या आठव्ड्यात पाकीस्तानातील गुरु नानकदेवांचीं श्रद्धेय स्मृतीस्थान असलेल्या शीखयात्रेकरुंसाठी सहज भेट देता येईल असे भारत आणि पाकीस्तान दरम्यान कर्तारपूर कॉरीडॉर बाबत सहमती होऊन सीमेच्या दोन्ही बाजूला शीलान्यासाचे कार्यक्रम झाले. एकदा पाकीस्तानने अनुमती दिल्या नंतर भारताला नको म्हणणे कठीण असणार होते. तेव्हा भारतानेही सहाजिक प्रस्ताव स्विकारला. कर्तारपूर कॉरीडॉर शीलान्यासाचे कार्यक्रमाच्या निमीत्ताने पाकीस्तानने राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला तर नवल नाही.
शीलान्यासाचाच कार्यक्रम दोन दिवस आधी किंवा दोन दिवस नंतर होऊ शकला नसता का ? २६ नव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्याला दहा वर्षे होऊनही सर्व कटकर्ते अद्याप पाकीस्तानात मोकाट फिरत असताना २६ नव्हेंबरच्या आसपासची तारीख भारत सरकार स्विकारु शकले याचे आश्चर्य वाटते. पाकीस्तानच्या बाजूने जो शिलान्यास झाला त्यात खलिस्तानवादी अतिरेकी केवळ मोकाट फिरत नव्हते अपेक्षेप्रमाणे नवज्योतसिंग सिद्धु सोबत त्यांनी फोटोपण काढून घेतले.
इम्रान आल्यापासून काश्मिरातील अतिरेकींचा गोंधळ चालू आहेच पण त्या सोबत काश्मिरी अतिरेक्यांच्या नवे पोस्टाची तिकीटे छापण्याचे प्रतापही इम्रानी कारकिर्दीत पार पडत आहेत. कर्तारपूर शिलान्यासाच्या अगदी काही दिवस आधी निरंकारी गुरुद्वार्यावर चक्क ग्रेनेड अटॅकही घडवला जातो. पाकीस्तानातील गुरुद्वार्यांमध्ये भारतीय दूतावासाच्या आधीकार्यांना प्रवेश दिला जात नाही. एवढे असूनही कर्तारपूर कॉरीडॉर करता तर ठिक पण २६/११ची तारीख पारपडेल एवढे भान भारत सरकारने ठेवावयास नको होते का ?
कर्तारपूर कॉरीडॉरने दोन्ही बाजूंच्या पंजाबी लोकांचे आणि दक्षिण आशियातील गैर ड्रग ट्रेड किती सुलभ होईल याची नेमकी कल्पना येणे कठीण असावे. त्या बद्दल भारत सरकारने कोणत्या उपाय योजनेचा विचार केला आहे याची काहीच कल्पना नाही.
बाकी कर्तारपूर मध्ये बसून इम्रानखानने मोठे मोठे तारे तोडण्याचे काम व्यवस्थित पार पाडले. नवज्योत सिंग सिद्धुवर भारतात उगीच टिका होते , पाकीस्तानात सहज निवडून येऊ शकतो म्हणाला. नवज्योत सिंग सिद्धू असेल किंवा इतर कुणि पर धर्मीय असेल त्याला पाकिस्तानचा पंतप्रधान अथवा अध्यक्ष होता येते का ? हे इम्रानखान ने तपासून सांगावे. पाकीस्तान आणि भारताचे संबंध चांगले होण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू भारताचा पंतप्रधान होण्याची वाटपहावी लागेला का फार फारतर भारतातिल २०१९च्या निवडणूका होऊन जाईपर्यंत वाट पाहू असेही तारे तोडले. मोदी पंतप्रधानपदावरुन दूर होण्याची आपण वाट पहात आहोत असा आव तो पाकीस्तानी आणि आंतररास्।त्रीय समुदया समोर आणू पहात आहे. काश्मिर असो वा अफगाणीस्तान अतिरेक्याचे जबाबदारी इम्रान भारत आणि आमेरीकेवर लाख फोडू इच्छित असेल पण अतिरेक्यांना उपलब्ध होणारी शस्त्रे आणि पैसा झाडाला लागत नसतात .
