मराठी दिवस २०२०

मोदीजी गडकरीजी नेहरूजी पटेलजी ...

Primary tabs

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in राजकारण
9 Dec 2018 - 5:27 pm

एखादा राजकारणी हा अर्थतज्ज्ञ असलाच पाहिजे असं नाही. त्याचप्रमाणे तो इन्फ्रास्ट्रक्चर नियोजन वा नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन यातही तो वाकबगार असेलच असं नाही. मात्र राजकारणी हा निश्चितच असा असला पाहिजे की भारताच्या नैसर्गिक संसाधनांचं सुयोग्य व्यवस्थापन करून,
जो या देशाला त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ उठविता यावा, व शहरी निमशहरी , कृषी तसेच ग्रामीण क्षेत्राला त्यांचं देणं देऊन, या दृष्टीने या देशापुढचे वेगवेगळे प्रश्न व्यवस्थित हाताळू शकेल. देशाला पुढे जाण्यापासून रोखणार्या त्रुटींचं विश्लेषण करताकरता त्यावर मात करून पुढे जाण्याचा मार्गही दाखवेल.

गडकरी यांचे कर्तृत्व तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी बरोबर हेरले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्षपद त्यांनी गडकरी यांच्यावर सोपवले. त्याआधी त्यांनी मुंबईतील उड्डाण पुलांची मालिका आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करताना गडकरी यांनी अक्षरशः रात्रीचा दिवस केला. प्रत्येक प्रशासकीय निर्णयामागे ते खंबीरपणे उभे झाले आणि त्यांनी कुठेही तडजोड केली नाही. त्यांनी मुंबईत ५६ उड्‌डाणपूल बांधले, देशभर रस्ते बांधले, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे केला, पण हे सारे कर्तृत्व म्हणून मिरविले नाही. कर्तृत्वाची सर्वसामान्यांची व्याख्या त्यांनी कधीच ओलांडली आहे.
दिल्लीत न पचणारे काही गुण गडकरी यांनी आपले ब्रीद बनवलेले आहेत. हे गुण म्हणजे स्पष्ट बोलणे आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणे.
हा प्रकल्प धीरुभाई अंबानी यांच्या कंपनीकडे सोपवावा म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली सूचना गडकरी यांनी मानली नाही. तेव्हा मोठी खळबळ निर्माण झाली होती.गडकरी यांनी खुल्या आंतरराष्ट्रीय निविदा प्रसिद्ध करून उत्तम कंत्राटदार निवडले आणि हे उच्च गुणवत्तेचे काम दोन हजार कोटी रुपये वाचवून पूर्ण करून दाखवले. याबद्दल त्यांना नंतर बाळासाहेबांनी शाबासकी दिली.

मोठे होण्यासाठी काय लागतं? अनुभव,कर्तृत्व, कामाचा झपाटा,हे सारं तर लागतंच. पण आणखीही एक गोष्ट लागते. ती म्हणजे मोठं मन. जे गडकरी यांच्याजवळ आहे. प्रांजळता, प्रामाणिकता, वेळ पडल्यास परखडता व अर्थातच मोठ मन. ही त्यांची शिदोरी आहे. परंतु ..........
आता एखाद्या राजकीय नेत्याचा, ‘मी’ बुलंद नसेल, तर त्याची आणखी आणखी वरच्या "प्राईम" स्पॉटपर्यंत पोहोचण्याची ऊर्जाच संपून जाते, असे सामान्यपणे मानले जाते आणि तसलेच वर्तन याकाही वर्ष्यात राजकारणात दिसते. मात्र गडकरींसारखा जो नेता समष्टी होतोे, त्याचा 'मी' कधीचाच ‘आम्ही’त परावर्तित झालेला असतो. ‘मुझमे बसतें है कई लोग’ अशी त्याची अवस्था असते. अनेकांनाही तो म्हणजे मीच, असे वाटत असते.
गडकरींच्या बाबत नेमकेपणाने अगदी हेच झालंय.

पंडित नेहरुंच्या ऐवजी सरदार पटेल पंतप्रधानपदी विराजमान झाले असते तर भारताचा इतिहास बदलला असता का? ह्या प्रश्नाचे आज जेव्हडे प्रयोजन नाही,
त्याऐवजी आज गडाकरीजी पंतप्रधान हवे होते, असं आपण म्हणू शकतो, कदाचित त्यांनी देश वेगळ्याप्रकारे चालवून, त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीने
खरोखरच ५ वर्ष्यात आणखी विकास घडवून आणला असता.

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

9 Dec 2018 - 9:00 pm | मार्मिक गोडसे

त्याऐवजी आज गडाकरीजी पंतप्रधान हवे होते, असं आपण म्हणू शकतो, कदाचित त्यांनी देश वेगळ्याप्रकारे चालवून, त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीने
खरोखरच ५ वर्ष्यात आणखी विकास घडवून आणला असता.

सहमत

नितिन थत्ते's picture

10 Dec 2018 - 11:34 am | नितिन थत्ते

मुंबईतील ५६ उड्डाणपुलांचे आणि मुंबई पुणे एक्स्प्रेसवेचे श्रेय गडकरी यांचेच यात संशय नाही.

