विधानसभा निवडणूक 2018 निकाल (मप्र,राजस्थान, छग, मिझोरम, तेलंगणा)

महासंग्राम's picture
महासंग्राम in राजकारण
11 Dec 2018 - 12:16 pm

सर्वशक्तिशाली औटघटकेच्या मतदार राजास्नी रामराम,

सध्या लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या राज्यांचे निवडणूक निकाल हाती येत आहेत. सध्यच्या कलानुसार काँग्रेसने मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ हि ०३ भाजपशासित राज्ये जवळजवळ हिसकावून घेतली जाण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पण पानिपत झाल्यात जमा आहे.

  • ०३ महत्वाची पूर्ण बहुमत असलेली राज्य निसटून जाण्यामागे कारणं काय असू शकतील ?
  • याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का ? कि नेहमी प्रमाणे दुसऱ्याच मुद्द्याद्वारें लोकसभा लढवली जाईल ?
  • या विजयामुळे संजीवनी मिळेलेली काँग्रेस या यशाचा भविष्यात कश्याप्रकारे लाभ घेऊ शकेल ?

प्रतिक्रिया

विशुमित's picture

12 Dec 2018 - 12:16 pm | विशुमित

हायला हे तर ते 'अच्छे दिन आयेंगे' च्या वरची हाइट झाली.
पण यात किमान आकडा तरी माहित आहे. अच्छे दिन मधे ती सोय नव्हती. (15 लाख तर जुंमला होता हे तर दस्तुरखुद प्रदेश अध्यक्षानी मागेच डिक्लर केले होते)

अभ्या..'s picture

12 Dec 2018 - 12:53 pm | अभ्या..

बाकी काई का असेना गरीबी हटाव, कॉंग्रेस हटाव, इंदिरा हटाव, दलदल हटाव, अबकी बार असल्या अजेंड्यापेक्षा "अच्छे दिन आयेंगे" सारख्या सर्वसमावेशक, मल्टीयुज आणि मोस्ट पोकळ घोषणेसाठी सगळ्या पक्षांनी आणि जनतेने पण मोदीकाकांचे आभारी असले पाहिजे.
उद्या कोणीही अगदी राहुल गांधी सुध्दा हिच ट्यागलाईन वापरुन जनतेला अश्वारोहण करायला तयार करणार हे निश्चित.
कसले अच्छे, काय अच्छे, किती अच्छे, कधी अच्छे हे ज्येचं तेनं ठरवून घ्यायचं.

ह्या 3 राज्यातील जनतेचे अच्छे दिन जानेवाले है!

सुबोध खरे's picture

12 Dec 2018 - 7:21 pm | सुबोध खरे

एक त्रिकाल अबाधित सत्य -- "अच्छे दिन" कधी ही येत नाहीत.

याचे कारण एकदा "अच्छे दिन" आले कि त्याचे नावीन्य संपून जाते आणि तो "हक्क" होतो.

कितीही काही दिले तरी श्रमिक वर्गाची पिळवणूक हे पालुपद संपत नाही.

जेंव्हा तुम्ही तुमच्या मोलकरणीचा पगार ८०० चा १००० करता तेंव्हा पुढच्या महिन्यात तुमची नोकरी गेली तरी तो पगार परत ८०० रुपये होत नाही.
किंवा या वर्षी तुम्ही बोनस दिलात कि पुढच्या वर्षी पगार भरपूर वाढवला तरी बोनस हा द्यावाच लागतो कारण तो हक्क झालेला असतो.

याप्रमाणेच सरकारने जन्म दरिद्री माणसाला फुकट घर दिले, फुकट गॅस सिलिंडर दिला किंवा शौचालयासाठी सबसिडी दिली कि पुढच्या वेळेस तो त्याचा हक्क होतो आणि जो कोणी अधिक देण्याचे, कर्जमाफीचे आश्वासन देतो तोच माणूस जास्त चांगला ठरतो.

माझ्या मुलाला मी हि गोष्ट समजावताना एकच सांगितलॆ कि उद्या तू व्यवसाय सुरु करशील तेंव्हा हि फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची कि उत्तम काम केले तर कर्मचाऱ्याला २०० रुपये पगारवाढ न देता एकदम घसघशीत १००० रुपये बक्षीस द्यायचे.

कारण पुढच्या ६ महिन्यात पगारवाढ हा हक्क होऊन जातो आणि कर्मचाऱ्याला त्यात काय एवढे मी हुशार म्हणून पगारवाढ दिली असे वाटू लागते.

