DIY - मोबाइल चार्जर एक्सटेन्शन वायर

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
15 Dec 2018 - 4:47 pm

DIY - मोबाइल चार्जर एक्सटेन्शन वायर

गाभा : मोबाइल चार्जरला जोडून आलेली वायर फारच तोकडी असते. चार्जिंगच्या मेन्स सॅाकेटजवळच फोन ठेवावा/धरावा लागतो. रेल्वेमध्ये आता खिडकीजवळ चार्जिंग पॅाइंट दिलेला असतो त्याचा उपयोग फक्त जवळच्या प्रवाशास होतो. एकाचवेळी दोनजणांना पॅाइंट वापरायचा झाल्यास अडॅप्टर लागतो.
ही वायर बाजारात तयार मिळत नाही.
तर त्यासाठी एक्सटेन्शन वायर बनवायची आहे.

कृतीसाठी लागणाऱ्या वस्तू :
- तीन मिटर केबल दोन वायरसवाली ( अर्थिंग असणाऱ्या तिसऱ्या वायरची गरज नाही.)
- टुपिनचे एक सॅाकेट (एक नग)
- थ्रीपिन मेन्स अडॅप्टर (एक नग)
- इन वायर ओनओफ स्विच (एक नग)

लागणारा वेळ : एक तास

कृतीसाठी थोडे वायरिंगचे ज्ञान हवेच.

इथे फोटो (१) मध्ये दाखवल्याप्रमाणे अडॅप्टर, स्विच, टुपिन सॅाकेट जोडायचे आहे. दिलेल्या वायरचे एक आणि दोन मिटर लांब तुकडे केल्यावर त्यापैकी कोणत्याही एकावर ही वायर तयार करायची आहे. म्हणजे एक किंवा दोन मिटर लांब एक्स्टेन्शन बनेल. इथे दोन मिटरचा तुकडा वापरला आहे.

अडॅप्टर उघडून फेज आणि न्युट्रल जोडायच्या. यासाठी थ्रीपिन प्लग वापरला असता तर फक्त एकास चार्जिंग करता येते पण अडॅप्टरमुळे तिथे आणखी एक पॅाइंट तयार होतो. हा रेल्वेत उपयोगी पडेल. हॅाटेल रुममध्ये बऱ्याचदा एकच सॅाकेट पॅाइंट असतो अथवा एकच चालू असतो. तिथून थोडे दूर काम करता येईल.

मधला स्विच हा फेजवर ठेवायचा आहे. न्युट्रल डिरेक्ट आहे.

टुपिन सॅाकेट जे बाजारात मिळतात त्यामध्ये कोणताही चार्जर बसणार नाही. सॅाकेटमधल्या होल्डर पिना थोड्या दूर कराव्या लागतील. हे थोडे खटपटीचे काम आहे. पण सॅाकेटचे प्लास्टिक सॅाफ्ट असल्यास सोपे होईल. वर टेप मारावी म्हणजे स्क्रू निघणार नाही.

फोटो १ वायर

फोटो २

फोटो ३

आणखी दोन पर्याय
मल्टिप्लग आणि टु_पिन प्लगसह
फोटो ४

मल्टिप्लग आणि साधा एकश्टेन्शन बॅाक्स
यामध्ये काही खटाटोप नाही परंतू अधिक सेफ आणि जरा आकार वाढतो.
फोटो ५

