खिला-रे एग्ज कॅफे, पुणे ... एक रिव्यू

उपेक्षित's picture
उपेक्षित in पाककृती
26 Nov 2018 - 12:36 pm

खूप दिवस झाले अंडा भुर्जी खावीशी वाटत होती किंवा अस म्हणा अंड खूप दिवसा पासून खाल्ल नव्हत अर्थात घरी आपण करतोच पण बाहेरची चव ही काहीतरी वेगळीच असते....

मग विचार केला की आता जावं कुठ.. आणि त्यात आपल्या पुण्यात खास फॅमिली ला घेऊन जावं असं फक्त एग च कुठल हॉटेल किंवा कॅफे नाहीये रादर कमी आहेत म्हटलं इट आऊट वर जाऊन विचारावं की चांगली भुर्जी कुठे मिळेल.. बघतो तर काय इट आऊट वरच खिला-रे एग कॅफे ची पोस्ट दिसली.. जहा चाह वहा राह
झाल तर मग खाली पत्ता दिला होताच जवळच कर्नाटक हायस्कूल पाशीचा पत्ता होता आणि पोस्ट वाचून वाटलं की हा गडी पण खवैया असेल..

पत्ता शोधत शोधत गेलो... आत गेल्यावर बघितल तर हा फिल्मी किडा दिसला.. सगळे फिल्म चे डायलॉग याच्या कॅफे chya भिंती वर दिसले...
म्हंतल डायलॉग तर भारी आहेत पण खाऊ काय घलतो ते बघू त्यालाच म्हणटल बाबारे खूप दिवसा पासून बाहेरच अंड नाही खाल्ल काही तरी भारी आणि वेगळं दे

मग त्याने भरपूर नाव सांगितली अंडा घोटाळा, एग मेजिक,अंडा चिंबोरी आणि इतर त्यालाच सांगितलं तुझी स्पेशल आणि खास डिश दे मग एक १० मिनिटांनी अंडा घोटाळा समोर हजर झाला.....

डिश काय होती हे सांगणं खरच खूप अवघड आहे आणि त्यात ह्या बाबा ने काय केलं आहे हे सांगणं त्याहून अवघड आहे...
जो काही प्रकार याने केला होता तो खरच लाजवाब होता कांदा, लसूण आणि टॉमेटो ह्यांचा त्रिवेणी संगम हा बऱ्याच डिश मध्ये असतो किंबहुना सगळ्याच डिश मध्ये असतो पण ह्याने जो काही संगम आणि तडका ह्या तीन पदार्थांचा घडवला होता त्याला तोड नव्हती त्यात परत एंड हे आलच पण ते कसं आल हे सांगणं खूप अवघड आहे आणि त्यात ते मला ह्या ठिकाणी शब्दात मांडणं हे त्या हूंन ही अवघड आहे किंवा अस म्हणा की ते कोणालाच मांडता येणार नाही.
(अर्थात हे माझ व्यक्तिगत मत झालं कदाचित शब्दांचे जादूगार ते मांडतील ही...असो विषयांतर होतंय तो आपला विषय नाही)

सांगायचं हे होत डिश कशी होती तर अप्रतिम, लाजवाब आणि एकदम कडक आणि त्यात हाफ फ्राय याला तर तोड नव्हती, अगदी हवं ते आणि मागल ते अस सगळ डिश मध्ये होत.

सगळ्यात महत्त्वाचं आणि संगण्या सारखं म्हणजे कंजुषी हा प्रकार डिश मध्ये कुठेही नव्हता.

आणि सगळ्यात शेवटचा होम रन म्हणजे *लेमन टी आणि कोल्ड कॉफी, काय कमाल होती vaaaaaa... हे मात्र मला लिहिता येणार नाही ते तुम्ही एकदा जाऊन ट्राय करा..