पण १००० रुपये बक्षीस हे चांगल्या कामाचा मोबदला असतो आणि त्याने परत चांगले काम केले "तर आणि तरच" तुम्ही त्याला देणे लागता.

ता. क.- याचा राजकारणाशी संबंध नाही.

प्रमोद देर्देकर's picture

13 Dec 2018 - 9:37 am | प्रमोद देर्देकर

1000% सहमत डॉ साहेब.

मोदी सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार?, पराभवानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता...

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे हादरलेल्या मोदी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे तब्बल ४ लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

तेजस आठवले's picture

13 Dec 2018 - 4:14 pm | तेजस आठवले

दहशतवादी हल्ले ह्याचे अत्यंत दुर्दैवी उदाहरण ठरू नयेत. गेल्या चार वर्षांत दहशतवाद्यांचे हल्ले, बाँबस्फोट ह्यांचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. हा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्लक्षित करण्यासारखा नाही.

ट्रम्प's picture

14 Dec 2018 - 4:48 pm | ट्रम्प

मिपावरिल ( माझ्या सहित ) खोट्या आइडी च्या दुनियेत फक्त ' खरे ' सारखे खरे खुप कमी आहेत ,जे मुखवटे घालून वैयक्तिक हल्ले करत नाहीत .

दहा दिवसात कर्ज माफ होणार आहे.

https://www.facebook.com/DhongiAamAadmiParty/videos/2161436194118963/

आजानुकर्ण's picture

12 Dec 2018 - 9:03 am | आजानुकर्ण

खूप आनंद झाला. खास लॉगिन करुन प्रतिसाद देतोय.

भाजपाचा पराभव का झाला ते इथलेच काही - हरल्यावर आता मतदारांचीच लायकी काढणारे - प्रतिसाद वाचून लगेच लक्षात येते. किती माज! शेवटी मुस्काटात बसली!! आता तरी जागे व्हा.

बाकी काय म्हणता प्रा. डॉ. साहेब.

स्वधर्म's picture

12 Dec 2018 - 12:42 pm | स्वधर्म

‘काय करू नये, हे मोदींकडून शिकलो’ अशी अाहे. बाकी कोणी काही का म्हणेना, रागा थोडेफार शिकत अाहेत.

रागा'ने निवडणूक निकालानंतरची दिलेली प्रतिक्रिया बर्यापैकी सयंत होती.
ही खरी आपली भारतीय परंपरा आहे. विजयाने जास्त हवेत उडू नये.
....
अहंकारचा वारा न लागो राजसा... हा वारा लागला की जनतेने आपली ताकद दाखवलीच म्हणून समजा.

ट्रम्प's picture

12 Dec 2018 - 3:37 pm | ट्रम्प

मतिमंद का फेकू अशा द्विधा मनःस्थितित सापडलेल्या मतदारानीं शेवटी सध्यातरी मतिमंदा च्या पारड्यात थोड़े जास्तच वजन टाकले आहे !!!!
पण काँ .च्या इतर नेत्यासारखे या मतिमंद मध्ये धडाडी , कर्तबगारी , वाक्चातुर्य , नियंत्रण व नेतृत्व कौशल्य ,आणि उच्च बुद्धिमत्ता नसल्यामुळे येड्या गबाळ्याला मुलगी दिलेल्या बापा सारखी अवस्था मतदारांची होणार .

महाराष्ट्रातील भाजपा चे विद्यामान खासदार , आमदार , नगरसेवक आणि गाव शहरातील भाजप कार्यकारणी मंडळ , सतत जनसंपर्क असणारे कार्यकर्ते आणि मिपासारख्या संस्थाळावरील स्वयंघोषित महात्मा मंडळीनीं अहंकार , जातिद्वेष बाजूला ठेवून सामान्य जनतेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न नाही केला तर अशाच निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ति होईल हे नक्की .

तेजस आठवले's picture

12 Dec 2018 - 3:53 pm | तेजस आठवले

तीन राज्यात काँग्रेस निवडून आल्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. भाजपाला हरवल्याची भावना एवढी तीव्र आहे की सात पूर्वोत्तर राज्यातले मिझोरम नावाचे सत्ता असलेले एकमेव राज्य काँग्रेसने गमावल्याचे दुःख फारसे टोचत नसावे.राजस्थानात भाजपचा पराभव होईल ह्याचा अंदाज खुद्द भाजपलाही नसावा असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल.मध्य प्रदेशात निम्म्याच्या जवळपास जागा मिळवल्याने ह्या पराभवाला दारुण म्हणता येऊ नये.