-----------------------
धोके आणि सूचना
१) एसी २३० व्होल्ट्सचे काम आहे, पूर्ण खात्रीशिवाय करू नये. किंवा माहितगाराकडून करून घ्यावे.
२) टुपिन सॅाकेटचे टोक पाण्यातवगैरे पडणार नाही याची वापरताना काळजी घ्यावी किंवा एक्सेटेन्शन वायर एक मिटर लांबीचीच बनवावी.
३) मध्ये स्विच ठेवला असला सोयीसाठी तरी मुळातच मेन्ससॅाकेटमध्ये फेज वायर डाविकडे असल्यास या स्विचचा उपयेग होणार नाही. फेज प्रवाह बंद करता येणार नाही.
४) चार्जरमधली युएसबी वायरच इक्सटेन्ड केली तर? असे बरेच विडिओज युट्युबवर आहेत. चार्जमधून डिसी +/_ ५ व्होल्ट्स प्रवाह येणे अपेक्षित असते. ती वायर लांब केल्यास तेवढे वोल्टेज दूरवर पोहोचत नाही हा डिसीचा दोष असतो. एसी वायर वाढवल्याने काही फरक पडत नाही पण वापर काळजीपूर्वक करावा लागतो.
५) तुमच्याकडे वायर गुंडाळायचा पॅार्टबल हलका छोटा एक्सटेन्शन बोर्ड असेल तर त्याचा प्लग काढून तिथे अडॅप्टर बसवला तरी चालेल. हा पर्याय अधिक सोपा आहे, आणि कमी खटपट आहे.

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

15 Dec 2018 - 4:59 pm | प्रमोद देर्देकर

मस्त प्रवासास खरंच उपयोगी.

लेख आवडला. प्रवासासाठी उपयोगी.
हे डी वाय आय मस्त आहे. करता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2018 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलं.

-दिलीप बिरुटे

धर्मराजमुटके's picture

15 Dec 2018 - 8:44 pm | धर्मराजमुटके

सर,
बाजारात दुध मिळत असताना घरात म्हैस नका ना पाळायला सांगू.
दुवा १
दुवा २

इथून विकत घ्या.

कंजूस's picture

16 Dec 2018 - 6:05 am | कंजूस

धर्मराजमुटके
सर, त्या डेटा केबल एक्सटेन्शन आहेत डेटा जाऊ शकतो पण डिसी ५ वोल्टस केबलची लांबी वाढवल्यास वोल्टेज उतरते. मोबाइल चार्ज होण्यासाठी चारपेक्षा अधिक दाब लागतो.

ट्रम्प's picture

16 Dec 2018 - 7:19 am | ट्रम्प

मोबाइल चार्जिंग साठी 5 वोल्ट आणि 500 ma / 1 ma ची गरज असते , चार्जर अडॉप्टर च्या केबल ची लांबी वाढवली तर त्या केबल मध्ये रेसिस्टेंस निर्माण होवून वोल्टेज व करंट ड्रॉप होतो त्यामुळे मोबाइल चार्जिंग ला वेळ जास्त लागतो .

१० फुट कॉपर केबलला कीतीसा DC रेझिस्टंस असणार? जवळ जवळ शुन्य (मल्टीमिटरवर पहा). त्यामुळे लांबी वाढली म्हणुन व्होल्टेज ड्रॉप होणार नाही. पण स्व्स्तातली (नॉन कॉपर व अत्यंत बारीक तारा असलेली) केबल असेल तर कदाचित ड्रॉप होउ शकतो.

माझ्याकडे बर्‍या १० ते १२ फुट लांब USB केबल्स आहेत ज्या क्वीकचार्ज सुद्धा सपोर्ट करतात. तासाभरात सॅमसंग Galaxy S9 फुल चार्ज होतो.

नेत्रेश's picture

10 Jan 2019 - 3:57 am | नेत्रेश

रिव्युमध्ये काहीजणांनी लिहिलं आहे की चार्जिंग होत नाही. एकूण वायरमधल्या तांब्याच्या क्वालटीवर अवलंबून आहे. त्यामध्ये विरोध नसला तर शक्य आहे. सामान्य वायर्समध्ये तो असतोच.

क्विक_चार्ज फिचर असणाऱ्या फोनात एक केपसिटर असतो तो प्रथम वीज (करंट) खेचून चार्ज होत असावा आणि बॅटरीला नंतर चार्ज करत असेल.

बॅटरीचे फुल चार्ज वोल्टेज ३.७ असते म्हणजे वायरच्या टोकाला ४.७ वोल्टेज येत असल्यास लांबडी वायर वापरता येईल. दुकानात/ किंवा ओनलाइन मागवलेली वायर खरोखर मीटरने तपासता आली तर नक्की सांगता येईल वायर वापरता येईल का नाही.