परंतु "मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण करताना गडकरी यांनी अक्षरशः रात्रीचा दिवस केला. प्रत्येक प्रशासकीय निर्णयामागे ते खंबीरपणे उभे झाले आणि त्यांनी कुठेही तडजोड केली नाही" हे फारसे खरे नाही. कारण एक्स्प्रेसवेचे प्रत्यक्ष काम १९९८ सुरू झाले. ९९मध्ये युतीचे सरकार जाऊन काँग्रेस आघाडीचे सरकार आले. एक्स्प्रेसवेचे काम २००२ मध्ये पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला झाला. २००० साली एक्स्प्रेसवेचा काही भाग खुला करण्यात आला होता.

त्यांनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा नवा अध्याय सुरू केला हे ही श्रेय गडकरींचेच आहे. पूर्वीही हायवेची किंवा इतरही कामे खाजगी कंत्राटदारच करीत होते. परंतु त्यात पार्टनरशिपचा भाग नव्हता. तो त्या काळात सुरू झाला. यात आर्थिक तरतूद कंत्राटदारानेच करणे आणि वापरकर्त्यांकडून ते पैसे वसूल करणे ही पद्धत नव्याने सुरू झाली.

mrcoolguynice's picture

10 Dec 2018 - 12:07 pm | mrcoolguynice

तरीही .....
आज ज़र गड़करीजी पंतप्रधान असते, तर विकास,
रोज़गार, पायभूत सुविधा याबाबत भारतातिल चित्र काही औरच असते.

.
.
जनता तो कोई बाहुबली जैसा राजा चाहती थीं....
मगर कपट धोखेसे भल्लालदेव राजा बन बैठा ...

नितिन थत्ते's picture

10 Dec 2018 - 12:13 pm | नितिन थत्ते

आप की सोच गलत है.

लोग भल्लालदेव को ही राजा बनाना चाहते थे. लोग ये भी जानते थे की वो बाहुबलीका रूप लिये हुए है.

सुबोध खरे's picture

10 Dec 2018 - 12:44 pm | सुबोध खरे

गडकरी हे उत्तम प्रशासक आहेत यात शंकाच नाही.

परंतु त्यांना व्यापक जनाधार आहे का? ते भ्रष्टाचारी नाहीतच असे जनतेला वाटते का?

जसे तवलीन सिंह या मोदींच्या तिखट टीकाकार-- यांनी लिहिले आहे रफाल बद्दल इतका वादंग होऊनही कि त्या अख्खा उत्तर प्रदेश फिरून आल्यावर ९९ % लोकानी मोदी हे स्वच्छ आहेत (भ्रष्टाचारी नाहीतच) असे स्पष्टपणे सांगितले
सामान्य माणसाला त्यांच्या( श्री गडकरी) बद्दल किती माहिती आहे?

श्री मोदी यांनी गुजरात राज्य किती उत्तम तर्हेने चालवले होते हे आपण एकदा गुजरात भर फिरून पाहून या.

त्यानंतर "ब्रँड मोदी" जनतेच्या गळी उतरवण्यात ते किती यशस्वी झालेले आहेत ते हि पाहून घ्या.
अशी क्षमता श्री गडकरी यांची आहे का? गडकरी २७२ पैकी निदान २७ खासदार "स्वकर्तृत्वावर" निवडून आणू शकतील का ?

शेवटी उत्तम प्रशासक आणि जनतेची मते मिळवून निवडून येणे या परस्पर अजिबात संबंध नसलेल्या गोष्टी आहेत. श्री राजीव गांधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे( गांधी घराण्यात जन्माला येणे/ विवाहसंबंध असणे सोडले तर) काय कर्तृत्व आहे कि त्यांना सगळे काँग्रेसी लोटांगण घालतात आणि त्याना काँगेसचे समर्थक "मते देतात".

मंत्री म्हणून खाते उत्तम चालवणे आणि बहुमताने आपला पक्ष निवडून आणणे या मुळातच वेगळ्या गोष्टी आहेत. श्री नरसिंह राव हे उत्तम( कदाचित काँग्रेमधील सर्वोत्तम) पंतप्रधान होते पण एकहाती त्यांना विजय मिळवता आला असता का?

तेंव्हा आपला लेख मुळातच अप्रस्तुत आहे.

डँबिस००७'s picture

10 Dec 2018 - 12:49 pm | डँबिस००७

गडकरी निसंशय चांगले आहेत पण मोदीजींनी एक हाती निवडणुक जिंकली नसती तर गडकरी आज विपक्षात बसलेले असते !

२०१९ साली देशाला लागलेल ग्रहण सुटु दे !! भल्लाळदेव जाउन देशाला युवराजा सारखा प्रतिभावान राजा मिळु दे !
मग देशातल्या सर्व समस्यांच निराकरण होईल !

