कार्स आणि बाईक्स

गवि's picture
गवि in काथ्याकूट
13 Nov 2018 - 1:08 pm
गाभा: 

कार्स, बाईक्स आणि एकूण ऑटोमोबाईल या विषयावर अपडेट्स ठेवण्यासाठी आवश्यक असलेली चर्चा इथे व्हावी म्हणून हा धागा.

चालू घडामोडी या धाग्यात आगोदर प्रतिसाद म्हणून लिहिल्यावर तिथे तो मजकूर योग्य नसल्याचं वाटलं.

मुख्यतः नवीन वाहनं, मॉडेल्स, जुन्या वाहनांच्या नव्या एडिशन्स हे विषय गेल्या काही महिन्यांत सुसंगत झाले असं वाटतं.

सॅन्ट्रो नव्या रुपात, Datsun Go फेसलिफ्ट लॉन्च, टाटा हॅरीयर आगमन वगैरे या हायलाईट्स.

शिवाय आणखी एक विषय ,

२०१९ साली नवीन (आणि कदाचित जुन्याही) वाहनांसाठी काही कंपल्सरी बदल / उपकरणे इत्यादि घोषित झाली आहेत असं वाचलं. ही घोषणा बरीच जुनी असावी. विविध ठिकाणी वाचनात आणि ऐकण्यात आलेल्या तुकड्यांना जोडल्यास खालील गोष्टी अपरिहार्य होणार असल्याचं दिसतं.

-ABS

- ठराविक वेग उदा. ८० किमी प्रतितासपेक्षा वेग वाढल्यास आवाजी वॉर्निंग देणारं उपकरण

-एअरबॅग्ज (याविषयी खात्री नाही)

-नवीन क्रॅश टेस्ट मानक. यामुळे मारुती ओम्नी बंद होणार अशी बातमी वाचली. अन्य काही परिणाम आहेत का?

तो एक फास्ट टॅग या आगोदरच नवीन चारचाकी वाहनांना अनिवार्य झाला आहे.

यामध्ये आणखी काही माहिती असल्यास चर्चा व्हावी आणि या उपायांच्या व्यवहार्यतेबद्दल मत व्यक्त व्हावं.

स्पीड लिमिट ८० अशी फिक्स आहे की अडजेस्टेबल? बीपर एकदाच वाजून थांबणार की ८० च्या खाली वेग आणेस्तोवर सतत वाजत राहणार? तो बटन दाबून इग्नोर करता येणार का? याचे नियम ठरले आहेत का?

जुन्या गाड्यांना वरून ही फिटिंग्ज करून घ्यावी लागणार का? करता येतात का? (ABS, एअरबॅग्ज वगैरे)

आणखी काही कंपल्सरी गोष्टी येताहेत का? काही वाहनं कायमची भंगारात काढावी लागणार का?

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

13 Nov 2018 - 2:40 pm | अमर विश्वास

स्पीड लिमिट ताशी ८० किमी हे फक्त कमर्शिअल गाड्यांसाठी आहे ...

पर्सनल गाड्यांना गव्हर्नरची गरज नाही

२०१९ पासूनच्या नॉर्मस् प्रमाणे हे प्रायव्हेट कारसाठीही अनिवार्य आहे. त्याबाबत शंका नाही. शंका या नॉर्मनंतर येणारं उपकरण सेट करण्यायोग्य / ओव्हरराईड ऑप्शनवालं असेल का? असेल तर खरं म्हणजे कायद्याला अर्थ उरत नाही. पण किमान एकदा वेग ओलांडल्यास एकदाच आवाज आणि तो रिसेट करता येतो इतपत असेल काय?

अमर विश्वास's picture

13 Nov 2018 - 3:56 pm | अमर विश्वास

२०१९ पासूनच्या नॉर्मस् प्रमाणे हे प्रायव्हेट कारसाठीही अनिवार्य आहे --- हे माझ्या तरी वाचनात आले नाही ...
कारण दिल्ली च्या आसपासच्या हायवे वर वेगमर्यादा १०० किमी पर्यंत वाढवली आहे ... (सर्व गाड्यांसाठी)

आणि गडकरींचे हे स्टेटमेंट वाचा
No need for speed governors for commercial vehicles, taxis: ..

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/65708465.cms?utm_source=c...

गवि's picture

13 Nov 2018 - 4:28 pm | गवि

चांगलं आहे मग...

अमर विश्वास's picture

13 Nov 2018 - 2:42 pm | अमर विश्वास

गव्हर्नर ची लिमिट (८० किमी ताशी ) ही बदलता येते (Reset) ...

तसा गव्हर्नर बायपास ही करता येतो :)

हे सध्या असलेल्या ऑप्शनल (व्हॅल्यू एडिशन) उपकरणांबाबत करता येत असेल. ते फीचर कंपल्सरी झाल्यावरही ऑप्शन राहिला तर बरं.

