चॅनलचं पॅकेज! हे काय नवीन?

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
11 Dec 2018 - 5:50 pm

सध्या टिव्हीवर वारंवार दाखवतायत की १ जानेवारीपासून आपल्याला हवे ते चॅनेल पॅकेज निवडता येणारेत.जे पॅक निवडू तेवढ्याचेच पैसे द्यायची सोय आहे.त्यासाठी १९ डिसेंबरच्या आत पॅकेज निवडायचेत.चॅनलच्या दरांचीही माहिती प्रत्येक चॅनल देतंय.उदा.झी मराठी १९ रु.सोनी मराठी ९ रु. इ.

हा नेमका काय प्रकार आहे?यामुळे सेट टॉप ग्राहकांचे फायदे/तोटे कोणते होणार?हे केल्यामुळे सदर सेवा पुरवणार्‍या कंपन्यांचे फायदे/तोटे कोणते होणारेयत?

कृपया याबद्दल कोणाला माहिती असेल तर सांगा! _/\_

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

27 Jan 2019 - 7:19 pm | धर्मराजमुटके

ते आहेच पण प्रश्न आहे की हे यापुढेही चालू शकेल की नाही ? की त्यासाठी १५३ रुपये मोजावे लागणार ?

फ्री टु एअर डिशला मासिक भाडे नसते.

सतिश गावडे's picture

27 Jan 2019 - 8:56 pm | सतिश गावडे

तरीही नामांकित कंपन्या ग्राहकाचा बॅलन्स संपल्यानंतर सेवा बंद करतात त्यात फ्री टू एयर ही बंद होते. त्यामुळे ब्रँडेड डिशवर फ्री टू एयर खर्‍या अर्थाने नसतेच.

तुषार काळभोर's picture

27 Jan 2019 - 9:06 pm | तुषार काळभोर

माझी स्मरणशक्ती धोका देत नसेल तर, डिशटीव्ही नवीन असतानाच्या काळात २००८/०९ मध्ये रिचार्ज संपल्यावर पेड वाहिन्या बंद होत आणि दूरदर्शन इत्यादी वाहिन्या चालू राहत.नंतर ते पूर्ण बंद करायला लागले.

कंजूस's picture

27 Jan 2019 - 9:20 pm | कंजूस

थोडे शंका निरसन -

सरकारी फ्री डिश हा प्रकार वेगळा आहे. त्यांच्या सटेलाइटवर जे कोणते चानेलस असतील ते फ्रिच मिळतात. त्यात बदल नाही. (रेडिओवर एफेम, मिडिअम वेव लावतो फ्री तसं.) मागच्या वर्षी झी चोवीस तासही होता. आता नाहीये.

डिशटिवी वाल्यांचा सॅटेलाइट हा फ्रीडिशचाच आहे. त्यामुळे त्याच वायरवर फ्रिडिश डबाही चालतो पण डिशटिवीचे पेड चानेल्स लॅाक्ट दाखवतात.

इतर टाटास्काइ, विडिओकॅान, रिलाअन्स, सन, यांचे वेगळे सटेलाइट आहेत. त्यांच्या सटेलाइटवर काही फ्रीटुएर चानेल्स असतील तर ( दोनतीन असतात) ते फ्रीडिशचा डबा त्या वायरला लावल्यावर दिसू शकतात. पण नव्या प्रकारचा एमपीइजी ४ सक्शम डबा हवा. अर्थात ते चानेल फारसे कामाचे नसतात.

ज्यांना जुने हिंदी/इतर भाषेचे चित्रपट पाहायला आवडतात त्यांना मात्र फ्री डिश उपयुक्त आहे.

आता पेड सर्विसवालेही सरकारी फ्रीटुएर चानेल्स रीडिरेक्ट करून दाखवतात पण पण पण तेसुद्धा १५३ रु भरले नाहीत तर दिसत नाहीत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2019 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

"१७०० रुपयांत डिश, एचडी-डबा, एक महिन्याची फ्री सर्वीस, इत्यादी सर्व देऊ" असे टाटास्कायने फोनवर सांगीतले. ही किंमत योग्य आहे का?

तसेही, मला ४०-५० पेक्षा जास्त चॅनल नको असल्याने, सर्वीस १ फेबपासून (चार दिवसांत) रु १५३ होणार आहेच.

डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात रेकॅार्डिंग होत नाही. याच किंमतीत डिशटिविचा एचडीनेक्स्ट डबा मिळतो त्यात पेनड्राइव लावून रेकॅार्डिंग करता येते.

२०१६ साली केबलवाल्यांना डिजिटल बॅाक्स लावण्याचे बंधन घातले होते तेव्हा त्या गिर्हाइकांना खेचण्यासाठी डिटिएच ओपरेटरांनी किंमती अर्ध्यावर आणल्या होत्या (७०० वरून ४०० , तर विडिओकॅान २६० !)

तर गिऱ्हाइकाचा हक्क मिळवण्याच्या खटपटीत लोकांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2019 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

डॅाक, या टाटास्काइच्या डब्यात रेकॅार्डिंग होत नाही.

बरोबर. ती सोय असलेल्या डब्याची किंमत जास्त आहे. पण, किमतीपेक्षाही महत्वाचा मुद्दा म्हणजे (पूर्वी वेळ सेट करून रेकॉर्डिंग करण्यासाठी असलेले व्हिडीओ रेकॉर्डर्स वापरतानाही) आजतागायत एकदाही टीव्ही प्रोग्रॅम रेकॉर्डिंग करून बघितलेला नाही. त्यामुळे ती सोय आमच्या घरात वापरली जाणार नाही याची खात्री आहे. :)

चौथा कोनाडा's picture

4 Feb 2019 - 5:47 pm | चौथा कोनाडा

डॉ साहेब,

टाटा स्काय की इतर काही? काय घ्यावे?

इथं कोणतं बरं आहे यावर मस्त लेटेस्ट उपयुक्त चर्चा आहे.
( वाचली असेल तर सोडून द्या)

शेतीविषयक कार्यक्रम असणारे डीडी_ मलयालम, किसान,नॅार्थ इस्ट, पोधगायी,चंदना, वगैरे कामाचे आहेत.

चौथा कोनाडा's picture

4 Feb 2019 - 5:36 pm | चौथा कोनाडा

टाटा स्काय :
एक फ़ेब्रु २०१९ पासून मी निवडलेले चॅनेल्स टाटा स्कायने दाखवायला सुरुवात केलिय.
फ़ारसा अभ्यास न करता साध्या ठोकताळ्याने त्यांच्या वेबसाईटव्र मराठी+फुकट चॅनेल्स निवडून सबक्राइब केले. त्याचे आता २०७ रू प्रति महिना पडतील. आधी अर्धवार्षिक धमाल फॅमिली मिक्स रू ३२० प्रति महिना असा पॅक होता. दोन तीन महिने हे वापरून आणखी गरजांनुसार नविन पॅक करीन.

बिन कामाचे चॅनेल्स पाहिले जाणार नाहीत व सध्या पैसे वाचताहेत हे बरेय.
मिपाकरांनो, तुमचा काय अनुभव ?

>>>मराठी+फुकट चॅनेल्स निवडून सबक्राइब केले. त्याचे आता २०७ रू>>

हेच मराठी सर्व अधिक डीडी +पंजाबी/बंगाली/तेलुगु/मलयालम/तमिळ जवळपास प्रत्येकी चाळीस चानेल्स टाटा स्काइ १३९(९९+४०) मध्ये देत
होती ते आम्ही एका टिविवर पाहात होतो.

चौथा कोनाडा's picture

6 Feb 2019 - 5:24 pm | चौथा कोनाडा

कंजूस साहेब, तुम्हि म्हणाताय ती विविध भाषी फ़ुकट दिसताहेत ना, त्याच किमंतीत रू २०७ मध्ये.  

टाटा स्काइचा रेकॅार्डिंगचा डब्बा ( यात ५००जिबी स्टोरिज असते ते फक्त त्यासाठीच वापरता येते) २०१२ साली अडिच हजारात देत होते. थोडा उशिर केला तर साडेचार हजार केले. आता साडे नउहजार.
मग डिशटिवीचा पेनड्राइव रेकॉर्ड सोयवाला डबा ७५०रु (अधिक डिश) मिळत होता तो घेतला.
दुकानदाराने सांगितले की यास कित्येक लोकांनी हार्डडिस्कच जोडली आहे. पिच्चर रेकॅार्ड करतात.
आमचा उद्देश - पाककृती वगैरे पुन्हा पाहणे, पाहुणे आले, फोन आला तर रेकॅार्ड करणे व नंतर पाहून दुसरे दिवशी डिलिट करणे॥ तसेच महा कार्यक्रम रेकॅाड केल्यास नंतर फास्ट फा जाहिराती ढकलून पाहाणे. यासाठी एक १६जिबी पेनड्राइव पुरते.