यावरून अटलजी गेले तेव्हा गळे काढणारे लोक आठवले... ते तावातावाने अटलजींचे गुण गाऊन मोदी त्या तुलनेत किती डावे आहेत हे आडून आडून दाखवायचा प्रयत्न करत होते.
इथे पण तोच प्रकार आहे. गडकरीबद्दल पूर्ण आदर बाळगून देखील मला हे म्हणावेच लागेल की ते उत्तम प्रशासक आहेत, पण लीडर नाहीत. जसे अमित शहा, सुषमा स्वराज यांचा व्यक्तिगत करिष्मा तितका नाही जितका मोदींचा आहे. आणि याच्यामागे संघाची पार्श्वभूमी, अविवाहित असणे आणि धडाडी या तीनही गोष्टी आहेत.
असो, चालू द्या.

विशुमित's picture

10 Dec 2018 - 4:12 pm | विशुमित

अविवाहित असणे??
कुछ ज्यादा दुर चला गया क्या??
....
अवांतर- अविवाहित असणे मुद्दा बाजुला ठेऊ,पण ते ब्रह्मचारी असतील का? उगाच एक कुतुहल, कृपया कोणीही स्वतच्या भावना दुखावून घेऊ नये. नाहीतर आपली सपशेल सहिष्णू माघार..!!

आनन्दा's picture

10 Dec 2018 - 6:00 pm | आनन्दा

नाही. मोदी अविवाहित आहेत म्हणून त्यांच्या मागे त्यांचा मुलगा त्यांचा उत्तराधिकारी बनेल ही शक्यता शून्य. मला तरी व्यक्तिशः हा मुद्दा महत्वाचा वाटतो. बाकीच्यांचे माहीत नाही.

ब्रह्मचारी असतील का हे कसे सांगणार? वाजपेयी स्वतः मान्य करत असत की ते ब्रह्मचारी नाहीत म्हणून. कल्पनारंजन म्हणून ठीक आहे. पण तो मुद्दा तितका महत्वाचा मला वाटत नाही कारण त्याला व्यावहारिकदृष्ट्या काहीही महत्व नाही.

मुल्गा असण्या आणि नसण्या ने लोकशाहीला काय फरक पडतो??
.....
माझ्या मते प्रापंचिक माणस जवाबदारी ने वागतात. नंगाड बहाद्दराना, वाजली तर पुंगी नाहीतर तोडून खाल्लं..!!
गावाकडचे एक आडाणी निरिक्षण..!

गृहस्थाश्रमापासून स्वतःला दूर ठेवण्याचा उपयोग मुख्यत्वे एखाद्या उद्दीष्टाला किंवा कार्याला वाहून घेण्यासाठी अधिक ऊपयूक्त ठरू शकतो.

मुले नसलेल्यांमध्ये व्यक्तिगत ऐषोआराम फर्मावणे आणि पार्टी कार्यासाठी पैसा जमवणार्‍या जय ललितांसारखी उदाहरणे ही दिसून येऊ शकतात. पण सहसा. मुले-मुली किंवा घनीष्ठ नाती नसलेल्यांना पुढच्या पिढीसाठी शिल्लक ठेवण्यासाठी भ्र्ष्टाचाराचे आकर्षण आणि घराणेशाही सहसा कमी राहील हे खरे . तर दुसरीकडे मुले-मुली असलेलेही भष्टाचार आणि घराणेशाही पासून दूर राहू शकतात.

मोदी अविवाहित आहेत म्हणून

हाच बेनेफिट तुम्ही राहुल गांधींना देणार का ? तेही अविवाहित (टेकनिकली तसेच ओरिजनली ) आहेत.

विशुमित's picture

12 Dec 2018 - 6:33 pm | विशुमित

हेच लिह्नार होतो.
पण तसे होणे शक्य नाही कारण संघाच्या कुशित वावरणारे अविवाहितच त्यागी बाकी सगळे भोगी...

आनन्दा's picture

12 Dec 2018 - 6:58 pm | आनन्दा

मी दिला असता, पण नॅशनल हेराल्ड आणि डीएलएफ प्रकरण, त्याचबरोबर दरवर्षी सुट्टीसाठी अज्ञातवासात जाणे वगैरे कारणामुळे तो द्यायची हिम्मत होत नाही..
1. स्वतःच्या मुलांसाठी नाही तर बहिणीच्या मुलांसाठी तरी नक्कीच काहीतरी करत आहे तो
2. लग्न होत नाही किंवा सुयोग्य साथीदार मिळत नाही म्हणून अविवाहित राहणे, आणि सार्वजनिक आयुष्यासाठी कुटुंबाचे पाश तोडून मुक्त होणे यात बराच फरक आहे
त्यामुळे हा फायदा राहुल गांधीला द्यायची तयारी माझी नाही.

मराठी कथालेखक's picture

10 Dec 2018 - 6:47 pm | मराठी कथालेखक

मोदी अविवाहित आहेत ही चुकीची माहिती आहे.. ते विवाहित आहेत पण पत्नी सोबत रहत नाहीत आणि त्यांनी आपले कुटूंब वाढवलेले नाही.

टेक्निकल पॉइंट, पण बरोबर आहे.