स्पीड ओलांडायची इच्छा आहे असं नव्हे पण ८० ला केकाटायला लागणार असेल आणि थांबणार नसेल तर मोठ्या हायवेजवर कटकट आहे.

८० या स्पीडबाबत लोकांची काय मतं आहेत?

तुषार काळभोर's picture

13 Nov 2018 - 5:36 pm | तुषार काळभोर

आणि पुणे मुंबई एक्स्प्रेस वे सारख्या रस्त्यांवर 120 पर्यंत असायला हवं. नाहीतर एक्स्प्रेस वे या नावाला आणि टोल ला काय अर्थ??

जयंत कुलकर्णी's picture

13 Nov 2018 - 7:09 pm | जयंत कुलकर्णी

एकदा मुंबईहून पुण्याला कारने चाललो होतो. एका टोल नाक्यावर पोलिसांचा बराच मोठा ताफा गाड्या थांबवत होता. मलाही गाडी बाजूला घ्यायला सांगितले. ओव्हरस्पिडींगसाठी. किती स्पीड होता ? मी विचारले. ९० पोलीस म्हणाला. ८०च्या स्पीडनेच जाता येते एक्स्प्रे वेवर. मी म्हटले ठीक आहे. सगळ्या गाड्या जर ८० ने गेल्या तर ओव्हरटेक कसे करायचे ? पुढच्या गाडीला तू आता स्पीड कमी कर हे कसे सांगायच ? त्याला म्हटले प्रत्येक लेनला वेगवेगळा नियम पाहिजे तरच ओव्हरटेक करता येईल. मग तो मला साहेबाकडे घेऊन गेला. तीच रेकॉर्ड परत वाजविल्यावर साहेब म्हणाला, "तुम्ही हे खात्याला लिहा !''

गुपचूप पैसे भरले आणि ७०च्या स्पीडने निघालो. हो ! मागच्याला ओव्हरटेक करायचे असेल तर अडचण नको...:-)

याला बरीच वर्षे झाली. नुकतीच त्यांनी स्पीडगन आणली होती...

एन्ट्री टोल तिकीट वेळेचा स्टॅम्प एक्झिट टोल वर तपासून मधला वेळ मोजून अंतराच्या फिक्स गणितानुसार बाजूला घेणे असाही प्रकार काही काळ झाला. पण मध्ये फूड मॉलला थांबणारे लोक त्यातून सहज निसटत असत. केवळ नॉनस्टॉप फुलस्पीड मारणारे मात्र अडकायचे.

लई भारी's picture

14 Nov 2018 - 4:29 pm | लई भारी

आजच जावाच्या लाँच ची बातमी लोकसत्तामध्ये वाचली. छोटेखानी जाहिरात पण आलीय तुनळी वर. महिंद्राने विकत घेतलाय म्हणे ब्रँड.
जुनी जावा बघितली नाही कधी, बघूया आता ही घ्यायची इच्छा होतेय का!

हॅरियर विषयी तर प्रचंड उत्सुकता आहेच!

गवि's picture

14 Nov 2018 - 4:54 pm | गवि

हो हो.

जावा, येझदी, राजदूत हे एके काळचे लिजंड्स. जावाची वाट पाहत आहे.

गवि's picture

15 Nov 2018 - 3:43 pm | गवि

जावा लॉन्च झाली. १.५५ लाखांपासून पुढे.

फार महाग वाटते. स्पेक्स बघायला हवेत.

रेट्रो लुक मेंटेन केला आहे चक्क. उगीच ठिगळ लावून मॉडर्न / कंटेम्पररी बदल करायचा अर्धवट प्रयत्न दिसत नाही.

धन्यवाद.

माझ्या कल्पनेनुसार एक्सप्रेस वे सिमेंट कॅान्क्रिटचा आहे तो टायरमधली उष्णता वाढवतो पण शोषून घेऊ शकत नाही. डांबरी रस्ते करत असावेत. चारपदरी डामरी रोडस बरे.
२) विमानांचे टायरस नॅचरल रबराचे असतात ते जलद वाढणाऱ्या उष्णतेला सहन करतात.
३) टायरसचे ट्रेडिंग खासगी कारसचे बरे असते पण कमर्शल वाहनांचे पार गेलेले असते. आताच आबूला पार्कींगमधल्या उदेपूर/अहमदाबाद एसी बसेसचे टायरस पाहिले. ट्रेडस नव्हतेच,गुळगुळीत झालेले. हीच वाहने अपघात करवतात.
४) ज्या एसयुवि/ सुमोची जमिनीपासूनची उंची जास्ती आहे ती ८० पेक्शा अधिक वेगाने जाण्यास योग्य नसतातच तरी ती वेगात दामटतात हा ड्रायवरांचा दोष आहे.
५) भाड्याच्या वाहनांवर शिटा आणि वेगावर नियंत्रण पोलीस ठेवत नाहीत कारण खिसा भरत नाही. शिवाय झोप न घेता वाहने चालवतात मोबाइलवर बोलत . या्ंना आवरायची गरज आहे. आठ पंधरा लाखांचे वाहन स्वत:साठी घेणारा खूप काळजी घेत असतोच त्यांना त्रास का देता?