काही महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ह्या विजयाचा कितपत फायदा होईल ते आत्ताच सांगता येणार नाही. महागठबंधनमध्ये काँग्रेसचा क्षीण असलेला आवाज आता आत्मविश्वासपूर्ण होईल. पण पडद्यामागे काँग्रेस आणि मायावती ह्यांमध्ये काय बोलणी झाली आहेत ह्यावर बरेच काही अवलंबून आहे.मध्य प्रदेशात मायावतींच्या पाठिंब्यावर काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याच्या बातम्या आहेत. बहेनजी ह्याची किंमत पुरेपूर वसूल करतील.त्यामुळे बाकीचे सहभागी पक्ष साशंक राहतील. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार नाही असे मायावती जाहीर करून बसल्या असल्या तरी स्वतःचीच विधाने गिळणे त्यांना कठीण नाही. चार महिन्यातच चित्र स्पष्ट होईल.
ह्या विजयाचे श्रेय रागाला देण्याची चढाओढ आता सुरु होईल.जर ते खरंच बदलले असले, तर ह्या विजयाचा फायदा उचलण्यात काही अडचण येऊ नये. पण हुरळून जाऊन गाफील राहिले तर ते भाजपाला हवेच आहे.संसदेत कितीही राफेल राफेल आरडाओरडा केला, तरी फारसा काही प्रभाव पडेल असे वाटत नाही.तसंपण सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहेच.राफेल कराराबाबत सर्वोच्च न्यायालयाने देशहिताचा निर्णय दिला तर भाजप त्याचा फायदा घेईल.मधल्या काळात जर मल्ल्याला परत आणण्यात यश मिळाले, तर मोदींनी त्याला पळून जायला मदत केली हे बालंट परस्पर निकाली निघेल.आगामी चार महिन्यात मोदी काय खेळी करणार आहेत हे प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीच चित्र स्पष्ट होणार नाही.

लोकसभा आणि विधानसभा ह्या निवडणुकींमध्ये महदंतर आहे.

भाजपने आतातरी सावध होऊन पुढची पावले टाकायला हवीत.महागठबंधनचे नेतेपद काँग्रेसकडे, पर्यायाने राहुल गांधींकडे यावे ह्यासाठी काँग्रेसच काय भाजप पण पडद्याआडून प्रयत्न करण्याची शक्यता आहे.घराणेशाही हा भाजपच्या प्रचारातील एक मुद्दा आहे, त्याला ते सहाय्यकारकच ठरेल.ह्या तीन राज्यात जी आश्वासने काँग्रेस ने दिली होती, ती ते किती पूर्ण करू शकतात हा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.मोदी सरकारबद्दल नाराजी असल्याने काँग्रेसला निवडून दिले अशी भावना असेल तर काँग्रेस आश्वासने पूर्ण करू शकला नाही तर मतदार गोंधळात पडेल आणि गोंधळात असलेल्या, कुंपणावर बसलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यात भाजप माहीर आहे.
भाजपने प्रचारात विकासाचा मुद्दा सोडला होता हे खरे आहे आणि पराभवात त्याचा वाटा नक्कीच आहे. पण काँग्रेसच्या बाजूनेसुद्धा विकास हा मुद्दा फारसा लावून धरण्यात आला नव्हता असे मला वाटते.मोदी सरकारच्या चुका, जनतेबद्दलची नाराजी आणि मोदींवर केलेले आरोप ह्यांचा फायदा काँग्रेसने उचलला असला तरी तेच मुद्दे परत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरता येणार नाहीत.राफेलचा एकमेव मुद्दा मध्यला काळात जर निकालात निघाला तर वैयक्तिक आरोप करण्यावर मर्यादा येईल. आंतरराष्ट्रीय राजकारण, शेजारी राष्ट्रांशी संबंध, बेरोजगारी हे मुद्दे मला नीट हाताळता येऊ शकतील असा विश्वास रागांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून प्रगट झाला तर काँग्रेसला मतदारांच्या एका वर्गावर(मध्यमवर्गीय, लहान व्यावसायिक, व्हाईट कॉलर जॉब करणारे इ.) प्रभाव पाडता येईल.ते कितपत शक्य आहे ह्याची शंकाच आहे.

सर्व मते वैयक्तिक.