प्रसाद_१९८२'s picture

4 Feb 2019 - 8:36 pm | प्रसाद_१९८२

आमच्या कडे Den Set top Box आहे.
--
ह्यात डिस्कवरी, एनजी, हिस्ट्री१८ अश्या मल्टिलॅंग्वेज चॅनेलवरिल एकादा प्रोग्राम (आपण तो प्रोग्राम हिंदीभाषेत पाहात/ऐकत असूनही) रेकॉर्ड केल्यास, उपलब्ध सर्व भाषेतील आवाज रेकॉर्ड होतात व नंतर ते प्रोग्राम परत पाहाताना त्या सर्व भाषेतील आवाज बरोबरच सुरु होतात.(डिस्कवरी भारतात, इंग्रजी, हिंदी, तमिळ व तेलगु भाषेत उपलब्ध आहे) ह्यावर काही इलाज ?

डेनच्या सर्वच केबल ओपरेटरांनी रेकॅार्डींगवाले बॅाक्स दिले नाहीत. उल्हासनगरात कुणाकुणाकडे आहेत.
--
सेट टॅाप बॅाक्स हे चारएकशे रुपयाची वस्तू ओपरेटर लोक बारापंधराशेला गळ्यात मारतात. दुसरीकडून आणलेला बॅाक्स चालत नाही कारण ती की(अनलॅाक,कनेक्ट) आपल्या एअरियातल्या माणसाकडूनच घ्यावी लागते.
बॅाक्सचे सॅाफ्टवेर रिपेर वगैरे काही नाही दुसरा घ्यायला लावतील.

समीरसूर's picture

7 Feb 2019 - 4:11 pm | समीरसूर

या योजनेनुसार पैसे जास्त भरावे लागणार आहेत. मला सध्या ३०० रुपयात मला हवी ती चॅनल्स दिसतात. तिच मी नव्या दरपत्रकानुसार तपासली तर साधारण ४५० रुपयापर्यंत जातात. ३०० रुपयांत मला हव्या त्या २०-२५ चॅनल्सव्यतिरिक्त बाकीची बरीच चॅनल्सदेखील मिळतात. ४५० मध्ये ती असणार नाहीत. शिवाय यावर १८% जीएसटी लागणार तो वेगळा.

एक-दोन वर्षांनी असला फालतूपणा येतच असतो...नसता डोक्याला ताप! असे ऐकीवात आहे की रिलायन्स या क्षेत्रात उतरणार आहे. म्हणून बाकी केबलसेवा महाग करण्याच्या दृष्टीने ट्रायने उचललेले हे पाऊल आहे. मग ५००-६०० खर्च करण्यापेक्षा ग्राहक आपसूकच रिलायन्स जिओच्या २००-३०० रुपयांच्या (किंवा फुकट) किफायतशीर पॅकेजेसकडे वळतील.

डिटिएचवाल्यांना महिना भाडे र१३० घेण्याची परवानगी दिली आहे.
रिलाअन्स नेट सर्विस ओवरदएर आणि केबलमधून देणार आहे त्यातून दिसणारे चानेल पाहता येतील. पण महिना भाडे नेट देण्याचे आहे.

एबीपी माझा(०.५०) उद्यापासून फ्रीटुएर होणार असं सांगत आहेत.
झी २४ तास (०.१०) आहे.
हे दोन जर फ्री डिशवर आले तर झकास होईल. पेड डिशवर फ्री केले काय अन नाही काय फरक पडणारे पन्नास पैशांनी?

आमच्याकडे केबलचालक च्यानल निवडायला येऊन सांगून गेले, सोबत 5-6 फॉर्म्स दिलेत, एक सेट आहे पॅकेज घ्यायचे असेल तर, एक सेट आहे वेगवेगळी च्यानल घ्यायची असल्यास आणि एक अजून काहीतरी ऑप्शन आहे. आम्ही निवडून ठेवलेत.

अजून काही फॉर्म्स गोळा करायला आले नाहीयेत, आधी जसे सुरू होते, तसे सर्व प्रक्षेपण सुखेनैव सुरू आहे.

ह्याची अंमल बजावणी कधीपासून होणार होती/ आहे?