सस्नेह's picture

15 Nov 2018 - 1:22 pm | सस्नेह

AGS ऑटो गिअर शिफ्ट हा प्रकारही अलीकडे रुळला आहे. पण ऑटो गिअर शिफ्ट कार्स आणि गिअरवाल्या कार्स ,पिक अप आणि अ‍ॅव्हरेज या बाबतीत एकसारखा पर्फोर्मंस देतात की फरक पडतो हे कुणी अनुभवले आहे काय ?

Datsun रेडी गो ही लहान कार AMT व्हेरियंट चालवून पहिला. फारच चांगला अनुभव. कारला क्लच पेडल नाहीच आणि डावा पाय नुसता आरामात जमिनीवर टेकवून ठेवायचा हे आधी विचित्र वाटलं. डावा पाय आणि डावा हात गियर टाकायचा नसूनही वेग बदलला, चढ आला की उगीच जागीच शिवशिवत होते. तो अर्थात सवयीचा परिणाम. :-)

या ऑटो गियरमुळे मायलेज कमी होत नाही असं कंपनीचं म्हणणं. खूप काळ गियरवाली कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला "पुरेसा कंट्रोल" नसल्याचा फील मात्र किमान काही काळ येऊ शकतो.

अमर विश्वास's picture

15 Nov 2018 - 3:20 pm | अमर विश्वास

ऑटोमॅटिक कार घेताना AMT का CVT हे नक्के बघा.

AMT प्रकारात एक Power Lag असतो . हायवे वर ओव्हरटेक करताना चांगलाच जाणवतो
CVT मध्ये Power Lag खूपच कमी असतो

सस्नेह's picture

15 Nov 2018 - 6:34 pm | सस्नेह

हीच भीती वाटतेय ऑटो कार घेताना.
अर्थात, सवय होऊन जजमेंट आल्यावर कदाचित हा प्रॉब्लेम जाणवणार नाही, असं वाटतं.

अमर विश्वास's picture

16 Nov 2018 - 12:42 pm | अमर विश्वास

बिनधास्त ऑटोमॅटिक कार घ्या .... जजमेंट लगेच येते ...
सध्या माझ्याकडे एक ऑटोमॅटिक व एक मॅन्युअल गिअर ची कार आहे ....
दोन्ही गाड्या आळीपाळीने चालवतो ... आता सवय झाली आहे.. ट्राफिक मध्ये ऑटोमॅटिक सारखे सुख नाही

सुबोध खरे's picture

15 Nov 2018 - 7:57 pm | सुबोध खरे

AMT चे पेट्रोलचा खर्च गियर वाल्या गाडी इतकाच असतो पण त्याला वेग घेताना वेळ लागतो
CVT मध्ये वेग चटकन घेता येतो त्याची किंमत पेट्रोलच्या जास्त वापराने द्यायला लागते.
आपल्याला काय हवे आहे हे ठरवून त्याप्रमाणे गाडी घ्यावी

mrcoolguynice's picture

15 Nov 2018 - 4:50 pm | mrcoolguynice

( कल्पनाविलास )
मला अशी दुचाकी आवडेल ( की जिच्याबरोबर निर्मात्याने मला द्यावे, जरुरी स्पॅनर्स टूल्स, वॉशर्स गॅस्केट्स फिल्टर्स वैगरे कन्सूमेबल्सचा एक सेट.
इंजिन / इतर सिस्टिम्स खोलायची/जुळवायची (क्रमवार सचित्र पद्धत ) असलेलले म्यन्युअल्स )
म्हणजे मी जागाच्या कुठल्याही कोपऱ्यात का असेना,
मला माझी दुचाकी स्वतः मेंटेन ठेवता आली पाहिजे. तिचे सर्व स्पेअर पार्टस, कन्सूमेबल्स अमेझॉनवर मिळावेत...

झेन's picture

15 Nov 2018 - 8:41 pm | झेन

कल्पनविलास कशाला प्रत्यक्षात मिळते ना. पेट्रोल पण लागत नाही :-)

mrcoolguynice's picture

16 Nov 2018 - 12:37 pm | mrcoolguynice

;)

ता क: आणि रोडवर मी चालवु शकेल अशी स्वयंचलित दुचाकी

उगा काहितरीच's picture

16 Nov 2018 - 6:42 pm | उगा काहितरीच

दुचाकीची सर्विसिंग करताना काय काय गोष्टी तपासून घ्याव्यात ? नक्की काही भाग दुरूस्त केला का नाही हे कसं तपासावं ? अॉइल वगैरे बदलले का नाही कसं कळेल ?