कानडाऊ योगेशु's picture

12 Dec 2018 - 5:27 pm | कानडाऊ योगेशु

विरोधी पक्षांनी एक चतुर खेळी खेळायला सुरवात केली आहे. मुद्दामुन जिथे तिथे गडकरींना हाईलाईट करणे मोदींऐवजी. राजतिलक कि करो तैयारी,आ रहे है नितीन गडकरी वगैरे मेसेज कायप्पावर फिरायला सुरवात झाली आहे. आतापर्यंत मोदींना पंतप्रधान पदासाठीचा एक स्थिर उमेदवार म्हणुन जाहीरात करणे हा भाजपचा एक प्लस पॉईंट होता पण इथेही मोदींना पक्षांतर्गतच प्रतिस्पर्धी लादुन भाजपची अवस्था बाकीच्या पक्षांसारखी करायचा डाव असु शकतो. येणारे चार महीने रा.गांनी जर व्यवस्थितपणे हाताळले तर परिस्थिती पूर्ण विरूध्द होऊ शकते मह्णजे विरोधी पक्षांकडे एक प्रमुख दावेदार आहे पंप्र पदासाठीचा व भाजपात संदिग्धता आहे ह्या अर्थाने. कुटील राजकारणी डावपेचांचा कस आता लागेल. काँग्रेसने जर ह्या निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे एखादी दुसरी प्रमुख मागणी जशी शेतकरी कर्जमाफी अंशतः जरी मान्य केली तर भाजपची अवस्था ह्या राज्यांतही अजुन बिकट होऊन जाईल.
२०१४ पूर्वी मोदींच्या बाबतीत विरोधी पक्षांनी केलेली नकारात्मक जाहीरात मोदींनाच फळभूत ठरली.आता ही गोष्ट रा.गांबाबत होऊ लागली आहे. जितक्यावेळा म्हणुन पप्पू म्हणुन आता हेटाळणी होईल तेव्हा तेव्हा त्यांची आपसूकच प्रसिध्दी होत राहील.

तेजस आठवले's picture

12 Dec 2018 - 6:09 pm | तेजस आठवले

+1

आनन्दा's picture

12 Dec 2018 - 7:16 pm | आनन्दा

https://www.misalpav.com/node/43740
इथे पण झालेय सुरुवात. अर्थात असे प्रयत्न लपून राहत नाहीत, किती काही झाकले तरी

मराठी कथालेखक's picture

12 Dec 2018 - 6:05 pm | मराठी कथालेखक

उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना ही मनसेची उत्तर प्रदेशातली शाखा असेल काय ?
बाकी भाजपात अंतर्गत बंडाळी असल्याचे चित्र निर्माण झाले तर भाजपला २०१९ खूप जड जाईल इतके नक्की.

अरेरे लोकसत्तावाल्यांकडे फोटोशाॅप वर काम करणारी दर्जेदार माणसे पण नाहीत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Dec 2018 - 7:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कुटील डावपेच, आय.टी. सेल, समाज्माध्यमांतून बदनामी.. हे प्रत्येकवेळी यशस्वी होईलच असे नाही. हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.
"कॅडरलेस पक्ष, त्यांच्याकडे आहे तरी कोण,भरकटलेला पक्ष?" हे विचारणारे आता आत्मचिंतन करू शकतील. खरे तर इंदिरा/मोदींना वगैरे पर्याय कोण ? असे प्रश्नच निरर्थक असतात. पंतप्रधान हा विद्वत्तापूर्ण, अफाट वाचन असलेला, बोलण्यात वाकब्गार असलेला पाहिजे.. ह्या (उच्च) मध्यम्वर्गाच्या अपेक्षा असतात पण एकंदरित भारतीय मतदार असला विचार करत असेल असे वाटत नाही.

नितिन थत्ते's picture

12 Dec 2018 - 7:18 pm | नितिन थत्ते

>>पंतप्रधान हा विद्वत्तापूर्ण, अफाट वाचन असलेला, बोलण्यात वाकब्गार असलेला पाहिजे.. ह्या (उच्च) मध्यम्वर्गाच्या अपेक्षा असतात

तुम्हाला शिक्षित मध्यमवर्गाच्या अपेक्षा म्हणायचंय का?
अशा अपेक्षा असत्या तर इथे मिपावर मोदीजींना शून्य पाठिंबा मिळाला असता. बोलण्यात वाकबगार (पक्षी रेटून खोटे बोलणारा) याखेरीज तुम्ही दिलेल्या यादीतले "विद्वत्तापूर्ण" आणि "अफाट वाचन असलेला" हे गुण काही मोदींजवळ नाहीत.

मामाजी's picture

12 Dec 2018 - 7:35 pm | मामाजी

नितिन थत्तेसाहेब "विद्वत्तापूर्ण" आणि "अफाट वाचन असलेला" हे गुण काही मोदींजवळ नाहीत. याबाबत आपला काही वैयक्तिक अनुभव की आपल उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. असो ही लिंक बघा.

https://youtu.be/yxNLXTl_BR8

गामा पैलवान's picture

12 Dec 2018 - 7:51 pm | गामा पैलवान

तेजस आठवले,

तुमचा इथला प्रतिसाद आवडला.