१०० दिवस झाल्याच्या निमीत्ताने केलेल्या भाषणात मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा कसा सुसंस्कृत आहे याचा इम्रान उल्लेख करत होता. मनुष्याचे प्राण्यांपेक्षा अधिल सुसंस्कृत असणे पाकीस्तानी जनतेला आणि शांततेच्या धर्माला समजले असते तर पाकीस्तानचा जन्म होण्याचा प्रश्न ही आला नसताना
प्रतिक्रिया
30 Nov 2018 - 10:39 am | अर्धवटराव
नव्हे, ते त्यासाठीच तयार करण्यात आलय हे नक्की. काहि दिवसांपुर्वी लष्करप्रमुखांनी खालीस्तान प्रॉब्लेम संबंधी अतिदक्षता पातळीची काळजी व्यक्त केली होती. ड्रॅगनच्या भरोशावर पाक काय काय उद्योग करणार आहे हे गुरु नानकच जाणोत.
30 Nov 2018 - 2:37 pm | mrcoolguynice
बघा की, हा सिद्धू बीजेपी सोडून दुसर्या पक्षात गेल्यावर, अगदीच देशद्रोही झाला आहे.
30 Nov 2018 - 2:46 pm | अभ्या..
च्यामारी,
खरे डॉक्टर अगदी खरे बोलले होते तुमच्याबाबतीत. ;)
तुमच्या बाबांचं डिबेटिंग होऊ द्या हो आधी, मग मारा की कोलांट्या.
30 Nov 2018 - 2:53 pm | mrcoolguynice
ओ सुरभीमोहोरचैतन्यचुर्णरसिक काका.....
बीजेपी सोडून गेलेल्याला देशद्रोही म्हटलं ... कुठे कोलांटी उडी मारली हो ?
30 Nov 2018 - 2:52 pm | माहितगार
'निरंकारी' हा शब्दतरी आपण कधी ऐकला आहे का ? त्यांच्या शांततामय सभेवर टाकण्यासाठीचा ग्रेनेड आकाशातुन पडल्याला किती दिवस झाले आहेत ? कशाचे काही तारतम्य ?
पक्षांच्या आदलाबदलीने कॉमनसेंन्स मध्ये कसा फरकपडतो ? माझ्यापुरते सांगायचे तर भाजपा गटातला पत्रकार पाकीस्तानी अतिरेक्याला भेटून आला तेव्हा त्याच्यावरही टिका केली आहे.
जे लोक केवळ प्रत्येकवेळी विश्वासघातच करत नाहीत, शत्रु सैन्याच्या सैनिकाला वीर मरण आल्या नंतर आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करुन मृत देहाच्या विटंबनेपर्यंत जाऊ शकतात अशा सैन्याच्या सेनापतीची पप्पी घेण्याचे कुणसही कौतुक कसे वाटू शकते याची कमाल वाटते. पण आपला भारत देशास असे कौतुक करणारेही भारतीय लाभतात याचा अभिमान ज्यांना वाटायचा ते वाटो बापडे.
एकदा एका व्यक्तीला पक्षाला शत्रू ठरवले की देशाचे हित अहित स्वतंत्रपणे पारखण्याची बुद्धी परवश होते ?
2 Dec 2018 - 10:36 pm | विनोद१८
तुम्ही पुरोगामी पंथिय अहात काय.
2 Dec 2018 - 10:44 pm | mrcoolguynice
वो क्या होता हय ?
30 Nov 2018 - 2:46 pm | mrcoolguynice
होना ...
तेही मोदीजी आणि डोवालसाहेब स्वतः डोळ्यात तेल घालून भारताचे राष्ट्रीय संरक्षणात गुंग असताना ...
१० दिवस आधी नॉर्वेचे पूर्वपंतप्रधान, असेच भारतीय काश्मीर खोर्यात येऊन, भारत-पाक मधील "द्विपक्षीय" वादासंधार्भात मेडिएट करून गेले,
बहुदा डोवाल साहेबांचा अंमळ डोळा लागला असावा, तितक्यातच त्यांनी पाकव्याप्त काश्मिरातून प्रवेश केला असावा बहुदा...