न्यायालयाने खूप पूर्वीच हेल्मेटसक्तीचा आदेश दिलेला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी आता या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय.

मी सुरुवातीपासून हेल्मेटचा कट्टर समर्थक आहे.
त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांचे या निर्णयासाठी अभिनंदन आणि अंमलबजावणीसाठी शुभेच्छा!!

सुबोध खरे's picture

16 Nov 2018 - 7:46 pm | सुबोध खरे

पुण्यातील बऱ्याच लोकांचे मत आपले "डोके हेल्मेट घालण्याएवढे किमती नाही" असे आहे असे ऐकतो.

त्यातून अनेक लोकांचे मत "उजवा आरसा हा त्यांच्या डोक्यापेक्षा जास्त किमतीचा आहे" असे आहे त्यामुळे त्यांचे हेल्मेट हे डोक्याऐवजी उजव्या आरशावर ठेवलेले असते

तुषार काळभोर's picture

17 Nov 2018 - 5:10 am | तुषार काळभोर

जे लोक हेल्मेट न वापरण्याकगी कारणे देतात, ते मूर्ख असतात.

वडीलांनी १८व्या वाढदिवसाला १००० रुपये हातात ठेवले व म्हणाले एक हेल्मेट घ्यायचं, लायसन्स काढायचं आणि गाडी फिरवायची. (ज्यांना आपल्या १६ वर्षांचा कुलदीपकाच्या हातात पल्सर/करीझ्मा द्यावीशी वाटते, त्यांना आकाशातला बाप आमच्या बापासारखी बुद्धी देवो). त्यामुळे वैयक्तिक अनुभव आहे. हेल्मेट घातल्यावर डोकं दुखणं, मान दुखणं, आजूबाजूचं न दिसणं, कमी ऐकू येणं, हे गैरसमज आहेत. मी बर्‍याच मित्रांबरोबर डब्बलशीट फिरतो, दोघांनी हेल्मेट घालून... बायकोसुद्धा हेल्मेट घालून मागे बसते. निवांत गप्पा मारता येतात.

* "मी चांगली गाडी चालवतो, मला काही होणार नाही. मग हेल्मेट का घालू?" :- अरे, पण मागून येणार्या रिक्षा/ टवेरा/१६१२/इनोवावाल्याला नाय ना येत नीट चालवता! तो धडकल्यावर डोकं तुझं फुटणार आहे!!

* " पोलीस व हेल्मेट कंपन्यांचं कारस्थान आहे" :- असू दे की!! त्यानिमित्ताने तुझं डो़कं जर वाचलं, तर काय त्रास आहे?

* "हेल्मेटसक्ती नसावी, ऐच्छिक असावे" :- एव्ह्ढे आपले सामान्यनागरिक अक्कलवंत असते, तर सक्तीची गरजच नाही पडणार. (मैदानात प्रेक्षकांनी काही फेकू नये, म्हणून प्रेक्षक व मैदानामध्ये जाळी बसवण्याची गरज वानखेडेवर असते, लॉर्ड्स वर नाही)

* "हेल्मेट परवडत नाही" :- अरे कर्मदरिद्र्या, दहा हजाराचा स्मार्टफोन घेऊन दिवसाला १जीबी चा नेटपॅक टाकता येतो ना? त्याच मोबाईलच्या स्क्रीनसाठी १००-२०० चं केस आणि टेम्पर्ड ग्लास लावतोस ना? मग लाखमोलाचा जीव, तुझ्या आई-बापाचा आधार, बायकापोरांचा आधार, वाचवण्यासाठी घे की ८००-९०० चं हेल्मेट. नको टाकू ४ महिने नेटपॅक.

*

सुबोध खरे's picture

17 Nov 2018 - 10:21 am | सुबोध खरे

"हेल्मेट परवडत नाही"हि सर्वात भंपक सबब आहे.
दुचाकी कमीत कमी ४०००० ला येते त्यात २% अधिक घातले तर हेल्मेट येते.

ज्या दिवशी पुण्यातील लोकाना हेल्मेट वापरायची आणि सिग्नल लाथांबवण्ब्याण्याची सुबुद्धी येईल त्या दिवशी हे जग शांत झालेलं असेल.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2018 - 4:00 pm | मुक्त विहारि

जागतीक मध्यवर्ती ठिकाणी पण हीच बोंब आहे.

जे जे डोंबिवलीत, ते ते इतरत्र....