कदाचित मुद्दा ध्यानी नीट न आल्यामुळे, लेख अप्रस्तुत वाटू शकतो.
परंतु मोदी/नेहरू व गडकरी/पटेल यांच्याविषयी कल्पनाविलास करताना, "मोदी/नेहरू यांची तत्कालीन जनमानसातील प्रतिमा (भ्रष्टाचारी आहे/नाही जनतेला वाटणे इ.) किंवा त्यांची ब्रँड मोदी/नेहरू जनतेच्या गळी उतरवण्याची हातोटी" याचा काही संबंध नाही. गडकरी/पटेल मंत्री म्हणून खाते उत्तम चालवणे आणि मोदी/नेहरू यांनी बहुमताने आपला पक्ष निवडून आणणे या मुळातच वेगळ्या गोष्टी आहेत.
मोदीजींचा भारताचा विकास पाहण्यासाठी 'गुजरातेत जा' हे सांगणे, म्हणजे सरकारी धोरण पटत नसेल तर 'पाकिस्तानात जा' हे सांगण्यासारखे झाले.
गुजरातेत जाऊन विकास जाणून घ्यायला मोदीजी काय फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का ?
मुद्दा सरळ आहे ...
"आज गडाकरीजी पंतप्रधान असले असते तर , कदाचित त्यांनी देश वेगळ्याप्रकारे चालवून, त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीने
खरोखरच ५ वर्ष्यात आणखी विकास घडवून आणला असता किंवा कसे ?."

आनन्दा's picture

10 Dec 2018 - 6:05 pm | आनन्दा

हे सांगणे कठीण आहे. गडकरी एखद्या सीटीओ सारखे अहेत असे म्हणूया आपण... त्यांच्याकडे विशिष्ट क्षेत्रात लागणारी विजन नक्की आहे. धडाडी, लीडरशिप देखील आहे. पण स्टार्टप टाकून वेळप्रसंगी डर्टी पॉलिटिक्स करुन ती यशस्वी करणे त्यांना जमेल असे वाटत नाही.
मोदी नव्हते तेव्हा होतेच की ते अध्यक्ष वगैरे.. पण तेव्हा त्यांना ते जमले नाही जे आत्ता ही दुक्कल करतेय.. तेव्हा युवराज पंप्र होणार अशी हवा होती जोरात, आणि यांना काही त्या बाळलीलांना आवर घालता येत नव्हता.

होप यु आर गेटिंग द पॉइंट.

च्याकडे विशिष्ट क्षेत्रात लागणारी विजन नक्की आहे. धडाडी, लीडरशिप देखील आहे.

परंतु "गडकरीजी / पटेलजी" च्यासारख्याकडे विशिष्ट क्षेत्रात लागणाऱ्या क्षमतेच्या परिघापुरते सीमित, म्हणून,
त्यांच्या पंतप्रधानपदासाठी लागणाऱ्या अनएक्सप्लोर्ड क्षमते/केपेबिलिटीवर, आपण अन्याय तर नाही करत आहोत ना ?

हे म्हणजे "मोदीजी/नेहरूजी" च्या पंतप्रधान म्हणून असलेल्या केपेबिलिटीवर, यत् / तत् कालीन जनतेने, केलेला,
अनक्वेश्चनिंग विश्वास म्हणावा काय ?

अन्याय का बरे करतोय? सगळेच जण तर पंप्र होऊ शकत नाहीत ना?
तसे म्हटले तर पंप्र व्हायला नशीबच लागते, अन्यथा देवेगौडा आणि गुजराल सारखे मध्यमवर्गीय नेते पंप्र झालेच नसते.
त्यामुळे गडकरी पंप्र व्हायला नालायक आहेत असे मुळीच नाही. पण त्यांच्यपेक्षा अधिक मोठा नेता असल्यामुळे म्हणतात तसे वटवृक्षाच्या सावलीत हे सगळे थोडे लहान दिसतेत इतकेच.
मोदींनंतर माझी पसंती फडणवीसांना असेल, नवखे असेन देखील ते त्या मानाने राजकारणात मुरलेले वाटतात. गडकरी, स्वराज राजनाथजी हे वाजपेयींच्या मवाळ राजकारणाच्या संस्कारात वाढलेले नेते आहेत, जे प्रचलित काळातील "राजकारणात" थोडे कालबाह्य वाटतात. याउलट फडणवीस हे मोदींचे खरे वारसदार वाटतात "मला".

हे वैयक्तिक मत आहे.

अवांतर - यानिमित्ताने गडकरींचे वय बघितले, तर ते जेमतेम ६०च आहेत. आणि अजुन एक गंमत म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातील बहुतेक जण मोदींना ज्युनिअर आहेत. ही माहिती मला नवीनच आहे!

त्यामुळे गडकरी पंप्र व्हायला नालायक आहेत असे मुळीच नाही. पण त्यांच्यपेक्षा अधिक मोठा नेता असल्यामुळे म्हणतात तसे वटवृक्षाच्या सावलीत हे सगळे थोडे लहान दिसतेत इतकेच.

व्हेरी गुड !