30 Nov 2018 - 3:01 pm | माहितगार
पक्ष कोणतेही असोत मुदलात सर्वच भारतीयात काही कमतरता आहे की काय असा प्रश्न पडतो. देशाचे स्वातंत्र्य आणि ऐक्य पचत नाही की काय असा प्रश्न पडावा एवढा वेडगळपणा चालतो.
30 Nov 2018 - 3:09 pm | mrcoolguynice
"देशाचे स्वातंत्र्य आणि ऐक्य न पचवू शकलेल्या" वेडगळ भारतीयानीं, एकदा निवडून दिलेले मोदीजी,
पुन्हा निवडून येवोत अशीच प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना.
30 Nov 2018 - 3:19 pm | माहितगार
हा धागा लेख मोदींना निवडून आणण्याच्या समर्थनार्थ काढलेला नाही. दृष्टीकोण राजकीय पक्ष केंद्रीत असते तर धागा लेखाच्या शीर्षकासहीत टिकेने सुरवात केली नसती. (आपल्या माहितीसाठी धागा लेखक तत्वतः ८ वर्षाच्यावर कोणत्याही नेत्याने एका पदावर चिटकून रहाण्याच्या विरोधात आहे आणि दुसर्या बाजूस अ ते ज्ञ सर्व पक्षीय घराणेशाहीच्या विरोधातही)
30 Nov 2018 - 3:55 pm | mrcoolguynice
धागालेखकाच्या विचारस्वातंत्र्याचा मला आदर आहे, म्हणूनच प्रतिक्रया देतोय.
आपण कृपया मजविषयी मनी रोष ठेवू नये, रागे भरू नयें, ही विनंती
परंतु माझ्यामते आपण, मोदींना निवडून आणण्याच्या समर्थनार्थ सरळ सरळ धागे काढावेत. नव्हे आजच्या काळाची ती गरज आहेच. फोटोशॉप पेक्षा अभ्यासू धागे स्वागतार्ह्यच.
हा धागा लेख मोदींना निवडून आणण्याच्या समर्थनार्थ काढलेला नाही/आहे की
दृष्टीकोण राजकीय पक्ष केंद्रीत आहे/नाही, याचे स्पष्टीकरण देण्यात येऊ नये, मिपा वाचक सुज्ञ आहेतच.
जाता जाता, आपण "तत्वतः ८ वर्षाच्यावर कोणत्याही नेत्याने एका पदावर चिटकून रहाण्याच्या विरोधात आहात", कदाचित सुदैवाने आपला विरोध मुख्यमंत्री पदाच्या पेक्षा मोठ्या पदाला असावा, नाहीतर १५+ वर्षे मुख्यमंत्री असलेल्या आमच्या मोदीजींना तुम्ही विरोधच केला असता.
30 Nov 2018 - 4:27 pm | माहितगार
मी डोकलामवर लिहीताना डोवालांना त्यांचे ड्यू क्रेडीट वेगळ्या लेखातून दिले, पण सुषमास्वराज यांचे परराष्ट्रमंत्रीपद आणि अजित डोवालांचे राजकीय सुरक्षा सल्लागार म्हणून मर्यादांची माझ्याकडून स्वतंत्र लेखातून चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र दौर्यांच्या मर्यादा चक्क कविता करुन मांडल्या आहेत. हे सर्व सांगण्याचा उद्देश्य व्यक्तिपूजा आणि व्यक्तीद्वेष दोन्ही कटाक्षाने टाळतो कारण आपण आपल्या देशाचे देणे लागतो व्यक्तिंचे अथवा पक्षांचे नाही. भाजपांईंच्या पाकीस्तानबाबतच्या वाचाळवीरते बाबत मी पुर्वी टिका केली असेल तर या वेळी सिद्धूवर केली आहे. पक्ष बदलला म्हणून सिद्धूवर टिका केली हा दावा धागा लेखकाच्या बाबतीत टिकत नाही मुख्य म्हणजे आपला दावा देशापेक्षा राजकारण मोठे करणारा आहे म्हणून मागे घ्यावा असे वाटते.
* निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल असा सविस्तर धागा आहे त्यात आपल्या प्रश्नाचे उत्तर आले असावे. त्या धाग्यावर अधिक चर्चेसाठी स्वागत आहे.