असो,

ज्या देशांत, वाहतूकीचे नियम कशोशीने पाळल्या जातात, ते देश सर्वच बाबतीत उत्तम प्रगती करतात, असे एक सामान्य निरिक्षण आहे.

इथे मारुती सुझुकी बॅलेनो या गाडीची कुणाला माहिती आहे का ?
परफॉर्मन्स कसा काय आहे ?

तुषार काळभोर's picture

17 Nov 2018 - 10:25 pm | तुषार काळभोर

परफॉर्मन्स माहिती नाही.
आमच्या सहा फुटी एचआर मॅनेजरच्या गाडीत तो चालवताना सीट मागे घेतो. तरी मला (६'२" +९४कि) त्याच्या मागच्या सीटवर आरामात बसता येतं. फार कमी गाड्यांत मला इतकं आरामात बसता येतं.

कपिलमुनी's picture

18 Nov 2018 - 1:51 am | कपिलमुनी

सस्पेंशन चांगले नाहीये. त्यामुळे छोटे खड्डे जाणवतात . वजनाला हलकी आहे त्यामुळे 100 नन्तर व्हायब्रेशन जाणवतात .
लुक्स, जागा , बूट स्पेस चांगली आहे.
केवळ सस्पेशनमुळे मी बुकिंग कॅन्सल केली .
बादवे पेट्रोल की डिझेल बघत आहात ??

सस्नेह's picture

18 Nov 2018 - 5:52 am | सस्नेह

पेट्रोल.
सस्पेन्शन चांगले नाही मग विचार सोडलेला बरा. कोल्हापूर आणि परिसरातील रस्ते दिव्य आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2018 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नुकतीच टॉप मॉडल घेतले आहे. डिझेल व्हेरीयंट आहे. अवरेज २४ देते. एका मित्राची जवळ जवळ २६ ते आपलं साठ ऐंशीच्या स्पीडने चालवतं गाडी. आणि मला जळवायला फोटो टाकतो.
बाकी, आपली स्पीड आपल्याला मर्यादेत ठेवायला डिजीटल आकडे मदत करतात.

मला आवडलीय गाडी. आता राहीलं खड्डे आणि सस्पेंशनचा प्रश्न.
रस्त्यावर ते सर्व अवलंबून आहे, मला चकाट रस्त्यावर अशी मजा येते ड्रायव्हींगला की विचारु नका.

-दिलीप बिरुटे

जावा बाइक्स लाँच झाल्यापासून उत्सुकता आहे. अगदी लहान असताना राजदूत बाइक वर फिरल्याच आठवतय, पण आमच्या आजूबाजूला कुणाकडेच जावा बाइक्स नव्हत्या, त्यामुळे उत्सुकता आधिकच आहे.
मला एक क्रूझर बाइक घ्यायची आहे बर्‍याच वर्षांपासून, बजेत अर्थातच १.५ लाखाच्या आसपास. आत्तापर्यंत रॉयल एन्फिल्डची बुलेट आणि बजाज अ‍ॅवेंजर हेच पर्याय होते, इंडियन मोटर्सचे काही मॉडेल्स आहेत पण त्यांच्याबद्द्ल विशेष माहिती नाही. माझा सगळ्यात मोट्ठा प्रॉब्लेम म्हणजे बाइक मेंटेन करायला असणारा कंटाळा, त्यामुळेच मी बुलेटच्या नादाला लागत नाही.
त्यामुळे जावा बाइक्सच्या मेंटेनन्स, राइड दर्जा बद्द्ल माहिती हवी होती. अर्थातच अजून या बाइक्स प्रत्यक्षात वापरायला सुरु झाल्यवरच अधिक कळेल, पण जुन्या बाइक्स कशा होत्या हे हवय.