तुषार काळभोर's picture

7 Feb 2019 - 5:15 pm | तुषार काळभोर

माझं चॅनल सिलेक्शन राहून गेलं. मग एक तारखेला सगळं चालू राहिलं. मग म्हटलं बघू, बंद पडलं तर ।..

4 ला सकाळी एकपण मराठी चॅनल दिसेना.
पाचला पण तसंच.

सहाला गप सगळं चालू झालं :D

बघू आता बंद पडल्यावर.

तोपर्यंत थोडं थोडं रिचार्ज करायचं.

उपयोजक's picture

14 Feb 2019 - 12:28 pm | उपयोजक

त्रास संपेना
p1

यशोधरा's picture

14 Feb 2019 - 12:41 pm | यशोधरा

हो, आमच्याकडेही गोंधळ आहे. मागची पोस्ट, सगळी च्यानेले व्यवस्थित सुरू आहेत म्हटल्याच्या दुसऱ्या दिवशी बंद पडली! केबालावाल्याला फोन केल्यावर पटापटा फॉर्म घेऊन गेला आणि मग आता जी सांगितली होती, त्यापैकी काहीच सुरू झाली आहेत. आता पुन्हा एकदा फोन करायला लागेल! तरी मराठी वाहिन्या सुरू झाल्या आहेत म्हणून बरं! नाहीतर ज्ये ना चिडले असते! =))

आणि आता काल बातमी, अजून मार्चपर्यंत वेळ दिलाय म्हणे. म्हणजे मार्च पर्यंत खरं तर सगळ्या वाहिन्या सुरू असायला हव्यात ना?

मार्च पर्यंत खरं तर सगळ्या वाहिन्या सुरू असायला हव्यात ना?

हो, मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवली आहे.

TRAI extended TV Channels Selection date to 31 March 2019

ट्रायच्या या आदेशा नुसार तुम्ही केबलावाल्याक्डे पहिली पॅकेजस होती तशी हवी म्हणून आग्रह धरू शकता.
फॉर्म बिर्म भरलेला कॅन्सल समज असं स्प्षट सांगायचं

यशोधरा's picture

14 Feb 2019 - 3:15 pm | यशोधरा

ओके, धन्यवाद. बोलते त्याच्याशी.

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2019 - 5:58 pm | चौथा कोनाडा

आणखी ..... हे कायप्पा वर आलेलं ढकलपत्रः

केबल किंवा डिश टीव्हीचे महिन्याचे पैसे कसे कमी करता येतील याची माहिती.

आता मी पहिला उपाय सांगणार आहे तो तुमचा प्रतिमाहिना कमीतकमी ₹ 20+ GST अशी 23.6 ₹ एवढी रक्कम वाचविण्याचा.

तर आता ₹130+GST असे मिळून 154 रुपयात 100 फ्री चॅनेल मिळणार आहेत. लक्षात घ्या की 130 ₹ ही 100 फ्री चॅनेल्सची फी नसून 100 इतक्या नेटवर्क कॅपॅसिटीची फी आहे. एक SD चॅनेल घेतला की एक नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरला जातो. आणि एक HD चॅनेल घेतला की दोन नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरतात.

जर आपण 100 फ्री SD चॅनल घेतले तर आपले हे 100 स्लॉट भरतील. 100 नेटवर्क कॅपॅसिटी स्लॉट भरले की अजून चॅनेल पाहण्यासाठी पुन्हा 20 ₹ देऊन 25 स्लॉट विकत घ्यावे लागतील, तेही भरले की पुढच्या प्रत्येक 25 स्लॉट्ससाठी 20 ₹ द्यावे लागतील. हे अधिकचे 20 ₹ हे चॅनेल्सच्या वैयक्तिक किंवा पॅकच्या किंमतीच्या व्यतिरिक्त आहेत.