30 Nov 2018 - 4:56 pm | mrcoolguynice
आपल्या लेटेस्ट लेखावर प्रतिक्रिया देताना,
फक्त लेटेस्ट लेख कॉन्टेक्स्टमधे न ठेवता,
,
आपल्या पूर्वप्रकाशित सर्व धाग्यांचा सांगोपांग अभ्यास करून,
त्यातून आपली वैचारिक बैठक समजून घेऊन, त्याअनुषंगाने मी इथे प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते,
याची मला कल्पना नसल्याने, असे घडले...
30 Nov 2018 - 11:09 pm | माहितगार
इट्स ओके
2 Dec 2018 - 10:49 pm | विनोद१८
मला वाटते तुम्हाला 'मोदीत्रस्तता' नावाची व्याधी झाली आहे म्हणुनच एका गंभीर विषयावर असल्या उथळ प्रतिक्रिया देत अहात, मिसळपाव म्हणजे 'चेपु' न्हवे हे लक्शात ठेवा.
3 Dec 2018 - 10:29 am | माहितगार
हा प्रतिसाद नेमका कुणाला आहे ?
3 Dec 2018 - 10:40 am | आनन्दा
हो हा प्रश्न मला पण पडलाय
3 Dec 2018 - 12:30 pm | अभ्या..
स्वाक्षरी असेल त्यांची,
काही झाले की हेच म्हणायचे, फक्त संस्थळांची नावे बदलायची, चेपुवर लिहिताना "हे व्हाटसप नाही हे लक्षात ठेवा" असे लिहित असतील.
3 Dec 2018 - 12:58 pm | नावातकायआहे
नुकताच "मोदिळ" हा नवीन शब्द वाचनात आला....
बाकि चालुद्या!
30 Nov 2018 - 5:39 pm | mrcoolguynice
इस्लामाबाद : करतारपूरचा कार्यक्रम हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून टाकण्यात आलेली ही एक 'गुगली' होती. या गुगलीमुळे भारताने दोन मंत्र्यांना पाकिस्तानला पाठविले, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आज (शुक्रवार) सांगितले.
करतारपूर कॉरिडोरचे भूमिपूजन कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी पार पडले. या कार्यक्रमाच्या काही तासानंतर शाह यांनी सांगितले, की ''करतारपूर कार्यक्रम इम्रान खान यांनी टाकलेली एक गुगली होती. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतासोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे. येथे यावे आणि आमच्याशी हातमिळवणी करावी. भारताचे प्रतिनिधी न्यूयॉर्कला भेटायला तयार होतात. मात्र, भारताचे राजकारण यामध्ये बाधा टाकत आहे''.
तसेच ते पुढे म्हणाले, ''आपण आणि संपूर्ण जगाने पाहिले असेल की इम्रान खान यांनी करतापरपूरची गुगली फेकली. त्याचा परिणाम काय झाला हेही आपण पाहिले असेलच. यापूर्वी भारत भेटीसाठी घाबरत होता. मात्र, आता भारताला आपल्या दोन मंत्र्यांना पाठविण्यास भाग पाडले, त्यांचे मंत्री पाकिस्तानात आले''. .
30 Nov 2018 - 10:28 pm | माहितगार
कैलाश मनसा सरोवर दर्शनास ओपन करण्यास चीन स्वतःहून तयार झाले तर भारत सरकारला नाही म्हणणे अवघड या प्रकारात हेही मोडते. मोदींचे दोन मंत्र्यांना भारतीय जनतेच्या भावना जपण्यासाठी कैलाश मनसा सरोवरला जावे लागले म्हणजे चीन ने मोठा तीर मारला असे होत नाही आणि त्याने सीमा विवाद मिटवण्यातही ह्या सर्व देखाव्यांचा काही उपयोग होत नाही. बर्लीन वॉल कोसळल्याची पंप्र मोदीं च्या वक्तव्याची मर्यादाही कैलास मनसा सरोवरच्या उदाहरणावरुन समजून यावी. शीख समुदायाची जुनी मागणी होती , एकाच वेळी दुहेरी भूमिका वठवण्याची सवय असलेला पाकिस्तान छुपेपणाने अफगाणीस्तान आणि काश्मिरात आतीरेक्यांना शस्त्र आणि पैशाचा पुरवठा करतो तेव्हाच त्याला आयएमएफचा पैसा आणि दुसर्या देशातील लिबरल्सचे समर्थनही हवे असते त्यासाठी आवश्यक असलेले शो सुद्धा पाकीस्तान करत असतो , शीख समुदायाच्या बाबतीत त्यांच्या उचकवण्या जोग्या नाजूक जागांचा पाकिस्तानी आयएसआयचा अभ्यास सर्वसामान्य शीखेतर भारतीयांपेक्षा अधिक असतो खलिस्तान विषय कसा खोडायचा हे भारतीयांना माहित नसते पण लावून कसा धरायचा हे पाकिस्तानींना व्यवस्थित माहित असते.