अभ्या..'s picture

21 Nov 2018 - 3:45 pm | अभ्या..

जुनी जावा आणि येझदी २५० सीसी च्या होत्या. एअर कुल्ड टू स्ट्रोक सिंगल सिलिंडर इंजिन आणि डबल एक्झॉस्ट सायलेन्सर होते. १६ ते १३ बीएचपी पॉवर, ४ गिअर मॅन्युअल. जावाला गिअर लिव्हर हिच स्टार्टर किक होती. इंजिन चालू झाले की उलटून टाकता येत होती. येझदीला नंतर सेपरेट देण्यात आली. टू स्ट्रोक २५० सीसी असल्याने भन्नाट पिकप होता. स्टीलची कांडी असल्यासारखी चावी असायची. १६ इंचाचे स्पोक व्हील कदाचित सध्याच्या १७(नॉर्मली सगळ्याच सध्याच्या) १८(हिरोच्या बाईक्स आणि जुन्या बाईक्स) १९ (एन्फील्ड) च्या तुलनेत लहान वाटतील पण ग्राउंड क्लीअरन्स जास्त. पुढील टेलेस्कोपिक सस्पेन्शन आणि इंजिनातील अंतर व लाहान चाके ह्यामुळे इंजिनच्या पुढे काहीजण एक स्टेपनी व्हील लावत असत (संदर्भासाठी पाहा: कभी हां कभी ना मधील शारुखने वापरलेली बाईक) वजन साधारण १३० किलो असे. ह्या बाईक नंतर रॉकेलवर सुध्दा चालवत असत. त्यासाठी स्टार्टिंगला पेट्रोलची गुट्टी द्यावी लागे. त्याची एक छोटी पिचकारी सीटच्या खाली ठेवत असत. टोटल मेटल बॉडी असल्याने बांधणी मजबूत होती. ब्लॅक आणि चेस्टनट ह्या रंगात अ‍ॅव्हेलेबल होती. डिस्प्लेला फक्त स्पीडोमीटर आणि कीमी रीडिंग असे, फ्युएल गेज, आरपीएम वगैरे काही नाही. हेडलाईट हंडीतूनच बाहेर आलेला आडवा हँडलबार असायचा. तेथेच की एन्ट्री असायची. सीटच्या मागे कॅरीअर बसवत असत. पुढची नंबरप्लेट मडगार्डवर कर्व्ह बसवायची पध्दत असे. जावा आणि येझदी मधला फरक ओळखायची खूण म्हनजे जावाचा गिअरबॉक्स स्मूथ कर्व्हचा गुळगुळीत तर येझदीचा कटस असलेला होता. फ्युएल टँक १४ लिटरचा असे, साधारण २५ ते ३५ च्या दरम्यान मायलेज असे. रॉकेलवर ते परवडत असे. टँकवर मांडीचा पार्ट जिथे येतो तिथे रबर पॅडस असायचे. टाकीच्या त्या पार्टवर दोन्ही साईडला क्रोम फिनिशची स्टाइल होती. जावा एकच माहीत आहे, येझदीचे मात्र डिलक्स, क्लासिक, १७५, सीएलटू, ऑइलकिंग, रोडकिंग, मोनार्क हे मॉडेल्स माहीत आहेत. सध्याच्या फॅशननुसार कॅफे रेसर किंवा बॉबर म्हणून मॉडीफाय करायला जावा आणि येझदी आदर्श मॉडेल आहेत.

रंगासेठ's picture

21 Nov 2018 - 5:31 pm | रंगासेठ

धन्यवाद अभ्याशेठ. :-) एकदम डोळ्यासमोर उभी राहिली बाइक.

चिगो's picture

21 Nov 2018 - 9:34 pm | चिगो

लै भारी माहिती दिली तुम्ही, अभ्यासेठ.. मला जावाची बाॅबर स्टाईलमधली ‘पेरॅक’ आवडलीय, आणि तिची वाट बघतोय. ‘राॅए’च्या गाड्या आवडत नाहीत, म्हणून ’क्लासिक’ टायपातल्या जावाच्या गाड्यांचा लूक ठेवून त्यात जर आधुनिक फिचर्स आणले असतील, आणि गुणवत्ता चांगली असेल, तर जावाच उचलणार..