तोपर्यंतचा हा स्वस्त उपाय.

एखदा छोटा कॅपॅसीटर काही फार चार्ज साठउ शकत नाही. (सुपरकॅपॅसीटर साठउ शकतो पण त्याचा आकार फोनपेक्षा मोठा असतो)
फास्ट चार्ज वेगळा प्रोटोकॉल असतो, त्यासाठी वेगळा चार्जर लगतो जो जास्त व्होल्टेज आणी जास्त करंट सप्लाय करतो.

असो, पण २३० व्होल्ट घरगुती केबलने गर्दीच्या ठीकाणी फीरवणे खुप धोकादायक वाटले म्हणुन वरील पर्याय सुचवला. अशा कोणतेही सर्टीफेकेशन नसलेल्या व कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीने बनवलेल्या केबलस सार्वजनीक ठीकाणी वापरणे धोकादायकच नव्हे तर कायद्याने गुन्हाही असु शकतो.

त्यापेक्षा 230V extension cables अवघ्या ३४० रुपयात मीळत असताना (AMAZON LINK), आपल्या व बाकी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनीक ठीकाणी (व घरी सुद्धा) अशा घरगुती केबल्स वापरु नये.

>>अशा कोणतेही सर्टीफेकेशन नसलेल्या व कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीने बनवलेल्या केबलस सार्वजनीक ठीकाणी वापरणे धोकादायकच नव्हे तर कायद्याने गुन्हाही असु शकतो.>>>

सहमत.
फोटो क्र ५ मधला एक्सटेन्शन बोर्ड हा एक पर्याय आहे.
वोल्टेज ड्रॅाप न होता चार्जरची आउटपुट वायर वाढवता आली तर उत्तमच आहे.

कंजूस's picture

10 Jan 2019 - 1:51 pm | कंजूस

>>>फास्ट चार्ज वेगळा प्रोटोकॉल असतो, त्यासाठी वेगळा चार्जर लगतो जो जास्त व्होल्टेज आणी जास्त करंट सप्लाय करतो>>>

त्यामुळेच तो मोठी पंधरा फुट वायर सपोर्ट करत असेल का?

स्नेहांकिता's picture

16 Dec 2018 - 8:32 pm | स्नेहांकिता

अत्यंत उपयुक्त माहिती.
धागा बुकमार्कवला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2018 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपयुक्त माहिती.

कंजूसकाका मिपाचे डीआयवाय एक्सपर्ट आहेत !

५ नंबरचा फोटो जुगाड साईटवर नेहमीच वापरतात.

या शिवाय गुगल फोटोची लिंक शेअर करून मिपावरील फोटोत ते जातील का? नसतील तर काय करावे? मार्गदर्शन अपेक्षित.

टमलरला साखळी ही तो लोकांनी नेऊ नये म्हणून बांधलेली असते, टमलर 'तिथपर्यंत' पोहोचावा यासाठी नसते. ( विनोदी उत्तर)
साधारणपणे एसी डब्याच्या टाइलेटातला टमलर बिना साखळीचाही जागेवर असतो.
----
गुगल फोटोच्या शेअरिंग याबद्दल एक वेगळा लेख लिहिला आहे. मोठा लेख अशासाठी की फोटोच्या दोनतीन लिंकस निघतात पण एकच उपयोगी असते ती कशी मिळवायची याविषयी आहे.

बाकी लिंक मिळाल्यावर ती -

<img src="लिंक" width ="500" />

या टेम्प्लेटात टाकून इथे मिपालेखात टाकल्यास फोटो उमटतो.

Img link गूगल माय ड्राईव्ह वरून मिळेल का? मी tinypic.com वापरून मिपावर टाकत आलोय. पण ते करताना आधी स्क्रीन शॉट क्रॉप करून तो सेव्ह करून मग टायनी वर चढवता येतो. ते सर्व ड्राईव्ह वरून जमेल का मग तो एमएस वन किंवा गूगलवरचा माय ड्राईव्ह असेल.