इम्रानखानचा पंप्र पदाची शपथ घेताना अडखळावे एवढा इस्लामचा अभ्यास मर्यादीत आहे शीख धर्मियांचा अभ्यास असण्याचा सुतराम प्रश्न नाही की इम्रानला स्वतःच्या मनाने त्या विषयावर गुगली वगैरे टाकता येतील. पाकीस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याला न्युयॉर्क मध्ये सुषमा स्वराज त्याच्या भाषणापुर्वी उठून गेल्याचा वचपा काढण्याची हि संधी वाटून दिलेले वाचाळवीर विधानाला खूपही अधिक महत्व देण्याचे कारण नसावे. दुसर्या हाताला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीत इम्रानचे 'आम्ही सिव्हीलाईज्ड डायलॉग करु इच्छितो, भारत साथ देत नाही' या विधानात भारत सिव्हीलाईज्ड नाही हे ध्वनित करायचे असते वस्तुतः सिव्हिलाईज्ड असण्याची पाकिस्तानने स्वतः वेळोवेळी फारकत केली असते. अशा स्वरुपाची विधाने भारतीयांना समजत नाहीत पण युरोमेरीकनचीन ते इस्लामिक देशातील डिप्लोमॅट त्यांचा वेगळा सोईस्कर अर्थ काढून भारत विरोधी अपप्रचार करताना, भारत विरोधी एकजूट केली जाताना आपण मुखस्तंभ होऊन जातो.
बाकी भारताने जे दोन मंत्रि पाठवले त्यातील पुरी परराष्ट्रमंत्री नसले तरी त्यांचा भारताचे वरीष्ठ राजनयिक प्रतिनिधी म्हणून अनुभव मोठा राहीला आहे. कर्तारपूर कार्यक्रम झाल्या नंतर पुरींच्या माध्यमातून इस्लामाबादेत पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तान विरुद्ध भारतानेही राळ उडवून एक चपराक दिली असती तर इम्रानखान स्वतातले राजकारण करण्याच्या भानगडीत पडला नसता. स्ट्रॅटेजी मेकींग मध्ये भारताचे परराष्ट्रखाते गेली ७१ वर्षे नेहमीच उशिरा जाग आल्यासारखे वागत आले आहे. ना मुरलेले मुत्सद्दी परराष्ट्रमंत्री पदावर येतात ना परराष्ट्रखात्याचे सचिव दोन वर्षांच्यावर टिकतात हा खेळ खंडोबा दशको न दशके तसाच चालू आहे ही खेदाची बाब असावी.
30 Nov 2018 - 6:48 pm | कंजूस
मला काही कळलं नाही.
पंजाब हा शिखांचा दुखरा कोपरा सतत आहे. आपल्याला, दक्षिण भारतातल्या लोकांना ते कळणे अवघड आहे.
30 Nov 2018 - 7:43 pm | अर्धवटराव
पंजाब हे भारताचं ब्लु-प्रीण्ट बनण्यालायक पोटेन्शीअल आहे. सुजलाम्-सुफलाम् भूमी, कष्टाळू लोकं, अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीतून शक्ती-भक्तीच्या बळावर उज्वल भवितव्याकडे नेणारी वृत्ती, एक प्रकारचा रांगडेपणा आणि भाबडेपणा, कर्मठतेला आणि अंधश्रद्धेला फाट्यावर मारणारी सर्वसमावेषक धार्मीक थेअरी.. असं बरच काहि आहे पंजाब. वि काण्ट अफोर्ड टु रिस्क इट.