एकंदरीत या विधानसभा निवडणुकींत पप्पू की मोदी हा प्रश्न नव्हताच मुळी. मोदींच्या नावावर धुडगूस घालणाऱ्या भाजप्यांना मतदाराने जमिनीवर आणलंय. जर मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडात मोदींनी गुजरातप्रमाणे लक्ष केंद्रित केलं असतं तर तिथल्यासारखा काठावर विजय मिळाला असताही. पण मग मोदींचं मुद्रामूल्य उणावलं असतं. हा धोका पत्करण्याची काहीही गरज नव्हती.

तसंही पाहता मतदार लोकसभा व विधानसभा निवडणुकांत फरक करतो. मग विधानसभांचा अपशकून करवून घेण्यापेक्षा थेट लोकसभेसाठी मोर्चेबांधणी केलेली उत्तम ठरावी. हात दाखवून अवलक्षण बघण्यापेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची काय वाईट? असा मोदीशहांचा व्यूह दिसतो आहे.

आ.न.,
-गा.पै.

तेजस आठवले's picture

12 Dec 2018 - 10:39 pm | तेजस आठवले

मोदींच्या नावावर धुडगूस घालणाऱ्या भाजप्यांना मतदाराने जमिनीवर आणलंय.

हे पटण्यासारखं आहे.
ह्या राज्यांच्या प्रचारसभेत मोदी-शहा जोडीने बाकी राज्यांसारखं वातावरण ढवळून काढलं नव्हतं.स्टार प्रचारक म्हणून योगींची प्रमाणाबाहेर ओळख करून देण्यात आली असली तरी योगींच्या भाषणाने काडीचाही फरक पडला नाही. हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याचा मुद्दा अगदीच हास्यास्पद होता. हा मुद्दा अजिबात उपयोगी ठरू शकत नाही ह्याची जाणीव भाजप नेतृत्वाला नक्कीच असणार. पण योगींना थांबवले गेले नाही.तसंपण तेलंगणा मध्ये राव सोडून दुसरे कोणी जिंकण्याची शक्यता नव्हतीच.त्यामुळे योगी फारसा प्रभाव पाडू शकत नाहीत हे चित्र स्पष्ट झाले.पुढचे पंतप्रधान योगी होऊ शकतात अशी बिनबुडाची विचारसरणी असलेल्या लोकांना परस्पर शह गेला. पहिला पक्षी.
गोव्यात भाजपने सत्ता मिळवण्यासाठी जो हपापलेपणा केला तो इकडे कुठल्याच राज्यात केला नाही हे बरेच केले(तसं करण्याचा पर्याय नव्हताच म्हणा). मध्य प्रदेश मध्ये फोडाफोडी करून, तडजोडी करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न अजिबातच झाला नाही.बसपा आणि काँग्रेसला एकत्र यावे लागणार आहे हे स्पष्ट झाल्यावर भाजपने वाट पाहिली असावी. काँग्रेस -मायावती ह्यांमध्ये काय बोलणी झाली हे कळणार नसली तरी कुरबुर चालू होण्याची वाट भाजप नक्कीच पाहत असणार.मायावती कधीही धोका देऊ शकतात हे भाजप आणि काँग्रेस दोघांना माहित आहे. जेव्हा महागठबंधनसाठी वाटाघाटी चालू होतील तेव्हा काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे, ह्यात मायावती पण आल्या,कसं फिस्कटेल ह्यासाठी भाजप प्रयत्न करेल.कदाचित त्यांच्या अंतर्गत लाथाळ्या एवढ्या वाढतील की भाजपाला काही करावे लागणार नाही. त्या क्षणाची भाजप वाट बघेल.
कर्नाटक निवडणुकीत येड्डियुराप्पा तसेपण भाजपाला डोईजड झाले होते.दुसरीकडे काँग्रेस आणि कुमारस्वामी एकमेकांचे तोंडही बघणार नाही असा प्रचार करत होते. शेवटी भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी तडजोड झाली आणि एकत्र येऊन बिगर भाजप सरकार स्थापन झाले.त्यानंतर शांतता असली तरी पुढच्या चार महिन्यांत तिकडे काही गडबड झाली तर काँग्रेसचे लक्ष्य विचलित करण्यासाठी ते पुरेसे ठरू शकते.येड्डियुराप्पा सत्ता स्थापनेचा पोकळ दावा करतायत हे भाजपच्या लक्षात आले असूनही त्यांनी तो पोरकटपणा थांबवायचा प्रयत्न केला नाही असे मला वाटते.येड्डियुराप्पा यांचा परस्पर काटा काढला जातोय तर कशाला मध्ये पडा हा हेतू असावा. पक्षी दुसरा.