अभ्या..'s picture

23 Nov 2018 - 6:28 pm | अभ्या..

ऑफकोर्स चिगो सर. जावा हा बेस्ट ऑप्शन आहे.
कसं झालंय की एन्फील्ड ला कॉम्पीटिशन नव्हती फुल मेटल पॉवरफुल बाईक्स मध्ये. शिवाय रेट्रो लुक, आर्मीचा अ‍ॅक्सेप्टन्स, इतर बाईकपेक्षा जास्त पॉवर ह्या सगळ्या फॅक्टरमुळे रॉयल एन्फिल्डला आयशरने घेतल्यापासून चांगले दिवस आले. नॉर्मली लोक्स डायरेक्ट आजच्या गाड्यावर येतात. पण मधला इंडीयन बाईकचा प्रवास हा खूप इंटरेस्टिंग आहे. ह्या काळात जब्बरदस्त पॉवरची आरडी ३५० होती, ३०.५ बीएचपी आउटपुट ३५० सीसीचे बुलेटचे इंजिनही देत नाही, तिची लहान आवृत्ती आरेक्स हंड्रेड होती, यामाहाप्रमाणेच १०० सीसी इंजिनात सुध्दा १४ बीएचपी देणारी सुझुकी शोगन होती, वापरायला सोपी अशी जावा येझदी होती, बुलेटचीही मिनि बुलेट होती. काही गाड्या पर्यावरण मानकांमुळे बंद करण्यात आल्या, काही गाड्या मायलेज कॉम्पीटिशनमुळे बंद झाल्या.
आता एन्फिल्ड ला जावा स्पर्धा देईल शुअर. रेट्रो लुक तर मेंटेन केलाच आहे पण इंजिन स्पेसिफिकेशन जबरदस्त आहे. टोटल लुक स्लान्टेड आणि फ्ल्युएन्ट लाईन्स असलेला आहे. कलर्स अगदी रेट्रो टाईपचे दिलेले आहेत. सिंगल चॅनेल एबीएस आहे. इन्फर्मेशन डिस्प्ले हायब्रीड आहे. ऑइल कुल्ड इंजिन आहे, ड्युअल सायलेन्सरमुळे जुनी शान मेंटेन झाली आहे. त्याने फायरिंग साउंड मध्येही फरक पडेल. हेवी असूनही सिटी आणि हायवे दोन्हीकडे वापरायला हॅन्डी वाटतेय. पेराक बॉबर आहे पण सिंगल सीट आहे. त्यापेक्षा मला जावा ४२ प्रचंड आवडली आहे. हेवी इंजिनसह तसा लुक आणायचा बजाजला चाम्गला चान्स होता व्ही सीरीजमध्ये, रिअर मडगार्ड आणि हेडलाईटचे फालतू डीझाईन आणि १५०, १८०, २२० ची सर्व इंजिने वापरुन व्हेरिएंट द्यायची बजाजची जुनी खोड ह्यामुळे ती सिरिज वाया गेली, नुसते विक्रांतचे स्टील हा युएसपी लोकांना कळलाच नाही.
असो. जावा आधीही चालवलीय, आता वेळ आणि संधी मिळाल्यास अवश्य घेणार.

सुबोध खरे's picture

23 Nov 2018 - 7:44 pm | सुबोध खरे

मी जावा आणि येझदी दोन्ही गाड्या व्यवस्थित चालवल्या आहेत. त्यांचे तंत्रज्ञान इतके जुने असून त्या "चालल्या" याचे कारण त्यांना स्पर्धा नव्हती. स्पर्धा आल्यावर या गाड्या बाराच्या भावात गेल्या. आज आपण विचारही करू शकत नाही असे कमकुवत दुवे होते या गाड्यात
१) गाडीची बॅटरी चार्ज होत नसे. त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज झाली कि एक दीड महिन्यांनी चार्ज करून घ्यावी लागत असे.यामुळे बहुसंख्य लोकांच्या येझदी ची बॅटरी गेलेली असे.
२) बॅटरी गेल्यामुळे गाडीचा हेड लाईट उदबत्ती किंवा फारतर मेणबत्ती सारखा प्रखर असे. शिवाय हॉर्न वाजत नसे. (तेंव्हा येझदी बद्दल असे म्हणत कि तिचे हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजत असत.) पण मुळात इंजिनचा आवाजच इतका असे कि येणाऱ्या माणसांना कळत असे कि येझदी आली.(त्या काळात रस्त्यावर वाहने मुळातच इतकी कमी होती की एखादी मोटार सायकल येते आहे हे दुरूनच कळत असे)
३) कार्ब्युरेटरला फ्लोट चेंबर/ फ्लोट पिन नव्हती. त्यामुळे पेट्रोल कॉक उघडा राहिला तर सगळे पेट्रोल थेट इंजिन मध्ये उतरत असे. सकाळी सकाळी अशा गाडीचे चालक पेट्रोल कॉक बंद करून चावी काढून इंजिनमधले पेट्रोल संपेपर्यंत किक मारत बसलेले आढळत असत. हि इतकी मूलभूत गोष्ट या मोटार सायकल मध्ये कशी नव्हती हेच आश्चर्य मला तेंव्हा सुद्धा वाटत असे. बहुसंख्य गाडीवाले शेवटच्या १०-१२ मीटर मध्ये प्रथम पेट्रोल कॉक ऑफ करत आणि मग गाडी घरंगळत आणून त्यावरून उतरत असत.
४) २ स्ट्रोकची गाडी असल्याने एक लिटरला ५०-६० मिली इंजिन ऑइल लागत असे आणि यामुळे गाडी भरपूर धूर काढत असे आणि कार्ब्युरेटरची स्थिती जरा बिघडली कि दोन्ही नळकांड्यातून महा पालिकेच्या डास निर्मूलनाच्या धुरळणी यंत्रातून येतो तसा धूर येत असे.
५) २५० सीसी ची असून तिची अश्वशक्ती केवळ १६ bhp इतकी होती. आणि ऍव्हरेज २५ kmpl. १४४ किलो वजन होते. येझदीच्या १४४ किलो ला १६ bhp म्हणजे १११ bhp/ton या शक्तीशी तुलना केली तर १०० सीसी ची यामाहा RX १०० हि ११ bhp मोटार सायकल ९५ किलोची होती म्हणजे ११.५ bhp/ton यामुळे सिग्नलवर यामाहा RX १०० येझदी ला हरवून सहज पुढे जात असे.
६) गिअर लिव्हर उलटी करून तिची किक मारायला लागत असे त्यामुळे मध्येच बंद पडली तर बसल्याबसल्या किक मारायची क्लृप्ती ज्यांना जमत नसे त्यांना पार उतरून गाडी मध्य स्टॅण्डवर लावून किक मारायला लागत असे. त्यातून ते तंत्र न शिकलेल्या लोकांनी उलट्या येणाऱ्या किकचा मार भरपुर खाल्ला आहे.
७) तिच्या तुलनेत बुलेट ३५० चे तेंव्हा पण ४ स्ट्रोक इंजिन असल्याने ३५ चे ऍव्हरेज मिळत असे शिवाय त्यात इंजिन ऑइल जळत नसल्याने त्याचा अतिरिक्त १० % खर्च कमी होता. बुलेट तेंव्हा २० bhp शक्तीची होती.
८) बुलेट येझदी किंवा जिवाच्या तुलनेत तंत्रज्ञानात कितीतरी पुढे होती पण वजन १८० किलो असल्यामुळे तेंव्हा बटण स्टार्ट नसल्यामुळे काडी पैलवान लोकांना बुलेट झेपत नसे(आणि तिची बॅक किक जोरदार झटका देत असे)
( आजकाल जोराचा वारा आला तरी उडून जातील असे टिनपाट लोकही बुलेट चालवू लागले आहेत ते याचमुळे.)
९) राजदूत हि दूधवाले सर्रास वापरत असल्यामुळे तरुण लोक ती शक्यतो घेत नसत
१०) बुलेट झेपत नाही आणि राजदूत दुधवाल्यांची यामुळे जावा / येझदी हि तरुणात लोकप्रय होती.
११) बजाज स्कुटर बुक केल्यापासून १० -१३ वर्षे काळाने मिळत असे. शिवाय ते फॅमिली वाहन होते त्यामुळे तरुण मुलांना मोटारसायकलचे आकर्षण जास्त असे.
बजाज स्कुटर सकाळी चालू करण्यासाठी तिच्या कार्ब्युरेटरमध्ये पेट्रोल उतरण्यासाठी डावीकडे वाकडी करावी लागत असे. अन्यथा चालू होत नसे. जेंव्हा श्री राहुल बजाज एअर इंडियाचे चेअरमन झाले तेंव्हा जंबोजेट चालू करण्यासाठी सकाळी डावीकडे वाकडे करावे लागते असा विनोद लोकप्रिय झाला होता.