गुगल_ड्राइव वापरून फोटो येतो.

( मुंम्ब्रा डोंगर संध्याकाळी)

१) फोटो 'google_photos'वर अपलोड न करता थेट 'google_drive'वर अपलोड केला.
२) फोटो अपलोड झाल्यावर शेअरिंग लिंक काढली, ती -
https_drive_google_com/file/d/1txfcwSKVqO9_GeIYN6oyVrsTgWHcVqj9/view?usp=sharing

आली. पण ही img link म्हणून वापरल्यास फोटो येत नाही.
मग ctrl dot org/ google/ photos
ही अॅपसारखी साइट वापरून एक नवीनच Direct link मिळवली. ती img link म्हणून चालते आहे.

(( माझा यावरचा लेख पाहा ))

शशिकांत ओक's picture

9 Jan 2019 - 10:45 pm | शशिकांत ओक

मिपावर फोटो डायरेक्ट चढवायला काही तांत्रिक अडचणी आहेत का?

विश्राम देशपांडे's picture

22 Jan 2019 - 11:20 am | विश्राम देशपांडे

मी अशाच प्रकारचा एक प्रयत्न करून एक मोठ्या वायरचा चार्जर बनविला आहे. माझ्याकडे दोन बिघडलेले सॅमसंगचे चार्जर होते. एकाची टू पीन आपटली गेल्याने बिघडली होती तर दुसऱ्याची मोबाईलला जोडायची पीन तुटली होती. दोन्ही जुन्या पद्धतीचे (बिगर यूएसबी वाले) एकाच कंपनीचे, एकाच मॉडेलचे होते. मी दोघांचे तुटके भाग कापून वायरींची टोके उघडी केली आणि सारख्या रंगांच्या वायरी जोडून इन्सुलेशन टेप लावून जोड मजबूत केला. यामुळे दोन बिघडलेल्या चार्जर पासून एक चांगला चार्जर तयार झाला. हा चार्जर मी गेली दोन वर्षे वापरत असून अत्यंत समाधानी आहे. कधी कधी चार्जिंग करणे आणि थोडे दूर सोफ्यावर बसून काम करणे यामुळे शक्य होते.

जुन्या फोन्सच्या चार्जरच्या वायर्स जोडल्याने ३-४ मिटर लांब वायर तयार झाली असेल आणि तेवढी तुम्हाला करता आली यातून उपयुक्त वस्तू निर्माण झाली. त्यावेळच्या फोन बॅटऱ्या ८५० -१४५० एमएएच असत.
सध्याच्या स्मार्टफोनच्या बॅटऱ्या २००० - ४००० असतात आणि चार्जिंगसाठी युएसबी सॅाकेट -पिन असणारी पिन लागते. या वायरी एकदीड मिटर लांब असतात पण जोडल्या की फोन लवकर चार्ज होत नाही.
सध्या एक चाइनिज युएएसबी-२ एक्सटेन्शन वायर ( एका टोकास युएसबी-बी सॅाकेट आणि दुसऱ्या टोकास युएसबी -बी पिन असते) घेऊन त्यास चार्जरची वायर ( युएसबी बी पिन , माइक्रोयुएसबी पिन ) जोडून बघतो आहे. यामध्ये फक्त बाजारात मिळणाऱ्या दोन वायरस कनेक्ट करणे एवढेच काम आहे.
सर्व रिझल्टस वायरच्या क्वालटीवरच अवलंबून आहेत.

माझा फोन नव्या काळातील स्मार्ट फोनच आहे. त्याच्याबरोबर यूएसबी वाला चार्जर आला आहे पण वायरची लांबी कमी असल्याने मी वापरात नाही. त्याऐवजी सॅमसंग च्या स्टोअर मधून ट्रॅव्हल चार्जर घेतले होते. त्याची एकाची लांबी सुध्दा भरपूर असते. दोन जोडून जवळ जवळ 2 मीटर आहे. चार्जिंग व्यवस्थित होते.