म्हणजे समजा तुम्ही 100 फ्री SD चॅनेल घेतले, आणि प्रत्येकी 5 ₹ किंमतीचे 25 पेड SD चॅनेल घेतले आणि प्रत्येकी 10 ₹ चे 10 HD चॅनेल्स घेतले तर तुम्हाला एकूण स्लॉट्स लागतील फ्री चॅनेल्सचे 100 + SD पेड चॅनेल्सचे 25 + HD चे प्रत्येकी 2 म्हणजे 20, असे टोटल 145.
म्हणजे तुम्हाला एकूण नेटवर्क कॅपॅसिटी फी ही 145 चॅनेल्ससाठी भरावी लागेल, जी वर सांगितल्याप्रमाणे 130+20+20+GST
अशी एकूण 200 ₹ इतकी होईल. याउपर परत चॅनेल्सच्या किंमती म्हणजे 25 पेड SD चॅनेल्स साठी 25 x 5= 125, तर 10 पेड HD चॅनेल्ससाठी 10 x 10= 100 असे 125+100=225+GST म्हणजे 265₹ भरावे लागतील.
म्हणजे तुमचे एकूण बिल होईल, नेटवर्क कॅपॅसिटी फीचे 200 + पेड चॅनेल्सचे 265 = 465 ₹ इतके.

आपण स्वतः तर 20 पेक्षा अधिक चॅनेल्स बघत नाही. ते सर्व पेड चॅनेल आहेत, मग मी काय करावे?
तर 130 मध्ये जे 100 फ्री चॅनेल मिळतात ते सर्व घेण्याची सक्ती नाही. त्यातील दूरदर्शनचे 25 फ्री चॅनेल घेण्याची मात्र सक्ती आहे.
मग दूरदर्शनचे 25 चॅनेल गेले की आपल्याकडे उरतात 75 फ्री स्लॉट्स. यात आपण फ्री असलेल्या चॅनल्सपैकी आपण बघत असलेले फक्त 25 चॅनेल निवडायचे, कारण इतर बहुतांश चॅनेल्स हे वेगवेगळ्या भाषांचे असतात, ते चॅनेल आपण घ्यायची गरज नाही. असे केल्यावर आपले एकूण 50 स्लॉट खर्च होतात आणि 50 उरतात.
आपण जे 25 पेड SD चॅनेल घेणार आहोत ते आता आपण याच उरलेल्या 50 पैकी 25 स्लॉट्समध्ये भरू शकू. यामुळे आपल्याला 20₹ देऊन अधिकचे 25 स्लॉट घेण्याची गरज नाही. आता अजूनही आपल्याकडे 25 फ्री स्लॉट उपलब्ध असतील. त्यात आपण जे 10 HD चॅनेल घेणार आहोत त्याचे प्रत्येकी 2 म्हणजे 20 स्लॉट खर्च झाले तरी आपल्याकडे 100 पैकी 5 स्लॉट उरतीलच. आणि

अशाप्रकारे सगळे 100 फ्री चॅनेल्स न घेता, फक्त आपल्याला पाहिजेत तेवढेच घेऊन आपण पुढील नेटवर्क कॅपॅसिटीचे जवळजवळ 47₹ प्रति महीना वाचवू शकतो. म्हणून सर्व्हिस प्रोवायडर्स देत असलेले सगळे 100 फ्री चॅनेल घेऊ नका, मोजकेच घेऊन, आपले इतर नेटवर्क स्लॉट्स हे पेड चॅनेल्ससाठी वापरा आणि पैसे वाचवा.
या व्यतिरिक्तही सिंगल पेड चॅनेल्स किंवा चॅनेल पॅक्स नीट पाहून निवडले तर आताच्या स्थितीतही बिल खूप कमी होऊ शकते. मी 20 फ्री, 10 पेड, 2 पेड पॅक्स मधले 15 आणि 5 HD असे 45 चॅनेल्स म्हणजे 50 स्लॉट्स अधिक दूरदर्शनचे 25 असे फक्त 75 स्लॉट्स खर्चून बिल GSTसहीत 240₹ इतकेच येईल अशी चॅनेल्सची निवड केली आहे.

यातही पुढे तीन महिन्यात सर्व ब्रॉडकास्टर्सला सब्स्क्रायबर्स कमी झाल्याने चॅनेल्सच्या किंमती कमी कराव्याच लागतील असा TRAI चा अंदाज आहे. असे झाले तर बिल 200च्या आसपास सुद्धा येऊ शकेल.

तुम्हीही असेच थोडे डोके लढवून आपले बिल कमी करा. उगीच कधी ढुंकूनही बघत नसलेले चॅनेल्स घेऊन ब्रॉडकास्टर आणि सर्व्हिस प्रोवायडर्सचे खिसे आपल्या मेहनतीच्या पैशांनी भरू नका.