आता तीन राज्यात भक्कम मते मिळवल्यावर काँग्रेसने ह्या वेळेस मतदान यंत्रांवर शंका घेतली नाही(तेलंगणा सोडून). त्यामुळे ह्यानंतर काँग्रेसने कधी परत हा मुद्दा आणलाच तर तो हास्यास्पद ठरेल.

-सर्व मते वैयक्तिक.

मतिमंद ने 10 दिवसात कर्जमाफी बद्दल पलटी मारली हो !!!!!
आता म्हणतोय कर्जमाफी है सोलुशन नाही , फार्मर्स को स्ट्रॉन्ग करना पड़ेगा

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2018 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2018 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
मार्मिक गोडसे's picture

15 Dec 2018 - 12:10 am | मार्मिक गोडसे

२७ डिसेंबर पर्यंत म. प्र. च्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास राजीनामा द्यावा.

विशुमित's picture

17 Dec 2018 - 6:59 pm | विशुमित

कर्ज माफी केली हो! ती पण 2 तासात.
बाकी कर्जमाफी चांगली का वाईट या चर्चेत मला रस नाही. प्रत्यकाचे वेगवेगळे ठोकटाळे आहेत. त्यांच्या विचारांचा आदर आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhopal-madhya-pradesh-chief-mi...
...
दिडपट हमीभावाचे कुठवर आलय? काय इन्फॉर्मेशन??

मार्मिक गोडसे's picture

17 Dec 2018 - 9:46 pm | मार्मिक गोडसे

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ,
बोले तैसा न चाले त्याची चेंदावी पाऊले.

दिडपट हमीभावाचे कुठवर आलय?

ते चितपट झाले की.

आता "सन्नाटा कायम रहे" चे व्रत कसोशीने पाळले जाईल.

s

मार्मिक गोडसे's picture

17 Dec 2018 - 10:09 pm | मार्मिक गोडसे

सोईचा अर्थ काढून व्हिडिओ, बातम्या पोस्ट करणारे तोंडावर पडले आता.

माहितगार's picture

12 Dec 2018 - 11:00 pm | माहितगार

Loan waiver promise tipped the scales in favour of Congress .. टाईम्स ऑफ इंडिया

माझा प्रतिसाद कदाचित धाग्याशी डायरेक्ट्ली संबंधित नसेल असं वाटतं, पण मग् मी विचार करतो , बरेचसे इतर आणि इतरांकडून आलेले प्रतिसादही तितकेच धाग्याशी डायरेक्ट्ली संबंधित नाही वाटत. असो...

"उत्तरेकडील" राज्यापैकी कुंतला राज्यात, खरी ओळख लपवून जेव्हा युवराज अमरेंद्र बाहुबली यांचा दौरा चालू असतो,
तेव्हा ओळख लपवण्याकरिता "मतिमंद" झालेला "बाहुबलीच्या, गळ्यात" सुंदरी देवसेना "आपल्या पसंतीची माला घालते",
तेव्हा "मूलतः भ्याड पण बोलबच्चन", असलेल्या कुमार वर्माच्या गळी , देवसेनेची चॉईस काय शेवटपर्यंत उतरत नाही.

मराठी कथालेखक's picture

13 Dec 2018 - 1:51 pm | मराठी कथालेखक

तीन राज्यात भाजपचा पराभव झाल्यास शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होणार असा अंदाज होता. पण झाले उलटेच , सेन्सेक्स काल सुमारे ७०० अंकांनी वर गेला तर आताही सुमारे ३०० अंकानी वर आहे.
भाजपच्या पराभवाचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले की काय ?

विशुमित's picture

13 Dec 2018 - 2:19 pm | विशुमित

या पराभवाचे समाजातील सर्व स्तरातील लोकानी सुप्त का होइना स्वागतच केले आहे.