आता मला सांगू शकाल काय , मोदीजी मागे एकदा म्हणलेले की ...."सरदार पटेल अगर पहले पंतप्रधान होते, तो आजका भारत कुछ और होता.. "
या वक्तव्यामागे मोदीजींची काय सोच असु शकते ? त्यांचे हे वक्तव्य जाणून , सर्वसामान्याच्या मनात काय इम्प्रेशन होत असेल ??

आनन्दा's picture

10 Dec 2018 - 10:00 pm | आनन्दा

हा हा हा.. वाटलेच. अजुन पाणी वळणावर कसे काय नाही गेले? अब आया उंट पहाड के नीचे.

काही फरक महत्वाचे आहेत.

पटेल मास लीडर नव्हते असे म्हणणे मोठ्या धाडसाचे ठरेल. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात गांधी पहिल्या फळीचे नेते होते, आणि बोस, नेहरू पटेल इत्यादी दुसर्‍या फळीचे नेते होते.. त्यापैकी नेहरुंकडे गांधींनी वारसा दिला असे म्हणता येइल. नेहरुंनी परराष्ट्र व्यवहाराबाबत आदर्शवादातून जे काही निर्णय घेतले त्याची फळे आपण आज अजुन देखील भोगतोय.
मला वाटते माहीतगारांनी हा विषय सविस्तर घेतला आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलणे फारसे योग्य होणार नाही. पण नेहरू आणि मोदी तुलना अप्रस्तुत आहे अनेक बाबतीत. त्यामुळे इथेच थांबतो.

मोदींचे वारसदर ' फडणवीस ' नां होण्यासाठी किमान 15 वर्ष पूर्ण बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवून गुजरतच्या ' कथित ' विकासा सारखा महाराष्ट्राचा विकास करावा लागेल आणि हो शहरातील भाजप समर्थकाना त्रासदायक वाटणाऱ्या ' सतत कटोरा घेवून भीक मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ' रोखाव्या लागतील .

सुबोध खरे's picture

11 Dec 2018 - 12:19 pm | सुबोध खरे

चष्मा घातला कि असं होतंय पहा.

मी लिहिलेलं मूळ वाक्य काय आहे

श्री मोदी यांनी गुजरात राज्य किती उत्तम तर्हेने चालवले होते हे आपण एकदा गुजरात भर फिरून पाहून या.
याचा साधा सरळ अर्थ असा आहे कि श्री मोदी मुख्यमंत्रीअसताना त्यांनी गुजरातचा विकास कसा केला आहे हे गुजरातभर फिरून पाहून (परत) या.

मोदीजींचा भारताचा विकास पाहण्यासाठी 'गुजरातेत जा' हे सांगणे, म्हणजे सरकारी धोरण पटत नसेल तर 'पाकिस्तानात जा' हे सांगण्यासारखे झाले.
गुजरातेत जाऊन विकास जाणून घ्यायला मोदीजी काय फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का ?

आपले वाक्य सरळ सरळ पूर्वग्रहदूषितआहे

खालीलपैकी कोणतेही वाक्य वाच्यार्थाने व्यंगार्थाने किंवा कोणत्याही इतर अर्थाइन माझ्या वाक्यात उघड किंवा अध्याऋत नाही
१)भारताचा विकास,

२) गुजरातेत जा आणि पाहून या यातील फरक न समजावून घेणे

३)मुख्यमंत्र्यानी केलेला विकास आणि मोदीजी काय फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का हे विचारणे
आणि
कळस म्हणजे ४) सरकारी धोरण पटत नसेल तर पाकिस्तानात जा हि तुलना करणे

यातून आपला मोदीभक्ताचा मुखवटा गळून पडतो आहे हे समजून येतंय.

पुरोगामी मोराने भगवा पिसारा लावू नाच केला तरी त्याला आपला पार्श्वभाग उघडा पडतो आहे हे ध्यानात येत नाहीये.

डँबिस००७'s picture

10 Dec 2018 - 5:24 pm | डँबिस००७

मोदीजींचा भारताचा विकास पाहण्यासाठी 'गुजरातेत जा' हे सांगणे,
हे सर्वथा चुकीचे स्टेटमेंट आहे ! चार पाच वर्षांपुर्वी गुजरातच्या विकासाचा पंचनामा करेन म्हणुन श्री केजरीवाल यांनी स्वतःच हस करुन घेतल होत !
२०१४ च्या निवडणुकीपुर्वी विकास कश्याप्रकारे होउ शकतो ह्याची झलक बघायला गुजरातला जावे लागत होते ,
आता विकास समोर दिसत असताना त्याची गरज काय ?

आता विकास समोर दिसत असताना त्याची गरज काय ?

म्हणूनच 'आज समोर दिसणारा विकास" व तुलनात्मक
"गडाकरीजी पंतप्रधान असले असते तर , कदाचित त्यांनी देश वेगळ्याप्रकारे चालवून, त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीने
किती विकास घडवून आणला असता किंवा कसे ?." यावर जरा (कल्पनारंजन ) प्रकाश पडावा.

प्रसाद_१९८२'s picture

10 Dec 2018 - 7:42 pm | प्रसाद_१९८२

"गडाकरीजी पंतप्रधान असले असते तर , कदाचित त्यांनी देश वेगळ्याप्रकारे चालवून, त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीने
किती विकास घडवून आणला असता किंवा कसे ?." यावर जरा (कल्पनारंजन ) प्रकाश पडावा.