*जागो ग्राहक जागो.*

...... एक चिकित्सक ग्राहक

मला वाटतं मा़झे दर महिना बील या मुळेच कमी झालेय (फ़ारसा अभ्यास न करता साध्या ठोकताळ्याने त्यांच्या वेबसाईटव्र मराठी+फुकट चॅनेल्स निवडून सबक्राइब केले होते . त्याचे आता २०७ रू प्रति महिना पडतील. आधी अर्धवार्षिक धमाल फॅमिली मिक्स रू ३२० प्रति महिना असा पॅक होता )

आता बघू आणखी काही काढता येतात का .

यशोधरा's picture

14 Feb 2019 - 6:06 pm | यशोधरा

काय ढम्म समजले नाही, आणि थोड्या वेळाने नुसतेच 25, 20, 75 ,100 असे आकडे आलटून पालटून दिसत राहिले!! =))

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2019 - 3:55 pm | चौथा कोनाडा

नुसतेच 25, 20, 75 ,100 असे आकडे आलटून पालटून दिसत राहिले!!

ते उदाहरण म्हणून दाखवलेयत. दुर्लक्ष करू शकता.

एकंदरीत :
१) सर्व फ़्री चॅनेल्स घ्यायला पाहिजेतच असे नाही. हे कमी घेतल्यास / केल्यास जे पैसे वाचतील (नेटवर्क कॅपॅसिटीची फी) त्यात आपल्याला हवे असलेले मोजके एचडी चॅनेल्स बघता येतील.

२) आपल्याला पाहिजेत तेव्हढेच चॅनेल्स घ्या. अगदी मोजके म्हंजे मोजकेच.

३) जेव्हढे चॅनेल्स आता आहेत / होते ते पहायला वेळ तरी आहे/ होता का? बघा, विचार करून ठरवा.

४) जे कधीतरी बघितले जाणार आहेत त्याचे पैसे उगाच नियमितपणे का भरायचे अन महाग महाग म्हणून करवादायचे?

उपेक्षित's picture

14 Feb 2019 - 6:41 pm | उपेक्षित

http://jiotvweb.live/airtelTV/#

सध्या या जिओ च्या लिंकवर बरेचसे Channel फुकट पाहायला मिळत आहेत (अगदी HD) सुद्धा.

अग्निवेश गिरीश भोसले's picture

20 May 2020 - 9:27 am | अग्निवेश गिरीश भोसले

मी अजून संसुई चा 2003 चा मॉडेल वापरतो,त्यावर dd न्युज आणि dd सह्याद्री हे दोनच चॅनेल लागतात,बाकी मी झी 5 चे सबस्क्रिपशन घेतले आहे,600 रुपये प्रती वर्ष आणि 5 मोबाईलवर ते बघता येते sign इन करून,म्हणजे वर्षाला 120 रुपये प्रत्येकी,पाहिजे तेव्हा बघितले, पाहिजे तेव्हा बंद केले

वाटसप मेसेज भंपकगिरी असते. कोणी पाठवले काय पत्ता लागत नाही.

केबलवाल्यांचे पितळ उघडे पडले आहे. ग्राहक किती हे पुर्वी लपवत होते. स्थानीक वजनदार लोक केबलवाल्याकडून फुकट सर्वीस मिळवत असतात.
(( रस्त्यावर चुकीच्या तारखेला चुकीच्या ठिकाणी वगैरे पार्किंग केलेल्या टु विलरस उचलून नेल्या पण एक तशीच ठेवली.
"ती केबलवाल्याची आहे , नेणार नाही" हे दुकानदार बोलला. अशा बऱ्याच भानगडी असतात.))
डिशटिवीचे प्याकेज डिशटिवी_डॅाट_इन साइटवर आहे. चानेल सिलेक्ट करून सबमिट केल्यावर मेसेज आला आणि टिविवर लगेच नवीन निवड दिसायलाही लागली.

ट्राइच्याबरोबर बोलणी करून डिटीएच वाल्यांनी फी वाढवून घेतली. ती पुर्वी टॅक्स धरून १०० रु होती ती १५३ झाली याचा अर्थ जुनेच सर्व चानेलस घेतलेत तर साठ-सत्तर रुपये अधिक द्यावे लागणार. पण या सर्व गोष्टींत ग्राहक ते डिटीएच कंपनी असा पारदर्शक व्यवहार असल्यास काम सोपे होते. केबलवाले हे मध्यस्थ म्हणजे गोंधळच.