सामाजिक प्रतिष्ठा

सखाराम_गटण्या's picture
सखाराम_गटण्या in काथ्याकूट
9 Oct 2018 - 4:43 am
गाभा: 

नमस्कार मिपाकरानो, काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की (खोट्या)सामाजिक प्रतिष्ठेसाठी वडील आणि सावत्र आईने मुलीची हत्या केली. मुलगी mbbs करत होती बहुतेक आणि मुलगा शेत गड्याचा होता शिक्षण वगैरे काही सांगितलेले नाही.तर ह्या बातमी वरील प्रतिक्रया वाचल्या बहुतेक करून बापाने योग्यच केले किंवा ज्यानी त्या मुलीचे समर्थन केले त्यांना उलट प्रश्न आले की तुमची बहिण असती व मुलगी असती तर काय केले असते ? मुळात हत्येचे असे समर्थन कसे काय होऊ शकते ?.आता जे काही झाले मुलीचीही त्यात चूक असू शकते-आहे. अगोदर साळगाड्याच्या मुलाबरोबर लग्न केले म्हणून समाजाने छि- थू केली असती।।।अन आता पोटच्या पोरीला मारले म्हणून समाज छि थू करेल। तर अश्या सामाजिक प्रतिष्ठेला खरच महत्व देण्याची गरज आहे का ? ह्यावर आपले काय मत आहे ?

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

11 Oct 2018 - 6:56 pm | तुषार काळभोर

चहासारख्या उत्तेजक पेयांपासून आणि सैराटसारख्या हिंसक चित्रपटांपासून मी स्वतःस अलिप्त ठेवले आहे.

Ram ram's picture

29 Oct 2018 - 1:54 pm | Ram ram

Porine bapachya pratisthecha vichar karava. Marale te yogya.

माहितगार's picture

29 Oct 2018 - 2:20 pm | माहितगार

????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

धागा लेखक म्हणतात म्हणुन महाराष्ट्र टाईम्स च्या बातमी खालील प्रतिक्रीया पाहिल्या ४० पैकी १२ , म्हणजे अदमासे ३०% तरी प्रतिक्रीया सुस्पष्टपणे मुलामुलीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारत आई वडीलांचे समर्थन करणार्र्या असाव्यात असे प्रथम दर्शनी दिसते.

पुढारी आणि सकाळ खाली कॉमेंट सेक्शन रिकामे आढळले पण इ सकाळ वृत्ताखाली हॅप्पी अँग्री सॅड अशा भावनांना वोट करता येते. -अशी वोटींग साख्यिकीय दृष्ट्या पुरेशी खात्रीची मानणे कठीण असते पण तरीही या निमीत्ताने दखल घेण्यास हरकत नाही. ईसकाळवर (२६ पैकी) ५४ टक्क्यांनी अँग्री २७ टक्के सॅद तर १२ टक्क्यांनी हॅप्पी याला वोट केले आहे. पुढारी वर (२५ पैकी) ८% अँग्री, आणि ८८ % हॅप्पी नोंदवल्याचे दिसते.

तसे पहाता चैकशी होऊन सिद्ध होणे बाकी अहे, प्रतिक्रीयांची संख्या तशी कमी असल्यामुळे महाराष्ट्राने बातमीची फारशी गंभीर दखल घेतल्याचे दिसत नाही. मटा सकाळ पुढारी चा वरील आकडेवारीचा सरासरी काढला तर प्रथा मोडणार्‍या प्रेमविवाहांना साधारणतः ३० ते ४० % लोकांचा तरी प्रखर विरोध अद्याप असण्याची शक्यता असू शकते अर्थात सर्वेक्षणाच्या दर्जाच्या दृष्टीने उपरोक्त आकडेवारी पुरेशी ठरत नाही, हे ही लक्षात घ्यावे लागते.