--
मुळात तुमचा प्रश्न "आत्याबाईला मिशा असत्या तर काय झाले असते" या टाईपचा आहे, ज्याचे उत्तर कधीही मिळणार नाही. श्री नितिन गडकरी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कित्येक वर्षे आधीपासून राष्ट्रीय राजकारणात आहेत मात्र त्यांना जे जमले नाही ते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये करुन दाखवले तेंव्हा श्री गडकरी किती ही कार्यक्षम मंत्री असले तरी संघटना चालवायला जे नेतृत्व गुण लागतात ते त्यांच्याकडे नाहीत हेच आजवर सिद्ध झालेय.

mrcoolguynice's picture

10 Dec 2018 - 7:57 pm | mrcoolguynice

मुळात तुमचा प्रश्न "आत्याबाईला मिशा असत्या तर काय झाले असते" या टाईपचा आहे, ज्याचे उत्तर कधीही मिळणार नाही.

व्हेरी गुड !

आता मला सांगू शकाल काय , मोदीजी मागे एकदा म्हणलेले की
"सरदार पटेल अगर पहले पंतप्रधान होते, तो आजका भारत कुछ और होता.. "
या वक्तव्यामागे मोदीजींची काय सोच शकते ? "आत्याबाईला मिशा असत्या तर काय झाले असते" या टाईपसारखं .....?

मराठी कथालेखक's picture

10 Dec 2018 - 6:54 pm | मराठी कथालेखक

गडकरींना संधी मिळत असेल तर आनंदच आहे पण उत्तरेकडील राज्यातून त्यांना कितपत पाठिंबा मिळेल याबद्दल शंका आहे. मुळात २०१९ मध्ये भाजप गडकरींना संधी देईल अशी शक्यता नाहीच.
जर २०१९ ला परत भाजप सरकार (ओह... मोदी सरकार.. भाजप सरकार असं काही नाहीये खर्‍या अर्थाने) आले तर गडकरींना पुढे जावून संरक्षण , अर्थ , रेल्वे (काही काळ प्रत्येकी) अशी खाती मिळावीत अशी आशा करुयात. पुढे जेव्हा कधी भाजप पंतप्रधान्पदाकरिता नवीन उमेदवार देण्याचा विचार करेल.. भाजपत अंतर्गत सत्तापालटाचे वारे वाहू लागतील तेव्हा गडकरींनी जर ही खाती (खासकरुन संरक्षण) सांभाळलेली असतील तर त्यांचे पारडे जड होईल

डँबिस००७'s picture

10 Dec 2018 - 10:46 pm | डँबिस००७

"सरदार पटेल अगर पहले पंतप्रधान होते, तो आजका भारत कुछ और होता.. "

हा प्रश्न सरळ विचारता आला असता पण नाही !! हा प्रश्न विचारला त्यामुळे
तुम्हाला ईतिहास माहित नाही हे ईथे प्रकर्शाने जाणवते आहे !
सरदार पटेल यांंनी पंत प्रधानपदाची जागा स्व कर्तुत्वावर मिळवलेली होती १५ पैकी १४ सदस्यांनी सरदार पटेल यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला होता . नेहरुंनी नेहेमी प्रमाणे महात्मा गांधीजींवर जबरदस्ती करुन स्वतःला पंत प्रधान म्हणुन घोषित केल. हे सर्वथा अनैतिक होते पण म. गांधीजींनी हे होउ दिले !
कणखर सरदार पटेलांना उगाच लोहपुरुष ही उपाधी उगाच मिळाली नाही ! ५६५ राज्य संस्थाने स्वतंत्र भारतात विलिन करणार्या ह्या महापुरुषाला काश्मिर विलीन करायला परवानगी नेहरुंंनी दिली नव्हती हे सत्य सर्वांना माहित आहे !
नेहरुंनी पं प्रधानपद जबरदस्तीँने मिळवलेले होते पण ते त्या पदाला योग्य नव्हते असे त्यांच्या विरुद्ध झालेल्या मतदानावरुन स्पष्ट होत . त्यावेळचे कॉंग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेत्यांच स्पष्ट मत होत पण म. गांधीजींमुळे सगळ्यांचा नाईलाज झाला !