आनन्दा's picture

13 Dec 2018 - 9:49 pm | आनन्दा

निकालाच्या दिवशी सकाळी मार्केट चांगली डुबकी मारेल अशी परिस्थिती होती. तीनही राज्ये काँग्रेसने क्लीन स्वीप मारली असे वाटत होते. निफ्टी 200 पॉईंट खाली होता. पण जसे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होत गेले तेव्हा तो पुन्हा रिकव्हर झाला.
तरीही संध्याकाळपर्यंत काही कळत नव्हते. संध्याकाळी चित्र स्पष्ट झाले.
1. भाजपचा पराभव झाला असला तरी काँग्रेसला मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये निर्णायक सत्ता मिळालेली नाही
2. दोनही राज्यांमध्ये भाजपाचा व्होट शेअर बऱ्यापैकी शाबूत आहे, आणि लोकसभा निवडणुकीत जेव्हा संघ आणि परिवारातील अन्य संघटना देखील पूर्ण शक्तीनिशी उतरतील तेव्हा चित्र बरेच वेगळे असेल.
3. सध्याच्या परिस्थितीत भाजपला किमान 50 जागांचा फटका बसेल असे चित्र परवा सकाळी होते. पण चित्र स्पष्ट झाल्यावर हो धोका साधारण 25-30 जागांपर्यंत खाली आला आहे असे चित्र होते.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मार्केट वर गेले

इरसाल's picture

13 Dec 2018 - 4:36 pm | इरसाल

हा असा पराभव महाराष्ट्रात झाला म्हणजे २०१४ चे शल्य थोडे कमी व्हायला मदत होईल, काही धुरंधरांना मिपावरील.
आतपर्यंत रुतुन बसलेल्या काट्याची जखम चिघळुन भळभळायला लागलेली दिसतेय काही प्रतिसादांवरुन....
आता कदाचित राजस्थानमधले पाटीदार जास्त चवताळुन नाही उठले म्हणजे मिळवली.

माझा प्लान,
जानेवारी २०१९- निघणार्‍या शेतकरी मोर्च्यात सामील होणे
फेब्रुवारी २०१९- मराठा आरक्षण मोर्च्यात सामील होणे
मार्च २०१९ - संविधान रक्षा दलित मोर्च्यात सामील होणे
एप्रिल २०१९ - एससी, एसटी,एसटी, ओबीसी यांच्या आरक्षणाच्या टक्केवारीत कपात केल्याच्या, कोणाचे १५लाख जमा न झाल्याबद्द्ल, नोटबंदी बद्दल, जीएसटी लादल्याबद्दल, टॅक्स ब्रॅकेट न वाढवल्याबद्द्ल, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल्,प्रकाश आंबेडकरांवर नक्षली आरोप लावल्याबद्द्ल, झालच तर निवडणुक पुर्वी आचारसंहिता न पाळल्याबद्दल मोर्चा काढायचा.

विशुमित's picture

13 Dec 2018 - 5:41 pm | विशुमित

मला वाटते एवढा लोड घेण्या पेक्षा कमळ सोडून कोण्या एका चिन्ह वर बटन दाबले तरी भळभळ थांबवणे सोपे होयील

रामदास२९'s picture

13 Dec 2018 - 4:55 pm | रामदास२९

अटीतटीची लढत .. मला वाटतय.. विजयाचे शिल्पकार कमलनाथ आणि अशोक गेहेलोत आहेत.. राहूल गान्धी , ज्योतिरादित्य किन्वा सचिन पायलट नाहीत.

मध्य प्रदेश
https://www.loksatta.com/desh-videsh-news/madhya-pradesh-assembly-electi...

https://www.indiatoday.in/elections/story/the-curse-of-4-337-on-shivraj-...

https://www.financialexpress.com/india-news/how-a-small-difference-of-0-...

राजस्थान
https://timesofindia.indiatimes.com/india/bjp-loses-vote-share-big-time-...

विशुमित's picture

13 Dec 2018 - 5:34 pm | विशुमित

अत्यंत सहमत

विशुमित's picture

13 Dec 2018 - 5:34 pm | विशुमित

अत्यंत सहमत

रामदास२९'s picture

13 Dec 2018 - 6:42 pm | रामदास२९

इथेच कोणीतरी म्हणाले होते ' रागा आता परिपक्व झाला आहे ' त्यावेळी आश्चर्य वाटले होते की जर मिपाकर नमो ला फेकू म्हणतात तर रागा ला मतिमंद ऐवजी परिपक्व कस म्हणता येईल ?

राफेल वरुन देशात गोंधळ माजवणाऱ्या कॉ च्या महामहिम रागा मतिमंद चे विमान जमिनीवर उतरवण्याचे काम सुप्रीम कोर्टातील रंजन गोगई यांच्या खंडपीठाने केले आहे .