30 Nov 2018 - 11:08 pm | माहितगार
हे सर्व मान्य आहे. त्यांच्या बद्दल होणारे चुकीचे विनोद वगैरे थांबवले पाहिजेत, शिक्षणाचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत हे सर्व मान्य आहे.
मुर्तीपुजा टाळून व्यक्ती , शब्द आणि ग्रंथ पूजा केली म्हणजे अंधश्रद्धा आणि कर्मठता टळल्या असे होत नसते. तसे झाले असते तर शीखांना खरेच काही प्रॉब्लेम उरला नसता. गुरुद्वारा प्रबंधक कमिटी निवडणूकात सहजधारी शिखांच्या मोठ्या समुदायाला नाकारणे हि सोईस्कर कर्मठताच आहे. गुरुग्रंथ साहेब वाचण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्या एवढे जवळपास पूर्ण स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेत आहेच. विधानसभेत किंवा संसदेत तलवार घेऊन जाण्याचा हट्ट एखादा फुटीर खलिस्तानवादी खासदार हट्ट धरतो तेव्हा तो शीख धर्मीयांच्या अंधश्रद्धेपलिकडे कशाचाही उपयोग करत नसतो.. असाच दुसरा प्रकार 'सरबत खालसा' नावाने होतो. शीखांना अपेक्षीत वेलफेअर डेमॉक्रसीची भारतीय राज्यघटनेत काळजी घेतली जातेच राज्यसरकारला त्यासाठी पुरेसे अधिकार आहेत. पण शीख धर्मात अपेक्षीत विधानसभेचे स्वरुप हे डायरेक्ट डेमॉक्रसीचे आहे, म्हणजे सगळे शीख एका ठिकाणी जमून निर्णय घेतील त्यास हे सरबत खालसा म्हणतात, या सरबत खालसात बहुतांश मागण्या गैर धार्मिकच असतात पण सरबत खालसात झालेल्या निर्णयाला धाम्रिक निर्णयाचे स्वरुप येते. आता प्रॅक्टीकल नसलेले बर्याच गोष्टी यात घुसवल्या जातात ज्या राज्य आणि भारत सरकारला प्रत्यक्षात आणता येणार नाहीत याच हिशेबाने त्या लिहिल्या जातात. यात पाकिस्तानचा हस्तक्षेप एवढा व्यवस्थित असतो की मागच्या सरबत खालसामध्ये चक्क काश्मिर, नागा आणि नक्षल अतिरेक्यांना सोडण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे.
भारतीय शीखांमध्ये शीक्षणाचे प्रमाण कमी रहाणे, गुरुमुखी लिपी मुळे उर्वरीत भारतीयांसोबत इंटेलेक्च्युअल संवाद होणे रखडते, हि गोष्ट उर्दू लिपी मुळे जे घडते तेच गुरुमुखी लिपी मुळे घडते. समजू नये म्हणून समजण्यास क्लिष्ट लिप्यांचा वापर जसा महानुभावपंथीयांनी महाराष्ट्रात केला तसा तो शीखांनी आक्रमक मुस्लिमांना समजू नये म्हणून केला. जी कारणे मध्य युगात लागू होती तीच आजही लागू आहेत अशा स्वरुपाच्या धार्मीक अंधश्रद्धा बाधा बनतात. सावरकरांनी शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारले तसे शब्द आणि ग्रंथ प्रामाण्याच्या मर्यादा प्रतिपक्षांना लक्षात आणून देण्यात हिंदू धर्मीय सातत्याने कमी पडत आले आहेत. त्याची हि किंमत आहे. खरे म्हणजे गुरु गोविंद सिंगांना शिकार करुन वन्य प्राण्यांना मारावे लागले म्हणून आजही वन्य प्राण्यांच्या शिकारी खेळत फिरणार का ? कृपाणचा सेल्फ डिफेन्ससाठी किती उपयोग होतो याच्या मर्यादा मुघल काळ ते नंतर झालेल्या अनेक दंगलीतून पुन्हा पुन्हा दिसून आले आहे, तरीही कृपाण ठेवेनात का पण संसदेत कॅरी करण्यासारखे हटवादांचा ते सरबत खालसा सारख्या मागे पडलेल्या प्रथांचा अंधश्रद्धात्मक उपयोगाचा युरोमेरीकेतील माध्यमातून पर्दाफाश करण्याची तेवढीच गरज असावी.