पुढे सरदार पटेल आजारी पडले व त्यांच्या कडच्या खात्याचा कारभार स पटेलांच्या नकळत नेहरुंनी स्वतःकडे घेतला . अश्या वागणुकीमुळे स पटेल खुप व्यथित झालेले होते !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Dec 2018 - 8:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पक्का डँबिस हो तू.

mrcoolguynice's picture

14 Dec 2018 - 9:07 am | mrcoolguynice

बुधवार, 12 डिसेंबर 2018
पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ज. स. करंदीकर व्याख्यानात "सद्य राजकीय स्थिती आणि माध्यमे' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी "पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर मोदी यांच्या नेतृत्वाला कोणी आव्हान देईल का,' या प्रश्‍नाचे उत्तर देताना सिन्हा म्हणाले, "मोदींच्या नेतृत्वाला भाजपमधून कोणी आव्हान करणार नाही. हे सगळे घाबरले आहेत.'' "भाजपच्या कार्यपद्धतीत आगामी सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत खूप मोठा बदल होईल असे दिसत नाही. कारण, बदल करणे हे फक्त भाजपच्या दोन जणांच्या हातात आहे,'' असे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता स्पष्ट केले.
सिन्हा म्हणाले, "पाच राज्यांच्या निवडणुकीत "योगी कार्ड' चालले नाही. तसेच, सामजात फुट पाडून मते मिळविता येतात, हे देखील शक्‍य झाले नाही. यातून हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपच्या यशांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.'' "2012, 2013 मध्ये तुम्ही विचार केला होता का, की मोदी पंतप्रधान होती. तेही इतक्‍या ताकदीने? त्या वेळी ते तर एका राज्याचे फक्त मुख्यमंत्री होते. मोदींना पर्याय मिळू शकत नाही, इतकी देशाची गुणवत्ता ढासळली आहे? मोदींना पर्यायी उमेदवार जनता निवडेल,'' असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

'गडकरी म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बोलावतात आणि अपमान करतात'. भाजपाचे अनेक नेते ... भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतात. . नितीन गडकरी एवढेच बोलले की, इथे घरी बोलावून आपला अपमान केला जातो'.

{{>>https://www.loksatta.com/maharashtra-news/pm-narendra-modi-invites-home-...

दुसर्‍या धाग्यावर हा प्रतिसाद टाकला होता. तोच इथेही लागू पडतो असे वाटल्यामुळे इथे उद्धृत करतो -
----------------

सद्यस्थितीत लागू होणारी काही वाक्ये :-
१. जगात केवळ दोन प्रकारची माणसे असतात: मोदीविरोधक आणि मोदीसमर्थक. बाकी कुणी सापडल्यास बाद धरावे.
२. या दोन्ही प्रकारच्या माणसांसाठी कोणीही माणूस परपक्षात असणे म्हणजे अक्षम्य गुन्हा असतो. या गुन्ह्याच्या खालोखाल महत्त्वाचे म्हणजे देशद्रोह, खून, बलात्कार, वगैरे..
वरील दोन मुद्यांचा परिणाम इतर गोष्टींवर होणे स्वाभाविकच..
३. मोदीविरोधकः देशासमोरच्या सर्व अडचणी [आर्थिक, सामाजिक, संरक्षण, भौतिक, पारलौकीक, खेळ, क्रिकेट, घरचा अस्वच्छ संडास, सासू-सुनेची भांडणे..इत्यादी अनेक ] निकालात लागण्यासाठी मोदींना दूर केले पाहिजे.
मोदीसमर्थकः देशासमोरच्या सर्व अडचणी [आर्थिक, सामाजिक, संरक्षण, भौतिक, पारलौकीक, खेळ, क्रिकेट, घरचा अस्वच्छ संडास, सासू-सुनेची भांडणे..इत्यादी अनेक ] मोदीच निकालात काढू शकतात.
४. मोदीविरोधक: "मोदींचा" पराभव होण्याचे मूळ कारण १२५ कोटी भारतीयांपैकी १७७३ लोकांना आपले कार्य त्यांनी समजावून सांगितले नाही.
मोदीसमर्थकः "मोदी" व्यतिरिक्त सगळ्यांचा पराभव होण्याचे मूळ कारण "मोदींचा" पराभव झालेला नाही.
५. मोदीसमर्थकः जगात दोनच काळ आहेतः मोदीपूर्व काळ आणि मोदीकाळ.
मोदीविरोधकः जगात एकच काळ होणार आहे. मोदींचा काळ.
६. मोदीविरोधकः मोदींनी कोणतेही काम केलेले नाही. जे केलेले दिसते ते मोदीपूर्वकालीन आहे असे धरून चालावे. [हे चित भी मेरी.. पट भी मेरी.. च्या चालीवर वाचावे.]
मोदीसमर्थकः मोदींनीच काम केलेले आहे. जे केलेले दिसते ते मोदीकालीन आहे असे धरून चालावे. [हे चित भी मेरी.. पट भी मेरी.. च्या चालीवर वाचावे.]
.
.
.
.
.
५१. मोदीसमर्थकः बाळा लौकर ढुंगण धुवून घे. मोदी जिंकले नाहीत तर धुण्यासाठी देखील पाणी मिळणार नाही.
मोदीविरोधकः अर्धवट माहिती आहे ही. व्हॉट्स अ‍ॅप वर मॅसेज फिरतोय, मोदी पाणीपट्टी वाढवणार. मोदी जिंकलेत तर धुण्यासाठी देखील पाणी मिळणार नाही.

mrcoolguynice's picture

11 Dec 2018 - 6:02 pm | mrcoolguynice

वाह मोदीजी वाह ....

अर्र आपल हे ते.......

वाह उत्खनकजी वाह....