माझा फोन नव्या काळातील स्मार्ट फोनच आहे. त्याच्याबरोबर यूएसबी वाला चार्जर आला आहे पण वायरची लांबी कमी असल्याने मी वापरात नाही. त्याऐवजी सॅमसंग च्या स्टोअर मधून ट्रॅव्हल चार्जर घेतले होते. त्याची एकाची लांबी सुध्दा भरपूर असते. दोन जोडून जवळ जवळ 2 मीटर आहे. चार्जिंग व्यवस्थित होते.

माझा फोन नव्या काळातील स्मार्ट फोनच आहे. त्याच्याबरोबर यूएसबी वाला चार्जर आला आहे पण वायरची लांबी कमी असल्याने मी वापरात नाही. त्याऐवजी सॅमसंग च्या स्टोअर मधून ट्रॅव्हल चार्जर घेतले होते. त्याची एकाची लांबी सुध्दा भरपूर असते. दोन जोडून जवळ जवळ 2 मीटर आहे. चार्जिंग व्यवस्थित होते.

माझा फोन नव्या काळातील स्मार्ट फोनच आहे. त्याच्याबरोबर यूएसबी वाला चार्जर आला आहे पण वायरची लांबी कमी असल्याने मी वापरात नाही. त्याऐवजी सॅमसंग च्या स्टोअर मधून ट्रॅव्हल चार्जर घेतले होते. त्याची एकाची लांबी सुध्दा भरपूर असते. दोन जोडून जवळ जवळ 2 मीटर आहे. चार्जिंग व्यवस्थित होते.

ट्रम्प's picture

12 Feb 2019 - 6:00 pm | ट्रम्प

तब्बल 8 मीटर वायर झाली हो = )

कंजूस's picture

22 Jan 2019 - 12:51 pm | कंजूस

फोटो अपलोड --
>>>मिपावर फोटो डायरेक्ट चढवायला काही तांत्रिक अडचणी आहेत का?>>

मिपाने वाढीव मेमरी घेतलेली नाही.

( #मायबोलीने घेतली आहे अमेझोनकडून विकत )

मी आतापर्यंत विविध प्रकारच्या बऱ्याच केबल वापरल्या, परंतु त्या ३ महिन्यांच्या वर टिकत नाहीत. फक्त OEM ने दिलेल्या केबल काही महिने टिकल्या. मिक्रो यूएसबी कनेक्टरची गुगणवत्ताही चांगली नसते. त्यावर उपाय म्हणून मी स्वतःच केबल बनवली, जी मी कधीही पुन्हा दुरुस्त करू शकतो. अर्थात त्यासाठी तुम्हाला सोल्डरिंग करता आलं पाहिजे. अलिएक्सप्रेस.कॉम या संकेतस्थळावर असे कनेक्टर खूप कमी किमतीत मिळतात.
यासाठी म्हणून गाड्यांच्या स्पीकरना वापरली जाणारी वायर मी वापरली. त्यात तांब्याच्या तारांचे प्रमाण जास्त असून वरील आवरण पातळ आहे. कनेक्टरच्या छोट्या आकारामुळे वायरचा एकूण घेर कमी असणे गरजेचे असते.

मी वापरलेल्या काही चांगल्या गुणवत्तेच्या कनेक्टरची लिंक खालीलप्रमाणे.

मिक्रो युएस्बि https://www.aliexpress.com/item/10PCS-DIY-Micro-USB-Male-Plug-Connectors...

युएस बि - https://www.aliexpress.com/item/10pcs-Type-A-Male-USB-4-Pin-Plug-Socket-...

कंजूस's picture

29 Jan 2019 - 12:27 pm | कंजूस

आठ फुट वायर हवी आहे आणि त्याचा वोल्टेज ड्रॅाप मीटर वापरून ( ५ >> ४.५ वगैरे ) मोजता आला तर काम सोपे होईल. सोल्डरिंग करणे अडचण नाही. आणि मोबाइलचे पार्ट्स विकणारी दुकाने आमच्याकडे चार झाली आहेत. प्रत्येक शहरांत होणार.