भारतात न झालेल्या अन्यायाच्या बर्याच कंड्या पाकिस्तान धार्जीणे युरेओमेरीकेत पकवत आले त्यात १९८४ कालीन दंग्यांची चौकशी यशस्वी पार न पडण्याने त्यांना आग भडकवण्यासाठी आयते कोलीत मिळाल्यासारखे झाले. युरोमेरीकेत स्थायिक झालेले तेथिल नियम मुकाटपणे पाळणारे तेथिल रेसिझमला झेलणारे भारता विरोधी उगाचच आग ओकत आणि खलिस्तानच्या मागणिला रसद पोहोचवत असतात.
१९८४ मधील दंग्याबबात न्याय झालाच पाहिजे पण त्याच वेळी भिंद्रांनवाले ला इंदिरा गांधींनी किती का चुचकारले असेना, अतिरेक्यांनी सुवर्ण मंदिरात मशिन गन घेऊन जाणे चुकीचेच होते हे सुवर्ण मंदिरावरील कारवाईच्या बद्दलच्या प्रत्येक चर्चेच्या वेळी लक्षात आणून दिलेच पाहिजे
आणि हे सगळे शक्य होते शीखांच्या अंधश्रद्धांना -त्यातुन उध्भवणार्या अतिरेकास- परदेशात उघडे पाडण्यात उर्वरीत भारतीय एन आर आय मागे पडतात त्यामुळे त्यांचे फावत आले आहे.
1 Dec 2018 - 4:19 am | अर्धवटराव
दोषविरहीत कुणीही व्यक्ती/व्यवस्था नाहि. भविष्यपयोगी वाटचाल ठरवताना काय टाळायचं, काय स्विकारायचं हाच मुद्दा असतो.
1 Dec 2018 - 8:57 am | माहितगार
Imran’s googly takes a wicket हा एक चांगला विश्लेषण लेख ट्रिब्यून इंडियावर आला आहे.
1 Dec 2018 - 10:12 am | माहितगार
बरखा दत्तचा हिंदूस्तान टाईम्स मध्ये एक लेख आला आहे अपेक्षेप्रमाणे त्यात भाजपा सरकारवर टिकाच असणार पण काही विश्लेषण वाक्ये पटण्याजोगी आहेत.
हे ठिक आहे
बादल आणि सुषमा स्वराज वेगळ्या दिशांनी बोलल्या असे बरखा दत्त म्हणू पहाते आहे पण पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला तोंड देण्यासाठी एवढे दुटप्पी होण्या शिवाय पर्यायही नसावा.
मोदींनी बर्लिन वॉलचे स्टेटमेंट देखाव्यासाठी केले असेल तर हरकत नाही पण हि बर्लीन वॉल मुमेंट नाही मोदींचे वाक्य मोदी भक्तांनी लिटरली नाही घेतले म्हणजे पुरे असावे.
सिद्धूला अगदी अँटी नॅशनल म्हणायची आवश्यकता नसावी पण त्याने त्याच्या वाचाळ वीरतेला लगाम घालण्याची जरुरी असावी. अर्थात पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री भारत सरकारचे आधिकृत प्रतिनिधी ठरतात पंप्र आणि त्यांच्या मंत्र्याचे पाकींना भेटणे आणि इतरांनी भेटणे आणि वरुन पाकींच्या भारत विरोधी कृत्यांबद्दल अवाक्षरही न काढणे पाकींच्या नापाक कारवायांनी भारतीयांना झालेल्या जखमांचा अपमान आहे हे मोदी विरोधकांना समजणे गरजेचे असावे. बरखा दत्तांचे नंतरच्या परिच्छेदात आलेले खालील वाक्य सिद्धूने काय बोलावे आणि काय नाही याबाबत सिद्धूचे भारताच्या परराष्ट्र खात्याकडून मार्गदर्शन व्हावयास हवे होते हे मात्र बरोबर आहे.
.
मंत्री म्हणून बादलांचे हे वाक्य सूचक होते मात्र मिडियाने त्यांच्या एवजी सिद्धूला अधिक प्रसिद्धी देऊन पाकीस्तानच्या खेळात पाकीस्तानची साथ दिल्यासारखे झाल्याचे दिसते.