अस म्हणतात की खूप कमी हॉटेल व्यावसायिकांना लोकांना खायला घालायला आवडत बऱ्याच लोकांचा विचार हा असतो की यातून पैसा किती येतोय आणि त्याच वेडा पायी हॉटेल जस सुरू होत तस लगेच बंद ही होत. पण जेंव्हा ह्या मालकाशी बोललो तेंव्हा कळलं की हा माणूस म्हणतो "पैसा नंतर आधी कस्टमर किती समाधानी झालाय ते जास्त महत्त्वाचं ते झाल की पैसा हा आपसूकच येतो"

खूप कमी लोकांना हे जमत, त्या खूप कमी आणि नगण्य लोकांना मधलाच हा एक जीव उगीच कोणाचं कौतुक करन हे आपल्याला जमत नाही आणि खाण्या chya बाबतीत तर ते जन्मात शक्य नाही मग तो कोणीही का असेना.

असो तर सांगणं इतकंच की सारखं सारखं जाऊन खाव अशी ही डिश आणि जागा होती त्यात फॅमिली साठी अशी एग्ज खाण्याची जागा आपल्या पुण्यात खूपच कमी किंवा नाहीच.. आणि त्यात ती मिळाल्याचं जास्त समाधान.

आता रेट म्हणाल तर तो ही अगदीच आपल्या खिशाला मानवेल असा....जरूर आणि आवरजून ट्राय करावी अशी जागा...

टीप :- 'विखी' आणि त्यांच्या पत्नी स्वतः सर्व पदार्थ तयार करतात आणि आग्रहाने खायला घालतात, व्यावसायिकपणा आहेच पण त्याचा अतिरेक नाहीये हे माझ्या आणि माझ्या पत्नीला आवडले.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2018 - 1:17 pm | चौथा कोनाडा

भारीच की मग !
फुटू कुटायत ?

उपेक्षित's picture

26 Nov 2018 - 2:00 pm | उपेक्षित

दादा फुटू नाय काढले या वेळी, लक्षात नाही आले ...

ते हॉटेलचा सविस्तर पत्ता तरी टाका कि राव .. नाय म्हणजे त्याच काय , कधी चुकून येणेजाणे झालेच तर आम्हीही तुटून पडू म्हणतोय ..

उपेक्षित's picture

26 Nov 2018 - 1:58 pm | उपेक्षित

Eat out च्या पोस्ट वरचा त्यांचा पत्ता इथे डकवत आहे... जरूर भेट द्या आणि तुमचा अनुभव सांगा.

पत्ता- खिला-रे एग्ज कॅफे
किशोरी पार्क, कर्नाटक हायस्कुलच्या बाजूला, एरंडवणा-पौडफाटा, पुणे (चतु:शृंगी स्नॅक्स सेंटरच्या समोरच्या लेन मध्ये)
वेळ- सकाळी 11.30 ते रात्री 9.30
*दर चतुर्थीला बंद*

अथांग आकाश's picture

26 Nov 2018 - 2:24 pm | अथांग आकाश

जाम भारी !
.

प्रसाद_१९८२'s picture

26 Nov 2018 - 7:42 pm | प्रसाद_१९८२

हा पदार्थ मुळचा गुजरात मधील सुरतचा. तिथे बर्‍याच वेळा खाल्ला आहे, अगदी लाजवाब टेस्ट होती त्याची.