अनिरुद्ध प's picture

11 Dec 2018 - 7:38 pm | अनिरुद्ध प

उत्खनन चालले आहे, लाजवाब मस्तच गुळ्पीठ . . . .

mrcoolguynice's picture

13 Dec 2018 - 10:14 am | mrcoolguynice

नवी दिल्ली- मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा दोघेच शिल्पकार असतील, तर ताज्या पराभवाचे बिल कोणाच्या नावावर फाडायचे? त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरायचे??? असे दबके सूर सत्तारूढ भाजपच्या वर्तुळात उमटू लागले आहेत.
विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार शिवराजसिंह यांनी काल उत्तररात्री संघाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी (सरसंघचालक नव्हे) थेट संपर्क साधला व माझ्याकडे एकहाती निवडणूक मोहिमेची सूत्रे दिली असती, तर चित्र बदलले असते, अशी खंत बोलून दाखविली. मोदींच्या सभा, त्यातील विखारी भाषा व अजयसिंह बिश्‍त उर्फ योगी आदित्यनाथांची मुक्ताफळे याबद्दल तर तीनही राज्यांत भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड राग धगधगत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवराजसिंह यांनी मोदींच्या विद्वेषपूर्ण भाषेचे दाखले देताच संघनेतृत्वाने "शिवराजजी, तुम्हीही माई का लाल सारखी भाषा वापरलीत व सवर्णांच्या मतांबाबत ती महागात गेली, हे वास्तव नाही का?'' असा प्रतिप्रश्‍न केला तेव्हा शिवराजसिंह यांनी त्याबाबत कबुली देतानाच, त्याबाबत संघाच्या मदतीने मी माझ्या पातळीवर डॅमेज कंट्रोल केले होते, पण मोदींचे गांधी घराण्यावरील अत्यंत आक्रमक आरोप व मायलेक जामिनावर बाहेर आहेत. अशी धमकीची भाषा जनतेला, विशेषतः युवकांना रुचलेले नाहीत, हे लक्षात आणून दिल्याचे सूत्रांनी नमूद केले.
शेतकऱ्यांसाठीच्या केंद्राच्या योजना मध्य प्रदेशात पोहोचल्या नाहीत व एकट्या नितीन गडकरींचा अपवाद वगळता केंद्राच्या कोणत्याही मंत्र्याने आपल्या राज्याला मदत केली नाही, अशीही तक्रार शिवराजसिंह यांनी केल्याची माहिती आहे.

हा धागा, त्यावरील प्रतिसाद आणि चर्चेचा सर्वसाधारण ओघ यावरून एक शंका मनात येते.

मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षात कुणी नाही ही वस्तुस्थिती आहे. तसेही मिडियावर याबद्दल आधीच चर्चा सुरू आहेतच.
मग आत त्यावर उपाय म्हणून भाजप मधूनच कुणी पर्याय उभा करून पक्षांतर्गत भांडणे लावण्याचा / फूट पाडण्याचा हा डाव तर नसावा.. ??
[हा प्रश्न प्रस्तुत लेखकावर नसून मिडियावर आहे हे इथे नमूद करतो.]

mrcoolguynice's picture

10 May 2019 - 1:07 pm | mrcoolguynice

..तर मोदी यांना गडकरी हा चांगला पर्याय – स्वामी
भाजपला २३० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अशक्य आहे.
वृत्तसंस्था | May 4, 2019 02:36 am

नवी दिल्ली : भाजपला २३० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी हा चांगला ‘पर्याय’ ठरू शकतो, असे वक्तव्य भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका मुलाखतीत केले.

भाजपला २२० किंवा २३० आणि ‘एनडीए’च्या घटक पक्षांना ३० अशा २५० जागा आम्हाला हमखास मिळतील. परंतु आणखी ३० जागांची आवश्यकता भासेल, असेही स्वामी म्हणाले. मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का, या प्रश्नावर ते म्हणाले, ते ३०-४० जागा जिंकलेल्या घटक पक्षांवर अवलंबून असेल. त्यांनी मोदींना नकार दिला, तर आम्ही त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारू शकत नाही.

पंतप्रधानपदासाठी मोदी यांना गडकरी हा चांगला पर्याय ठरू शकतो का, याविषयी स्वामी म्हणाले, ‘ते (गडकरी) मोदी यांच्याएवढेच चांगले आहेत.’ नेतृत्वात बदल केला तर ‘बसप’च्या मायावती ‘एनडीए’त आल्यासआश्चर्य वाटणार नाही, असे स्वामी म्हणाले.

ढब्ब्या's picture

10 May 2019 - 7:23 pm | ढब्ब्या

मुळातच लेख पटला नाही.
मोदी ना गडकरी पर्याय ही विपक्ष ची एक चाल आहे, ज्याला काही लोक सहज बळी पडतात.

राहता राहीला नेहरुंचा प्रश्न, गडकरी नक्कीच त्यांच्यापेक्शा सरस आहेत ;)

मोदी ना गडकरी पर्याय ही विपक्ष ची एक चाल आहे

Read Again carefully...

पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी हा चांगला ‘पर्याय’ ठरू शकतो, असे वक्तव्य भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका मुलाखतीत केले.