हा निकाल तीन राज्यातील निवडणुकीच्या निकाला अगोदर आला असता तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते .
मध्यप्रदेश मधील 10 दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आश्वासन वरुन निकालाच्या दुसऱ्या दिवशी घुमजाव करणाऱ्या रागाच्या आरोपा मधील हवा सुप्रीम कोर्टाने काढून टाकली .
विशेष म्हणजे देशभर गोंधळ करणाऱ्या काँ ने घोटाळा झालाय याची खत्री नसल्याने सुप्रीम कोर्टात एकहि याचिका टाकून न्याय मागितला नव्हता . निकालात काढलेल्या 5 ही याचिका इतर उठवळ लोकांच्या होत्या . इथुन पुढे सुशिक्षित , हुशार व जाती च्या पलीकडे विचार करणारे मतदार कितपत रागाच्या वेडेपणा च्या नादी लागतील शंका च आहे .

इथेच कोणीतरी म्हणाले होते की रागा आता परिपक्व झाला आहे !!!!
तर त्या रागा चा परिपक्व पणा पुन्हा एकदा जनते समोर उघडा पडला आहे व ते काम रंजन गोगई यांच्या खंडपीठा ने केले आहे . राफेल वरुन देशात अविश्वासाचे वातावरण तयार करणाऱ्या रागाला आणि न्यायालयीन चौकशी ची मागणी करणाऱ्या पाच याचिका सुप्रीम कोर्ट ने फेटाळून लावल्या आणि विशेष म्हणजे त्या पाच मधील एकही याचिका काँग्रेस ची नव्हती . राफेल मध्ये घोटाळा झाला होता तर कोर्टात याचिका न टाकता लोकांना मूर्ख बनवीणे रागा ला सोपे वाटले असावे . पण त्यामुळे रागाचा बालिशपणा अजुन जास्त स्पष्ट झाला आहे व मला नाही वाटत इथुन पुढे कोणीही सुशिक्षित मतदार आंधळ्या डोळ्यांनी / कानानी रागच्या कॉ ला मत देईल .
शेवटी काय आधीच मर्कट त्यात मद्य पिला !!!

थॉर माणूस's picture

15 Dec 2018 - 12:04 am | थॉर माणूस

>>>पाच याचिका सुप्रीम कोर्ट ने फेटाळून लावल्या
यावरून तुम्हाला काय वाटतं? याचिका न दाखल करण्याचा निर्णय शहाणपणाचा होता कि बालिशपणाचा? काँग्रेसची मागणी चौकशी समिती नेमण्याची आहे ना? म्हणजे निदान म्हणत तरी तसेच होते.

कोर्टाने याचिका फेटाळून लावताना काय लिहीले आहे? कुठलाही घोळ झालेलाच नाही असा काही निर्वाळा दिला आहे का?

ट्रम्प's picture

15 Dec 2018 - 6:57 am | ट्रम्प

चौकशी समिती ची मागणी करण्यासाठी संसद आहे ना ? गेली चार वर्ष सगळे भत्ते घेवून वारंवार संसद बंद पाडली तसेच इथुन पुढे ही करायचे .
विधानसभा निवडणुकीत , मीडिया वर राफेल चा विषय वर चर्चा करुन देशाची लक्तरे आणि संरक्षण गोपिनीयता चव्हाटयावर मांडणे निव्वळ बालिशपणा च आहे .

नितिन थत्ते's picture

15 Dec 2018 - 9:58 am | नितिन थत्ते

>>देशाची लक्तरे आणि संरक्षण गोपिनीयता* चव्हाटयावर मांडणे निव्वळ बालिशपणा

अय्या !! आम्ही बोफोर्सबाबत कध्धी कध्धी काही बोललो नाही

*राफेलच्या स्पेसिफिक्शन्स बाबत किंवा योग्यायोग्यतेबाबत विरोधीपक्षांनी काहीही आक्षेप घेतलेले नाहीत (बोफोर्स केसमध्ये इव्हन फ्रेंच सोफ्मा तोफा कशा अधिक योग्य आहेत, बोफोर्सच्या तोफा किती किमीपर्यंत मारा करतात, फ्रेंच तोफा किती किमी मारा करतात वगैरे चर्चाही तेव्हाच्या विरोधकांनी केली होती). विरोधकांनी आक्शेप घेतले आहेत ते त्याची किंमत वाढवणे, १२६ विमानांऐवजी ३६च विमाने घेणे आणि ती सर्व रेडी टु फ्लाय स्थितीत घेणे (पक्षी- आधीप्रमाणे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करार न करता ) आणि रिलायन्सला पार्टनर करून घेणे याबाबतीत आहेत.

या आक्षेपांचा संबंध संरक्षणविषयक गोपनीयतेशी लावणे हाच बालिशपणा आहे.