या कडे एका उत्तम व्यावसायिकाची खरोखरच घडलेली कथा टाकतो.

========

हे एक कायप्पा ढकलपत्र आहे.
अ

रानरेडा's picture

27 Dec 2018 - 6:34 pm | रानरेडा

यावर मला काय वाटते ते लिहायचे आहे , आसपास आता अशी मुले दिसत आहेत .

त्याआधी या कोचिंग संदर्भात माझ्या मित्राची सत्य कथा - आय आय टी चा क्लास _ इकडे टाकली आहे . मला वाटते उपयोग होईल हि लिंक घ्या .

https://www.misalpav.com/node/43832