बाकी आपल्या तारुण्याच्या काळात जी गोष्ट, वस्तू, हिरो किंवा हिरोईन लोकप्रिय असते त्याबद्दल एक आपुलकी वाटते म्हणून बऱ्याच लोकांना जावा येझदी बद्दल आकर्षण वाटते.
जसे त्या काळातील लोकांना हेमा मालिनी, आशा पारेख, वैजयंती माला, आशा काळे अशा "सुदृढ" नट्यांबद्दल आकर्षण वाटते तसेच जावा येझदी बद्दल आहे.( nostalgia-गतकाळा बद्दल वाटणारी ओढ).
अन्यथा चवळीच्या शेंगेसारख्या ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित सारख्या नेत्यांसमोर त्यांना उभे केले तर दोन मुलांच्या आया असाव्यात अशा दिसतात.

मार्मिक गोडसे's picture

23 Nov 2018 - 8:35 pm | मार्मिक गोडसे

माझ्या आजोबांची राजदूत (१९७२) आणि चुलत आजोबांची येझदी (१९७७) ह्या दोन्ही गाड्या दहा वर्षापूर्वी वापरात होत्या, आता आठवण म्हणून सध्या अडगळीत पडल्या आहेत. मला
yezdi पेक्षा राजदूत बरी वाटते. Yezdi वळवायला बरीच जागा लागते, तुलनेने राजदूत सायकलसारखी वळवता येते. किक आणि गेअर अगदी बोअर वाटतात yezdi चे. माझ्या चुलत आजोबांनी yezdi च्या सिटला मागे पकडण्यासाठीचे हॅण्डल लावले नव्हते, तेव्हा तशी फॅशन होती असे म्हणतात.त्यामुळे माझ्या आजीला कायम जीव मुठीत घेवून बसायला लागायचे.
आजोबांनी गाडीचा monogram उलटा करून लावला होता, त्यामुळे yezdi नाव ipzah असे दिसल्याने ही कोणती नवी गाडी असं लोकं विचारायचे.

आमोद's picture

25 Nov 2020 - 12:09 pm | आमोद

सधया मिशेलीन चे टायर मिळत नाहीयेत.. परयाय काय? योको चा अनुभव कसा आहे?