बरखा दत्तची स्वतःचा काश्मिर विषयक दृष्टीकोण माहित नाही पण भारत सरकारने कर्तारपूर कॉरीडॉर स्विकारताना डोनाल्ड ट्रंप ने केलेल्या टिकेकडून लक्ष भरकटवण्यासाठी पाकीस्तानने हि वेळ निवडल्याचे निदर्शनास आणून जाहीर टिका करावयास हवी होती २६ नोव्हेंबरच्या आसपासची तारीख नाकारावयास हवी होती म्हणजे दरवर्षी २६ नव्हेंबरला पाकीस्तानवर टिकाकरताना पाकीस्तानला चेहरा लपवण्याची संधी मिळाली नसती. २६ नव्हेंबरला केवळ मुंबईतील अकांडतांडवाचा इतिहास नाही काश्मिरात पहिली पाकिस्तानी घुसखोरी झाल्या नंतर काश्मिरातून बाहेर न निघू शकलेल्या हजारो हिंदू शीख लोकांची कत्तलीचा इतिहास २५ २६ नव्हेंबरच्या बाबतित पाकीस्तानी लष्कराला असण्याकडे लक्ष्यवेधून २६ नव्हेंबरची तारीख भारताने जाहीरपणे नाकारावयास हवी होती, या बाबत मात्र भारतीय राजनिती कमी पडली असे म्हणावे लागते.
2 Dec 2018 - 4:29 pm | माहितगार
याच सुमारास इम्रानखानच्या पंप्र पदाच्या कारकिर्दीला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने इम्रानने केलेल्या भाषणात इम्रानने पाकीस्तानातील गरिबी आणि ४३% गरीब मुलांच्या कुपोषण आणि ग्रोथ स्टंटींग म्हणजे वाढ खुंटण्याचा विषय चर्चेस घेतला. यावर उपाय म्हणून गरीब स्त्रीयांना व्यवसायासाठी कोंबड्या पालनास मदत करण्याची योजनेची इम्रानने घोषणा केली. कुक्कुट पालनाचा व्यवसाय पाकीस्तानी मुस्लिम समाजाला नवा नसणार त्यामुळे इम्रानखानची पाकिस्तानी पब्लिकने ट्विटरवरुन खिल्ली उडवली गेली तर त्याच्या उत्तरा दाखल इम्रानखानने आफ्रिकेत बिल गेटनेही कोंबड्या वाटल्याचा दाखला दिला. या बद्दल ट्विटरवर जो विवाद झाला त्यात इम्रानच्या पक्षाने "Propagandists really can't rise above their hate!" (संदर्भ) असे वक्तव्य केल्याचे दिसते. हेच वाक्य हिंदू आणि हिंदूस्थानबद्दल हेट कँपेन राबवणार्या पाकिस्तानला सुद्धा लागू पडत नाही का असा प्रश्न बातमी वाचताना पडून गेला.
मुस्लिम आणि क्श्रिश्चनांकडून मांसाहाराचे समर्थनासाठी बी १२ चा हवाला दिला जातो इथपर्यंत ठिक पण गाईच्या मांसाच्या किमती कमी पडतात असे पुढे गायी मारण्यासाठीचे समर्थन दिले जाते . पाकिस्तानात तर गायी मारुन स्वस्तात माम्स मिळवण्याचे स्वातंत्र्य आहे तरीही गरीब मुस्लिम मुलांपुढे वाढ खुंटण्याची मोठी समस्या उभी असण्याचे आणि ती दूर करण्यास कुक्कुटपालनाचा व्यवसाय पाकिस्तानी सरकारास काय प्रयोजन असावे ? हा प्रश्न उभा रहातो.
१०० दिवस पूर्ण झाल्याच्या भाषणात इम्रानने इतरही बरीच फेकुगिरि केली. भाषणात इतर प्राणी आणि माणसातील फरक सांगताना जनावरांमध्ये माईट इज राईट, अन्याय करु शकणारे फिट टिकतात दुबळे मरतात, तर माणसां मध्ये रहम आणि इन्साफ असतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. याच तत्वावर पाकिस्तानी लष्कर आणि त्यांनी स्पॉन्सर केलेल्या अतिरेक्यांकडे कोणत्या दृष्टीने पहायचे ?