अंतु बर्वा's picture

27 Nov 2018 - 12:22 am | अंतु बर्वा

पुर्वी पाहिलेली मायबोली वरची एक रेसिपी आठवली
https://www.maayboli.com/node/54324

सोंड्या's picture

27 Nov 2018 - 3:56 pm | सोंड्या

अंडा घोटला हा पदार्थ बारडोली (गुजरात) मधील वास्तव्यात यथेच्छ चापला आहे. सुरत, बारडोली, व्यारा परिसरात असलेल्या गाड्यांवर अंड्याची चविष्ट व्यंजने मिळतात. अंडा गोटाला, अंडा खिमा, गोटी मसाला,ओम्लेट पेपर डोसा इ.
अंडा गोटाला मधे तव्यावर कांदा, टोमॅटो, लसूण पात आणि मसाल्याची ग्रेवी तयार करून त्यात उकडलेले अंडे किसून खिमा तयार केला जातो. तो सर्विंग डिश मध्ये काढून गरम असतानाच त्यात कच्चे अंडे फोडून व्यवस्थित घोटतात आणि बटर लावलेल्या पावसासोबत सर्व करतात

Chandu's picture

8 Feb 2019 - 12:28 am | Chandu

दुकान बन्द होते.एकदा सकाळी अणि एकदा दुपारी गेलो होतो.वेळे चा बोर्ड ही नव्ह्ता

उपेक्षित's picture

10 Feb 2019 - 7:17 pm | उपेक्षित

तुम्हि बहुतेक नविन नविन झाले तेव्हा गेला असाल कारण ८/१० दिवसांपूर्वी चक्कर मारली तेव्हा timing आणि कधी बंद असते तो बोर्ड लागला होता.

आपले आनंदराव (आनंदा) पण जाऊन आलेत बहुतेक.

Chandu's picture

15 Mar 2019 - 9:00 pm | Chandu

या वेळेस गेलो.दुकां उघडे होते.मालक आणी पदार्थ दोन्ही छान

प्रभाकर पेठकर's picture

16 Mar 2019 - 1:31 am | प्रभाकर पेठकर

पारशी जमात आणि अंडी हे नाते अतूट असते. प्रत्येक पदार्थात त्यांना अंडे लागते. ह्यावर विनोदाने असेही म्हंटले जाते की पारशी माणूस अंड्याच्या पदार्थातही वरून अंडे घालून खातो. एकदा पारश्यास कोणीतरी विचारले की तुम्हाला मांसाहाराची एव्हढी आवड असते तर तुमच्यात भाज्या खातात की नाही? तर त्या पारशाने अभिमानाने सांगितले, 'हो, आम्ही भाज्या खातो की. पण...त्यावर अंडे घालूनच.' विनोदाचा भाग वगळता त्यांच्याकडे अंड्याचे विविध प्रकार असतात.
'आकुरी' हा त्यातलाच प्रकार. कांदा, लसूण, टोमॅटो, कोथींबिर इत्यादी जिन्नस घालून मंद आंचेवर पूर्ण पण हलकेच शिजवायचे. कमी नाही आणि जास्त नाही. अंडे भुर्जी करतात तसे कोरडे असता कामा नये. तो एक क्रिमी पदार्थ असतो.
ह्यात वैविध्य आणण्यासाठी दूध, क्रिम सुद्धा वापरले जाते. तर बदामी रंगावर परतलेल्या बटाट्याच्या काचर्‍या, शिजवलेले छोटे प्रॉन्स, बोंबिल, लसूण पात तर कधी कधी बदाम, काजू आणि किशमिशही वापरले जाते. हे सर्व 'आकुरी' गॅस वरून उतरावयाचे ऐनवेळी घालून मिसळायचे आणि लगेच गरमागरम खायला घ्यायचे.

महासंग्राम's picture

4 Jun 2019 - 2:06 pm | महासंग्राम

१२३

२३४

आनंद बँजो कॅफे मधली 'झिंगाट भुर्जी' एकदा ट्राय कराच ! त्या सोबतच वेगवेगळ्या अंड्याच्या रेसिपी पण भारी मिळतात इथे. डेक्कन जवळचं दुकान रात्री उशिरा पर्यंत सुरु असल्याने भरपूर गर्दी असते इथे.

शाखा : १. डेक्कन चौपाटीची उजवी बाजू.(सुकांता कडे जाताना )
२.पूना हॉस्पिटलच्या सिग्नल जवळ.